पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
1 May 2010 - 12:59 pm

नमस्कार,

सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे.

आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे.

पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे! म्हणुनच केवळ पुस्तकाचा परिचय/परीक्षण लिहुन थांबणे नाही, तर आपण इतरांनी लिहिलेल्या परिचयांवर चर्चा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच.

पुस्तकविश्वच्या सुविधा इथेच संपत नाहीत, तर

आपण वाचलेली पुस्तके,
आपल्या संग्रही असलेली पुस्तके
ह्यांचा एक छानसा विदाच आपल्या खातेपानावर बाळगु शकता. ह्यातुन आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचक आपण जाणुन घेऊ शकता, त्यांच्याशी केवळ परिचय/परीक्षणांच्या धाग्यांवरच नव्हे तर वैयक्तिक चर्चाही करु शकता, (शक्य असल्यास) आवडीच्या पुस्तकांची देवघेवही करु शकता.

थोडक्यात, पुस्तक परिचय / परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा असे या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.

पुस्तकविश्व.कॉम येथे नवनविन सुविधा देण्याच्या प्रयत्नात टीम लोकविकास नेहमीच वचनबध्द राहील.

तर रसिकहो,

www.pustakvishwa.com येथे आजपासुन नोंदणी खुली करण्यात येत आहे. या, पहा, लिहा, वाचा.....पुस्तकवेड्यांनो, पुस्तकविश्वात रममाण होऊन जा.

- नीलकांत.

(टीम लोकविकास.)

भाषावाङ्मयसाहित्यिकप्रकटनलेखमाहिती

प्रतिक्रिया

टारझन's picture

1 May 2010 - 1:34 pm | टारझन

झक्कास्स्स्स !!!

मनिष's picture

3 May 2010 - 12:01 pm | मनिष

अभिनंदन - लोकविकास टीमचे! :)

यशोधरा's picture

1 May 2010 - 2:13 pm | यशोधरा

मस्त, मस्त! :) सभासद झाले आहे :)

श्रावण मोडक's picture

1 May 2010 - 2:21 pm | श्रावण मोडक

नाव नोंदवलं आहे. पासवर्डच्या इमेलची वाट पाहतोय...

भारद्वाज's picture

1 May 2010 - 2:39 pm | भारद्वाज

सभासद झालोय. पण 'वाचलेली पुस्तके' मधे मी क्लिकवलेलं एकही पुस्तक जोडलं जात नाहीये. मदत करा.
-
कृपाभिलाषी

छोटा डॉन's picture

1 May 2010 - 3:35 pm | छोटा डॉन

तुमच्या सुचनेप्रमाणे मी आत्ताच ती गोष्ट तपासुन पाहिली.

तुम्हाला हवे ते पुस्तक शोधुन ते 'वाचले आहे' आणि 'ग्रंथसंग्रहमध्ये आहे' अशा दोन्ही नोंदी करता येत आहेत.
मी आत्ताच 'बाकी शून्य' हे पुस्तक शोधुन ते दोन्ही ठिकाणी जोडले आहे, तुम्ही पाहु शकता माझ्या सदस्य खात्यात.

प्रयत्न करुन पहा व कळवा.
तरीही अडचण आल्यास आपण पाहु काय करायचे ते.

धन्यवाद !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

यशोधरा's picture

1 May 2010 - 3:53 pm | यशोधरा

मीही जोडली आहेत २-३. काही प्रॉब्लेम आला नाही.

भारद्वाज's picture

1 May 2010 - 3:59 pm | भारद्वाज

हो. आता जोडले जात आहे. आधी केवळ "वाचले आहे" वर क्लिकवलं तेव्हा नाही झालं. "वाचले आहे" आणि "संग्रहात आहे" दोन्हीवर क्लिकवलं तेव्हा झालं.
जय महाराष्ट्र

बेसनलाडू's picture

1 May 2010 - 3:45 pm | बेसनलाडू

वाचलेले म्हणूनही व संग्रही असलेले म्हणूनही. मला काही अडचण आली नाही.
(अनुभवी)बेसनलाडू

श्रावण मोडक's picture

1 May 2010 - 3:23 pm | श्रावण मोडक

पासवर्ड आला.

बेसनलाडू's picture

1 May 2010 - 3:30 pm | बेसनलाडू

लवकरच मी वाचलेल्या काही पुस्तकांबद्दल लिहिण्याचा मानस आहे. सवड मिळायला हवी.
(कार्यमग्न)बेसनलाडू

भारद्वाज's picture

1 May 2010 - 4:06 pm | भारद्वाज

तिथल्या यादीत नसलेल्या पुस्तकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी कोणाला कळवावे?
जय महाराष्ट्र

धमाल मुलगा's picture

1 May 2010 - 4:16 pm | धमाल मुलगा

डाव्या समासात असलेल्या 'लेखन करा' ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर येणार्‍या पानावर 'पुस्तक' ह्या दुव्यावर टिचकी मारा. उघडणारे पान हे नवे पुस्तक यादीत समाविष्ट करण्याबाबतचे आहे.

लेखकाचे नाव टंकण्यास सुरु केल्यावर ऑटोकंप्लिट सोयीनुसार आपल्याला लेखकांची यादी पॉप-अप होईल त्यातुन नाव निवडता येते. शक्यतो आधी आडनाव टंकल्यास ऑटोकंप्लिट सोयीला शोध घेण्यास जास्त सोपे पडेल. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2010 - 4:35 pm | बिपिन कार्यकर्ते

गिरेट!!!!

सवडीने कपाट घेऊन बसतो... :)

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2010 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते

सदस्य झालोय... आता पुढचे काय काय आहे ते बघतोय.

आमच्या समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन.

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

1 May 2010 - 4:28 pm | मस्त कलंदर

सदस्यत्व घेतलंय.. थोडी इकडे-तिकडे उचकापाचक पण केली :)
लिहिन निवांतपणे सवडीनुसार तिथेही...

>>>समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन.
+१ सहमत

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

1 May 2010 - 4:45 pm | बिपिन कार्यकर्ते

मी आत्ता एक प्रकाशन नविन तयार केले. 'ऊर्जा प्रकाशन' ... नविन रेकॉर्ड नीट अ‍ॅड पण झाले. पण नंतर कळले की ते नाव आधी पासून आहे. नावावर युनिक की का नाही टाकली आहे?

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

1 May 2010 - 4:53 pm | धमाल मुलगा

युनिक की चे पहावे लागेल.
पण शक्यतो सोपा मार्ग म्हणजे, पुस्तक यादीत समाविष्ट करताना प्रकाशकाचे नाव टाकता येईल..त्यामध्ये ऑटोकंप्लिटची सोयही आहे, आणि शोध घेण्याचे बटणही दिले आहे. त्याने काम सोपे व्हावे असे वाटते.

सुधीर१३७'s picture

1 May 2010 - 5:41 pm | सुधीर१३७

www.pustakvishwa.com ही कडी माझ्याकडे उघडतच नाही...... ना गूगलमध्ये ना एक्स्प्लोररमध्ये .....??????? :''(

II विकास II's picture

1 May 2010 - 5:56 pm | II विकास II

+१
-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

छोटा डॉन's picture

1 May 2010 - 5:58 pm | छोटा डॉन

आपल्या हातात नसलेल्या काही इतर तांत्रिक कारणांमुळे 'पुस्तकविश्व' सध्या उघडले जात नाही. तपासकार्य आणि साईट पुन्हा सुरळित करण्याचे प्रयत्न चालु आहेत.

( च्यायला बाळ जन्माला येऊन २४ तास झाले नाहीत तोवर ही लफडी ??? )

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

चित्रा's picture

1 May 2010 - 6:30 pm | चित्रा

महाराष्ट्रदिनाबद्द्ल सर्वांना शुभेच्छा.

आणि नवीन संकेतस्थळकर्त्यांचे अभिनंदन. सभासदत्व नक्कीच घेईन.

विकास's picture

1 May 2010 - 6:36 pm | विकास

खूप चांगला प्रकल्प आहे हा! मनःपूर्वक शुभेच्छा!

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मुक्तसुनीत's picture

1 May 2010 - 7:02 pm | मुक्तसुनीत

मनःपूर्वक अभिनंदन.

Nile's picture

1 May 2010 - 7:27 pm | Nile

अभिनंदन आणि शुभेच्छा! सभासद झालो आहे.

पुस्तके वाचल्याची नोंद 'पुस्तक' या यादीतुन केल्यानंतरही(वाचलेले आहे म्हणुन जोडा' वर क्लीक करुन) ते पुस्तक माझ्या खात्यातील 'वाचलेल्या' विभागात जोडले जात नाही आहे.

(शंका इथे उपस्थित केल्याबद्द्ल क्षमस्व, तिथेच एखादा, धागा सुरु करता येईल का? प्रथमदर्शनी तरी दिसला नाही.)

आनंदयात्री's picture

1 May 2010 - 7:57 pm | आनंदयात्री

धन्यवाद धागा सुरु केला आहे.

निखिल देशपांडे's picture

1 May 2010 - 10:22 pm | निखिल देशपांडे

नाईल आणि काहि लोकांनी निर्देशनास आणुण दिलेली तृटी आता दुर करण्यात आलेला आहे.. चुक निर्देशनास आणुन देण्याबद्दल धन्यवाद
आपले सुचना/ अभिप्राय आपण http://www.pustakvishwa.com/node/56413 ह्या धाग्यावर देउ शकता
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

राजू's picture

2 May 2010 - 9:12 pm | राजू

नाव नोंदवलं आहे. पासवर्डच्या इमेलची वाट पाहतोय...

आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

प्रभो's picture

2 May 2010 - 11:17 pm | प्रभो

मनःपूर्वक अभिनंदन.

स्पंदन's picture

3 May 2010 - 7:32 am | स्पंदन

चांगला उपक्रम... मनःपुर्वक अभिनंदन.

श्रीराजे's picture

3 May 2010 - 10:21 am | श्रीराजे

पुस्तकविश्व - छान उपक्रम आहे..

विशाल कुलकर्णी's picture

3 May 2010 - 10:51 am | विशाल कुलकर्णी

झकास्स.. आत्ताच सभासदत्व घेवून टाकले.
सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

समंजस's picture

3 May 2010 - 12:20 pm | समंजस

व्वा!! हे फारच छान झालंय!! :)
एक चांगला उपक्रम !
या उपक्रमा मागे असलेल्या सगळ्यांचेच अभिनंदन आणि धन्यवाद =D>

समंजस's picture

3 May 2010 - 12:25 pm | समंजस

.

समंजस's picture

3 May 2010 - 12:25 pm | समंजस

.

मेघना भुस्कुटे's picture

3 May 2010 - 1:25 pm | मेघना भुस्कुटे

तत्काळ सभासद झाले!
मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. :)

वेदश्री's picture

4 May 2010 - 2:59 pm | वेदश्री

या स्तुत्य उपक्रमामागे असलेल्या सर्वांचे अभिनंदन. पुस्तकविश्वाचे सभासद व्हायचे आहे पण मी ऑफिसमधूनच नाहीतर घरूनही प्रयत्न करून पाहता अयशस्वी झाले. युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का?

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 3:05 pm | धमाल मुलगा

>>युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का?
आँ?
आत्ता प्रयत्न करुन पहा बरे, व्यवस्थित उघडते आहे इथे. आपण म्हणता ती अडचण फक्त १ मे दिवशी आली होती.

वेदश्री's picture

4 May 2010 - 3:50 pm | वेदश्री

मला अजुनही नाही दिसत आहे. पुस्तकविश्वाची युआरेल टाकून एंटर केले की http://10.100.135.6:15871/cgi-bin/blockpage.cgi?ws-session=3038426170 हे यूआरेल येते फक्त.. बाकी सगळे पेज कोरे. दरवेळेस सेशन आयडी तेवढा बदलतो. मी एक्सपी - आयई ६, एक्सपी - एफएफ ३.५.२ वर, व्हिस्टा - आयई ८ वर प्रयत्न करून पाहिले आहे आतापर्यंत... कुठेच प्रगती नाही.

इथेही टेस्टींगच करत असल्यासारखे झाल्याने डोक्याची मंडई व्हायची वेळ आली आहे!

निखिल देशपांडे's picture

4 May 2010 - 4:01 pm | निखिल देशपांडे

वेदश्री तुमच्या ऑफिसात प्रॉक्सी फायरवॉल असण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी ही यु आर एल तुमच्या प्रॉक्सी सर्वरची असावी असे वाटते.
आपण जेव्हा घरुन प्रयत्न करता तेव्हा सुद्धा हीच यु आर एल येते का???

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

वेदश्री's picture

4 May 2010 - 4:06 pm | वेदश्री

हो. घरीही हीच अवस्था आहे. शिवाय जर ऑफिसमधल्या प्रॉक्झी सेटींगमुळे असे होत असते तर तसा युजर-फ्रेंडली एरर मेसेज आला असता.. तसा प्रकार नाहीये त्यामुळे हे काहितरी वेगळेच आहेसे वाटते आहे.

धमाल मुलगा's picture

4 May 2010 - 4:03 pm | धमाल मुलगा

आत्ता ह्या क्षणाला मी अणि निखील देशपांडे हे दोन युजर्स आणि ६ पाहुणे असे पु.वि.वर ऑनलाईन आहोत. खरडी, लेख वाचणे, प्रतिसाद सर्वकाही चालु आहे.

आपण एकदा ह्या लेखात दिलेल्या दुव्यावरुन जाण्याचा प्रयत्न करुन पहाल काय?
ऑफिसात असाल तर फायरवॉल्स, फिल्टर्सचा काही प्रॉब्लेम आहे का?

सुधीर१३७'s picture

4 May 2010 - 5:29 pm | सुधीर१३७

सभासद झालो...........................:)

सुधीर१३७'s picture

5 May 2010 - 11:25 am | सुधीर१३७

.