या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे. तो हा,,,की विषय व भावना जरी एक असली, तरी त्यांनी जे चित्र उभं केलय,त्यापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ होण्याचा माझा प्रयत्न आहे.
धार्मिकांच्या आतमध्ये निधर्मी हा देश आहे
धर्म त्याचा आत्मा अन सेक्युलरी वेष आहे
काही असे निधर्मी काही तसे स्वधर्मी
सांगोत कोणी काही डोळ्यात फक्त गुर्मी
झेंड्यात फक्त त्यांच्या देशभक्ती 'पेश' आहे
देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे
खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे
धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे
महा-राज दाढीवाले सदगुरुही चकचकीत
सोज्वळंही कुणी भासे,भासे कुणी भगभगीतं
उत्पादने ती वेगळी पण कंपनी ती एक आहे
भक्तीलाही 'भाव' मोठा,पूजकांसी काय तोटा
दहा किलोचे 'फळं' हवे मग,दलालांना फेक नोटा
कर्मयोगा कुजवलेला षंढ तेथे त्वेष आहे
देवालयाच इतुकी मद्यालये इथेही
अभिषेक करुन घेण्या गर्दी जमे तिथेही
नंतर पुन्हा कसे ते?...सारेच 'थंड' आहे
गरीबीसही आळसाचा सदोदीतं शाप आहे
पूर्व जन्मीचे प्रतापं...लोणंकडी थाप आहे
''हरवूच शोषकांना''...नुसता आवेष आहे
प्रतिक्रिया
18 Oct 2011 - 1:10 am | प्रकाश१११
-खरेच खूप छान जमलीय कविता.
देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे
खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे
धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे
छान ..!!
18 Oct 2011 - 6:50 am | प्रचेतस
मस्त हो भटजीबुवा.
सुरेख कविता लिहिली आहे.
18 Oct 2011 - 8:08 am | पाषाणभेद
फटका जबरदस्त बसतो आहे. छान काव्य.
18 Oct 2011 - 9:08 am | किसन शिंदे
अतिशय सुंदर काव्य.
18 Oct 2011 - 10:00 am | अत्रुप्त आत्मा
प्रकाश१११, किसनराव,पा.भे,वल्ली ... सर्वांना धन्यवाद ...
अवांतर-या प्रकारच्या कवितांना प्रतिसाद मिळाले की खरच बरं वाटतं... :-)
18 Oct 2011 - 10:02 am | मनीषा
छान आहे कविता..
देउळे नी राउळे ती भक्तीचे बाजार सारे
खंगलेल्या माणसांचे मनाचे आजार सारे
धर्म म्हणजे प्रेम म्हणुनी नजरेत सारा द्वेष आहे ... अगदी खरं आहे !
18 Oct 2011 - 1:37 pm | विजुभाऊ
रामदास फुटाणे स्टायलीत ल्हिले आहे
18 Oct 2011 - 1:51 pm | अत्रुप्त आत्मा
रामदास फुटाणे स्टायलीत ल्हिले आहे
असेल... सेहेवाग खेळताना तेंडल्याचा भास होतो कधी कधी.... बघणाय्रांना ;-)
19 Oct 2011 - 12:08 am | गणेशा
अप्रतिम
आणि
हे मात्र व्यव्स्थीत नाही वाटले.
त्याएवजी
कपणीत रोश आहे आणि उरला कोठे जोश आहे..
असे काही तरी असते तर छान वाटले असते असे वाटते.