वॉल्व्हर

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
23 Dec 2010 - 10:42 am

वॉल्व्हर

चित्रपटाची सुरुवात दोघी बहिणी आणि एक मुलगी घाईने स्मशानभूमीत जाण्याने होते. दोघीजणी आपल्या आईवडिलांच्या समाधी-शिला स्वच्छ करतात. या दोघी बहिणींचे आईवडील एका आगीत जळून वारले आहेत. असे बोलण्यातून लक्षात येते. त्यानंतर त्या आजीच्या घरी जातात. जातांना रायमुंदाला आणि पावलाला पाहून ओळखीचे कुणी भेटतात. ते म्हणतात, 'अगदी तुझ्या वडिलांसारखे डोळे आहेत हिचे'.
आजीकडे त्यांना त्याची आई जशी बिस्किटे करत असे तशीच बिस्किटे मिळतात. त्या दोघींना आनंद होतो. आपली आजी इतकी म्हातारी असूनही इतके सगळे कसे काय सांभाळते याचे त्यांना आश्चर्य वाटते.

रायमुंदा (पेनेलोप् क्रुझ) आणि सोल (लोला द्युनास्) या दोघी बहिणी ला मंचा नावाच्या एका खेड्यामध्ये मोठ्या झाल्या पण आता (बहुदा माद्रीद) शहरात राहत आहेत. रायमुंदा कुठे मिळेल तेथे छोट्या मोठ्या नोकर्‍या करते. तिला एक तेरा चौदा वर्षांची टीन-एज मुलगी आहे. तिचे नाव पावला (योहाना कोबो). त्या दिवशी खेड्यातल्या स्मशानभूमीतून घरी परत आल्यावर बियर वर बियर पीत बसलेला रायमुंदाचा सहचर किंवा नवरा, पाको, तिला सांगतो की त्याची नोकरी गेली आहे!
वैतागलेली रायमुंदा नेहमीप्रमाणे दुसर्‍या दिवशी बसने नोकरीवर जाते. सायंकाळी परत निघाल्यावर तिला मुलगी पावला बस स्टॉपवर तिची वाट पाहत थांबलेली दिसते. काय झाले म्हणून चौकशी केल्यावर ती काही बोलत नाही. पण मग हळूहळू रडतरडत सांगू लागते की वडिलांनी म्हणजे पाकोने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने त्याचा प्रतिकार केला. पण तिला पाको म्हणाला की मी तुझा बाप नाहीये! या झटापटीत पावलाच्या हातात स्वयंपाक घरातली सुरी लागली आणि तिने त्याला सुरीने पाकोला सोडण्यासाठी धमकावले. पण त्याने ऐकलेच नाही आणि ती सुरी पाकोच्या पोटात खुपसली गेल्याने तो स्वयंपाकघरात मरून पडला. घरी आल्यावर रायमुंदा स्वयंपाक घरात पाकोचे रक्ताच्या थारोळ्यात प्रेत पाहून हादरते. जरा सावरल्यावर ती प्रथम पावला ला सांगते की, 'लक्षात ठेव कोणत्याही परिस्थितीत हा खून मी केला आहे. तू बाहेर होतीस आणि तुला याची काहीच माहिती नाही. आता तू बाजूच्या खोलीत जा, मी पाहते.'

मोठ्या धीराने ती सगळे रक्त साफ करायला घेते. पावला तिला विचारते की पाको माझा बाप नव्हता का? मग कोण आहे माझा बाप. रायमुंदा तिला सांगते की पाको खरच तिचा बाप नव्हता. पण तिचा बाप कोण हे मात्र सांगत नाही.
ते करत असतांनाच नेमकी घराची बेल वाजते. पावला आणि रायमुंदा दोघीही एकमेकींकडे पाहत राहतात.
रायमुंदा दार उघडते. रायमुंदाला ओळखणारा, कोपर्‍यावरच्या रेस्टॉरंटचा मालक दारात उभा असतो. तो सांगतो की रेस्टॉरंट चालत नाही, मी आता काम शोधायला दूर जातो आहे. तू रेस्टॉरंटच्या किल्ल्या तुझ्याकडे ठेव कुणी रेस्टॉरंट बघायला आले तर त्याला दे. रायमुंदा त्याला हो हो करते. तेव्हढ्यात त्याला रायमुंदाच्या मानेला रक्त लागल्याचे दिसते. तो विचारतो की तुला काही लागले आहे का? ती म्हणते की नाही. तिचा प्रश्नांकित चेहरा पाहून तो म्हणतो की, 'तुझ्या मानेला रक्त लागले आहे.' रायमुंदा चलाखीने त्याला सांगते की, 'ते काही नाही, ते बायकांचे प्रश्न असतात त्याचे आहे.' त्याला पटते आणि तो जातो.

रायमुंदा परत कामाला लागते. तेव्हढ्यात फोन वाजतो. पावला फोन घेते. रायमुंदाची बहीण सोलचा तो फोन असतो. ती सांगते की गावाकडची आपली आजी वारली. आपल्याला उद्या गावाकडे जावे लागेल. रायमुंदा सांगते की मला शक्य नाही. सोल चकित होते. ती म्हणते की तिने तुला सांभाळले. आणि तू येणार नाही? सगळे गाव विचारेल की रायमुंदा का नाही आली... पण रायमुंदा सांगते की तिला काही महत्त्वाचे करायचे आहे आणि ती येऊ शकत नाही. तसेच ती पुढे सांगते की पाकोबरोबर मोठे भांडण झाले आणि पाको सोडून गेला. तो आता परत येईल असे वाटत नाही.

रात्रीच रायमुंदा आणि पावला मिळून पाकोचे प्रेत एका जाड दुलईत गुंडाळून त्या बंद रेस्टॉरंटपर्यंत निर्मनुष्य रस्त्यावरून ओढत घेऊन जातात. रेस्टॉरंटच्या डीप फ्रीझर मध्ये ते प्रेत टाकून रायमुंदा त्याला कुलूप ठोकते. फ्रीजर चालू ठेवते.

आजीच्या शेवटासाठी सोल गावात जाते. गावात अनेकानेक अफवा पसरलेल्या असतात. त्यात सोल आणि रायमुंदाची आगीत जळून मृत्यू पावलेली आई कुणा-कुणाला दिसलेली असते. गावातल्या त्या जुनाट वाड्यात सोल प्रवेश करते. पुढच्या भागात कुणीच नसते. सोलला जिन्यावर आवाज ऐकू येतो. आणि तिला तिची आई जिन्यावरून आलेली दिसते. सोल घाबरून पळत सुटते आणि आतल्या भागात जाते. तेथे गावातली सगळी मंडळी आणि तिची गावातली शेजारीण ऑगस्तीन असतात. सोल ला धीर येतो. इतर भेटीगाठी होतात. गावातल्या अफवा सोलच्याही कानावर जातात. ऑगस्टीन सांगते की, 'जर एखाद्या माणसाचे काही कार्य करायचे राहिले असेल तर ते दिसतात. पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही.'

ज्या दिवशी रायमुंदा आणि सोल चे आईवडील आगीत मृत्यू पावतात तेंव्हाच ऑगस्तीनची आई चमत्कारिकरित्या गायब झालेली असते. तिच्या गायब होण्यामुळे ऑगस्तीन दु:खी असते. ती कशी गायब झाली हे कळावे अशी तीची इच्छा असते.

दफनाचा कार्यक्रम आटोपून सोल शहरात येते. कार पार्क करते आणि घरात जायला लागते तर तिला तिच्या कार मधून आवाज येतो, 'सोल! सोल मला बाहेर काढ'. सोल दचकते आणि थांबते.
परत आवाज येतो, 'सोल, माझ्या मुली मी येथे आहे कारच्या डिकीमध्ये. मला बाहेर काढ.' सोल धीर धरून कारची डिक्की उघडते. आत मध्ये तिला दिसलेली तिची आई - आयरीन, असते. आई तिला सांगते की, 'घाबरू नको मी खरोखर येथे आहे आणि मी जिवंत आहे.'

सोल काहीशी घाबरत तिच्या जवळ जाते. आईने जवळ घेतल्यावर तिला पटते की आई खरोखर आहे. तिला आनंद होतो. दोघी घरात येतात. आई तिला सांगते की मीच आजीला सांभाळायचे म्हणून सगळे ठीक झाले. आता सोल ला त्या अफवांचा, बिस्किटांचा आणि टापटीपीचा अर्थ लागतो.
सोल तिच्या फ्लॅटमध्येच तिचे पार्लर चालवत असते. पण तिच्या काही गिर्‍हाइकांना माहीत असते की सोलचे आईवडील वारले आहेत. मग त्या दोघी असे ठरवतात की आयरीन रशियन म्हणून तेथे राहील आणि सोल ला मदत करेल. आई इतर चौकशी करते तेव्हा सोल सांगते की तिचा पार्टनर दोन वर्षांपूर्वी तिला सोडून गेला. आणि रामुंदाचा पाकोही तिला सोडून गेला.

आई म्हणते की आपण तिघीही पुरुषांच्या बाबतीत दुर्दैवी आहोत. सोल चकित होते. ती विचारते की तू दुर्दैवी कशी काय? वडील तर तुझ्या मांडीवर, तुझ्या मिठीत वारले. आई तिला सांगते की, असे तुम्हाला वाटते. त्या माणसाने मला आयुष्यभर फसवले. जमेल तेथे लफडी केली आणि मला ते त्याचे सहन होईनासे झाले.
एक दिवस तो आणि ऑगस्तीनची आई घरामागच्या झोपडीत एकत्र असतांना मी पाहिले. मला ते सहन झाले नाही आणि मी त्या झोपडीला आग लावली. त्यातचे ते दोघे जळून मेले. तुम्हाला वाटले की ते आम्ही दोघे आहोत. मला पोलीस पकडतील म्हणून मी पळून गेले. पण नुसतीच कशी राहणार? म्हणून भ्रमिष्ट झालेल्या तुझ्या आजीकडे राहिले. तिलाही सोबत आणि तिच्या बोलण्यावर कुणाचा विश्वास नाही. या दोन बाबींवर चालत राहिले. तरी कुठे तरी मी दिसतच असे, म्हणून गावात अफवा पसरल्या की माझे भूत परत आले आहे.
सोलला धक्का बसतो आणि आईचे ममत्वही वाटते.

सोल गावाकडून परत आली म्हणून रायमुंदा तिला भेटायला येते. चटपटीत आणि चलाख रायमुंदाला आईचा वास येतो. ती सोलच्या फ्लॅटमध्ये इकडे तिकडे पाहते. गेस्टरूमचे कपाट उघडल्यावर तिला आईचे कपडे दिसतात. ती सोल ला म्हणते की तू आईचे कपडे का आणलेस? मेलेल्या माणसाचे कपडे काय करायचे तुला? शिवाय तिला आजीची पेटीही दिसते. त्यात तिचे काही दागिने आणि एक जुना फोटो अल्बम असतो. आजीची पेटी स्वतःच ठेऊन घेतल्याबद्दल रायमुंदा संतापते. सोल काहीबाही उत्तर देऊन तिला टाळते. पण रायमुंदा निघून जाते.

पण एकीकडे रायमुंदाला पत्ता लागू नये म्हणून आयारीन लपूनच राहते. आणि गिर्‍हाइकांसमोर रशियन मदतनीस म्हणून उभी राहते.

रायमुंदा रेस्टॉरंटमध्ये सगळे ठीक आहे की नाही हे पाहायला तेथे जाते. तर तेथे जेवणाची चौकशी करायला एक माणूस येतो. तो म्हणतो की आम्ही येथे चित्रपटाचे चित्रिकरण करत आहोत आम्हाला तीस जणांचे जेवण हवे. रायमुंदाला संधी दिसते. ती त्याला हो म्हणते आणि परस्पर रेस्टॉरंट सुरु करते. सगळे ठीक सुरु राहते.

फिल्म क्रु ला एक दिवस तेथे पार्टी करायची असते. सगळे येतात पण पावला मात्र पार्टीत यायला तयार नसते. ती रायमुंदाला कारण देते की पाको तेथे असतांना मला चांगले वाटत नाही. रायमुंदा तिला आग्रह करते. तर पावला तिला म्हणते की, 'तुला कसे समजेल आपल्याच वडलांचा खून केला की कसे वाटते ते.' रायमुंदा थंड नजरेने तिला पाहत राहते. पण मग हळूहळू तिला समजावते. पावला पार्टीत यायला तयार होते. पार्टी व्यवस्थित पार पडते.
गावाकडच्या ऑगस्तीनला कर्करोगाचे निदान होते. ती त्याच्या उपक्ष्चारासाठी प्रयत्न करते. पन तिला यश येत नाही.

एकदिवस रायमुंदा काम आहे म्हणून पावलाला सोलकडे सोडून जाते.
पावला आयरीनला म्हणजे तिच्या आजीला पाहते. सोल तिची ओळख करून देते. तिच्या आईच्या लहानपणा विषयी सांगते. रायमुंदा जरा मोठी झाली आणि माझ्यापासून तुटतच गेली, इतकी की ती माझा एक प्रकारे दुस्वास करू लागली. तू मात्र तुझ्या आईपासून कधी दूर जाऊ नकोस.
रायमुंदा मनावर घेऊन त्याच रात्री पाकोची नदी किनार्‍यावर खड्डा खणून विल्हेवाट लावते.

दुसर्‍या दिवशी पावलाला परत घ्यायला रायमुंदा सोलकडे येते. तिला परत आई तेथे असल्याचा भास होतो. सोल तिला कबूल करते की आई तेथे आहे. पावला तिला आईकडे घेऊन जाते. एकमेकींना पाहून दोघींच्या डोळ्यात अश्रु उभे राहतात.

आई विचारते की तू माझ्यापासून इतकी दूर दूर का राहिलीस? रायमुंदा विस्मयचकित होऊन संतापाने म्हणते जसे काही तुला माहितीच नव्हते काय होत होते ते? आई म्हणते की मला समजले पण फार उशीरा. मला कधी वाटलेच नाही की तुझे वडीलच तुझ्यावर कधी हात टाकतील! मलाही ते सहन झाले नाही. त्या संतापापाईच मी त्याला जाळून टाकला. वडीलांनीच मुलीवर हात टाकल्याने पावला ही रायमुंदाची मुलगी आणि बहीणही असते!
शेवटी आई आणि मुलीचे मनोमिलन होते.

आयरीन ऑगस्तीनच्या उपचारांसाठी तिच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेते. ती म्हणते की तिची आई माझ्यामुले गेली मला तिच्यासाठी इतके तरी केलेच पाहिजे आणि चित्रपट संपतो.

-----------

या चित्रपटाची बांधून घालणारी कथा, ग्रामीण स्पेन आणि सगळ्या कलाकारांचा अप्रतिम अभिनय या खास बाबी आहेत.
आयुष्यभरासाठी दुखावली गेलेली रायमुंदा आपली मुलगी हीच आपली बहीण हे शल्य बाजूला थेवून ज्या प्रकारे वावरते ते जबरदस्त आहे. पाहतांना अनेक गोष्टींचे संदर्भ एकानंतर एक लागत जातात. पटकथा लेखन खासच आहे.

इतके दिवस मी पेनेलोप क्रुझला फक्त शोभेची बाहुली मानत असे. मात्र या चित्रपटानंतर कळले की ती किती सशक्त अभिनेत्री आहे. हॉलिवुडने तिला अक्षरश: वाया घालवले आहे यात शंकाच नाही.

टॉक टू मी सारख्या चित्रपटानंतर अल्मोदोवर ने चित्रपट हा निराळाच मस्तच उभा केला आहे. चित्रपटात पुरुषपात्रे नाहीशीच आहेत. स्पेन मधील ग्रामीण आणि निमशहरी स्त्री जीवनाचे उत्तम दर्शन घडवणारा चित्रपट आहे.
अर्थातच चित्रपट चांगलाच गाजला.

चित्रपटाचे नाव - Volver (उच्चार बहुदा बॉल्बर)
भाषा - स्पॅनिश
दिग्दर्शक - पेद्रो अल्मोदोवर Pedro Almodóvar

~अभिनय~
रायमुंदा - पेनेलोप क्रुझ Penélope Cruz
आयरीन - कारमेन मौरा Carmen Maura
सोल - लोला द्युनास Lola Dueñas
ऑगस्टीन - ब्लांका पोर्तिलो Blanca Portillo
पावला - योहाना कोबो Yohana Cobo
आणि इतर

पुरस्कार
पाम द ओर् साठी नामांकन
कान्स २००६ - सर्वोत्तम पटकथा सर्वोत्तम अभिनेत्री - सहाही अभिनेत्रींना विभागून
२००७ ऍकॅडमी ऍवॉर्ड - सर्वोत्तम अभिनेत्री पेनेलोप क्रुझ
गोल्डन ग्लोब, गोया आणि इतरही अनेक.

संस्कृतीसमाजचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 10:57 am | निनाद मुक्काम प...

अरे तिचा जेमोन जेमोन पहा (त्यावेळी ती १८ वर्षाची असेल )
बाकी ज्या स्पेनिश सिनेमावरून वेनिला स्काय बनला त्या मूळ सिनेमात तिची अदाकारी पहा (टोम्या उगाच नाही भाळला )
हॉलीवूड गाजवून सुध्दा मायबोलीत सिनेमे करायला पेनेलोपे नेहमीच प्राधान्य देते .कालपरवा पर्यत तिचे लग्न होई स्तोवर जेव्हा जेव्हा स्पेन मध्ये ति येणार तेव्हा आपल्या मोठ्या एकत्र कुटुंबा मध्ये रमणार .
नाही तर आमचे मराठी चे स्टार बॉलीवूड ची हवा लागली तर परत मराठीकडे पाहत सुध्धा नाही .

निनाद's picture

23 Dec 2010 - 1:27 pm | निनाद

इंद्राप्रमाणेच तुम्हालाही सहमती... :)

छाण आहे परिक्षण !!

अवांतर : पुण्यात स्पॅनिश स्पिकींग क्लासेस कुठे आहेत ?

- टारझन दा विन्चु

निनाद's picture

23 Dec 2010 - 1:22 pm | निनाद

विंग्रजी / हिंदी टायटल्स असलेली चकतीही मिळायला हरकत नाही...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Dec 2010 - 11:08 am | निनाद मुक्काम प...

कुणा परकीय भाषेतील व्यक्तीने इंग्रजी बोलावे तर स्पेनिश व्यक्तींनी
अत्यंत गोड वाटते कानाला .

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2010 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

कुणा परकीय भाषेतील व्यक्तीने इंग्रजी बोलावे तर स्पेनिश व्यक्तींनी
अत्यंत गोड वाटते कानाला .

हे साध्या सरळ सोप्या शब्दात लिहिले असतेस तर ? हे समजुन घ्यायला मला ७ मिनिटे लागली.

इंग्रजी कोणा परकिय भाषिकाच्या तोंडून ऐकायचे असेल तर ते स्पॅनिश व्यक्तींकडून ऐकावे. असे साधे सोपे सरळ लिही की मेल्या.

प्रशु's picture

23 Dec 2010 - 11:29 am | प्रशु

आंतरजालावरुन उतरवता येईल काय?

निनाद's picture

23 Dec 2010 - 1:08 pm | निनाद

मला माहिती नाही. बिट टोरेंट वापरून पाहा...

अवलिया's picture

23 Dec 2010 - 2:31 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

ही घ्या लिंक.

टु वॉच यादीत नोंद केली आहे.

प्रशु's picture

23 Dec 2010 - 4:21 pm | प्रशु

धन्यवाद..

महेश-मया's picture

23 Dec 2010 - 11:36 am | महेश-मया

राव ईथे ई़ग्लीश समजत नाही तीथे स्पॅनिश काय कळ्नार, पन कथा छान आहे तुम्च्यामुळे पिक्चर कळला

धन्यवाद. मडळ आभारी आहे

निनाद's picture

24 Dec 2010 - 5:19 am | निनाद

दर वेळी भाषा यावीच लागते असे नाही हे आपल्याला चार्ली चॅप्लिनने दाखवून दिले आहे. कमल हसन ने ही हे उत्तमरित्या सिद्ध केले आहेच.
समर्थ दिग्दर्शक सादरीकरणातून हवा तो नेमका परिणाम साधू शकतो.
पण तुम्ही म्हणता तसे काही वेळा कथा बारकाईने समजायला भाषा आली तर फायदा होतो हे मात्र खरे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Dec 2010 - 5:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चार्ली चॅप्लिनचे बोलपट यायला लागले तेव्हाचं एक वाक्य (कोणाचं ते आठवत नाही), "चार्लीचे चित्रपट आता फक्त इंग्लिश समजणार्‍यांपुरते मर्यादित झाले."

चित्रपटाची कथा आवडली.

इन्द्र्राज पवार's picture

23 Dec 2010 - 11:57 am | इन्द्र्राज पवार

माझ्याकडे नुकताच आला आहे हा चित्रपट एका मित्राकडून....पण का कोण जाणे (स्पॅनिश कळणार नसल्यामुळे असेल कदाचित) पाह्यचा राहून गेला; पण आता तुमच्या या लेखामुळे अतिशय आनंदाने पेनेलोप क्रुझच्या या सुंदर चित्रपटाचा आस्वाद घेता येईल.

हॉलीवूडला ती शोभेची बाहुली वाटली (जसे पूर्वीच्या सोफिया लॉरेन आणि जिना लोलोब्रिगिडा या दोन इटालियन अभिनेत्र्यांबाबत त्यानी केले होते...) यात वाद नाही, पण तरीही तुमचे "हॉलिवुडने तिला अक्षरश: वाया घालवले आहे यात शंकाच नाही." हे वाक्य थोडेसे धार्ष्ट्याचे म्हणावे लागेल. मी तिचे अगदी सुरूवातीचे नसले तरी साधारणतः २००४ पासूनचे काही चित्रपट पाहिले आहेत...उदा.सहारा आणि गोथिका. दोन्ही चित्रपटातील तिचा सशक्त अभिनय वाखाणण्याजोगाच आहे (असे मला तरी वाटते) आणि या चित्रपटांनी तिला नावलौकिक तर मिळवून दिलाच आहे, पण सुंदरतेपेक्षाही तिच्यात अ‍ॅक्टींग एलेमेन्ट्स भरपूर आहेत हेही सिद्ध झाल्याने वूडी अ‍ॅलनसारख्या बाप दिग्दर्शकाने त्याच्या 'विकी क्रिस्टीना बार्सिलोना' साठी निवडले असणार.

असो....एका सुंदर अभिनेत्रीच्या तितक्याच सुंदर चित्रपटाबद्दल वाचताना मनस्वी आनंद झाला आहे हे सांगणे गरजेचे आहे.

(थोडेसे अवांतर : २००६ मध्ये 'Volver' साठी पेनेलोपला ऑस्कर मिळाले नाही...तर 'नॉमिनेशन' मिळाले होते. ते मिळाले होते 'हेलेन मिरेन' ला 'क्वीन एलिझाबेथ' साठी. मात्र २००८ च्या विकी क्रिस्टीना बार्सिलोना' मधील भूमिकेसाठी तिला 'सहाय्यक अभिनेत्री'ची ऑस्करची बाहुली मिळाली.)

इन्द्रा

पेनेलोप सुंदर आहेच. तुम्ही म्हणता त्यातहे तथ्य आहे. अगदीच वाया घालवली हे शब्द मागे. :)
अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड.... विकिचे पान घोळ करते आहे मग! पाहा http://en.wikipedia.org/wiki/Volver

नक्की पाहा...
कसा वाटला ते कळवा.

इन्द्र्राज पवार's picture

23 Dec 2010 - 1:31 pm | इन्द्र्राज पवार

व्वा.....तसे शब्द मागे घेण्यासाठी मी लिहिले नव्हते, फक्त वेळीच तिच्यातील अभिनयाचेही गुण हॉलिवूडने हेरले इतपतच माझे मत होते. असो.

विकीचे 'ते' पान पाहिले....तिथेही Penélope Cruz was nominated for the 2007 Academy Award for Best Actress असाच उल्लेख आहे.

चित्रपट आज रात्रीच पाहतो....आता तर पाहिलाच पाहिजे....अन् जरूर कळवितो.

इन्द्रा

सहज's picture

23 Dec 2010 - 11:58 am | सहज

परिक्षण की चक्क सिनेमा कथन!

परिक्षण करताना सिनेमाची संपूर्ण कथा सांगू नये असा एक संकेत आहे ना?

शक्यता नाकारता येत नाही.

- जावई

निनाद's picture

23 Dec 2010 - 1:16 pm | निनाद

सॉरी सर! वो गल्तीसे मिष्टेक हो गया !

तसे काही चित्रपटात संस्पेन्स नव्हते.
शेवट कळला तरी फार काही बिघडत नाही... खरे तर कथा आणि दिग्दर्शन अनेक क्ल्यू देत जातात. सादरीकरंण महत्वाचे वाटले. तसे चित्रपट अनेक ठिकाणी संपादित करता आला असता. उदा. पार्त्र्टीमध्ये होणारी पार्टी वगैरे काही कथेसाठी फार महत्त्वाचे ठरत नाहीत.
शिवाय इतक्या गुंतागुंतीच्या चित्रपटाची ओळख कशी द्यावी हे ही समजेना... म्हणून कथाच दिली.

अमोल केळकर's picture

23 Dec 2010 - 12:30 pm | अमोल केळकर

छान कथा / परिक्षण

अमोल केळकर

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Dec 2010 - 2:22 pm | बिपिन कार्यकर्ते

उतम ओळख. निनाद, तुमच्या कडच्या बाकीच्या खजिन्याची वाट बघत आहे. आतुरतेने. :)

निनाद's picture

24 Dec 2010 - 5:30 am | निनाद

जमेल तसे लिहित राहीन नक्की!
शिवाय इतर सूचनाही अमलात आणेनच!

संपादकांना विनंती आहे की 'संपूर्ण चित्रपट कथा' असा स्पॉयलर अलर्ट वर टाकाल का?
धन्यवाद!

चिंतातुर जंतू's picture

23 Dec 2010 - 2:44 pm | चिंतातुर जंतू

हा चित्रपट दाखवून काही वर्षांपूर्वीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा हा चित्रपट पाहिला गेला होता. त्याविषयी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट-परिचयाविषयी काही विनंत्या:

चित्रपटातले काही कळीचे घटक जर परिचयात उघड केले असतील तर कृपया तसं आधी सांगावं आणि ते पांढर्‍या फॉन्टमध्ये देऊन, विशिष्ट चिन्हांदरम्यान लिहून (किंवा तत्सम क्लृप्त्यांनी) झाकावं. ज्यांना ते जाणून घ्यायची इच्छा नसेल त्यांना मग ते टाळून परिचय वाचता येईल. मला स्वतःला चित्रपट पाहताना या गोष्टी माहीत नव्हत्या. पण विविध उपकथानकांची योजना अशी काही एकमेकांत गुंफून केलेली आहे की थोड्या विचारांती काही गोष्टी लक्षात येतात (विशेषतः पितृत्वविषयक). चित्रपट पाहताना ती रहस्यं हळूहळू लक्षात येण्यामुळे माझा आस्वाद अधिक परिणामकारक झाला होता असं आठवतं. तुमचा परिचय वाचल्यानंतर चित्रपट पाहण्यात आला असता तर तसा परिणाम कदाचित झाला नसता असं वाटतं.

दुसरी विनंती म्हणजे तुमच्या मते चित्रपट का चांगला होता, त्यात कोणत्या गोष्टी लक्षवेधक होत्या हे थोडं अधिक विस्तारानं सांगितलंत तर वाचकांना ते अधिक रोचक वाटेल. मला स्वत:ला त्या चित्रपटातला लाल रंगाचा वापर खूप लक्षणीय वाटला होता. रक्ताची नाती, त्यांत पुरुषांच्या मोहापायी बळजबरीचे शरीरसंबंध पत्करायला लागणं, त्यांतून पुन्हा स्त्री जन्मणं, अशा स्त्रियांची एकमेकांत मिसळलेली आणि पिढ्यानपिढ्या एकमेकांसारखीच असणारी प्रारब्धं असा लाल रंगाचा एक (हिंसक, वंशाबाबतचा, पुरुषी वर्चस्वाचा) संदर्भ लागतो. पुरुषप्रधान संस्कृतीत वाट्याला आलेल्या अशा आयुष्यांशी भिडण्याचे यशस्वी-अयशस्वी प्रयत्न करणार्‍या त्या स्त्रिया तरीही आपली आंतरिक ताकद पणाला लावत, परस्परांविषयीचा स्नेह टिकवून छान जगण्याच्या प्रयत्न करत राहतात, हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) लाल धागा त्यात जाणवतो. त्यामुळे तो लाल रंग लक्षात राहिला.

निनाद's picture

24 Dec 2010 - 5:27 am | निनाद

चित्रपटातले काही कळीचे घटक जर परिचयात उघड केले असतील तर कृपया तसं आधी सांगावं हे मान्य आहे येथून पुढे तसे करेन.

चित्रपट का चांगला होता, त्यात कोणत्या गोष्टी लक्षवेधक होत्या हे मलाही सांगायला आवडेल. पण इतकी मोठी आणि गुंतागुंतीची कथा टायपतांनाच दमून गेलो हो!
शिवाय कधी कधी प्रतिसादातून अनेक कंगोरे स्पष्ट होत जातात, ते ही मला आवडते.

तुम्ही म्हणता तसेच मला वाटले पण लाल रंगाचा वापर तेव्हढा मला जाणवला नाही. रक्त स्वच्छ करतांना दाखवलेला लाल रंग हा भडकपणा आणतो. तो प्रसंग त्यामुळे परिणामकारक होतो.
बाकी तुम्ही म्हणता ते
परस्परांविषयीचा स्नेह टिकवून छान जगण्याच्या प्रयत्न करत राहतात, हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) हे मात्र नक्की जाणवत राहिले. या स्त्रीया एकमेकींपासून दूर जातात आणि जवळ येतात ते आंदोलन सुंदर टिपले आहे.
हा पुरुषी लैंगिगता आणि पितृत्त्व यावर विचार करायला लावणारा चित्रपट आहे हे नक्की.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Apr 2012 - 11:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इतर काही गोष्टी लक्षवेधक वाटल्या. उदाहरणार्थ पाकोने लहान मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न आणि त्याचा खून या गोष्टी अतिशय हळूवारपणे हाताळल्या आहेत. तरीही या प्रसंगातलं क्रौर्य समोर येत रहातं. सतत फोनला चिकटून असणारी टीनेजर पावला या आपत्तीमुळे अचानक मोठी होते, आपल्या आईच्या खरोखरच जवळ येते हे दिसतं. (त्याच वेळी आठवला 'थ्री इडीयट्स' आणि त्यातला विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रसंग. निष्प्राण शरीर दाखवतानाही बटबटीतपणा आणि त्यावरून घेण्याचा बोधही तसाच लाऊड, ओरडून सांगणं.) पावलाच्या वागण्यात होणारा सुजाण बदल ती स्वतःच्या आजीला सांगते त्याआधीच तो वागण्यातून दिसत रहातो. चित्रपटाच्या सुरूवातीला दिसणारी टिपिकल टीनेजर पावला आणि 'मरणान्तानि वैराणि' हे समजून-उमजून वागणारी पावला यांच्यातला बदल लक्षवेधी आहे. कुठेही भाषणबाजी नाही, उपदेशाचे डोस नाहीत हे हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिका पहाणार्‍यांसाठी सुखावह बदल आहे.

रायमुंदाच्या आईकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत म्हणून तिला आईचा राग असतो. स्वतःच्या मुलीवर जेव्हा तसाच प्रसंग येतो तेव्हा तिचा आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. झालेल्या भयंकर प्रकारानंतरही शांत डोक्याने विचार करणारी, परिस्थितीला तोंड देणारी, प्रसंगी चापलूस बनणारी रायमुंदा या कथेची नायिका आहे हे निर्विवादच. पण तत्त्वांसाठी, शेजार्‍यांवर असणार्‍या प्रेमाखातर स्वार्थाचा मागे टाकणारी निरागस अगुस्तीना आणि पुढे तिची जबाबदारी स्वीकारणारी ईरीनं (/ऑगस्टीना आणि आयरीन) या दोघीही गोड आहेत.

रायमुंदाच्या भूमिकेत पुरूषांना अर्थातच अतिसुंदर वाटणारी पेनीलोपे क्रूझ आहे. पण तिचं पात्रही पुरूषांच्या मोहाला बळी पडणारं, बळी पडणारीची काळजी घेणारं आणि पुरूषसुख नशीबात नसणारंच आहे.

चित्रपट पाहून स्पेनमधली खेडी, निमशहरंही सुंदर आहेत, तिथेही वार्‍याने वणव्यांसारख्या आगी लागतात, तिथेही टीव्हीवर ट्यार्पीखेचू, तद्दन मालिका चालतात आणि काही लोकांना ह्या प्रकाराचा राग आहे हे ही समजलं.

हा धागा वाचून दीड वर्षांनंतर चित्रपट पाहिला असला तरीही काही तपशील लक्षात राहिल्यामुळे परिणामकारकता कमी झाली असं वाटलं. काही ठिकाणी सबटायटल्स वाचण्यासाठी चित्रपट थांबवावा लागला. काही स्पॅनिश चित्रपट पाहिल्यानंतर, सबटायटल्स वाचण्याचा त्रास टाळण्यासाठी स्पॅनिश शिकवंसं वाटतं.

निनाद's picture

1 May 2012 - 7:53 am | निनाद

कुठेही भाषणबाजी नाही, उपदेशाचे डोस नाहीत हे अगदी माझ्याही मनातले... :)

रायमुंदाच्या आईकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत म्हणून तिला आईचा राग असतो. स्वतःच्या मुलीवर जेव्हा तसाच प्रसंग येतो तेव्हा तिचा आईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. झालेल्या भयंकर प्रकारानंतरही शांत डोक्याने विचार करणारी, परिस्थितीला तोंड देणारी, प्रसंगी चापलूस बनणारी रायमुंदा या कथेची नायिका आहे हे निर्विवादच. पण तत्त्वांसाठी, शेजार्‍यांवर असणार्‍या प्रेमाखातर स्वार्थाचा मागे टाकणारी निरागस अगुस्तीना आणि पुढे तिची जबाबदारी स्वीकारणारी ईरीनं (/ऑगस्टीना आणि आयरीन) या दोघीही गोड आहेत.

इन्द्र्राज पवार's picture

23 Dec 2010 - 4:15 pm | इन्द्र्राज पवार

".....हा एक वेगळा (स्नेहाचा आणि सॉलिडॅरिटीचा, स्त्रीवादी) लाल धागा त्यात जाणवतो...."

Quite interesting चिं.जं. ~ तुमच्या या प्रतिसादाने मला गेल्या वीस वर्षात सातत्याने आपल्या अविस्मरणीय निर्मितीमुळे हॉलिवूडमध्ये आघाडीचे नाव बनलेला दिग्दर्शक मार्टिन स्कोरसेसे आठवला. त्याने निर्माण केलेल्या एका डॉक्युमेंटरीमध्ये (A Personal Journey with Martin Scorsese Through American Movies) चित्रपटातील 'रंगाचे' महत्व विशद केले आहे. कल्पक दिग्दर्शक नेमक्या कोणत्या प्रसंगासाठी फ्रेमवर कुठला रंग येणे आवश्यक ठरवितो त्याचे सुंदर विवेचन हे मार्टिन यानी Leave Her to Heaven तसेच Phantom of the Opera या दोन (आणि अन्य... ज्यांची नावे आता या क्षणी मला आठवत नाहीत) उदाहरणावरून दिली आहेत. ते म्हणतात, "या चित्रपटांतील रंगांचा नेमका वापर मला खूप प्रभावित करून गेले आणि ते पाहतानाच माझा निर्धार पक्का होत गेला की, भविष्यात मला चित्रपट निर्मिती करता आली तर कथानकासाठी नेमके कोणते रंग घेतले पाहिजेत हे मी प्रथम ठरवीन."

तुम्ही म्हणता तसा 'लाल' स्नेहाचा, सॉलिडॅरिटीचा तर असतोच पण ढोबळमानाने हॉलिवूडच्या नामांकित दिग्दर्शकांना तो क्रांतीचा (तसेच द्वेष, चीड, संताप, भावनावेग) वाटतो. डेव्हिड लीनने तर डॉक्टर झिवागोसाठी बर्फाच्या रूपाने केलेला "पांढर्‍या" रंगाचा सढळ वापर हे युरीच्या सरळसोट स्वभावाचे लक्षणीय उदाहरण ठरले....तसेच स्टीव्हन स्पिएलबर्गने जाणीवपूर्वक "शिंडलर्स लिस्ट" कृष्णधवल निर्मित केला, त्याचेही कारण त्याला कथानकासाठी हवे असणारे काळे-पांढरे दोन रंग.

(फार छान आहे हा विषय, खरे तर !!....पण धागा भरकटेल असे वाटत असल्याने थांबतो)

इन्द्रा

गणपा's picture

23 Dec 2010 - 4:28 pm | गणपा

इंद्रदा या विषयावर एक नवा लेख होउन जाउद्या ना.

इन्द्र्राज पवार's picture

23 Dec 2010 - 6:29 pm | इन्द्र्राज पवार

थॅन्क्स....सूचना चांगलीच आहे. जरूर स्वतंत्र धाग्याच्या रूपाने लिहिण्याचा प्रयत्न करतो.

इन्द्रा

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Dec 2010 - 7:20 pm | बिपिन कार्यकर्ते

वाट बघतोय. आधीच्या आश्वासानंसारखे नको. :)

इन्द्र्राज पवार's picture

23 Dec 2010 - 7:39 pm | इन्द्र्राज पवार

गॉश्श्श......तुमच्या स्वींगरने माझी दांडीच उडाली, बिपिन जी.

पण "आधीच्या" आश्वासनातील 'माझा' पार्ट मी तयार केला होता, हे तुम्हीच काय पण त्यातील अन्य सभासददेखील जाणून आहेत. "संपादकां"नीच बाळ जन्माला येण्याच्या अगोदर मयत घोषीत केल्याने माझ्याकडील तो भाग पडून राहिला.....जो मी संधी आणि योग्य वेळ येताच स्वतंत्रपणे इथे प्रकाशित करू शकतो.

(बाय द वे, यू आर रिअली अ विट्टी फेलो....आय बिलिव्ह !)

इन्द्रा

टारझन's picture

23 Dec 2010 - 9:06 pm | टारझन

(बाय द वे, यू आर रिअली अ विट्टी फेलो....आय बिलिव्ह !)

शक्यता नाकारता येत नाहि.

- इंद्रिल