फसू नका तुम्ही फसू नका

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
16 Sep 2010 - 11:00 am

फसू नका तुम्ही फसू नका

विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||

लांब दाढी कपाळी टिळा
बोटात अंगठ्या गळ्यात माळा
समोर पोपट चिठ्ठी काढतो
त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो

गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय?

अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||१||

देई गंडा ताईत दोरा
अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा
राशी ग्रह नक्षत्र कामाला लावी
पोट भरण्या तुम्हाला फसवी

गद्य: अशा भोंदूला त्याच्या जीवनात समस्या नसतात का?

अशा भोंदूकडे तुम्ही जावू नका, जावू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||२||

कुणी तळहात भविष्यासाठी पाहतो
कुणी तळपायाकडे त्यासाठी जातो
कुणी चेहेरा पाहून भविष्य सांगे
कुणी त्यासाठी कुंडली मांडे

गद्य: अहो ज्योतिष पाहण्याच्या कितीतरी अजब ह्या तर्‍हा?

अशा लफग्यांच्या नादी तुम्ही लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||३||

कुणी घरी येवून भविष्य सांगे
कुणी आजारपणावर उपाय सांगे
कुणी हॉटेलात ऑफीस काढी
कुणी आंतरजाळावरी घागा सोडी

गद्य: ज्योतिष हा 'धंदा' आहे अन 'धंद्यात' फसवणूक चालते, ग्राहकराजा जागा हो!

अशा व्यापार्‍यांच्या दुकानी तुम्ही जावू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||४||

विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०९/२०१०

शांतरसकवितासमाजफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशी

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

16 Sep 2010 - 11:17 am | अमोल केळकर

खुप छान . आम्हीही अशीच एक कविता केली होती काही वर्षापुर्वी की बाबानो जोतिषाच्या जास्त मागे लागू नका :)

( जोतिषी ) अमोल केळकर

(सदैव माणसा, पुढेच जायचे )
चाल :सदैव सैनिका, पुढेच जायचे
------------------------------------------------
सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे

सदा तुझ्यापुढे, असे महा दशा
सदैव फसवी टॅरोट्ची दिशा
हळूच ग्रह हे,राशीस ग्रासती
मधेच या नाडी, निर्गाठ मारती
बारा जागेतुनी, हळूच जायचे

प्रलोभने तुला हे स्वामी दाविती
ही जन्मकुंडली तूलाच बाधिती,
मंगळ, शनी हा तुला न थांबवी
न चंद्र ग्रहणे, आयुष्य घडवी
न भविष्य तुझे, असे घडायचे

सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे

पाषाणभेद's picture

16 Sep 2010 - 2:48 pm | पाषाणभेद

अगदी मस्त काव्य आहे अमोल तुझे. वास्तव आहे तेच लिहीले आहे.

अवांतर:
कुणी हॉटेलात ऑफीस काढी
कुणी आंतरजाळावरी घागा सोडी

च्या ऐवजी

कुणी हॉटेलात ऑफीस उघडी
कुणी आंतरजाळावरी घागा* काढी

*(किंवा संस्थळ काढी)

असे वाचावे.