मुंबई क्विझ...१..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
27 May 2011 - 5:41 pm

मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी.

आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्‍यांचा तर अर्थात रोजच.

पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्‍या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही.

एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा.

सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्‍याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती.

ओळखण्याचा प्रयत्न कराल?
१.

२.

३.

४.

प्रवासराहणीभूगोलआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

27 May 2011 - 6:10 pm | अमोल खरे

१. सी लिंक
२.गिरगाव चौपाटी
३.मरीन ड्राईव्ह
४. धारावी

बरोबर आहे का ?

गवि's picture

27 May 2011 - 6:20 pm | गवि

प्लीज थोडे थांबा.

काही उत्तरे आल्यावरच उत्तर सांगणे जास्त चांगले ना?

निखिल देशपांडे's picture

27 May 2011 - 6:19 pm | निखिल देशपांडे

१) सी लिंक
२) हँगिग गार्डन मधुन चौपाटीचा फोटो
३) वरळी सि फेस
४) बॅग्राउंडला हिरानंदानीचा लाल त्रिकोण दिसतोय?? म्हणजे बहुदा विक्रोळी/घाटकोपरचा फोटो असावा.. मॉस्टली एच सी सी च्या गच्ची वरुन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2011 - 6:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>हँगिग गार्डन मधुन चौपाटीचा फोटो

च्यायला, गार्डनच्या त्या जागेवरुन चौपाटीकडे पाहिल्याची आत्ता आठवण झाली. थँक्स हं निदे. :)
हँगिंग गार्डनच्या बाहेर देशाविदेशातल्या भाषा बोलणारं ते अशिक्षित पोर्ग असतं का आता ?

च्यायला या फटाल येररच्या..... :(

-दिलीप बिरुटे

सूड's picture

27 May 2011 - 7:24 pm | सूड

निदेंशी सहमत, विशेषकरुन चौथ्या फोटुसाठी !!

सहमत...

चौथा फोटू विख्रोळीचा आहे.. :)

मस्त कलंदर's picture

27 May 2011 - 8:16 pm | मस्त कलंदर

यातला शेवटचा फोटो सोडून मीही सगळे ओळखलेयत.
तिसरा फोटो सी-लिंक चालू होण्याआधीचा भाग आहे, आणि हँगिग गार्डनमध्ये म्हातारीच्या बुटापासून पुढे आल्यानंतर चौपाटी वेगवेगळ्या कोनांतून दिसते. हा त्यातलाच एक फोटो आहे.

शुचि's picture

27 May 2011 - 7:29 pm | शुचि

मला फोटो खूप आवडले. मुंबईचे दर्शन मिळते आहे हेच नशीब. अगदी "कलात्मक" फोटोंपेक्षा हे फोटो खूप देखणे आणि प्रांजळ वाटतात.

धमाल मुलगा's picture

27 May 2011 - 7:31 pm | धमाल मुलगा

चारही फोटू मुंबईचे आहेत. :P

श्रावण मोडक's picture

27 May 2011 - 7:56 pm | श्रावण मोडक

+१

मला काहीही ओळखू येणार नाही हे नक्की.

आनंदयात्री's picture

27 May 2011 - 9:19 pm | आनंदयात्री

शटरस्पीड किती ? अपार्चर काय ? डिपार्चर किती वाजता ?
फोटो क्लिअर का नाही दिसत ? हां प्रदुषण असेल .. काय बाबा गचाळ मुंबई इत्यादी इत्यादी ..

(अशा प्रकारच्या उच्चभ्रु प्रतिसादाच्य प्रतिक्षेत)

पंगा's picture

30 May 2011 - 7:24 pm | पंगा

डिपार्चर किती वाजता ? ... हां प्रदुषण असेल .. काय बाबा गचाळ मुंबई इत्यादी इत्यादी ..

उलटपक्षी, मुंबई ही १०,००० फुटांवरूनच चांगली (अ‍ॅज़ इन नयनरम्य, मनोहर इ.इ.) दिसते, असे मत सुमारे अठरा वर्षांपूर्वी मुंबईहून पहिल्यावहिल्या उड्डाणाचे वेळी टेकऑफनंतर खिडकीतून खाली डोकावून* बघितल्यानंतर झाले होते, ते या निमित्ताने आठवले.

(* बोले तो, काचेच्या बंद खिडकीतून खाली डोकावणे जितपत शक्य असते, तितपतच.)

(छ्या:! ही फेटल एरर म्हणजे एक छळवाद आहे बुवा! मुक्त अभिव्यक्तीला खीळ घालू पाहणारा याहून मोठा अडथळा दुसरा नसावा.)

नितिन थत्ते's picture

27 May 2011 - 9:37 pm | नितिन थत्ते

शेवटचा फोटो विमान लॅण्डिंगसाठी अ‍ॅप्रोच होताना विमानातून घेतलेला असावा. विमानाने एल बी एस मार्ग ओलांडल्यानंतर दिसणारे दृश्य. घाटकोपर आणि कुर्ल्याच्या मधली झोपडपट्टी.

इंटरनेटस्नेही's picture

28 May 2011 - 1:01 am | इंटरनेटस्नेही

असल्फा त्या झोपडपट्टीचे नाव..
-
इंट्या मुंबईकर

गवि's picture

30 May 2011 - 10:33 am | गवि

शेवटचा फोटो विमान लॅण्डिंगसाठी अ‍ॅप्रोच होताना विमानातून घेतलेला असावा. विमानाने एल बी एस मार्ग ओलांडल्यानंतर दिसणारे दृश्य. घाटकोपर आणि कुर्ल्याच्या मधली झोपडपट्टी.

अंदाज चांगला आहे. पण ही टेकडी विक्रोळी ते पवई मार्गाच्या डावीकडे आहे. त्यावर झोपड्या आहेत. पलीकडे दिसणारा हिरानंदानी ट्रेडमार्क कळस पहा)

ही टेकडीही लँडिंगच्या वेळी उजवीकडे दिसते. या डोंगररांगेचाच तो घाटकोपर साईडचा एक भाग आहे.

(पण बादवे. लँडिंग अ‍ॅप्रोचच्या वेळी या इतक्या लो अँगलने फोटो निघाला असता तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा फोटो ठरला असता. कॅमेराही नंतर त्या टेकडीवरच्या अवशेषांत "आढळून आला असता.." ;) )

पंगा's picture

30 May 2011 - 5:20 pm | पंगा

(पण बादवे. लँडिंग अ‍ॅप्रोचच्या वेळी या इतक्या लो अँगलने फोटो निघाला असता तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा फोटो ठरला असता. कॅमेराही नंतर त्या टेकडीवरच्या अवशेषांत "आढळून आला असता.." ;) )

पण... पण... तशीही भारतात डीजीसीएची खास परवानगी घेतल्याशिवाय एरियल फोटोग्राफीला बंदी आहे ना? की कायदे बदललेत आता?

गवि's picture

30 May 2011 - 12:17 pm | गवि

डुप्रकाटाआ

गोगोल's picture

28 May 2011 - 5:55 am | गोगोल

कल्पना भारी आहे.
बाकी शहरांबद्दल पण असेच येऊ द्यात.

सर्वांनीच एकदोन बरोबर उत्तरं दिली आहेत.पण सगळीच्या सगळी बरोबर देणारे निखिल देशपांडे यांना सलाम. ग्रेट ऑब्झर्वेशन.सर्व उत्तरकर्त्यांना थँक्स.

सूर्यपुत्र's picture

29 May 2011 - 12:03 pm | सूर्यपुत्र

फोटो आंतरजालावरुन साभार आहेत का?

-सूर्यपुत्र.

नाही..आंतरजालावरुन नाही..माझ्या फोन-क्यामेर्‍यावरून विनाआभार घेतले आहेत ते फोटो.

तस्मात त्यावर माझा कॉपीराईट असून वापरणार्‍यास रु. ५१/- (अक्षरी रु एक्कावन्न मात्र) इतका दंड करणेत येईल. ;)

फटल येररमुळे उत्तर देण्यास येळ लागला. हे उत्तर तरी जिवंतपणी बोर्डावर पोचेल याचा नेम नाही.

व्याडेश्वरास स्मरून "पूर्वदृश्य" बटण दाबत आहे.

..पूर्वदृश्य आले. व्याडेश्वर पावला..

व्याडेश्वरास स्मरून "साठवा" बटण दाबत आहे.

असे टुकार धागे गविंकडून अपेक्षित नव्हते..
परा म्हणतो तसच " लेखन कंडू " बस दुसर काही नाही

हा भाग पहिला.. असे अजून १० टुकार भाग वाचावे लागणार , असो...

पराभाऊ सीनियर मेंबर आहेत. त्यांच्या मताचा आदर आहेच. त्यांना हा "लेखनकंडू" वाटला असेल तर ते सांगतीलच.

त्यांनीच पूर्वी सांगितलेले एक वचन असे आहे की "वीसतीस चांगल्या कॉमेंटस् नंतर एखादी प्रतिकूल कॉमेंट आली आणि तेवढ्याने लेखक खचत असेल तर दोष लेखकाकडे जातो."

त्याने मनाला फार शांत वाटले होते.

धोणीजी हा धागा पाहून / वाचून तुमचे एक मत झाले आणि त्याचा आदर आहे. प्रतिक्रिया देताना तुम्हाला फटल एररचा त्रास होऊन अनेकदा सबमिट करावे लागले याचे वाईट वाटले. पण मजकडून तुमच्या अधिक चांगल्या अपेक्षा आहेत हे वाचून बरेही वाटले.

धन्यु.

(आता पुढे भाग वाढवले तरी धाग्याचे आणि लेखकाचे टायटल माहीत असल्याने पुढचे दहा वाचावे लागणार ही परिस्थिती टाळता येईल. - न वाचून :) )