कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संताप दाटून येतो!
सरकारच्या नावाने खडे फोडले जातात,
मिडियाला शिव्या घातल्या जातात,
अमेरिका आणि इस्राएलचा धडा भारताने गिरवावा वगैरे मागण्या होतात,
संतापाच्या भरात, 'संपवा यांना' वगैरे सारख्या कडवट प्रतिक्रिया दिल्या जातात.
यातले काही घडत नाही किंवा घडू शकत नाही म्हणून मग चरफडत बसणं...
पण या पलिकडे जाऊन,
मी माझ्या परीने अगदी छोट्या पातळीवर दहशतवादा विरुद्ध लढण्यासाठी काय करू शकतो?
याविषयी माहिती देऊ-घेऊ या.
- तुमचा उपाय कितीही साधा सोपा असला असला तरी येथे नक्की द्या.
- तुम्ही काय केले हे दिलेत तरी चालेल.
माझ्यापासून सुरुवात करतो - कोणत्याही स्टेशनवर किंवा गाडीत असतांना मी एकदा डब्यावर नजर फिरवतो आणि संशयास्पद बेवारशी वस्तू किंवा हालचाल दिसते आहे हे पाहतो.
ट्रेनच्या डब्यात शिरल्यावर सर्वत्र नजर टाकणे हे सवयीने आता जमू लागले आहे. (हा फार मोठा उपाय नाही पण मी दर वेळी करतो - कारण तो करणे मला शक्य आहे.)
तुम्ही काय करता?
प्रतिक्रिया
15 Jul 2011 - 6:41 am | नरेशकुमार
विनाकारन इकडे तिकडे फिरायला जात नाही. घरातच केबल टीव्ही बघतो. तसेच पेट्रोल पन महाग झालं. आहे.
.
अगदिच नाही झालं तर भारताबाहेर जाउन सेटल होउ शकतो.
पन हा उपाय खुप खर्चिक आहे.
बाहेरच्या देशात नविन जॉब बघने. सगळे कुटुंब तिथे हलवने.
मिसेस साठी सुद्धा तिथे जॉब बघने.
भविश्यात मुलांचे शिक्शन वगेरे वगेरे. खुप पैसे लागतील. पन प्रयत्न करु शकेन.
सिर सलामत तो पगडी हजार.
15 Jul 2011 - 6:42 am | निनाद
पण हल्ले सर्वत्र होऊ शकतात हे लक्षात का घेत नाही? प्रमाण कमी असणे इतकाच फरक आहे असे मला वाटते.
15 Jul 2011 - 6:43 am | नरेशकुमार
प्रमाण कमी असणे इतकाच फरक आहे असे मला वाटते.
कमी असने पुरेसे आहे. असे तुम्हाला का वाटत नाही ?
15 Jul 2011 - 6:48 am | निनाद
खरे सांगायचे तर दहशतवादच नको असे वाटते.
या उपायाला इतर अनेक साईड इफेक्टस आहेत हे नक्की. तरी उपाय सुचवल्या बद्दल धन्यवाद.
न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथे इमिग्रेट होता येईल.
अधिक माहिती साठी त्या त्या देशाची अधिकृत इमिग्रेशन वेबसाईट पाहणे.
तसेच डेन्मार्क, स्वीडन आणि फ्रान्स यांचेही कायदे, व्हायला काहीसे सोईचे असावेत असा माझा समज आहे.
पण या सर्व देशांवर दहशतवादी हल्ले झालेलेच आहेत हे ध्यानात ठेवलेले बरे.
15 Jul 2011 - 6:54 am | प्रियाली
उत्तम. ही सवय चांगलीच आहे. जागरूकतेने लक्ष ठेवणे हे चांगलेच पण आपल्याकडल्या बेशिस्तीचे काय करायचे? कोणीही गाडी आणून कुठेही पार्क करून जातो. मुंबईला माझे घर स्टेशनच्या जवळ आहे. तेथे गेट उघडे मिळाले तर कोणीही येऊन आपली बाईक लावून जाते. अशावेळी एखादी बॉम्ब असलेली बाईक कोणी कुठे लावून गेला तर कसे कळायचे? कुठलेही ज्वालाग्राही, विशिष्ट रासायनिक पदार्थ हे भारतात लाचलुचपतीने कुठूनही मागवता/ काढता येत असतील तर? एखाद्याला थोडेफार पैसे चारून हव्या त्या ठिकाणी प्रवेश मिळवता येत असेल तर?
असे अनेक प्रश्न आहेत. त्याला उत्तरे नाहीत कारण आपण सुधरायचे ठरवले तरी बिघडणारे आणि बिघडवणारे इतर अनेक उत्सुक आहेत. यंत्रणेत जोपर्यंत सुधार होत नाही तोपर्यंत या दुष्टचक्राला अंत दिसत नाही.
निदान उद्या तरी काहीतरी चांगले होईल असा पॉझिटिव अॅटिट्यूड ठेवून पुनश्च कामाला लागू शकते आणि अर्थातच सावध राहू शकते. :)
15 Jul 2011 - 10:55 am | विसोबा खेचर
सहमत आहे. मीही हेच करतो..
तात्या.
15 Jul 2011 - 5:29 pm | सही रे सई
अगदी माझ्या मनातला धागा टाकलात तुम्ही. त्याबद्दल सगळ्यात पहिले तुम्हाला धन्यवाद निनादराव.
माझ्या मनातील काही उपायः
१) आपल्यापैकी जर कोणी भाड्याने घर दिले असेल कोनाला तर त्याची नोंदणी जवळच्या पोलिसस्टेशन मधे करावी. हल्ली चेह-यावरून सभ्य दिसणारे कोणीही दहशदवादी असू शकते.
२) आपल्या परीसरात अथवा आपल्या बिल्डींग मधे जर कोणी नवीन माणूस राहायला आले तरी त्यांची नीट चौकशी करावी. त्यातुनही काही संशयास्पद आढळल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे.
३) मला माहित नाही की हे शक्य आहे की नाही, पण जर असं शक्य असेल तर एक असं मशीन निघायला हवे की ज्याने जवळपास असलेल्या स्फोटकाला सेन्स करावे आणि ताबडतोब अलार्म करावं. असं मशिन प्रत्येक सामान्य माणसाकडे सहज ठेवता येईल (जसा आपण मोबाईल ठेवतो) असे असावे आणि खिशाला परवडणा-या किमतीत असावे.
आणखीन काही उपाय जसे सुचतील तसे टाकीनच.
पण हे मात्र खरं की फक्त सरकारला दोष देउन काहिहि होणार नाही. प्रत्येकानेच जागरूक राहिलं पाहिजे.
16 Jul 2011 - 7:20 pm | राही
आमची ओळखपत्रे कायम जवळ बाळगतो. नोकर /मोलकरीण बदलायची असेल तर तिचा/त्याचा फोटो काढून स्वतःजवळ ठेवतो तसेच पोलिसठाण्यात माहिती देतो.केरकचरा,वेष्टने कधीही कधीही रस्त्यावर/गटारात टाकीत नाही.इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करतो.(अशा कचर्याच्या छोट्याश्या ढिगात बॉम्ब्सदृश वस्तू सहज लपविता येते शिवाय पर्यावरणाची म्हणजे राष्ट्रहिताची हानी होते.)कुठल्याही प्रवासात एक मोठी कचरापिशवी जवळ बाळगतो व सहप्रवासी कचरा बाहेर टाकू लागले तर त्यांच्यापुढे ती पिशवी धरतो. रस्त्यावर लेनची शिस्त, सिग्नल्,वेगमर्यादा, पार्किंग इ.चे नियम कटाक्षाने पाळतो. रांगेत उभे राहावयाचे असेल तर शिस्तीत सरळ रेषेत उभे राहातो.आपल्यामुळे रांग तिरकी तिरकी होऊन रस्त्याच्या मध्यावर येणार नाही असे पाहातो.इतरांनाही समजावतो.एकंदर शिस्तीला व सुव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे हातभार लावणार्या गोष्टी देखील आम्ही करतो. यादी बरीच मोठी आहे. दोन चार वानग्या :
रेल वे मध्ये शिरल्यावर शेवटचे स्टेशन असेल किंवा प्रवासी नसतील किंवा थंडीचे दिवस (हे दुर्मीळच) असतील तर संपूर्ण कंपार्टमेंट फिरून पंखे बंद करतो आणि कुणाचे काही सामान राहिलेले नाही ना हे पाहातो. कुठल्याही काउंटर समोरील रांगेमध्ये सहसा हुज्जत घालीत नाही. कारण त्यामुळे इतरांचा खोळंबा होतो. आपले काम झाल्यावर काउंटरवरच्या माणसाशी हलकेच हसून त्याचे आभार मारतो. गावगप्पा करीत उभे राहात नाही.सुटे पैसे वगैरे शक्यतो जवळ बाळगतो.ड्रायव्हर,कंडक्टर, रिक्शावाले यांवर कधीही खेकसत नाही.उलट वाहनातून उतरताना त्यांना अभिवादन करून त्यांचे आभार मानतो.(यामुळे शुभभावना,सौहार्द व समोरच्याचा आत्मसन्मान वाढीस लागून कर्तव्यदक्षता व कर्तव्यसंतुष्टता येते.) रस्त्यावर चालताना 'कीप लेफ्ट' आवर्जून पाळतो.यामुळे समोरासमोर टक्कर अथवा हुलकावणी टळते. गर्दीच्या रस्त्यावर मध्येच अनपेक्षितपणे थांबणे,कोंडाळे करून उभे राहाणे,गप्पा मारत मारत घोळक्याने चालणे,मोठ्याने बोलणे,हसणे,टाळ्या देणे,सेलफोनवर बोलत बोलत चालणे हे सर्व टाळतो. इ. इ. इ.
16 Jul 2011 - 7:35 pm | पंगा
हे सर्व ठीक आहे, नव्हे उत्तम आहे. पण याने दहशतवादाला आळा नेमका कसा बसतो, हे कळले नाही.
16 Jul 2011 - 9:04 pm | राही
दहशतवादाला आळा घालणे ही केवळ शस्त्रे वापरून आणि केवळ सरकारनेच अथवा केवळ सैनिकांनीच करावयाची गोष्ट नव्हे. संपूर्ण समाजामध्ये सतर्कता,प्रसंगावधान,कर्तव्यदक्षता,कर्तव्यतत्परता,कर्तव्याप्रति आत्मीयता आणि सौहार्द या गोष्टी खोलवर मुरल्या तर बरेच काही घडू शकते. शिवाय कुठल्याही संकटाचा मुकाबला करताना अंतर्गत सुव्यवस्था असणे जरूरीचे असते. या स्फोटांचेच उदाहरण पहा. नंबरप्लेट नसलेल्या,छत्री तारेने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या(पाऊस बदाबदा कोसळत असताना छत्री घट्ट जखडलेली असणे हे संशयास्पद नाही का?) स्कूटर कडे कोणाचेही लक्ष अवैध आणि अस्ताव्यस्त पार्किंग मुळे गेले नाही. चिंचोळ्या गल्लीत खाऊच्या गाड्या लागल्यामुळे (व इतरही अव्यवस्थेमुळे) लोकांचे थवे जमतात आणि अपघातग्रस्ततेची व्याप्ती वाढते,पहारा ठेवण्यात अडथळे येतात. केरकचरा जमतो आणि ह्या सर्वांच्या अनुपस्थितीत जी एखादी गोष्ट ठळकपणे नजरेत भरली असती ती अश्या स्थितीत दुर्लक्षित रहाते.
अपघातानंतरही मदतकार्यात,तपासकार्यात मोठे अडथळे येतात. गोंधळ माजवण्याचा अतिरेक्यांचा हेतू(असलाच तर)सफल होतो पण तो वेगळा विषय आहे.
16 Jul 2011 - 9:07 pm | पंगा
काउंटरसमोरील रांगेमध्ये हुज्जत न घालणे, ड्रायव्हर,कंडक्टर, रिक्षावाले यांवर न खेकसणे (म्हणजे खेकसू नयेच), उलट त्यांचे आभार मानणे, रस्त्यावर चालताना 'कीप लेफ्ट' आवर्जून पाळणे, सेलफोनवर बोलत बोलत न चालणे या सर्वांनी दहशतवादाला आळा बसतो, असा आपला दावा आहे काय?
काउंटरसमोरील रांगेमधील इतर व्यक्ती अथवा काउंटरमागील व्यक्ती, ड्रायव्हर, कंडक्टर, रिक्षावाले, रस्त्यावरील इतर पादचारी अथवा वाहनचालक, झालेच तर सेलफोन कंपनी, या सर्वांमध्ये आपल्याला भावी/होतकरू ('पोटेंशियल' अशा अर्थी) दहशतवादी दिसतात काय?
(वरील सर्व कृती करण्याबाबत काहीही आक्षेप नाही, उलट आपल्या नागरी कर्तव्यपालनाचा अट्टाहास म्हणून त्या कदाचित* स्तुत्यच आहेत. पण त्यांचा दहशतवादाशी/दहशतवादाला आळा घालण्याशी संबंध जोडलेला पाहून आश्चर्य वाटले.)
* 'कदाचित' एवढ्यासाठी, की आपापल्या नागरी कर्तव्यपालनात वस्तुतः 'स्तुत्य' असे काही नसावे, उलट ते 'किमान अपेक्षित' असावे. परंतु 'बहुतांश नागरिक आपापले नागरी कर्तव्यपालन करीत नाहीत' या गृहीतकाखाली ते कदाचित स्तुत्य ठरू शकेल, इतकेच.
मात्र, दहशतवादाशी या बाबीचा तरीही संबंध जोडला जाऊ शकेल, असे वाटत नाही.
16 Jul 2011 - 11:24 pm | राही
नागरी कर्तव्यपालन हे किमान अपेक्षित असले आणि त्याची टिमकी वाजवणे अपेक्षित आणि उचित नसले (तशी ती इथे वाजवलेलीही नाही) तरी किमानपक्षी भारतात ते थोडेफार दुर्मीळ आहे. सर्वांनी ही कर्तव्यपालनदक्षता दाखवल्यास एकंदर समाजाची सतर्कता,प्रसंगावधान,कार्यक्षमता थोडीफार वाढू शकते हे मांडावयाचे आहे.
रांगेतली हुज्जत वगैरे पुढील सर्व मुद्द्यांनुसार वर्तन हे सद्ध्याच्या धकाधकीच्या जीवनात थोडीफार सुसह्यता आणते,थोडीफार तणावमुक्ती देते,एकाग्रता थोडीफार वाढवते,कोलाहल कमी करून थोडीफार हार्मनी आणते, सौहार्द थोडेफार वाढवते, कामाप्रति थोडीफार आत्मीयता निर्माण होते. त्यामुळे कार्यक्षमता, प्रसंगावधान,समयसूचकता, निर्णयक्षमता थोडीफार वाढते. हा 'थोडेफारपणा' चोहोंबाजूंनी केंद्रित झाल्यास अथवा सर्वच स्तरांवर (सैन्यदले,शासन.लोकप्रतिनिधी,बाबूलोक,माध्यमे,न्यायसंस्था,वैद्यक,खाजगी उद्योगव्यापार क्षेत्र, शिक्षण इ.) थोडाफार वाढल्यास एकंदरीत सुव्यवस्था थोडीफार वाढते, एक शिस्तबद्ध समाज निर्माण होतो, कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठीची सुसज्जता आणि क्षमता थोडीफार वाढते.
खरे तर केवळ दहशतवादावरच नव्हे तर भ्रष्टाचारासारख्या रोगावरही हा थोडाफार इलाज ठरू शकतो. केवळ हाच एक किंवा संपूर्णतः हाच इलाज आहे असा दावा नाही. थोड्याफार प्रमाणात तसा तो असू शकतो.
16 Jul 2011 - 11:34 pm | ऐक शुन्य शुन्य
ऐक पत्र लिहा... तुमचे आमदार, खासदार, ग्रुहम्नत्री कार्यालय, मुख्यम्नत्री कार्यालय आणी कळवा कि ते आपल्या सुरक्षा करण्यास असमर्थ आहेत म्हणुन्......त्यान्च्या प्रत्येक विधानामध्ये ते आप्ल्यला ग्रुहीत धरु शकत नाहीत ही जाणीव आपण करुन दिली पाहिजे...तरच ते सुरक्षा मजबुत करण्यावर भर देतील.