नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

अनुप्रिया's picture
अनुप्रिया in जनातलं, मनातलं
9 Nov 2010 - 9:24 pm

14 November 2010

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील. त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून दिनांक

१४ नोव्हेंबर रोजी एक नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

असणार आहे. इंटरनेट वर लिहीणारे कवी लेखक आणि नेटवरील साहित्याचे वाचक या संमेलनात सामिल होत आहेत. या संमेलनात तुम्ही स्वतःच्या कविता वाचू शकता. किंवा आजवर ज्या लेखक कवींची ई पुस्तके तुम्ही वाचली, किंवा ब्लॉग आणि ई नियतकालिकांद्वारे ज्यांचे लिखाण आजवर वाचले त्यांना प्रत्यक्ष भेटू शकता.

या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वतःची कविता वाचू इच्छिणार्‍यांनी किंवा प्रेक्षक म्हणून हजर राहू इच्छिणार्‍यांनी कृपया
सुमन परब(09820112526)
किंवा
मकरंद सावंत( 08082044004)
यांच्याशी संपर्क साधावा आणि आपला विनामूल्य पास मिळवावा. किंवा
esahity@gmail.com
वर नांव नोंदवावे. ऑर्कुट आणि फ़ेसबुकवर देखिल आपण नांव नोंदवू शकता.

स्थळ :
ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय, स्टेशन रोड, तलावपाळी जवळ, ठाणे
वेळ :
रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१०, संध्याकाळी ४ ते ७ वा.

आपल्या मित्र मैत्रिणींना हा मेसेज फ़ॉरवर्ड करा.

--
ई साहित्य प्रतिष्ठान

कलासंस्कृतीभाषासाहित्यिकसमाजप्रकटन

प्रतिक्रिया

विकास's picture

9 Nov 2010 - 10:59 pm | विकास

अरे वा! चांगला उपक्रम आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!

कार्यक्रम पार पडल्यावर येथे वृत्तांत सांगावात ही विनंती.

इनोबा म्हणे's picture

9 Nov 2010 - 11:09 pm | इनोबा म्हणे

अतिशय चांगली कल्पना आहे. नेटकर्‍यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे सहभागी करुन घेत असावेत.

-इनोबा

अवलिया's picture

10 Nov 2010 - 11:30 am | अवलिया

चांगला उपक्रम.