मोहविते मज तव गंधीत कांती

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 May 2010 - 8:29 pm

मोहविते मज तव गंधीत कांती

चालः एखादे नाट्यपद असावे अशी चाल आहे. आपण ती चाल येथे ऐकू शकतात.
(मी काही गायक नाही. फक्त चाल ऐकण्यासाठी गाणे ऐका.)

मोहविते मज तव गंधीत कांती
रूपांग ते सुंदर दे मज हाती
मोहविते मज तव गंधीत कांती ||धृ||

लक्ष लक्ष या तारका समोर असती
वायू हे शितल आनंदे वाहती
अशा समयी राजहंस जळात पोहती
मोहविते मज तव गंधीत कांती ||१||

समीप असता यौवन हे असले
भान हे हरपले मन गुंतले
राजा अन राणी असती एकांती
मोहविते मज तव गंधीत कांती ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/०५/२०१०

शृंगारसंगीतनाट्यप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

jaypal's picture

14 May 2010 - 8:35 pm | jaypal

पाषाण सुद्धा मोहरला .
मस्त कविता.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पाषाणभेद's picture

15 May 2010 - 11:41 pm | पाषाणभेद
sur_nair's picture

16 May 2010 - 7:18 pm | sur_nair

वाचलं आणि ऐकलं देखील. प्रयत्नांना दाद देतो. मी 'लाविली थंड उटी' च्या चालीवर बसतंय का पहिले पण नीटसे जमले नाही. 'राजा राणी' हि ओळ काहीशी वेगळी हवी होती असे वाटले.

पाषाणभेद's picture

16 May 2010 - 8:30 pm | पाषाणभेद

नाटकातल्या सिच्यूयेशन प्रमाणे त्यात बदल करता येण्याजोगा आहे.
म्हणजे नाटकात/चित्रपटात राजा राणी असेल तर:

राजा अन राणी असती एकांती

राजकुमार असेल तर:
राजकुमार अन राजकुमारी एकांती

प्रियकर अन प्रेयसी असेल तर:
प्रियकरासंगे असे प्रेयसी एकांती

किंवा नाटकातल्या/चित्रपटातल्या नायक नायीकेचे नावेही टाकता येतील:
जसे :

माझ्या संगे xxx असे एकांती
किंवा फारच झाले तर:

रमेश संगे सिमा असे एकांती
अभी संगे ऐश्वर्या असे एकांती
श्रीरामासंगे माधूरी असे एकांती

असे कस्टमाईज बदल करता येण्यासाठी ती ओळ तशी ठेवली आहे. तुमच्या नाटकात /चित्रपटात कशी सिच्यूऐशन आहे ते पहा अन त्यात बदल करा.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही