वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
30 Jun 2011 - 1:41 pm

वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा

शनिवारी अचानक संध्याकाळी ६.०० वा. फोनाफोनी झाली, आणि आज रात्रीच कोकणदिव्याला जाऊ असं ठरल. आत्तापर्यंत बरेच वेळा रायगडाच्या टकमक टोकावरुन समोरचा कोकणदिवा पाहिला होता, पण प्रत्यक्षात जायची वेळ काही कधी आली न्हवती. अहो रायगडासारखा तेजस्वी तारा असताना या लुकलुकणा-या दिव्यावर कशाला कोण जातो. पण आता आमची वय झाली असल्याने (वय ३४) आणि शक्यतो तेच गड परत परत करायचे नाहीत असं ठरवल असल्याने (भिमाशंकर, राजमाची, हरिश्चंद्रगड ई. ई. सन्माननीय अपवाद वगळता) कोकणदिव्याला फिक्स केल. धावाधाव करुन सामान गोळा केलं आणि रात्री ८.०० वा. व्ह्यन घेऊन निघालो.

साधारण १.०० च्या सुमारास पाचाड्ला पोहोचलो. पाचाड गाव शांत झोपलं होतं. दिवस पावसाचे त्यामुळे झोपायचं कुठे हा मु़ख्य प्रश्ण. पाचाडच्या शाळेत पाहिल तर गेटलाच कुलूप. पाचाड फेमस देशमुख वगैरे मंडळी गार झाली होती. शेवटी एका दुकानाच्या ओसरीवर जागा दिसली, वरती शेडसुध्दा होती त्यामुळे तिथेच क्यरिमैट पसरली. पण झोप कुठची येते, आम्ही आडवे पड्लो तसे डास जागे झाले. ओडोमॉस लावुन त्यांच्या पासुन सुट्का करुन घेतोय तर तोपर्यंत पाचाड मधील कुत्र्यांना आमची खबर लागली, आम्हाला तिथे झोपु द्याव कि नाही यावर बराचवेळ त्यांची वादावाद झाली, आणि त्यातच पहाटे ३.३० च्या सुमारास आम्ही झोपलो.

७ च्या सुमारास ऊठलो समोरील रायगड ढगात हरवला होता, खुबलढा बुरुज मात्र अस्पष्ट दिसत होता. रायगडाकडे पहात पहात चहा पिऊन घेतला, प्रेशरचं निवारण केल, सांडोशी या कोकणदिव्याच्या पायथ्याच्या गावात जायचा रस्ता विचारुन घेतला आणि निघालो. पाचाड गावातुन ऊजवीकडचा रस्ता रायगडला तर डावी कडचा रस्ता सांडोशीला जातो. वाटेत जिजाबाईंची समाधी दिसली तिच बाहेरुनच दर्शन घेतलं . सांडोशी पाचाड पासुन १० कि.मी. ८ च्या सुमारास सांडोशीला पोहोचलो.

समोरच कोकणदिवा दिसत होता.

सांडोशी गावात असलेल्या देवळाजवळ गाडी पार्क केली आणि निघालो.

शेतीच्या कामांना सुरुवात झालेली होती.

पहिलं चढण पार करताच कोकणदिव्याच मनोहारी दर्शन झालं.

वाटेतले ओढे-नाले पार करत, मजल दरमजल करत चाललो होतो.

खेकडा

क्षणभर विश्रांती घेऊन, पोटपुजा करुन निघालो.

नुकतीच पावसाला सुरुवात झाली असल्याने, सगळीकडे हिरवाई पसरायला लागली होती.

साधारण तास-दिड तासाच्या चढाईनंतर मधल्या पठारावर पोहोचलो.

२०-२५ मिनीटाच्या घसा-यावरुन चढून गेलो आणि कोकणदिव्याच्या गुहेत पोहोचलो.

गुहेच्या दोन्ही बाजुला पाण्याचे टाके आहे, त्यापुढेच सर्वोच्य माथ्यावर जाणारी वाट आहे.

माथ्यावरुन रायगड, लिंगाणा, कावळे घाट ई. परिसर दिसतो. हवा स्वच्छ असल्यास रायगडावरील जगदिश्वर मंदिर व ईतर इमारती स्पष्ट दिसु शकतात.

फोटो सेशन वगैरे झाल्यावर, खाऊन घेतलं थोडी विश्रांती घेतली आणि निघालो. वाटेतल्या घसा-यावरुन ऊतरताना आमच्यापैकी एका भिडुची चप्प्ल तुटली. आम्ही घरातुन निघतानाच घाईघाईत निघालो असल्याने एक्स्ट्रा चप्प्ल, बुट कोणाकडेच नव्हते. त्यातच पावसाला सुरुवात झाली. अनवाणी पायांनी चालताना त्याची अवस्था दयनीय झाली. पाऊस पड्ल्यामुळे श्वासागणिक घसरत घसरत एकदाचे मधल्या पठारावर आलो. तिथे त्याच्या पायाला दगड लागु नये म्हणुन टॉवेल बांधला आणि वरुन मोजे घालायला दिले. "तुका म्हणे त्यातल्या त्यात."

साधारण ३ तासानी पुन्हा सांडोशी गावात पोहोचलो.

बज्जु

प्रवासइतिहासभूगोलमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Jun 2011 - 1:50 pm | प्रचेतस

बज्जुगुर्जी कुठे गायब होतात इतके दिवस.?
फोटो आणि वर्णन मस्तच.

गायब नव्हतो रे बाबा, इथेच आहे. मध्यंतरी तैलबैला आणि आजोबा करुन आलो पण ईतर व्यापात फोटो आणि वर्णन टाकायचे राहुन गेले इतकेच.

बज्जु गुर्जी नव्हे गुरुजी. आणि हो आता गुरुजीगिरी कमी करुन सट्ट्याच्या लाईन मध्ये आहे (शेअर मार्केट).

प्रचेतस's picture

30 Jun 2011 - 2:29 pm | प्रचेतस

आता तैलबैला आणि आजोबाचे पण चित्रांसहित वर्णन येउ द्यात की.

छान.. रायगडाच्या जवळचा हा भाग मला माहित नव्हता.. बरे झाले सांगितले .. पुढच्यावेळेस जाण्याचा प्रयत्न करुच.

तो पानाचा हिरवागार फोटो खुप छान आला आहे.
शेतिच्या कामाच्य सुरवातीचा आणि त्या खालील कोकण दिव्याचे २ फोटो ही मस्त.

त्या गुहे जवळचे गवत पिवळे कसे काय बरे हिरवेच हवे होते ना ?

सुनील's picture

30 Jun 2011 - 1:56 pm | सुनील

मस्त फोटो आणि वर्णन.

अमोल केळकर's picture

30 Jun 2011 - 1:56 pm | अमोल केळकर

सुरेख. नवीन गडाची माहिती झाली . धन्यवाद :)

अमोल केळकर

जवळपास ५/६ वर्षांनी राब आणि मुठ्या पहिला तो सुद्धा फोटोत.
बाकी ट्रीप आणि फोटो छानच .

उगाच : गणेशा बाबा तू सध्या शंकेश्वर होत चालला आहेस ?

हेम's picture

30 Jun 2011 - 3:57 pm | हेम

..मग कावल्याबावल्याची खिंड कां नाही केली?? तिथल्या प्रसंगाचा इतिहास तर एकदम रोचक आहे.. कुर्डूगड- मानगड करून देवघाटाने वर येऊन कोकणदिवा- रायगड.. एक जबराट ट्रेक.

निनाद's picture

1 Jul 2011 - 11:21 am | निनाद

..मग कावल्याबावल्याची खिंड कां नाही केली?? तिथल्या प्रसंगाचा इतिहास तर एकदम रोचक आहे..

कळू द्या काय आहे ते. लिहिले नाही तर कसे कळेल?

सहज's picture

30 Jun 2011 - 4:01 pm | सहज

मानले!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2011 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास रे....!

>>>> पायाला दगड लागु नये म्हणुन टॉवेल बांधला आणि वरुन मोजे घालायला दिले.

नमस्कार हे भो तुम्हाला.....!

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2011 - 5:36 pm | स्वाती दिनेश

'कोकणदिवा' - वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले.
स्वाती

आचारी's picture

30 Jun 2011 - 7:10 pm | आचारी

एकदम जबरा !!

मेघवेडा's picture

30 Jun 2011 - 11:24 pm | मेघवेडा

मस्तच हो गुरूजी!

अप्पा जोगळेकर's picture

1 Jul 2011 - 12:03 am | अप्पा जोगळेकर

निजामपूर-कुंभे घाट -माजूर्णे-घोळ-कोकणदिवा-कावळ्याघाट-सावराट आणि महाडहून मुंबई. एकदम जबर्या ट्रेक. अति पावसामुळे कोकणदिवा मिस झाल्याचं दु:ख सलत राहिलंय अजून.

५० फक्त's picture

1 Jul 2011 - 7:32 am | ५० फक्त

जबरदस्त फोटो आणि माहिती, धन्यवाद.

रेवती's picture

1 Jul 2011 - 7:35 am | रेवती

छान वर्णन आणि फोटू!

जातीवंत भटका's picture

1 Jul 2011 - 1:18 pm | जातीवंत भटका

सुंदर !! कोकणदिव्याला जायला पुण्याहूनही पानशेत धरणाच्या मागल्या बाजूने, घाटावरुन जाणारी वाट आहे. गारजाई नावाच्या वस्तीत मुक्काम ठोकून सकाळी कोकणदिवा .... भन्नाट आहे.