डेफिनेशन बदललेला मित्र

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
20 Feb 2011 - 2:01 pm

मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही. म्हणजे मित्र आहेत बरेच, पण ते सगळे नेहमीच्या भाषेत दुसऱ्या वर्तुळातले. जय-वीरू टाईप किंवा दो हंसो का जोडा टाईप मित्र आजपर्यंत तरी मला नाही. निकोप नसलेली स्पर्धा, शालेय राजकारण, संशयी वातावरण आणि या सगळयातुन हरवलेली निखळता अशी अनेक कारणे त्याला आहेत, आणि त्याची जाणीवही मला आहे. पण, तरीही असा कोणीतरी मित्र नसल्याची खंत कुठे ना कुठे तरी मला आहे, आणि का असु नये? कधीतरी वाटत आपलाही एक मित्र असावा कवी कल्पनेतला ..पण ,कल्पना आणि वास्तव यात फरक असतोच

आता खरी गंमत आहे, माझ्या फेसबुक मित्रांची संख्या आत्ताच्या घडीला १२६७ आहे व यातल्या बऱ्याच जणाशी माझ्या खुप चांगल्या गप्पा होत असतात. अगदी चांगले शेअरिंग होत असते . या मित्रपरिवारात 78 वर्षांच्या गृहस्थापासून ते आता 9 वी ला असणारे माझे ज्युनिअरदेखाल आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा मित्रपरिवार खुपच समृध्द आहे.

हा,हा,हा… गोंधळलात का? हा विरोधाभास बघुन मी स्वत:च गोंधळतो. आणि लक्षात येतं की माझ्यासाठी ”मित्राची” डेफिनेशनच बदललेली आहे. फक्त एकाच वर्गातले, एकाच बाकावरचे किंवा लंगोटी यार जरी कोणी नसलं, म्हणजेच, हक्कानं शिव्या घालणरं, आमच्या भाषेत गांडदोस्त नसलं तरी ”समानशीले समान व्यसनेषु-” टाईप मित्र मात्र प्रचंड आहेत.

आणि, त्यामुळेच आमच्या मैत्रीला वयाचं, काळाच, जागेचं कसलंच बंधन नाही. हिमांशु आणि केदार.. माझ्याहुन 10 वर्षानं मोठे, पण, आम्ही एकेरीतच हाक मारतो.. आणि बर्‍याच गोष्टी एकत्र करतो. हक्काने काही सांगतो देखील कारण, एकच आवड, जमणारे विचार.. माझा एक पुण्याचा मित्र आहे. ज्याला मी गेल्या दीड वर्षात बघितलेलं देखील नाही. पण, तो कोणत्याही साईट बद्दलची मदत करायला तयार असतो.. इतकचं काय, तर आमचे पैशाचे व्यवहारही झाले. मात्र यात, त्याने मला व मी त्याला न बघितल्याचा आडसर कुठेच आला नाही. याहुन गंमतीची गोष्ट, कमलेश आणि श्रीरंजन यांचे लेख वाचून मी त्याचा मित्र झालो. आम्ही आता गाढ दोस्त आहोत. शिव्या, गप्पा, चर्चा, सगळं सुरू असतं. आणि आपसुकच, फिजिकल प्रेसेन्सच महत्त्व देखील निघुन गेलेयं. बिपिनदा.. याला मी बघितलेलं नाही. पण मी अस्वस्थ झालोय म्हटल्यावर दुबईहुन एक तास माझ्याशी बोलणारा असा माझा मित्र ..

पण, तरीही हा गुंता मनात राहतोच, आणि मग आजुबाजुला पाहिल्यावर लक्षात येतं की, आपण एकटेच असे नाही आहोत. माझ्या मित्रपरिवारातले अनेक जिवलग मित्र आजकाल मित्र उरलेले नाहीत. किंवा त्यांचचं नातं सैल झालंय. मी पुढं, मी पुढं, करताना निर्माण होणारी चढाओढ हे त्यातलं प्रमुख कारण. अपरिहार्यपणे येणारी कौटुंबिक पार्श्वभुमी, इगो, चांगल्याबरोबर वाईटही सांभाळून घणं/घ्याव लागणं. जे आजच्या फास्ट लाईफ मध्ये शक्य नाही. त्यामुळे, मैत्रीच नाते सैल होऊ लागलंय..

हा, पण त्याला पर्याय दिलाय या नव्या माध्यमांनी .. कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही..

काहीसं विचीत्र वाटु शकतं हे सारं किंवा ज्यांनी ही माध्यमे वापरलेली नाहीत त्यांना बकवासदेखील.. पण, नवे बंध फुलतायत हे नक्की आणि आजच्या ईर्षेच्या जगात हे फुलणंच महत्वाचे आहे. ’मित्र’ संकल्पना अधिक ब्रॉड होतीय.. भावनिक वीण किंचीतशी कमी झालीय, पण, सर्व बंधन तुटुन हेल्दी नाती निर्माण होत आहेत.

हयाच बंधामुळे माझे पाय आपोआपच माझ्या ई- मैत्रीणीच्या सीडी प्रकाशन समारंभाकडे ओढले जातात. अभिनय गेल्याची बातमी थेट त्यांच्या ई-मित्राकडे जाते. आणि जेंव्हा अभिनय किंवा पराग जातात. तेंव्हा त्यांना कधीही न बघितलेले मराठी/फेसबुकीय मित्र देखील दु:खात बुडून जातात..

मला वाटतं, आमच्या पिढीचं, टेक्नॉलॉजीचं हेच खरं संचित आहे.. नवा मुक्त, कृतीशील समाज घडतोय. आणि, आम्ही त्यात सहभागी आहोत. असो, आता थांबतो, कारण ही सांगण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे. पण, आत्ताच एका ई-मैत्रीणीचा मेसेज आलाय. आय थिंग या मैत्रीचे वर्णन करायला तो पुरेसा आहे..

Some one asked me to describe you in two words, He was expecting from me to answer, “The best” But didn’t answer I just smiled & said “Maza Mitra.”

संस्कृतीसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

20 Feb 2011 - 4:01 pm | पैसा

मैत्रीची नवी व्याख्या आवडली. पण एक पाहिलंय. माझ्या कॉलेजमधल्या मुलीला फेसबुकवर असेच शेकडो मित्र्/मैत्रिणी आहेत, पण ती म्हणते, यातले बरेच फक्त 'फ्रेंडस रिक्वेस्टमधून आलेले'. ते सगळेच जण एवढे आपले वाटत नाहीत. त्यातले काही फक्त 'ओळख' एवढ्याच पातळीवर राहतात. म्हणजे माध्यम बदलंल तरी कोणी जास्त आपला वाटतो कोणी नाही वाटत. ही मानवी मनाची वागणूक तशीच रहाते.

पूर्वी शाळा कॉलेजातून बाहेर पडल्यावर माझ्यासारख्या अत्यंत बिझी ठिकाणी काम करणार्‍याना नवे मित्र मैत्रिणी मिळणं कठीणच असायचं. कारण ऑफिसच्या वेळात सतत काम असतं तर ऑफिस संपताच घराचे वेध लागतात. पण आता घरबसल्याच फेसबुकवरून नवे मित्र मैत्रिणी मिळतात, त्यानाही थोडा वेळ देता येतो. हा मोठाच फायदा!

खंरंच .. कसं काय जमतं हो कोदा तुम्हाला इतकं छाण लिहायला ? टेक्नॉलॉजी चं वर्तमान आणि भविष्य आणि त्याची आपल्या संस्कृतीशी असलेली गुंफण एवढी गुंतागुंतीची प्रक्रिया पण आपण एका सुलभ निबंधाद्वारे अशी काही उलगडुन सांगितली आहे जशी हैदराबाद च्या पॅराडाईज च्या बिर्याणी मधल्या परफेक्ट शिजलेल्या चिकन चा एकेक थ्रेड काढावा. आपल्या शब्दांची नजाकत , त्यातलं ते खोलवर विचारमंथन करुन ओतलेलं शब्दामृततुल्य त्यांना बहुआयामी वाक्यरचनेत बसवनं आणि त्याची वास्तवाशी सुरेख गुंफण , व्वा ! जवाव नही कोदा का !
कृतीशील समाज , टेक्नॉलॉजीचं खरं संचित , ई-मित्रमैत्रिणी , "आय थिंग " ( बहुतेक थिंक ) , बंध फुलणे , मित्र दु:खात बुडणे ,इर्षेचं जग , मित्रता फुलणे , मित्रसंकल्पना ब्रॉड होणे , वैचारिक मैत्री आणि मैत्रीची वीण , आजचं फास्ट लाईफ , मैत्री सैल होण , गाढ दोस्ती ,आजच्या काळात गौण झालेला फिजिकल प्रेसेंस , दुबैहुन तब्बल एक तास गफ्फा हाणनारे बहुआयामी मित्र आणि खुप म्हणजे खुपच समृद्ध असलेलात उमचा मित्र परिवार , एवढा सगळा सुकामेवा म्हणजे जणु पुण्याच्या सुप्रसिद्ध लक्ष्मिणारायण चिवड्यातले काजु आहेत काजु.
व्वा ! अफलातुन निबंधलेखन .
तुमचे १२६७ च्या वर मित्र आहेत म्हणजेच बघा ना , तुमची लोकप्रियता लवकर ९९९९९९९ च्या वर पोहचो आणि असेच एकसे एक व्हर्चुअल मैत्रीचे सुरेख शब्दकाजुंची/ शब्दपिस्तांची शिंपडण केलेली सुरेख गुंफन पहायला मिळो , आणि आमच्या सारख्या वाळवंट रुपी वाचकांना वाचनाची तहान भागवण्या करिता तुमच्या सुरेखसंगम लेखणाचे निबंधामृत मिळो अशी तुमच्या गांडदोस्त चरणी प्रार्थना करतो आणि आमचा छोटा प्रतिसाद आवरता घेतो.

-(फेसबुक वर फक्त सिलेक्टेड मित्र असलेला) केसबुक
”सामानशीले सामान व्यसनेषु”

विनायक पाचलग's picture

20 Feb 2011 - 5:53 pm | विनायक पाचलग

व्वा ! अफलातुन निबंधलेखन .

अहो ,आमची मास्टरी त्यातच ... नवीन काही नाही त्यात ...

पर्नल नेने मराठे's picture

20 Feb 2011 - 7:08 pm | पर्नल नेने मराठे

टारझन व कोदांची मैत्री बघुन दोळे भरुन आले ;)

चुचुआत्ते चे दोले भरलेले बघून्...मी ढसाढसा रडायला लागले!!!!

चुचु माह्यशी फ्रेंडशिप कर्नर क?

पर्नल नेने मराठे's picture

21 Feb 2011 - 3:53 pm | पर्नल नेने मराठे

फ्रेन्द्शिप केली

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Feb 2011 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll

टार्‍या आणि विन्याची मैत्री अंबळ ब्रॉड झालेली दिसते आहे.

विनायक पाचलग's picture

20 Feb 2011 - 10:08 pm | विनायक पाचलग

पुणे मटासाठी लिहिले .. सो जरा खास प्युअर मराठीत निबंध लिहिला ... ;)

वेताळ's picture

20 Feb 2011 - 6:07 pm | वेताळ

जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत.

विजुभाऊ's picture

21 Feb 2011 - 10:31 am | विजुभाऊ

जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत.

जिवलग बायको आणि चांगला मित्र यांच्या बाबत काय मत आहे?

जिवलग मित्र व चांगली बायको नशीबात असला हवी बाबा.. ह्या दोन्ही गोष्टी शोधुन सापडत नाहीत.

:) हे खरोखर दुर्मिळ कॉम्बीणेशण आहे :)

सुनील's picture

20 Feb 2011 - 6:17 pm | सुनील

छान लेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2011 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान लेखन. अजून येऊ दे.....!

बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे.

-दिलीप बिरुटे

क्लिंटन's picture

21 Feb 2011 - 12:14 am | क्लिंटन

विनायक, लेख आवडला.

बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे.

माझा अनुभव तर याबाबतीत जरा वेगळाच आहे.मी माझ्या हिलरीला भेटलो ते पण अशा आभासी जगातच.प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी आम्ही ३.५ वर्षे चॅट करत होतो आणि अनेकदा फोनवरही बोललो होतो.पण प्रत्यक्ष भेट नव्हती. तसेच प्रत्यक्ष भेटल्यानंतर तर आम्हाला एकमेकांविषयी सर्वकाही माहित होते कारण इतक्या काळात आमची चांगली ओ़ळखही झाली होती .तेव्हा अशा आभासी जगात भेटणाऱ्या व्यक्ती किती प्रामाणिक आहेत यावर बरेच काही अवलंबून असते. असो याविषयी इतरही खूप लिहिता येईल पण ते परत कधीतरी.

शिल्पा ब's picture

21 Feb 2011 - 3:32 am | शिल्पा ब

<<< बाकी, आभासी जगातील मित्रांवर किती विश्वास टाकला पाहिजे याबद्दल मी जरा सांशक आहे.

सहमत आहे. याहू वगैरे chat वर बहुतेक लोक टाईमपास करण्यासाठीच येतात....कदाचित तुमचे नशीब चांगले असेल तर कोणी genuine भेटू शकते /तो....बाकी आनंदच असतो..
फेसबुक , ओर्कुट वगैरे वर सुद्धा खोटं प्रोफाईल तयार करणारे असतात...जसे खोटे आय डी लिखाण करतात तसे...त्यामुळे जपूनच बरे.

तिमा's picture

20 Feb 2011 - 7:46 pm | तिमा

लेखन आवडले. खरे मित्र फार दुर्मिळच असतात.

ज्ञानेश...'s picture

20 Feb 2011 - 9:29 pm | ज्ञानेश...

व्हर्च्युअल मित्रांची खर्‍या आयुष्यातल्या मित्रांशी तुलना करणेच मुळात विचित्र आहे. शिवाय विनायक यांना खर्‍या आयुष्यात तुलना करण्यालायक मित्र मिळालेले नसल्याचे त्यांनी स्वतःच नमूद केलेले आहे. त्यामुळे त्यांनी अशी तुलना करणे सुसंगत आहे का, हा प्रश्न पडतो.

हा, पण त्याला पर्याय दिलाय या नव्या माध्यमांनी .. कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही..

हा परिच्छेद अजिबातच पटला नाही. या सर्व 'सोयी' खर्‍या आयुष्यातल्या मैत्रीमधेसुद्धा जशाच्या तशा लागू असतात, हे विनायक यांना सांगू इच्छितो.

'सायबर मैत्री' हे पेन फ्रेन्डचे विस्तारीत रूप म्हणून किंवा एक नवे दालन म्हणून उदयाला आले आहे आणि त्याचे स्वतःचे असे एक महत्वपूर्ण स्थान एखाद्याच्या आयुष्यात असू शकते, हे मान्य आहे. पण खर्‍या आयुष्यातल्या मित्रांना हा पर्याय असू शकतो असा जो काही लेखकाचा सूर आहे, त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही.
(यात श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीच ठरवायचे नाही. मित्र हे मित्र असतात, त्यात असे सबसेट करू नयेत असे वाटते.)

भडकमकर मास्तर's picture

21 Feb 2011 - 12:03 am | भडकमकर मास्तर

खर्‍या आयुष्यातल्या मित्रांना हा पर्याय असू शकतो असा जो काही लेखकाचा सूर आहे, त्याच्याशी सहमत होऊ शकत नाही.

हेच लिहायला आलो होतो...
सहमत...

.... प्रस्तुत लेखकाने केलेली सायबरमैत्रीची खर्‍या मैत्रीशी तुलना आवश्यक वाटली नाही....

परिकथेतील राजकुमार's picture

21 Feb 2011 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार

प्रस्तुत लेखकाने केलेली सायबरमैत्रीची खर्‍या मैत्रीशी तुलना आवश्यक वाटली नाही....

'सायबरमैत्री' ह्या शब्दाचा अर्थ फार फार वेगळा आहे हे मास्तरांच्या निदर्शनास आणुन देऊ इच्छीतो. मराठीत सहसा हा शब्द 'सायबरींग करणार्‍या दोन व्यक्ती' ह्या अर्थी वापरला जातो. मास्तरांना 'नेट मैत्री' म्हणायचे असावे.

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2011 - 9:51 pm | नगरीनिरंजन

कुठेतरी मित्राची एक साधी आणि सरळ व्याख्या वाचली होती आणि ती अजूनही बदलावीशी वाटत नाहीये.
जो तुमच्या घरी हक्काने जेवतो आणि ज्याच्या घरी तुम्ही हक्काने जाऊन जेवू शकता तो तुमचा मित्र.

खरी मैत्री फक्त प्रत्यक्ष जगातूनच (सूरू झालेली) असते/होते. फेसबूक वगैरे फक्त समवीचारी लोकांना एकत्र जमण्याचे, वैचारीक देवाण घेवाण मारण्याचे अथवा स्वतःला मीरवण्याचे माध्यम असते, म्हणून तीथे खरी मैत्री जोपासणे वगैरे बाबतीत जरा जपूनच...... असतीलही कदाचीत पण हे वर्चूअल मीत्र रीयल जगातील गरजा/ भावनांसाठी कधीच पूरे पडत नाहीत.

कधीकाळी याच माध्यमाचा लोक आयडेंटीटी झाकून मैत्री करायला वापर करायचे. ती खऱ्या मैत्रीपासूनची पळवाट होती. पण, त्यालाही कंटाळल्यवर लोक खऱ्या नावानं पुढे आले आणि नवे बंध तयार होऊ लागले. मुळात म्हणजे, या मैत्रीला कसलेही सामाजिक बंधन नाही. स्त्री-पुरूष, जात-पात, जेवण्या-खाण्याचा, आवडीनिवडी काही नाही.. समान सांस्कृतिक, वा इतर जाणिवेनं एकत्र आलेली लोकं..बहुतांश वेळा सुजाण, वैचारिक मैत्रीसाठी आणि, मैत्रीची वीण झाली की प्रत्यक्ष भेट ओघाने येतेच, पण मैत्रीसाठी ती नीड नाही.. व्हर्च्युअल जग असल्याने टेन्शन नाही. आणि कोणीच कोणाचे मिंदे नसल्याने भांडतानादेखील दडपण नाही. आणि एखाद्याचे आपले जमत नाही म्हटल्यावर लगेच बाजुला व्हायची सोय .. आणि बोलताना समोरच्याचा स्टेटस, पत, प्रतिष्ठा कशाचा संबंध नाही

तूम्ही नक्की फेसबूक बाबतच बोलताय ना ?

जो तुमच्या घरी हक्काने जेवतो आणि ज्याच्या घरी तुम्ही हक्काने जाऊन जेवू शकता तो तुमचा मित्र.

:) मस्तच.

योगी९००'s picture

21 Feb 2011 - 1:26 am | योगी९००

लेख आवडला विनायका..

सहज's picture

21 Feb 2011 - 6:45 am | सहज

काय?? मटामधे 'गां*दोस्त' शब्द छापले तर चालतात?? हर हर हर रामा शिवा गोविंदा

आणि हो, कोदा जपून बर का - हा लेख वाचण्यात आला.

पण, नवे बंध फुलतायत हे नक्की आणि आजच्या ईर्षेच्या जगात हे फुलणंच महत्वाचे आहे. ’मित्र’ संकल्पना अधिक ब्रॉड होतीय.. भावनिक वीण किंचीतशी कमी झालीय, पण, सर्व बंधन तुटुन हेल्दी नाती निर्माण होत आहेत.

हे म्हणजे सुरवातीला झटून ३०-३५ रन्स केल्यावर पुन्हा आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूला 'पोक' करायला जाण्यासारखे वाटले..

जसे पटकथेची गरज असताना चुंबन दृश्य सिनेमात असावे पण रेलचेल असली की दिग्दर्शक स्वतंत्र बुद्धीचा वाटत नाही, निर्मात्याच्या मागणी व वेळापत्रकानुसार चालणारा वाटतो. थोडक्यात जितके इंग्रजी वर्डस वापरले गेले आहेत ते सगळेच गरजेचे नव्हते असे वाटते. अर्थात वृत्तपत्रात आजकाल दर चार वाक्यांमधे किमान दोन, तीन आंग्ल शब्द आवश्यक हा नियम असल्यास मुद्दा बाद समजावा.

प्यारे१'s picture

21 Feb 2011 - 9:35 am | प्यारे१

>>>>मला अत्यंत जीवाभावाचा असा मित्र नाही.

भो*** ज्या वयात पोरांबरोबर हुंदडायचं, पोरी बघायच्या, (चोरुन) बीअर प्यायच्या, भटकंती करायची, आणि बर्‍याच येड** गोष्टी करायच्या त्या वयात हे 'असले' उद्योग केल्यावर दुसरे काय होणार???

पहिल्या वाक्यानंतर पुढचा लेख वाचला नाही.

फू बाई फू च्या एका एपिसोड मधे (सौ.) किशोरी गोडबोले याणी साकारलेली पूजा भट्ट आणि तिच्या तोंडचे ' नोबडी कुड अंडरस्टँड मी बिकॉज आय वॉज टेन इयर्स अहेड ऑफ द जनरेशन' हे वाक्य आठवले आणि ड्वाले हस्सून हस्सून पाणावले.

कोदा.... कोदा.... (चीअरअप साटी क्लेप करत वाच्तात ने तसे वाचा)

किशोरी गोडबोले याणी साकारलेली पूजा भट्ट आणि तिच्या तोंडचे ' नोबडी कुड अंडरस्टँड मी बिकॉज आय वॉज टेन इयर्स अहेड ऑफ द जनरेशन' हे वाक्य आठवले आणि ड्वाले हस्सून हस्सून पाणावले. >>>

कल्ल्ला !! ..प्रामाणिक प्रतिसाद आवडला रे प्यारे !!

लवंगी's picture

21 Feb 2011 - 9:51 am | लवंगी

मांडलायपण चांगला.. जरा बोजड शब्द न वापरता लिहिलास तर अजुन चांगला होईल..

अभिज्ञ's picture

21 Feb 2011 - 10:17 am | अभिज्ञ

फेसबुकवर १२६७ मित्र. अरे बापरे.
चांगलेय.

अभिज्ञ.

स्पंदना's picture

21 Feb 2011 - 10:58 am | स्पंदना

लेखन या दृष्टीने बघीतल तर अतिशय सुन्दर म्हणाव लागेल विनायक, पण जर 'ही' परिस्थीती असेल तर तुझ या कंम्प्युटर नामक मित्रा समोर बसण अगदी ताबडतोब कमी कर. तु स्वतः जेंव्हा निखळ मैत्रीचा हात पुढे करशील, तेंव्हाच दुसरी व्यक्ती तुझी मित्र वा मैत्रीण होउ शकते.
वर ननींनी लिहिल्या प्रमाणे माझी मैत्रीण होती, वर तर वर शाकाहारी. कधीही तीच्या घरी गेल तर जेवायच्या वेळी जेवुन परत येणारी मी, ती माझ्या घरी आल्यावर अगदी न संकोचता तीच्या समोर मांसाहार करत असे. अर्थात तीच्या साठी वेगळ शाकाहारी बनवुनच! असा वेळ सरायचा तीच्या बरोबर!
परवा परवा पर्यंत तीला असेल तीथुन खणुन काढणे हा माझा हातखंडा होता, पण या वर्षी आले अन काही कारणान तीचा बदललेला पत्ता शोधायला नाही जमल मला तर , कुठउनशी खबर मिळाल्यावर पठ्ठीने अक्षय्चा नंबर शोधुन काढुन इकडे फोन करुन वर्षाचा शिव्याम्चा कोठा पूर्ण करुन घेतला.
चेहरा बघितला की काहीतरी बिनसलय हे समजणारा, अगदी स्वतःच्या चुका ज्याच्यासमोर कबुल कराव्या असा वाटायला लावणारा अन आपल चुकल तरीही आपल्याला जगाच्या दृष्टीने न जोखणारा असा मित्र निदान मला तरी साक्षात शरीरान समोरच हवा.

जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही जर दुर्मीळ गोष्ट असेल तर मी धन्य आहे या बाबतीत.

(जीव ओवाळुन टाकणारे मित्र म्हणजे नेमके काय? माझा जीव ओवाळुन खुंटीवर टांगणारे असा जर असेल तर आणी तरंच )

मित्र म्हणजे तो जो 'सगळं काही ठीक' असं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला म्हणतो
"चल, आता खरं खरं सांग काय झालंय ते?"

मुलूखावेगळी's picture

21 Feb 2011 - 2:18 pm | मुलूखावेगळी

जीवश्च कंठ्श्च मित्र लाभणे ही जर दुर्मीळ गोष्ट असेल तर मी धन्य आहे या बाबतीत.
(जीव ओवाळुन टाकणारे मित्र म्हणजे नेमके काय? माझा जीव ओवाळुन खुंटीवर टांगणारे असा जर असेल तर आणी तरंच )

+१००००
मला पण वर्च्युअल आनि रीअल फ्रेन्ड्स आहेत.
पन खरे खुप जास्त क्लोज असतात.
तसे नेट फ्रेन्ड्स पन जॉब आनि बाकि बर्यच वेळा कामास आलेत.
पन बरेचदा डोकेदुखी पन ठरतात.

प्यारे१'s picture

21 Feb 2011 - 2:28 pm | प्यारे१

>>>जीवश्च कंठ्श्च मित्र

ऐकिव फोडः जीव जाईपर्यंत कंठ दाबून धरणारा.

छोटा डॉन's picture

21 Feb 2011 - 2:43 pm | छोटा डॉन

लेखातल्या अनेक संकल्पना आणि व्याख्या मजेशीर वाटल्या, ह्या गमतीची सुरवात लेखाच्या शिर्षकापासुन होते ते म्हणजे'डेफिनेशन बदललेला मित्र' , मला नाही कळाले. मित्र म्हणजे मित्र, त्यात कसल्या डेफिनिशन्स आल्या ?

माहिती-तंत्रज्ञानामुळे 'समानशीले समान व्यसनेषु' मित्र जवळ येतात ही एक अजुन गंमतशीर संकल्पना वाटली.
गंमत सांगतो, आमच्या लहानपणी आमच्या इथे सुट्टी मिळाली की नदीच्या वाळवंटात क्रिकेट खेळायला जायची पद्धत होती, तिकडे आमची अनेकांशी 'ओळख' झाली.
होळीला लाकडं पळवायला दुसर्‍या गल्लीत गेल्यावर भांडनातुन तिकडे नव्या 'ओळखी' व्हायच्या.
गणपतीच्या काळात अजुन नव्या 'ओळखी' व्हायच्या.
पुण्यात तर इतक्या ठिकाणी इतक्या प्रकारच्या लोकांशी 'ओळख' झाली की काही विचारु नका.
नोकरी, शहरं बदलली, अनेक ओळखीही बदलल्या ...
आंतरजालावर आलो, पुन्हा अनेक नव्या 'ओळखी' झाल्या ...

पण ह्या सर्व 'ओळखीच्यांना' मी मित्र म्हणु का ?
अर्थात ह्या ओळखीच्यातले काही अत्यंत चांगले मित्र झाले आहेत हे सत्य आहे, पण किती हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे, हाताच्या बोटावर मोजता येईल इतके नगण्य आहे.

आंतरजाल आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे सगळे दालनच खुले झाले हे मान्य, पण मला ह्यात अजुन वैयक्तिकरित्या दोस्त बनवता नाही येत हे कबुल करतो.
अर्थात आंतरजालाने कधीही नाव घेण्यासारखे ८-१० दोस्त जरुर दिले हे आवर्जुन उल्लेख करण्यासारखे आहे.
मात्र अजुनसुद्धा मी आंतरजालावरच्या दोस्तंबाबत तितकासा कंफर्टेबल नाही, मला त्याची आवड नाही आणि रसही नाही, बहुसंख्यवेळा मला हे तापदायकच वाटत आले आहे हे सत्य आहे.
बर्‍याचदा मी हे अनुभवातुन शिकलो आहे.

असो, लेख चांगला आहेच मात्र काही संकल्पना मजेशीर वाटल्या म्हणुन एवढे खरडले.
बाकी आमचे विचाराल तर आमचे दोस्त फैल्यपासुन आहे तसे आहेत, गेल्या काही वर्षात भयंकर बदल झाले आहेत, परिस्थिती, आचर-विचार आणि इतर अनेक बाबीत, पण ते साला दोस्तीची डेफिनिशन वगैरे नाय बदलली हो अजुन, ते ***चे अजुन आहे तसे आहेत, म्हणुन ते आमचे दोस्त आहेत, असो.

- छोटा डॉन

गणपा's picture

21 Feb 2011 - 3:05 pm | गणपा

आंजावर ज्या ओळखी होतात ( शुद्ध मराठीत Contacts) त्यांना मित्र म्हणायच का?
आता त्या ओळखींना फ्रेंड्स-लिस्ट सारख गोंडस नाव आहे म्हणुन ते मित्र ?

जो तुमच्या अडी-नडीला वेळ न पहाता धावुन यावा. (आणि हे एकतर्फी असुन उपयोगी नाही.)
ज्याच्यापाशी मनातल्या खाजगी गोष्टी उघड पणे बोलता याव्या. तो खरा मित्र.

छोटा डॉन's picture

21 Feb 2011 - 3:20 pm | छोटा डॉन

आता त्या ओळखींना फ्रेंड्स-लिस्ट सारख गोंडस नाव आहे म्हणुन ते मित्र ?

+१, करेक्ट !
एकदम मुद्द्याचा प्रश्न.

काही अवांतर कमेंट्स देतो.
माझे काही खरे मित्र माझ्या कुठल्याच सोशल नेटवर्किंग साईटवर माझे मित्र म्हणुन अ‍ॅड केले गेले नाहीत ( ते असले काही वापरतात का ह्याचीही माहिती नाही, वापरत नसावेच असे वाटते ).
माझ्या काही खर्‍या दोस्तांना मी वर्षानुवर्षे कधी 'पिंग' केलेले नाही.
माझ्या काही जिगरी दोस्तांना मी कधीही स्क्रॅप पाठवला नाही.
माझ्या काही दोस्तांचे मी कधीच ऑनलाईन अल्बम्स वगैरे बघितले नाहीत.
माझ्या काही दोस्तांना गेल्या काही वर्षात मी कधी कसले 'इन्व्हिटेशन' पाठवल्याचे मला स्मरत नाही.

तरीही दोस्त इज दोस्त, नै का ?

बाकी ते निदान ऑनलाईन बाबतीत 'फ्रेंड लिस्ट, चॅट लिस्ट, बडी लिस्ट' जेवढी कमी ठेवाल तेवढे उत्तम असते असा एक वैयक्तिक सल्ला देतो, हे असे केले की निदान स्वतःबद्दल भंपक गैरसमज होत नाहीत ( हे विन्याला अथवा कुणालाच उद्देशुन नाही ) आणि नंतर मग कधी त्रागाही होत नाही.
बाकी मित्र बनवा, १ नाही १००० बनवा, अहो बालगंधर्वपासुन डेक्कनकडे चालत निघालात तर हाय-बाय करत चालत जाण्यास १ तास लागेल आणि मध्ये १००० वेळा अभिवादन करायला लागेल एवढे बनवा, त्यात काही 'फसवे' नसते.

असो, इथे थांबतो.
उगाच आजच्या टेक्नोसेव्ही जनतेच्या भावना अजुन दुखवायल नको, कमी-जास्त लिहले असेल तर क्षमस्व.
मात्र गतकालात ह्या ऑनलाईन मैत्रीच्या आहारी जाऊन स्वतःचे संतुलन गमावुन बसलेली काही उदाहरणे डोळ्यासमोर आहेत म्हणुन हे जास्तीचे ४ शब्द ...

ऑनलाईन मैत्रीची नशा ही "पेज-३" च्या नशेसारखी असते.
तिकडच्यासारखेच ज्या दिवशी तुमच्यावर फोकस नाही ( पक्षी : नो स्क्रॅप / खरड / मेसेज / पिंग / टॅग इत्यादी इत्यादी ) त्या दिवशी तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि हे बहुदा सहन होत नाही म्हणुन इतर नशा लागते ते सांभाळायला.
टेक्नोसेव्ही जनतेने 'नो स्क्रॅप / खरड / मेसेज / पिंग / टॅग इत्यादी इत्यादी' परिस्थितीत त्यांना मनातुन काय वाटते ह्याचे उत्तर स्वतःलाच द्यावे, आम्हाला ते जाणण्यात इंटरेस्ट नाही.

- (अतीच)छोटा डॉन

टारझन's picture

21 Feb 2011 - 3:29 pm | टारझन

एक एक शब्दाला +१ आहे ... :) मी देखील अलिकडे माझ्या बर्‍याच खर्‍या मित्रांना पिंग करत नाही कींवा मेल बिल पाठवत नाही ... ना त्यांच्याशी परदेशात गेल्यावर तासभर बोलत .. :) तरी पण ते आमचे मित्रंच होते ...

पण मैत्री मधे कधी तोडुन फेकायचं तर कधी परत यायचं .. हे सर्वांत क्लेशदायक आहे असे वाटते :)

बाकी "जो जे वांछील तो ते लाहो .. " आणि "तथास्तु" म्हणतो .. आणि माझा +१ आवरता घेतो ..

- ( मातीच) आता गॉन

छोटा डॉन's picture

21 Feb 2011 - 3:34 pm | छोटा डॉन

चक्क टार्‍या सहमत झाल्याचे पाहुन डोळे पाणावले. ;)

बरं का, आता हा टारझनच घ्या ना, तो आमचा मित्र आहे का नै ते आम्हाला माहित नाही, माहित करुन घेण्यात विंटरेस्टही नाही.
मात्र कधी राडा वगैरे झाल्यावर आम्ही आमच्या साईडने मारामारी करायला टार्‍याला बोलावणार व तो येईलही.
ते सगळे निपटुन झाल्यावर आम्ही 'दोस्ती म्हणजे काय' ह्यावर साधकबाधक चर्चाही करु, पण बहुतेकच, अन्यथा नाही.

- ( क्लियरकट ) छोटा डॉन

विनायक पाचलग's picture

21 Feb 2011 - 3:38 pm | विनायक पाचलग

पण मैत्री मधे कधी तोडुन फेकायचं तर कधी परत यायचं .. हे सर्वांत क्लेशदायक आहे असे वाटते Smile

___/\___ मान्य .. २०० %

माझ्या काही खर्‍या दोस्तांना मी वर्षानुवर्षे कधी 'पिंग' केलेले नाही/कधीही स्क्रॅप पाठवला नाही/ 'इन्व्हिटेशन' पाठवल्याचे स्मरत नाही.

+१००
पण दर दिवाळीला एकत्र बसुन गफ्फा मारणे. एखादा काही कारणास्तव उपस्थित राहु शकला नाही तर गफ्फांसमवेत त्याची *** मारणे. हे मात्र आवर्जुन. फोनाफोनी चालायचिच.

विनायक पाचलग's picture

21 Feb 2011 - 3:35 pm | विनायक पाचलग

डॉन्याचे आणि इतरांचे सर्वच प्रतिसाद वाचले .. काही सगळे पटले तर काही थोडेफार ..
सांगायची गोष्ट अशी की प्रत्यक्षातल्या मैत्रीला हा पर्याय असे मला म्हणायचे नाही .. हे दोन्ही समांतर असु शकते असे वाटते ...
आणि या १००० लोकांमधले सगळेच मित्र झाले असे नाही .. तेही ओळखीसारखेच ...
पण त्यातले जे काही १५ -२० लोक खुप चांगले मित्र झाले त्यांच्याबाबत बोलत होतो मी ..
आणि माझ्यासाठी एवढे एकमेव माध्यम आहे , जे मला असे मित्र मिळायचा चान्स देते .
हे सगळे माझ्या खर्‍या आयुष्यात आले ... फक्त ई - मार्गाने ...
हे दोस्त माझे जगणे समृद्ध करत आहेत , मला न भेटता देखील .. ते मला महत्वाचे वाटते ...
( अजुनही ऑनलाईन मैत्रीची नशा चढलेली नाहे .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा नेटवर लॉगिन न करता राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..)

प्यारे१'s picture

21 Feb 2011 - 3:45 pm | प्यारे१

>>>( अजुनही ऑनलाईन मैत्रीची नशा चढलेली नाहे .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा नेटवर लॉगिन न करता राहु शकतो .. आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..)

हे असे वाचले>>>

अजुनही मला दारुची नशा चढलेली नाही (व्यसन लागलेले नाही) .. ठरवल्यावर आजही आठवडा आठवडा सोबर राहु शकतो ..

आणि , गेल्या काही दिवसात खर्‍या खुर्‍या आयुष्यातही असे मित्र(?) का मैत्रिणी मिळायची शक्यता तयार झाली आहे .. लेट्स होप फॉर द बेस्ट ..

अरे जरा बुडाखालची वाळवी झाड....

स्वगतः ह्ये यकुलतं येक हाये का रे शिरिमंत आय बापाला.....????

विनायक पाचलग's picture

21 Feb 2011 - 3:48 pm | विनायक पाचलग

बाप रे... !!!!!!!!

विजुभाऊ's picture

21 Feb 2011 - 3:56 pm | विजुभाऊ

माझ्या फेसबुक मित्रांची संख्या आत्ताच्या घडीला १२६७ आहे व यातल्या बऱ्याच जणाशी माझ्या खुप चांगल्या गप्पा होत असतात. अगदी चांगले शेअरिंग होत असते
विनायक भाउ या वाक्यात एक खरी गोष्ट दडलेली आहे. एक विचारतो. तुम्ही जर प्रत्यक्ष लोकांशी बोलत असतात तर इतके मित्र झाले असते का हो?
कॉम्प्युटरसमोर बसून जगभर फिरून आलात तरी एका चहाच्या घोटाचा आनन्द मित्राबरोबर येतो तो काही आगळाच. कॉम्प्युटर समोर बसून तुम्ही इतके मित्र जोडलेत याचाच दुसरा अर्थ असा की तुम्ही प्रत्यक्ष लोकांशी थेट मैत्री करायला वेळच देत नाही.
याचा परीणाम तुम्ही कदाचित एकलकोंडे होण्यात होतो. आभासी विश्वातले आयडी हेच खरे मानुन त्यात रममाण होने हे भंगलेल्या आत्ममग्नतेचे एक लक्षण आहे.
आभासी प्रतिमा खर्‍या असत्या तर मिपा कट्ट्याला एकत्र यावे असे लोकाना वाटले नसते. प्रत्यक्षात भेटण्याची ओढ वाटली नसती. आभासी जगातल्या मैत्रीपेक्षा प्रत्यक्ष भेटल्यानन्तर होणारी मैत्री ही कितीतरी भक्कम बंध निर्माण करते.
एके काळी मी देखील चॅटिंगला अ‍ॅडिक्ट झालो होतो. ती नशा लवकरच उतरली .
तुम्हाला जालावर १२६७ मित्र आहेत याबद्दल प्रौढीने सांगावे असे काही नाही. त्यातलया काहींकडून व्यावसायीक फायदा होईलही. पण तुम्ही जितके हाडामाम्साच्या लोकांत वावराल तितका तुमचा स्वभावातील अट्टाहासीपणा/ माझे तेच खरे वगैरे कमी होत जातो. टीमस्पीरीट /खेळकरपणा वाढत जातो
१२६७ जालावरील व्यक्ती हे समीकरण बघताना आपण घरताल्या लग्नाला निमन्त्रणे देताना अगदी आठवूनसुद्धा नावांची संख्या ३०० /३५० च्यावर जात नाही. हे वास्तवदेखील लक्षात घ्यावे.
आनन्दात सुखदु:त सहभागी होतो मार्गदर्शन करतो तो मित्र. तो कदाचित तुमचे दु:ख दूर करणार नाही पण निदान ऐकून तरी घेईल.