काल पुणे मिरर पान क्र.२ वरील बातमी वाचली आणी तळपायाची आग मस्तकात गेली. काही महिन्यांपूर्वी हिंजवडी येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणार्या तीघांना जन्मठेप झाल्याच्या बातमीबरोबरील फोटो पाहून कोणत्याही सामान्य माणसाला चीड आल्याशिवाय राहणार नाही.
शिक्षा झालेला गुन्हेगार एखाद्या ऑलिंपिक विजेत्याच्या थाटात हात उंचावून, जमलेल्यांना निगरगट्टपणे अभिवादन करत होता. मुळात, बलात्कारासारखा नीच गुन्हा करून एका स्त्रीच्या व तिच्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्या हरामखोरांना अतिशय निर्घ्रुण शिक्षेची तरतूद असायला हवी. त्याचबरोबर प्रश्न असा पडतो की असला फोटो छापून या माध्यमांनी काय साध्य केले? हे फोटो पाहून सामान्य, कायद्याचे पालन करणार्या, लोकांना आपल्या दुबळ्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर वाटेल का? बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबियांवर, मित्रमैत्रिणींवर, असले फोटो बघून काय परिणाम होईल? त्यांच्या प्रति या माध्यमांची काही जबाबदारी नाही का? न्याव्यवस्थेवर विश्वास असलेल्यांचे मानसिक खच्चिकरण असल्या गोष्टींमुळे होत नाही काय? अप्रत्यक्षपणे गुन्हेगारांच्या उदत्तिकरणास यामुळे हातभार मिळत असावा काय?
असल्या गुन्हेगारांना पोलीस फरपटत नेत आहेत, तुडवून काढत आहेत, अशी द्रुश्ये फक्त चित्रपटातच पहायला मिळणार काय?
प्रतिक्रिया
23 Oct 2011 - 12:46 pm | चिंतामणी
छापणा-या वर्तमानपत्राचा आणि आरोपींचा.
मिडीयाला येनकेन प्रकारणे "हलचल" निर्माण करायची असते. ज्यामुळे संबधीत वर्तमानपत्राचे/ वाहिन्यांचे नाव चर्चेत रहाते. यासाठी कुठल्याही थराला जातात. खरे सांगायचे तर असल्या वर्तमानपत्रांवर, वाहिन्यांवर सामुहीक बहीष्कार टाकला पाहीजे.
आरोपींबद्दल न बोलणेच चांगले.
याच संदर्भात "टेनिसपटू रुचिका गिऱ्होत्रा विनयभंग प्रकरणातील आरोपी हरियानाचे माजी पोलिस महासंचालक एस. पी. एस. राठोड याच्यां" वक्तव्याची आणि कृतीची आठवण झाली.
हे पहा..
हा निर्लज्ज माणूस सांगत आहे की "हसण्याची कला नेहरुंकडून शिकलो". या गोष्टीलासुद्धा वाहीन्यांनी प्रसिध्दी दिली होती.
23 Oct 2011 - 4:10 pm | आत्मशून्य
.
23 Oct 2011 - 10:46 pm | गवि
-1
After seeing such photo, बघा कसा निर्ढावलेला निबर निर्लज्ज आहे असं इंप्रेशनच लोकांच्यात होईल.उदात्तीकरण होणार नाही.निर्लज्जपणा highlight करणं हाही उद्देश असेल पेपरचा.
24 Oct 2011 - 4:05 am | शिल्पा ब
तसं वाटत नाही.
24 Oct 2011 - 9:56 am | श्रीरंग
बरोबर आहे गवी.
निर्लज्जपणा अधोरेखित करण्यासाठीच तो फोटो छापला असणार.
माझे म्हणणे इतकेच आहे, की असे फोटो बघून बहुतांशी लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत असावा. आरोपींना भिती देखील वाटू नये शिक्षेची, हे पाहणं बर्याच लोकांसाठी मनोधैर्य खालावणारं असावं. बाकी वर म्हटल्याप्रमाणेच शोषित मुलीला ओळखणार्यांसाठी तर हा फोटो म्हणजे थोबाडीत खाल्ल्यासारखा वाटत असेल.
ज्याप्रकारे एखाद्या खुनाचे वार्तांकन करताना त्यातील क्रौर्य ठळकपणे दाखवण्यासाठी छिन्नविच्छिन्न म्रुतदेहांचे फोटो छापणं अनावश्यक असतं, तसाच संयम या बातमीच्यावेळी दाखवणं देखील गरजेचं होतं.