ब्रह्मोत्सव
रात्र पुर्ण चंद्रामुळे, पाणी कमळांच्या फुलां मुळे तर मंदिरे सदैव उत्सवाने शोभून दिसतात. या संस्कृत सुभाषिताचा प्रत्यय नुकताच बेंगलोरमधे ईस्कॉन मंदिरात सुरु असलेल्या ब्रह्मोत्सवाने आला.
तसेही दक्षिण भारतात या-ना त्या कारणाने सदैव सण समारंभ आणी उत्सव चालू असतात अगदी नित्य सुमंगल-नित्य महोत्सव. ऊदा : दोलोत्सव, कल्याणोत्सव, योगोत्सव, ब्रह्मोत्सव, वसंतोत्सव, तपोत्सव, आणि पवित्रोत्सव.
तसे भारतीय लोक उत्सव प्रिय आहेतच, पण दक्षिण भारतात ते साजरे करण्याची वेगळी पद्धत आणि प्रकारही, विशेष म्हणजे या उत्सवांचे प्रमाणही फार मोठे असते.
ब्रह्मदेवाने विष्णुची आराधना केली आणि या उत्सवाची सुरवातही, प्रत्येक विष्णु / कृष्ण मंदिरात रीती-रीवाजा नूसार ९ ते ११ दिवस हा उत्सव साजरा केला जातो. याची विषेशता म्हणजे दररोज देवाची वेगळ्या रुपात / वेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली उत्सवमुर्तीची पुजा बांधली जाते, संध्याकाळी काही नृत्य-गायन-भजनादिकार्यक्रम असतात. शेवटच्या रथोत्सवाने सांगता होते.
यामधे गरुड वाहन, कल्पवृक्ष, अनंत शेष, हनूमंतवाहन, पुष्प पालखी ह्या अत्यंत विलोभनीय सेवा आहेत.
या मधे वापली जाणारी फुलं-पानं, वस्त्र, अलंकार-आभूषण, छत्र -चामर, अत्तरांचे सुवास, आणि ईतर सामुग्री लक्षवेघुन धेत असतात. प्रसादांची रेलचेल तर असतेच हे वेगळ्याने सांगायला नको.
मीसळ पावच्या सदस्यांसाठी काही फोटो देता आहे.
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 10:25 am | आर्य
http://www.flickr.com/photos/vk5/2451521970
http://www.flickr.com/photos/vk5/2451521954
29 Apr 2008 - 5:47 pm | मनस्वी
फुलांची सजावट तर खूपच मनमोहक.
30 Apr 2008 - 10:05 am | विसोबा खेचर
फोटू दिसत नाहीत बॉस!
तात्या.