चौथीकडवा पंचमबर्मन
अकल्मखाजा धत्तड तत्तड
विचित्रपंथी सलज्जदूषण
धत्तड तत्तड धत्तड तत्तड
तोंडावरती उलटा पंज्जा
एटिएसचा स्वयंसेवक
इटलिपूरचा डिग्गी राजा
बोल बोलतो भलते रोचक
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन
टेननंबरी शार्दुलविक्रिडित
जमालगोटी चेंडूफोडन
रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
तळपत तडपत चित्रविचित्रा
त्रेधा तिरपिट पुजाबात्रा
याएसेलचा विचित्रसद्रा
धेनू भानू कर्मदरिद्रा
कर्तव्याच्या गंडस्थळावर
सिंगल मिंगल सिंगल मिंगल
एलोमा पाय्लोमा जिंगल जिंगल
दधीची ची हड्डी फ़्रॅक्चर
शरदिनी अभ्यंकर ... ५ जानेवारी पुणे
_______________________________________
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 10:04 am | बिपिन कार्यकर्ते
एऽऽऽ धत्तड तत्तड!!!
5 Jan 2011 - 12:30 pm | श्रावण मोडक
+१
5 Jan 2011 - 1:07 pm | नगरीनिरंजन
गंधमादन धडपड पडझड
मेंदूस्त्राव गडबड गडबड
झांगडझिम्मा दर्पबोकड
कवीलाळते बडबड बडबड
कंड कांडप अर्थ सांडव
भरतनाट्यात भग्न आडव
धुंद हिडींबा मग्न पांडव
शब्द नागडे निव्वळ तांडव
एऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!
5 Jan 2011 - 1:33 pm | भडकमकर मास्तर
धुंद हिडींबा मग्न पांडव
शब्द नागडे निव्वळ तांडव
खास जमले अहे..
यावर तर मुखपृष्ठच करावे इतके सुंदर.....
5 Jan 2011 - 4:13 pm | मेघवेडा
धुंद हिडींबा मग्न पांडव
शब्द नागडे निव्वळ तांडव
दंडवत!
अभ्यंकरबैंची कविता पैल्यांदा कळते का काय असं वाटलं ब्वॉ! पहिलं कडवं विशेष आवडलं नाही. आणखी कल्पक नक्कीच लिहू शकल्या असत्या शरदिनीतै हे नक्की!
स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!
5 Jan 2011 - 4:32 pm | गणपा
हा आपल्या जिव्हाळ्याच विषय आहे ना.... आवडणारचं ;)
5 Jan 2011 - 5:17 pm | मेघवेडा
तर वो! ते आहेच पण कसं आहे, 'टेननंब्री शार्दूल विक्रीडित' ही ओळ तर खासच आहे! नुसतं शार्दूलविक्रीडित हे रौद्र वृत्तच नाही तर "दहा नंबराच्या शार्दूलाचा पराक्रम" असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटतं (किंवा आम्ही तसा अर्थ घेतला, किंवा कसेही) ;)
5 Jan 2011 - 3:15 pm | वाहीदा
दोन्ही कडवे आवडले .
काय मस्त जमले रे तुला नगरीनिरंजन !
मान गए उस्ताद !
5 Jan 2011 - 5:13 pm | गणेशा
छान ..
5 Jan 2011 - 2:04 pm | केशवसुमार
एऽऽऽ धत्तड तत्तड!!!
केशवसुमार अभ्यंकर
5 Jan 2011 - 3:19 pm | वाहीदा
कर्तव्याच्या गंडस्थळावर
सिंगल मिंगल सिंगल मिंगल
कॉलिंग इंट्या ! कॉलिंग इंट्या !
http://www.misalpav.com/node/15699
तळपत तडपत चित्रविचित्रा
त्रेधा तिरपिट पुजाबात्रा
अग्गा पण पुजा बात्रा ची का त्रेथा तिरपिट ??
नेहमीचीच विचित्रपंथातील कविता ..जास्त काही कळली नाही पण तुमचे धत्तड तत्तड धत्तड तत्तड आवडले :-)
13 Jan 2011 - 2:36 am | इंटरनेटस्नेही
वा वा चान चान! शुभेच्छा गं वाहिदा तुला!
(अवांतरः सध्या आमच्या पोटात २.५ क्वार्टर असल्याने जास्त काही लिहु शकत नाही. क्षमस्व!)
5 Jan 2011 - 11:13 am | चेतन
शरदिनी मास्तर/बाई बॅक अगेन....
5 Jan 2011 - 11:13 am | निखिल देशपांडे
ऑ!!! शरदिनी ताई तुमचे आडनाव माहित नव्हते ;)
बाकी कविता कळतेय असे वाटतंय..
5 Jan 2011 - 11:37 am | मैत्र
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध --
४जानेवारी पंचमचा स्मृतीदिन
दिग्विजय - इटली पूर - एटिस हेही स्पष्ट आहे -
स्टेन / मॉर्केल - सचिन चा दहा नंबर .. जमाल आणि आम्हाला जो मोडीत निघाल्या अत्यानंद झाला तो रिक्की पाँटिंग
पूजा बात्रा आणि YSL च्या कुठल्या फ्याशनचा उल्लेख आहे तो समजला नाही.
आणि मुख्य म्हणजे - कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग
कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?)
वर्षाची सुरुवात तर जोरदार झाली :)
5 Jan 2011 - 3:24 pm | परिकथेतील राजकुमार
दादोजी :)
शरदिनी ह्यावेळी पुण्यात आलात की नक्की भेटा.
5 Jan 2011 - 4:24 pm | श्रावण मोडक
कॅफेत भेटणार का? ;)
5 Jan 2011 - 4:50 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्हाला का हो चौकशा ? तुमची फोनवर गाठ घालुन देउ ;)
5 Jan 2011 - 5:23 pm | श्रावण मोडक
फोनवर कशा गाठी घालता म्हणे?
ते जाऊ दे. ताई तुमच्याकडे येऊन जातील आणि तुम्हाला कळणारही नाही असं व्हायचं. तेव्हा... ;)
5 Jan 2011 - 5:25 pm | परिकथेतील राजकुमार
नाही नाही....
मागल्या एका प्रकरणापासून आम्ही चांगलाच धडा घेतला आहे.
5 Jan 2011 - 5:39 pm | श्रावण मोडक
हेच, म्हटलं हा धडा विसरला की काय... म्हणून तर आधी विचारलं होतं कॅफेत भेटणार का असं. ;)
2 Feb 2011 - 9:45 pm | शाहरुख
http://www.bollywoodmantra.com/news/pooja-batra-seeks-divorce-from-her-h...
http://www.iol.co.za/lifestyle/style/fashion/ysl-s-simulating-drug-use-a...
गुगल न्युज वापरत असल्याने हे असू शकेल असे डोक्यात आले !
5 Jan 2011 - 11:46 am | ५० फक्त
अतिशय सुंदर आणि सर्वरसपुर्ण कविता
ब-याच दिवसांनी अशी कविता मिळाली.
अतिशय धन्यवाद.
5 Jan 2011 - 1:29 pm | गणेशा
कविता कळली नाही ..
तरीही शेवट पर्यंत वाचावी वाटली ..
तोंडावरती उलटा पंज्जा
एटिएसचा स्वयंसेवक
इटलिपूरचा डिग्गी राजा
बोल बोलतो भलते रोचक
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन
टेननंबरी शार्दुलविक्रिडित
जमालगोटी चेंडूफोडन
रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
या दोन कडव्यामधील अर्थ थोडाफार कळतो आहे पण एकमेकांप्रती कुठल्याच कडव्याचा दुसर्या कडव्याशी काय संबंध आहे ते मला कळालेले नाही.
तरीही आपले नाव बरेच ऐकुन होतो .. आपली कविता पाहुनच आनंद झाला
लिहित रहा .. वाचत आहे
------------
5 Jan 2011 - 1:53 pm | गणपा
हुऽऽऽऽऽऽऽर्रे
न्यु इयर गिफ्ट :)
पहिल कडवं वाचुन मला आता धम्याचा संशय येतोय ;)
5 Jan 2011 - 4:52 pm | नंदन
हे खासच! आणि 'धुंद हिडींबा मग्न पांडव, शब्द नागडे निव्वळ तांडव' हा तर ननिंचा 'भीम'टोलाच _/\_ :)
बाकी शरदिनीतै 'हाडाच्या' कवयित्री असल्याने दधीची कधी ना कधी त्यांच्या कवितेत डोकावणार होताच ;) ('प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन' ह्या शीर्षकाची पुढली कविता असेल काय? :D)
5 Jan 2011 - 10:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शरदिनींच्या कविता, नगरीनिरंजन यांनी केलेलं विडंबन आणि नंदनने केलेले कविता परिक्षण ही मिपाची शान आहे.
5 Jan 2011 - 5:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
ये बाई अपुनको येडा बनाकेच छोडेगी,
5 Jan 2011 - 5:35 pm | मुलूखावेगळी
शरदिनी बाय/मास्तर,
भारी आहे कविता.डोके खाजवयला लावनारी
तुमचा मेन्दु स्कॅन करुन बघायला पाहिजे.
तुम्ही त्याचा भरपुर वापर करता कवितेत आनि त्यामुळे वाचनार्याना पन करायला लावता
6 Jan 2011 - 1:21 am | फारएन्ड
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन
टेननंबरी शार्दुलविक्रिडित
जमालगोटी चेंडूफोडन
रिक्कि फिक्कि सगळे मोडीत>>> हे जबरी आवडले :)
बाकी वाक्यांचा अर्थ अजून लावतो आहे :) डिग्गी थोडेफार कळाले पण पूर्ण नाही.
6 Jan 2011 - 1:24 am | बेसनलाडू
भारी!
(नतमस्तक)बेसनलाडू
6 Jan 2011 - 6:45 am | सहज
नतमस्तक
2 Feb 2011 - 9:20 pm | सुवर्णमयी
शरदिनीताई, तुमची कविता वाचून खूप आनंद झाला!
2 Feb 2011 - 10:15 pm | वेताळ
खुप आवडली.
2 Feb 2011 - 10:20 pm | टारझन
छाण गं .. मस्तं ग ... कस जमतं गं ?
शरदिनी , डेट वर येणार का गं ? पगार झालाय :)
- फरदिनी
3 Feb 2011 - 11:52 am | नरेशकुमार
हॅ हॅ हॅ,
ह्या मध्यमवर्गिय लोकांना काय एकेके सुचते देव जाने. काय तर म्हने, पगार झालायं.
3 Feb 2011 - 10:40 pm | छत्रपती
आयला पहा हे गर्भशिरमंत.
तु काय सोन्याचा चम्चा घेऊन जल्माला आला काय रे नर्या.