नमस्कार मंडळी,
एकदा असाच मनात विचार आला, आपण काय जपुन ठेवतो बरं? पैसा? माणसं? सुखं? ईतर काही?
नाही.. मग काय? तर आठवणी. ज्या कायम सोबत राहतात, अगदी मरेपर्यंत. बाकी सगळं क्षणिक. नाही का?
**************************************************
आज नविनच लोकांना भेटलो, कधी विचारच काय तर कल्पना सुद्धा केली नव्हती. एका मित्राला भेटायला काय गेलो आणि एक नविन विश्व पाहुन आलो. शनिवार रात्र म्हणुन पार्टी चालु होती तिथे, नविन चेहरे, नविन लोकं, खरं तर मित्राला बरोबर घेउन लगेच निघायचे होते तिथुन पण हे लोकं एवढे आग्रही होते की मला तिथे तास दोन तास थांबायला भाग पडलं. पहिल्यांदाच मार्गारिटा प्याली, आवडली. :)
फिजी.. कधी काळी फक्त ऐकुन असलेला एक देश, कुठे आहे हे सुद्धा माहित नाही. मी तिथे गेलो आणि त्यांनी मी ईंडीयन आहे म्हंटल्यावर माझे पाय खेचायला सुरुवात केली. (पण मी अस्सल पुणेकर्+मुंबईकर असल्याने त्यांची डाळ काही शिजली नाही.. ;) )
असो.. तर थोड्या वेळानंतर हे लोकं म्हणजे सगळे हिंदू आणि मुळ भारतीय असलेले लोकं भारताबद्दल्/हिंदूत्वाबद्दलच्या शंका कुशंकांच निरसन माझ्या थोड्याफार ज्ञानामधुन शोधु लागले, (मनातल्या मनात मी शॉक्ड होतो, फिजी बद्दल काहीच माहिती नव्हतं.) पण एवढं कळालं की हे कधी काळी भारतातुन तिथे स्थायीक झाली आणि तिथलेच झाले. भारतापासुन कितीतरी हजारो मैल लांब पण आजही भारतीय सिनेमे पाहतात, हिंदी बोलतात, भारतीय पद्धतीचे जेवण जेवतात पाहुन मी अवाक झालो होतो.
मग मी काय करतो, खातो, शिर्डीचे साईबाबा - सत्य श्री साईबाबा मधला फरक, मी हिंदू धर्माला मानतो का? पित्रुपक्ष भारतात कसा करतात (खरं तर इथे मला चक्कर आली होती.. फिजी मधे पित्रुपक्ष??? बापरे.. ) देवाची पुजा कशी करतात.. (थोड्या वेळाने कशी करावी इथपर्यंत वेळ आली होती.)
मग इथे भटजी लोकं आम्हाला काहीही सांगुन कसलीही पुजा करायला लावतात आणि हजारो डॉलर्स घेउन जातात असा वादविवाद सुरु झाला, त्यावरुन त्यांच्यामधे आपसात खुपच वाद झाला, मी गप्प बसुन नुसता ऐकत होतो, पण मला मधे खेचलच आणि गुरुजी बोलतात तेव्हा सगळा वर्ग शांत असतो तसा मी बोलताना सगळे लहान मुलासारखे ऐकत होते, अर्थात मी माझ्या तुटक्या-फाटक्या ज्ञानाप्रमाणे माझे मत मांडले (काही मिपाकरांची फार आठवण झाली.. मनात लाज वाटली, पण काय करु? वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार होता)
शेवटी मला निघणं भाग होतं तिथुन, पण मन काही निघत नव्हतं.
वाटलं की जग किती मोठं आहे आणि आयुष्य किती छोटं...
अजुनही बरीच माहिती मिळवायची आहे खरं तर, मे बी नेक्स्ट टाइम, विथ सम मोअर मार्गारिटाज्...
आपलाच,
प्रतिक्रिया
26 Sep 2010 - 5:30 pm | सहज
फिजी म्हणले की आठवतो तो कर्नल राबुका. नंतर विजय सिंग.
अजुनही बरीच माहिती मिळवायची आहे - हे तर पदोपदी वाटत असते :-)
अजुन सांगा हो ममो!
26 Sep 2010 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन सांगा हो ममो !
-दिलीप बिरुटे
26 Sep 2010 - 8:41 pm | पैसा
+१
पृथ्वी गोल आहे!
26 Sep 2010 - 8:34 pm | शुचि
एक आगळा हृदयस्पर्शी अनुभवच म्हणायचा हा.
26 Sep 2010 - 8:39 pm | भडकमकर मास्तर
अम्हाला तर फिजी म्हटलं की जॉर्ज स्पैट आणि महेन्द्र चौधरी आठवतात....
26 Sep 2010 - 8:43 pm | सुनील
मग इथे भटजी लोकं आम्हाला काहीही सांगुन कसलीही पुजा करायला लावतात आणि हजारो डॉलर्स घेउन जातात असा वादविवाद सुरु झाला,
तिथेच स्थायिक व्हा हो! "सदा सर्वदा" म्हणायचे आणि फक्त १०१ डॉलर्स घ्यायचे. सगळ्या भटजींची छुट्टी!!!
अजून माहिती येऊदे.
26 Sep 2010 - 8:50 pm | बिपिन कार्यकर्ते
फिजी हे नाव लहानपणी, ते लफडं झालं, तेव्हा ऐकलं आणि मग बरीच ओळख होत गेली. अजून कधी फिजीकरांना भेटायचा योग आलेला नाहीये. ममो, अजून भेट यार त्या लोकांना आणि लिहि ना. प्लिज.
26 Sep 2010 - 9:28 pm | श्रावण मोडक
तरीच मागल्या दौऱ्यात तिथून हुश्श, सुटलो वगैरे ऐकू येत होतं. ;)
26 Sep 2010 - 11:08 pm | बिपिन कार्यकर्ते
स्कोअर सेटलिंगचा निषेध.
26 Sep 2010 - 9:55 pm | सुहास..
काही मिपाकरांची फार आठवण झाली.. मनात लाज वाटली, पण काय करु >>>
तरी धम्याला ऊचक्या लागत होत्या
27 Sep 2010 - 5:13 pm | निखिल देशपांडे
ओ मालक ईतकच
अजुन सविस्तर लिहा ना फिजी बद्दल
28 Sep 2010 - 2:39 am | अश्विनीका
माझ्या मुलीला शाळेत पॅसिफिक रिम कंट्रीज या प्रोजेक्ट अंतर्गत फिजी देश अभ्यासण्यासाठी मिळाला होता. त्यावेळी तिने त्यावर बरेच शोधन करून छानसा रीपोर्ट आणि प्रेझेंटेशन बोर्ड बनवला होता. त्यावेळी मुलीबरोबर मलाही बरिच नवीन माहिती मिळाली होती. घराजवळच रहाणार्या एका फिजियन बाईंशी पण ओळख झाली त्यावेळी.
फिजीमध्ये हिंदू लोक रहातात आणि ते हिंदी बोलतात हे आधी माहिती नव्हते.
हे भारतातून स्थलांतरीत झालेले लोक आहेत आणि त्यांचे आचार बरचसे भारतियांप्रमाणेच आहेत. जालावर शोधल्यास खूप रोचक माहिती मिळेल. पण तुम्ही तर प्रत्यक्षात जाऊन आल्याने तुमचे अनुभव अजून रोचक असतील .
30 Sep 2010 - 3:49 pm | मराठमोळा
या लेखातले दोन मोठे पॅरेग्राफ लेख प्रकाशित करताना तांत्रिक बिघाडामुळे (साईटच्या किंवा ईंटरनेट्च्या)गंडले. हे झाल्यामुळे मी फिजीला गेलो होतो असाही गैरसमज झाला असेल काहींना. :(
सेव करणे नेहमी लक्षात रहात नाही. काय करावं?
आज सुद्धा एका व्यनीला रिप्लाय देताना "पेज कॅन नॉट बी डिस्प्लेयड" चा मेसेज आला.
असं काही झालं की पुन्हा टंकण्याचा हुरुप रहात नाही. काही उपाय आहे का?
30 Sep 2010 - 3:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या फाफॉमधे अशा वेळेस बॅक बटण दाबलं तरी काम होतं. तू कोणता ब्राऊझर वापरतोस?
30 Sep 2010 - 4:01 pm | मराठमोळा
आयई आणि क्रोम..