(रमी)

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जे न देखे रवी...
17 Sep 2011 - 3:47 am

यासाठी वापरलेला कच्चा माल
पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे.

त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला
असीमकौशल्ये प्रकटे रमी
एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा
पाठराखीण जिची लक्ष्मी
अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला

लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली.
:)

भयानकहास्यप्रेमकाव्यविडंबनसुभाषिते

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2011 - 3:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाषाणभेद's picture

17 Sep 2011 - 3:58 am | पाषाणभेद

हा हा हा

मस्त विडंबन जमलेय.

नव्या ऐवजी दस्सा नाही का मिळाला?

काल मी "रम" विषय घेवून तिन ओळी बनवल्या होत्या. पण नंतर (फुलांची बाग) करतांना हा प्रयत्न सोडून दिला. (फारच थोड्या लोकांनी ती फुलबाग बघीतली. परदेशी पाहूणे आलेल्या पर्यटकांना ती फुलबाग सहन न झाल्याने माळ्याने नंतर ती फुलबाग उखडून टाकली. असो.)

रमा, रमी झाली आता कुणीतरी 'रम' घ्या आता.

अरे वा डांबीस? किती छान लिहिल आहे.

त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला
असीमकौशल्ये प्रकटे रमी

अगदी सह्ज ताल येतो वाचता वाचता. सुंदर !

एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा

एक या शब्दाची द्विरुक्ती सुंदर ! पण क्वचित नंतर छोटासा पॉज घ्यावासा वाटतोय, अन मग विदूषकस्पर्शा, मला वाटतय 'राजा ही' नंतर पण एक पॉज चालेल

पाठराखीण जिची लक्ष्मी
अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला

सुरेख हो ! सुरेख ! चारच ओळी पण सुरेख !

स्पंदना's picture

18 Sep 2011 - 10:18 am | स्पंदना

हेच म्हणायला आले होते.

खुपच छान अन अभ्यासपुर्ण काव्य !!

सुरेख सुरेख!

सिद्धार्थ ४'s picture

17 Sep 2011 - 4:29 am | सिद्धार्थ ४

मस्त विडंबन जमलेय. :)

>> एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा >>
=)) =)) =))

प्रियाली's picture

17 Sep 2011 - 6:12 am | प्रियाली

पिडांना रमी लागलेली दिसते

आत्मशून्य's picture

17 Sep 2011 - 6:24 am | आत्मशून्य

हॅहॅहॅ

मूकवाचक's picture

17 Sep 2011 - 12:28 pm | मूकवाचक

खतरनाक ...

नगरीनिरंजन's picture

17 Sep 2011 - 6:45 am | नगरीनिरंजन

त्रयोदशगुणी एक्का, राजा वगैरे म्हणजे पत्त्यांतून रमी प्रकटली आणि तिची पाठराखीण लक्ष्मी आहे ही जुगाराची व्यसनप्रधान कल्पना मला टाकाऊ वाटते. त्यामुळे कवितेचा आस्वाद वगैरे घेणं मला जमणार नाही.

शहराजाद's picture

17 Sep 2011 - 7:21 am | शहराजाद

फर्मास विडंबन

चतुरंग's picture

17 Sep 2011 - 7:43 am | चतुरंग

जबराट हो पिडा! मस्तच जमवलीए की रमी!! ;)

(रमी कशी खेळतात हे नेहेमीच विसरणारा) रंगा

पैसा's picture

17 Sep 2011 - 7:51 am | पैसा

लेखनाची क्याटेगरी "प्रेमकाव्य" वाचूनच ह.ह.पु.वा.
एकच शंका आहे,
>>रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली.
म्हणजे शेवट पत्ते फेकून दिलेत की काय?

विकास's picture

17 Sep 2011 - 9:37 am | विकास

मस्तच! =))

मला या निमित्ताने गदिमांची "रमी" नामक कविता आठवली!

सुहास झेले's picture

17 Sep 2011 - 10:10 am | सुहास झेले

वाह वाह... मस्त जमलीय रमी :D :D

कॉमन मॅन's picture

17 Sep 2011 - 10:10 am | कॉमन मॅन

मस्त! :)

कॉमॅ.

चित्रा's picture

17 Sep 2011 - 10:51 am | चित्रा

मस्तच विडंबन!

श्रावण मोडक's picture

17 Sep 2011 - 11:00 am | श्रावण मोडक

बसलं पाहिजे एकदा डाव जमवायला.

बसलं पाहिजे एकदा डाव जमवायला.

सहमत. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2011 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

रचनेचा प्रयत्न बराच चांगला आहे,,,पण हीचे व्रुत्त काय समजावे,की अनाव्रुत्त समजावे...पण अनाव्रुत्तही म्हणता येत नाही...

राहुन राहुन काही तरी राहिल्यासारखे वाटते...

विनायक प्रभू's picture

17 Sep 2011 - 1:19 pm | विनायक प्रभू

'रम' ला विसरलात?
येउ द्यात.
(प्रतिक्षेत विप्र)

तिमा's picture

17 Sep 2011 - 5:02 pm | तिमा

झणझणीत चटकदार चकणा, काजु, टिक्काही लाभला
गांधीदिनी, निराश मन असता, म्हातारा भिक्षु हसला |
सेलावरी कॉल करुनी, तो मित्रगण जमविला
करर्र, दोन कॅट मिसळूनी, रमीचा डाव टाकिला|
पेल्यावर पेले रिचवुनि, स्वर जेंव्हा उच्च जाहला
उदरातील अग्नि प्रज्वलित, तो स्वर्ग उभा ठाकला ||

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2011 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

महान विडंबक पिडामास्तुर की जय! ;-) ...की जय! ;-) ...की जय! ;-)

बोला पुंडलिकानी वरुन जोरात हा..णली विटकर... :-D