शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

मालोजीराव's picture
मालोजीराव in कलादालन
10 Jun 2011 - 5:00 pm

रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता.
पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं.
यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग हे मॉडेल(?) किल्ले करणार आणि शिवरायांच्या जीवनावर भव्य इंग्रजी चित्रपट काढणार असल्याची पण घोषणा केली.
सहस्त्र जलधारांच्या अभिषेकात हा राज्याभिषेक सोहळा सुंदररित्या पार पडला...काही क्षणचित्रे जोडीत आहे.
तारीख आणि तिथीचा घोळ इथेही होणार हे सामनामध्ये वाचून वाईट वाटलं....
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे १३ जून २०११ रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे राज्याभिषेक सोहळा पुन्हा साजरा होत आहे...
ज्यांना ६ जूनला जायला मिळालं नाई ते १३ जूनला तिथीप्रमाणे होणार्या या सोहळ्याला हजेरी लाऊ शकतात.




छायाचित्रे साभार - बाजी जेधे,संभाजी छत्रपती

कलासंस्कृतीप्रवासइतिहासछायाचित्रण

प्रतिक्रिया

michmadhura's picture

10 Jun 2011 - 5:04 pm | michmadhura

अतिशय सुन्दर फोटो !

विकास's picture

10 Jun 2011 - 5:05 pm | विकास

येथे छायाचित्रवृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद!

छोटा डॉन's picture

10 Jun 2011 - 5:06 pm | छोटा डॉन

धन्यवाद मालोजीराजे, आभारी आहे.
जबरदस्त फोटो आहेत.

शिवराज्याभिषेकाचा एवढा मोठ्ठा सोहळा होतो ह्याची खरोखर कल्पना नव्हती.
फार आनंद झाला हे पाहुन, धन्यवाद :)

- छोटा डॉन

प्यारे१'s picture

10 Jun 2011 - 5:11 pm | प्यारे१

मस्त वृत्तांत.

महाराजांना मानाचा मुजरा...!!!

१३ जूनला तिथीप्रमाणे (आमचा पुप्या जाणार आहे शाखेत ;) ) राज्याभिषेक दिन आहे.

अवांतरः शेवटचा फटु प्रतिक्रियाखेचक. व्यक्ति त्रासदायक वाटल्या..!!! ;)

ती धातूची मूर्ती कोणाची आहे ?? म्हणजे शेवटून अकरावा फोटो .

मालोजीराव's picture

10 Jun 2011 - 5:35 pm | मालोजीराव

सूड's picture

10 Jun 2011 - 6:05 pm | सूड

ह्म्म !! अशी पुर्णाकृती मूर्ती पहिल्यांदाच पाह्यली. पण तरीही सर्व फोटो झक्कास.

साबु's picture

10 Jun 2011 - 5:21 pm | साबु

मस्त फोटो... नुसते फोटो पाहुन...वातावरण किती भारलेले असेल याचा अन्दज येतोय...
काटा आला ना राव.

सुरेख ..

५० फक्त's picture

10 Jun 2011 - 5:23 pm | ५० फक्त

मस्त रे खुप छान खुप छान पुढच्या वर्षी आमाला पण न्या बरोबर, इसरु नका.

धुक्यातल्या झेंड्याचा फोटो एकद्म खल्लास,

@ सुड, ती प्रतिमा महाराजांची आहे, ती सिंधुदुर्ग किल्यावरजे महाराजांचे मंदिर आहे त्या मंदिरातील मुर्तिची रिप्लिका आहे अशी माहीती आहे, तज्ञांनी क्रुपया खुलासा करावा हि विनंती.

मालोजीराव's picture

10 Jun 2011 - 5:41 pm | मालोजीराव

नक्की नेणार
दर वर्षी ५०-६० हजारांहून अधिक शिवभक्त हजर असतात सोहळ्याला!
लवकरच छत्रपतीकृपेने हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण व्हावा .....अशी मनोकामना आहे

धमाल मुलगा's picture

10 Jun 2011 - 6:20 pm | धमाल मुलगा

>लवकरच छत्रपतीकृपेने हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण व्हावा .....अशी मनोकामना आहे
काय बोललात द्येवा.... व्वा!
खरं सांगतो, हे वाक्य वाचलं अन का कोण जाणे टचकन डोळे भरुन आले.

किसन शिंदे's picture

10 Jun 2011 - 5:30 pm | किसन शिंदे

भारलेलं वातावरण आणी अतिशय सुंदर फोटो...विशेषतः वरून १२ वा सजावटीचा फोटो..

महाराजांना मानाचा मुजरा...!!!

मालोजीराव's picture

10 Jun 2011 - 5:46 pm | मालोजीराव

हो,तो फोटो २०१० चा आहे,यावेळी जोरदार पावसाने फारशी फुलांची सजावट होऊ शकली नाही !
यातील २-३ फोटो २०१० शिवराज्याभिषेकाचे आहेत...आणि शेवटचा नितीन देसाई यांच्या सेटवरचा आहे

धमाल मुलगा's picture

10 Jun 2011 - 6:19 pm | धमाल मुलगा

वाह!!!
नुसते फोटो पाहूनच तबियत खुश जाहली!

ओमकार बिन मालोजीराजे,
शतशः धन्यवाद!

मालोजीराव's picture

10 Jun 2011 - 6:39 pm | मालोजीराव

धमालराव पुढील वर्षी आपण सगळे जाऊया म्हणतो, ३३९ व्या शिवराज्याभिषेकाला !

धमाल मुलगा's picture

10 Jun 2011 - 6:55 pm | धमाल मुलगा

मालोजीराव,
नक्की! आई जगदंबेच्या कृपेनं, पुढच्या सोहळ्याला आपण नक्कीच हजर राहू.

गणेशा's picture

10 Jun 2011 - 6:59 pm | गणेशा

महाराजांना मानाचा मुजरा...!!!

मालोजीराजे आदले २ दिवस रायगडावरच होतो आम्ही..
तुम्ही आहात हे आधी माहिती असते तर मज्जा आली असती की.

फोटो खुपच छान आहेत.

प्रचेतस's picture

10 Jun 2011 - 7:02 pm | प्रचेतस

महाराजांना मानाचा मुजरा.
धन्य झालो फोटो पाहून.
मालोजीराव, धन्यवाद.

पिवळा डांबिस's picture

11 Jun 2011 - 12:28 am | पिवळा डांबिस

फोटोंद्वारे सोहळा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक धन्यवाद!

अग्रजा's picture

12 Jun 2011 - 9:42 pm | अग्रजा

रोमांचित करणारे फोटो

अमोल केळकर's picture

13 Jun 2011 - 11:21 am | अमोल केळकर

असेच म्हणतो

अमोल केळकर