एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस.
व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री. जयंत कुलकर्णींना भेटणे, अन्या दातारनं त्यांना खव आणि व्यनितुन येण्याचा आग्रह केलेलाच होता, आणि शुक्रुवारी त्यांचा येणार असल्याचा व्यनि आला. अन्या दातार कोल्हापुरहुन खरगपुरला जाता जाता कट्ट्यासाठी पुण्यात थांबणार होता तर सुधांशु अन किसन शिंदे हे मुंबईकर म्हणजे हुंबईकर पावसात आले होते.
शनिवार उजाडला आणि दिवस मावळत आला तो पावसातच, पावसामुळं किती जण येतात आणि कसं हे जरा अवघड वाटत होतं, पण जयंत कुलकर्णी, अन्या दातार आणि मी सारसबागेजवळ भेटुन रविवार पेठेत पोहोचेपर्यंत वल्ली, धनाजीराव, वपाडाव व आत्मशुन्य पोहोचलेले होते.
जयंत कुलकर्णीच्या एका धाग्यातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांच्या वयाबद्दल जो अंदाज केलेला होता तो साफ चुकला, हिरवं मन हिरव्या टिशर्ट सारखंच मोकळेपणानं कॅरी करणारा हा माणुस दिसता क्षणी प्रभावित करुन गेला. इतिहासात रमणा-या या माणसानं सारस बाग ते रविवार पेठ या प्रवासात त्यांच्या फिनलंडमधल्या वास्तव्यातल्या धमाल किस्से ऐकवले.
शाहजि मध्ये एकत्र आल्यावर व्हर्चुअल जगात दिलेले शब्द प्रत्यक्ष जगात पाळले जातात याचा याचि देही प्रत्यय आला, एक म्हणजे अन्यानं वपाडाव साठी कोल्हापुरहुन आणलेले भडंग आणि दुसरी म्हणजे धनाजीरावनं जे त्याच्या ’मुलगी वाचवा’ या धाग्यावर पोस्टर्स केलेली होती, त्याचे प्रिंटस, सामाजिक बांधिलकीच्या भान ठेवण्याच्या फक्त जालीय गप्पा न मारता प्रत्यक्ष क्रुती करणा-या धनाजीरावांना धन्यवाद व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आम्ही आपलं लगेच जयंत कुलकर्णींच्या हस्ते एक छोटासा उदघाटन सोहळा आटोपुन घेतला, फोटो काढले
आणि कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाणे वड्या खाउन झाली, यावेळी खोब-याच्या वड्या अन्यानं आणलेल्या होत्या, हा फोटो बॉक्स रिकामा होण्यापुर्वी ०.२६५७९८ सेकंद काढलेला आहे.
शाजीमधलं च्यालेंज हे फक्त सोमवार ते शुक्रुवार ह्याच दिवसात असतं हे कळाल्यानं आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली व मेन्यु कार्ड पहायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच भेटणारा मन१ आला आणि हुंबईकर (याचा अर्थासाठी संपर्क - वपाडाव) किसन शिंदे व सुधांशु यांचे हुंबईहुन आगमन झालं; कोरम पुर्ण झाला आणि आता आर्डर दिली नाही तर हाकलुन देतील अशी वेळ येउ नये यासाठी आर्डर दिल्या गेल्या.
पहिल्या राउंडला मिक्स व्हेज, पनीर, मेथी, आलु चिज, असे सर्व पराठे मागवुन संपवल्यानंतर आणि मेन्यु कार्डात लिहिल्याप्रमाणे ’ आर्डर देण्यापुर्वी पराठ्याच्या आकाराची खात्री करुन घ्यावी’ खात्री झाल्यामुळं, पिचचा अंदाज आल्यावर बॅट्समन जसा खुलुन खेळायला लागतो, तश्या रिलेमध्ये आर्डरी सुटत गेल्या आणि टेबल व त्यावरच्या प्लेटा रिकाम्या न राहता परोठे व नान येत गेले आणि संपत गेले. आमच्या टेबलवर तर पडलेल्या लोणच्याच्या मिरच्यांची देठं ही काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी आणि बटरच्या रिकाम्या डब्या दारुगोळ्याच्या रिकाम्या डब्यासारखे दिसत होते.
हाटेलच्या बैठकव्यवस्थेमुळं ग्रुप जरी दोन भागात विभागला होता तरी दुस-या टेबलवर सुद्धा थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती होती. मन१ आणि जयंत कुलकर्णी हे पहिल्यांदाच येणारे सदस्य सुद्धा वल्ली, सुधांशु, किसन शिंदे आणि अन्या दातार यांच्या साथित खुलली होती हे आवाजावरनं कळत होतं.
सगळे पराठे आवडल्या गेल्या असल्याने तसेच आकाराचा व पार्टनरांचा अंदाज आल्याने हरी मिर्च पराठा पण मागवला, आणि त्येच्यायला पहिलाच घास मी तोंडात टाकला, एकतर गरम आणि नेमका त्यातच मिरचीचा तुकडा, असलं तोंड पोळलं की उगा कुठुन असला धागा काढला असं होतं तसं झालं. पण कट्ट्याची ओपनिंग पेअर वपाडाव आणि आत्मशुन्यनं हे पण आव्हान लिलया पेललं.
मध्ये एक दोन वेळा आवाजाबद्दल सुचना मिळाल्यानंतर आवाज खाली आलेच अन हाटेलातल्या गर्दिचे प्रमाण पाहुन चर्चेचे विषय सुद्धा बरेच सभ्य झाले,
कट्ट्याचा शेवट पतियाला लस्सीनं झाला, दोन ग्लास पतियाला लस्सी पाच जणांत संपवली, म्हणजे एकेकाला एक ग्लास चालला असता पण आधी खाल्लेले पराठे हे शाजीच्या च्यालेंजपेक्षा जास्त आहेत याची सुचना पोटातुन दिली जात असल्यानं शेअर इट हा मार्ग पत्करला गेला.
बाहेरची वेटिंगची बाढलेली गर्दी आणि वेटर/मालकांच्या चेह-यावरचे चिंतेचे भाव पाहुन बाहेर येउन पुन्हा प्रथेप्रमाणे गप्पा मारण्याचा ठरवुन बाहेर आलो, एक तासभर विविध विषयावर साधक बाधक चर्चा करुन, पोस्टरच्या उदघाटनानं सुरु झालेला कट्टा जयंत कुलकर्णीना त्यांच्या मराठा इंनफ्र्टीच्या पुस्तकासाठी शुभेच्छ एका छोट्यश्या भेटीच्या रुपात देउन कट्ट्याचे मेंबर निघायला सुरुवात झाली,
लांब राहणारे वल्ली, जयंत कुलकर्णी तसेच मन१ व पराग दिवेकर गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास जागा बदलुन गप्पा मारुन धनाजीराव, वपाडाव, आत्मशुन्य, किसन शिंदे, सुधांशु, अन्या दातार व मी पुन्हा एकदा निरोप घेउन निघालो, ते पुढच्या कट्ट्याचं ठरवुनच..
ही बारा कट्ट्यांची कहाणी, साता कट्टी संपुर्ण..
सुचना - सध्या बाजारात असलेले इनोचे शॉर्टेज पाहता पराठ्यांचे जास्त फोटो टाकलेले नाहीत. असं हि काढायला वेळ कुणाला होता, तिथं.
प्रतिक्रिया
30 Aug 2011 - 9:37 am | प्रचेतस
उत्तम वृत्तांत दिलात ५० फक्त.
शाजी'ज मधले चुर चुर नान तर लै भारी. नान मध्ये पनीरचा चुरा करून त्याचे स्टफिंग केले जाते व नानला घड्या घालून 'कोन'सारखा आकार दिला जातो. चवीला एकदम सुंदर लागते. अगदी नुसते खाल्ले तरी हरकत नाही. बाकी पराठ्यांबद्दल आम्ही पामर काय बोलू. ते तर चवीला अप्रतिमच. पतियाळा लस्सी तर चवीला अतिशय छान. इतर ठिकाणी लस्सी म्हणजे उगाच पातळ श्रीखंड खाल्यासारखं वाटतं, इथली लस्सी अस्सल पंजाबी चवीची, ग्लास बघूनच दडपायला होणारी.
जयंत कुलकर्णींबरोबर बर्याच चर्चा करता आल्या त्या निमित्ताने एका चतुरस्त्र माणसाची ओळख झाली.
हुंबैकर खास पावसातून इकडील कट्ट्याला आल्यामुळे त्यांचे खास आभार. आत्मशून्यला च्यालेंज पूर्ण करण्याची संधी हुकल्याने तो लवकरच वीकडेजला जाउन च्यालेंज पूर्ण करणार हे निश्चित. (मी पण बरोबर येणार :) )
30 Aug 2011 - 3:23 pm | गणेशा
आनि मी पण च्यालेंज स्विकारणार आहे, वल्ली आपण दोघे आक्रमणास निघु.
यावेळेस माझा घोडा आणत आहे...
बाकी कट्ट्याला यावेळी येता नाही आल्याने वाईट वाटले.. पराठ्यामुळे नाही वप्या ( तुझा असाच प्रतिसाद ध्यानात घेवुन आधीच तुला बोलतोय, आणि आयोजक आहे ना तु .. अरे वा ) तर वाईट वाटले आपले नविन मित्र .. धनाजीराव, जयंतराव आणि परागशेठ यांना भेटता आले नाही म्हणुन..
बाकी आत्मशुन्य ... कधी जायचे रे परत...
30 Aug 2011 - 4:05 pm | आत्मशून्य
फिल फ्री टू कॉल/व्यनी मी एनी टाइम इन विक्डेज, आय एम लूकींग फॉर्वर्ड टू मीट दी चायलेंज ए.एस.ए.पी. दीवस ताबडतोप ठरवावा, ही विनंती.
30 Aug 2011 - 4:50 pm | गणेशा
मी १ ते ४ पुण्यात आहे ...
30 Aug 2011 - 5:13 pm | आत्मशून्य
इट्स योर कॉल नाऊ.
30 Aug 2011 - 5:32 pm | प्रचेतस
ठरल्यावर मला सांगा रे. :)
30 Aug 2011 - 5:45 pm | आत्मशून्य
पण मूळातच हे चायलेंज घ्यायला जाणे, हे काही मिपाकरांची मिपाकरांशी कट्टा विरहहीत ओळख असल्याच्या प्रखर वास्तवाखाली येत असल्याने ते पार पडल्यानंतर त्याचा सच्चित्र वृत्तांताचा धागा अथवा कोणत्याही प्रकारे तमाशा वगैरे होइल याची अपेक्षा तेव्हडी ठेऊ नकोस म्हणजे झालं.
30 Aug 2011 - 5:48 pm | प्रचेतस
होय होय.
अपेक्षा ठेवल्या जाणार नाहीत.
बाकी च्यालेंज पार पाडल्यावर पतियाळा लस्सी पण फूल हाणून दाखवणार ना तू बे?
30 Aug 2011 - 5:57 pm | आत्मशून्य
ही कट्टावीरहीतते सारखी छाटछूट गोश्ट आहे म्हणून त्यात फूका चाय्लेंज ओतू नका. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत आहे. जर तीन पराठे खाल्ले तर मात्र पटीयाला अख्खा गट्टम करीन म्हणतो. पण तरीही ही कट्टा विरहीतता असल्याने याचा सचित्र धागा काढून तमाशा केला जाणार नाहीच.
30 Aug 2011 - 5:58 pm | प्रचेतस
:)
31 Aug 2011 - 1:20 am | ५० फक्त
इथं धागा काढु नका चालेल पण शाजीवाला तुमचे फोटु काढुन लावेल मागं भिंतीवर त्याचं काय, आणि फार्म नीट भरा रे आधी.
31 Aug 2011 - 3:09 pm | आत्मशून्य
पण तिथं जे घडल त्याचा सविस्तर वृत्तांत प्रतीक्रीयांच्या स्वरूपात इथ याच धाग्यावर आलाच पाहीजे हे मात्र खरं. छाटछुट गोश्ट असली तरी चायलेंज ते शेवटी चायलेंज आहे.
(कट्याला उघडपणे कट्टाच मानणारा) -उन्नतीशून्य
14 Sep 2011 - 8:02 pm | किसन शिंदे
ठरल्याप्रमाणे शाहजी मध्ये आज पराठा चॅलेंज पार पडण्यात आलं आहे. :)
एका वेळेला एकच माणूस हे चॅलेंज घेऊ शकतो त्यामुळे हे शिवधनुष्य कोण पेलणार यासाठी मात्र थोडा गोधंळ झाला कारण चॅलेंज एकासाठीच आणी ते घेण्यासाठी तिथे जमलेले पाचही जण उत्सुक!
त्यावर तोडगा म्हणुन नावाच्या चिठ्ठ्या उडवण्यात आल्या आणी त्यात धनाजीरावांना हे चॅलेंज स्विकारण्याचा मान मिळाला.
मग काय, धनाजीरावांनी 'कधी नाही मिळलं आणी गप्पकन गिळलं' या पध्दतीने चार पराठयाचं चॅलेंज आरामशीर जिंकलं..!
धनाजीरावांचे हार्दिक अभिनंदन..!! :)
14 Sep 2011 - 10:47 pm | प्रचेतस
सर्वप्रथम धनाजीरावांचे हार्दिक अभिनंदन.
च्यालेंजसाठी लवकर जायचे असल्याने शाहजी तसे रिकामेच होते आणि अगदी सहजच जागा मिळाली. ५० फक्त आणि पराग दिवेकर अगोदरच आले होते. मी, धनाजीराव, आत्मशून्य पाठोपाठ पोहोचलोच.
ग्रुप मध्ये फक्त एकालाच आव्हान स्विकारता येणार असल्याने चिट्ठ्या पाडून धनाजीरावांचे नाव पुढे आले आणि त्यांच्या पोटात गोळा उभा राहिला तो त्यांनी महत्प्रयासाने सरकवून पराठ्याना उदर मनाने जागा करून द्यायचे मान्य केले. फॉर्म भरण्याची फॉर्मेलीटी पूर्ण करून पराठ्यांची ऑर्डेर देण्यात आली. आम्हाला मिक्स व्हेज पराठा, पनीर पराठा, हरी मिर्च का पराठा असे विविध प्रकार घेण्यात आले. धनाजीराव एकेक पराठा संपवण्यात मग्न होता. त्यांच्या खाण्याकडे शाहजीच्या वाढप्यांची तशी सक्त नजर होतीच. न जाणो हे आपल्या ताटातले पराठे हळूच दुसर्याला वाढतील की काय. ;)
आम्ही दोन पराठ्यामध्येच गप्पगार झालो. इकडे धनाजीराव सुरुच होते. ३ रा पराठाही संपवला. हळूहळू शेवटचा पराठाही खायला सुरुवात केली. खाणे आता कष्टप्रद झाल्याचे जाणवत होतेच. शेवटी पराठा अगदी संपायला आला, वाढपीही उत्सुकतेने धनाजीरावांकडे बघत होते. अखेर शेवटचा तुकडा त्यांनी तोंडात टाकला आणि झाला टाळ्या, शिट्ट्यांचा जोरदार कडकडाट. धनाजीराव विजयी झाले होते. चेहरा घामेघूम झाला होता पण डोळ्यांत समाधानाचे भाव होते. इतके वेळ पाणी न पिल्याने तहानही लागली होती. मग त्यांनी मागवली थंडाई. बदामाचे काप घालून केलेली ग्लासभर थंडाईपण त्यांनी अगदी सहजपणे रिचवली. बाकीच्यांनी पतियाळा लस्सी संपवली.
आव्हान जिंकल्याबद्दल शाहजीच्या व्यवस्थापनाकडून धनाजीरावांचे पराठा बिल माफ झाले तसेच जाण्यायेण्याचा खर्च रू. १५० रोख मिळाला. विजयानंदाप्रीत्यर्थ धनाजीरावांकडून आम्हाला खास सरप्राईझ मिळाले. :)
खाणे झाले, बाहेर जाउन मस्त मसाला पानांचा आस्वाद घेण्यात आला. तितक्यात प्यारे१ आणि वपाडाव आले, त्यांच्यासाठी परत शाहजीला गेलो. मग त्यांनी पण विविध पराठे आणि चुर चुर नानचा आस्वाद घेतला व परत आम्ही सर्वांनी पतियाळा लस्सी व थंडाई रिचवली.
बाकी ५० फक्त यांचे डोडा आणल्याबद्दल खास आभार. तो सुरुवातीलाच संपवल्यामुळे वप्या आणि प्यारे१ यांना मिळू शकला नाही.
15 Sep 2011 - 7:20 am | धन्या
आधी खरंच पोटात गोळा आला होता पण नंतर म्हटलं की लायिप यिज फुल ऑप च्यायलेंज्येस यांड सरपरायजेस... होउन जौद्या ;)
15 Sep 2011 - 6:38 pm | मृत्युन्जय
तुम्हाला साष्टांग नमस्कार. आगे बढो हम तुम्हारे साथ है.
15 Sep 2011 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा
@--- आधी खरंच पोटात गोळा आला होता----@ हेच वाक्य उलट बाजुनी टाइपुन शेवटी प्रश्न चिन्ह टाका :-p स्वारी टंका :-D
14 Sep 2011 - 11:57 pm | सूड
किसना तू पण गेलेला ??
15 Sep 2011 - 12:19 am | मी-सौरभ
लवकर आणा रे कुणी तरी...
15 Sep 2011 - 8:01 am | ५० फक्त
इनो कशाला मागवताय, थंडाई मागवा मस्तपैकी, आणि हो एक डोडा खाउन हे च्यालेंज पुर्ण केल्याबद्दल धनाजीचे विशेष अभिनंदन, आता शाजीवाल्याला प्रत्येक गि-हाइकाता धनाजी दिसताहेत म्हणे.
15 Sep 2011 - 8:31 am | सूड
कवाधरनं आईकतोय डोडा-डोडा. आमी आल्तो तवा दुकान बंद झाल्तं त्येचं, फोटु तरी लावाच आता त्ये डोडा का काय अस्तंय त्येचा. वपाडावकडं ती मस्तानी बी पेंडींग हे.
15 Sep 2011 - 5:33 pm | इरसाल
15 Sep 2011 - 6:20 pm | प्रचेतस
अगदी अगदी. हेच ते.
16 Sep 2011 - 9:49 am | किसन शिंदे
आयला हे डोडा होय, हे तर लय वेळा खाल्लय ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरमधुन
15 Sep 2011 - 9:01 am | किसन शिंदे
खरचं फोटो काढला असेल तर द्या इथे किंवा व्यनीत टाकला तरी चालेल
15 Sep 2011 - 9:03 am | प्रचेतस
फोटो एकपण काढला नाही रे. :(
15 Sep 2011 - 9:23 am | सोत्रि
फोटो न काढण्याचे कारण : अधिक माहितीसाठी आत्मशुन्यला भेटावे ;)
@ आत्मशुन्य: ह.घे. पीस... :)
- (सचित्र तमासगीर) सोकाजी
15 Sep 2011 - 11:39 pm | आत्मशून्य
कोनत्याही कट्ट्याच्या अथवा कट्टावीरहीततेच्या प्रतीसादात/उत्तरांत फटू चिटकवण्या न चिटकवण्याबाबत आपन(आदरार्थी एकवचन) कधी तरी मत व्यक्त केलयं काय राव ? :p
-(लोककला प्रेमी) आत्मशून्य
15 Sep 2011 - 11:42 pm | मी-सौरभ
लै कायदेशीर बोलाया लागले तुमी..
प्रमोशन व्हनार बगा तुमचं लवकरचं ;)
16 Sep 2011 - 12:03 am | आत्मशून्य
अरे लोकांना आचार स्वातंत्र्य वगैरे काय है की नाय शेवटी ...? आपन हाडामासांची सामान्य मानसच की, हौस मौज मजा मिपाकरांनी नाय तर मंग आनखी कोनी करायची ? फटू खरच काढायला (व प्रतीसादात डाकवायला) पायजे होते ;)
अती अवांतर :- पराठा खाणे माझ्यासाठी छाट्छूट चायलेंज होतेच होते व म्हणूनच माझ्याकडे त्याबाबत मिपाकरांना फार काही सांगण्यासारखे नव्हतेही, पण धनाजीरावां सारख्या व्यक्तीने हे अचाट काम करून मूर्ती लहान पण किर्ती महान हे जे सिध्द केलं आहे त्याबद्दल खर तरं सचित्र धागाच टाकायला पाहीजे असं माझं स्पश्ट मत आहे.
15 Sep 2011 - 9:03 am | स्पा
हो तेजायला.. डोडाचे फटू हवेतच
15 Sep 2011 - 11:59 am | ५० फक्त
फोटो फोटो काय चाललंय रे, रेल्वेच्या फोटोनं स द ग दि त होणारा तु तुला काय करायचा रे डोडाचा फोटो आणि ती खाउन चवीची मजा घेण्याची गोष्ट आहे फोटोत बघायची नाही, आणि खायच्या गोष्टीचे फोटो टाकले की बघवत नाहीत उगा का बघितलं असं होतं, म्हणजे भुक लागते रे लगेच.
ये की लेका एकदा पुण्याला, त्या उत्तम वाल्याकडं गरम गरम समोसे खाउ मग डोडा खाउ नंतर पापडी अन मिरची, नंतर आख्खा लक्ष्मी रोड फिरुन येउ मग गुरुद्वारात जाउ प्रसाद घ्यायला, तो पर्यंत चार वाजतील मग तुझा फॉर्म भरु शाजी मध्ये अन बसवू तुला, एक दोन तीन चार पराठे खायला आणि नंतर तुझा फोटो लावु तिथं. खरंच स्पावड्या तु च्यालेंज जिंकलास ना तर तुझा फोटो मिपावर एक वर्षभर लावावा अशी परवानगी काढेन मी मालकांकडुन. बघ विचार कर.
15 Sep 2011 - 12:12 pm | स्पा
तो पर्यंत चार वाजतील मग तुझा फॉर्म भरु शाजी मध्ये अन बसवू तुला, एक दोन तीन चार पराठे खायला आणि नंतर तुझा फोटो लावु तिथं. खरंच स्पावड्या तु च्यालेंज जिंकलास ना तर तुझा फोटो मिपावर एक वर्षभर लावावा अशी परवानगी काढेन मी मालकांकडुन. बघ विचार कर.
=))
=))
=))
=))
=))
=))
तेजायला माझा फोटू भलतीकडेच लावायची वेळ येईल...
शाजी च्यालेंज आपला प्रांत नाही
15 Sep 2011 - 6:45 pm | मी-सौरभ
एक रिक्वेष्ट आहे...
चॅलेंज नंतरच्या दिवशी काय झाल हे जाणोन घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.... ;)
बघा जमलं तर ईथं सांगा नाय तर व्यनीत लिहा..
15 Sep 2011 - 9:19 am | सोत्रि
बिंगो !
धनाजीरावांचे मन:पुर्वक अभिनंदन!
(आता धनाजीरावांना घरी जेवायला बोलावताना दहावेळा विचार करावा लागेल किंवा दहाजणांचे जेवण बनवावे लागेल) ;)
- (खादाडीची आव्हाने स्विकारणारा) सोकाजी
5 Sep 2011 - 4:45 pm | ऋषिकेश
ऑफीसातून फोटो दिसत नाहीयेत (विषेशतः पराठे आनि लश्श्यांचे) याचा आनंद हा धागा वाचुन होतो आहे :P
बाकी कट्टा जोरदार झालेला दिसतोय
30 Aug 2011 - 9:44 am | गवि
कट्टा झकास झालेला दिसतोय. वरचेवर मिपा वाचत असूनही कट्ट्याच्या आमंत्रणाचा धागा पाहण्यातून कसा सुटला कोण जाणे. शनिवारी असल्यामुळे सहज शक्य होते. (एरवी पुणे कट्टा रविवारी असतो..) पण धागाच न वाचल्याने मिस झाले. आता शोधतो.
बेटर लक फॉर मी नेक्स्ट टाईम.. :)
30 Aug 2011 - 12:00 pm | वपाडाव
@गवि : तुम्ही येण्यास उत्सुक आहात ही कल्पना जर असती तर सुडक्याने संपर्क साधायला हवा होता....
कट्ट्यचा धागा नव्हता....
आग लावण्यात आली आहे....
30 Aug 2011 - 12:06 pm | गवि
समजले.
आम्हास फाट्यावर मारल्या गेले..
30 Aug 2011 - 1:10 pm | मनिष
असेच म्हणतो...पराठे आम्हालाही आवडतात रे!
30 Aug 2011 - 2:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नाही हो गवि, तसे नाही. पराठ्याला बटर लावावे की नाही यावर वाद होऊ नये म्हणून धागा काढला गेला नाही असे आतल्या गोटातून कळते ;-)
*आतल्या गोटातून कळणे :- स्वतः चा अन्दाज असणे, उगाच पुडी सोडणे.....
30 Aug 2011 - 2:20 pm | मृत्युन्जय
जाउ द्या हो गवि. तुम्ही तरी मुंबैला होता. आम्ही तर इथे पुण्यातच बसलो होतो. पण तरीही...............
जौद्या. इनो घेउन येतो.
बाकी कट्टा झक्कास झालेला दिसतोय.
30 Aug 2011 - 3:10 pm | अन्या दातार
>>आम्ही तर इथे पुण्यातच बसलो होतो.
त्याचाही वृत्तांत टाका की मग. अडवलंय कुणी?? का आता आठवत नाहीये काय काय केलं ते?
30 Aug 2011 - 3:49 pm | मृत्युन्जय
शनिवारी काहीच केले नाही ब्वॉ. घरीच बसलो होतो तंगड्या वर करुन. आता त्याचा वृत्तांत कदाचित तुम्हाला आवडायचा नाही. ;)
30 Aug 2011 - 3:12 pm | प्यारे१
'उपलब्ध पराठ्यांची संख्या' आणि 'येण्याची कमाल शक्यता व खाण्याची किमान क्षमता असलेले सदस्य' यांमध्ये निर्माण झालेल्या गुणोत्तराचा परिणाम म्हणून किमान सदस्यांना आमंत्रण्याचा निर्णय 'आयोजकां'नी घेतला असावा.
31 Aug 2011 - 7:50 am | ५० फक्त
सर्वप्रथम, गवि, मनीष, म्रुत्युंजय व प्यारे १ यांची सपशेल माफी मागतो. या कट्ट्याचा धागा काढलेला नव्हता, वर लिहिल्याप्रमाणे इथं जायचे हे जुलैच्या कट्ट्यात ठरलेलं होतं, फक्त तारिख नक्की नव्हती.
गवि तुम्हाला येणं शक्य होईल याची कल्पना नव्हती किंवा स्पावड्या / सुड्ने तुम्हाला कळवले आहे असा समज झालेला होता. एक विनंती, शक्य असेल तर वरचा फाटावर मारण्याचा प्रतिसाद काढुन टाकावव, असा कोणताही विचार नव्हता आमचा.
अर्थात तुम्ही केलेल्या नामबदलातुन कट्ट्याला त्यादिवशीचा सगळ्यात मोठा जोक देउन गेली, हे खरं.
मनीष व म्रुत्युंजय, तुम्हाला कळवणं राहुन गेलं ही आमची चुक आहे, सपशेल मान्य.एक डाव माफि करावी.
प्यारे१, तुझ्याबरोबर व्यनित बोलणं चालु आहेच.
सर्वच मिपाकरांना एक नम्र विनंती, या कट्ट्याच्या आमंत्रणाचा धागा न काढला गेल्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे, त्याचा ब्लेम माझ्यावर टाकु शकता, जर एका वर्षात किमान १२ वेळा मिपाकरांना एकत्र आणण्याचे ठरवले आहे तर त्याबद्दल कळवणे ही माझिच जबाबदारि आहे, असं मी मानतो. सदर चुक पुढच्या वेळी सुधारुन घेतली जाईल.
लवकरच गणेशोत्सव समाप्ती ते नवरात्र सुरुवात याच्या दरम्यान अजुन एक कट्टा, खाली धमुने दिलेल्या सुचना व एका मिथुनायणाच्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादाच्या अनुषंगाने करण्याची तयारी चालु आहे, लवकरच आमंत्रणाचा धागा टाकला जाईल.
31 Aug 2011 - 8:59 am | सूड
हे बरंय राव !! मलाच कळलं शुक्रवारी तेही किसना कडून. लास्ट मोमेंटपर्यंत शाश्वती नव्हती जाण्याची. त्यात यु नो हुंबैचा पाऊस, त्यादिवशी गाड्या रद्द होऊ नयेत म्हणून मनातल्या मनात देव पावसाच्या पाण्यात ठेवले होते. तरी मळवली क्रॉस केलं आणि गाडी अर्धा तास खोळंबली होती.
असो. गवि, पुढल्या वेळेस कळवतो तुम्हाला जाणार असलो तर.
31 Aug 2011 - 9:32 am | गवि
एक विनंती, शक्य असेल तर वरचा फाटावर मारण्याचा प्रतिसाद काढुन टाकावव, असा कोणताही विचार नव्हता आमचा.
आता कसा काढणार. बूच बसले आहे ना. आणि ते सिरियसली म्हटलेलं नसल्याने संमंला विनंती करुन वगैरे काढण्याच्या द्रा.प्रा.ची आवश्यकता नाही. :)
ती स्माईली ज्या प्रकारचे भाव दाखवतेय ते पाहून तो एक ज्योक आहे हे पुरेसे प्रकट होत असावे. :)
खरेच यासाठी काही करायचे असेल तर तो काय जोक झाला होता ते सांगा.. इथे किंवा खवत. किंवा व्यनीत. :)
31 Aug 2011 - 9:40 am | वपाडाव
५०, लिहु का रे इथे तो ज्योक....
म्हणजे तुझी संमती घेणं गरजेचं आहे की नाही ते माहीत नाही म्हणुन विचारलं......
31 Aug 2011 - 10:13 am | ५० फक्त
अरे बाबा आता कुठं आयोजक झाला आहेस, का उगा आयडि उडवुन घ्यायच्या मागं लागलास. व्यनि कर सगळ्यांना.
30 Aug 2011 - 9:45 am | इंटरनेटस्नेही
अप्रतिम!
सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखीव.
31 Aug 2011 - 7:56 am | ५० फक्त
ईंट्या सविस्तर प्रतिसाद जनलोकपाल मंजुर झाल्यावर देणार का ?
30 Aug 2011 - 9:56 am | धन्या
झक्कास इतिवृत्तांत !!!
आणि हो आयोजक वपाडाव यांचे मनापासून आभार. एरव्ही आम्ही शनिवार आला की ताम्हीणी घाटातून कोकणात कल्टी मारतो. यावेळी थांबलो. त्याचं चीज, सॉरी अमुल बटर झालं. :)
30 Aug 2011 - 10:03 am | सहज
कट्टा वृत्तांत आवडला.
30 Aug 2011 - 10:36 am | सूड
आजपर्यंतच्या उनाड दिवसांपैकी एक हा कट्टा !! जायचं ठरलं तेही आदल्या दिवशी. सकाळ-सकाळ फोन खणखणला, " सुड, मी पुण्यात कट्ट्याला जायचं म्हणतोय" इति शिंदे सरकार. म्हणलं बाबा थोडा वेळ दे विचार करायला गेले दोन वीकेंड पायाला भोवरा लावून फिरतोय, थोड्या वेळानं सांगतो काय ते.
बाकीचा फापटपसारा लिहीत नाही, पण सिंहगडने जनरल डब्यातून जायचं ठरलं. उभ्याने जावं लागणार अशी मनाची तयारी केलीच होती. पण काय आश्चर्य !! चक्क बसायला जागा मिळाली. वाटेत पुण्यातही भयंकर पाऊस असल्याचं फोनाफोनीवरुन कळलं.
उतरल्यावर एका अमुकअमुक अमृततुल्य नामक दुकानात शिरलो. त्या चहाला अमृततुल्य का म्हणावं आणि अमृत जर चवीला असं असतं तर देवांना तेच पिण्याची अवदसा का आठवावी असे प्रश्न पडले. चहाचा पाऊण कप ( पक्षी: ग्लास) संपवतोय तोवर काऊंटरवरुन कोणतरी जाडसर आवाजात ओरडलं 'ओ, तुमचं झालं असेल तर जागा रिकामी करा'. आय्ला, मनात म्हटलं अजून आहे चहा शिल्लक कपात, नंतर पाह्यलं तर आमच्याच शेजारी एकजण नुकताच चहा संपवून मित्राशी गप्पा मारत होता त्याच्यासाठी होतं ते. ही शिस्त पुणेकरांनी जरा वाहतुकीच्या बाबतीत वापरली असती तर किती बरं झालं असतं असा एक अविचार येऊन गेला.
पाच-सहा रिक्षावाल्यांची नकारघंटा ऐकून शेवटी ऑटो मिळाली. फार शोधाशोध करावी लागली नाही हे ही नसे थोडके. शाहजी'ज मध्ये पोहचेपर्यंत अन्या दातारान् आणलेल्या नारळाच्या वड्या संपल्या होत्या. मग जे काही चर्चा, मध्येच उडणारे हास्याचे फवारे यांनी शाहजी'ज दणाणून सोडलं.
गप्पा काय सुरु झाल्या की संपतात होय ?? पण आता शाहजी'ज मध्येही अमृततुल्य सारखा प्रसंग घडू शकतो, याचं प्रसंगावधान राखून काढता पाय घेतला. आता कट्टा रंगला शाहजी'ज च्या बाहेर. अर्धा तासभर गप्पा मारुन लांब राहणारी मंडळी घराकडे निघाली.
शेवटी उरलो ते मी, वप्या, किसन आणि आशू . मग वपाडाव यांचेकडून आयस्क्रीमची ट्रीट घेऊन कट्ट्याची सांगता झाली. वप्या स्वारगेट्पर्यंत सोडायला आला, पण शेवटपर्यंत तो भडंगाचा पुडा काही उघडलंन् नाय हो !!
30 Aug 2011 - 10:36 am | गवि
पुडा काही उघडलंन् नाय हो !!
अहा.
क्या बात..
.....
केलंन् .
उघडलान्,
ग्यला...
पड्ला मं?..
कळ्ळं कांय..?
हाच तो सुप्रसिद्ध आमच्या लाडक्या कोकणातला लाडका लहेजा... रत्नागिरीच्या शाळेत परत गेल्याचा भास झाला.
धन्यवाद हो देवरुखकर..
30 Aug 2011 - 11:07 am | किसन शिंदे
मस्तच झाला कट्टा..!
सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून खुप मजा आली त्याचबरोबर व्यनीतून जयंत कुलकर्णी येणार आहेत असं कळालं मग अशा हुरहुन्नरी, चतुरस्त्र लेखकाला भेटण्याची संधी दवडून चालण्यासारखं नव्हतंच. अल्बर्ट स्पिअर पुर्ण करण्यासोबतच मुसोलिनीवर लिहणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आणी आमची अवस्था 'देवाकडे मागितलं एक मागणं, त्याने पुर्ण केल्या दोन' अशी झाली होती. गप्पाटप्पा चालू असताना होणार्या प्रत्येक विनोदाला अटलबिहारी वेशातल्या दिवेकर भटजींच हास्य एकदम सातमजली होतं.
शाह-जी चे पराठेही अप्रतिम होते.
30 Aug 2011 - 11:12 am | स्पा
धन्यवाद
30 Aug 2011 - 11:25 am | सोत्रि
इनो घेतल्या गेला आहे.
50 फक्त ने आगाउ सुचना दिली होती ह्या कट्ट्याचीची आणि मी जाणारही होतो. पण त्या दिवशी लोणावळ्यावरुन परतायला खुप उशीर झाला (नागफणी - ट्रेक). पण किस्ना आणि सुदे थेट मुंबैहुन आलेले हे वाचल्यावर भयंकर शर्मनाक अवस्था झाली आहे. :( :( :(
पुढच्या कट्ट्याला नक्क़ी ! कधीचा ठरतोय ?
- (पराठे खुप आवडणारा मराठे) सोकाजी
30 Aug 2011 - 11:30 am | जयंत कुलकर्णी
सर्व तरूण मित्रांचे आभार !
मला खरं सांगतो माझे कॉलेजचे दिवस आठवले. अर्थात माझ्या उपस्थितीमुळे जरा तुमच्यावर बंधने आली असणार, पण काय करणार ? पण मी तुमच्या विनोदाची मजा लुटत होतो हे निर्विवाद.
आणि आपण सर्वांनी दिलेल्या भेटी बाबत काय बोलणार ! छानच आहे ! लवकरच मी त्याचा एक मोमेंटो करून त्याचा फोटो येथे टाकीन. मी तो स्वतः हाताने लाकडाचा craft करणार आहे. Design कालच तयार केले आहे. अर्थात याला वेळ लागेल कारण सगळे हाताने करणार आहे. :-).
30 Aug 2011 - 11:56 am | वपाडाव
जयंत कुलकर्णी व मनोबा यांचे विशेष आभार....
फक्त खरडीतुन होकार देउन भर पावसात तिथे उपस्थित राहिल्याबद्दल...
आपल्या भेटी अशाच वृद्धिंगत होत राहोत व मिपा परिवार पुर्ण समाजमनावर प्रतिबिंब उमटवत राहो.....
30 Aug 2011 - 12:05 pm | स्पंदना
किती खुष दिसताहेत सारीजण. गुड!! वपा आता संयोजक झाला!! गुड गुड!!
31 Aug 2011 - 1:24 am | ५० फक्त
तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी हुडकते आहे आता वपाडावचे दोनाचे चार हात करायचे कान्टॅक्ट तुम्ही घेता काय ओ अपर्णातै, नाही घ्याच घ्याच आग्रहाचि विनंती कम सल्ला ज्यादा.
31 Aug 2011 - 8:45 am | धन्या
हो राव... मॅट्रीमोनियल साईटसवर काय किंवा वधू-वर सुच़क केंद्रात काय फक्त काँटॅक्टच मिळतात. पुढच्या भानगडी आपल्यालाच कराव्या लागतात... भले मग ती मॅट्रीमोनियल साईट किंवा वधू-वर सुच़क केंद्र कितीही बोंबलू देत "इथे लग्न जुळतात."
बाकी वरच्या दोन प्रतिसादांचा अर्थ "अपर्णातैंची मॅट्रीमोनियल साईट किंवा वधूवरसुचक मंडळ आहे आणि त्या वप्याला कष्टमर बनवायच्या मागे आहेत" असा घ्यायचा काय? ;)
31 Aug 2011 - 9:09 am | सूड
( रेवती आज्जी देवळात गेलेली पाह्यली आणि आलो, घाबरतो ब्वॉ)
>>आता वपाडावचे दोनाचे चार हात करायचे कान्टॅक्ट तुम्ही घेता काय
अगदी अगदी !! :D
5 Sep 2011 - 8:12 am | स्पंदना
कश्याला एव्हढ्यात. अजुन हसाय् खेळायचे , दिवस त्याचे, का जळताय राव?
बाकि वपा आपण वेळ आली की बघुच रे, तसा तुला कोणी रिकामा ठेवला तोवर तर, नाही तर आहेतच पुण्याच्या पोरी.
5 Sep 2011 - 11:43 am | ५० फक्त
पाठिंब्याबद्द्ल धन्यवाद,
पण अपर्णातै, पुण्याच्या पोरी वप्याला रिकामा ठेवतील का नाही माहित नाही, पण त्याचा खिसा मात्र नक्की रिकामा करतील.
अर्थात वपाडावने मात्र डेट साठी शाजीच फिक्स केलंय असं कळालं कालच.
5 Sep 2011 - 12:24 pm | वपाडाव
तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत कशाला? याचसाठी....
सुंदर, गुणी/सोज्वळ, सुगरण व मनमिळावु (४ वेगवेगळ्या नव्हे काही) मुलगी शोधुन तिच्यासोबत बँड वाजवुन द्यायलाच नाही का?
राहता राहिलं खिशाचं.... झाला तर झाला रिकामा..... आहे कुणासाठी तो?
5 Sep 2011 - 1:39 pm | वपाडाव
तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत कशाला? याचसाठी....
सुंदर, गुणी/सोज्वळ, सुगरण व मनमिळावु (४ वेगवेगळ्या नव्हे काही) मुलगी शोधुन तिच्यासोबत बँड वाजवुन द्यायलाच नाही का?
राहता राहिलं खिशाचं.... झाला तर झाला रिकामा..... आहे कुणासाठी तो?
6 Sep 2011 - 11:49 am | स्पंदना
अच्छा ! म्हणजे खिसा रिकामा झाल्यावर मग तुला सुंदर सोज्वळ वगैरे वगैरे मुलगी पाहिजे, तोवर सार्या फटाकड्या शाजीज मध्ये खाउन पिउन टुन्न ?
6 Sep 2011 - 6:10 pm | वपाडाव
अगं तायडे, तसं नाही....
खिसा हा भरलेला असो वा कसाही.....
आहे तर त्यांच्याचसाठी (सोज्वळ मुलींसाठीच म्हणतोय मी) ना....
आपण नाय काय घरवाली..... बाहरवाली टायपचे......
प्रभु रामचंद्रावानी एकपत्नित्ववादी आहोत आपण.....
(जमलं तर सदैव तसंच ^^^^ राहण्याचा प्रयत्न करु)
30 Aug 2011 - 12:16 pm | अन्या दातार
पराठे इतके अप्रतिम आणी डेलिशिअस होते कि दुसर्या दिवशी ट्रेनमध्ये सकाळी नाश्तासुद्धा करावा वाटला नाही. :)
कुलकर्णी काकांनी कट्ट्याला उपस्थिती लावून अगदी चार चाँद लावले. मनोबाला इतके मिपाकर एकत्र भेटल्याने अगदी भरुन आले होते (असे त्याच्या चेहर्यावरुन आणि आवाजावरुन मला जाणवले)
सुड आणि किसन चक्क हुंबैवरुन येताहेत हे ऐकून तर फार आश्चर्य वाटले. मला वाटले स्पा त्याची 'नवी' YZ सॉरी, आपलं SZ घेऊन येत असेल.
वड्या लगोलग संपल्या असल्याने त्या चांगल्याच झालेल्या होत्या हे सांगणे न लगे. बाकी वपाडाव ने कुणालाही भडंग दिले नाही हे वाचून अंमळ वाईट वाटले. वपा, अरे कुठे फेडशील रे हे पाप???
30 Aug 2011 - 3:42 pm | मनराव
>>वपा, अरे कुठे फेडशील रे हे पाप???<<<
वपाकडून पुढच्या कट्ट्याला सबको भडंग....... :)
30 Aug 2011 - 4:20 pm | अन्या दातार
नको!!!!!!!! भडंग नको
सुड आणि किसनने जशी आईस्क्रीम ट्रीट घेतली तशीच आईस्क्रीम ट्रीट (किंबहुना त्याहीपेक्षा सरसच ;) ) सर्व कट्टेकर्यांना (तेही माझ्या उपस्थितितील) मिळूदेत!
31 Aug 2011 - 8:55 am | धन्या
अबे वप्याने पुन्हा एकदा उल्लू बनवलं तुम्हाला... त्याने सुजाता मस्तानी दयायचं कबूल केलं होतं... आणि आईस्क्रिमवर कटवलं... :)
31 Aug 2011 - 9:34 am | वपाडाव
तुला बर्या चवकश्या ह्या सगळ्या.....
बस की गप्प.....
तुला फुडंच्या येळी कटाप करतो बघ सुजाता मस्तानीच्या लिस्टमधुन.....
31 Aug 2011 - 10:14 am | ५० फक्त
छे काय मजा नाय राहिली सुजाता मस्तानी मध्ये, म्हणजे साइज फारच छोटा झालाय आता ग्लासाचा आणि त्यामुळं त्यातल्या द्रव पदार्थाची क्वांटीटी पण,
याच महिन्यात गेलो होतो की मी, आत्मशुन्य, वल्ली आणि गणेशा आरबिटीत जेवायला अन मग तिथुन पुढं पेठेतल्याच सुजाता मस्तानी मध्ये गेलो होतो, पराशेटच्या एरियात गेल्यावर त्यांना फोन पण केला होता येता का असं विचारलं, वाटलं होतं, त्यांची अन सुजाता मस्तानीची ओळाख बघता डिस्काऊंट नाही मिळाला तरी क्वांटीटी तरी थोडी जास्त मिळाली असती, पण तो योग नव्हता, असो.
अवांटर - सदर प्रतिसाद वेगवेगळे अर्थ काढले जाउ नयेत अशाच प्रकारे याची पुर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. कोणातेही शब्द गाळुन किंवा मनातले शब्द अॅडावुन प्रतिसाद वाचु नये.
30 Aug 2011 - 12:20 pm | स्पा
मला वाटले स्पा त्याची 'नवी' YZ सॉरी, आपलं SZ घेऊन येत असेल.
अन्या कशाला जळवतोस बे.. घेतलाय न इनो आता
गप्प पड कि बाजूला ;)
30 Aug 2011 - 1:38 pm | अनुरोध
आयला आधि कलाल असता तर आमि बी आलो असतो कि हो नविन असलो म्हनुन काय झालं.....
बरं आता पुढचा कट्टा कुठे... ???
30 Aug 2011 - 2:12 pm | Mrunalini
फोटो तर एकदम मस्त आलेत. मस्त मजा चालु आहे सगळ्यांची. हे शाजीज रेस्टॉरंट कुठे आहे????
30 Aug 2011 - 3:25 pm | अन्या दातार
आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो.
हाच आमचाही फंडा आहे; फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. तुम्ही घरी विविध पाकृ करता आणि आम्ही नित्यनवीन अशी खादाडीची ठिकाणे हुडकत तिथे कट्टे भरवतो! :)
30 Aug 2011 - 4:41 pm | Mrunalini
चांगले आहे. आपल्या पुण्यात अशी खादाडीची ठिकाणे हुडकायला मला पण खुप आवडतं. :)
30 Aug 2011 - 3:56 pm | वपाडाव
http://pune.burrp.com/listing/shahjis-paratha-house_raviwar-peth_pune_re...
एकदा या लिंकेवर क्लिकवुन पहा.... सर्व कोडे सुटतील....
30 Aug 2011 - 4:44 pm | Mrunalini
धन्स हो... :) आता पुढच्या वर्षी भारतात आल्यावर नक्की try करणार इथला पराठा. मला f. c. collg जवळचा चेतन्यचा पराठा पण खुप आवडायचा. mainly गोबी पराठा. :)
30 Aug 2011 - 4:44 pm | Mrunalini
धन्स हो... :) आता पुढच्या वर्षी भारतात आल्यावर नक्की try करणार इथला पराठा. मला f. c. collg जवळचा चेतन्यचा पराठा पण खुप आवडायचा. mainly गोबी पराठा. :)
30 Aug 2011 - 6:04 pm | वपाडाव
तेथील पराठे पण चाखले आहेत, पण तिथे सदानकदा वर्दळ असते....
म्हणुन जावे/वाट पाहुन खावे वाटत नाही....
पण तिथेच उभारुन तिथली हिरवळ पाहायला ज्याम आडौते....
31 Aug 2011 - 12:19 am | धन्या
हाहाहा... आमचं हापिस शिवाजीनगरला होतं तेव्हा आम्ही चैतन्यला पडीक असायचो... पराठे खायला आणि हिरवळ न्याहाळायला :)
30 Aug 2011 - 3:35 pm | प्रास
शनिवारी झालेल्या या पराठे कट्ट्याचा वृत्तांत आणि सोबतचे फोटो प्रचंड आवडले. हर्षदरावांच्या निमंत्रणानंतर, येण्याची खूप इच्छा असूनही या वेळी शक्य झालं नाही आणि जयंतरावांना याची देही भेटण्याची संधी हुकली.
पुढल्यावेळी त्यांनी त्यांच्या खिडकी-टेबलवाल्या खोलीत कट्टा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बाकी व्यवस्था करण्यास मिपा-कट्टेकरी समर्थ आहेत हे त्या मिपाकरांच्या परवानगीविनाच जाहिर करतो. ;-)
(पुढल्या कट्ट्याची वाट बघणारा) :-)
30 Aug 2011 - 4:08 pm | अत्रुप्त आत्मा
@-''आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली''
सदरहू कट्टा लई झ्याक झाला...आमच बी दुसय्राच कट्ट्यात बरच ''भ्या'' पराठ्यांबरोबर चेपलं गेलं...पहिल्या (आखाडातल्या)खेपेला बरच जड गेलं व्हत.(बाकी पहिल्या खेपेला भारीच जड होतं हो मेलं ;-) ) अता अनुभवानी हुरूप वाढला... ;-)
फक्त आमचा सगळ्यांनी अटल बिहारी केला. (अर्थात तिसय्रा कत्ट्यापर्यंत आमी बी अट्टल होऊच ;-) )
पराठ्याचा फोटू स्माइली सारखा येणार हे आंम्ही वर्तवलेलं 'अमुल्य' भविष्य लोणी लाऊन खंरं ठरल की नै... :-)
30 Aug 2011 - 4:32 pm | आत्मशून्य
पराठ्याचा हँगोव्हर पूढील दोन दीवस जिभेवर (आणि मनामधे) तसाच होता. पटीयाला लस्सि व चूर्चूर नानही अत्यंत चवदार. त्यातून जयंत कुलकर्णी सारख्या व्यक्तीमत्वाशी झालेली भेट तर कट्याचे वातावरण अधीकच उत्साही बनवत होतं. बाकी मिपाकर्स जमले की ज्या (खमंग) गप्पा सूरू होतात त्या लगेच सूरू झाल्याच. तसचं स्पा नेही शब्द दिल्याप्रमाणे फोनवरून कट्याला हजेरी लावली त्यामूळे पराठा खाण्याचे चायलेंजच दीवस फक्त वीकडेज असतात हा मूद्दा सोडला तर बाकी सर्व कार्यक्रम एकदम मस्त झाला.
धनाजी व वपाडाव सोबत असताना वाटेत एका हलवायाच्या दूकानात एक व्यक्ती खमंग जिलब्या टाकत होता ते पाहून आम्ही तिघे हसू आवरत शाहजी'ज ला पोचलो. त्यानूसार अल्केमीस्ट मधील साइन लॅंग्वेजनूसार आधीच शूभशकून झाला होता म्हणायला हरकत नाही ;)
बाकी सर्वजण निघून गेल्यावर वपाने हूंबैकरांसोबत अजून एक छोटासा कट्टा (गप्पा-गोश्टींचा) साजरा करून त्यांना मार्गस्थ व्हायला मध्यरात्री जी मदत केली त्याबद्दल त्याचे विषेश आवर्जून आभार.