पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग.
(भाग- १)
दुसरे कोकण...पण अशांत!
आसामात मोरीगावातल्या मिंटुरंजन डेका या मित्राच्या घरी जाण्याचा योग काही वर्षांपूवीर् आला. मुख्यत: बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर. या काळात वहिवाटीसाठी बोटीचा वापर होतो. पूर आणि समस्या आसामला नव्या नाहीत.
आसामचं कोकणाशी कमालीचं सार्धम्य. लाल मातीचे डोंगर, नारळी-पोफळीच्या बागा, जेवणात भाताचा वापर अशी बरीच साम्यस्थळं आहेत. आसामी व मराठी या बहिणी वाटाव्यात, इतके समान शब्द आहेत. मात्र, उच्चारातील फरक खूप. आसामीत 'सर' व 'श' चा उच्चार 'ह' असा करतात, पण 'ह' चा 'ह'च उच्चारल्यामुळे 'सुहास'चे 'हुहाइ' होते व गंमत वाटते. महाराष्ट्रातली 'आई' आसामकडे जाताना मधल्या पाच राज्यांमध्ये 'मां' असते पण आसामात ती परत 'आई' होते!
कोकणासारखा निसर्ग असलेल्या या प्रदेशाला कोकणासारखी शांतता मात्र लाभली नाही. आधीच 'उपेक्षित' असे शल्य उराशी बाळगणारे हे राज्य आसामी-बंगाली वाद, मग जनजातीतील संघर्ष आणि आता घुसखोर बांगलादेशींच्या प्रश्नावरून सतत धुमसत आहे. 'उल्फा'चा नेता अरविंद राजखोवा याला ढाक्यात अटक झाल्याने इथला दहशतवाद पुन्हा चचेर्त आला. खालिदा झिया यांची कट्टरपंथी राजवट खालसा होऊन भारताकडे कल असलेल्या शेख हसीना बांगलादेशाच्या पंतप्रधान झाल्यामुळे हे घडू शकलं. राजखोवा सध्या भारताच्या ताब्यात आहे. शस्त्रे ठेवल्याशिवाय वाटाघाटी नाही; असं भारताचं धोरण आहे. पण राजखोवाने संपूर्ण स्वातंत्र्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगून कुत्र्याचं शेपूट वाकडंच ठेवलं आहे. लष्कराच्या 'ऑपरेशन बजरंग' व 'ऑपरेशन ऱ्हायनो'मुळे 'उल्फा'ची नांगी ठेचली गेली. पण चीन, बांगलादेश व पाकिस्तान यांच्या रसदीमुळे ही दहशतवादी संघटना जिवंत आहे.
'उल्फा'च्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि हत्यारं आधी चीननं दिली. 'एनएससीएन' या नागा दहशतवादी संघटनेच्या मदतीने उल्फाचे दहशतवादी नागालँडमागेर् चीनमध्ये जात. भारत-चीन सीमेवर काचीन या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण केंद चीननं चालवलं. भारताच्या लष्करी कारवाईनंतर हे केंद भूतानमध्ये हललं. पण एनडीए सरकारच्या दबावामुळे भूतान सरकारने शेकडो दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यामुळे मग 'उल्फा'चा प्रमुख अड्डा बांगलादेशात गेला. पाकिस्तानच्या आयएसआयने उल्फाला बळ दिलं. बिगरआसामींच्या विरोधात लढणारे 'उल्फा'चे अतिरेकी बांगलादेशींच्या प्रश्नावर मौन पाळतात! काही वर्षांपूवीर् 'उल्फा'ने ५० बिहारी मजुरांची हत्या केली. घाबरून जवळपास दहा हजार बिहारी मजुरांनी आसामातून पळ काढला. त्यांचे काम बांगलादेशी घुसखोरांना मिळाले, हे वेगळे सांगायला नकोच. परप्रांतियांकडून लुटलेला पैसा 'उल्फा' त्यांच्यापैकीच काही व्यापाऱ्यांकडे ठेवते. तसेच, त्यांच्या अड्ड्यांवर मादक पदार्थांचे साठे सापडले. अशा अनेक कारणांनी आसामी जनतेचा 'उल्फा'ला काडीचा पाठिंबा राहिलेला नाही. आता बांगलादेशात सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्यानंतर 'उल्फा'चा म्होरक्या परेश बारुआ चीनमध्ये पळालाय. दलाई लामांना आश्रय दिल्याचा राग चीन 'उल्फा'च्या माध्यमातून काढतोय.
२ कोटी ६६ लाख लोकसंख्येच्या आसामात बांगलादेशी घुसखोरांची संख्या एक कोटीपर्यंत गेल्याचं आसाम सरकारचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेल्या जे. पी. राजखोवा यांनी मला सांगितलं. आसामचे माजी राज्यपाल अजय सिंग यांनी केंद सरकारला पाठविलेल्या गोपनीय अहवालात रोज सरासरी सहा हजार बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात, असा अंदाज कळवला होता.
आसामचे माजी राज्यपाल अजय सिंग यांनी केंद सरकारला पाठविलेल्या गोपनीय अहवालात रोज सरासरी सहा हजार बांगलादेशी भारतात घुसखोरी करतात, असा अंदाज कळवला होता. यावरून घुसखोरीचं विष किती वेगानं भिनतंय याचा अंदाज यावा. घुसखोरीनं आसामच्या लोकसंख्येचा तोलच ढळलाय. आसामी भाषिकबहुल असलेल्या ब्रह्मापुत्रेच्या खोऱ्यातील धुबडी, ग्वालपाडा, बरपेटा, नांगाव, मोरीगांव व दरंग हे जिल्हे तर बंगाली भाषिकबहुल असलेल्या बॅरेक नदीच्या खोऱ्यातील काछार, करीमगंज व हाईलाकांदी हे तीनही जिल्हे आज बांगलादेशीबहुल झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये आज पूर्ण अराजक आहे. त्यांच्या एकगठ्ठा मतांनी आसामात एयूडीएफ हा पक्ष जन्माला घातलाय. 'अगर' वृक्षाच्या सुगंधी दव्याची तस्करी करणारा बदुद्दीन अजमल हा या पक्षाचा संस्थापक. तो मूळचा बांगलादेशी. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थापन झालेल्या या पक्षाचे पहिल्याच निवडणुकीत दहा आमदार निवडून आले. अजमल यंदा धुबडीतून लोकसभेत निवडून गेलाय.
'र्वल्ड हेरिटेज' म्हणून घोषित केलेल्या काझीरंगा अभयारण्याच्या जवळपास दहा टक्के भूमीवर बांगलादेशींनी अतिक्रमण केलंय. जागतिक बाजारात लक्षावधी रुपये किंमत असलेल्या शिंगासाठी काझीरंगात गेंड्याची शिकार करणारे बांगलादेशीच आहेत. आसामचा ३५ टक्के भूभाग जंगलांनी भरलेला आहे. बांगलादेशी हे जंगल झपाट्याने साफ करत आहेत. आसामातील आसामी-बंगाली वाद जुनाच. दोघांमधून विस्तव जात नाही. दोन भाऊ आपसात लढत असल्याने त्या भांडणाचा घुसखोरांना फायदा होतोय.
बोडो, कारबी, डिमासा या आसामातल्या प्रमुख जनजाती. राभा, मिशिंग, तीवा, मिशमी, मिरी इत्यादी कमी लोकसंख्येच्या जनजाती. आसामी भाषाबहुल असलेल्या सरकारने यांची कायम उपेक्षा केली. बोडो, कारबी व डिमासांनी स्वतंत्र राज्यांची मागणी केली. अविकास व उपेक्षेबरोबरच एकमेकांबद्दल असलेला अविश्वास या जनजातीअंतर्गत संघर्षाच्या मुळाशी आहे. लोकशाहीच्या चौकटीत आपले प्रश्न सुटत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर काहींनी हातात शस्त्रं घेतली.
आसामचा दहशतवाद चचेर्त असतो पण हा प्रदेश एक उत्तम टुरिस्ट स्पॉट आहे. एकशिंगी गेंडा असणाऱ्या 'काझीरंगा'प्रमाणेच 'मानस'चे व्याघ्र अभयारण्यही 'र्वल्ड हेरिटेज साईट' आहे. दोन लाख लोकवस्तीचं ब्रह्मापुत्रेच्या पोटातील 'माजुली' हे बेटही 'र्वल्ड हेरीटेज साईट' म्हणून घोषित व्हावे, असे आसामी जनतेला वाटते. पंतप्रधान आसामातून राज्यसभेवर गेले असल्याने आसामी जनतेच्या आशा उंचावल्या आहेत. सुमारे चारशे वर्षांपूवीर् श्ाीमत् शंकरदेव या महान संताने बळीप्रथा, कर्मकांडांना विरोध करून माजुली येथे वैष्णव धर्माची पताका फडकवली. त्यांनी स्थापन केलेली 'सत्रं' म्हणजे धर्म-संस्कृतीची केंदंच आहेत. साहित्य, नाट्य, संगीत, हस्तकला व शास्त्रीय नृत्य यांची या सत्रांत लयलूट असते. माजुली बेटावर अशी २२ सत्रं होती. ब्रह्मापुत्रेच्या लहरी प्रवाहामुळे माजुलीच्या आकार दिवसेंदिवस कमी होतोय. आता शिल्लक असलेल्या १८ सत्रांपैकी 'कमलाबारी' व 'गहमूर' तर अवश्य पाहावीत. पर्यटक म्हणून येथे आलेल्या फ्रेंच जोडप्याने तेथे काही वषेर् मुक्काम ठोकला व जाण्यापूवीर् मिशिंग जनजातीच्या पारंपारिक घराप्रमाणे 'गेस्ट हाऊस' बांधून ठेवले. तेथे राहण्याचा आनंद विरळाच. गुवाहाटीतील कामाख्या देवी ही ५२ शक्तिपीठांपैकी एक. महाभारत काळात प्रागज्योतिषपूर म्हणून उल्लेख असलेल्या या प्रदेशात नरकासुराने बंदिवान केलेल्या १६ हजार मुलींना सोडवण्यासाठी श्रीकृष्णाने युद्ध केलं. पहाटे नरकासुराचा वध करून त्याच्या रक्ताचा टिळा लाऊन कृष्णाने अभ्यंगस्नान केलं म्हणून अवघा भारत दिवाळीच्या पहिल्या पहाटे अभ्यंगस्नान करतो. १८२६ मध्ये आसाम भारताचा झाला म्हणणाऱ्यांना हे एक उदाहरणच पुरेसं आहे.
ब्रिटिशांपूर्वी सहाशे वर्षे या प्रदेशावर अहोम राजांनी राज्य केलं. अहोम राजे लढवय्ये. मुघलांना आसाम जिंकता आला नाही. शिवरायांचा मार खाणारा मामा शाहिस्तेखान याला औरंगजेबाने बंगालात पाठविले. त्याने अहोम राज्यावर चढाई केली. ब्रह्मापुत्रेच्या किनारी साराईघाटात अहोम सेनापती लाचित बडफुकनने त्याचा दणदणीत पराभव केला. अहोम राजांची राजधानी असलेलं शिवसागर शहर पाहण्यासारखं आहे. हिरव्यागार गालिच्यांप्रमाणे पसरलेल्या चहाच्या मळ्यांनी वेढलेल्या या शहरात पुरातन ऐतिहासिक वास्तू आहेत. भारतातील सर्वांत भव्य शिवमंदिर आहे.
चहाचे उत्पादन हाच आसामच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार. उत्तर आसामच्या जमिनी व्यापणाऱ्या चहाच्या मळ्यांमध्ये पिढ्यान्पिढ्या राबवणाऱ्या मजुरांचा प्रश्नही खितपत पडून आहे. बिहार, झारखंड, ओरिसा व बंगालमधून ब्रिटिशकाळात आलेल्या वनवासी मजुरांची आज तेथील लोकसंख्या ४० लाखांच्या घरात आहे. गरिबी, शोषणाच्या अंधारात असलेल्या या मजुरांबाबत प्रत्येक मुख्यमंत्री जणू 'इट्स नॉट माय कप ऑफ टी' असंच म्हणत आला.
आथिर्क पिछाडीवरचा आसाम सामाजिक स्वास्थ्याबाबत मात्र सरस आहे. उर्वरित भारताला पोखरलेल्या जातीव्यवस्थेचं अस्तित्व इथं नावापुरतं आहे. तेही पोलिटिकल कास्टीजममुळेच आहे. इथे महिलांना मानाचं स्थान आहे. महिला मोकळ्या स्वभावाच्या व सोशल आहेत. हुंड्यासारख्या अन्याय्य प्रथा नाहीत. स्त्रीभृणहत्या हा प्रकार आसामच्या गावी नसावा. त्यामुळे पुरुष-स्त्री गुणोत्तर हजार पुरुषांमागे ९६५ महिला असं आहे.
मुघलांना जिंकता न आलेला आसाम अनेक दशकांच्या निशब्द आक्रमणामुळे बांगलादेशींच्या घशात चाललाय. खनिज तेल, चुनखडी व जंगलसंपत्तीने समृद्ध असलेला, सगळ्या जगाला दजेर्दार चहा देणारा हा प्रदेश भारतापासून तोडण्यासाठी मोठं षडयंत्र सुरू आहे. आसाम वाचवण्यासाठी 'ऑल आसाम स्टुडंट्स युनियन'ने आंदोलन केले. त्यातून 'आसाम गण परिषद' या पक्षाचा जन्म झाला. पण सत्तेवर आल्यावर या पक्षाने घोर निराशा केली. आज हे आंदोलन निर्नायकी बनलंय. आसामी माणूस हवालदिल झालाय. आसामी माणसाला एकाकी पडू न देता देशानं आसामच्या मागे ठाम उभं राहणं, त्यामुळंच आज गरजेचं बनलं आहे.
.................
- राजधानी - दिसपूर
- क्षेत्रफळ ७८४३८ चौ. किमी
- जिल्हे -२७
- लोकसंख्या-२६,६५५,५२८
- भाषा- मुख्य भाषा असामी, शिवाय बोडो, बंगाली व अन्य
- मुख्य उत्पन्नस्त्रोत शेती- चहाचं सर्वाधिक उत्पन्न, भात, मोहरी, बटाटा, रताळ, केळी, पपई, हळद, औषधी, वनस्पती, मसाल्याचे पदार्थ
- खनिज संपत्ती-खनिज तेल, नैसगिर्क वायू, चुनखडी, दगडी कोळसा
- सरासरी दरडोई उत्पन्न- ७३३५ रुपये वर्षाला
- स्त्री-पुरुष प्रमाण - ९६५:१०००
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हा लेख सविस्तर येथे वाचा.
प्रतिक्रिया
16 Mar 2011 - 6:03 pm | स्वप्निल रत्नाक...
अशा प्रकारचा लेख मा. पंतप्रधानापर्यंत पोहचावा आणि तो वाचून तरी मा.पंतप्रधानाना आपण आसाम मधून राज्य सभेवर निवडून आलो आहोत याची आठवण होवो व संपूर्ण भारतीय जनतेची नाही किमान आसामी जनतेच्या समस्या सोडविण्याबाबत तरी त्याच्याकडू कृती व्हावी हीच अपेक्षा
16 Mar 2011 - 6:14 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख.
(फक्त जशाचा तसा डकवलेला हा लेख मिपाच्या नियमात बसतो का ते बघणे महत्वाचे)
16 Mar 2011 - 6:15 pm | चित्रा
माहितीपूर्ण लेख.
धर्मांच्या पताकेबद्दल जास्त बोलायला नको, पण आसामी लोकांना आपल्या पद्धतीने भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होता आले पाहिजे असे वाटते. बर्याचदा दुर्गम भाग दुर्लक्षित राहतात. एकेकाळी माझे आईवडील, बहीण पाच वर्षे आसाममध्ये शिलाँगजवळच्या एका खेड्यात राहत होते. तेव्हाचे अनुभव वडील सांगतात तेही असेच होते. अजूनही तेथील अवस्थेत फारसा फरक झालेला दिसत नाही. वडिलांनी शिक्षणासाठी परत महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला नसता तर तिथेच वाढले असते. पण तेव्हाच्या काही हितचिंतकांनी वडिलांना परत जाण्याचा सल्ला दिला.
(तान्हेपणी सहा महिने आसाममध्ये शिलाँगजवळ राहिलेली) चित्रा
16 Mar 2011 - 8:57 pm | गणेशा
हे दोन्ही थ्रेड आताच पाहिले .. अजुन पाहिले नव्हतेच .
वाचुन प्रतिक्रिया लिहितो .. येथेच
16 Mar 2011 - 10:16 pm | निनाद मुक्काम प...
संग्रही ठेवावी अशी लेखमालिका आहे .
ती आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद .
ह्या विषयात विशेष गती नाही म्हणून अवांतर लिहित नाही.
''आम्ही मुकवचक म्हणूनच ही लेखमाला वाचू'' .
पुढचा भाग लवकर टाका .
16 Mar 2011 - 11:32 pm | रेवती
माहितीपूर्ण, मुद्देसूद लेखन!
आसामच्या परिस्थितीबद्दल थोडेफार ऐकून होते.
रोज सरासरी ६ हजार बांगलादेशी घुसखोरी करतात हे वाचून वैताग आला.
काय आहे हे? श्या!
दर शंभरी मुलांमगे मुलींचे प्रमाण बरेच चांगले आहे हे वाचून मात्र बरे वाटले.
17 Mar 2011 - 1:39 am | चिंतामणी
स्वप्निल रत्नाक, चित्रा, गणेशा, निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी, रेवती आणि इतर सर्व मुक वाचक.
आपले आभार. वरती एक प्रतिक्रीया आली आहे. "पुढचा भाग लवकर टाका ." मी नम्रपणे नमुद करू इच्छीतो की संपादक मंडळाने सहमती दर्शवल्यास पुढील लेख लौकरच टाकीन.
हे लिखाण श्री. सुनील देवधर यांचे आहे असे मी प्रथम भागात म्हणले होते. त्याच बरोबर त्यांच्या लेखांची "लिन्क" मी दोन्ही लेखांचे शेवटी दिलेली आहे. देवधर या खास लेखमालेत ईशान्येतील आठ राज्यांचे आजवर न झालेले दर्शन घडवले आहे.
देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीकोनातुन हा फार महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. यात जेव्हढे लोक सामील होतील ते देशहिताच्या दृष्टीने चांगलेच होईल.
यात मी वैयक्तीकरीत्य फक्त जास्तीतजास्त लोकांना या विषयाची खोली व गांभीर्य माहीत व्हावे असा प्रयत्न करणारा सामान्य कार्यकर्ता आहे.
17 Mar 2011 - 1:57 am | पुष्करिणी
सुंदर माहिती, ती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद
17 Mar 2011 - 8:28 pm | पैसा
असंच म्हणते..
17 Mar 2011 - 1:51 pm | मन१
निवडलात साहेब.
ह्यातील आकडेवारी खरी मानायची म्हणलं तर परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे.
लिखाण आवडल, वाचुन आनंद झाला असलं काहिही म्हणू शकत नाही.
आपलाच
मनोबा.
14 Apr 2013 - 4:20 pm | यशोधरा
हा लेख पाहिला नव्हता. ह्याचा पहिला भाग दिसत नाही.. लिंकवर जायचा प्रयत्न केल्यास काहीच दिसत नाहीये.
4 Sep 2016 - 11:25 am | चिंतामणी
आजच्या केंद्र सरकारचे घोरण या राज्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आहे. त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजना योग्य काळात पुर्ण होतील आणि सर्व भारतियांना हा भाग आपला वाटायला लागेल अशी माफक अपेक्षा आहे.
4 Sep 2016 - 1:32 pm | झेन
या उपेक्षीत आणि अपिरीचीत भागाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.
यातला गुंता समजवून घेणे खरच अवघड आहे. कधी कधी असं वाटतं कि देशात विवीधता जोपासण्याच्या नादात आपण एकत्र बांधणारा धागाच विसरून गेलो आहे का ?
4 Sep 2016 - 1:57 pm | अमितदादा
उत्तम लेख, मूळ लेख सुद्दा वाचले. अजूनसुद्धा इशान्ये कडची राज्ये उर्वरित भारताशी प्रोपेरली कनेक्टेड नाहीयेत. काही राज्यांच्या राजधान्या हि रेल्वे बरोबर जोडलेल्या नाहीत. 2020 पर्यंत सगळ्या राजधान्या मध्ये रेल्वे नेण्याचा सरकार चा मानस आहे. तसेच अनेक राज्यांना उर्वरीत भारताबर जोडण्यासाठी एक किंवा दोनच राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि बहुतांश वेळा त्याची दुर्दशा असते. मणिपूर मध्ये रास्तारोको मुळे सतत होणार blockade किंवा त्रिपुरा मध्ये पाऊसामुळे होणार blockade हे नित्याच आहे. आसाम मध्ये बांगलादेश घुसखोरांची समस्या गंभीर आहे. सध्याचे आसाम चे मुख्यमंत्री यांनी आसाम बांगलादेश सीमा बंद करण्यावर भर दिला आहे, परंतु ब्रम्हपुत्रेच पात्र तसेच इतर पाणी क्षेत्रात सीमेचे कुंपण घालणे अवघड काम आहे.