रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी
आडरानी पंक्चरणार्या टायराची रांगोळी
मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी
येती सारी येकजात देता एक साधी हाळी
चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी
संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी
गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी
उजेड फुटतो भल्या सकाळी
आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी
उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी
ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी
बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी
दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी
स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी
घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी
जीवनात रंग भरे सृजनतेची टिंबावळी
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/18175
प्रतिक्रिया
8 Jun 2011 - 10:57 pm | आंबोळी
लै भारी ओ विजुभाउ...
आमच्या एका मैत्रीणीची ... म्हणजे मैत्रीणीचे रुप घेतलेल्या मित्राची आठवण करून दिलीत....
जै जालिंदर बाबा
8 Jun 2011 - 11:07 pm | पैसा
. अति सुंदर.
8 Jun 2011 - 11:53 pm | टारझन
=)) =)) =))
वेगळीच कविता :) विजुभाऊ म्हणजे हरभजन आहेत कवितेतले .. काय करतील .. सान्गता येत नाही
9 Jun 2011 - 8:18 am | नगरीनिरंजन
वा! एकदम टुन(tun) विडंबन झालंय!