मदर्स डे अर्थात मात्रुदिन

ईश्वरी's picture
ईश्वरी in जनातलं, मनातलं
11 May 2008 - 1:27 pm

आज ११ मे २००८ ..मदर्स डे अर्थात मात्रुदिन. अमेरिकामध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जातो.

आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाहि मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. पाश्चांत्यांचे अन्धानुअकरण नको पण मदर्स डे मागचा उद्देश अतिशय चान्गला असल्याने आपणही तो साजरा करायला काही हरकत नाही.

सकाळी आईच्या आधी उठून आपण तिच्यासाठी तिच्या आवडीची न्याहरी बनवू शकतो. तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ तिला भेट देऊ शकतो. आपल्या व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून थोडासा वेळ काढुन तिच्याशी मस्त गप्पा मारु शकतो. तिला आवड असेल तर नाटकाला वा सिनेमाला नेऊ श़कतो. तिच्यापासून लाम्ब असलो तर तिला छानसे पत्र लिहू शकतो.

काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी.
ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या ,धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. हे सर्व टाळून तिला स्पेशल फील व्हाव यासाठी आजच्या मात्रुदिनाचा उद्देश.

माझी आई माझ्यापासून हजारो मैल लाम्ब असल्याने मी तिला फोनवरूनच शुभेच्छा देणार आहे. तुम्ही काय करणार आहात किन्वा काय केले हे वाचायला जरूर आवडेल.
मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मात्रुदिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !!!

-- ईश्वरी

संस्कृतीप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

सुरताल's picture

11 May 2008 - 1:59 pm | सुरताल

मातृदिन असे लिहावे ! जमल्यास चुक सुधारण्याची तसदी घ्यावी हि नम्र विनंती!
मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुरताल

ईश्वरी's picture

11 May 2008 - 2:20 pm | ईश्वरी

मातृदिन असे लिहावे

-- तुमचं बरोबर आहे...मातृदिन असे लिहायला हवे. पण माझ्या टंकलेखनातील अडचणी मुळे कळल नाही तृ कसा लिहावा ते. ईथे तुमचाच शब्द copy paste केला आहे.
यात सुधारणा कशी करावी हे मला माहीत नाही. मूळ लेखन edit कसे करावे?

ईश्वरी

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 2:32 pm | प्रभाकर पेठकर

तृ लिहीण्यासाठी tRu असे टाईप करावे.

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 2:42 pm | प्रभाकर पेठकर

आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच. त्यातूनही तुम्ही त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून साजरे करा त्यांना 'मातृदिना'पेक्षा जास्त आनंद होईल.

एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी.

असा एक दिवसच का, ३६५ दिवस आपल्या हातात असतात. हे ३६५ दिवस (निदान जास्तीतजास्त) तिच्यासाठी काहीतरी करीत राहा. तिच्या कष्टांचे कौतुक करा, तिच्याशी दोन शब्द गोड बोला ती भरून पावेल.

असो. तुमच्या भावना मी समजू शकतो पण मुद्दाम मातृदिन साजरा करण्याच्या मी विरोधात आहे. राग नसावा.

मन's picture

11 May 2008 - 3:01 pm | मन

आपणा सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
(मी साजरा करत नसलो , तरी सर्वांना शुभेच्छा!)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

पक्या's picture

11 May 2008 - 3:17 pm | पक्या

आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच.

-- आता आपण भावावरील बहीणीचे आणि बहीणीवरील भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाटी रक्षाबंधन , भाउबीज हे सण साजरे करतोच ना. रोजच का नाही आपण भावावरील / बहीणीवरील प्रेम व्यक्त करत? शिवाय valentines day, friendship day हे ही मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. मग मातृदिन साजरा केला तर काय बिघडले? उद्देश चान्गलाच आहे. तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ..तर असे नाही.. कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या व्यक्त ही व्हायला हव्यात.

तुम्ही ईश्वरी यान्चा हा परिच्छेद वाचलेला दिसत नाहीये.
काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी. ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या , धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं.

माझ्या मते मातृदिन साजरा केल्याने काही बिघडत नाही.
आपणा सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मन's picture

11 May 2008 - 3:33 pm | मन

पक्याशी सहमत.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 3:35 pm | प्रभाकर पेठकर

ज्यांना मातृदिन/पितृदिन साजरा करावासा वाटतो त्यांनी जरूर करावा. आम्ही त्यांच्या भावनेचा आदरच करू.

-- आता आपण भावावरील बहीणीचे आणि बहीणीवरील भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाटी रक्षाबंधन , भाउबीज हे सण साजरे करतोच ना. रोजच का नाही आपण भावावरील / बहीणीवरील प्रेम व्यक्त करत? शिवाय valentines day, friendship day हे ही मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. मग मातृदिन साजरा केला तर काय बिघडले? उद्देश चान्गलाच आहे. तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते.

भाऊबिज आणि राखी पोर्णिमा ह्यांना सणांचे पाठबळ आहे त्यामुळे संस्कार ह्या सदरात हे सर्व लहानपणी मनापासून साजरे केले. गेल्या २५ वर्षातील परदेशातील वास्तव्यामुळे हे दोन्ही दिवस कधी करायला मिळाले नाहीत आणि केले नाहीत म्हणून मला किंवा बहिणीला कधी वाईट वाटले नाही. 'अरे! भाऊबिज आणि राखी पौर्णिमा साजरी नाही केली म्हणजे काय आपले एकमेकांवर प्रेम नाही का?' असाच विचार आमच्या दोघांचाही आहे. valentines day, friendship day मी तरी कधी साजरे केले नाहीत. ज्यांना करावेसे वाटतात त्यांना माझा विरोध नाही. तसेच , सगळे जग करते म्हणून मीही तेच करावे असा आग्रहही कोणी माझ्यापाशी धरला नाही. असो.

मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ..तर असे नाही.. कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या व्यक्त ही व्हायला हव्यात

मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ह्याचा अर्थ 'ते नातेच तसे निस्सीम आहे' असा आहे.. मुलांनी आईचे कौतुक करू नये असे मी कुठेही म्हंटलेले नाही. उलट ३६५ दिवस करा असा मी आग्रह धरेन. मनात प्रेमभाव असेल तर तो मुद्दामहून व्यक्त करावा लागत नाही (केलात तर चांगलेच, पण...) जेवताना एखाद्या पदार्थाचे कौतुक करणे, जेवल्यावर किंवा इतर वेळी आईला घरकामात मदत करणे, तिचे श्रम कसे कमी होतील हे पाहणे, आपल्या आनंदात तिला सहभागी करून घेणे, तिच्या जवळ बसून संवाद साधणे अशा अनेक गोष्टीतून तो व्यक्त होत असतोच. तिने केलेल्या संस्कारात राहणे आणि त्या संस्कारांचे महत्त्व वेळोवेळी मान्य करणे हेही मनातील प्रेम भावदर्शकच आहे.
असो. समाजाने मातॄदिन साजरा करू नये असे मी म्हणत नाही. मला पटत नाही एवढेच माझे म्हणणे आहे.

धन्यवाद.

वेलदोडा's picture

12 May 2008 - 11:39 pm | वेलदोडा

काल आमच्याही घरी मदर्स डे मस्त साजरा झाला. म्हणजे कन्येने साजरा केला. तिने तिच्या आईसाठी एक छान चित्र काढून रंगवले होते. त्याची गुंडाळी करून त्यावर सजावटीची रन्गीत रिबन बान्धून ते भेट म्हणून दिले. शिवाय शाळेत ही सर्व मुलांनी मिळुन एक छानसे पुस्तक बनवले होते. त्यात प्रत्येक मुलाने अल्फाबेट्स मधील एकेक अक्षर घेउन त्यापासून सुरु होणारा शब्द निवडून एकेका वाक्यात आपापल्या आईचे वर्णन केले होते. त्याखाली त्या वाक्याशी मिळतेजुळते आईचे चित्र काढुन रन्गवले होते. उदा. रायन ने लिहीले होते. A is for awesome . My mom is awesome
मायकेल ने लिहीले होते C is for cookie. My mom makes delicious cookies. (मुलांची वये ७ते ८ वर्ष आहेत.)
शिक्षीकेने ह्या पुस्तकाच्या कापीज (copies ) काढून सर्व मुलांना घरी आईला देण्यास दिल्या.
कन्येने मग फर्मान काढले. ..आज आईला स्वयंपाकाला सुट्टी. आपण बाहेर जाऊ. त्यापूर्वी तिने माझ्या मदतीने सकाळ्ची न्याहरी बनवली होती. मग आम्ही सहकुटुम्ब बाहेर जेवायाला गेलो.

माझ्या मते खरया नात्यामधे असे डेज (मातॄदिन, पितॄदिन) साजरे केले नाही तरी काही बिघडत नाही....अगदी रक्षाबन्धन सुद्धा. वर्षातील ३६५ दिवस आपण खर्या नात्यातील प्रेम कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून व्यक्त करीतच असतो. नात्यातील प्रेम व्यक्त करायला मिळत नाही किन्वा केले जात नाही म्हणुन हे डेज आहेत असे मुळीच नाहीये. यात भावनेचे प्रदर्शन करण्याचा हेतू नसतोच. उलट हे डेज साजरे केल्याने आन्नद द्विगुणीतच होतो. कोणाला त्याचा त्रास होत नाही. त्यानिमित्ताने घरातील मातापितांना काहीतरी मजा, रूटीन पेक्षा काही तरी वेगळे करायला मिळते. त्याना आन्नद , समाधान च मिळते.
ज्या मोठ्यांना मदर्स डे साजरा करायला आवडत नाही त्यानी नाही केला तरी घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी जरूर साजरा करावा. त्यानिमित्ताने मुलान्च्या कल्पनाशक्तीला , विचारशक्तीला वाव मिळतो. त्यान्च्यावर एक संस्कार च घडत असतो.
ज्याना मदर्स डे आवडत नाही त्यानी फक्त शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही.

इथे अमेरिका मधे मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नसून आजी , मावशी , (step mom) सावत्र आई, मदर इन लौ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर या सर्वासाठी मातॄदिन आहे.
सर्व मातांना मातॄदिनाच्या (उशिराच्या) शुभेच्छा !!

पक्या's picture

13 May 2008 - 12:35 am | पक्या

हे डेज साजरे केल्याने आन्नद द्विगुणीतच होतो. कोणाला त्याचा त्रास होत नाही. त्यानिमित्ताने घरातील मातापितांना काहीतरी मजा, रूटीन पेक्षा काही तरी वेगळे करायला मिळते. त्याना आन्नद , समाधान च मिळते.

-- पटले.

स्वाती दिनेश's picture

11 May 2008 - 5:18 pm | स्वाती दिनेश

मातृदिन साजरा करा अथवा करु नका...आई ती आईच!
उगाच नाही म्हटलं ..
मायबाप तो सर्व जगाचा,
आईसाठी जगात येतो.
हात जोडुनि देव बोलतो,
शरण तुला गे जननि..
आपल्या हिंदू क्यालेंडरातही पिठोरी अमावस्येला मातृदिन संबोधतात.
स्वाती

वेलदोडा's picture

13 May 2008 - 12:21 pm | वेलदोडा

मातृदिन साजरा करा अथवा करु नका...आई ती आईच!

अहो आई ती आईच रहाणार. मातृदिन साजरा केल्याने वा न केल्याने तिचे प्रेम कमी होणारच नाहीये. पण साजरा केला तर तिला आनंदच मिळेल. आपण भारतीय पाश्चात्य संस्कृतीचे कित्येक गोष्टी त अनुकरण (की अंधानुकरण) करीत आलो आहोत..(खाणे, कपडे /पेहराव , वाढ दिवसाला केक कापणे, रोज डे, व्हॉलेन्टाईन डे सारखे वेगवेगळे डेज साजरे करणे .., पब संस्कृती, पार्टया ) मग ही त्यान्ची चान्गलि गोष्ट अनुसरली तर काय बिघडले ?

अजय's picture

11 May 2008 - 6:00 pm | अजय

स्वातीजी धन्यवाद, आपला मातृदिन लक्षात आणून दिल्याबद्दल.
आपल्या मराठी संस्कृतीत, पोळा (पिठोरी अमावस्या) हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी दशमी व त्यावर ठेवलेला दिवा घेऊन आई मुलांना वाण लावते.
"माझा अतिथी कोण' हा प्रश्‍न विचारल्यानंतर मुलगा "मी' उत्तर देतो.

- अजय

प्रियाली's picture

11 May 2008 - 10:35 pm | प्रियाली

कोणताही दिन साजरा करणे हे काही चुकीचे नाही त्याचे अवडंबर माजवणे चुकीचे आहे. असो,

मातृदिना निमित्त माझ्यात आणि मुलीत झालेला एकतर्फी संवाद.

काल आम्ही वर्गात हस्तकलेच्या तासाला आपापल्या आईसाठी हे उघडझाप करणारं फूल बनवलं. याच्या प्रत्येक बंद पाकळीवर तुझ्यासाठी एक छोटासा संदेश आहे. मला माझी आई का आवडते हे त्यात सांगितलं आहे.

पहिली पाकळी सांगते की मला माझी आई आवडते कारण ती माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष पुरवते. मला भूक लागेपर्यंत थांबत नाही. माझे खाणे, माझा डबा, माझे जेवण यांकडे तिचे काटेकोर लक्ष असते.

दुसरी पाकळी सांगते की माझ्या आईला माझी काळजी घ्यायला आवडते. माझे केस विंचरायला, माझे कपडे धुवायला, इस्त्री करायला, माझ्यासाठी खरेदी करायला तिला आवडते.

तिसरी पाकळी सांगते की मला दुखलं-खुपलं, मी आजारी असले की माझी आई हवालदील होते. ती त्यावेळी थोडीशी जास्तच प्रेमळ असल्यासारखी वाटते.

चौथी पाकळी सांगते की माझ्या आईला माझ्याबरोबर बसून वाचन करायला आवडते. मी काय वाचते याकडे तिचे लक्ष असते. ती ग्रंथालयातून मला पुस्तके आणायला मदत करते आणि दररात्री ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे पुस्तक वाचते. मला तिच्याबरोबर असा वेळ घालवणे खूप आवडते.

पाचवी पाकळी सांगते की ती मला तिच्या कामात मदत करायला देते तेव्हा ती मला खूप आवडते. यावेळी आम्ही काहीतरी खेळ खेळत कामे उरकतो.

सहावी पाकळी सांगते की मला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. माझ्या शाळेच्या, वर्गातल्या, मैत्रिणींच्या गोष्टी ती दर संध्याकाळी ऐकते. मला एखादे दिवशी भीती वाटली तर तिच्या कुशीत घेते.

सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.

आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी!

हेच येथेही वाचता येईल.

राजे's picture

11 May 2008 - 10:46 pm | राजे (not verified)

सहाव्या पाकळीपर्यंत जरा वेगळ्या अर्थाने आई - मुलीचे नाते बघत होतो पण अचानक शेवटच्या परिछेदाने मनाला कोठे तरी हुंदका दिला व डोळे पाणावले !

राज जैन
जेव्हा कर्म करुन ही काहीच हाती लागत नाही तेव्हा मात्र ह्यात फक्त नशीबाचाच दोष!

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 11:57 pm | विसोबा खेचर

सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.

---- नि:शब्द!

(मातृभक्त) तात्या.

प्रियाली's picture

12 May 2008 - 12:17 am | प्रियाली

गेल्या वर्षी सॅराची आई खूप आजारी पडली. सॅराची शाळा बरेचदा चुकत होती. वडलांना घर, मुलं, नोकरी, बायकोचं आजारपण सांभाळणं कठीण होत होतं. आई वारली तेव्हा सॅरा खूप एकलकोंडी झाली होती, कोणाशी बोलत नसे. तेव्हा वर्गातील बाईंनी आणि मुलांनी तिला मदत केली. तिचा अभ्यास, गृहपाठ शाळेतच इतरांच्या मदतीने उरकला जाई. तिच्याबरोबर सतत कोणीतरी प्रेमाने वागते आहे याची शाळेत काळजी घेतली जाई. हळूहळू सॅरा नव्या आयुष्याला रूळत गेली पण तिच्यातले मूलपण संपलं ते कायमचं .

आजही बरेचदा शाळा सुटल्यावर सॅराचे बाबा तिला आफ्टर केअरमधून आणताना दिसतात. इतर मुले संध्याकाळी आई वडिल दिसले की मोठमोठ्याने दिवसभराच्या गप्पा, मागण्या, वर्गात हे हवं ते हवं असं सांगताना दिसतात. त्यावेळी सॅरा डोकं खाली घालून आपल्या बाबांना दिवसभराची हळू हळू कहाणी सांगत असते पण आता बरीच रूळली आहे.

मन's picture

12 May 2008 - 12:22 am | मन

मनाला भिडली.
असंख्य जाणिवा झाल्या डोक्यात जाग्या.

आणि श्री फ.मु. शिंदे ह्यांच्याच शब्दात जाणिवा सांगायच्या तर...

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही
....
घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

काय लिहू?...अशी अकस्मात वळणे घेणारे आयुष्य एखाद्या रहस्यकथेसारखे असते. अचानक समोर एखादा प्रसंग असा येतो की आपण अंतर्मुख होतो.
आयुष्याबद्दल काही काळ नव्याने विचार तरळून जातात आणि दैनंदिन जीवनाच्या रेट्यात पुन्हा एकवार समेवर येऊन आयुष्य पुढे वाहू लागते!

चतुरंग

सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.
डोळे पाणावले.....

(आईचा लाडका)
मदनबाण.....

ईश्वरी's picture

12 May 2008 - 1:21 am | ईश्वरी

प्रियाली, मदर्स डे निमित्त फूलाच्या पाकळीवर लिहीलेले संदेश फारच छान आहेत.
साराबद्द्ल वाचून मन हळवं झालं.
ईश्वरी

वेदश्री's picture

12 May 2008 - 2:11 pm | वेदश्री

मला माहितीच नव्हते काल की आज मदर्स डे आहे ते. नुकतेच वाचायला मिळवलेले 'वनवास' पुस्तक वाचत होते काल.. त्यातल्या गोष्टी आवडत गेल्या आणि त्या आईला वाचून दाखवल्या फोनवरून. ही माझी नेहमीची सवय आहे. आईला आवडत नाही ती कारण तिला स्वतःला वाचायचे असते पुस्तक. लहानग्या लंपनच्या कथा ऐकताऐकता तीही कधी नव्हे ते गुंगून गेली होती कथा ऐकण्यात आणि मीही. कथांच्या अनुषंगाने आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या माझ्या लहानपणाबद्दलच्या. काल ती म्हणाली की ते पुस्तकच नक्की घेऊन येशील येताना. ते पुस्तक विकत घेण्याचे मनाने घेतले होतेच.. आता कालचा दिवस 'तिचा' होता म्हणता या एकंदरीत घटनेलाच एक वेगळीच खुमारी मिळाली आहे. कुठला डे साजरा करायचा म्हणून लोक भरपूर काही करताना दिसतात.. माझ्याबाबतीत उलटेच घडलेले दिसतेय. आईला म्हणाले असते की तुला काय हवे सांग.. तर तिने ते उघडपणे सांगितले नसतेच, यानिमित्ताने कळले आपोआप. काल मातृदिन होता हे रेडिओ मिरचीवरून कळले असते पण पुस्तकवाचनात कम कथनातच इतकी रंगून गेले होते की रेडिओ लावायचंच विसरून गेले मी. त्यामुळे आज इथे आल्यावर कळते आहे की काल मातृदिन होता... :)

शितल's picture

12 May 2008 - 5:31 pm | शितल

>>>सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.
>>>>>आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी!

खुप सुद॑र,
आपल्याला आई आहे हे सुख ज्या॑ची आई जिव॑त नाही त्या॑च्याकडे पाहुन जाणवते.
शाळेत असताना माझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीची आई अपघात वारली, त्यामुळे तीच्या मनाची झालेली सैरभैर अवस्था अगदी जवळुन पाहिली आहे.

पक्या's picture

13 May 2008 - 1:17 pm | पक्या

इथे अमेरिका मधे मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नसून आजी , मावशी , (step mom) सावत्र आई, मदर इन लौ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर या सर्वासाठी मातॄदिन आहे.

-- सहज एक प्रश्न डोक्यात आला - जबरदस्तीने ज्या स्त्रीयांवर मातृत्व लादले जाते त्या , कुमारी माता याना मातृदिनाबद्द्ल काय वाटत असेल?