अघटीत!!

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
12 Oct 2010 - 2:58 pm

एक जुनी चांगली मैत्रीण, कॉलेजमधे एकदम बब्ली गर्ल, एकदम एंथु, अस्खलीत ईंग्रजी बोलणरी, जगाची माहिती असणारी, सुंदर, चुलबुली, सर्वांना ती खुप आवडयची, मनमोकळा स्वभाव, हसत खेळत रहाणारी एक गोड मुलगी. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस टच मधे नव्हती.. गेले बरेच दिवस अचानक अचानक खुपच सोशल झाली.. मला शंका आली.. पण म्हंटल की असेल बुवा. कधी कधी ऑनलाईन यायची.. खुप विनोद करायची. आणि विनोदाची अपेक्षा ठेवायची. मला वाटलं काहीतरी चुकतय. मध्यंतरी एका मिपा सदस्याच्या कार्यक्रमाला तिला बोलावलं होतं, काही कारण काढुन तिने टाळलं. पुन्हा बरेच दिवस गेले, मग अचानक फिलॉसॉफिकल कोट्स, वेगवेगळे स्टेटसेस. मला कळत होतं की काहीतरी बिनसलय, पण विचारायची हिम्मत केली नाही आणि मग मध्यंतरी वेळही मिळाला नाही.
अचानक एक दिवस गबोल वर हाय म्हणाली.. मी चक्रावलो, ही कधीही ऑनलाईन येत नाही, आणि आज अचानक हाय??
का ब्वॉ? मी थोड्या गप्पा मारल्या, मग थोडीशी फ्रस्ट आहे असे वाटलं. विषय तिथेच थांबला.
पुन्हा एकदा ऑनलाईन आली.
ती: हाय
मी: कशी आहेस?
ती: मी मजेत, तुझं काय चाल्लय?
मी: (साशंक) मी पण मजेत. कुठे आहेस?
ती: मला जॉब हवा आहे, काहीही करुन.
मी: मी तुला आधीच बोललो होतो, पुणे, मुंबई मधे ये, आणि पुढचे करीयर बघ म्हणुन, तेव्हा तुला तुझ्या छोट्या जगात समाधानी वाटत होतं.
ती: अरे मी सद्ध्या आपल्या कॉलेज मधे एलसी घ्यायला आले आहे, माझं हरवलं आणि कंपनी मागत आहे.
बराच वेळ मग मी तु मुलगी आहेस, तुला हा सेंस नाही , तो नाही असा विनोद करत होतो, मग शेवटी ती सिरिअस झाली.
मी: सगळं व्यवस्थित आहे ना?
ती: नाही रे.. सद्ध्या थोडीशी टेंस्ड आहे.
मी: मला वाटलंच होतं, तु अचानक सोशल झालीस तेव्हा.. एक प्रश्न विचारु?
ती: काय?
मी: Did you choose the right partner?
बराच वेळ शांतता..
ती: आमचा डिवोर्स झाला, काही महिने झाले.
मी: निशब्द.
ती: मला तुझी मदत हवी आहे, पुण्यात तुझ्या काही मैत्रिणींना रुममेटची गरज असेल तर मला नक्की सांग. माझी कंपनी माझ्या ताईच्या घरापासुन बरीच लांब आहे..
मला खरं कारण समजत होतं, मुलगी नव्हे स्त्री, तिला तिच्या लग्न झालेल्या बहिणिच्या घरात किती दिवस जागा मिळणार होती. आणि आई वडिलांच्या घरी आजुबाजुला किती दिवस टोमणे खात फिरणार होती? म्हणतात ना, मारणार्‍याचे हात धरता येतात, बोलणार्‍याचे तोंड नाही.

ती: मी खोटं बोलले तुझ्याशी, माझम एलसी हरवलं नाही, ते माझ्या नवर्‍याजवळ आहे, आणि तो परत देत नाहीये, म्हणून मी ड्युप्लीकेट काढायला आले होते.
मी: तो खुप दारु/नशा करतो का?
ती: ........
ती: तो चांगला आहे, पण प्रत्येक गोष्ट जमेलच असे नाही दोघांत.
यावेळी काय बोलायचं असतं मला माहित नव्हतं. पण तरी
मी: सद्ध्या खुप सार्‍या कंपनी मधे ओपनींग्स आहेत, थोडा आत्मविश्वास ठेव, सगळ सुरळीत होईल.
ती: मला स्वतःला खुप व्यस्त करुन घ्यायचं आहे.
मी: उगाच स्वतःला शिक्षा देऊ नकोस.
ती: नाही, पण सद्ध्या तरी.
मी: ओके.
ती: तुला खुप त्रास देतेय, पण रुमसाठी नक्की बघ.
मी: नक्की.
ती:........

शेवटी मीचः ठीक आहे, बाय.
ती : बाय.

पुन्हा मी निशब्द!!!

समाजजीवनमानराहणीविचारअनुभव

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

12 Oct 2010 - 3:13 pm | इंटरनेटस्नेही

अरेरे! :(

गणेशा's picture

12 Oct 2010 - 3:14 pm | गणेशा

एक जुनी चांगली मैत्रीण .....

तर तुम्ही निशब्द न होता .. तिला मदत करावी असे वाटते.

'मदत' हा शब्द जरी म्हंटला असला तरी नात्याच्या निखळतेमध्ये तो कधी पुसट होत जातो कळत ही नाही ..

असो जास्त लिहित नाही .. कारण शब्दांपलीकडले जग वेगळे असते हे माहीत आहे .

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Oct 2010 - 3:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका मित्राच्या बायकोची गोष्ट ऐकीवात आली, साधारण अशाच पद्धतीची. माणसं वेगवेगळ्या नात्यांत किती वेगवेगळी वागू शकतात याचा विचार त्रास देऊन गेला. आमच्या या मित्राच्या बायकोसाठी आणि तुझ्या या मैत्रिणीसाठी मनापासून शुभेच्छा!

स्वाती२'s picture

12 Oct 2010 - 5:09 pm | स्वाती२

च्च! वाईट वाटले वाचून. तुमच्या मैत्रिणीला शुभेच्छा!
माणसं वेगवेगळ्या नात्यांत किती वेगवेगळी वागू शकतात याचा विचार त्रास देऊन गेला.
खरे आहे अदिती. आपल्याला माहित असलेली व्यक्ती हिच का असा प्रश्न पडतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Oct 2010 - 5:50 pm | बिपिन कार्यकर्ते

हम्म्म!!!

निवेदिता-ताई's picture

12 Oct 2010 - 5:59 pm | निवेदिता-ताई

एक जुनी चांगली मैत्रीण .....

तर तुम्ही निशब्द न होता .. तिला मदत करावी असे वाटते.

मलाही तसेच वाटते..........तुम्ही तिला मदत करावी.
राखावी बहुतांची अंतरे..................

नगरीनिरंजन's picture

12 Oct 2010 - 6:18 pm | नगरीनिरंजन

आजकाल हे तितकंस अघटीत राहिलेलं नाही. एकप्रकारे योग्यच आहे. एखाद्या माणसाबरोबर पटत नसेल तर वेगळं झालेलं बरं. तुमच्या मैत्रिणीला सुरुवातीला थोडा त्रास होईल पण कमीतकमी स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीने तरी जगू शकेल.

इंटरनेटस्नेही's picture

12 Oct 2010 - 6:26 pm | इंटरनेटस्नेही

.

निरंजन जी , आपले म्हणने मनात जावुन खुप टोचत असले तरी काही प्रमाणात ते योग्य ही असु शकते.
परंतु नात्यातील ही अवस्था, यात अघटीत असे राहिलेले नाही आता असे म्हणताना ही वाईट वाटते .. माणसाने पटत नसले की नाते तोडुन बरे केले असा विचार करे पर्यंत परिस्थीती न येवुन दिलेली कधीही चांगली असे वाटते.. असो नाईलाज असु शकतो तरीही काही गोष्टींचा विचार व्हावा असे वाटते ..

-- >>

कुठलेही नाते असुद्या, ते नाते नितळ असते ... परंतू नात्यांवरील अपेक्षांनी त्या नात्याताली बंध कधी निखळले जातात तेच कळत नाही .
आणि मग उरते एक निशब्द शांतता .. निखळलेल्या नितळपणाचा शोध माणसाचे मन नंतर करत असते .. पण तेंव्हा हाती काहीच नसते , कारण उरलेली असते ती माणुसकीच्या नात्यांची फक्त झालर असलेली स्वकीयांची मांदिआळी ..

स्वमार्ग म्हणजे स्वताचा एकला मार्ग हा अर्थच मुळी कधी जीवनात लागु होत नाही, स्वमार्ग म्हणजे स्व कर्तुत्वाने, आपुलकीने सर्वांसमवेत पुढे जाणे ... हे ज्याला कळले तो समाधानी.

- गणेशा

सुहास..'s picture

12 Oct 2010 - 6:58 pm | सुहास..

पुन्हा मी निशब्द!!! >>>

आणी मीही .....

प्राजु's picture

12 Oct 2010 - 7:00 pm | प्राजु

या गोष्टी होत असतात. पण आपल्या जवळाच्या सोबत जेव्हा घडतात तेव्हा त्यातली तीव्रता आपल्याला जाणवते.
तुझ्या मैत्रीणीला मनापासून शुभेच्छा!

पैसा's picture

12 Oct 2010 - 9:11 pm | पैसा

यावेळी तिला जास्त भावनिक आधार हवा आहे. जमेल तेवढी मदत तुम्ही करालच.

शिल्पा ब's picture

12 Oct 2010 - 10:27 pm | शिल्पा ब

ठीक आहे...उगाच मानसिक त्रासात आयुष्य घालवण्यापेक्षा हे जास्त चांगलं...आणि सुदैवाने तिच्या आई वडिलांनी तिला चांगले शिकवले असे दिसते...त्यामुळे (किमान बऱ्या पगाराची )नोकरी करेलच हे उत्तम....आणि पुढे मागे ओळखी झाल्यावर दुसरा एखादा जुळवून घेण्यायोग्य जोडीदार मिळेलच कि..आता सध्या मात्र मानसिक आधाराची गरज आहे.