माझ्या माहितीतल्या एका संस्थेतर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने एक उपक्रम चालू होत आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीत ९४%च्यावर गुण मिळतील तसेच त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,८०,०००/- पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील ११वी आणि १२वी साठी आर्थिक मदत केली जाईल. जर का विद्यार्थ्याने १२वीत परफॉर्मन्स मेंटेन केला तर वैद्यकिय अथवा अभियांत्रिकीच्या (फक्त शासकिय महाविद्यालायतील) शिक्षणासाठी देखिल मदत केली जाऊ शकते.
आपणा सर्वांना नम्र आवाहन... आपल्या माहितीत असे कोणी विद्यार्थी असतील तर कृपया पूर्ण माहितीसह (नाव, पत्ता, पालकांचे नाव व पत्ता, आर्थिक उत्पन्नाचे तपशील) कृपया मला व्यनि करावा.
विद्यार्थ्याची मुलाखत, एक प्रवेश परिक्षा, काउंसेलरची घरी भेट आणि पालकांच्या उत्पन्नाच्या आकड्यांची शहानिशा या नंतर अंतिम निवड केली जाईल.
तुम्ही काही मित्रांनी सुरु करुन दिलेले छोटेसे रोप मोठे होतेय.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
20 Jan 2011 - 3:37 pm | स्पा
अतिशय सुंदर उपक्रम
20 Jan 2011 - 3:40 pm | मेघवेडा
स्तुत्य उपक्रम. अनेक शुभेच्छा.
20 Jan 2011 - 3:48 pm | ५० फक्त
विनायक प्रभु,
एका अतिशय छान उपक्रमाबद्दल अतिशय धन्यवाद, आमच्या येथे असा एक विद्यार्थी आहे परंतु तो या वर्षी आठवीत आहे, जर पुढची दोन वर्षे येथेच राहिलो तर निश्चितच कळवेन.
हर्षद.
20 Jan 2011 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद गुर्जी :)
खरच छान उपक्रम आहे हा.
20 Jan 2011 - 4:14 pm | नरेशकुमार
अतिशय छान उपक्रम.
20 Jan 2011 - 4:22 pm | पैसा
अतिशय चांगला प्रस्ताव आहे. या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा! मदत खर्याच गरजू मुलांपर्यंत पोहोचतेय याची काळजी घ्यालच!
20 Jan 2011 - 4:28 pm | प्राजक्ता पवार
छान उपक्रम. अनेक शुभेच्छा.
20 Jan 2011 - 5:08 pm | Nile
ग्रेट उपक्रम! मनापासुन शुभेच्छा!
20 Jan 2011 - 5:11 pm | सहज
अनेकोत्तम शुभेच्छा.
20 Jan 2011 - 5:43 pm | RUPALI POYEKAR
तुमच्या या उपक्रमाला मनापासुन शुभेच्छा.
20 Jan 2011 - 6:00 pm | यशोधरा
स्तुत्य उपक्रम, शुभेच्छा.
अधिक सविस्तर माहिती वाचायला आवडेल.
20 Jan 2011 - 6:21 pm | चिगो
ऑल द बेस्ट...
आपल्या ह्या उपक्रमासाठी खुप खुप मनःपुर्वक शुभेच्छा...
20 Jan 2011 - 7:03 pm | रेवती
उपक्रमास शुभेच्छा!
असे विद्यार्थी/विद्यार्थीनी असल्यास नक्की कळवीन.
20 Jan 2011 - 8:01 pm | मी-सौरभ
खूप खूप शुभेच्छा :)
20 Jan 2011 - 8:09 pm | रामदास
बर्याच दिवसानी या निमीत्तानी आलात याचा आनंद आहे,
20 Jan 2011 - 8:44 pm | कुसुमिता१२३
सुरेख उपक्रम,,हार्दीक शुभेच्छा!
20 Jan 2011 - 9:30 pm | शाहरुख
चांगला उपक्रम !
मला ९४ % हा निकष फार कडक वाटतो..आणि कला शाखा का नाही ?
20 Jan 2011 - 10:17 pm | टारझन
९४% मिळालेला कोणी कला शाखा घेईल असं वाटत नाही . तिकडे कितीही शिकलं तरी दुश्काळंच असतो , म्हणे !
९४% च्या खाली क्रायटेरिया आणला तर मास्तर ला घरदार विकलं तरी पैका पुरणार नाही :)
सजेशण : ९४% च्या खालच्या कोट्या ची जबाबदारी तुम्ही उचला ;)
20 Jan 2011 - 10:28 pm | शाहरुख
दादा, क्रायटेरियात बसणार्या प्रत्येकाला मदत करा असं कुठं म्हटलंय आम्ही मास्तरला !
बाकी आम्ही आमची जबाबदारी उचलतोयच :-)
20 Jan 2011 - 9:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, उपक्रमास मन:पूर्वक शुभेच्छा.....!!!!
-दिलीप बिरुटे
20 Jan 2011 - 10:33 pm | कुंदन
>>सर, उपक्रमास मन:पूर्वक शुभेच्छा.....!!!!
असेच म्हणतो.
मात्र पैसे अडकले असल्याने सक्रिय सहभाग नाही घेउ शकत याबद्दल वाईट वाटतेय.
20 Jan 2011 - 10:40 pm | अविनाशकुलकर्णी
छान उपक्रम. अनेक शुभेच्छा.
20 Jan 2011 - 11:18 pm | नावातकायआहे
शुभेच्छा!
सविस्तर माहिती वाचायला आवडेल.
20 Jan 2011 - 11:34 pm | कौशी
छान उपक्रम. अनेक शुभेच्छा.
पण विनायक जी आपला व्यनी आयडी मिलेल का?
21 Jan 2011 - 8:30 am | गुंडोपंत
उत्तम उपक्रम पण यातला फक्त हुशार विद्यार्थ्यांनाच मदत करण्याचा हेतू खटकला.
कदाचित खरी गरज मधे असणार्यांनाच असते. त्यांना खरी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
९४% च्या पुढचे आपला मार्ग कसाही काढतातच. त्यांना त्यांचा स्वार्थ कशात आहे आणि तो कसा साधायचा हे चांगलेच कळलेले असते म्हणून तर ते तेथे असतात.
21 Jan 2011 - 11:18 pm | चित्रा
फक्त हुशार विद्यार्थ्यांनाच मदत करण्याचा हेतू खटकला.
पण हा मुद्दा बरोबर वाटला. मुलांमध्येही शिक्षणाची खरी इच्छा असलेली मुले निवडणे कठीण जाईल, पण अशी मुले असतात.
उपक्रमाबद्दल प्रभुसरांचे आभार. घरी विचारते, ओळखीत कोणी आहे का?
21 Jan 2011 - 2:43 pm | विनायक प्रभू
टक्के आणि सर्व माहीती असणे ह्याची गल्लत करु नका पंत.
ह्या क्षेत्रातील ३० वर्षाच्या अनुभवावरुन सांगतोय बर का.
21 Jan 2011 - 10:54 pm | प्राजु
अतिशय छान वाटले हे वाचून.
मास्तर, हॅट्स ऑफ टू यू!