कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
14 Oct 2007 - 3:04 pm

कोई लौटा दे मेरे

मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार
चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार

अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये ||
आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय! कहाँ गये ||

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन | बीते हुए दिन वो मेरे, प्यारे पलछिन || धृ ||

मेरे ख्वाबों के महल, मेरे सपनों के नगर |
पी लिया जिनके लिये, मैंने जीवन का ज़हर ||
आज मैं ढूँढूं कहाँ, खो गये जाने किधर |
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पलछिन || १ ||

मैं अकेला तो न था, थे मेरे साथ कई |
एक आँधी सी उठी, जो भी था लेके गई ||
ऐसे भी दिन थे कभी, मेरी दुनिया थी मेरी |
बीते हुए दिन वो हाय, प्यारे पलछिन || २ ||

कोणी परत करावे

खुशालीचे दिन आवडते, माझे हरपले संगसोबती | हाय! कुठे गेले, हाय! कुठे गेले ||
माझ्या नयनींचे तेज, सुन्या रात्रींचे सहारे | हाय! कुठे गेले ||

कोणी परत करावे, हरपले दिन | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ ||

मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर |
ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर ||
आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे |
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ ||

एकटा मुळी नव्हतो, होते माझे संग किती |
एक वादळसे आले, होते ते ते घेऊन गेले ||
असेही होते कधी दिन, माझे होते जग ते माझे |
हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || २ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१२२२

तात्यांच्या एका लेखावरून प्रेरणा घेऊन हे इथे पेश करत आहे.

निगाहे करम असावे.

कविताआस्वादप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Oct 2007 - 3:21 pm | विसोबा खेचर

तात्यांच्या एका लेखावरून प्रेरणा घेऊन हे इथे पेश करत आहे.

धन्यवाद गोळेसाहेब!

निगाहे करम असावे.

म्हणजे काय?

मला उर्दूतल्या बर्‍याचश्या शब्दांचा अर्थ समजत नाही, परंतु ती भाषा, तिचा लहेजा, तिचा डौल अतिशय आवडतो. कानाला ही भाषा खूप छान लागते!

एकंदरीतच या भाषेचा डौल पाहिला की 'वाघ चुकून जर कधी बोललाच तर तो निश्चितपणे उर्दूतूनच बोलेल. त्याची मातृभाषा उर्दूच असेल!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं!

असो, या निमित्ताने उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल आपण इथे काही लेखन करावे अशी मी तुम्हाला विनंती करेन! हीच विनंती मला माझे मित्रद्वय धोंडोपंत आणि चित्तोबा यांनाही करायला आवडेल!

आपला,
(उर्दूप्रेमी!) तात्या.

तात्या, माझ्याबद्दल तुमच्या फार म्हणजे फारच अपेक्षा आहेत हो!

ऊर्दू भाषेचा लहेजा वगैरे ते चित्तरंजननाच साधेल. आमच्यासारख्याच्या बसची बात नाही ती.

निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे.

हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय?
तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल.

मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू
सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे.

धन्यवाद..

'इकडे लक्ष द्यावे' या किंचित कठोर आणि शिस्तप्रिय वाटणार्‍या शब्दांऐवजी 'निगाहे करम' हे शब्द अधिक भावले, अधिक अदबशीर वाटले! असो..

हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय?

हो...

तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल.

अहो दूरदृष्टी कसली? मिसळपाव हा माझा अत्यंत लाडका पदार्थ, तेव्हा तेच नांव द्यावसं वाटलं इतकंच! :)

मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

सल्ला द्यायचं काम मी करीन, इव्हन तुम्हीही ते करू शकता. इथे संपूर्ण लोकशाही आहे.

मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर

नाही, माझं इथल्या पंचायतीवर जराही वजन नाही!

इथे काय असावं आणि काय असू नये ह्यात मी लुडबूड करत नाही. ते ठरवण्याचे सर्वाधिकार फक्त सन्माननीय पंचायत समितीकडेच आहेत. पंचायत समितीवरील सर्व सदस्य सुजाण व मिसळपावच्या भल्याकरता योग्य ते निर्णय घ्यायला अत्यंत लायक व समर्थ आहेत याबद्दल मला खात्री आहे! त्यांची नांवंही जाहीर केलेली आहेत. यापैकी कुणाही व्यक्तिने माझ्याकडे 'पंचायत समितीवर घ्या' अशी मागणी केलेली नाही, तसेच पंचायत समितीवरील कुणीही सदस्य माझ्या ताटाखालचं मांजर वा माझा मिंधा नाही, त्यामुळे वजनबिजन असण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही!

मी फक्त नांवापुरता मालक आहे, विश्वस्त आहे. पंचायतीवरील सर्व सदस्य माझे सबॉर्डिनेटस नसून माझ्या बरोबरचे सहकारी आहेत अशीच माझी प्रामाणिक भावना आहे!

गोळेसाहेब,

आपण इथे नवीन आहात, परंतु लवकरच आपल्याला येथील मुक्त वातावरणाचा व लोकशाही तत्वांचा सुखद अनुभव यावा अशी अपेक्षा आहे..

आपला,
(विश्वस्त तरीही फक्त एक सामान्य सदस्य!) तात्या.

जयन्त बा शिम्पि's picture

29 Jan 2015 - 4:46 pm | जयन्त बा शिम्पि

माझ्या मनात एक वेगळीच कल्पना घोळतेय . उपरोक्त हिन्दी गाण्याचे पुढिल कडवे आपण तयार करावयाचे म्हणजे असे कि गाण्याची सिचुअशन तुम्हाला समजली आहे, चाल लक्षात आलेली आहे , मुळचा कवीचा भाव समजला आहे तर नवीन कडवे तुम्ही रचून दाखवावे. जमेल काय? मी तसा प्रयत्न करणार आहे