मंचर मध्ये काल गुढीपाडवा घरोघरी ब्रह्मध्वज अर्थात गुढी उभारून उत्साहात साजरा झाला. हिंदू नववर्षानिमित्त शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांत हजारो आंबेगावकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत मराठमोळ्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडविले.
शहर भर रस्तोरस्ती भव्य भगवे झेंडे फडकावले होते
हिंदू नववर्षारंभानिमित्त बजरंग दल आणि दुर्गावाहिनी तर्फे आज सायंकाळी मारुती मंदिर येथून स्वागतयात्रा काढण्यात आली . स्वागतयात्रांच्या अग्रभागी गुढी व भगवे झेंडेधारी होते. शहरातील सर्वच यात्रांमध्ये पारंपरिक वेशभूषेतील स्त्री-पुरुषांचा सहभाग लक्षणीय होता. शालेय विद्यार्थ्यांची लेझीम पथके, मानवी मनोरे, संत-महापुरुषांच्या वेशभूषेतील मुले व चित्ररथ,राम पंचायतन , आणि मराठी युद्धकलेची प्रात्यक्षिके, स्वागतयात्रेत लक्ष वेधून घेणारे ठरले.सनातन प्रभात च्या साधकांनी समाज प्रबोधन पर फलक हातात घेऊन शोभा यात्रेत सहभाग घेतला .
शिवछत्रपती ,मावळे , हत्ती ,घोडे ,उंट ,झाशीच्या राणीच्या वेशभूषेतील अश्वारुढ विद्यार्थिनी, उंटावर स्वार झालेले चिमुरडे आकर्षणाचे केंद्र ठरले.
मराठी युद्ध कलेच्या प्रात्यक्षिका साठी आणि प्रशिक्षणा साठी खास कोल्हापूर वरून जाणकार आले होते.या पूर्वी त्यांनी प्रशिक्षित केलेली मुले ,मुली यांनीही त्यांच्या बरोबर प्रात्यक्षिके सादर केली .
फटाक्यांची आतषबाजी करीत ढोलताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात निघालेल्या या स्वागतयात्रांमधील नागरिकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. स्वागतयात्रांच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. चौकाचौकात उत्साहपूर्ण वातावरणात नागरिकांनी यात्रांचे स्वागत करून परस्परांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 5:41 pm | परिकथेतील राजकुमार
7 Apr 2011 - 12:32 pm | VINODBANKHELE
धन्यवाद
5 Apr 2011 - 6:08 pm | अविनाशकुलकर्णी
संभाजी महाराजांना औरंगजेबाने मनुसृतिच्या आधारे शिक्षा देवुन हालहाल करुन मारले..ति कलमे औरंग जेबाच्या पदरी असलेल्या ब्राह्मण अधिका~यानी सुचवली होति असेहि वाचनात आले.. व तो आनंद साजरा करण्या साठी गुढ्या उभारल्या जातात असा एक विचार वाचण्यात आला...काम एक मेसेज फिरत होता
Its my heartiest request to all of you celebrate new marathi year but dont place a gudhi infront of your house Bcoz on the same day Aurangjeb killed Chatrapati Sambhaji Maharaj and placed his had at the tip of Bhala. The peoples who were happy after death Of Maharaj Started Celebrating Gudhi So its Request to All marathas Dont Place Gudhi at hour Hous
मुलनिवासी च्या अंकात त्यावर एक लेख हि वाचनात आला होता...