पराठे वाला कट्टा

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
30 Aug 2011 - 9:10 am

एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस.

व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री. जयंत कुलकर्णींना भेटणे, अन्या दातारनं त्यांना खव आणि व्यनितुन येण्याचा आग्रह केलेलाच होता, आणि शुक्रुवारी त्यांचा येणार असल्याचा व्यनि आला. अन्या दातार कोल्हापुरहुन खरगपुरला जाता जाता कट्ट्यासाठी पुण्यात थांबणार होता तर सुधांशु अन किसन शिंदे हे मुंबईकर म्हणजे हुंबईकर पावसात आले होते.

शनिवार उजाडला आणि दिवस मावळत आला तो पावसातच, पावसामुळं किती जण येतात आणि कसं हे जरा अवघड वाटत होतं, पण जयंत कुलकर्णी, अन्या दातार आणि मी सारसबागेजवळ भेटुन रविवार पेठेत पोहोचेपर्यंत वल्ली, धनाजीराव, वपाडाव व आत्मशुन्य पोहोचलेले होते.

जयंत कुलकर्णीच्या एका धाग्यातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांच्या वयाबद्दल जो अंदाज केलेला होता तो साफ चुकला, हिरवं मन हिरव्या टिशर्ट सारखंच मोकळेपणानं कॅरी करणारा हा माणुस दिसता क्षणी प्रभावित करुन गेला. इतिहासात रमणा-या या माणसानं सारस बाग ते रविवार पेठ या प्रवासात त्यांच्या फिनलंडमधल्या वास्तव्यातल्या धमाल किस्से ऐकवले.

शाहजि मध्ये एकत्र आल्यावर व्हर्चुअल जगात दिलेले शब्द प्रत्यक्ष जगात पाळले जातात याचा याचि देही प्रत्यय आला, एक म्हणजे अन्यानं वपाडाव साठी कोल्हापुरहुन आणलेले भडंग आणि दुसरी म्हणजे धनाजीरावनं जे त्याच्या ’मुलगी वाचवा’ या धाग्यावर पोस्टर्स केलेली होती, त्याचे प्रिंटस, सामाजिक बांधिलकीच्या भान ठेवण्याच्या फक्त जालीय गप्पा न मारता प्रत्यक्ष क्रुती करणा-या धनाजीरावांना धन्यवाद व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आम्ही आपलं लगेच जयंत कुलकर्णींच्या हस्ते एक छोटासा उदघाटन सोहळा आटोपुन घेतला, फोटो काढले

आणि कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाणे वड्या खाउन झाली, यावेळी खोब-याच्या वड्या अन्यानं आणलेल्या होत्या, हा फोटो बॉक्स रिकामा होण्यापुर्वी ०.२६५७९८ सेकंद काढलेला आहे.

शाजीमधलं च्यालेंज हे फक्त सोमवार ते शुक्रुवार ह्याच दिवसात असतं हे कळाल्यानं आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली व मेन्यु कार्ड पहायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच भेटणारा मन१ आला आणि हुंबईकर (याचा अर्थासाठी संपर्क - वपाडाव) किसन शिंदे व सुधांशु यांचे हुंबईहुन आगमन झालं; कोरम पुर्ण झाला आणि आता आर्डर दिली नाही तर हाकलुन देतील अशी वेळ येउ नये यासाठी आर्डर दिल्या गेल्या.

पहिल्या राउंडला मिक्स व्हेज, पनीर, मेथी, आलु चिज, असे सर्व पराठे मागवुन संपवल्यानंतर आणि मेन्यु कार्डात लिहिल्याप्रमाणे ’ आर्डर देण्यापुर्वी पराठ्याच्या आकाराची खात्री करुन घ्यावी’ खात्री झाल्यामुळं, पिचचा अंदाज आल्यावर बॅट्समन जसा खुलुन खेळायला लागतो, तश्या रिलेमध्ये आर्डरी सुटत गेल्या आणि टेबल व त्यावरच्या प्लेटा रिकाम्या न राहता परोठे व नान येत गेले आणि संपत गेले. आमच्या टेबलवर तर पडलेल्या लोणच्याच्या मिरच्यांची देठं ही काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी आणि बटरच्या रिकाम्या डब्या दारुगोळ्याच्या रिकाम्या डब्यासारखे दिसत होते.

हाटेलच्या बैठकव्यवस्थेमुळं ग्रुप जरी दोन भागात विभागला होता तरी दुस-या टेबलवर सुद्धा थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती होती. मन१ आणि जयंत कुलकर्णी हे पहिल्यांदाच येणारे सदस्य सुद्धा वल्ली, सुधांशु, किसन शिंदे आणि अन्या दातार यांच्या साथित खुलली होती हे आवाजावरनं कळत होतं.

सगळे पराठे आवडल्या गेल्या असल्याने तसेच आकाराचा व पार्टनरांचा अंदाज आल्याने हरी मिर्च पराठा पण मागवला, आणि त्येच्यायला पहिलाच घास मी तोंडात टाकला, एकतर गरम आणि नेमका त्यातच मिरचीचा तुकडा, असलं तोंड पोळलं की उगा कुठुन असला धागा काढला असं होतं तसं झालं. पण कट्ट्याची ओपनिंग पेअर वपाडाव आणि आत्मशुन्यनं हे पण आव्हान लिलया पेललं.

मध्ये एक दोन वेळा आवाजाबद्दल सुचना मिळाल्यानंतर आवाज खाली आलेच अन हाटेलातल्या गर्दिचे प्रमाण पाहुन चर्चेचे विषय सुद्धा बरेच सभ्य झाले,

कट्ट्याचा शेवट पतियाला लस्सीनं झाला, दोन ग्लास पतियाला लस्सी पाच जणांत संपवली, म्हणजे एकेकाला एक ग्लास चालला असता पण आधी खाल्लेले पराठे हे शाजीच्या च्यालेंजपेक्षा जास्त आहेत याची सुचना पोटातुन दिली जात असल्यानं शेअर इट हा मार्ग पत्करला गेला.

बाहेरची वेटिंगची बाढलेली गर्दी आणि वेटर/मालकांच्या चेह-यावरचे चिंतेचे भाव पाहुन बाहेर येउन पुन्हा प्रथेप्रमाणे गप्पा मारण्याचा ठरवुन बाहेर आलो, एक तासभर विविध विषयावर साधक बाधक चर्चा करुन, पोस्टरच्या उदघाटनानं सुरु झालेला कट्टा जयंत कुलकर्णीना त्यांच्या मराठा इंनफ्र्टीच्या पुस्तकासाठी शुभेच्छ एका छोट्यश्या भेटीच्या रुपात देउन कट्ट्याचे मेंबर निघायला सुरुवात झाली,

लांब राहणारे वल्ली, जयंत कुलकर्णी तसेच मन१ व पराग दिवेकर गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास जागा बदलुन गप्पा मारुन धनाजीराव, वपाडाव, आत्मशुन्य, किसन शिंदे, सुधांशु, अन्या दातार व मी पुन्हा एकदा निरोप घेउन निघालो, ते पुढच्या कट्ट्याचं ठरवुनच..

ही बारा कट्ट्यांची कहाणी, साता कट्टी संपुर्ण..

सुचना - सध्या बाजारात असलेले इनोचे शॉर्टेज पाहता पराठ्यांचे जास्त फोटो टाकलेले नाहीत. असं हि काढायला वेळ कुणाला होता, तिथं.

वावरराहती जागाजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

30 Aug 2011 - 5:44 pm | धमाल मुलगा

मिसळपाव मस्तकी धरावा, मिपाधर्म वाढवावा..
अवघा कल्लोळ माजवावा..सदोदित!!!

असेच उत्तरोत्तर एकेक करत कट्टे वाढत जाऊ द्या! गल्ली, गाव, राज्य, प्रांत, देश अशा सार्‍या सीमा तोडून सारे मिपाकर एक होऊ द्या.
असेच हे कट्ट्यांचे लोण पसरत जावे, एक एक मिपाकर जवळ येत जावा हीच सदिच्छा!!!

एक सुचना: शक्य झाल्यास, पुढच्या वेळी कट्ट्याच्या प्लॅनिंगमध्ये असं ठिकाण निवडण्याचा प्रयत्न होऊ दे, जिथे 'उठा उठा, बाकीचे ताटकळतायत' किंवा 'श्शूऽऽ..इतरांना त्रास होतो, हळू जरा' वगैरे त्रास नसतील.
अरेऽऽ,
जल्लां मुंड्या खाली घालून चराचरा तर जनावरंही खाऊन निघून जातात! हे क्षुद्र हाटिलवाले मिपाकरांच्या हास्यशास्त्रविनोदाला असं अडवूच कसं शकतात? आँ?
आमचे एकेक मिपाकर म्हणजे असे बहाद्दर, पोतडीतून एकेक किस्से काढतील तर तास तास तरी प्रत्येकाला द्यावा लागेल. आणि हास्यधबधबे तर सातमजलीच!
अशी ठिकाणं शोधा, जिथं मनमोकळेपणानं ज्याला कट्टा म्हणतात तो करता येईल मझा येऊन जाईल नं भौ! :)

वृत्तांत झकास लिहिलाय!
फोटोही छान आलेत.
सारखे कट्टे करून आम्हाला जळवल्याचं पाप माथी आलं तर पराग गुर्जींकडून पूजा करून घ्यावी लागेल हे जाताजाता सांगून ठेवते आहे.

सानिकास्वप्निल's picture

30 Aug 2011 - 10:55 pm | सानिकास्वप्निल

रेवतीशी अगदी सहमत आहे ...
सारखे कट्टे जमवून वर असे फोटो लावून, त्यात भर म्हणजे असले झक्कास पराठे हादडून, लस्सी गटवून्...किती-किती त्रास देत आहात :(

५० फक्त's picture

30 Aug 2011 - 11:24 pm | ५० फक्त

रेवतीआजै आणि सानिकातै, या पुण्याला (आमच्या नाही, आम्ही सोलापुरीच), झकास कट्टा जमवु, जमणार असेल किंवा जमवणार असाल तर सोलापुरसाठी एक दिवस द्या, सकाळी पुनमची इडली चटणी, दुपारी नसले बंधुकडे जेवण आणि संध्याकाळी चव्हाणांकडे बेसनाची चटणि घालुन कचोरी खाउ, मग समोर नामदेव चिवडेवाल्याकडे कुंदा खाउन , सिद्धेश्वर मध्ये चहा पिउ.

दुस-या दिवशी शाहिर वस्तीला गुलाब केटी प्यायला जाउ, वेडाचा प्रकार आहे तो. त्या हाटेलवाल्यानं, एक दोन वेळा फुल वाल्यानं दगा दिल्यावर हट्टानं जमिन घेउन गुलाब लावलेत त्या साठी.

>>दुस-या दिवशी शाहिर वस्तीला गुलाब केटी प्यायला जाउ, वेडाचा प्रकार आहे तो. त्या हाटेलवाल्यानं, एक दोन वेळा फुल वाल्यानं दगा दिल्यावर हट्टानं जमिन घेउन गुलाब लावलेत त्या साठी.

च्यामारी माझं कसं जायचं राहिलं इकडे??

चतुरंग's picture

31 Aug 2011 - 12:12 am | चतुरंग

तू वेगळ्याच गुलाबात दंग असणार त्यावेळी! ;)

-रंगा

५० फक्त's picture

31 Aug 2011 - 1:31 am | ५० फक्त

प्रभो, आपण कधी पासुन कधी पर्यंत होता सोलापुरात, भवानी पेठेतुन तुळजापुर नाक्याला गेला आहात काय , त्याच रस्त्यावर आहे हे हाटेल, अधिक जुनीमिल कंपाउंड एमेसिबि कँटिन, सिद्धेश्वर, हुतात्मा बागेसमोर, इंडिया टि सात रस्ता हे अजुन काही खास चहावाले, स्वस्तातला म्हंजे साखर पेठ शापिंग् सेंटर वाला, मे महिन्यात गेल्तो, कटिंग २ रु, अन फुल ४ रु. अजुन. त्या मानानं क्वालिटि लईच झ्याक.

>>प्रभो, आपण कधी पासुन कधी पर्यंत होता सोलापुरात,
इ. स. १९९१ जून ते इ.स २००२ जूलै - ११ वर्षे (पुर्णवेळ)
इ.स. २००२ ऑगस्ट ते इ.स २००९ नोव्हेंबर - ७ वर्षे ३ महिने (सुट्टीत येऊन जाऊन)

>> भवानी पेठेतुन तुळजापुर नाक्याला गेला आहात काय , त्याच रस्त्यावर आहे हे हाटेल,
बर्‍याचदा गेलोय...पण हाटेलात नाही :(

>> अधिक जुनीमिल कंपाउंड एमेसिबि कँटिन, सिद्धेश्वर, हुतात्मा बागेसमोर, इंडिया टि सात रस्ता हे अजुन काही खास चहावाले,
इंडिया वाला तर शाळेपासूनचा खास आहे.. :)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2011 - 1:00 am | अत्रुप्त आत्मा

''पराग गुर्जींकडून पूजा करून घ्यावी लागेल हे जाताजाता सांगून ठेवते आहे.'' चालेल ना :-) तेवडीच दक्षीना बी सुटल, आणी जळवल्याचं परिपूर्ण समाधान बी भेटल... ;-)

च्यायला... कुणाची जळते माडी आणि कुणी पेटवतं त्याच्यावर बिडी...

भटजीबूवा, जरा समाजाचं देणं म्हणून काही असतं की नाही? अं? बघावं तेव्हा आपली दक्षिणेची पडलेली असते तुम्हाला... कधीतरी लोक देतात त्या साबुदाण्याच्या खिचडीवर समाधानी र्‍हावा की... :)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2011 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा

वरती रेवतीताईंनी जो प्रतिसाद दीलाय,तो मला मजेशीर वाटला,म्हणून मी ही थोडी गंमत केली,,,त्या गमतीचे गमक त्यांच्या प्रतिसादातला माझा गमतीदारपणे केलेला उल्लेख एवढेच आहे,त्याला अनुसरून मी ही प्रतिसाद दिला...या गमतीजमतीत ''समाजाचं देणं''वगैरे गंभीर विषय कुठे बसतो बुवा? आणी दक्षिणेची नाही बघितलं तरी प्रत्येकालाच पडलेली असते ;-) (नाही का? )... आणी लोक देतात त्या खिचडीवर आंम्ही समाधानी आहोतच्,,,फक्त कधी ती असते साबुदाण्याची, तर कधी असते साधी...असो,काही गैरसमज झाला असल्यास सादर क्षमस्व.......... :-)

पर्यूषण पर्वाचा लईच परिणाम झालेला दिसतोय सगळ्यांवर ... असो...

ओ परागबुवा, हुर हुर गेली काय हरि मिर्च पराठ्याबरोबर.

धन्या's picture

11 Sep 2011 - 2:28 pm | धन्या

परागबूवा... आम्ही हलका प्रतिसाद दिला होता... तुम्ही उगाचच जड घेतलात. मस्करी करत होतो राव :)

अत्रुप्त आत्मा's picture

11 Sep 2011 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा

@- तुम्ही उगाचच जड घेतलात. मस्करी करत होतो राव ...ब्वार...ब्वार... ठीक हाय...

प्रतिसाद हलका , पण शब्द वाटले जड,
तुमची असल ओवी, आमी बगू ह्रायलो... तमाशाचा फड ;-) ... ह्यो परतीसाद मातूर हलकाच घ्या हो... :-) :-)

अप्पा जोगळेकर's picture

30 Aug 2011 - 9:04 pm | अप्पा जोगळेकर

फोटो एकदम भारी. आणि लस्सीचा फोटो तर एकदमच दिलखुश आहे.

स्मिता.'s picture

30 Aug 2011 - 10:59 pm | स्मिता.

आम्ही आजकाल असे धागे वाचत नाही.

प्रभो's picture

30 Aug 2011 - 11:13 pm | प्रभो

भारी रे!!

फोटूखाली नावं देत जा रे कोण कोण आहे, जरा बरं पडतं समजायला! :)

-रंगा

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2011 - 12:23 am | बिपिन कार्यकर्ते

झ का स!

मुख्य आणि पुरवणी वृत्तांत वाचून मजा आली. कट्टे असेच रंगतात आणि रंगोत. :)

बादवे, हे शाजीज कुठे आहे आणि कसले च्यालेंज वगैरेचे तपशील गुलदस्त्यात का बरे?

''नमस्कार बिका, लक्ष्मि रोडचं रास्तापेठेकडचं टोक आहे शाजी पराठा म्हणजे. नाहीतर लक्ष्मी रोडच्या समांतर रोडने गणेश पेठच्या गुरुद्वाराच्या बोळातुन पुढे आल्यावर उजव्या बाजुला समोरच आहे. ०२०२४४७७८१०.'' दरबार बँडच्या रांगेत.

शाजि पराठाचे च्यालेंज

टायमिंग सोमवार ते शुक्रुवार दुपारी ४ ते ७

कोणत्याही एका प्रकारचे चार पराठे ६० मिनिटात एकाच व्यक्तीने खाणे

बक्षिस - चार पराठ्यांचे बिल देणेची गरज नाही, तुम्ही डिक्लेअर केलेल्या ठिकाणापासुन शाजीपर्यंत येण्याजाण्याचा खर्च र. २०० पर्यंत रोख, आणि त्या तारखेपासुन पुढचे एक वर्षभर तुमच्या हजेरीत, तुम्ही + कुणिही केलेल्या खादाडीच्या बिलावर १० % सुट. + तुमचा फोटो हाटेलात लावला जातो , सध्या तिथं ४-५ फोटो आहेत.

चतुरंग's picture

31 Aug 2011 - 1:22 am | चतुरंग

शाजीचं च्यालेंज भारी है की!!

(घ्यावं की काय च्यालेंज? सातारा रोडवरुन गणेश पेठेत आणि परत असं चालंत गेलो तर च्यालेंज घेता येईल! ;) )

-(प्राठेप्रेमी) रंगा

सातारा रोडवरुन गणेश पेठेत आणि परत असं चालंत गेलो तर च्यालेंज घेता येईल.

आत्मशुन्य, ऐकलं का रे? च्यायलेंज घेण्यासाठी सकाळपासून उपाशी राहायची गरज नाही. नळ स्टॉपवरुन शाजी पराठयाला चालत ये... :)

घ्यायला हवं च्यालेंज......जीभ आणी हात वळवळायला लागलेत... :D
(च्यालेंज लाऊन ६ प्लेट पोहे + १ प्लेट समोसा + १ प्लेट वडा सांबार + ४ चहा रिचवलेला) प्रभो

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2011 - 1:37 am | बिपिन कार्यकर्ते

बा**ला! आपण या चॅलेंजला घेतलं. कधी जाऊयात? चला बरोबर. ट्राय नक्की मारणार. फोटो बरोबरच घेऊन येतो.

लै आवडलं च्यालेंज!

अर्धवट's picture

31 Aug 2011 - 9:38 am | अर्धवट

बिका.. घेतलं ..

काउंट मी इन..
च्यायला सातारी गडी मी अन् असं च्यालेंज बघितल्यावर माघार घेणार व्हय. जाउनच येउ एकदा..

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Aug 2011 - 1:58 pm | बिपिन कार्यकर्ते

डन डना डन! एवढी गणपतीची धांदल उरकून जाऊ दे.

छोटा डॉन's picture

31 Aug 2011 - 2:07 pm | छोटा डॉन

च्यायला, घेतलं मी पण हे चॅलेंज.
बिका, तुम्ही जाताना मला पण घेऊन जावा, ४ पराठे म्हणजे काय लै मोठ्ठी चीज आहे काय ?
डन !!!

- छोटा डॉन

एक तास हा वेळ पाहता जास्त वाटत नाही.

पंधरा मिनिटात खायचे म्हटले असते तर अवघड वाटले असते. आधी दोन आणि अर्धा तास थांबून दोन असे खाणे नुसता विचार करता तितके अवघड वाटत नाही.

तरीही त्यांनी ज्याअर्थी चॅलेंज ठेवलाय त्याअर्थी ते पुष्कळ कठीण असणारच याची खात्री बाळगावी.

उदा. चार पारले जी बिस्किटे किंवा चार मारी बिस्किटे एका मिनिटात खाऊन दाखवणे हा तसा सोपा वाटणारा चॅलेंज अजूनपर्यंततरी कोणी जिंकताना मी पाहिलेलं नाही.

अट इतकीच की बिस्किटे दुधात बुडवून किंवा ओली करुन खायची नाहीत / सोबत पाणी प्यायचे नाही.

बाकी एकामागून एक खा किंवा एकावेळी चारी तोंडात कोंबा..

नाही जमले अद्याप.

छोटा डॉन's picture

31 Aug 2011 - 2:23 pm | छोटा डॉन

गवि, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे.
पण जनरली असे पाहण्यात आहे की असे चँलेंज ज्या ठिकाणी असते तिथला जनरल कंश्टंबर हा 'डाएट कॉन्शस किंवा चरबी मोजणार्‍यातला' असतो, मोजुनमापुन आणि 'चवी'साठी खाणारे लोक येतात अशा ठिकाणी.
इरेला पेटुन खाणारेही असतातच की ...

लेट्स सी ह्या पराठ्याचे कसे होते आहे ?

एक चौकशी : चैतन्य ( एफ.सी.रोड ) आणि इथले पराठे ह्यांच्या आकारात किती फरक आहे ?
चैतन्यचे ३ पराठे बर्‍याचदा खाल्ले आहेत, अर्थात ४ ते ७ ह्या वेळेत पराठे खाण्याची ही आयुष्यातली पहिलीच वेळ असेल.

- छोटा डॉन

चिंतामणी's picture

11 Sep 2011 - 8:05 pm | चिंतामणी

एक चौकशी : चैतन्य ( एफ.सी.रोड ) आणि इथले पराठे ह्यांच्या आकारात किती फरक आहे ?

फारच थोडा फरक आहे.

मग आव्हान स्विकारले आहेस ना? कधी जाणार आहेस हे सांग. बिका येणारच.

मी, धम्या, परा, सोत्री आणि श्रामो इत्यादी तुला प्रोत्साहन द्यायला येउ (आणि नंतर कट्टा करू. जिंकलास तर खुशीत आणि हारलास तर गम में;) ;-) :wink:)

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 2:18 pm | धमाल मुलगा

दोन वडापाव (संपुर्ण) आणि १ कटिंग च्या (संपुर्ण) बसल्या बैठकीला संपवता यायला लागला वाटतं!

छोटा डॉन's picture

31 Aug 2011 - 2:25 pm | छोटा डॉन

पुढच्या वेळी येताना इनोचे पाकिट घेऊन येतो बरं का धमालबुवा.

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

31 Aug 2011 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार

फ्रेंच फ्राइज च्या ऐवजी पराठे खाताना आणि बरोबर जोडीला सोलकढी किंवा ताक वैग्रे घेउन डान्या गफ्फा कुठल्या हाणणार पण ? बहूदा मावळ, नर्मदा, अणूउर्जा प्रकल्प असे विषय घेतले जातील.

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 2:33 pm | धमाल मुलगा

विधायक, परिवर्तनवादी, राजकीय, क्रांतिकारक (मला कळतंय, हे चुकतंय, पण असुद्या, क्रांती वगैरे आलं की कसं बोलण्याला वजन येतं. ;) ) वगैरे कोणतेही विषय यायचे नाहीत. बहुतेक पराठे आणि लस्सीमुळं 'माझं पहिलं प्रेम, माझं काय चुकलं? , तीनं असं करणं बरोबर आहे का? ' वगैरे हळवे विषय शून्यप्रहरात चर्चेला येतील .

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 2:34 pm | धमाल मुलगा

आम्हाला कशाला इनो?

आमुचे कट्टे उदंड होतसे! आणि दिलखुलासही. इनोसाठी दुसरी बाजारपेठ शोधा भो!

गणपा's picture

31 Aug 2011 - 4:02 pm | गणपा

काढून टाकला

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 4:06 pm | धमाल मुलगा

तुझ्यामुळं प्र.का.टा.आ.

गणपा's picture

31 Aug 2011 - 4:04 pm | गणपा

तुमी र्‍हावंद्या वो. तुम्हीतर मिपाचे रजनीकांत.
उगा शाजिवाल्यांना गाशा गुंडाळावा लागेल. ;)

बाकी मिपाकरांचा एकंदर उत्साह पाहाता आता फोटो सोडा शाजिवाल्यांना एक मोठा बोर्ड लावावा लागेलस दिसतय.

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 4:07 pm | धमाल मुलगा

मग पूनमक्षेत्री जमूया की!
टेन्शन इल्ला!
झक्कपैकी हैद्राबादी खिमा हाणू, मटण शोरबा आहेच, बाकी दाल-खिचडी, पर्‍यापेश्शल 'करारी भेंडीमसाला' वगैरे रात्री साडेअकरापर्यंत हवं तेवढं मागवा. टेन्शन इल्ला!

क्या बोल्ता? :)

मग पूनमक्षेत्री जमूया की!

तो सुदिन लवकरात लवकर उगवावा अशी मनापासुन ईच्छा आहे हो बारामतीकर.

मनीच्या बाता: ये पूनमवालोंने धम्या को गोद लिया हय काय?

धमाल मुलगा's picture

31 Aug 2011 - 4:22 pm | धमाल मुलगा

इंडेक्स -II ट्रान्सफर करुन घेतलाय. ;)

Mrunalini's picture

31 Aug 2011 - 1:25 am | Mrunalini

आईला.... मस्त्च आहे हे च्यालेंज... मला नव्ह्त माहित हे असं काही. मग तुमच्या ह्या कट्ट्या मधे कोणी च्यालेंज जिंकले की नाही???

''टायमिंग सोमवार ते शुक्रुवार दुपारी ४ ते ७'' आम्हि गेलंतो शनिवारी सांजंला. वर उल्लेखल्याप्रमाणं,

आत्मशुन्य, गणेशा अन वल्ली जाणार आहेतच, आमच्या त्या दिवशीचा खेळ पाहता ४ पराठे खाणं अवघड जाणार नाही, फक्त एकाच टाइपचे हे थोडं लफडं आहे. असे हि एका टेबलावर ५ जणात १२ पराठे अन ६ नान + २ पतियाला लस्सी संपवल्यात आमी.

वपाडाव's picture

31 Aug 2011 - 9:41 am | वपाडाव

आत्मशुन्य, गणेशा अन वल्ली जाणार आहेतच

आम्हाला फाट्यावर मारण्यात आलेले दिसत आहे.....
तरीही मंडळ तिथे उपस्थिती द्यायला तयार राहील हे जाता जाता नमुद करतो....

५० फक्त's picture

31 Aug 2011 - 10:22 am | ५० फक्त

अबे, हाटेल पाहिलंस ना ते, मंडळ घेउन आस तर जागा पुरेल का, त्या दिवशी बिचारा सुडच लोकलमध्ये बसल्यासारखा चवथ्या सीट्वर बसला होता आणि किसन, ते वडापचे ड्रायव्हर बसतात ना अर्धी क्ष्क्ष्क्ष्क्ष बाहेर काढुन तसा.

असो, आपला नामोल्लेख न केल्याबद्दाल सॉरी. वर अपर्णातै ना सल्ला दिलेला आहेच, त्या असतात सिंगापुरात त्यांनी मनावर घेतलं तर काय होईल याचा विचार करा.

सध्या बरेच जण तयार होत आहेत च्यालेंजसाठी गणपतीझाल्यावर एकदा सगळ्यांनी तिथं जाउ. दहाजण च्यालेंज जिंकले तर तिथले पुढचे एक वर्षाचे कट्टे फुकट पडतील आपल्याला.

बाकी संयोजक वल्ली, गणेशा असल्याने इच्छूकांनी तेंचेकडे संपर्क करणे.

नंदन's picture

31 Aug 2011 - 9:00 am | नंदन

जोरदार झालेला दिसतोय कट्टा. च्यालेंज लै भारी आहे, एकदा प्रयत्न करावा म्हणतो :)

हम भी है जोशमें......

:-)

मी-सौरभ's picture

10 Sep 2011 - 12:35 am | मी-सौरभ

जर का चॅलेंज पूर्ण झालं नाही तर काय??

वरील सर्व रथी महारथी गारद होतील अशी दाट शक्यता वाटत असल्याने हा प्रश्नप्रपंच..

स्पा's picture

14 Sep 2011 - 8:44 pm | स्पा

च्यालेंज जीत्ल्याबद्दल वाकडे रावांच "काच्क्कन" अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!