रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
12 Nov 2010 - 11:58 am

‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन

श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.

‘रानमेवा’

११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे.
‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी.
* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा.
* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.
* ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.

धन्यवाद!
. आपला स्नेहांकित
. गंगाधर मुटे
.....................

रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.
.....................

रानमेवाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.
.....................

रानमेवाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
....................

रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी
..................

रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अ‍ॅड उमरीकर इत्यादी
...................

थोडा हास्यविनोद.
......................

उपस्थित जनसमुदाय.
............................................

कवितावाङ्मयबातमीमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

12 Nov 2010 - 11:59 am | अवलिया

अभिनंदन !!

:)

सहज's picture

12 Nov 2010 - 12:10 pm | सहज

हार्दीक अभिनंदन!

मनापासुन अभिनंदन ...

साईट्स ब्लॉक असल्याने फोटो पाहु शकलो नाही ..
नक्की बगेन बाहेर जावुन ..
तुमची प्रगती अशीच वाढत जावो ...

नगरीनिरंजन's picture

12 Nov 2010 - 1:05 pm | नगरीनिरंजन

अभिनंदन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2010 - 2:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन.......!
एवढ्यावर थांबू नका. अजून येऊ द्या कवितासंग्रह.

-दिलीप बिरुटे

विलासराव's picture

12 Nov 2010 - 6:55 pm | विलासराव

मनःपुर्वक अभिनंदन.

धमाल मुलगा's picture

12 Nov 2010 - 7:16 pm | धमाल मुलगा

अभिनंदन...अभिनंदन :)

पिंगू's picture

12 Nov 2010 - 7:58 pm | पिंगू

मुटे साहेबांचे विशेष अभिनंदन..

- शुभेच्छुक पिंगू

डावखुरा's picture

12 Nov 2010 - 8:12 pm | डावखुरा

अभिनंदन..तसेच प्रा.डॉ.शी सहमत...

गंगाधर मुटे's picture

14 Nov 2010 - 7:07 am | गंगाधर मुटे

खूप खूप आभारी आहे सर्वांचा..

गवि's picture

16 Nov 2010 - 1:35 pm | गवि

सर्..वाचायला थोडा उशीर झाला.

मनापासून अभिनंदन..

अशीच अजून पुस्तकं येऊ देत.

मिळवून वाचतो.

आधीही तुमचा ब्लॉग वाचत असल्याने काही वाचन झालेच आहे.

गंगाधर मुटे's picture

19 Dec 2010 - 9:37 pm | गंगाधर मुटे

आज 'सकाळ' 'सप्तरंग पुरवणीने' 'रानमेवा' ची दखल घेतली.
.
थोडा ’रानमेवा’ खाऊ चला!
..................................................

’रानमेवा’

.................................................

पुष्करिणी's picture

20 Dec 2010 - 12:04 am | पुष्करिणी

मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

शहराजाद's picture

20 Dec 2010 - 12:34 am | शहराजाद

अभिनंदन आणि पुलेशु.