मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
19 Jan 2011 - 9:45 pm

विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती.
भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का?
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने
हे काय चालले आहे!
न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत.
जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच. पण सेक्युलर भारत कूठे जाणार?

http://www.thenarendramodi.info/deoband-chief-lauds-modis-gujarat/
http://www.funonthenet.in/forums/index.php?topic=197611.0
http://www.zeenews.com/news681584.html

समाजराजकारणप्रकटनमाध्यमवेधमाहिती

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Jan 2011 - 10:25 pm | निनाद मुक्काम प...

एका उच्च विभूषित माणसाचे वक्तव्य हे पूर्ण समजून उमजून केलेले आहे .
जे त्यांना स्वताच्या राज्यात आजू बाजूला दिसले ते .
विकासात सर्व घटक भागीदार होत आहेत त्या राज्यात
हा आदर्श आहे .
अर्थात आपल्यापुढे आपल्याकडे हि आदर्श आहेच कि

प्रतिसादाशी सहमत.
आपल्याकडे वेगळा आदर्श आहे. काळजी नको.;)

कापूसकोन्ड्या's picture

26 Jan 2011 - 10:30 pm | कापूसकोन्ड्या

त्यानी राजीनामा दिला. त्याना राजीनामा द्यावा लागला.

विकास's picture

20 Jan 2011 - 9:59 pm | विकास

ऑक्टोबर २०१० मधे देवबंदच्या उलेमांनी "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे" असे जाहीर करून प्रथमच काश्मीरवर भाष्य केले. त्यामुळे अलगतावादी/काश्मिरी अतिरेकी पण चक्रावले होते. अर्थात काश्मीरमधून सैन्य हलवायला हवे वगैरे म्हणलेले आहे पण त्याचे कारण परत गोष्टी सुरळीत व्हाव्यात असे म्हणत.

त्याच बरोबर टाईम्स मधील या बातमीत, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे (आणि देवबंदी) सदस्य कमाल फारूकी असेही म्हणाले, "The country is in a reconciliatory mood, be it on J&K or Ayodhya. So, reconciliation within the Indian Constitution is the way out. An overwhelming section of Kashmiris want it, too. Which stupid person would want to go with Pakistan?"

हे जर उशीरा का होईना शहाणपण असले तर उत्तमच आहे. पण हेच देवबंदी फतवे काढत असतात. त्यांच्या संकेतस्थळावर एका धार्मिकाने विचारलेला प्रश्न आणि त्यावरील उत्तर वाचल्यावर वेगळेच वाटते...

कापूसकोन्ड्या's picture

21 Jan 2011 - 12:38 pm | कापूसकोन्ड्या

मान्य.

पण त्याच्या वर सर्व बाजूने झालेली टिका पहा.जणू काही नरेन्द्र मोदी ची सर्वाना कावीळ झालेली आहे. त्यांनी कितीही चांगले काम केले तरी !

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2011 - 12:42 pm | परिकथेतील राजकुमार

खुप सुंदर चर्चाप्रस्ताव.
मला कोणी देवबंद म्हणजे काय सांगेल काय ? आणि मुस्लिम संस्थेच्या नावात 'देव' शब्द कसा ?

कापूसकोन्ड्या's picture

21 Jan 2011 - 1:20 pm | कापूसकोन्ड्या

मे बी ''देव'' बन्द!
लोजीकली देवावर बन्दी असे असावे वाटते. पण पटत नाही कारण जरी बन्दी हा उर्दू शब्द असला तरी!
आणखी एक शंका फतवा याचा अर्थ शंकानिरसन असा आहे. मग तो निर्देश (और्डर ) म्हणून का वापरला जातो?

विकास's picture

21 Jan 2011 - 7:18 pm | विकास

देवबंद हे खाली विजूभाउंनी म्हणल्याप्रमाणे उत्तर प्रदेशातील गावाचे नाव आहे. ह्या सुन्नी मुस्लीम समाजाच्या थोडाशा सोप्या भाषेत "थिंक टँक" ला जवळपास दोनशे वर्षे झाली आहेत. त्यावर विस्तृत लिहीण्यास तुर्तास वेळ नाही. पण देवबंदला जे बोलले जाते त्याचा परीणाम हा भारतीय उपखंडात + अफगाणिस्तानातील मुस्लीम विचारवंत आणि मुस्लीमांवर होतो. त्यातील बहुतांशी टोकाच्या मुस्लीम धोरणांबद्दल लिहीता येईल, त्यांचे फतवे पण त्या संदर्भात बघता येतील, पण तुर्तास त्यावर उत्तरे देण्यास वेळ नाही आणि तो इतिहास/वर्तमान या चर्चेचा मूळ भाग होऊ नये असे वाटते.

त्यामुळे ज्या देवबंदने आजतागायत काश्मीरवर कुठलीच भुमिका घेतली नाही त्यांनी भारताच्या बाजूने तशी भुमिका घेणे अथवा आता मोदींच्या बाजुने त्यांच्या कुलगुरूने बोलणे ह्याला महत्व आहे. या शिवाय त्यांच्या वर उल्लेखलेल्या फतवा/मुस्लीम धोरणे यांचा विचार करत असताना देखील त्यांनी आता (२००९ मधे) तालीबानींना "अन-इस्लामिक" म्हणलेले आहे हे देखील लक्षात घेतले पाहीजे. (Senior clerics of India’s top seminary whose version of Islam the Taliban claim to follow have denounced the actions of the hardline militia, saying the group does not qualify to enjoy affiliations with the historic madressah.). हे महत्वाचे का, कारण तालीबानी हे देवबंदी मदरसामधे शिकलेले आहेत आणि ते त्यांचे प्रेरणाकेंद्र होते असे मानले जाते.

असो.

विजुभाऊ's picture

21 Jan 2011 - 1:18 pm | विजुभाऊ

देवबन्द हे त्या गावाचे नाव आहे.
मोदीनी गुजरात मध्ये फार उत्तम सुधारणा केल्या आहेत. ते इथे पदोपदी जाणवते.
रोजगार मिळाल्यावर लोकांची माथी भडकावने कठीण असते.
आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे अहमदाबादेत इतक्या मशीदी असूनही लाउडस्पीकरवरून आरत्या आणि अजान ऐकु आली नाही
संपूर्ण गुजरातमध्ये कुठेही कोणत्याही पुढार्‍याचे अभिनन्दनाचे फलक दिसत नाहीत.
मोदीना नावाजणारे किम्वा नावे ठेवणारे स्वतः हे कधी साधू शकतील का?

श्री. वस्तानी फारच 'सही' बोलले. त्यांनी मोदींना गुजरात दंगलीबद्दल क्लीन-चिट दिली नाहीं. ते खरं तर म्हणाले कीं आता पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण मोदींनी विकासात व पुनर्वसनात जे कार्य केले त्याचे मनापासून कौतुक केले.
ही फारच निरोगी घटना (healthy development) आहे व तिचे प्रत्येक भारतीय स्वागतच करेल.

नितिन थत्ते's picture

21 Jan 2011 - 8:16 pm | नितिन थत्ते

>>त्यांनी मोदींना गुजरात दंगलीबद्दल क्लीन-चिट दिली नाहीं. ते खरं तर म्हणाले कीं आता पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे.

सहमत आहे.
*१० वर्षांपूर्वीच्या घटना विसरून पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला ते तयार झालेले दिसतात.
२००/३००/४००/४५० वर्षांपूर्वीच्या घटना विसरायला आपण केव्हा शिकणार?

विकास's picture

26 Jan 2011 - 10:43 pm | विकास

१० वर्षांपूर्वीच्या घटना विसरून पुढील गोष्टींकडे लक्ष द्यायला ते तयार झालेले दिसतात. २००/३००/४००/४५० वर्षांपूर्वीच्या घटना विसरायला आपण केव्हा शिकणार?

म्हणजे २००/३००/४००/४५० घटना घडल्या होत्या हे मान्य आहे वाटते. आणि तसे काय (अजून चारच दिवसात) ६२ वर्षे होतील अशा घटनेचा कितीजण कसा उपयोग करतात ते देखील आपण बघतोच.

असो. मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानींना त्यांच्या केल्या कर्माची शिक्षा मिळाली. त्यांनी राजीनामा दिला आहे. कारण "ते तयार" आहेत मधे फक्त "ते" म्हणजे "मौलानाच"...

कापूसकोन्ड्या's picture

26 Jan 2011 - 10:54 pm | कापूसकोन्ड्या

हा स्पष्टपणाचा बळी आहे. राजीनामा द्यावा लागला आहे, दिलेला नाही.त्याच दिवशी हे ठरले होते.
नरेन्द्रा मोदीनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हे समंजस पणाचे झाले.