मुंब्रा देवी

स्पा's picture
स्पा in कलादालन
15 Jan 2011 - 11:21 am

बर्याच दिवसांपासून 'मुंब्रा देवीला'जायचं मनात होतं, पण वेळच मिळत नव्हता, शेवटी काल तो योग आला
मी आणि माझा मित्र सौरभ असे दोघे सकाळी प्रचंड थंडीत ५.३० ला निघालो, काहीही करून सूर्योदयाच्या आधी आम्हाला वर पोहोचायचंच होतं
(फक्त आणि फक्त सूर्योदय बघण्यासाठी मुंब्रा देवीला जायलाच हव)
प्रचंड धुके असल्याने आमचा पचका होणार अशी चिन्ह होती

पायऱ्या चढताना बऱ्यापैकी अंधार होता

७ वाजत आलेले होते, आणि आम्ही धापा टाकत कधी एकदा देऊळ गाठतोय या प्रयत्नात होतो
शेवटी एकदाचे देवळात पोहोचलो, आणि नारायण अवतरले, समोरचा देखावा अवर्णनीय होता, खाली धुक्यात लपटलेल मुंब्रा गाव, आणि वर असंख्य किरणांनी सोनेरी रंगाची उधळण करणारे सूर्यदेव, फटाफट फोटो काढायला सुरुवात केली

हा फोटो विमानात बसून काढलाय असं वाटतंय

अस्मादिक

देवीचे दर्शन घेतले. फोटो काढायला परवानगी नाही , त्यामुळे इथे टाकलेले नाहीत
मुंब्रा देवी म्हणजे "नव दुर्गा" आहे, येथे नऊ देवींच्या मुर्त्या आहेत.
मग खाली उतरताना.. एक झकास जागा शोधून बरोबर आणलेल्या खिचडी आणि गरमागरम पोह्यांवर ताव मारला
आता पर्यंत मस्त उन्ह चढलेलं होतं, मग देवळाचा सुद्धा फोटू काढला

मुंब्रादेवीला जाण अतिशय सोप्पं आहे , मध्य रेल्व्ये च्या 'मुंब्रा' स्थानकात उतरायचं , आणि बाहेर चालू लागायचं समोरच डोंगर आहे, त्यामुळे शोधाशोधीचा प्रश्न नाही.
थोडक्यात मस्त सहल.

कलासंस्कृतीप्रवासधर्मछायाचित्रण

प्रतिक्रिया

अवलिया's picture

15 Jan 2011 - 11:25 am | अवलिया

मस्त फटू !! ग्रेट !!

डावखुरा's picture

16 Jan 2011 - 12:22 am | डावखुरा

मस्त आहेत फोटो..

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2011 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार

मस्त रे :)

धुकट सूर्योदयाचे फोटु एकदम कल्ला आलेत.

अवांतर :- ('नारायण अवतरले' च्या जागी 'सूर्यनारायण अवतरले' असे हवे आहे.)

नन्दादीप's picture

15 Jan 2011 - 11:32 am | नन्दादीप

मस्त फोटो....
पहीला फोटो बघीतल्यावर आधी वाटल की डोंगराच्या मधूनच सूर्योदय झालाय....वाटल काय प्रतिभावंत आणि नशिबवान आहेत आमचे स्पा भौ...

sneharani's picture

15 Jan 2011 - 11:32 am | sneharani

मस्तच फोटो!
:)

प्रचेतस's picture

15 Jan 2011 - 11:41 am | प्रचेतस

झक्कास रे स्पाइल्या, कड्यातले मंदिर पाहून अगदी वणीच्या सप्तशृंगी मंदिराची आठवण झाली.

वणीच्या सप्तशृंगी मंदिराची आठवण झाली.

अगदी खरय ....
पण वणीच्या जेमतेम अर्धच चढायच आहे.... :)

५० फक्त's picture

15 Jan 2011 - 11:47 am | ५० फक्त

स्पा खुप छान फोटो , सुर्यनारायण हा या जगाचा एकमेव उर्जा स्त्रोत आणि या सुर्यादयाबरोबर अ‍ॅकायला तेजोमय निधि किंवा गगन सदन तेजोमय.

आता कोकण फोटो बरोबर सुर्य नारायण फोटो स्पर्धा पण घ्यायला हवी मिपावर. - मा. संपादक मंडळ.

स्पा,काही फोटो डेस्कटॉपला वापरले तर चालेल काय? उपयोत फक्त वॅयक्तिक होईल व्यावसायिक नाही.

अवांतर - सुर्याचे असे डायरेक्ट फोटो काढले तर कॅमेराची लेन्स किंवा सेन्सरला काही धोका होउ शकतो काय ? कॉलिंग - युयुत्स्युजी, यशोधराजी, अभिजा, किल्लेदार व इतर फोटोग्राफि जाणकार ऑफ मिपा.

हर्षद.

हर्षद,
मा बापड्याचा साधा 'kodak easy share camera ' आहे
त्यामुळे लेन्स वगेरे बाबतीत मी अडाणीच आहे

पण नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचे फोटो काढताना मला नाही वाटत काही अडचण येईल

आणि फोटो वापरायला माझी काय हरकत असणार?
तो (सूर्य) एवढा त्याचे फोटो फुकटात काढायला देतोय , तर मी कोण अडवणारा ;)

गणपा's picture

15 Jan 2011 - 11:48 am | गणपा

मस्त रे स्पा.
पहिल्या फोटोतल्या दिव्यालाच सुर्यनारायण समझुन मी ही फसलो. :)

प्रीत-मोहर's picture

15 Jan 2011 - 11:48 am | प्रीत-मोहर

सही फटु.......

RUPALI POYEKAR's picture

15 Jan 2011 - 12:49 pm | RUPALI POYEKAR

खुपच सुंदर

मुलूखावेगळी's picture

15 Jan 2011 - 3:20 pm | मुलूखावेगळी

एकदम सहि स्पा

आता वाट बघते फोतो चा नवा धागा कोनाचा येइल ह्याची

नरेशकुमार's picture

15 Jan 2011 - 3:30 pm | नरेशकुमार

सहि स्पा,
पुने-मुंबई-पुने रेल्वे प्रवास करताना निदान शंभर वेळा या डोंगराकडे (लांबुनच) बघुन झाले होते, आज तुझ्यामुळे जवळुन दर्शन झाले.

धन्य आहे स्पा तु.

बाय द वे, तु रहायला कुठे आहेस ?

तुझा फोटो बी मस्त आलाय ! बाकी सर्व झक्कासच

स्पा's picture

15 Jan 2011 - 3:30 pm | स्पा

ठाकुर्ली-डोंबिवली

कवितानागेश's picture

15 Jan 2011 - 3:33 pm | कवितानागेश

फोटु छानच आलेत.....म्हटलं काही निरिक्षणे नोंदवावीत.

स्पा फोटु छान काढतो.
स्पा पहाटे उठू शकतो.
स्पा अंधाराला घाबरत नाही.
स्पा विमानात न बसताच तसे फोटो काढू शकतो.
स्पा सकाळच्या उन्हातसुद्धा गॉगल वापरतो.
स्पाची रहाणी साधी आहे ( उदा: त्याचा 'साधा' क्यामेरा.)
स्पाला १ ते ९ आकडे मोजता येतात.
स्पाला यंदाच्या वर्षी 'मुंब्रा देवी' नक्की पावणार!

शाबास रे स्पा. ;)

अवांतरः स्पा सूर्याला लाडानी नारायण म्हणतो!

नन्दादीप's picture

15 Jan 2011 - 4:22 pm | नन्दादीप

हा हा हा......

माऊ संघ बदललेला पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. ;)

----स्पारझन

पुष्करिणी's picture

15 Jan 2011 - 5:11 pm | पुष्करिणी

स्पाला खिचडी आणि पोहे खूप आवडतात
स्पाला डायरेक्ट ठेशनाच्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळं आवडतात्....

फोटो छान आलेत स्पा

पुष्करिणी संघ बदललेला पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले ;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jan 2011 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार

आपण आपल्याच धाग्याची खरडवही केलेली पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले

इन्द्र्राज पवार's picture

15 Jan 2011 - 3:40 pm | इन्द्र्राज पवार

सुंदर....जणू काही प्रत्यक्ष सफरच झाली 'मुम्ब्रा देवी' आणि गड परिसराची. बटण दाबले की फोटो निघतो इतपतच कॅमेर्‍यासंदर्भात माहिती असल्याने तांत्रिकतेकडे लक्ष न देता निव्वळ निसर्गसौंदर्य अनुभवले.

इन्द्रा

अमोल केळकर's picture

15 Jan 2011 - 4:11 pm | अमोल केळकर

सुंदर ठिकाण. एकादा जायला हवे. मुंबईतच अस्ल्याने काही प्रश्न नाही

अमोल

जागु's picture

15 Jan 2011 - 4:49 pm | जागु

छान फोटो आणि ठिकाणही.

प्राजक्ता पवार's picture

15 Jan 2011 - 6:23 pm | प्राजक्ता पवार

छान आलेत फोटो :)

सगळे फोटू छान.
अश्या छोट्या सहली मलाही आवडतात.
मोठ्या सहलींची तयारी करायचा कंटाळा येतो.
देवळाचे फोटू घ्यायला परवानगी नव्हती पण खिचडी आणि पोह्याचे फोटू तरी द्यायचे की!;)

विलासराव's picture

15 Jan 2011 - 7:49 pm | विलासराव

मस्त ठिकाण आहे. वरुन दिसणारा खाडीचा नजारा तर केवळ अप्रतिम असतो

आत्मशून्य's picture

15 Jan 2011 - 10:40 pm | आत्मशून्य

तो फोटो खरोखरच विमानात बसून काढलाय असं वाटलं, कींबहूना तो आणी पहीला फोटो बघून तूझ्यामूळेच मला वर्टीकल इमेज तीरकी करून शूट करायची प्रेरणा मीळाली आहे, फार्फार धन्स. लगे रहो.

क्लास फोटो.
खूप छान आले आहेत सगळेच फोटो.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jan 2011 - 11:19 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो मस्तच!

पण तुम्हाला तिथे जाताना कोणी बघितले तर नाही ना? ;)

चित्रा's picture

15 Jan 2011 - 11:55 pm | चित्रा

एकदाच गेले आहे मुंब्र्याच्या देवीला. मस्त आहे चढण. पण वर चढायला फार वेळ लागत नाही असे आठवते.
खाली सगळी मुस्लिम वस्ती आहे, हे विशेष.

टारझन's picture

16 Jan 2011 - 12:11 am | टारझन

शेवटचे दोन एक फोटु टाकले असतेत तरी चाललं असतं ,... सुर्य काय आम्ही रोज बघतो :) असो :)
स्पा काका सुर्या पेक्षा तेजवान आहेत :) - इति 'म्या पामर'

पैसा's picture

16 Jan 2011 - 10:13 pm | पैसा

फोटो मस्तच! पण एवढ्या मरणाच्या थंडीत उठून डोंगर चढायला कोणी पैसे देत असेल तरी मी नाही जाणार. त्याबद्दल तुझ्या चरणकमलांचे दर्शन घेईन म्हणते! बाकीच्या प्रेक्षणीय स्थळांचं काय?

मदनबाण's picture

17 Jan 2011 - 7:45 am | मदनबाण

वा... छान फोटु. :)
माझ्याही मनात इथे एकदा जायचे आहे. लहानपणापासुन रेल्वे प्रवास करताना अनेक वेळा हे देउळ नजरेस पडले आहे.
फकस्त यक प्रश्न इचारावासा वाटतोया...तो म्हणजी वरुन तुला रेल्वे ट्रॅक दिसला नाय का ? त्याचा बी फोटु लयं भारी आला असता असं वाटतं मला.

वरुन तुला रेल्वे ट्रॅक दिसला नाय का ? त्याचा बी फोटु लयं भारी आला असता

अरे बाणा...
धुकं एवढं होतं, कि खालचं काहीही दिसत नव्हतं...
फोटो काढलेले सगळे धुरकट येत होते
खाडी पण खरी खूप छान दिसते :)

अप्पा जोगळेकर's picture

17 Jan 2011 - 10:03 am | अप्पा जोगळेकर

वरुन २रा , ७वा आणि तो विमानात बसून काढलेला फोटो एकदम सही आलाय. मुंब्रादेवीची वॉल पण भारी आल्येय. रविवारी सकाळी इथे बर्‍याचदा मंडळी जमतात क्लायम्बिंच्या प्रॅक्टिसला.