हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा चरित्रनायक मॅकमोहन याचे काल निधन झाले. (मॅकमोहन यांना आदरार्थी संबोधणे अवघडच वाटते. आपण आपल्या आजीला कधी 'अहो आजी' म्हणतो का? एकेरी संबोधण्याने आजीची पदरमाया कधी कमी होते का?) 'हकीकत' या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणार्या मॅकमोहनने हिंदी पडद्यावर असंख्य अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्याचा 'सांबा' तर प्रसिद्ध आहेच, पण 'इतने पैसे के लिये तो मै अपने बाप को भी बेच दूंगा' म्हणणारा 'मजबूर' मधला त्याचा अॅन्टिक्सचा व्यापारी, 'ताश का सबसे छोटा पत्ता तिर्री नही, दुर्री होता है मेरे दोस्त' म्हणणारा 'काला पत्थर' मधला त्याचा कलाबाज ताशबहाद्दर... किती नावे घ्यावीत!
काही वर्षांपूर्वी युनुस परवेझ गेले, आज मॅकमोहन.. आता शरद सक्सेना सोडला तर हिंदी चित्रपटसृष्टीत म्हणावा असा चरित्र अभिनेता नाही, ही जाणीव काळीज भेदून जाते!
मॅकमोहन यांना मिसळपाव परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली!
प्रतिक्रिया
11 May 2010 - 12:45 pm | टारझन
मॅकमोहन ला आम्ही "सांभा" मुळेच ओळखायचो. त्याच्या गुबगुबीत गालांचं लहाणपणी मला फार कुतुहल वाटे.
मॅकमोहन ला शांती लाभो !!
- ("जी पचास हजार" च्या आठवणींत) टारझन
11 May 2010 - 12:58 pm | दत्ता काळे
मॅकमोहनला भावपूर्ण श्रध्दांजली . . .!
11 May 2010 - 1:00 pm | मदनबाण
मॅकमोहनला भावपूर्ण श्रध्दांजली !!!
मदनबाण.....
11 May 2010 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शोलेतला सांभा विसरणे शक्यच नाही.
मॅकमोहनला भावपूर्ण श्रध्दांजली !!!
-दिलीप बिरुटे
11 May 2010 - 1:57 pm | पांथस्थ
वेळ प्रसंगी माणुस कीती मोठा होऊ शकतो हे दाखवणारा हा एक नंबरचा सीन आहे.
मॅक हम तुम्हे भुला नही पायेंगे. विनम्र श्रद्धांजली.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
11 May 2010 - 2:36 pm | वाहीदा
शोले ला ही पर्याय नाही अन शोलेतल्या सांभालाही पर्याय नाही ..
मॅकमोहन हे रविना टंडन चे मामा होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..
आमीन !
अवांतर : हिंन्दी चित्रपट स्रुष्टीतिल नटांची नावे खुप विचित्र असतात . १९१४ मध्ये शिमलाच्या कॉन्फरन्समध्ये 'मॅकमोहन लाईन' बनवण्यात आली जी चिन अजूनही मानत नाही अन सीमावादाचा प्रश्न अजूनही सुटला नाही.
~ वाहीदा
11 May 2010 - 3:16 pm | अमोल नागपूरकर
ती मॅकमहोन लाईन आहे, मॅकमोहन लाईन नव्हे.
11 May 2010 - 4:12 pm | वाहीदा
नावात गफलत झाली
Thanks for correcting me :-)
~ वाहीदा
11 May 2010 - 4:49 pm | अमोल नागपूरकर
अर्थात हिन्दी चित्रपटातील चरित्र/विनोदी अभिनेत्यान्ची टोपणनावे गमतीशीर असतात हे खरे आहे. उदा:- टुनटुन (उमादेवी), जौनी वाकर (बद्रुद्दिन) , मोहन चोटी इत्यादी
11 May 2010 - 2:59 pm | भडकमकर मास्तर
लक बाय चान्स सिनेमामध्ये एक छोटी भूमिका आहे मॅकमोहनसाहेबाची...
त्यात त्याने स्वतःचा रोल केला आहे...( एका फिल्म ट्रेनिन्ग अॅकेडमीमध्ये पारितोषिक वितरणसमारंभाला आलेला मॅकमोहन विद्यार्थी -प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा शोलेतला एक डायलॉग म्हणून दाखवतो , असा काहीसा सीन होता...)... एकाच वेळी मजा वाटणे आणि उतारवयातल्या चरित्राभिनेत्याची परवड पाहून दु:खबि:ख असे प्रकार झाले... अर्थात दिग्दर्शिकेला नक्की काय अभिप्रेत होते ठाउक नाही...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?
11 May 2010 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी!
शोलेतला सांबा हिट आणि अजरामर आहे.
अदिती
11 May 2010 - 4:58 pm | मुक्तसुनीत
http://www.youtube.com/watch?v=8CYqvYqvgyQ&feature=related
11 May 2010 - 4:23 pm | बिपिन कार्यकर्ते
खरं आहे रावसाहेब... लक्षात राहिल असा माणूस.
युनुस परवेझ आणि शरद सक्सेना वगैरेंबद्दलचे निरीक्षणही खरेच आहे. युनुस परवेझतर खरंच खूप उत्तम काम करत असत. 'अंगूर' मधला सोनाराच्या दुकानातला उर्दू बोलणारा कारागीर तर अप्रतिमच होता त्यांचा.
बिपिन कार्यकर्ते
11 May 2010 - 5:16 pm | दत्ता काळे
मॅकमोहन ह्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
11 May 2010 - 6:37 pm | अरुण मनोहर
खरच नेहमी लक्षात राहील. मॅकमोहनला श्रद्धांजली.
मात्र एका गोष्टीचे वाईट वाटते. बिचारा नेहमीच व्हिलन बॉसचा उजवा किंवा डावा हात म्हणून राहीला. त्याच्या नशिबी बॉस बनणे नव्हतेच. एकदा कोणीतरी एका दिग्दर्शकाला मुलाखतीत विचारलेही होते "मॅकला तुम्ही प्रमोशन केव्हा देणार म्हणून.
ईफ्तेखार सुरवातीपासून पोलीस एसीपी किंवा कमिशनर होता. मॅकने मात्र असिस्टंट व्हिलन पोस्टवर समाधानी राहिला!
11 May 2010 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मात्र एका गोष्टीचे वाईट वाटते. बिचारा नेहमीच व्हिलन बॉसचा उजवा किंवा डावा हात म्हणून राहीला. त्याच्या नशिबी बॉस बनणे नव्हतेच. एकदा कोणीतरी एका दिग्दर्शकाला मुलाखतीत विचारलेही होते "मॅकला तुम्ही प्रमोशन केव्हा देणार म्हणून.
करेक्ट. दुपारी प्रतिसाद लिहितांना असेच लिहिणार होतो. मारधाडीत सतत मार खाण्यात आघाडीवर..एखादा तरी चित्रपट आहे का त्यांचा, की ज्यात त्यांनी मुख्य खलनायक रंगवला आहे ? तसाही बॉसचा उजवा डावा हात रंगवण्यात त्यांनी कुठे कसर ठेवली नाही असे वाटते.
-दिलीप बिरुटे
11 May 2010 - 6:47 pm | चिरोटा
आदरपूर्वक श्रद्धांजली
मॅकमोहन ह्यांनी शोलेच्या आधीही भूमिका केल्या होत्या.विशेषकरून १९६४/६५ चा गाजलेला 'हकीकत' चित्रपट्.बाकी बहुतांशी हिंदी चित्रपटांचे कथानक नायक्/नायिकांभोवतीच घुटमळत असल्याने महत्वाच्या भूमिका त्यांना कधी मिळाल्या नसाव्यात्.पण तरीही डॉन्,काला पत्थर..७०च्या दशकातल्या चाललेल्या चित्रपटांत त्यांचे अस्तित्व जाणवायचे.
भेंडी
P = NP
11 May 2010 - 7:06 pm | विकास
वरील तसेच अरूण मनोहर, बिरूटेसर यांच्या सारखेच वाटले.
मात्र तरी देखील असे वाटते की इतके अगदी दुय्यम भुमिका करून देखील लोकांच्या लक्षात राहीला आणि निधनानंतर कोणी तरी ओळखिचे गेल्याची हूरहूर लावली... यातच या कलावंतामधील कलेचे आणि मनापासून केलेल्या कलेच्या सेवेचे, व्यावहारीक दृष्ट्या नसेल कदाचीत पण किमान तात्विक (फिलॉसॉफिकली) दृष्ट्या तरी नक्कीच सार्थक झाले असे वाटते.
माझी देखील मॅकमोहनना श्रद्धांजली.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
11 May 2010 - 7:07 pm | नितिन थत्ते
>>७०च्या दशकातल्या चाललेल्या चित्रपटांत त्यांचे अस्तित्व जाणवायचे
सहमत. दाढी आणि पांढर्या केसांची बट लक्षात राहणुआसारखी.
नितिन थत्ते
11 May 2010 - 9:07 pm | भारद्वाज
मॅकमोहनला आदरपूर्वक श्रद्धांजली
सरदार बहुत खुस हुवा होगा....सांभा उसे मिलने जो गया है ।
12 May 2010 - 4:19 am | केशवराव
मॅकमोहन यांना श्रध्दांजली !!!
12 May 2010 - 6:15 pm | डॉ.प्रसाद दाढे
मॅकमोहनला माझी श्रद्धांजली.. अशी कितीतरी मंडळी आपण
चित्रपटात पाहतो ज्यांचे काम आपल्याला खूप आवडते
पण त्यांचे नाव मात्र माहीत नसते. अर्थात मॅकचे तसे झाले नाही;
पण असे इतर अनेक आहेत. उदा. अंगूरमधल्या सोनाराच्या
दुकानातल्या कारागिराचे नाव मलाही माहीत नव्हते; पण
काम खूप आवडले होते.
13 May 2010 - 5:39 am | सन्जोप राव
अंगूरमधल्या सोनाराच्या
दुकानातल्या कारागिराचे नाव मलाही माहीत नव्हते; पण
काम खूप आवडले होते.
तोच युनुस परवेझ
सन्जोप राव
'मजरुह' लिख रहे हैं वो अहले वफा का नाम
हम भी खडे हुए हैं गुनहगार की तरह
13 May 2010 - 10:14 am | सहज
>ही जाणीव काळीज भेदून जाते!
"उंचे लोग उंची पसंत" ऐकले होते. त्याच्या उलटे पण खरे असते हे ह्या धाग्यावरुन कळले L)
>मिसळपाव परिवारातर्फे
ओहोहो! ते बेगाने शादीमे अब्दुला....
13 May 2010 - 11:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणाच्या मृत्युवरून अशी टिप्पणी केलेली आवडले नाही.
अदिती
13 May 2010 - 11:49 am | सहज
खव उत्तर