नृत्यांगना मिताली...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
12 Jul 2011 - 9:24 pm

माझी एक जिवाभावाची मैत्रिण सोनाली भट. म्हणजे पूर्वाश्रमीची सोनाली भट, आताची डॉ सोनाली मुखर्जी. मेडिकलला असताना सधन मुखर्जी नावाच्या एका सज्जन मासेखाऊ बंगाल्याच्या पिरेमात पडली आणि त्याच्याशी लगीन केलं..

गेल्या काही वर्षांपासून सधन-सोनाली सिंगापुरला स्थायिक झाले आहेत. मिताली ही त्यांची मुलगी. तात्यामामाचा हा छोटेखानी लेख हा खास तिचं कौतुक करण्याकरता...!

वयाच्या अक्षरश: अडीचव्या वर्षापासूनच मितालीचे पाय थिरकू लागले. एक नैसगिक देवदत्त लय होती त्या पदन्यासात. सधन-सोनाली तेव्हा मुंबैतच राहायचे. त्यामुळे लगेचंच त्यांनी मितालीमधल्या या गुणांना पूर्ण वाव द्यायचं ठरवलं. आणि मितालीचाही योग इतका चांगला की तिला कथ्थक दुनियेतल्या एक विद्वान विदुषी डॉ सौ मंजिरी देव या गुरू म्हणून लाभल्या. मंजिरीताई या पं गोपीकृष्ण यांच्या शिष्या. आज ताईंचा अधिकार इतका आहे की त्यांनी लिहिलेली पुस्तकं कथ्थकची टेक्स्ट बुक्स् म्हणून वापरली जातात. गेली अनेक वर्ष त्या ठाण्यात अतिशय उत्तम प्रकारे गोपीकृष्ण संगीत नृत्य महोत्सव भरवत आहेत. असो, आमच्या मंजिरीताई या एका स्वतंत्र विस्तृत लेखाचा विषय आहेत.

(अवांतर - आज जगभर कीर्ती असलेला त्यांचा तब्बलजी मुलगा मुंकदराज देव हा माझा वर्गमित्र.) :)

मंजिरी देवांचं उत्तम मार्गदर्शन मितालीला अगदी लहान वयापासून मिळालं. त्याचसोबत पं बिरजू महाराज, शाश्वती सेन, अर्चना जोगळेकर यांच्याकडून अनेक शिबिरातूनही मितालीला मार्गदर्शन मिळालं आहे, आजही मिळतं आहे.

आजच्या घडीला मिताली एक चांगली कथ्थक नृत्यांगना म्हणून उदयास येण्यास तयार आहे. अर्थात, अजूनही खूप काही शिकायचं आहे, अनुभव घ्यायचे आहेतच. कारण गाणं काय किंवा नृत्य काय, हा न संपणारा अभ्यास आहे, न संपणारा प्रवास आहे. परंतु मिसळपावच्या माध्यमातून मितालीचं योग्य ते कौतुक व्हावं आणि तिला साधना करण्यास अधिकाधिक उत्तेजन मिळावं म्हणूनच या लेखाचं प्रयोजन..

आज वयाच्या अवघ्या १२-१३ वर्षापर्यंत भारतात अनेक ठिकाणी आणि सिंगापुरातही अनेक ठिकाणी मितालीने सोलो कार्यक्रम केले आहेत. हे सगळं करत असताना आपला शालेय अभ्यासही ती चोखपणे करत असते. तिथे कधीही दुर्लक्ष नाही.

सोनालीचंही मला या निमित्ताने कौतुक करायचं आहे, ते याचसाठी की तिने सिंगापुरात राहूनही मितालीवर पूर्णत: भारतीय संस्कार ( मराठी आणि बंगाली! :) ) केले आहेत, करते आहे.

मितालीचा स्वभावही अतिशय नम्र. तशी अबोल आहे परंतु मिश्किलही आहे. सोनाली मास्तरणीकडून आज पावेतो उत्तम स्वयंपाकही बनवायला शिकली आहे. मितालीच्या हातचा साधा वरणभात, बटाट्याची भाजी -पोळी खावी. अगदी उत्तम..!

असो..

इथेच संपवतो आहे हा छोटेखानी लेख. मितालीला तिच्या पुढील नृत्यप्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा..! येथे तिच्या काही भाव व नृत्यमुद्रा देत आहे..

-- तात्यामामा.

कलानृत्यसद्भावनाशुभेच्छामाहिती

प्रतिक्रिया

सुधीर१३७'s picture

12 Jul 2011 - 9:32 pm | सुधीर१३७

वाह , तात्या, मस्तच...................................

मितालीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा................:)

छान ..
पालकांनी मुलांबाबत असे योग्य निर्णय घेतलेले पाहुन छान वाटते.

लेखाबद्दल धन्यवाद.. मराठी-बंगाली या दोन मोठ्या संस्कृती एकत्र आल्यावर .. फक्त खाण्याचेच नाहि तर दर्जेदार साहित्याचे बंध ही खुप सुखावुन जात असतील.
त्यात सोबतील उत्तरेकडचे क्लासिकल कथ्थक मस्तच .
मितालीला भविष्यासाठी शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2011 - 10:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मितालीला तिच्या पुढील नृत्यप्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा..!

-दिलीप बिरुटे

>> मितालीला तिच्या पुढील नृत्यप्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा..! >>
असेच म्हणते
मितालीच्या भावमुद्रा खूप सुंदर आहेत.

>>आज वयाच्या अवघ्या १२-१३ वर्षापर्यंत भारतात अनेक ठिकाणी आणि सिंगापुरातही अनेक ठिकाणी मितालीने सोलो कार्यक्रम केले आहेत. हे सगळं करत असताना आपला शालेय अभ्यासही ती चोखपणे करत असते. तिथे कधीही दुर्लक्ष नाही. >>
कौतुक आहे.

मितालीच्या भावमुद्रा खूप सुंदर आहेत.

अगदी हेच मनात आल अगदी.

आमच्या कडूनही मितालीला तिच्या पुढील नृत्यप्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा !!!!

प्राजु's picture

12 Jul 2011 - 11:51 pm | प्राजु

मस्तच!!
खूप गोड आहे मिताली.
तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

स्वाती२'s picture

13 Jul 2011 - 12:15 am | स्वाती२

मितालीला शुभेच्छा!

धनंजय's picture

13 Jul 2011 - 12:48 am | धनंजय

मितालीला शुभेच्छा!

मितालीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

मितालीला बघितल्यावर बालकलाकार-अभिनेत्री सारिकाचा भास होतो.

असेच म्हणते
मितालीच्या भावमुद्रा खूप सुंदर, निरागस आहेत.

मी-सौरभ's picture

13 Jul 2011 - 10:28 am | मी-सौरभ

+१

michmadhura's picture

13 Jul 2011 - 12:15 pm | michmadhura

मितालीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

मितालीला खुप खुप शुभेच्छा तिच्या पुढच्या वाटचालीसाठी

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jul 2011 - 1:05 am | बिपिन कार्यकर्ते

मितालीला शुभेच्छा!