रक्षा हेच बंधन

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
24 Aug 2010 - 9:08 am

एखाद्या व्यक्तिचं रक्षण करायचं म्हटलं की रक्षणकर्त्याला चांगलं चुंगलं अन्न भक्षण करुन बॉडी कमवावी लागते. परंतु आजच्या सुप्परफास्ट युगात बहुतेक तरुण बंधूराजांचं फास्टीँगच होत असतं. तरीही येनकन प्रकारे जगातील सगळेच बांधव जर बॉडी बिल्डर झाले तर सर्वांचा भगिनीवर्ग सुरक्षित राहील अन् आरक्षितही!
एखाद्या बहिणीकडून औक्षण करवून घेतले की तिचे रक्षण करणे भावाचे कर्तव्यच असते. आजकाल बहुतेक कुटुंबे ही त्रिकोणी राहण्यातच समाधान मानतात. अशा कुटुंबातील एकल भावांना बहिणीँचा हट्ट, मस्करी, रुसवे फुगवे काय डीव्हीडी लावून दाखवायचे? येत्या काही दशकात हेही करावे लागेल की काय कोण जाणे? 'एक या दो बस्स' या हिँदी घोषवाक्याचा हा मराठी परिणाम आहे. लोकसंख्येला लगाम घालण्याच्या नादामुळेच ही परिस्थिती उद्भवलीय.
एकंदर काय तर भावाला बहिणीचं प्रेम अन् बहिणीला भावाची माया समजावून सांगावी लागणार आहे. चिमणीच्या दाताने गोळ्या बिस्किटांचे तुकडे कसे शेअर करायचे, कमीअधिक वाटणी झाल्यावर कसा आरडाओरडा करायचा याचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी पाळणाघरे निघाली तर नवल वाटण्याचं कारण नाही.
त्यातही भरीस भर म्हणून की काय एका प्रश्नाकडे काणाडोळा करून चालणार नाही. तो ज्वलंत प्रश्न म्हणजे घसरत गेलेला मुलीँचा आकडा. लिँगपरीक्षण करुन काही महाभागांनी फक्त भावांनाच जन्माला घातले असून त्यांच्या बहिणींना पोटात असतांनाच मूठमाती दिलीय. म्हणजे भावा बहिणींची गाठभेट व्हावी हे समाजाच्याच मनात नाहीये तर आपण इकडे काथ्याकूट करून काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा राखी बांधून घेणारे हात असंख्य आहेत परंतु राखी बांधणाऱ्‍या भगिनीँचा तुटवडा येत्या पाचपन्नास वर्षांत नक्कीच जाणवेल हे आजच्या बंधूराजांनी मनावर घेण्याची गरज आहे...
असो.
भावाबहिणींच्या या पवित्र बंधनाचा उत्सव सर्वांना लखलाभ असो हीच सदिच्छा...

संस्कृतीसमाजजीवनमानसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

सगळे पुरुष जर भाऊ अन स्त्रिया बहिणी (एकमेकांच्या )झाल्या तर लोकसंखेला आळा बसू शकेलसे वाटते...मान्यवरांचे काय म्हणणे आहे?

अनामिक's picture

24 Aug 2010 - 7:23 pm | अनामिक

'एक या दो बस्स' या हिँदी घोषवाक्याचा हा मराठी परिणाम आहे.

खरं आहे. आमच्या ऑफिसातल्या डेबीलापण रक्षाबंधन आवडते... म्हणूनच की काय ती चार पोरी झाल्यावरही थांबली नाही... पाचव्याच्या तयारीत आहे. रक्षा करायला भाऊ नको?