आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही.
मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.
मे महिन्यात माझ्या मुलाच्या मुंजीत त्यांच्या आवर्जून फोन आला होता आणि त्यांनी आशीर्वादही दिले होते. त्यांच्याशी झालेले ते बोलणे शेवटचे ठरावे हा दैवयोग!
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या दु:खातून लवकर बाहेर पडण्याचे बळ देवो ही प्रार्थना!
(साश्रू)चतुरंग
--------------------
सावरकर आजोबा ह्या लेखमालेचा दुवा -
http://www.misalpav.com/node/9354
प्रतिक्रिया
13 Aug 2010 - 8:10 pm | रेवती
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
13 Aug 2010 - 8:12 pm | धमाल मुलगा
:(
अरेरे.
खरं तर, कोण कुठली माणसं, पण अचानक असे बंध जुळतात आणि मग हळहळायला होतं. :(
15 Aug 2010 - 7:02 am | विकास
अरेरे.
खरं तर, कोण कुठली माणसं, पण अचानक असे बंध जुळतात आणि मग हळहळायला होतं.
अगदी असेच वाटले...
13 Aug 2010 - 8:13 pm | पर्नल नेने मराठे
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
13 Aug 2010 - 8:14 pm | स्वाती दिनेश
आजोबांना विनम्र आदराजंली.
स्वाती
13 Aug 2010 - 8:17 pm | निशदे
लेखमाला अतिशय आवडली होती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
13 Aug 2010 - 8:19 pm | वेताळ
ते एक परिपुर्ण आयुष्य जगले ह्यातच त्याच्या जीवनाचे सार्थक झाले.त्याची ओळख करुन दिल्याबद्दल मिपाकर तुमचे आभारी आहेत.
13 Aug 2010 - 8:23 pm | निखिल देशपांडे
अरेरे फार वाईट वाटले वाचुन. सावरकर आजोबांची लेखमाला खुपच आवडली होती.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
13 Aug 2010 - 8:58 pm | सुनील
हेच म्हणतो. लेखमाला आवडली होती.
13 Aug 2010 - 9:01 pm | सहज
असेच म्हणतो.
भावपूर्ण श्रद्धांजली.
14 Aug 2010 - 6:55 am | धनंजय
भावपूर्ण आदरांजली.
13 Aug 2010 - 8:24 pm | बिपिन कार्यकर्ते
अरेरे!!!
13 Aug 2010 - 8:30 pm | मदनबाण
आजोबांना विनम्र आदराजंली...
13 Aug 2010 - 10:15 pm | स्वाती२
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
13 Aug 2010 - 10:21 pm | बहुगुणी
या कर्मयोग्याची भेट झाली म्हणून तुम्ही नशिबवान, आणि आमची ओळख लेखातून झाली हे आमचं भाग्य.
एका कृतार्थ आयुष्याची अखेर झाली असली तरी त्यांचा सल्ला पुन्हा उद्धृत करावासा वाटतो:
"आपण मेहेनतीने, कष्टाने आपला अधिकार सिद्ध केला पाहिजे आणि तो टिकवून ठेवला पाहिजे. काही माहीत नसताना उगाच वायफळ चर्चा करु नका. शब्दांचे बुडबुडे काढू नका. विषयाची खोली समजून घ्या आणि मग पुढे चला. आनंदी रहा. काम करत रहा. आशा ठेवू नका. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे ही गोष्ट कधीही नजरेआड करु नका. हव्या त्या गोष्टी आपोआप मिळत जातात!"
13 Aug 2010 - 11:32 pm | नाटक्या
असेच म्हणतो..
15 Aug 2010 - 4:31 am | चित्रा
असेच म्हणते.
वाचून वाईट वाटले.
15 Aug 2010 - 5:50 am | Nile
असेच म्हणतो.
वाचून वाईट वाटले.
13 Aug 2010 - 10:35 pm | ऋषिकेश
अरेरे!
धमु म्हणतो तसे कोण कुठली लोकं.. कधीही न बघितलेली.. केवळ त्या लेखमालेतून भेटलेले आणि ही बातमी कळल्यावर जीव गलबलला!
सावरकर आजोबांना आदरांजली!
13 Aug 2010 - 10:37 pm | स्पंदना
तुमच्या दुखा:त एक सह प्रवासि म्हणुन आम्हीही सामिल आहोत.
थोडच वाचल आत्ता पण तुमच्या लिहिण्यावरुन तुम्हाला त्यांच्या बद्दल असणारा आदर व आपुलकी जाणवली.
धीर राखा!
13 Aug 2010 - 10:42 pm | नंदन
सावरकर आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली. चतुरंग यांनी शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या मनोगतात दहिसरमधले अनेक ओळखीचे उल्लेख आले होते.