ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
11 Apr 2011 - 2:19 pm

आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं.

मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला. आपापल्या टोपणनावांविषयी प्रत्येकाने (खरे काय त्याचा थांग लागू न देता) डीटेलवार सांगितलं.

तेवढ्यात मदनबाण तिथे येऊन रुतला. पुन्हा "ओळखा पाहू"चा मजेदार सोहळा आणि "मदनबाण" या नावाची चिरफाड झाली.

विश्वनाथ मेहेंदळे असे नाव सांगत एक तरुण हजर होताच आम्ही सर्व अचंबित झालो. मेहेंदळे यायचे बाकी आहेत हे माहीत असल्याने मलमलीचा सदरा लेंगा घातलेले, हातात भाजीची पिशवी असे एखादे नुकतेच रिटायर्ड गृहस्थ पाहण्याच्या तयारीत आम्ही उभे होतो आणि हे काहीतरी वेगळेच.

मग लीमाउजेट आली. तिचे नाव "लीमाउजेट" का आहे? याचा पत्ता मात्र अज्जिबात लागला नाही बॉ. त्याच सुमारास मिसळलेला काव्यप्रेमी हजर झाला. मग मात्र आम्ही आपली रिझर्व केलेली जागा हातची जाऊ नये म्हणून हॉटेलात घुसलो.

स्थानापन्न होऊन ऊर्दू वाचनपद्धतीने मेन्यूकार्डावर नजर टाकताक्षणीच उजव्या बाजूचे आकडे वाढलेले आहेत हे लक्षात आलं. धाग्यात आम्ही टाकलेलं मेन्यूकार्ड नोव्हेंबर वीसशेदहातलं होतं. त्यानंतर ही वाढ झालेली दिसून गोंधळाने सुरुवात होण्याची प्राचीन परंपरा आपण पार पाडणार हा समाधानकारक विचार माझ्या आणि स्पावड्याच्या मनात आला.

पण उपस्थित मिपामित्रगणांनी त्यावरून मनात आलेले स्वल्पगालिप्रदान मनातच ठेवले आणि चेहर्‍यावर येऊ दिले नाही. उदाहरणार्थ हे पहा:

सुधांशू, वपाडाव, लीमाउजेट आणि विश्वनाथ मेहेंदळे यांनी मेन्यू पाहूनही चेहर्‍यावर ठेवलेलं हसू..

तदनंतर हात्तेच्या म्हणायची वेळ मजवर आली. कारण स्पावड्या धरुन पाच सहा जण आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत असे म्हणू लागले.

रे देवा..आधी माहीत असते तर "पुरेपूर कोल्हापूर" ऐवजी कर्व्यांच्या "स्वाद थाळी"तच गेलो असतो की..

असो.. पण व्हेज थाळीचा मेनू पाहून मजसारखे "पोहणारे, धावणारे आणि सरपटणारे जीव पोटात घालण्यास उत्सुक (आभार: शिरीष कणेकर)" सामिषाहारी मेंबर्सही व्हेज खाण्याचा विचार करु लागले.

आम्ही तासभर उभ्याने वाट पाहून अखेरीस लाभलेले विजुभाऊ मात्र "रामदासकाका आल्याशिवाय आणि त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श करणार नाही", असं म्हणू लागले.

(त्यामुळे बहुधा समोर बसलेल्या मदनबाण आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींनाही काही मागवता येईना.)

शेवटी मदनबाणांनी नुसतीच सोलकढी मागवली. आणि मिसळलेल्या काव्यप्रेमींची शाकाहारी थाळी समोर येऊन हजर झाली तरी एकट्यानेच कुठे खायचे म्हणून उगीच पापड कुरडया खाऊन त्यांनी भागवाभागवी करायला सुरुवात केली. पण तेवढ्यात अखेर रामदासकाका आले..

त्यांच्या सोबत गुलाबी पानांची डायरी होती. (मी फक्त निरिक्षण नोंदवले..). त्यांनी आल्या आल्याच आपण जेवणार नाही असे जाहीर केले.

मी आणि मेहेंदळे हे दोघेच मांसाहारी उरलो होतो. त्यामुळे विजुभाऊंना मांसाहाराच्या गळास लावून आपली संख्या वाढवण्यासाठी तातडीने धनगरी मटणताट मागवून आम्ही दोघे त्यांच्यासमोर चापू लागलो.

अखेरीस विजुभाऊ आमच्या क्लबात आले.

मधेच जयपालही येऊन थोडावेळ गप्पा मारुन गेले.

तेवढ्यातच खादाड अमिता स्वहस्ते घरी बनवलेले चॉकलेट मार्बल केक्स घेऊन घटनास्थळी पोहोचली. (एव्हाना ठ्ठोठ्ठो हसण्याच्या आवाजाने आणि एकूण गप्पागोंधळ घालून मिपाकरांनी त्या लहानशा खोलीचे "घटनास्थळ" बनवले होते..)

हे केक जेमतेम फोटो काढेपर्यंत टिकून राहिले. नंतर दहावीस सेकंदात रिकामा डबा उरला. केकची चटणी नावाची उत्स्फूर्त पाकृ समस्त उपस्थितांनी बनवली.

मग मात्र गप्पा आणि बडबडीने थकलेले सर्वजण गपागप खाण्यात गुंगले. तेवढावेळ एकदम शांतता झाली.

रामदासकाका उपास सोडायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर बाजूला बसलेल्या स्पावड्याने त्यांचा नाद सोडून आपली थाळी रिकामी केली आणि हात वाळवत बसला..मागे खादाडताईही उगीच मला जेवायचं नाही म्हणत पोळीभाजी घ्यावी तशी काहीतरी थोडंसं घेऊन बसली. अशा अल्पाहारी मेंबरांना आधी चोवीस तास उपास ठेवण्याची वेगळी सूचना यापुढे सर्व कट्टा करणार्‍यांनी द्यावी अशी विनंती.

शेवटी साग्रसंगीत जेवण झाल्यावर आणि बाहेर वेटिंगलिस्ट वाढतेय असं दिसल्यावर अत्यंत नाईलाजाने कट्टेकरी हात धुवून रस्त्यावर आले. मदनबाण "निघतो" म्हणून गायब झाले. अमिताताईलाही निघावे लागले.

सर्वसाक्षी, विजुभाऊ आणि रामदासकाकांनी गप्पांना पुन्हा तोंड फोडले. फोटो काढण्यासाठी अनेकदा सर्वांचे कोंडाळे फोडून चेहरे कॅमेर्‍याकडे वळवावे लागत होते, इतका गप्पांना जोर चढला होता.

तुमच्या जीवनातले तुमचे प्रियकर / प्रेयसी यांच्या बाबतीत दोन गोष्टी होतात : "एकतर तुमचं त्यांच्याशी लग्न होतं, किंवा ते तुमचे आयडी, पासवर्ड होतात..", इति विजुभाऊ.. वगैरे अशी उपयुक्त वचने ऐकताना धमाल येत होती. कट्टा सार्थकी लागत होता आणि पाय मात्र दुखायला लागले होते.

तरीही दर दहा मिनिटांनी कोणीतरी म्हणायचं, "चला.निघूया आता..मजा आली..वगैरे.." आणि तरीही कोणीच तिथून न हलता परत गप्पा पुढे सुरु व्हायच्या.

असाच तास सव्वा तास गेला. मग नाईलाजाने एकेक गडी गळायला लागला. स्पावड्या, वपाडाव, सुधांशू वगैरे सांसारिक वेसणीत न अडकलेली मंडळी मध्यरात्र उलटून गेली तरी कट्ट्यात आणि गप्पांत रंगली होती. (त्यांनी नंतर एकट्याने आइस्क्रीम खाल्ले असे ऐकतो.. नोंद घेतली आहे. योग्य वेळी कारवाई करण्यात येईल.)

एकूण कट्टा आनंदात पार पडला. खूप मोठा कट्टा नव्हता, अगदी छोटासाच. पण जवळजवळ सर्वच जण एकमेकांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटत होते.

रोजच्या नोकरी आणि घर अशा साच्यात अडकून गेलेल्या लाईफमधे नवीन मित्र मिळणं ही किती गरजेची गोष्ट होती हे या कट्ट्यामुळे जाणवलं. कॉलेज संपल्यापासून अशा मनसोक्त गप्पा कोणाशीच कधी झाल्या नव्हत्या.

तात्यांची अगदी निघण्याच्या वेळेपर्यंत वाट पाहूनही ते आलेच नाहीत याचं मात्र खूप वाईट वाटलं.

मौजमजालेखप्रतिसादप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

तेजायला विजूभाऊंचा जेवणाच्या कार्यक्रमाखेरीज फोटो खूप काळात पाहिल्या गेलेला नाही.

नितिन थत्ते
मलादेखील ते जाणवलय.
पण काय कर्णार... नोंद घेतल्या गेली आहे.
... नेक्ष्ट टैम मी पोहोण्याच्या ड्रेस मध्ये पोज देईन
आणि रामदसकाका आईस स्केटिंग च्या पोशाखात ( खात खात) पोज देतील
प्रभू मास्तर स्वतः परीक्षा देतानाचा फोटो देतील

आणि त्या कट्ट्याला नितीन थत्ते चाचा बील देण्याच्या पोज मध्ये फोटो देणार देतील ;)

टारझन's picture

14 Apr 2011 - 11:11 am | टारझन

... नेक्ष्ट टैम मी पोहोण्याच्या ड्रेस मध्ये पोज देईन

=)) =)) =)) नहीईईईईईईईईईईईईईई ... ये देखने से पैले उठा ले रे बाबा ..

आणि त्या कट्ट्याला नितीन थत्ते चाचा बील देण्याच्या पोज मध्ये फोटो देणार देतील

त्यांनी गप्प रहाण्याचे ठरवले आहे :)

खादाड अमिता's picture

15 Apr 2011 - 8:23 pm | खादाड अमिता

शेवटचे सरप्राईज म्हणजे गवि आणि स्पा ह्यांनी सगळ्यांचे बिल दिले. आम्हाला कोणाला पैसे द्यावे लागले नाहीत.

गवि : किती छान निरुपण केलंय (माझ्या जेवणाविषयी ची टिप्पणी सोडता :( )
स्पा: कट्ट्याचे आयोजन आणि फोटो बद्दल अभिनंदन.
दोघांचे खूप आभार. आता पुढचा कट्टा कुठे?

माझीही शॅम्पेन's picture

15 Apr 2011 - 8:38 pm | माझीही शॅम्पेन

:)
ओके धन्यवाद ! माझा एक अंदाज खरा ठरला तर (तोडलेल्या अनेक तार्या पैकी एक ) !!

दोघांचे खूप आभार. आता पुढचा कट्टा कुठे?

+१

वरून चौथ्या फोटो मध्ये नेमका मदनबाण कोण आणि मिसळलेला काव्यप्रेमी कोण ?

वरून चौथ्या फोटो मध्ये नेमका मदनबाण कोण आणि मिसळलेला काव्यप्रेमी कोण ?
पांढरा शर्ट घातलेला चष्मिश म्हणजे मी, आणि माझ्या बाजुला मिका.

प्रमोद देर्देकर's picture

28 Oct 2013 - 3:19 pm | प्रमोद देर्देकर

हे सगळं लै मिस करतोय इथे
विजुभाऊ - Thu, 24/10/2013 - 19:28 नवीन
हे सगळं लै मिस करतोय इथे जोहान्सबर्गात.
सोबतचे एकतर गुलटे आहेत. नायतर अफ्रीकन.

जर विजुभाऊ जोहान्सबर्गात आहेत तर कोणते विजुभवु तुम्हाला येवुन मिळाले,लेखात काहीतरी गफलत आहे काय?
शिवाय गविंचा स्वत:हाचा फोटो कुठेच नाहीये.
जरा विस्ताराने शेवटचे दोन फोटोतील ओळख डावीकडून उजवीकडे अशी सांगल काय ?

>>जर विजुभाऊ जोहान्सबर्गात आहेत तर कोणते विजुभवु तुम्हाला येवुन मिळाले,लेखात काहीतरी गफलत आहे काय?
आन्ना, जरा त्यो लेख लिवल्याची तारीक आन ईजुभौंच्या पर्तिसादाची तारि़ख बगा की!!

विजुभाऊ स्थूलदेह तिकडे ठेवून सूक्ष्मदेहाने आले असतील.. हॅ हॅ हॅ.. :)

ते तसेही चैतन्यरुपाने आमच्यात सदैव असतातच..

श्री.रा.रा. प्रमोद देर्देकर यांचे शंकासमाधानः

A

डावीकडूनः विजुभाऊ, मिसळलेला काव्यप्रेमी, वपाडाव (कुठे गेलास रे. जिथे असशील तिथून परत ये. तुला कोणी काही बोलणार नाही),गवि, लीमाउजेट, सूड (वड्या फेम), विश्वनाथ मेहेंदळे, सर्वसाक्षी.

आता तुमचा फोटो टाका इथे.. :)

प्रभाकर पेठकर's picture

28 Oct 2013 - 5:18 pm | प्रभाकर पेठकर

भारतापासून दूर असल्याने आणि मनाला लागेल तेंव्हा येऊ शकत नसल्याने भारतातला, मिपाचा, कुठलाही कट्टा मनाला उदास करतो. ठाणे कट्टा सदस्य संख्येने लहान असला तरी आनंदी क्षणांनी उजळून निघाला आहे.
विजूभाऊ डिसेंबर/जानेवारीत येणार म्हणताहेत. पाहूया शब्द पाळतात का...

गविंचे खास अभिनंदन. प्रसिद्ध व्हायोलीन वादक श्री. प्रभाकर जोग ह्यांचा 'गाणारे व्हायोलीन' नांवाचा एक सुंदर कार्यक्रम व्हायचा. तद्वत, गविंनी, 'खाणारे' सदस्य गोळाकरून एक कट्टा कार्यक्रम करावा असे सुचवितो. (खाणारे-पिणारे असतिल तर क्या बात है।)

विजुभाऊ's picture

28 Oct 2013 - 5:35 pm | विजुभाऊ

विजूभाऊ डिसेंबर/जानेवारीत येणार म्हणताहेत. पाहूया शब्द पाळतात का...

जरूर.... जरूर......
कट्ट्यासाठी का होईना मी नक्की येईन.
काय पेठकर काका प्रॉमिस म्हणजे प्रॉमिस.
वायदा करून पळून जायला मी म्हणजे काय "ज्यांच्या नावाची सुरुवात छो या अक्षराने होते आणि शेवट न या अक्षराने होते, व मधली दोन अक्षरे ट आणि ड च्या बाराखाडीत येतात " असा सदस्य वाटलो की काय तुम्हाला.

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 6:12 pm | प्यारे१

ड डा डि डी डु डू डे डै डो डौ डं डः

काय पण विजुभाऊ... डॉ कुठं येतं बाराखडीमध्ये? ;)

विजुभाऊ's picture

28 Oct 2013 - 6:20 pm | विजुभाऊ

अर्र प्यारे१
माताय बाराखडीत अ‍ॅ आणि ऑ येत नाही हे वायदेआझमानी अगोदरच पाहून ठेवले होते.
बघा किती दूरदृष्टी चे नेतृत्व आहे आपले.......

विजुभाऊ's picture

11 Aug 2023 - 2:56 pm | विजुभाऊ

गवि मनावर घ्या आता.
असाच एखादा कट्टा होऊन जाउ दे.
ठाणे तर ठाणे.
पार्ल्यामधे आता पुरेपूर कोल्हापूर च्या जागी " कायस्थ सुरू झाले आहे.
तेथे कायस्थी स्टाईलचे खिमा नाहीतर सोड्याची खिचडी हाणूया.

कंजूस's picture

11 Aug 2023 - 6:26 pm | कंजूस

फोटोतले मिपाकर कोणते?
फोटोंना क्रमांक दिले असते तर विचारायला सोपं झालं असतं.

बाकी असे कट्टे आता होत नाहीत कारण वाटसपमुळे मिपाकर पझेसिव्ह झाले आहेत. ठराविक गाळीव लोकांना बोलावतात आणि कट्टा उरकतात.
असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2023 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाटसपमुळे मिपाकर पझेसिव्ह झाले आहेत. ठराविक गाळीव लोकांना बोलावतात आणि कट्टा उरकतात.

सहमत.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Aug 2023 - 8:09 pm | हणमंतअण्णा शंकर...

गविंचा फोटो पाहून असे वाटले : गवि निगोशिएशन करू शकतात कसलेही. गविंसारखी माणसे गव्हर्नमेंट मध्ये असायला हवीत. थेट यु. एन. मटेरियल वाटतात गवि.
(ह. घ्या.)

गवि दोन कोटींचा फ्लॅट सव्वा कोटीत फायनल करू शकतात.

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2023 - 8:17 pm | चौथा कोनाडा

:)

हणमंतअण्णा, तुमाला आता त्यांच्या तर्फे षेपरेट पार्टी ! ... हाय का नाय !

सुरिया's picture

11 Aug 2023 - 8:56 pm | सुरिया

गवि दोन कोटींचा फ्लॅट सव्वा कोटीत फायनल करू शकतात.

करतील पण.
फक्त कोकण, खादाडी आणि इमायन हे तीन विषय टाळायचे निगोसेशनला. नायतर फ्लॅटच्या चाव्या न घेता पैसे देऊन येतील गप्पांच्या नादात.
.
(गविकाकावळकापाहुम्याकोन)

महिरावण's picture

11 Aug 2023 - 11:06 pm | महिरावण

गविकाकावळकापाहुम्याकोन

© अभ्या..

सुरिया's picture

12 Aug 2023 - 4:53 pm | सुरिया

गेसचा प्रेत्न चांगलाय पण लंका उघडी पडली बर्का. ;)

विवेकपटाईत's picture

12 Aug 2023 - 9:45 am | विवेकपटाईत

कट्ट्याचे वर्णन आवडले.बाकी आम्ही दिल्लीकयांना घरी जरी पार्टी केली तरी पनीर आणि मा की दाल, नान, रायता हे पाहिजे. शेवटी आईस्क्रीम ही.

बारा वर्षांपूर्वीचे विजुभौंनी वर आणलेले दिसते. विजुभाऊ नॉस्टॅल्जिक झालेले दिसतात. आता यातले सर्व लोक बऱ्यापैकी वयस्क झाले असतील. ;-) मिपाची पुढची पिढी आली आहे. कट्टे होत राहोत.. मिपा वाढत राहो.

विजुभाऊ's picture

12 Aug 2023 - 4:49 pm | विजुभाऊ

अहो खरेच.... मिपा कट्टा लैच मिस करतोय. गेली चार एक वर्षे एकाही मिपाकराला भेटलेलो नाहिय्ये.
परवा धम्याला फोन केला होता त्यामुळे जरा जास्तच नॉस्टॅल्जिक व्हायला झाले

विजुभाऊ's picture

12 Aug 2023 - 4:58 pm | विजुभाऊ

अहो खरेच.... मिपा कट्टा लैच मिस करतोय. गेली चार एक वर्षे एकाही मिपाकराला भेटलेलो नाहिय्ये.
परवा धम्याला फोन केला होता त्यामुळे जरा जास्तच नॉस्टॅल्जिक व्हायला झाले

कंजूस's picture

12 Aug 2023 - 11:31 am | कंजूस

फोटोतला कोण सांगा सांगा.

एका प्रतिसादात ऑलरेडी आहे की वर.

सापडलं. फोटो मोहन गोखलेच काढणार.दुसरं कोण.

स्पावड्याला ओळखतो,गाववाला आहे,एकत्र भटकंती झाली आहे. हल्ली स्पावड्याने राजसंन्यास घेतला आहे. चित्र काढतो स्क्रीनवर पोटासाठी, मिपासाईटवर लिहीत नाही.ती बॅन आहे.

विजुभाऊ घारापुरी कट्ट्याला आले होते आठवतंय. पण तेव्हा मी मिपावर नवीन होतो.

मला कट्टे आवडतात पण बंदिस्त जागेतले नाही. मोकळे रान भटकत बोलणे आवडते. पाच सहा केले आहेत मर्यादित. शिवाय तीन महाकट्ट्याला होतो. तीन झाडाखालचे पाताळेश्र्वरला त्यापैकी एकाला मालक नीलकांत होते. .एक वल्ली,सगासह अर्थातच भाजेलेणी. ठाण्यात दोन - एक टकासह,दुसरा वरुणमोहितेसह. डोंबोलीत दोनतीन नंदी हाटिलात .

कट्टा हा बुद्धिबळ किंवा टेनिस खेळासारखा नसतो. आपल्यापेक्षा चांगल्या खेळणाऱ्याशीच खेळायचं तर कुणालाच भिडू मिळणार नाही. म्हणून जाहीर कट्टे. मिपा सर्वांसाठी.