साद रामेश्वरमची .... - भाग १

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
30 Aug 2011 - 7:59 pm

साद रामेश्वरमची .... - भाग १

"शशिकांतजी आप को हमारे साथ रामेश्वरम आना है।"
असा हुकूम वजा आदेश मला फोनवरून आला व मी तात्काळ होकार कळवला. झाले. मी कामाला लागलो.
तोवर हवाई प्रवासाची तिकीटे आली.
मधल्याकाळात मला महर्षीं अत्रींच्या जीव नाडीत सांगण्यात आले,
"तुला सांगून अजूनही अमुक अमुक ते सोपस्कार तू केलेले नाहीस. आम्हाला कल्पना आहे की तू मुद्दाम टाळत नाहीस पण त्याची तातडी आहे हे लक्षात ठेव. मी, अत्री, आता नाडीवाचकाला अशी आज्ञा करतो की त्याने तुझ्यासाठी व तुझ्या पत्नीसाठी सांगितलेली गोष्ट त्याच्या खर्चाने करावी."
मी ते उत्तर ऐकून थक्क झालो. कारण आत्तापर्यंत माझ्या व कुटुंबियांकरिता केलेल्या सर्व शांती-दीक्षा माझ्या खर्चाने मी करत आलो आहे. पुर्वीपासून अनेक लोक त्यांचे अनुभव मला सांगत की त्यांना शांती-दीक्षेच्यासाठी महर्षी म्हणाले की तुला परवडेल तितकी दक्षिणा नाडीवाचकाला दे किंवा तुला शांतीदीक्षा करायची गरज नाही. तू जे नाडी वाचकाला देशील ते पुरे आहे. ते आदेश नाडी केंद्रातील लोक तत्परतेना पाळतात. जादापैशाची मागणी करत नाहीत.
आजकालच्या जमान्यात पैशासाठी काहीही करायला तयार असलेले लोक पाहून असे काही नाडीकेंद्र चालक महर्षींचे आदेश आपणहून मानतात वेळोवेळी फुकट नाडी कथन करतात यावर विश्वास बसणे शक्य नाही. आता तर त्याचा मला पण प्रत्यक्ष अनुभव येणार होता. नाडीवाचन झाल्यावर नाडी केंद्र संचालक म्हणाले, "असे आदेश मला आधून मधून मिळतात. तेंव्हा आपण संकोच मानू नका. आपणां उभयतांसाठी सर्व व्यवस्था मी करतो. आपण केंव्हा तमिळनाडूत जाणार ते फक्त ठरवा."
या दरम्यान मला रामेश्वरला जायला निमंत्रण आले. एरव्ही टाळमटोल करणारी पत्नी ही आश्चर्यकारकरित्या तयार झाली लगेच तिचे हवाईतिकीट काढले.
रामेश्वरमला जायला मदुराईपर्यंत हवाईप्रवास झाला. एक मिनी बस तयार होती. त्यात आरूढ होऊन आमची रामेश्वरमला रवानगी झाली. तेथील समुद्रात स्नान झाले आणि आम्ही नाडी वाचनाला सरसाऊन बसलो.
"आज नाही उद्या सकाळी" असा आदेश झाला म्हणून रात्री गप्पांना उत आला.
"बताईये ना शशिकांत जी, आजकल आपका क्या चल रहा है? अशा विचारणांना उत्तरे देता नाकी नऊ आले.
आमच्यासोबत आलेले १२जण आधी एकदा रामेश्वरमला येऊन परत काशी-वाराणशीला गंगेत स्नान करून परत रामेश्वरमला आले होते. ते ही फार थकले होते. सकाळी नाडी पट्ट्याशोधायला सुरवात झाली. काही पट्ट्या बाद झाल्यावर एका पट्टीत नावे, जन्मदिनांक, ग्रहमान जुळले अन वाचनाला प्रारंभ झाला. त्यातील वर्णन ऐकून सगळ्यांना थक्क व्हायला झाले. नंतर आणखी अनेकांच्या पट्या निघाल्या त्यातील कथनांनी अनेकांना उत्साह आला. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकादा महफिल जमली. करता करता संध्याकाळ व्हायला लागली, तेंव्हा एकांची पट्टी वाचायला सुरवात होणार तेंव्हा आदेश आला, "आपण रामेश्वराची वाळू व जल काशीना गंगेत सोडलेत आणि तेथील जल आणि मृत्तिका कथनाप्रमाणे रामेश्ररमच्या समुद्रात सोडलीत. पण त्या धांदलीत एक गोष्ट करायला आपण विसरलात. ती केली की वाचन करायला पुर्ण परवानी मिळेल. तोवर नाही." झाले. चर्चा झाली खरोखर आम्ही २२ विहिरीतील जलाने अंघोळ केलेली नव्हती असे उत्पन्न झाले. आम्ही धावलो. कारण तेथे स्नानाची वेळ सुर्यास्तापर्यंतच असते. आम्ही पोहोचलो तोवर फक्त काही मिनिटे उरली होती. पटापट तिकिटे काढून एका एका विहितील पाणी पाळीपाळीने आम्ही १४ जणांनी अंगावर घेत २२ विहिरींची परिक्रमा पूर्ण केली आणि परत कपडे बदलून वाचनाला बसलो. तेंव्हा महर्षी म्हणाले, "अशी त्वरा करावी, तेंव्हाच मनाच्या निश्चयाची परीक्षा होते. आत्ता केलेल्या स्नानाचा विसर तु्म्हाला पडणार मग तुम्ही त्वरेने ती करणार. हे सर्व पुर्व नियोजित होते. जसे आम्ही आता तुम्हाला जे कथन करणार आहोत. ते ही असेच पुर्व नियोजित असेल."
"तुम्ही आता त्या एकाची नाडीपट्टी वाचायला मनाने तयार झाला आहात. आणि आम्हीही."
त्याच काळात अण्णा हजाऱ्यांचे उपोषण भर-बहरात होते. कधी नव्हे ते भारतभर उत्साहाने जनप्रवाह आपापल्यापरीने काही तरी करून दाखवायला सरसावला होता. त्यावर महर्षी काही भाष्य करतात काय? किंवा सूचक काही वर्तवतात काय? याची उत्सुकता आम्हाला होती.
तिकडे आम्हा पति- पत्नीसाठी आणखी काय आश्चर्य तयार होते?....
भाग २ .... मधे वाचकांनी उत्सुकता दर्शवली तर उचलेन लेखणी...

संस्कृतीप्रवासमौजमजाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2011 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अण्णा हजाऱ्यांचे उपोषण भर-बहरात होते. कधी नव्हे ते भारतभर उत्साहाने जनप्रवाह आपापल्यापरीने काही तरी करून दाखवायला सरसावला होता. त्यावर महर्षी काही भाष्य करतात काय? किंवा सूचक काही वर्तवतात काय? याची उत्सुकता आम्हाला होती.

श्री अण्णा आणि टीमचे जनलोकपाल विधेयक प्लस सरकारी लोकपालचे काही मुद्दे मिळून असे एक प्रभावी विधेयक दोन्ही सभागृहात कधी पास होईल याबाबत पट्टीत काही सापडले काय याबाबत मला उगाच उत्सूकता लागली आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

अमचे काळजी पुर्वक लक्ष आहे .कोण कोण उत्सुकता दाखवते आहे..(धमकी नही हो ... कोर्नर करण्याचा पण प्रयत्न नाहि)

स्पावड्याच्या जिलेबी ची वाट बघणारा

अनंत छंदी's picture

30 Aug 2011 - 8:24 pm | अनंत छंदी

अण्णांसंबंधी नाडीतील उल्लेख जाणून घेण्यास उत्सुक आहे. बाकी उर्वरित लेखही ज्ञानात भर टाकणारा, वाचनीय......

पाषाणभेद's picture

31 Aug 2011 - 1:18 am | पाषाणभेद

अच्छा, तो नाडी ऐसे धागे धागे से बनती है!

अनंत छंदी's picture

31 Aug 2011 - 2:14 pm | अनंत छंदी

सगळ्या व्यंगचित्रात फोटोतल्या गांधीबाबाची रिअ‍ॅक्शन लई भारी वाटतिया राव. :))

नगरीनिरंजन's picture

30 Aug 2011 - 8:27 pm | नगरीनिरंजन

उत्सुकता जीव घेईल माझा.

प्रास's picture

30 Aug 2011 - 9:04 pm | प्रास

+१

तेव्हा टाका पुढले भागही!

लवकरात लवकर!!

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

जाई.'s picture

31 Aug 2011 - 12:19 am | जाई.

सहमत

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2011 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

''भाग २ .... मधे वाचकांनी उत्सुकता दर्शवली तर उचलेन लेखणी...'' :-)

आपण उत्सुकता दर्शवत राहू,ते लेखणी उचलत राहतील,,,अता त्यांची नाडी आपल्याच हातात (त्यांनी दिलेली) आहे ;-) तेंव्हा ती नाडी आपण वाचण्याचा मार्ग म्हणजे,,,उत्सुकता दर्शवत रहाणे...स-मस्त मिपाकरहो,(ही नाडी) वाचाल तर(पुढील भाग)वाचाल... ;-)

अन्या दातार's picture

31 Aug 2011 - 3:07 pm | अन्या दातार

>>आम्ही २२ विहिरीतील जलाने अंघोळ केलेली नव्हती असे उत्पन्न झाले.

तुम्हाला निष्पन्न असे म्हणायचे आहे का? कि अंघोळीतूनही तुम्हाला काही उत्पन्न (अर्थप्राप्ती) झाले म्हणावे?

आत्मशून्य's picture

31 Aug 2011 - 4:45 pm | आत्मशून्य

.

शशिकांत ओक's picture

31 Aug 2011 - 4:29 pm | शशिकांत ओक

होय..धन्यवाद...

योगी९००'s picture

31 Aug 2011 - 9:39 pm | योगी९००

पुढील भाग वाचण्यास उत्सूक..!!

काही गोष्टी समजल्या नाहीत...

असा हुकूम वजा आदेश मला फोनवरून आला व मी तात्काळ होकार कळवला. झाले. मी कामाला लागलो.
तोवर हवाई प्रवासाची तिकीटे आली.
मधल्याकाळात मला महर्षीं अत्रींच्या जीव नाडीत सांगण्यात आले,
"तुला सांगून अजूनही अमुक अमुक ते सोपस्कार तू केलेले नाहीस. आम्हाला कल्पना आहे की तू मुद्दाम टाळत नाहीस पण त्याची तातडी आहे हे लक्षात ठेव. मी, अत्री, आता नाडीवाचकाला अशी आज्ञा करतो की त्याने तुझ्यासाठी व तुझ्या पत्नीसाठी सांगितलेली गोष्ट त्याच्या खर्चाने करावी."

म्हणजे तुमची आणि तुमच्या पत्नीची हवाई प्रवासाची तिकीटे नाडीवाचकाने काढली असा अर्थ मी काढला..

या दरम्यान मला रामेश्वरला जायला निमंत्रण आले. एरव्ही टाळमटोल करणारी पत्नी ही आश्चर्यकारकरित्या तयार झाली लगेच तिचे हवाईतिकीट काढले.

पत्नीचे तिकीट परत?

शशिकांत ओक's picture

1 Sep 2011 - 12:18 am | शशिकांत ओक

मित्रा,
माझ्या विमानाच्या तिकिटांची सोय आधी झाली. मग केंद्रातील घटना घडली. मग पत्नीचे तिकिट मी काढले. केंद्रातील लोकांनी नाही. असो. आपल्या सारख्या वाचकाचे बारीक लक्ष असल्याचे वाचून पुढे लिहायला हुरूप येईल....

योगी९००'s picture

1 Sep 2011 - 3:18 am | योगी९००

आभारी आहे..

आधी :
आता नाडीवाचकाला अशी आज्ञा करतो की त्याने तुझ्यासाठी व तुझ्या पत्नीसाठी सांगितलेली गोष्ट त्याच्या खर्चाने करावी.

नंतर :
मग केंद्रातील घटना घडली. मग पत्नीचे तिकिट मी काढले. केंद्रातील लोकांनी नाही.
म्हणजे नाडीवाचकाने महर्षींची आज्ञा पाळली नाही तर...!! माफ करा..माझा अतिचिकित्सा किंवा चेष्टा करावी असा उद्देश नाही आहे..पण आपल्या काही नाडीकेंद्र चालक महर्षींचे आदेश आपणहून मानतात या वाक्यामुळे ह्या असल्या शंका मनात आल्या..

तिकडे आम्हा पति- पत्नीसाठी आणखी काय आश्चर्य तयार होते?...
लवकर सांगा हो..

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2011 - 10:59 pm | राजेश घासकडवी

झाली खरोखर आम्ही २२ विहिरीतील जलाने अंघोळ केलेली नव्हती असे उत्पन्न झाले.

तुमचा काहीतरी समजण्यात घोटाळा तर झाला नाही ना? कदाचित ते म्हणाले असतील 'बावीस जाऊन आंघोळ करा. म्हणजे विहिरीवर, विहिरीवर जाऊन आंघोळ करा.'

तसं असेल तर उगाच एकवीस आंघोळी जास्त झाल्या असतील. पण कदाचित तेही ठीक आहे - पुढच्या तीन आठवड्यांची सोय झाली. :)

शशिकांत ओक's picture

1 Sep 2011 - 12:15 am | शशिकांत ओक

मित्रा,
रामेश्वरमला गेलात तर कळेल की बाव किती असतात तिथे ते. मग असे बाव(ळट) संशय येणार नाहीत मनांत...
परतल्यावर आज काल पुन्हा रीतसर आंघोळीला बसतोय शॉवर खाली....

मित्रांनो,
येथील मिपाकरांनी नाडीकेंद्राकडे मोर्चा वळवला. पण त्यांची पट्टी सापडली नाही म्हणून त्यांना नाडी केंद्रवाले तंगवून भांडावून सोडतात कि काय असे वाटू लागले. त्यासाठी प्रतिक्रिया देत आहे. ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे.

मी जरूर म्हणेन की आपण नाद न केलेला बरा. कारण आपल्या नाडी ग्रंथांचा अनुभव घ्याचा असेल तर प्रतीक्षा करायला हवी. ती होत नसेल आणि वर तुम्ही मला लांछन लावणार असाल तर मी जरूर म्हणेन की आपल्याला नाडी ग्रंथांवर टीका टिप्पणी करायचा आधार नाही.
पहा आणि मग बोलाना. आपल्याला कथन केले गेलेले भविष्य बरोबर कि चूक हा नंतरचा विषय आहे. त्याचा खुलासा आपण केंद्रातील लोकांना विचारावा.
आपल्याला नाडी पट्टी निघायला वेळ लागला तर त्यासाठी थांबायला हवे हे आपण जाणता. म्हणून मी प्रथम म्हटले की तितका धीर नसेल तर नाद सोडा. हा पर्याय आपणाला उपलब्ध आहे. मात्र नाडीकेंद्रातील लोकांनी नंतर या म्हणून सांगितले तर त्याचे कारण पुढे करून आपण नाडी ग्रंथांना पर्यायाने नाडीकेंद्रवाल्यांना किंवा मला निंदेचे वा आरोपीचे लक्ष्य करू शकणार नाही आणि मुद्दाम केलेत तर त्याची वाचक दखल घेणार कशी.
माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपण दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. नाडी केंद्रात आपण चार खेटे मारलेत त्यावरून तो दिसून आला. अन्य तेही करायला तयार नाहीत. जेंव्हा आपली नाडी ताडपट्टी मिळेल त्याची वही त्यांच्या कडून तयार करून घ्यावी आणि ती आपल्यापैकी तमिळ माहितगाराला दाखवून त्यातील मजकुराची शहानिशा करावी. त्यासाठी मला आपण मदतीचा हात मागितलात तर मी जरूर मदत करीन पण आपणास इतकी पावले आधी टाकून हात पुढे करावा लागेल.
आपण विचार करावा.

शशिकांत ओक's picture

14 Sep 2011 - 10:33 pm | शशिकांत ओक

मस्त मिपाकरहो,
(ही नाडी) वाचाल तर (पुढील भाग) वाचाल.