मला ओळखणार्या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय.
त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय. त्यातही सुरूवातीला माझा शरीराला छेद पाडून वापरल्या जाणार्या दागिन्यांना जास्त विरोध होता; पण एका घटनेने माझा अंगठीच्या वापराला असलेला विरोध देखील तितकाच तीव्र झाला. १९९८ साली माझ्या एका शेजार्याला घेऊन मी इस्पितळात गेलो असता तिथे टेल्को चा एक अभियंता उपचाराकरिता आलेला मला दिसला. त्याच्या हाताच्या बोटांवर अवजड वस्तू पडून गंभीर दुखापत झाली होती. डॊक्टरांना पुढील उपचार / क्ष-किरण तपासणी या करिता त्याच्या बोटात असलेली अंगठी काढणे गरजेचे होते पण बोटात ज्या भागावर अंगठी होती त्याच्या पुढच्या भागावरच गंभीर जखम झाली होती. आता ती घट्ट बसलेली अंगठी (अंगठी सर्वसाधारणपणे घट्ट बसणारीच असते अन्यथा ती कधीही बोटातून निसटून पडू शकते) काढायची तर त्या दुखापत झालेल्या भागाला घासूनच काढावी लागणार म्हणजे पुन्हा असह्य वेदनांना सामोरे जाणे आले. शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, “तो क्या अब आप इनकी उंगली काट डालेंगे?” तेव्हा माझ्या कडे आश्चर्याने पाहत ती उत्तरली, “नही, उंगली नही, इनकी अंगुठी काट देंगे.” पण बोट कापणे ज्यांना शक्य आहे असे इस्पितळातले विशारदही अंगठी कापू शकत नाहीत, त्याकरिता मग दागिन्याच्या दुकानातून कारागिरास पाचारण करण्यात आले आणि त्या रूग्णाच्या पुढील उपचारांना अजूनच विलंब झाला. त्यानंतर माझ्या डोक्यात अंगठी चा वापर एकदम निषिद्ध हा विचार पक्का रूजला.
मग आता लेखाचे शीर्षक अशा पद्धतीने देण्याचे मला कारण तरी काय असा प्रश्न वाचकांना नक्कीच पडला असेल तर त्याचे स्पष्टीकरण असे की लेखाच्या शीर्षकात वापरलेला अंगठी हा शब्द प्रतीकात्मक आहे. आपल्या सर्वांना अल्लाउद्दीन आणि त्याच्या जादुई दिव्याची गोष्ट ठाऊक असेलच. या गोष्टीतील हा जादुई दिवा मूळात अल्लाउद्दीनच्या मालकीचा नसतो तर त्याचा काका म्हणवून घेणारा एक जण (जो या कथेचा खलनायक आहे) त्याला आपल्या सोबत घेऊन जातो आणि एका अंधार्या तळघरातून मोठा धोका पत्करून हा दिवा शोधून आणण्याचे काम अल्लाउद्दीनवर सोपवितो. अल्लाउद्दीनला या कार्यासाठी तळघरात पाठविण्यापुर्वी हा त्याचा तथाकथित काका त्याच्या बोटात एक अंगठी चढवतो. ह्या अंगठीत देखील दिव्याप्रमाणेच घासल्यावर आज्ञाधारक राक्षसाला प्रकट करण्याचा गुण असतो. फक्त दिव्याच्या तूलनेत या अंगठीच्या राक्षसाच्या काही मर्यादा असतात व क्षमता कमी असते. ही अंगठी अल्लाउद्दीनला तात्पुरत्या स्वरूपात तळघरातील मोहिमेत काही अडचण आल्यास मदतीकरिता दिली गेलेली असते. नंतर जेव्हा अल्लाउद्दीन दिवा मिळवितो तेव्हा हा काका म्हणविणारा इसम लबाड असल्याचे त्याला कळते व तो दिवा त्याला द्यायचे नाकारतो आणि स्वत:साठीच त्या दिव्याचा वापर करतो. मालकाच्या इच्छापूर्तीबाबत दिव्याच्या राक्षसाची क्षमता प्रचंड असल्यामुळे पुढे दिव्याचाच वापर मोठ्या प्रमाणात केला गेल्याचा कथेत उल्लेख येत राहतो. त्यासोबतच खलनायकाचे दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि नायकाने खलनायकापासून दिव्याची केलेली जपणूक या बाबीही कथानकाच्या प्रवासात पुढे वाचकांच्या समोर येत राहतात.
पुढे एका प्रसंगी खलनायक अल्लाउद्दीनचा हा जादुई दिवा स्वत:च्या ताब्यात घेण्यात यशस्वी होतो. आता अल्लाउद्दीनचे कसे होणार या काळजीत पडलेला वाचकदेखील नायक व खलनायकासोबत एव्हाना अंगठीला विसरलेला असला तरी लेखक मात्र तिला ध्यानात ठेवून असतो आणि ही योग्य संधी साधून पुन्हा ती लोकांच्या नजरेत आणून देतो. त्याचे असे होते की, दिवा नाहीसा झाल्यामुळे हताश झालेला अल्लाउद्दीन हातावर हात चोळत बसलेला असतो तेव्हा त्याच्याकडून नकळत बोटातील अंगठी घासली जाऊन त्यातून राक्षस प्रकट होतो. अल्लाउद्दीनला कळतच नाही की दिवा हरवला असला तरी आता राक्षस कुठून आला ते. मग राक्षस त्याला आपण अंगठीच्या मालकाचे गुलाम असल्याचे सांगतो. तेव्हा अल्लाउद्दीन त्याला प्रथम दिवा आणून देण्यास फर्मावतो. राक्षस त्याला दिव्याची ताकद अंगठीहून मोठी असल्याने तसे शक्य नसल्याचे समजावतो पण त्याचसोबत इतर लहान मोठी मदत करण्याचे आश्वासन देतो. पुढे ह्या अंगठीच्या राक्षसाचे मर्यादित सहकार्य आणि अल्लाउद्दीनचे बुद्धिचातुर्य ह्या दोहोंच्या एकत्रित प्रयत्नांना यश मिळून दिवा पुन्हा अल्लाउद्दीन च्या ताब्यात येतो. या कथेत अंगठी दिव्यापेक्षा कमी क्षमतेची असल्याचे दाखविली गेले असले तरी दिवा पुन्हा मिळविण्यासाठी या अंगठीची मदत मोलाची ठरल्याचे वाचकांच्या लक्षात येते.
या गोष्टीत उल्लेख केलेल्या अंगठीसारखी किमान एक तरी अंगठी आपल्यापैकी प्रत्येकाकडे असते आणि ती म्हणजे आपल्यापाशी असलेले दुय्यम कौशल्य. एक मुख्य कौशल्य आपल्याकडे असते ज्याच्या बळावर आपण आपला चरितार्थ चालवित असतो जसे डॊक्टर, इंजिनीयर, वकील, इत्यादी. त्याशिवाय आपणापाशी अजुनही एखादे कौशल्य असू शकते की ज्याचा आपण व्यावसायिक वापर करीत नसलो तरी तो आपला छंद असू शकतो जसे गायन, वादन, लेखन, चित्ररेखाटन, इत्यादी. अल्लाउद्दीनचा दिवा त्याच्या ताब्यातून नाहीसा झाला तसे पुढे आयुष्यात काही कारणाने आपल्याला आपल्या मुख्य कौशल्यास बाजूला ठेवावे लागले (म्हणजे पगारदारांना सक्तीची/स्वेच्छा निवृत्ती आणि व्यावसायिकांना अपयश इत्यादींमुळे) तरी आपले हे दुय्यम कौशल्य अल्लाउद्दीनच्या गोष्टीतील अंगठीप्रमाणे आपल्या मदतीला धावून येऊ शकते आणि उत्पन्नाचे साधन देखील ठरू शकते. क्वचित प्रसंगी आपल्या मूळ व्यावसायिक कौशल्यापेक्षा ह्या छंदामुळेच आपल्याला जास्त पैसा, प्रसिद्धी व समाधान मिळू शकते.
देशातील सर्वात मोठे महाकाव्य समजले जाणार्या महाभारतात देखील पांडवांना जेव्हा बारा वर्षे वनवास व एक वर्ष विजनवास भोगावा लागला तेव्हा पांडवांनी आपल्या दुय्यम कौशल्यांच्या जोरावर ते एक वर्ष विराट राजाच्या पदरी व्यतीत केले. गदायुद्धात प्रवीण असलेला भीम त्याच्या भोजनप्रेमामुळेच चांगला आचारी देखील होता व बल्लवाच्या रूपात त्याने ते सिद्ध करून दाखविले तर सौंदर्यसम्राज्ञी द्रौपदी सौंदर्योपचारांविषयी ज्ञान असल्यामुळे त्या काळातील सुदेष्णा राणीची ब्युटीशिअन म्हणून सैरंध्री या नावाने यशस्वीपणे वावरली. भालाफेकीत कुशल असलेल्या युधिष्ठिराने आपण शकुनीच्या कपटामुळे हरलो असलो तरी द्युतातील कौशल्य अंगी असल्याचे दाखवून दिले आणि धनुर्धारी अर्जुनाने नृत्याच्या स्टेप्समध्येही आपला नेम चूकत नसल्याचेच राजकुमारी उत्तरेचा नृत्य शिक्षक म्हणून वावरताना बृहन्नडेच्या रूपात सिद्ध केले.
पौराणिक कथांना बाजुला ठेवले तरी चालु काळातही मोहन आगाशे, गिरीश ओक व श्रीराम लागू यांच्यासारख्या लोकांनी वैद्यकीय व्यवसायापेक्षाही अभिनयातून नेत्रदीपक यश कमावल्याचे आपणांस दिसून येते. यापैकी श्रीराम लागू यांना तर ऎनासिनच्या जाहिरातीत काम केल्यामुळे वैद्यकीय व्यवसायापासून त्यांच्या संघटनेने वंचित केले आहे तरी त्यांच्या चरितार्थावर यामुळे फरक पडलाच नाही. सलील अंकोला ह्या क्रिकेटपटूला त्याच्या दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी त्याने अभिनयाद्वारे दूरदर्शनमालिकांमध्ये स्वत:चे बस्तान बसविले. बॆरिस्टर जीना व जवाहरलाल नेहरू हे राजकारणाइतकेच वकिलीत देखील यशस्वी ठरले. हल्लीचे अनेक राजकारणी सुद्धा वकिली व्यवसायातील पदवीधर असतात.
कधी कधी तर एखाद्या व्यक्तिकडे इतकी कौशल्ये असतात आणि सगळीच इतकी महत्वाची असतात की कशाला दुय्यम म्हणावे हा प्रश्नच पडतो. गायक / अभिनेता म्हणून परिचित असलेले स्व. श्री. किशोरकुमार हे तितकेच उत्तम गीतकार, संगीतकार, लेखक व दिग्दर्शकही होते. अतिशय यशस्वी शास्त्रज्ञ असलेले डॊ. ए.पी.जे अब्दुल कलाम जगभर ओळखले गेले ते भारताचे राष्ट्रपती झाल्यावर. त्या पदावरून निवृत्त झाल्यावरही त्यांनी आपली ओळख एक विद्वान प्राध्यापकाच्या रूपात जगापुढे ठेवलीय. ह्या लोकांपाशी एकाहून अधिक अंगठ्या असल्यामुळे ह्यांना आयुष्यात कधीही ’पुढे काय?’ अशी विवंचना सतावणार नाही हे नक्की. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी ह्या प्रतीकात्मक अंगठीचा एवढा महिमा जाणून घेतल्यावर निदान एकतरी अंगठी बाळगायला (खरं म्हणजे ओळखायला कारण आपल्याकडे ती असतेच पण आपण तिच्याकडे लक्ष देत नाही) हवीच, कोणास ठाऊक दिवा कधी हातातून निसटेल तेव्हा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घट्ट बसलेली अंगठीच मदतीला धावून येईल ना?
प्रतिक्रिया
5 Aug 2011 - 11:36 am | ५० फक्त
शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, - मला वाट्लं तुम्ही म्हणालात, ' तो अब तक क्या पाळणेंमें झोपव्या था क्या पेशेंट को ?
''कोणास ठाऊक दिवा कधी हातातून निसटेल तेव्हा हातावर हात चोळत बसायची वेळ आलीच तर बोटात घट्ट बसलेली अंगठीच मदतीला धावून येईल न'''' - हेच स्टेटमेंट् मराठी संस्थळं / डु आय्डि / उधारी खातं असणारे बार/ क्रेडिट कार्ड यांना सुद्धा किती फिट बसतं ना.
5 Aug 2011 - 11:43 am | वपाडाव
"पायातील पैंजण / जोडवे " या विषयावर लेख पाडायला कुणी लेडी तयार हय का?
5 Aug 2011 - 11:47 am | विश्वनाथ मेहेंदळे
लेख आवडला. सुरुवातीला जरा मुद्दा कळत नव्हता, पण नंतर चा भाग आवडला.
5 Aug 2011 - 1:49 pm | चेतन सुभाष गुगळे
@ विश्वनाथ मेहेंदळे,
<< लेख आवडला. सुरुवातीला जरा मुद्दा कळत नव्हता, पण नंतर चा भाग आवडला. >>
शीर्षकावरून किंवा सुरुवातीच्या परिच्छेदांवरून नेमका काय मुद्दा मांडायचा आहे याचा अंदाज येऊ शकणार नाही अशा पद्धतीचे लिखाण करायला मला विशेषत्वाने आवडते.
धन्यवाद.
5 Aug 2011 - 7:41 pm | प्रदीप
विश्वनाथ ह्यांच्याशी मीही सहमत आहे. सुरूवातीस लेख थोडा भरकटल्यासारखा वाटतो आहे (meandering). पण पुढे तो मुद्द्यावर आला आहे. विषय, भाषाशैली व मांडणी (सुरूवातीचा स्वतःविषयीचा भाग व एका रूग्णाईताच्या अंगठीचा भाग सोडल्यास) छान आहे., लेख आवडला.
5 Aug 2011 - 8:13 pm | चेतन सुभाष गुगळे
@ प्रदीप
<< सुरूवातीस लेख थोडा भरकटल्यासारखा वाटतो आहे (meandering). >>
<< सुरूवातीचा स्वतःविषयीचा भाग व एका रूग्णाईताच्या अंगठीचा भाग सोडल्यास >>
सदर लेखन हे एका जाहीर सभेतील भाषणाच्या उद्दिष्टाने केले गेले होते. त्या ठिकाणी मला ओळखणारे अनेक जण होते. मी निरीश्वरवादी (या विषयावर त्यांच्यासमोर यापूर्वीच भाषणे केली असल्याने) असल्याचे त्यांना ठाऊक असल्याने इतक्या किमान प्रास्ताविकाची गरज होतीच.
<< विषय, भाषाशैली व मांडणी छान आहे., लेख आवडला >>
धन्यवाद.
6 Aug 2011 - 7:26 am | प्रदीप
तुमचा संदर्भ आता लक्षात आला. तरीही इथे तो लेख प्रसिद्ध करतांना ते दोन्ही भाग काढले असते तर लेख अजून चांगला झाला असता असे मला वाटते.
लेख व्यक्तिगत बाबींवर नसल्यास त्यात लेखकाने स्वतःविषयी कसलीही बरीवाईट टिपण्णी करणे मलातरी अनावश्यक वाटते. तसेच इस्पितळातील एका रूग्णाच्या अंगठीची कहाणी इथे सर्वस्वी distracting वाटली.
स्वतःविषयीची टिपण्णी आल्याने अनेकांना तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचे आयते साधन मिळते. आणि त्या इस्पितळातील घटनेच्या उल्लेखाने तर इतके डिस्ट्रॅक्शन झाले आहे की अनेक प्रतिसाद त्यातच गुंतून पडले आहेत. शक्य आहे, तसे लिहीणार्यांनी लेखाचा पुढील व मुख्य, महत्वाचा भाग वाचलाच नसावा.
असो, ही माझी मते झाली. तुमचे लेख ह्यापुढे आवर्जून वाचत राहीन.
6 Aug 2011 - 8:19 am | चेतन सुभाष गुगळे
<< तुमचा संदर्भ आता लक्षात आला. तरीही इथे तो लेख प्रसिद्ध करतांना ते दोन्ही भाग काढले असते तर लेख अजून चांगला झाला असता असे मला वाटते. >>
हा लेख अपूर्णावस्थेत प्रकाशित करावा असे मला तरी ठीक वाटले नाही. या शिवाय हा लेख यापूर्वीही इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आहेच. तिथे त्यात संपादकांनी देखील कुठली काटछाट केलेली नाहीय. हे पाहा.
http://mfdiwaliank.blogspot.com/2010/10/mahima-angthicha.html
<< लेख व्यक्तिगत बाबींवर नसल्यास त्यात लेखकाने स्वतःविषयी कसलीही बरीवाईट टिपण्णी करणे मलातरी अनावश्यक वाटते. तसेच इस्पितळातील एका रूग्णाच्या अंगठीची कहाणी इथे सर्वस्वी distracting वाटली. >>
बोटात अंगठी परिधान केल्यास आपत्तीच्या वेळी कुठल्या अडचणी येऊ शकतात हे देखील इथे मांडणे मला तरी गरजेचे वाटते.
<< स्वतःविषयीची टिपण्णी आल्याने अनेकांना तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचे आयते साधन मिळते. >> वैयक्तिक हल्ला करायची इच्छा असल्यास करणारे कुठल्याही कारणाने आणि कुठेही करू शकतात.
हे पाहा इथे तर एकाने त्याकरिता स्वतंत्र धागा काढला आहे.
http://www.misalpav.com/node/18720
त्यात त्यांना आनंद वाटत असल्यास तो आनंद त्यांच्यापासून हिरावून घेण्याची माझी इच्छा नाही. Let them enjoy.
इथे थोडीच कुणा जाणकार समीक्षकांकडून माझ्या लेखनाची चिरफाड होतेय? कुणा काल्पनिक नाव धारण करणार्या व्यक्तिने माझ्या लेखनाची आणि अगदी वैयक्तिक माझी निंदा केली तरी त्याची फिकीर मी का करावी? त्यांच्या संकेतस्थळावरील ओळखीप्रमाणेच त्यांनी केलेली माझी निंदाही तितकीच काल्पनिक समजून सोडून द्यावी असे मला वाटते. अर्थात त्यातील मजकूर वाचून माझी बर्यापैकी करमणूक होते हा भाग निराळा. त्याकरिता त्यांचेही आभारच मानायला हवेत.
<< तुमचे लेख ह्यापुढे आवर्जून वाचत राहीन.>>
धन्यवाद प्रदीप. माझे लेखन वाचून आपली निराशा होणार नाही याची खात्री बाळगा.
6 Aug 2011 - 10:56 am | अन्या दातार
>>बोटात अंगठी परिधान केल्यास आपत्तीच्या वेळी कुठल्या अडचणी येऊ शकतात हे देखील इथे मांडणे मला तरी गरजेचे वाटते.
मग रस्ता क्रॉस करताना, गाडी चालवताना तसेच मराठी संस्थळावर लेख वाचताना कुठल्या आपत्ती येऊ शकतात हे देखील मांडा की राव!
6 Aug 2011 - 12:20 pm | इंटरनेटस्नेही
क्या बात क्या बात.. गुगळे साहेब मग ते भाषण सारांश रुपाने इथे मिपावर देखील प्रसिद्ध करा की राव.. तेवढाच आम्हा पामरांचा फायदा!
-
आपला कृपाभिलाषी,
इंट्या.
6 Aug 2011 - 12:21 pm | इंटरनेटस्नेही
क्या बात क्या बात.. गुगळे साहेब मग ते भाषण सारांश रुपाने इथे मिपावर देखील प्रसिद्ध करा की राव.. तेवढाच आम्हा पामरांचा फायदा!
-
आपला कृपाभिलाषी,
इंट्या.
5 Aug 2011 - 11:47 am | स्पा
अप्रतिम .. मस्तच जमलाय ...
पटापट लिहा हो तुम्ही
२ ३ दिवस एवढा मोठा gap घेऊ नका
शेवटी तिथली परिचारिका म्हणाली, “अब तो काट ही डालनी पडेगी.” मी घाबरून विचारले, “तो क्या अब आप इनकी उंगली काट डालेंगे?” तेव्हा माझ्या कडे आश्चर्याने पाहत ती उत्तरली, “नही, उंगली नही, इनकी अंगुठी काट देंगे.”
तुमची विनोद बुद्धी पाहून मौज वाटली,हे अतिशय विनम्रतेने नेमूद करू इच्छितो
असो
और आनेदो
5 Aug 2011 - 12:04 pm | प्यारे१
>>>२ ३ दिवस एवढा मोठा gap घेऊ नका
अरे स्पावड्या हा गॅप त्यांनी का घेतला ते लिहिलंय की! पण फक्त प्रसादसाठी हो...!!! आपण फक्त वाचायचं ;)
http://www.misalpav.com/node/18666#comment-327912
5 Aug 2011 - 12:18 pm | चेतन सुभाष गुगळे
@प्रसन्न आपटे,
रोज अनेक कल्पना सूचत असल्या तरी कित्येक दिवसांत नव्याने लेखन केलेले नाहीय. हे जुनेच लेखन प्रसिद्ध करत आहे. प्रतिक्रिया वाचून त्यांना प्रत्युत्तरे देण्यात वेळ जात असल्याने लेखन प्रकाशित करण्यात वेळ लागत आहे.
परिचारिकेशी बोलताना विनोदबुद्धीने बोललोच नाही. हाड, मांस, लोंबणारी कातडी आणि रक्ताने माखलेले ते बोट पाहून अतिशय यातना होत होत्या. अशावेळी विनोद सूचणे कसे काय शक्य आहे? मला खरंच असे वाटले की काही वेळात हे बोट निकामी झाले तर इथला जंतूसंसर्ग इतर भागात पसरू नये म्हणून हे बोट कापले जाईल की काय?
बाकी लेख आपल्याला आवडल्याचे आपण नमूद केले, त्याबद्दल आपला आभारी आहे.
5 Aug 2011 - 11:48 am | पियुशा
या ..........अंगठीत लपलय काय? ,लपलय काय?
हे मराठी गाण आठवल, अन हसुन हसुन पुरेवाट झालिये ;)
@ व .प्या.
"पायातील पैंजण / जोडवे " या विषयावर लेख पाडायला कुणी लेडी तयार हय का?
तु नेहमी दुसर्यानाच का बरे विडा ऊचलायला सान्गतोस?
हा शिवधनुष्य तुच उचल की ;)
5 Aug 2011 - 11:59 am | वेताळ
असेच एकदा हॉस्पिटलात माझ्या एका दोस्ताला अपघात झालेवर त्याची महागडी पँट फाडावी लागली पण मी अजुनही पँट वापरणे सोडले नाही.
5 Aug 2011 - 12:26 pm | मी ऋचा
मी हा प्रतिसाद वाचून गतप्राण झालेली आहे हे नम्रपणे नमूद करू ईच्छिते ;).
5 Aug 2011 - 12:46 pm | ५० फक्त
अर्र्र्र्र्र्र्र , माझी एक प्यार्टी गेली, तरी आता हेवनली बाव्डी झाल्याबद्दल अभिनंदन
अवांतर - ७२.५६९८९६३३६५१%
5 Aug 2011 - 2:31 pm | मी ऋचा
धन्यवाद! आणि अवांतरासाठी शाब्बास.
5 Aug 2011 - 12:50 pm | प्यारे१
'वेताळा'च्या प्रतिसादाने ऑलरेडी गतप्राण झालेली ही प्रतिसाद खरडणारी ऋचा म्हणजे संत्राच्या झाडवाली 'हडळ' काय?
5 Aug 2011 - 2:29 pm | मी ऋचा
आयला माझी "हिडन आय्डेंटीटी" उघड झाली!
5 Aug 2011 - 12:00 pm | नितिन थत्ते
चांगला विषय मांडला आहे.
कौशल्ये अडचणीच्या वेळी उपयोगी पडतात हे तर आहेच. त्याचबरोबर अशी काही कौशल्ये स्ट्रेस रिलीव्हर म्हणूनही कामास येतात. उदाहरणार्थ एखाद्याला चित्रकलेत गती असेल तर आत्यंतिक ताण आल्यावर चित्र काढण्यात मन रमवून तो ताण कमी करता येतो.
5 Aug 2011 - 12:03 pm | चेतन सुभाष गुगळे
<< त्याचबरोबर अशी काही कौशल्ये स्ट्रेस रिलीव्हर म्हणूनही कामास येतात. >>
या विधानाशी पूर्णत: सहमत.
धन्यवाद नितीन थत्ते.
5 Aug 2011 - 1:45 pm | जाई.
+१
सहमत
5 Aug 2011 - 12:19 pm | नगरीनिरंजन
खूपच छान विचार आहेत. अडीअडचणीसाठी दुय्यम कौशल्य पाहिजेच! म्हणूनच मी नुकताच जिलब्या पाडायला शिकलो आहे...
तुमचे लेखन ओघवते आणि सर्वस्पर्शी आहे हे नमूद केल्यावाचून राहवत नाही. वैचारिक लेखनाबरोबर थोडे करमणूकप्रधानही लिहावे ही विनंती.
आता एक लेख महिमाची अंगठीवरही येऊ द्या.
5 Aug 2011 - 12:51 pm | वपाडाव
साफ खपलोय....
=))=))=))=))
5 Aug 2011 - 1:01 pm | चेतन सुभाष गुगळे
@नगरीनिरंजन,
<< तुमचे लेखन ओघवते आणि सर्वस्पर्शी आहे >>
या आपल्या प्रशंसोद्गाराबद्दल अत्यंत आभारी आहे.
<< वैचारिक लेखनाबरोबर थोडे करमणूकप्रधानही लिहावे >>
तसे लिखाण मी यापूर्वीच केले आहे. आपण ते इथे वाचू शकता :-
http://www.misalpav.com/node/18561
http://www.misalpav.com/node/18534
यापैकी चतुर्भुज या एकांकिकेचा दिनांक २७.०७.२०११ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग देखील झाला आहे.
<< आता एक लेख महिमाची अंगठीवरही येऊ द्या >>
सदर लिंकद्वारे उघडणारे छायाचित्र छान आहे परंतू त्यासोबत दिलेली बातमी त्या अभिनेत्रीच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असल्याने त्यावर लेख लिहीणे मला ठीक वाटत नाही.
धन्यवाद.
5 Aug 2011 - 1:23 pm | प्यारे१
>>>तसे लिखाण मी यापूर्वीच केले आहे. आपण ते इथे वाचू शकता :-http://www.misalpav.com/node/18561
ही लिंक 'चेतनची शोकांतिका' या लेखावर उघडते. सदर लेख हा करमणूकप्रधान असल्याचा लेखकाच्या लिहिण्यातून आम्हाला समजले. आमची समज तोकडी पडली नव्हे तोकडीच असल्याचा आज आम्हाला साक्षात्कार झालेला आहे. हे भूमाते आम्हाला पोटात घे.
>>>यापैकी चतुर्भुज या एकांकिकेचा दिनांक २७.०७.२०११ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग देखील झाला आहे.
चतुर्भुज वाचायला सर्वसाधारण गतीने दहा मिनिटापेक्षा जास्त लागू नयेत. अभिनयासहित या सर्व सादरीकरणाच्या कृतीला २० मिनिटे लागतात असे समजू. प्रयोग कुठल्या कार्य्क्रमाच्या निमित्ताने झाला?
5 Aug 2011 - 1:35 pm | चेतन सुभाष गुगळे
चेतनची शोकांतिका हा लेख "छोटा चेतन" या चित्रपटाशी संबंधित आहे. चित्रपटविषयक लेखन हे करमणूक प्रधानच मानले जाते.
चतुर्भुज वाचण्यास १० मिनीटे लागतात या आपल्या विधानाशी सहमत नाही. साधारण ३५ मिनीटे लागतात असा आमचा अनुभव आहे. यावर वाद घालण्यात अर्थ नाही. सदर एकांकिकेचा प्रयोग "टाटा मोटर्स समाज कल्याण केंद्र - एकांकिका स्पर्धा" या अंतर्गत झाला. २७ जुलै रोजी आकुर्डी केंद्रातर्फे सहा कलाकारांमार्फत ही एकांकिका सादर करण्यात आली. या प्रयोगास ४५ मिनीटे एवढा वेळ लागला. याच दिवशी इतर तीन केंद्रांनीही त्यांच्या एकांकिका सादर केल्या. संपूर्ण कार्यक्रम साडे तीन तासाचा होता.
5 Aug 2011 - 12:33 pm | किसन शिंदे
उत्तम आहे लेख.
अवांतर: ह्या लेखाची कल्पना तुम्हाला कुठे सुचली?
5 Aug 2011 - 1:16 pm | चेतन सुभाष गुगळे
@किसन शिंदे,
आपला आभारी आहे.
एका दिवाळी अंकात मी लता मंगेशकरांची सविस्तर मुलाखत वाचली. त्यात त्यांना पानातून शेंदूर कालवून, जेवणात ब्लेडचे तुकडे घालून त्यांच्या स्वरयंत्राला इजा होईल असा डाव काहींनी रचल्याचा एक अनुभव त्यांनी नमूद केला होता. त्याच मुलाखतीतत पुढे त्या एक उत्तम छायाचित्रकार असल्याचाही उल्लेख होता व सोबत त्यांनी काढलेली काही छायाचित्रेही प्रकाशित केलेली होती. मुलाखत वाचल्यावर मी विचार केला की समजा लताजींच्या स्वरयंत्राला अपाय करण्यात त्यांचे हितशत्रू यशस्वी झाले असते तरीही लताजी व्यावसायिक आघाडीवर कोलमडून न पडता छायाचित्रकार म्हणूनही तितक्याच यशस्वी ठरल्या असत्या इतकी त्यांनी काढलेली छायाचित्रे अप्रतिम आहे.
या उदाहरणावरून मला हा लेख लिहीण्याची कल्पना सूचली.
5 Aug 2011 - 1:22 pm | किसन शिंदे
अरे वा!
तुम्ही पाहीलेली लताताईंची अशी छायाचित्रे आम्हालाही पहायला मिळू द्या की..!
5 Aug 2011 - 1:40 pm | चेतन सुभाष गुगळे
टाटा मोटर्स समाज कल्याण केंद्र आकुर्डी येथे दरवर्षी ३५ रुपये वर्गणी काढून ५० दिवाळी अंकांची खरेदी केली जाते. प्रत्येक आठवड्याला एक या गतीने वर्षभरात हे अंक वाचले जातात. पुढे यापैकी प्रत्येक अंक एकेका वर्गणीदाराला भेट दिला जातो. संबंधित मुलाखत ज्या अंकात प्रसिद्ध झाली आहे तो अंक माझ्याजवळ नाहीय. कुठे आहे ते शोधून चित्रे प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
5 Aug 2011 - 2:38 pm | चेतन सुभाष गुगळे
हा लेख वाचावा.
http://www.mid-day.com/entertainment/2010/jun/190610-lata-mangeshkar-pho...
इथे राजाध्यक्ष म्हणतात - "Shooting didi (Lata) is difficult even though she is easy in front of the camera," Rajadhyaksha said. "It's difficult because didi herself is a very good photographer. She is well versed with the nuances of photography."
त्यांनी स्वतः काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन देखील भरवलं होतं. इथे तसा उल्लेख आहे.
http://www.screenindia.com/old/nov12/cover.htm
अजून काय हवं?
5 Aug 2011 - 12:45 pm | मृत्युन्जय
मस्त जमला आहे लेख.
5 Aug 2011 - 1:18 pm | चेतन सुभाष गुगळे
@मृत्युंजय,
धन्यवाद.
5 Aug 2011 - 1:38 pm | गणपा
नमनालाच घडाभर तेल गेलं पण जो मुद्दा मांडायचा होता तो समजला.
लेख आवडल्या गेला आहे.
-(अंगठीच्या शोधात) गणा
5 Aug 2011 - 1:46 pm | चेतन सुभाष गुगळे
@ प्रतिक,
<< नमनालाच घडाभर तेल गेलं पण जो मुद्दा मांडायचा होता तो समजला. >>
शीर्षकावरून किंवा सुरुवातीच्या परिच्छेदांवरून नेमका काय मुद्दा मांडायचा आहे याचा अंदाज येऊ शकणार नाही अशा पद्धतीचे लिखाण करायला मला विशेषत्वाने आवडते.
<< लेख आवडल्या गेला आहे.>>
धन्यवाद
5 Aug 2011 - 2:18 pm | शाहिर
+१
डोंगर पोखरुन उंदीर काढला
5 Aug 2011 - 3:44 pm | नावातकायआहे
+१
(बोटांच्या शोधात) -फणा
5 Aug 2011 - 2:44 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुरेख आणि कसदार लेखन पुन्हा एकदा.
ह्या ओळी तर प्रत्येकानी आपल्या खरडवहीत डकवुन रोज वाचाव्यात अशाच आहेत.
तुमच्या लेखणीला सलाम.
5 Aug 2011 - 2:51 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद प्रसाद,
आपल्या प्रतिसादाचीच वाट पाहत होतो. मिसळपाव वर हा लेख प्रसिद्ध केल्याचं चीज झालं असं आता खर्या अर्थाने वाटतंय.
5 Aug 2011 - 3:40 pm | ५० फक्त
आधी अवांतर - हे उत्तर नाही खरंतर प्रश्न आहे प्रा. परांना, तुम्ही माझ्या कोणत्याच धाग्यावर येउन त्याचं चीज सोडा पण खफपण केला नाही कधी, हा भेदभाव करणे योग्य नाही याची दखल घेण्यात यावी.
आणि आता मुद्याचा भाग -
मा. गुगळे,
इथं काय किंवा एकुणच नेटावर येणारे त्यांचं युजर नेम काही विशिष्ट हेतुनं किंवा समजानं घेतात आणि तशी मोकळिक या संस्थळानं प्रत्येक सद्स्याला दिलेली आहे, तसेच प्रत्येकाचे खरे नाव व इतर माहिती ही प्रामुख्याने संस्थळाच्या माहितीकरिता मागितलेली असते., त्यातच एक उद्देश स्वताचे मुळ किंवा खरे नाव लपवणे हा असतो, त्यामुळे किमान इथं तरी प्रतिसाद लिहिताना तो त्या आयडीवं नाव वापरुनच द्यावा, इथं जर एखादा आयडी मुद्दाम घेतला असेल तर त्याला प्रतिसाद न देता त्या आयडिच्या मालकाच्या किंवा मालकिणीच्या ख-या नावाने आपण प्रतिसाद देता हे सर्वथा सुयोग्य वाटत नाही, तसेच माझ्या सृजनशील मनाला पटत नाही, असे करण्याने आपले खरे नाव हे शक्यतो गुपित रहावे किंवा काही विशिष्ट लोकांनाच माहित व्हावे हा उद्देश सफल होत नाही. अशा प्रकारे कोणाही आयडीच्या अतिशय खाजगी मालकीच्या वैयक्तिक गोष्टी उघड करण्याची आपणास गरज का पडावी असा एक निष्पाप प्रश्न मला पडतो आहे. किमान माझ्या बाबतीत तरी हे करु नये, बाकीच्या आयडिंच्या बाबतीत मी फक्त विनंती करु शकतो. .
इतर मा. सद्स्यांनी याबाबत आपले प्रामाणिक मत द्यावे ही नम्र विनंती.
5 Aug 2011 - 3:45 pm | परिकथेतील राजकुमार
मी तुमच्या पहिल्याच धाग्यावर प्रतिसाद दिला होता ; पण त्या प्रतिसादाबद्दल आमच्या सुहॄदांनी माझ्या अब्रुची लक्तरे काढली :( माझ्या प्रमाणीक प्रतिसादाला हिन लेखले :( मला काय काय ऐकुन घ्यावे लागले म्हणून सांगतो तुम्हाला :(
5 Aug 2011 - 3:54 pm | स्पा
मी तुमच्या पहिल्याच धाग्यावर प्रतिसाद दिला होता ; पण त्या प्रतिसादाबद्दल आमच्या सुहॄदांनी माझ्या अब्रुची लक्तरे काढली,माझ्या प्रमाणीक प्रतिसादाला हिन लेखले , मला काय काय ऐकुन घ्यावे लागले म्हणून सांगतो तुम्हाला
जाव द्या ना,झाले गेले गंगेला किंवा कावेरीला मिळाले .... :)
परा सर तुम्ही नव्या जोमाने ५० फक्त यांच्या धाग्यावर प्रतिसाद देत जा , ओक्के
5 Aug 2011 - 5:43 pm | मृत्युन्जय
जाव द्या ना,झाले गेले गंगेला किंवा कावेरीला मिळाले ....
तुझ्या पहिल्या भयकथेवरचा (असं जगण्यापेक्षा....) पराचा प्रतिसाद आठवतो का? (आणी माझा आठवतो का?) ;)
5 Aug 2011 - 9:14 pm | धन्या
त्या भयकथेचा दुवा द्या हो कुणीतरी !!!
5 Aug 2011 - 9:38 pm | मृत्युन्जय
भयकथा अल्लाला प्यारी झाली. पण आमची ३-४ दिवस करमणूक झाली होती. स्पावड्या अजुन आयमाय काढतो आठवले की. हो की नाही रे स्पावड्या?
5 Aug 2011 - 4:01 pm | प्यारे१
@ ५० फक्त,
तुमचे लिखाणच इतके सपक आणि करमणूकहीन होते की परा यांनी प्रतिक्रिया न देऊन तुमच्यावर उपकारच केले आहेत. एवढेच काय तर बाकी कुणी मिसळपाव वर आजतागायत लिहिले नाहीये. लिहितात ते फक्त डॉ. चेतन गुगळेच. मिसळपाव म्हणजे त्यांचा ब्लॉगच जणू. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे इथे देखील गुडीगुडी प्रतिक्रियाच आम्ही लिहिणार आहोत.
मिसळपाव वरचे रामदास, बिपीन कार्यकर्ते, विप्र, परा, डॉन, ब्रिटीश, पिडां, टारझन, प्राजु, गवि, घाडपांडे काका, सुधीर काळे, सुहास आणखी किती आयडी नुसते 'टॉम्बे आहेत टॉम्बे'... लिहीणं शिकावं ते गुगळे यांच्याकडूनच.
तुम्ही अपेक्षा तरी कशी करता? छ्या... काय ते लिखाण, काय तो बाळबोध बावळटपणा, काय तो सातत्यानं 'संपर्क करा'चा घोशा. अरे जरा नीट लिहा आणि मग मागा प्रतिक्रिया. तुमच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती ५० फक्त.
10 Aug 2011 - 11:34 am | सोत्रि
सहमत, इथे आयडेंटी लपवण्याचा मुद्दा नसुन जे टोपणनाव घेतले आहे त्यामागे एक निश्चित भुमिका असते आणि इथे मिपावर त्या टोपणनावानेच ओळखले जावे अशी इच्छा रास्त आहे.
अलबत, माझ्याही बाबतीत हे असे करू नये. केल्यास.....
- ('टोपण' असलेला) सोकाजी
5 Nov 2011 - 6:29 am | दिपोटी
एकीकडे 'प्रतिसादांच्या प्रत्येक फांदीवर शेवटचा उपप्रतिसाद मात्र माझाच असावयास हवा' अशा अट्टाहासाने लांबलचक पानभर व व्यर्थ प्रतिसाद-उपप्रतिसाद टंकणार्या चेतन सुभाष गुगळे यांची दुसरीकडे मात्र त्यांच्या प्रतिसादाची-स्पष्टीकरणाची गरज असेल तेव्हा (असे करणे निव्वळ गैरसोयीचे होईल म्हणून तोंडात गुळणी ठेऊन बसल्याप्रमाणे) प्रतिसाद देणे टाळण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
- दिपोटी
5 Nov 2011 - 8:45 am | चेतन सुभाष गुगळे
दिपोटी,
आपल्याला लेखाच्या अनुषंगाने काही मुद्दा मांडायचा नसल्यास इथे ही अवांतर व निरर्थक चर्चा कशा साठी करत आहात? आणि ज्या सदस्याच्या प्रतिसादास आपण उपप्रतिसाद म्हणून माझा उल्लेख करीत हे जे काही टंकले आहे त्याबद्दल मी इतकेच सांगू शकतो की माझी त्यांच्या आक्षेपाबाबतची भूमिका त्यांच्यापर्यंत मी फोनवरून (दीड तास चर्चा चालली होती) पोचवली आहे. त्यांना ती पटलीय आणि आता आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत (ही खात्री आपण आमच्या खरडवह्या वाचल्या तरी आपणास होईलच). सबब आमच्या दोघांच्या आपसातील चर्चेमुळे इथे धागा लांबवावा अशी माझी इच्छा नसल्यानेच केवळ मी इथे काही टंकले नव्हते.
आपण विनाकारण हे इथे उकरण्यापेक्षा मला एक फोन केला असतात तर आपला गैरसमज दूर झाला असता.
7 Nov 2011 - 5:02 pm | दिपोटी
चेतन सुभाष गुगळे,
आपण ३ वर्षांहून जास्त काळ येथे सभासद आहात तेव्हा 'मिसळपाव हे जाहीर चर्चा / काथ्याकूट करण्यासाठी असलेले संस्थळ आहे' हे आपणास माहित असायला हवे. 'मी तुमच्या खरडवह्या वाचणे वा तुमच्याशी फोनवर बोलणे' हा 'तुम्ही येथे जाहीर प्रतिसाद देणे' याला पर्याय ठरत नाही. येथे जाहीरपणे व्यक्त झालेल्या प्रतिसादांवर-उपप्रतिसादांवर जाहीर उपप्रतिसादाचीच अपेक्षा असते - जेणेकरुन येथील सर्वांनाच चर्चेत प्रतिसादकर्ता म्हणून (वा किमानपक्षी एक वाचक म्हणून तरी) भाग घेता येईल. चर्चा पुढे नेण्यास याने हातभारच लागतो. वर लिहिल्याप्रमाणे गैरसोयीचे होईल तेव्हा तोंडात गुळणी ठेऊन बसणे नाहीतर इतर वेळी मात्र हिरीरीने 'प्रतिसादांच्या प्रत्येक फांदीवर शेवटचा उपप्रतिसाद मात्र माझाच असावयास हवा' अशा अट्टाहासाने वा दुराग्रहाने पानांवर पाने भरत रहाणे हे अपरिपक्वतेचे लक्षण ठरते.
आपल्या दीड तासांच्या चर्चेचे सार - त्यातील जेवढे जाहीर करता येईल तेवढे व मोजक्या शब्दांत - येथे मांडायला पाच मिनिटांचा अवधी लागला असता. आपण असे केले नाही तेव्हा 'येथील सभासदांना त्यांच्या टोपणनावाने संबोधन करावे आणि त्यांच्या खर्या नावाने करु नये' ही ५० फक्त आणि सोकाजीराव त्रिलोकेकर यांची विनंती शेवटी आपल्याला पटली असावी - पण तसे जाहीरपणे कबूल करणे मात्र आपल्याला सोयीस्कर वाटत नाही - असे गृहित धरतो. (ही विनंती या दोघांची असल्याने 'एकाशीच चर्चा करुन या मुद्यावर पडदा कसा काय आपण पाडता' हा वेगळा प्रश्न आहेच). असे गृहित धरणे योग्य नसल्यास ही इतरांना रास्त वाटणारी विनंती आपल्याला मात्र रास्त का वाटत नाही याचे पूर्ण समर्थन आपण कराल अशी वाजवी आशा करतो.
या धाग्यावर अवांतर असला तरीही या संस्थळाच्या मूलभूत भूमिकेशी व येथील सभासदांच्या 'आयडी'शी हा मुद्दा निगडीत असल्याने महत्वाचा निश्चितच आहे, तेव्हा आपले मत बहुसंख्य सभासदांच्या मताविरुध्द असल्यास त्याचे - योग्य कारणांसहित - स्पष्ट समर्थन कराल ही अपेक्षा आहे.
- दिपोटी
7 Nov 2011 - 5:41 pm | चेतन सुभाष गुगळे
<< (ही विनंती या दोघांची असल्याने 'एकाशीच चर्चा करुन या मुद्यावर पडदा कसा काय आपण पाडता' हा वेगळा प्रश्न आहेच). >>
एक तर तुमचा उल्लेख मी दिपोटी असाच करत असल्याने व ही विनंती त्या दोघांची असल्यानेच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायला मी बांधील नाही.
<< येथे जाहीरपणे व्यक्त झालेल्या प्रतिसादांवर-उपप्रतिसादांवर जाहीर उपप्रतिसादाचीच अपेक्षा असते - जेणेकरुन येथील सर्वांनाच चर्चेत प्रतिसादकर्ता म्हणून (वा किमानपक्षी एक वाचक म्हणून तरी) भाग घेता येईल. चर्चा पुढे नेण्यास याने हातभारच लागतो. वर लिहिल्याप्रमाणे गैरसोयीचे होईल तेव्हा तोंडात गुळणी ठेऊन बसणे नाहीतर इतर वेळी मात्र हिरीरीने 'प्रतिसादांच्या प्रत्येक फांदीवर शेवटचा उपप्रतिसाद मात्र माझाच असावयास हवा' अशा अट्टाहासाने वा दुराग्रहाने पानांवर पाने भरत रहाणे हे अपरिपक्वतेचे लक्षण ठरते. >>
हे आपले प्रतिपादनच अतिशय अपरिपक्व गृहीतकावर आधारित आहे; कारण जेव्हा जेव्हा चर्चा / वाद धाग्याशी संबंधित मुख्य मुद्याला सोडून भरकटत जातात तेव्हा एक किंवा अधिक सदस्य खरडवही / व्यक्तिगत निरोप याद्वारे ही अवांतर चर्चा पुढे नेण्याचा पर्याय सूचवितो व बहुतेकदा ही विनंती उभय पक्षी मान्य केली जाते. (या बाबत मिसळपाववरील यापूर्वीच्या वाद/चर्चा यांचा इतिहास तपासावा) अन्यथा अवांतर मजकुरासाठीच धाग्याची लांबी वाढत जाते. शेवटच्या फांदी वर माझा प्रतिसाद हवा असा अट्टहास मी करीत असतो तर अवांतर प्रश्नांना उत्तरे देत बसलो असतो, पण ते मला करायचे नाही.
<<आपल्या दीड तासांच्या चर्चेचे सार - त्यातील जेवढे जाहीर करता येईल तेवढे व मोजक्या शब्दांत - येथे मांडायला पाच मिनिटांचा अवधी लागला असता. आपण असे केले नाही >>
आपल्यालाही इतके टंकन श्रम घेण्यापेक्षा मला एक फोन करता आला असता पण आपण तसे केले नाही. तसेच दीड तासाची चर्चा इथे मोजक्या शब्दांत टंकता येईल असा निष्कर्ष स्वत:च काढलात. आपणांस फोनचा खर्च करावयाचा नसल्यास गुगल टॉक सारख्या पर्यायांचा वापर करू शकता. माझे सर्व संपर्क तपशील इथे दिलेले आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळविण्यापेक्षा इथे माझ्यावर जाहीर चिखलफेक करण्यात (गुळणी धरणे सारखे शब्दप्रयोग करून) जास्त रस आहे असे दिसते.
<< 'येथील सभासदांना त्यांच्या टोपणनावाने संबोधन करावे आणि त्यांच्या खर्या नावाने करु नये' ही ५० फक्त आणि सोकाजीराव त्रिलोकेकर यांची विनंती शेवटी आपल्याला पटली असावी - पण तसे जाहीरपणे कबूल करणे मात्र आपल्याला सोयीस्कर वाटत नाही - असे गृहित धरतो. >>
आपण एकतर्फी निष्कर्ष काढण्याची आपली रीत अशीच पुढे चालु ठेवा.
<< असे गृहित धरणे योग्य नसल्यास ही इतरांना रास्त वाटणारी विनंती आपल्याला मात्र रास्त का वाटत नाही याचे पूर्ण समर्थन आपण कराल अशी वाजवी आशा करतो.
या धाग्यावर अवांतर असला तरीही या संस्थळाच्या मूलभूत भूमिकेशी व येथील सभासदांच्या 'आयडी'शी हा मुद्दा निगडीत असल्याने महत्वाचा निश्चितच आहे, तेव्हा आपले मत बहुसंख्य सभासदांच्या मताविरुध्द असल्यास त्याचे - योग्य कारणांसहित - स्पष्ट समर्थन कराल ही अपेक्षा आहे. >>
ही चर्चा या धाग्याशी संबंधित नसल्यानेच यापूर्वीही या प्रश्नाचे उत्तर इथे दिलेले नव्हते तरी आपण आता इतक्या कालावधीनंतर या प्रश्नाचे उत्तर केवळ आपण विचारले म्हणून इथे मांडेल ही अपेक्षा आपण ठेवणे व्यर्थ आहे.
<< आपण ३ वर्षांहून जास्त काळ येथे सभासद आहात तेव्हा 'मिसळपाव हे जाहीर चर्चा / काथ्याकूट करण्यासाठी असलेले संस्थळ आहे' हे आपणास माहित असायला हवे. >>
माझ्या सभासदत्वाचा काळ तपासून त्याचा जाहीर पंचनामा करण्यापूर्वी आपण स्वत:ही इथे तितकाच कालावधी सभासद आहात हे आपण विसरलात का? नाही कारण ज्या विशिष्ट प्रतिसादाला मी उत्तर दिले नाही म्हणून आपण इतका जो थयथयाट चालविला आहे त्या प्रतिसादाला प्रकाशित होऊन तीन महिने झाले आहेत. मग इतके दिवस आपण कुठे होतात? (झोपले होतात? असं विचारलं तरी आपल्याला राग येऊ नये कारण आपण स्वत: माझ्याविषयी गुळणी धरणे सारखे शब्दप्रयोग पुन्हापुन्हा केले आहेतच. असो.) आताच का बरे आपणांस ह्या गोष्टीची आठवण झाली?
याचे सरळ उत्तर असे आहे की आपल्या http://www.misalpav.com/node/19366 या धाग्यावर मी आपण विचारलेल्या प्रश्नाचे जे उत्तर दिले ते आपल्या आवडीविरुद्ध असल्यानेच केवळ सूडापोटी इथे आपण माझ्याशी वाद घालत आहात.
आपल्याला खरंच जर टोपणनावाविषयी मी करत असलेल्या उल्लेखांबद्दल काही शंका असती तर एव्हाना आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर मला किंवा इतर कोणालाही त्याबद्दल न विचारताही मिळाले असते. परंतु आपला उद्देश स्वच्छ दिसत नाहीये.
एक बाब लक्षात घ्या:- तुमचा उल्लेख मी दिपोटी असाच करतो त्याचप्रमाणे इतर काही सदस्यांचा त्यांच्या टोपणनावानेच उल्लेख करतो. केवळ काही सदस्यांनाच त्यांच्या खर्या नावाने संबोधतो याचे कारण काय असावे याचा स्वत:च थोडे निरीक्षण केल्यास तुम्हाला उलगडा होईल, न झाल्यास मला व्यक्तिगत संपर्क करू शकता. या प्रश्नाचे उत्तर इथे मात्र नक्कीच दिले जाणार नाही कारण त्याचा लेखाशी संबंध नाही.
7 Nov 2011 - 6:36 pm | दिपोटी
चेतन सुभाष गुगळे,
बांधील नाही ?! कमाल आहे ! आपण सर्व येथे या संस्थळावर येतो व प्रतिसाद-उपप्रतिसाद देतो ते चर्चेत सहभागी होण्यासाठी येतो. अशा चर्चेत जेव्हा एकाच्या प्रतिसादाला दुसर्याने दिलेल्या उपप्रतिसादाच्या अनुषंगाने तिसर्याने सुध्दा प्रश्न विचारला आणि उत्तराची अपेक्षा ठेवली तर यात काहीही गैर नाही. चर्चा पुढे नेण्यास याने हातभारच लागतो हे मी वर लिहिलेच आहे. हा केवळ बांधिलकीचा प्रश्न नसून औचित्याचा व संस्थळावरील सभ्यतेचा सुध्दा मुद्दा आहे. 'सभासदांची खरी नावे येथे (इतर काही कारणांनी माहित झाली असल्यास) कोणीही येथे उघड करणे' हे माझ्या (व माझ्या माहितीतील इतरही काही जणांच्या) दृष्टीने एक अशिष्ट वर्तन म्हणून गणले जाते, तेव्हा या बाबतीत आपले काय विचार आहेत हे स्पष्ट करणे याची अपेक्षा करणे यातही काही गैर नाही आहे. ही अपेक्षा एकतर आपल्याला योग्य तरी वाटते वा अयोग्य तरी वाटते - अशा दोनच शक्यता आहेत. आपली भूमिका येथे मांडण्यास आडपडदा कशाला?
वर लिहिल्याप्रमाणे जाहीर चर्चेतील माझ्या जाहीर प्रश्नाच्या आपल्या उत्तरासाठी आपण माझ्याकडून (वा कोणाहीकडून) खाजगी फोनची अपेक्षा ठेवणे हे गैर आहे.
एका रास्त व - मुख्य म्हणजे या संस्थळावरील सभासदांच्या 'आयडी'शी संबंधित असल्याने - एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणे आपणे टाळत आहात हा शुध्द पलायनवाद झाला.
हा 'सूडापोटी वाद घालत असल्याचा' निष्कर्ष आपण कोणत्या आधारावर काढला? खरे तर आपण या धाग्यावर आपल्या कोणत्या उत्तराचा संदर्भ आपण देत आहात हेच मला कळले नाही, कारण आपण दिलेला दुवा धाग्याचा आहे (व आपल्या प्रतिसादाचा नाही) व या धाग्यावर आपण बरेच प्रतिसाद दिले आहेत. दुसरे असे की यातील एखादा (वा काही वा सर्वच) प्रतिसाद माझ्या आवडीविरुध्द आहे (वा आहेत) असा निष्कर्ष सुध्दा आपण काढून मोकळे झाला आहात, या निष्कर्षाचा सुध्दा आधार काय? बादरायण संबंध जोडण्याची आपली हातोटी मात्र वाखाणण्याजोगी आहे.
'गुळणी धरणे' हा मराठीतील ('गप्प बसणे' ला समानार्थी असा) एक सभ्य व शिष्ट वाक्यप्रचार आहे. माझ्या संयत व संयमित प्रतिसादाला आणि त्यातील (आपल्याकडून उत्तर मिळण्याविषयीच्या) माझ्या प्रामाणिक अपेक्षेला आपण 'थयथयाट' व 'सूड' व 'वाद' असे टोकाचे व नकारात्मक शब्दप्रयोग करुन वेगळीच दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहात (व माझ्या प्रश्नाला उत्तर न देण्याच्या आपल्या हट्टापासून इतरांची दिशाभूल करीत आहात). यापेक्षा आपणही प्रामाणिकपणे व शिष्टपणे माझ्या प्रश्नाला उत्तर दिले तर सर्वांनाच याबाबतीत (म्हणजे टोपणनावाऐवजी खर्या नावाने संबोधण्याविषयी) आपली काय भूमिका आहे हे कळेल व या मुद्यावर कायमचा पडदा पडेल.
- दिपोटी
7 Nov 2011 - 6:42 pm | चेतन सुभाष गुगळे
इथे या अवांतर प्रश्नास उत्तर मिळणार नाही. ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना मिळाले. तुम्हाला सूचविलेला मार्ग मान्य नाही आणि इथे नसता वाद उकरण्यात जास्त स्वारस्य आहे. हा निष्कर्ष मी काढतोय.
बाकी मी निष्कर्ष काढला त्याला आधार मागणारे तुम्ही स्वत: मात्र कुठल्याही आधाराशिवाय निष्कर्ष काढता ही मोठीच कमाल आहे.
<< या संस्थळावरील सभासदांच्या 'आयडी'शी संबंधित असल्याने - एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणे आपणे टाळत आहात हा शुध्द पलायनवाद झाला. >>
धागा आयडीशी संबंधित नसल्याने त्या संबंधाने असलेल्या प्रश्नाचे उत्तर न देणे हा पलायनवाद नव्हे. तरीही तुम्ही असा एकतर्फी निष्कर्ष काढताय हा फॅसिझम आहे.
7 Nov 2011 - 6:49 pm | दिपोटी
चेतन सुभाष गुगळे,
ज्या शिताफीने आपण उत्तर देणे (व आपली भूमिका काय आहे याचे स्पष्टीकरण-समर्थन करणे) टाळण्याचा प्रयत्न करीत आहात यावरुन आपल्याशी logical debate वा रास्त-वाजवी चर्चा करणे हे किती फोल आहे याचा परत एकदा प्रत्यय आला.
मिपासारखी संस्थळे जाहीर (व सर्वांनी शिष्टाचाराला धरुन व एकत्र मिळून करण्याच्या) चर्चेसाठी आहेत व 'ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना उत्तर मिळाले / मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही' अशी उथळ व अपरिपक्व भूमिका ठेवण्यासाठी नाहीत हे आपल्या ध्यानी ज्या दिवशी येईल तो सुदिन !
- दिपोटी
7 Nov 2011 - 7:24 pm | चेतन सुभाष गुगळे
<< ज्या शिताफीने आपण उत्तर देणे (व आपली भूमिका काय आहे याचे स्पष्टीकरण-समर्थन करणे) टाळण्याचा प्रयत्न करीत आहात यावरुन आपल्याशी logical debate वा रास्त-वाजवी चर्चा करणे हे किती फोल आहे याचा परत एकदा प्रत्यय आला.>>
म्हणजे यापूर्वी कधी आला?
<< व 'ज्यांनी प्रश्न विचारला होता त्यांना उत्तर मिळाले / मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही' अशी उथळ व अपरिपक्व भूमिका ठेवण्यासाठी नाहीत हे आपल्या ध्यानी ज्या दिवशी येईल तो सुदिन !>>
उथळ व अपरिपक्व असली बालिश विशेषणे वापरण्याआधी हे लक्षात घ्या ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना उत्तर मिळाले केवळ म्हणून च मी आपणांस उत्तर द्यायला बांधील नाही तरीही उत्तर देणार नाही असे मी आपणांस म्हंटलेले नाही. उलट बांधील नसतानाही द्यायला तयार आहे. फक्त त्यांना ज्या मार्गाने उत्तर मिळाले (व्यक्तिगत संपर्क) त्याच मार्गाने मी तुम्हाला उत्तर देईल असे म्हंटले होते. इथे धाग्यावर नाही. मी फोन / गुगल टॉक वर ह्या प्रश्नाचे उत्तर अजुनही देऊ शकतो, लिहून शक्य नाही. कारण हे उत्तर बोलून एका चर्चात्मक प्रकारानेच द्यावे लागते. निबंधासारखे हे जमणे शक्य नाही. मूळात हा प्रश्न उपस्थित करणार्या सदस्यानेही इतके आढेवेढे न घेता मला सरळ स्वत:चा फोन नंबर दिला होता आणि दीड तास आमची चर्चा चाललीहोती.
तुम्हाला उत्तर मिळण्यात रस नसून ही अवांतर चर्चा इथेच घडविण्यात जास्त रस आहे हा आडमूठे पणा आहे. तुम्हाला फोन करण्यात कसली भीती वाटते? तुमचा नंबर मला ठाऊक असता तर मीच केला असता. अर्थात पळपूटे लोक आपले संपर्क तपशील कशाला उघड करतील म्हणा? तेव्हा उगीच आपल्याला प्रश्नाचे उत्तर पाहिजे असून मी देत नाही असा कांगावा करू नका.
माझ्या महिमा अंगठीचा या लेखाशी अजिबात संबंध नसलेल्या अतिअवांतर प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी (आणि तेही एकाच मार्गाने - इथेच) मिळण्याकरिता इथे वाद घालण्यात अर्थ नाही हे आपल्याला जेव्हा समजेल तोच सुदिन.
8 Nov 2011 - 2:03 pm | दिपोटी
चेतन सुभाष गुगळे,
पुनरुक्तीचा धोका पत्करुन परत एकदा लिहितो : येथे जाहीरपणे व्यक्त झालेल्या प्रतिसादांवर-उपप्रतिसादांवर जाहीर उपप्रतिसादाचीच अपेक्षा आहे. जाहीर चर्चेतील माझ्या जाहीर प्रश्नाच्या आपल्या उत्तरासाठी आपण माझ्याकडून (वा कोणाहीकडून) खाजगी फोनची अपेक्षा ठेवणे हे सर्वथा गैर आहे. जाहीर धाग्यांच्या व प्रतिसादांच्या जोरावर या संस्थळावरील चर्चा/काथ्याकूट चालतात - फोनवरील खाजगी संभाषणांच्या द्वारे नाही.
आता या संस्थ़ळावरील (व अशा अगणित इतर संस्थळांवर) अंदाजे ९५हून अधिक टक्के लोक आपापल्या टोपणनावाद्वारे वावरतात. वर ५० फक्त यांनी लिहिल्याप्रमाणे "इथं काय किंवा एकुणच नेटावर येणारे त्यांचं युजर नेम काही विशिष्ट हेतूनं किंवा समजानं घेतात आणि तशी मोकळीक या संस्थळानं प्रत्येक सद्स्याला दिलेली आहे". असे असताना व आपापल्या विशिष्ट कारणास्तव संपर्काचा तपशील येथे उघड न करणार्या या बहुसंख्यांना सरळसरळ 'पळपुटे' म्हणून संबोधून आपण आपल्याच अपरिपक्वतेची ग्वाही देत आहात.
आता 'प्रतिसादांच्या प्रत्येक फांदीवर शेवटचा उपप्रतिसाद मात्र माझाच असावयास हवा' अशा अट्टाहासाने आपण परत एकदा याला एक निरर्थक उपप्रतिसाद द्याल (ज्याला मी मात्र यापुढे उपप्रतिसाद देणार नाही हे निश्चित आहे). यदाकदाचित आपण असा कोणताही उपप्रतिसाद न दिला तर मात्र वर मी नमूद केलेला 'सुदिन' लवकरच येण्याचा संभव बळावतो अशी आशा व्यक्त करता येईल.
हा प्रत्यय मला या धाग्यावरील आपल्या प्रतिसादांतूनच नव्हे तर इतर धाग्यांवरील आपल्या व इतरांच्या प्रतिसादांतून अनेक वेळा आला आहे. फार लांब कशाला - वानगीदाखल हे एक ताजे उदाहरण पहा. यात मिपावरील एक सन्माननीय सदस्य राजेश घासकडवी यांनी तीन दिवसांपूर्वीच आपल्याविषयी व्यक्त केलेले हे मत : " ... तुमच्याकडे एकाचवेळी शाळकरी निबंधाप्रमाणे लिहिण्याची व त्यात अति बडबड करणाऱ्या काही म्हाताऱ्यांप्रमाणे पाल्हाळ लावण्याची क्षमता आहे." याहून अधिक काय बोलणार ! I rest my case, Your Honour.
- दिपोटी
8 Nov 2011 - 4:25 pm | चेतन सुभाष गुगळे
<< जाहीर चर्चेतील माझ्या जाहीर प्रश्नाच्या आपल्या उत्तरासाठी आपण माझ्याकडून (वा कोणाहीकडून) खाजगी फोनची अपेक्षा ठेवणे हे सर्वथा गैर आहे. जाहीर धाग्यांच्या व प्रतिसादांच्या जोरावर या संस्थळावरील चर्चा/काथ्याकूट चालतात - फोनवरील खाजगी संभाषणांच्या द्वारे नाही. >>
अभ्यास वाढवा. मोठे व्हा. अवांतर चर्चा या धाग्यांवरून नंतर व्यक्तिगत संपर्कातच पुढे चालु राहतात. याबाबत याच संकेतस्थळाचा इतिहास तपासायला हरकत नाही. मुख्य म्हणजे तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे (तुमच्याशी किंवा धाग्याशीही संबंधित नसूनही) त्याचे उत्तर द्यायला मी तयार आहे पण ते उत्तर हे केवळ चर्चात्मक पद्धतीनेच देता येईल हे पुन्हापुन्हा स्पष्ट करूनही तुमच्या बालबुद्धीच्या आवाक्यात येत नाही हेच मोठे दु:ख आहे. तुम्हाला उत्तर तर हवे आहे पण केवळ तुम्ही म्हणता त्या आणि त्या एकाच पद्धतीने. या हटवादी पणा वरून माकड व लाल रंग या शब्दांचा समावेश असलेली एक मराठी म्हण आठविली.
<< "इथं काय किंवा एकुणच नेटावर येणारे त्यांचं युजर नेम काही विशिष्ट हेतूनं किंवा समजानं घेतात आणि तशी मोकळीक या संस्थळानं प्रत्येक सद्स्याला दिलेली आहे". असे असताना व आपापल्या विशिष्ट कारणास्तव संपर्काचा तपशील येथे उघड न करणार्या या बहुसंख्यांना सरळसरळ 'पळपुटे' म्हणून संबोधून आपण आपल्याच अपरिपक्वतेची ग्वाही देत आहात. >>
मान्य. तुम्हाला तो तपशील इथेच द्या असं काही मी म्हंटलं नव्हतं. तुम्हाला उत्तर अपेक्षित असल्यास मला तुमचे संपर्क तपशील कळवू शकता. इथे जाहीर न करताही. तुम्ही ज्यांची नावे घेत आहात त्यांनी मला फोन केलेला असून त्यांचेही संपर्क तपशील मला दिले होते आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळून ते आज समाधानी आहेत. अशा लोकांना जेन्युईन म्हणतात. तुम्ही नुसतेच कांवकांव करीत आहात.
<< आता 'प्रतिसादांच्या प्रत्येक फांदीवर शेवटचा उपप्रतिसाद मात्र माझाच असावयास हवा' अशा अट्टाहासाने आपण परत एकदा याला एक निरर्थक उपप्रतिसाद द्याल . >>
माझा कुठला उपप्रतिसाद निरर्थक आणि कुठला आवश्यक हे ठरविण्याचे सर्व हक्क आपल्याला कोणी आणि केव्हा हे दिले हेही सोबत नमूद करायला हवे होते.
<< (ज्याला मी मात्र यापुढे उपप्रतिसाद देणार नाही हे निश्चित आहे) >>
सुरूवातीला इथे जो अनावश्यक व विषयाशी संबंधित नसणारा उपप्रतिसाद दिलाय तो देखील दिला नसता तरी चालले असते, कारण कळफलकावर बोटे इतकी आपटूनही तुम्हाला जे पाहिजे ते मिळालेले नाहीच.
इतर कुठल्या तिसर्या सदस्याचे दाखले देण्याची तुमची खोड ही तुमच्या बौद्धिक मर्यादांचा परिणाम आहे असे मी मानतो. जे सदस्य उठवळ मोर्च्यासारखे धागे काढतात आणि ज्यांचे धागे उडविण्याची वेळ येते त्यांच्या मताचे दाखले देत बसणे हा निव्वळ आचरटपणाला प्रोत्साहन देण्याचाच भाग आहे.
<< I rest my case, Your Honour. >>
तुमची केस हाताबाहेर गेलेली आहे इतकेच नमूद करु इच्छितो.
5 Aug 2011 - 3:07 pm | स्मिता.
सुरूवातीला नेमका मुद्दा लक्षात आला नसला तरी लिखाण आणि त्यातले विचार आवडले.
5 Aug 2011 - 3:21 pm | पिंगू
लेख आधीपण वाचला आहे. तरी इथे पाहून आनंद झाला.
- (चेतनचा जालीय मित्र) पिंगू
5 Aug 2011 - 3:27 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद भारत,
तुला इथे पाहून फारच आनंद झाला. हा लेख पूर्व प्रकाशित आहे हे खरेच, पण इथल्यासारख्या विविध प्रतिक्रिया तिथे वाचायला मिळाल्या नव्हत्या. तिथे फक्त आणि फक्त गोडधोड च होते. इथे मात्र गोडासोबतच तिखट, तुरट, आंबट, खारट, कडवट, पांचट, कुजकट आणि खवचट प्रतिक्रियांची मिसळ झाली आहे.
5 Aug 2011 - 4:00 pm | योगी९००
मस्त लेख .. आवडला..
त्याचे असे होते की, दिवा नाहीसा झाल्यामुळे हताश झालेला अल्लाउद्दीन हातावर हात चोळत बसलेला असतो
फक्त दिवाच नाही पण यास्मिन पण नाहीशी झाली असते म्हणूनच त्याला हाताचा वापर करावा लागतो...(ह्.घ्या.)
5 Aug 2011 - 4:02 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला जास्मिन म्हणायचे आहे का ?
5 Aug 2011 - 4:09 pm | प्यारे१
यानंतरच 'सढळ हस्ते वापर' अशी म्हण निर्माण झाली असे ऐकिवात आहे. याच नाही तर बर्याच म्हणी अरेबियन नाईटस मधून गुगळे यांच्या कल्पनांचा राजमार्ग वापरुन या भारतभूवर अवतरल्या असे नम्रपणे नमूद करतो.
5 Aug 2011 - 5:42 pm | योगी९००
च्यायला नॉर्वेजीयन वाचन करण्याचा परिणाम...J is pronounced as Y in norewegian
त्यामुळे येथे येथे य येतो तो य असेच वाचतो..
(जेथे जेथे ज येतो तो य असेच वाचतो..)
खरे तर जास्मिनचे नाव "बाद्र अल बुदूर" असे आहे..बहुतेक डिस्ने वाल्यांनी तिला जास्मिन केले असावे..कारण मुळ नाव ऐकले की राजकन्येऐवजी एखादी चेटकीण असावी असे वाटते..
5 Aug 2011 - 4:25 pm | इरसाल
चेतन खूप छान लिहिलेस.
उत्कंठा आणि उत्सुकता जागवून ठेवण्यात यशस्वी.
@गणपा : साहेब आपण पराकोटीचे बल्लव आहात त्याबरोबरच सध्या अनिवासी भारतीयही आहात म्हणजे दोन दोन अंगठ्या घेवून बसलात कि अजून कंची शोधताय ?
5 Aug 2011 - 4:39 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद राकेश,
<< उत्कंठा आणि उत्सुकता जागवून ठेवण्यात यशस्वी. >>
वाचकांना हाच अनुभव मिळावा असा माझा उद्देश होता, जो सफल झाल्याची पावती तुझ्या प्रतिक्रियेने मिळाली.
आभारी आहे.
5 Aug 2011 - 4:52 pm | आत्मशून्य
सूरूवात विषयांतर आहे की काय वाटत होतं.. पण लेखन खरचं कसदार होत गेलं. धन्यवाद.
5 Aug 2011 - 6:33 pm | चेतन सुभाष गुगळे
@आत्मशून्य
<< सूरूवात विषयांतर आहे की काय वाटत होतं.. >>
माझं लेखन आणि एकूणच जीवनावरही मी आजवर केलेल्या प्रवासाचा प्रभाव आहे. प्रवासाचं मला एक उत्कट आकर्षण वाटत आलं आहे. अर्थात मी काही प्रचंड प्रवास केलाय अशातला भाग नाही. स्वस्तात प्रवास केल्यास तो बराच गैरसोयीचा असतो आणि गैरसोय टाळून करायचा ठरविल्यास प्रवास बराच खर्चिक ठरतो. त्यामुळे अगदी कामानिमित्त करावा लागलेला आवश्यक तेवढाच प्रवास मी आतापर्यंत करत आलोय. हौसेखातर विशेष असा प्रवास केला नाहीय. अर्थात एकदा प्रवासाला सुरूवात केली की मग त्याचा पुरेपुर आनंद मी घेतो.
लहान पणी मला अहमदनगरला जावे लागायचे. वास्तविक, अहमदनगर पूर्व / उत्तर दिशेला पण आमच्या उपनगरापासून थेट एसटी बस नसल्याने आधी पीएमटीने शिवाजीनगर ला जावे लागायचे, म्हणजे उत्तरेला जायच्या प्रवासाची सुरूवात आधी दक्षिण दिशेने प्रवास करण्यापासून व्हायची.
तसेच, अनेकदा कामानिमित्त, मनपा भवन येथून निगडी असा पीएमटीने प्रवास करण्याचा प्रसंग आलाय. एक तर तास दीड तास प्रतीक्षा केल्यावर मिळणारी ही बस आधी ज्या दिशेला जायचे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला प्रवासाला सुरूवात करायची मग सगळ्या प्रवाशांना जोरदार धक्का देणारा यू टर्न घेत योग्य दिशेने मार्गस्थ व्हायची.
कुस्रो वाडिया महाविद्यालयात शिकत असताना पुणे जंक्शन - आकूर्डी रेल्वे स्टेशन असा प्रवास करावा लागे. सायंकाळी सव्वा सहा ची लोकल बहूतेकदा फलाट क्रमांक ५ किंवा ६ वर उभी असायची. मार्गस्थ होण्यापूर्वी योग्य त्या रूळावर येण्याकरताच तिला बराच वेळ लागत असे. (ह्याच दोन स्थानकांदरम्यान पुढे अनेक वर्षांनी पीएमटीने प्रवास करायची वेळ आली तेव्हा लोकलचा प्रवास बराच सरळ असल्याचे जाणविले. या प्रवासाविषयी "चेतनची शोकांतिका" ह्या लेखाच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना सविस्तर लिहीले आहेच.)
अशा प्रकारच्या प्रवासाच्या प्रभावामुळे माझे लेखन नियोजित ट्रॅक वर येण्याआधी विविध दिशांना फिरून येते. असे घडण्याचे अजून एक कारण म्हणजे जाहीर सभांमध्ये भाषणे करण्याची सवय असल्याने तिथे सुरूवातीला मुख्य विषयावर बोलणे न करता "जरा इकडचे, जरा तिकडचे" असे बोलावे लागते. श्रोत्यांची संख्या बर्यापैकी वाढली म्हणजे मग हळूच मुख्य विषयावर भाषण वळवावे लागते. तोच प्रकार लेखनातही होतोय. असे लिखाण करणे ही आता माझी आवडही झालीय.
<< पण लेखन खरचं कसदार होत गेलं. >>
<< सही, मज्या आली.. >>
या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
6 Aug 2011 - 2:23 am | आत्मशून्य
जो काही केलात तो प्रवास तूम्ही टाळला असता तर फार बरं झालं असत असं आता वाटतयं. प्रवासातील गैर्सोयीबाबत तूम्ही मंडळाकडे निषेध नोंदवला होता काय ?
5 Aug 2011 - 5:39 pm | तिमा
या लेखावरुन एक अशी कल्पना सुचली की, प्रत्येक माणसाने आपल्या मूळ व्यवसायाव्यतिरिक्त जितक्या इतर कला वा तत्सम त्याला किंवा तिला येतात, (निदान तसा स्वतःचा समज असतो) तितक्या अंगठ्या हातात घालाव्या. दाही बोटे संपल्यास पायाच्या दहा बोटांचाही उपयोग करावा.
--- अंगठाछाप माणूसघाणे
आमच्या बोटात आम्ही एकही अंगठी घालत नाही त्याचे कारण हेच असावे.
5 Aug 2011 - 6:24 pm | वपाडाव
अंगठ्या नसतील तर मग गळ्यात चेन घाला....
किंवा कानात बाळ्या घाला...
हे ही जमत नसेल तर डाकु अंगुलीमाल सारखे डॉ. दांतीवाला व्हा...
नाकात नथनी किंवा पायात पैंजण / जोडवे घालण्याचा प्रकार करु नका...
5 Aug 2011 - 7:21 pm | अनामिक
"१९९८ साली माझ्या एका शेजार्याला घेऊन मी इस्पितळात गेलो असता तिथे टेल्को चा एक अभियंता उपचाराकरिता आलेला मला दिसला. त्याच्या हाताच्या बोटांवर अवजड वस्तू पडून गंभीर दुखापत झाली होती........"
तुम्ही तुमच्या शेजार्याला सोडून त्या टेल्कोमधल्या अभियंत्यामागे का गेलात हो?
5 Aug 2011 - 8:21 pm | चेतन सुभाष गुगळे
@अनामिक,
आम्ही जनरल वॉर्ड मध्ये होतो. आमच्या शेजार्याची मुख्य डॉक्टरांकरवी तपासणी चालु होती तर शेजारच्याच खाटेवर त्या जखमी अभियंत्याला परिचारिका सूचना देत होती. तो वेदनेमुळे किंचाळत होता. तेव्हा साहजिकच माझे त्याकडे लक्ष गेले.
5 Aug 2011 - 9:13 pm | खेडूत
पण उपचार चालू असताना इतरांनी अजिबात बोलू नये. या ठिकाणी ठीक आहे पण एखाद्या रूग्णा ला ते ऐकून धक्काही बसू शकतो. सल्ला देणे सुधा शक्यतो टाळावे. बाकी लेख सुंदर, आवडला!
खेडूत.
5 Aug 2011 - 10:30 pm | चेतन सुभाष गुगळे
@ खेडूत,
<< पण उपचार चालू असताना इतरांनी अजिबात बोलू नये. या ठिकाणी ठीक आहे पण एखाद्या रूग्णा ला ते ऐकून धक्काही बसू शकतो. >>
परिचारिकेचे बोलणे ऐकून मलाच धक्का बसला होता. त्या वेळी न राहवून मी तसं विचारलं.
<< सल्ला देणे सुधा शक्यतो टाळावे. >>
नक्कीच. कुठल्याच क्षेत्रात मी मागितल्याशिवाय सल्ला देत नाही. वैद्यकीय क्षेत्रात तर कुणी मागितला तरी मी सल्ला देऊ शकलो नसतो निदान तेव्हा म्हणजे १९९८ साली. हां अर्थात आता १३ वर्षानंतर आरोग्यविषयक विपूल लेखन केले आहे. तेव्हा कदाचित, काही बाबींमध्ये मर्यादित प्रमाणात सल्ला देऊ शकेन, पण तेही कुणी मागितला तरच.
<< बाकी लेख सुंदर, आवडला! >>
धन्यवाद.
5 Aug 2011 - 10:51 pm | अर्धवटराव
लेखनाचा विषय, त्यातला संदेश, मांडणी, भुमीका बांधताना सुरुवातीला घेतलेली वळणे, काहि वाक्यात कमी शब्दात व्यक्त केलेला मोठा अर्थ.... सर्व काहि झकास !!
सर्व प्रतिक्रीयांना प्रतिसाद देण्याचा उत्साह विशेष वाखाणण्याजोगा.
( दस अंगुठेवाला ) अर्धवटराव
5 Aug 2011 - 11:02 pm | चेतन सुभाष गुगळे
@ अर्धवटराव,
<< लेखनाचा विषय, त्यातला संदेश, मांडणी, भुमीका बांधताना सुरुवातीला घेतलेली वळणे, काहि वाक्यात कमी शब्दात व्यक्त केलेला मोठा अर्थ.... सर्व काहि झकास !! >>
लेखनाचा हुरूप वाढविणारी प्रतिक्रिया दिल्याबद्दल अतिशय आभारी आहे.
<< सर्व प्रतिक्रीयांना प्रतिसाद देण्याचा उत्साह विशेष वाखाणण्याजोगा. >>
हे अतिशय गरजे चे आहे असे मला वाटते. कित्येक वाचक लेख वाचतात. काहींना आवडतो, अनेकांना आवडत नाही, पण जेव्हा एखादा वाचक विशेष तसदी घेऊन प्रतिक्रियेदाखल चार वाक्ये लिहीतो तेव्हा लेखकानेही त्याची दखल घ्यायलाच हवी. साहित्यिकाला रसिकांची दाद उत्साह वाढविणारी ठरते. तसेच आपण ही दाद विनम्रपणे स्वीकारली आहे याची पोच जेव्हा लेखक देतो तेव्हा तो रसिक वाचकही समाधानी होतो.
धन्यवाद.
6 Aug 2011 - 12:19 am | अर्धवटराव
थोडक्यात काय तर तुमच्याकडे लेखनी नावाची एक अंगठी आहे तर. भाग्यवान आहात.
अर्धवटराव
6 Aug 2011 - 1:38 am | इंटरनेटस्नेही
उत्तम लेखन!
6 Aug 2011 - 4:54 am | शुचि
लेख खूप आवडला.
6 Aug 2011 - 6:22 am | चेतन सुभाष गुगळे
ऋषिकेश चिंदरकर आणि शुचि,
धन्यवाद.
6 Aug 2011 - 9:36 am | सौन्दर्य
लेखातून दिलेला संदेश चांगला आहे, पण तुलना पटली नाही.
अंगावरचा एखादा दागिना कधीकधी इमर्जंसी मध्ये उपयोगीही पडू शकतो, त्यामुळे सर्वसकट त्याला बद्नाम करणे बरोबर नाही असे मला वाटते. ज्या प्रमाणे सेकंडरी कला जिवनात उपयोगी पडू शकते, त्याच प्रमाणे काही कारणाने खिशातले पैसे (प्रायमरी सोर्स) संपले तर अडीअडचणीला अंगठीचा (सेकंडरी सोर्स) उपयोग होउ शकतो.
सौन्दर्य
6 Aug 2011 - 3:18 pm | मराठी_माणूस
सलील अंकोला ह्या क्रिकेटपटूला त्याच्या दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी त्याने अभिनयाद्वारे दूरदर्शनमालिकांमध्ये स्वत:चे बस्तान बसविले
कोणत्या मालिका ?
6 Aug 2011 - 6:57 pm | चेतन सुभाष गुगळे
http://en.wikipedia.org/wiki/Salil_Ankola
7 Aug 2011 - 4:04 pm | पियुशा
@ चेतन गुगळे
सलील अंकोला ह्या क्रिकेटपटूला त्याच्या दुखापतीमुळे खेळापासून मुकावे लागले तरी त्याने अभिनयाद्वारे दूरदर्शनमालिकांमध्ये स्वत:चे बस्तान बसविले
कोणत्या मालिका ?
असा प्रश्न आहे तो ! तुम्ही दिलेलि लिन्क सलिल अंकोलाच्या क्रिकेट कारकिर्दिबद्द्लची आहे
सलिल अंकोला "कभी तो नजर मिलाओ" या अदनानच्या अल्बममध्ये दिसला होता बहुतेक :)
आणी १-२ सिनेमा मध्ये त्याला छोटा रोल मिळाला होता
त्यानन्तर जो गायब आहे तो आतापर्यन्त दिसलाच नाही
बहुतेक त्याच्याकडे अजुन एखादि प्रभावी अं ग ठी असेल ;)
8 Aug 2011 - 2:49 pm | वपाडाव
पियुशाने सुधलेख्नाचे क्लास लावल्याचे कल्ते....
8 Aug 2011 - 3:22 pm | स्वानन्द
घाईघाईत टंकले असेल... म्हणून कदाचित चुकून तसे झाले असण्याची शक्यता आहे :P