सब सूर तीवर मेल मिलायो..(ओळख..)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
9 Oct 2010 - 10:23 pm

राम राम मंडळी,

पं यशवंतबुवा महाले.. यांच्याबद्दल मी इथे फार काही लिहीत नाही कारण या पूर्वी त्यांच्यावर मी एक लेख मिपावर लिहिला आहे. उत्सुकांनी तो अवश्य वाचावा. एकच सांगतो, की आजवर संगीतक्षेत्रात जी काही आभाळाइतकी मोठी माणसं पाहिली त्या पैकी आमचे महालेबुवा एक. महालेबुवा मला गुरू म्हणून लाभले हे माझं फार मोठं भाग्य..!

http://www.ragas4u.com/ - हे एक आपल्या हिंदुस्थानी राग संगीतावर आधारीत असे संकेतस्थळ. त्या संस्थळ चालकांचा मनोदय असा की आपल्या रागसंगीताची सगळ्यांना माहिती व्हावी, अधिकाधिक प्रचार व्हावा.. आणि म्हणून त्या संस्थळावर त्यांनी आपल्या रागसंगीतातील विविध रागरागिण्यासंदर्भात ओळख स्वरुपात माहिती करून देण्याचे ठरवले व त्याची जिम्मेदारी आमच्या महालेबुवांवर टाकली..

आपण हे संस्थ़ळ पाहालच अशी आशा करतो..प्रत्येक रागाचा आरोह-अवरोह, त्याचं लक्षणगीत, त्याचं सरगमगीत, आणि त्या रागातली एक बंदिश - अश्या स्वरुपात श्रोत्यांना त्या रागाची ओळख होऊ शकेल.

ध्वनिमुद्रण ऐकण्यापूर्वी या संस्थळाचं सभासदत्व घेणं आवश्यक आहे, जे विनामूल्य आहे. त्यानंतरच आपल्याला तेथील ध्वनिमुद्रण ऐकता येईल..

या संस्थळावर उपलब्ध असणार्‍या विविध रागांवर काही भाष्य करून एक लेखमाला लिहायचा माझा मनोदय आहे. हा त्या लेखमालेचा ओळखस्वरुप भाग..

तरी आपण सर्वांनी या संस्थळाचा अवश्य लाभ घ्यावा व समृद्ध व्हावे, श्रीमंत व्हावे ही इच्छा..

तूर्तास सभासदत्व घ्या आणि आमच्या लाडक्या यमनचं 'सब सूर तीवर मेल मिलायो..' हे लक्षणगीत ऐका एवढीच विनंती.. तात्या अभ्यंकरांचं यावरील भाष्य पुढील भागात..!

आजच्या तरूण पिढीतली गुणी गायिका व माझी मैत्रिण आणि गुरुभगिनी - सौ वरदा गोडबोले हिनं हे लक्षणगीत गायलं आहे..

हे आमचे गुरू पं यशवंतबुवा महाले आणि त्यांच्या सौभाग्यवती.
महालेबुवांकडून मला खूप काही मिळालं, मिळत आहे. महालेकाकूंच्या हातच्या सारस्वती मासळीचा मी जन्माचा ऋणी आहे..!

असो..

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
विद्यार्थी, प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

संगीतवाङ्मयआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

10 Oct 2010 - 8:25 am | आनंदयात्री

या लिंकसाठी धन्यवाद तात्या.
संस्थळ छान आहे.

स्वाती२'s picture

10 Oct 2010 - 5:20 pm | स्वाती२

धन्यवाद!

मला पेज नॉट फाउंड असेच येत होते.

विसोबा खेचर's picture

11 Oct 2010 - 10:36 am | विसोबा खेचर

आपण कोणता ब्राउजर वापरता? फायरफॉक्सवर संस्थळाचं सभासदत्व न घेताही परस्पर दुव्यावर जाऊन ऐकता येत आहे..

असो,

आनंदराव, यात्रीचे आणि स्वातीचे आभार..

तात्या.