स्त्रीची आजची प्रतिमा - २

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
30 Apr 2010 - 12:48 pm

आजच्या स्त्रीची प्रतिमा - या मालेची सुरूवात झाली तेव्हा कल्पना अशी होती की स्त्रीचं भोगवस्तू हे एकांगी चित्र आहे, व तेच बघत बसण्याऐवजी (आधुनिक व ऐतिहासिक) स्त्रीच्या रूपाचे व कर्तृत्वाचे विविध पैलू बघता यावेत. काय लिहावं असा प्रश्न होता. पण आपल्यापासून दूर असलेल्या जवळपास काल्पनिक वाटणाऱ्या कर्तबगार स्त्रियांऐवजी आपल्या रोज संपर्कात येणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, करीअरसाठी धडपडणाऱ्या मैत्रिणींविषयी लिहावंसं वाटलं. शेवटी आजच्या स्त्रीची प्रतिमा काय आहे हे आजच्याच परिस्थितीत बघायला नको का?

खाली एक काल्पनिक चर्चा दिली आहे. तसं पाहिलं तर काहीच काल्पनिक नसतं, असल्या विषयांवर आपण कधी ना कधी बोलतोच. बोलत असलो, नसलो तरी प्रतिसादांतून अधिक खोलवर चर्चा व्हावी ही इच्छा.

(स्थळ: एक कॅफे. पाच-सहा मित्रमैत्रिणी रविवारी दुपारी गप्पा मारायला जमलेले आहेत. बहुतेक सगळे तिशीच्या आतले)

पक्या - मन्या, मग चाललंय सध्या? कामबीम एकदम जोरात का?

मन्या - अरे काम चाललंय... पण एकंदरीत इकडे काही खरं नाही असं वाटतंय.

पक्या - कारे?

मन्या - काही नाही रे. आमचा बॉस हरामखोर आहे. तुला सिमीविषयी सांगितलं होतं ना..

पक्या - (हातांनी उभ्या लाटा काढून) तीच ना...

इंद्राणी - ए....

मन्या - हो तीच. तर आमचा बॉस जरा तिच्याशी लगट करून असतो.

पक्या - तू पण करायला जायचास ना...

मन्या - हो, पण माझे इरादे नेक होते. (सगळे हसतात) जोक्स अपार्ट, माझं लग्न झालेलं नाहीये. त्याला दोन पोरं आहेत.

देवी - वा वा वा, नेक इरादे म्हणे.

मन्या - नाही गं हे खूप लोकांचं बघितलंय म्हणून माझं फ्रस्ट्रेशन आहे. प्रोजेक्टमधल्या पोरींशी.. युनो... आता आमचा सीनियर मॅनेजर, परवा शीला सांगत होती, तिच्यावर लाईन टाकून बघत होता.

पक्या - मग त्यात काय एवढंसं? सगळीकडेच चालतं हे.

मन्या - नाय रे. पण आमच्या इकडे जरा जास्तच आहे असं वाटतं. आणि काही पोरी रिस्पॉंड करतात सुद्धा. आता आमच्यासारख्या लोकांनी असल्या गोष्टींशी कसं कॉंपीट करायचं? ग्रुपमधले इतर, इव्हन चांगल्या पोरीसुद्धा मग डिसकरेज होतात. हे असले बॉस डोक्यात जातात. पण बोलणार काय? आपली करिअर त्यांच्या हातात असते.

पक्या - दुर्लक्ष करायचं अरे.

मन्या - तुला बोलायला ठीक आहे. जाऊदेत, आत्ता फार डिटेलमध्ये शिरत नाही.

इंद्राणी - आम्ही आहोत म्हणून लाजू नकोस, सांग थोड्या चमचमीत गोष्टी

बंड्या - नाही गं, आमच्या इथे पण हे चालतं. मला एक बया माहीत आहे, आमच्या ग्रुपमधली नाही... पण... एनीवे. तिला कोडिंगमधलं ओ की ठो कळत नाही. पण सीनियर बॉसबरोबर 'सलोख्याचे' संबंध ठेवल्यामुळे ती वर्षाभरात इंटर्नपासून टीम लीडर झाली. आणि मग अर्थात बॉस कंपनी सोडून गेल्यानंतर हिलाही रिझाईन करण्याची पाळी आली. 'दुसरी' काही स्किल्स तर नव्हतीच...पण बॉस होता तोपर्यंत काही करता येत नव्हतं. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.

मन्या - मग आपल्यासारख्यांच काय होणार? सगळे भो*&^** वर चढून बसले आहेत.

बंड्या - अरे म्यानेजर कसले घेऊन बसला आहेस? मी भर पार्टीत आमच्या सीईओला घाणेरडे चाळे करताना बघितलाय. ती ही आहे ना.. जाऊदेत फार बोलत नाही.

देवी - आमच्या समोर नाही का? तुमच्या स्पेशल स्टॅग पार्टीसाठी राखीव वाटतं?

बंड्या - हा हा हा...

पक्या - वेल. आरोप करणारे कधीकधी उगाच आरोप करतात. बाकी मन्याच्या बाबतीत, असेलही. असो. पण बाकी सुंदर मुलीचं प्रमोशन तिच्या बुदधीमुळे झालं तर काय उपयोग?

देवी - म्हणजे?

पक्या - मला म्हणायचंय की मग तिच्या सौंदर्याचा काय उपयोग?

इंद्राणी - काय? हा काय प्रश्न झाला?

पक्या - नाही, ते विधान आहे.

देवी - ओ, भाऊ, काय बोलताय नक्की?

इंद्राणी - अगं जाऊदेत गं. कॉफी चढलीय त्याला बहुतेक...

पक्या - च्यायला, आता काही स्पष्ट बोलण्याचीच सोय राहिली नाही. मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटणार नाही..

देवी - नाहीच पटत...

पक्या - पण खरं आहे ते. असंच असतं. जग कसं चालतं हे तुम्हाला स्वीकारायचं नसेल तर तसं म्हणा.

इंद्राणी - काहीतरी बोलू नकोस पक्या. आता कोणी आपल्या टॅलेंटच्या जोरावर वरती चढली तर? तिलासुद्धा तू 'सुंदर म्हणून चढली' असंच लेबल लावणार का?

मन्या - नाही पण पक्या म्हणतो ते अगदीच चूक नाही. मीच स्वत: पोरींना अप्रेजलच्या दिवशी जरा जास्तच प्रदर्शन करणारे कपडे घालून आलेलं बघितलंय. नुसतं तेवढंच नाही, तर त्यांनी ते मान्यही केलंय.

देवी - वा वा तुम्ही सूतावरून स्वर्ग गाठताय...

इंद्राणी - हे पुरुष असलेच शेवटी... डोंट टेक इट पर्सनली, बरं का..

पक्या - पर्सनली कशाला घेऊ? मी जे बघतो ते सांगतो. मी काही असलं करत नाही. पण तू म्हणतेस त्यात कर्तबगार आणि सुंदर स्त्री गृहीत धरलेली आहे.

इंद्राणी - पण जेव्हा सौंदर्य आणि कर्तबगारी एकत्र येते तेव्हा काय? तुम्ही कर्तबगारी मोजणार ती एखादी स्त्री किती पुढे गेली यावरून, आणि ती पुढे गेली म्हणजे म्हणायचं, हॅं, सुंदर म्हणून पुढे गेली, नक्कीच तिच्या बॉसवर 'चांगलं' इंप्रेशन मारलं असणार...

पक्या - मी तसं कुठे म्हटलंय...

देवी - म्हणायला कशाला लागतंय? हे जग शेवटी पुरुषांचं आहे, हेच खरं नाही का? इंदू म्हणते ते बरोबरच आहे. स्त्री पुढे गेली की तिच्यावर घाणेरडे शिक्के बसतात. याला पुरुषी मनोवृत्ती नाही म्हणायचं तर काय? आणि असलं गलिच्छ गॉसिपिंग कोण करतं? ज्यांना ती हवीशी वाटते, पण आपल्याला ती भीक घालणार नाही ही खात्री असते तेच ना? मग उगाच सगळ्या सुंदर स्त्रियांबद्दल असं कसं म्हणवतं? त्यांच्या मनाची, बुद्धीची काहीच पर्वा नाही का?

मन्या - देवी, हे जरा जास्तच झालं हं. आम्ही काय बोलतोय, आणि तू कुठे गेलीस. ते नुसतं अहंकार सुखावणं किंवा सुंदर आणि बुद्धीमान पोरगी पटवणं एवढंच नसतं...

बंड्या - नाही पण माझासुद्धा पक्यासारखाच अनुभव आहे. पण तो म्हणतो ते जरा जास्तच जनरल वाटतं. अरे, सगळ्याच मुलींना तसं म्हणणं बरोबर नाही.

पक्या - वा वा वा... हे चोराच्या उलट्या बोंबा नाही का? पुढे गेलेली प्रत्येक सुंदर स्त्री त्या अर्थाने कर्तबगारच असणार, नाही का? बाकी देवीने जे पटवणं, नाही पटली तर गॉसिपिंग करणं वगैरे म्हटलं त्याबाबतीत मला काही अनुभव नाही. तेव्हा मी काही बोलत नाही. पुन्हा जनरलायझेशनविषयी आणखी काय बोलू? मला जसं दिसतं तसं मी सरळ बोलतो एवढंच. ते कोणाला का लागावं?

इंद्राणी - पण बुद्धीमत्तेवर पुढे गेली तर सौंदर्याचा काय उपयोग, हे खोचकच आहे.

देवी - तेच म्हणत्ये मी. ते उघड उघड पुरुषकेंद्रित मनोवृत्तीचं प्रतीक आहे. शेवटी हा खेळ असतो, आणि काही जणी त्या खेळतात हे मान्य आहे. पण म्हणून सगळ्याच तशा हे म्हणणं किती बरोबर? आता तुझ्या बहिणीविषयी असं कोणी म्हटलं तर तू ते मान्य करशील का?

मन्या - नाही गं. सर्वच सुंदर मुली तसल्याच असतात असं नव्हतं म्हणायचं. पण सगळ्यांनाच हा चॉईस असतो, कुणी सोपा मार्ग निवडतं तर कुणी सरळमार्ग. बर्‍याचदा समर्थन पण दिसून येतं या सगळ्याचं...

_______

असो... चर्चा विस्कळीत झाली थोडीशी, आणि वाद संपला नाही. पण मुद्दा स्पष्ट आहे. काही अधिकारी पुरुष आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्या रिपोर्ट असलेल्या मुलींबरोबर लफडी करतात. काही स्त्रिया आपल्या सौंदर्याचा फायदा घेतात, व आपली 'तरक्की' करून घेतात. पण सरसकट तीच प्रतिमा होणं रास्त आहे का? काही स्त्रियांना सुंदर नसल्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रात नकार मिळत असेल का? आणि अनेक स्त्रिया फक्त बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जात असतील त्यांची प्रतिमाही अशी गढूळलेलीच असते का?

या प्रश्नाची दुसरी बाजूही या चर्चेत आली नाही. ती म्हणजे, जर एखाद्या पुरुषाला आपल्या पुरुष बॉसचं मन जिंकायचं असेल तर त्याच्याबरोबर दारू पिणं, मॅच बघणं, पत्ते कुटणं अशा रास्त, समाजमान्य, ज्यांना लैंगिकतेचा वास येणार नाही अशा शतकांपासून चालत आलेल्या गोष्टी करण्याला भरपूर वाव आहे. स्त्रियांना तसे मार्ग नाहीत. व्यापक दृष्ट्या बघितलं तर हा काही या काळातलाच प्रश्न आहे असं वाटत नाही. आजूबाजूची परिस्थिती, तीत असलेली शक्तीस्थानं आज एक आहेत काल वेगळी होती. आज बॉसला लाडकं होणं महत्त्वाचं आहे, कदाचित गेल्या जमान्यात नवऱ्याला, सासूला खुष ठेवणं हे महत्त्वाचं असेल. खोटंच गोडगोड बोलणं, पुढे पुढे करणं, मस्का लावणं या गोष्टी कालातीत आहेत. तसाच पाताळयंत्रीपणा व संधीसाधूपणाही. व तो काही बायकांचाच मक्ता नाही. याचा अर्थ सर्वच तसे आतल्या गाठीचे असतात असं नाही. मॅनेजर पुरुष व रिपोर्ट स्त्री हे समीकरण आलं की त्याला लैंगिकतेची बाजू येते इतकंच.

स्त्रियांचा कार्यक्षेत्रात शिरकाव तसा अलिकडचाच आहे. त्यामुळे स्टॅटिस्टिकली बघितलं तरी बॉस पुरुष असण्याचीच शक्यता जास्त असते. ज्या स्त्रियांना छचोर मार्ग पत्करायचे नसतात, त्यांनाही केवळ मैत्रीचे संबंध ठेवले तरी बदनाम होण्याची भीती असते. पुरुषप्रधान व्यवस्था व तीतून निर्माण होणारा दृष्टीकोन काही अंशी या प्रतिमेमागे आहे. शेवटी प्रतिमा ही सौंदर्याप्रमाणे बघणाऱ्याच्या डोळ्यात अधिक असते. तेव्हा आजच्या स्त्रीची प्रतिमा कशी घडते? या प्रश्नाचा विचार करताना दिसणारं चित्र व त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन या दोन्हीला महत्त्व द्यावं असं वाटतं. स्त्रियांनी घराबाहेर पडून निव्वळ अर्थार्जनच नव्हे तर करियरही सुरू केल्यावर ही पुरूषप्रधान व्यवस्था आता सर्व घटकांना न्याय्य ठरू शकते का? का दुष्टचक्रासारखी ही प्रतिमा व पुरुषप्रधानता एकमेकांना पूरक ठरतात?

संस्कृतीसमाजप्रकटनविचारवाद

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2010 - 12:58 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम चर्चा.. शेवटून दुसर्‍या परिच्छेदातला मुद्दा वेगळाच दृष्टिकोन देऊन गेला.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2010 - 1:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असा संवाद काही नवीन नाही, अधूनमधून वेगवेगळ्या शब्दांमधे आणि भाषांमधे होत असतो.

राजेश, हा (शेवटून दुसरा परिच्छेद) मुद्दा कधी लक्षात आलाच नव्हता.

अदिती

भोचक's picture

30 Apr 2010 - 1:24 pm | भोचक
मराठमोळा's picture

30 Apr 2010 - 1:26 pm | मराठमोळा

हा मुद्दा राहुन गेला खरं, पण ह्या केसेस चे चान्सेस फारच कमी असतात असं मला वाटतं, जसं कुणी बॉसला खुश ठेवणारा पुरुष असेल आणी त्याच टीममधे अनैतिक गोष्टींचे समर्थन करणारी स्त्री असेल तरी ह्या केसमधे पुरुष टीममेट चे प्रमोशन होणे अवघडच नाही का?

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2010 - 2:48 pm | मेघना भुस्कुटे

बॉसला नक्की कुठल्या गोष्टींमध्ये इंट्रेष्ट आहे (किंवा तो नक्की कुठल्या गोष्टींनी सुखावतो किंवा तो कामाव्यतिरिक्त खुशामतींना / नात्यांना किती महत्त्व देतो) यावर अवलंबून आहे. स्त्रीद्वेष्टा असेल तर तो अशा अनैतिक मार्ग अवलंबू पाहणार्‍या स्त्रीचा अधिकच तिरस्कार करेल. किंवा उलटही. डिपेण्ड्स!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Apr 2010 - 5:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पॉईंट आहे मेघना!

स्त्रीद्वेष्टा असेल तर अनैतिक मार्ग अवलंबणार्‍या स्त्रीचा तिरस्कार करेलच. आणि त्याच्याचबरोबर नैतिकतेची चाड असणारा असेल तरीही हेच होईल. व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्य वेगवेगळं जपणार्‍या लोकांकडून स्त्रियांचे अंगप्रदर्शन आणि/किंवा इतर पुरुष सहकार्‍यांबरोबर पार्ट्या, इ. या गोष्टींची ऑफिसातल्या बढती, पगारवाढ या गोष्टींमधे गल्लत होणार नाही.
अव्यावसायिक दृष्टीकोन असणार्‍या बॉसेसच्या हाताखाली काम करावे का नाही हा प्रश्न आपल्यालाच सोडवावा लागतो

आयटीमधल्या अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे, "मॅनेजर्सची अपेक्षा असते आम्ही उशीरापर्यंत थांबावं. बॅचलर्सचं ठीक आहे, त्यांना घरी जाऊन जेवण बनवायचा कंटाळा, एकटेपणाचा कंटाळा म्हणून थांबतात. आम्हाला घर, संसार आहे; आम्ही काम पूर्ण करूनही घरी आलो तरीही कामचुकार असल्यासारखे वागवतात."
कोण स्त्री आहे, कोण पुरूष आहे संबंधच नाही. पण अव्यावसायिक दृष्टीकोनाचा फटका बसतोच, जेंडर बायस नसतानाही!.

अदिती

Nile's picture

30 Apr 2010 - 1:23 pm | Nile

उत्तम चर्चा. शेवटुन दुसरा परिच्छेदात जे लिहले आहे त्याला 'प्रोफेशनल नेटवर्किंग' म्हणत असावेत. कुठलाही 'काउंसेलिंग' वाला तुम्हाला अश्या टीप्स देईलच. माझी माहिती बरोबर असेल तर. मॅनेजमेंटच्या काही पदव्यांमध्ये अश्या पार्ट्या अभ्यासक्रमाचा भाग असतात. (ऑफीशीयली का नाही ते माहित नाही, पण माझ्याच रुममेटच्या अनुभवावरुन). अशी 'सोशल' कनेक्शन्स जॉब्स/प्रमोशन मिळवायला उपयोगी ठरतात असे सर्रास सांगितले जाते. ते असो.

मला वाटतं पहिला संवाद आणि शेवटुन दुसरा परिच्छेद यात बराच फरक आहे. दुसरे 'डील' मध्ये मोडत नाही असे मला वाटते.

असो, एक उत्तम चर्चा योग्य शब्दांत इथे मांडल्याबद्द्ल धन्यवाद. तुमच्या मेहनतीचे कौतुक आहे.

राजेश घासकडवी's picture

30 Apr 2010 - 1:43 pm | राजेश घासकडवी

मला वाटतं पहिला संवाद आणि शेवटुन दुसरा परिच्छेद यात बराच फरक आहे. दुसरे 'डील' मध्ये मोडत नाही असे मला वाटते.

संवादात न आलेल्या, मला व्यक्तीश: वाटणाऱ्या गोष्टी तिथे मांडलेल्या आहेत. पण त्या असंबद्ध नाहीत. कारण दोन व्यक्तींमधलं नातं, व दोन सहकाऱ्यांमधलं नातं (किंवा बॉस-रिपोर्ट नातं) या तत्वत: वेगळ्या पण प्रत्यक्षात एकमेकांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात. जोपर्यंत ऑफिसमधली नाती पुरुषांमधलीच होती तोपर्यंत जग सोपं होतं. स्त्रिया कार्यक्षेत्रात आल्या तेव्हापासून त्या नात्यांत असिमेट्री व लैंगिक कंगोरे आले. संवादात त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आहे...

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2010 - 3:11 pm | मेघना भुस्कुटे

आता समलैंगिकताही तितकीशी गावकुसाबाहेर राहिलेली नाही. आमच्याच ऑफिसात एका सहकार्‍याला चेष्टेतच त्यावरून लोक चिडवतात. त्यामुळेच तुला रेटिंग चांगलं मिळालं असणार, असं म्हणतात. यात विखार असतो असं नाही.
पण उद्या अशाच प्रकारच्या सिच्युएशनमधे तितका विखार नसेलच असंही नाही. परिस्थिती बदलते आहे.
सांगण्याचा मुद्दा हा की कामाच्या ठिकाणच्या राजकारणात बाई आल्यामुळे लैंगिकता आली, असं समजण्याचं आता कारण नाही. त्याच दिशेनं विचार करणारे लोक बोलताना तुमच्या लिंगाचा मुलाहिजा राखत नाहीत.
शिवाय स्त्रिया आता 'पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून' वगैरे काम करताना आपलं स्त्रीत्व लपवत नाहीत, पुरुषी असणं म्हणजेच प्रागतिक असणं असं मानत नाहीत. बाई असण्याचा चार्म वागवूनदेखील ती मुक्त बाई असू शकते, असं मानलं जातं. असं असताना 'आपल्या लैंगिकतेचा फायदा घेणं' या गोष्टीच्या सीमारेषा तरी कशा ठरवणार? की अमुक इतकं अंगप्रदर्शन केलं म्हणजे ती बाई 'तशी' आणि त्याच्यापेक्षा कमी केलं की 'सभ्य आणि सुसंस्कृत' असं?
बोलणार्‍याच्या तोंडाला लगाम आणि सारासार विचारही नसतोच. आपला विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हाच उपाय.

प्रकाश घाटपांडे's picture

1 May 2010 - 10:07 pm | प्रकाश घाटपांडे

असं असताना 'आपल्या लैंगिकतेचा फायदा घेणं' या गोष्टीच्या सीमारेषा तरी कशा ठरवणार? की अमुक इतकं अंगप्रदर्शन केलं म्हणजे ती बाई 'तशी' आणि त्याच्यापेक्षा कमी केलं की 'सभ्य आणि सुसंस्कृत' असं?

यात सापेक्षता खुप मोठी आहे. त्यामुळे आपण सांगितलेले

बोलणार्‍याच्या तोंडाला लगाम आणि सारासार विचारही नसतोच. आपला विवेक आणि सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवावी, हाच उपाय.

याच्याशी सहमत आहे. स्वतःशी प्रामाणिक असणे हे सुद्ध जगात अवघड जाते. त्याची किंमत मोजायला लागते ती तयारी नसेल तर स्वतःशी प्रतारणा करावी लागते.

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाहीदा's picture

30 Apr 2010 - 3:27 pm | वाहीदा

तुम्ही कार्यालयात hardcore professional असाल अन कुठल्याही गोसीपींग मध्ये भाग घेत नसाल तर कोणीही तुमचा फायदा घेणार नाही असे माझे वैयक्तीक मत आहे .
One should not get carried away by the passion of the moment.
Cool as a cucumber, grace under pressure, while keeping the total focus on what one is supposed to be doing and accomplishing.
If people know that you're more than willing to engage in gossip, your professional integrity looks tarnished to your superiors as well as to your peers. :-)
~ वाहीदा

ऋषिकेश's picture

30 Apr 2010 - 3:44 pm | ऋषिकेश

शक्यतो या विषयावर मी मत देत नाहि.. पण इथे विषयाची फारच सुरेख मांडणी केली आहे म्हणून ही पिंक

बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला).
बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे?

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2010 - 3:46 pm | मेघना भुस्कुटे

बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला).
बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे?

---
संपूर्ण सहमत. १०० टक्के अनुमोदन.

मराठमोळा's picture

30 Apr 2010 - 3:58 pm | मराठमोळा

हमममम्म्म्म्म्म

माझ्या एका मित्राला लवकरात लवक्र श्रीमंत व्हायचे होते.. त्याच्या करीअर मधे त्याने सुरुवातीला द्युप्लीकेट बीयरचा धंदा सुरु केला, नंतर बरेच काही, खुन, मारामार्‍या, खंडणी हे सर्व केले. आता तर तो फारच पुढे पोहोचला आहे.

तेव्हा पण सर्वांनी हेच म्हणायला हवे होते. की
"एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि.""

यालाच व्यक्तीस्वातंत्र्य म्हणायचे का?

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2010 - 4:03 pm | मेघना भुस्कुटे

कोणतंही मत वाचताना त्याचा संदर्भ लक्षात घ्यावा, हे लोकांना कधी कळणार?

मराठमोळा's picture

30 Apr 2010 - 4:08 pm | मराठमोळा

>>कोणतंही मत वाचताना त्याचा संदर्भ लक्षात घ्यावा, हे लोकांना कधी कळणार?
चांगल्या चर्चेत हे असे लहान मुलांसाखे प्रतिसाद उगाद चर्चेला भरकटवतात आणी बाकिच्यांचा वेळ खर्ची होतो.

संदर्भ कुणाला कळत नाहिये ते समजुन येत आहे, असो हा सेम टु सेम प्रतिसाद मी तुमच्या ह्या कमेंटला देणार होतो,
http://www.misalpav.com/node/12150#comment-191708

पण असो, समोरचा आप्ल्या विचारांच्या विरुद्ध बोलत असला की तो मुर्खच दिसतो. त्यामुळे मी लगेच ऊलट सुलट प्रतिसाद न देता विषयाचा पुर्ण विचार करण्याचा निर्णय घेतला.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मेघना भुस्कुटे's picture

30 Apr 2010 - 4:35 pm | मेघना भुस्कुटे

उत्तम निर्णय. मीही गप्प बसते.

ऋषिकेश's picture

30 Apr 2010 - 4:05 pm | ऋषिकेश

चूक पटली
वाक्य असे वाचावे:
एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने भारतीय कायद्याच्या मर्यादेत कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मराठमोळा's picture

30 Apr 2010 - 4:14 pm | मराठमोळा

>>भारतीय कायद्याच्या मर्यादेत
ऋ,
ते तर नुसतं उदाहरण होतं पण तरीसुद्धा प्रश्न तोच राहतो,
कायद्याच्या चौकटीत राहुन सुद्धा बरीच अनैतीक कामे करता येतात हे आपल्याला माहितच आहे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

ऋषिकेश's picture

30 Apr 2010 - 4:25 pm | ऋषिकेश

कायद्याच्या चौकटीत राहुन सुद्धा बरीच अनैतीक कामे करता येतात हे आपल्याला माहितच आहे

होय आणि ती कामे केल्यास माझा आक्षेप नाहि अशी माझी भुमिका आहे.
कायदा असूनही कायद्याकडे काणाडोळा करून कोणी अनैतीक कामे करत असेल तर (अर्थातच माझा पाठींबा नसेल आणि) योग्य ठिकाणी तक्रार करणे माझे काम आहे ते मी करेनच

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

प्रकाश घाटपांडे's picture

1 May 2010 - 10:26 pm | प्रकाश घाटपांडे

होय आणि ती कामे केल्यास माझा आक्षेप नाहि अशी माझी भुमिका आहे.

ऋषिकेश ठाम राहणे जमेल का? आयुष्यभर!
जेव्हा एखादी गोष्ट बेकायदेशीर असली तरी आपल्या मते नैतिक असते अशा वेळी आपण कायदा गाढव आहे न्याय आंधळा असतो असे म्हणतो कारण ती नैतिक असण्यापेक्षा आपल्या सोईची अधिक असते.
एखादी गोष्ट कायदेशीर असली पण आपल्या मते नैतिक नसते त्यावेळी त्यावेळी तिने नैतिक नसण्या पेक्षा कायदेशीर असणे आपल्या दृष्टीने अधिक गैरसोयीचे असते.
कायदेशीर असुन नैतिकही आहे असे प्रसंग येत असतात पण ते सोईचे / पेचाचे असतात च असे नाही
सोईप्रमाणे आपण नैतिक वा कायदेशीर असतो. या दुटप्पीपणाला अर्थातच व्यवहारज्ञान म्हटले जाते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाक्य असे वाचावे:
एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने भारतीय कायद्याच्या मर्यादेत कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि

रोचक विधान

पण शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात हे कायदे दिसले नाही कुठे ;-)
~ वाहीदा

ऋषिकेश's picture

30 Apr 2010 - 4:30 pm | ऋषिकेश

शालेय पातळीवरच्या नागरीक शास्त्राच्या पुस्तकात सगळे कायदे देणे शक्य/योग्य/(फिजिबल) वाटत नाहि.
असो.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

प्रियाली's picture

30 Apr 2010 - 5:18 pm | प्रियाली

बॉसला खूष ठेवण्यापेक्षा बॉसला ओळखून वागणारी माणसे चलाख असतात असा माझा अनुभव आहे. "सारी दुनिया एक तरफ और जोरू का भाई एक तरफ" ही म्हण बदलून "सारा ऑफिस एक तरफ और अपना बॉस एक तरफ" अशी वागणूक ठेवली तर इतर फारसे काही न करता बॉस खूश राहतो. माझ्या बाबतीत राहते असा अनुभव आहे. ;)

असो.

भोचक's picture

30 Apr 2010 - 6:29 pm | भोचक

बॉसला खुष ठेवणं ही एक कला आहे असं मी मानतो (बॉसलाच का पण समोरील कोणत्याही व्यक्तीला).
बॉस कसा आहे, त्याचे इंटरेस्टस्, त्याचे आवडते विषय वगैरे गोष्टी जाणून घेऊन त्याचा कल्पकतेने वापर करणं ही शिकण्यासारखी बाब आहे. अणि जर एखाद्याच्या आयुष्यात नोकरीतील बढती/प्रगती त्याच्या इतर बाबींपेक्षा महत्त्वाची असेल तर त्याने/तिने कोणत्याही पद्धतीने ती मिळवण्यात मला गैर वाटत नाहि. केवळ मला एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाहि / मी ती करू शकत नाहि म्हणून ती चूक आहे असे का बरे म्हणावे?

ऋषिकेश, तुझं म्हणणं तितकसं पटत नाही. म्हणजे एखाद्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या ते खरंही असेल. पण त्याचवेळी दुसर्‍यासाठी ते त्रासदायकही असेल. उदा. बॉसची मर्जी सांभाळून, त्याला खुश ठेवणं मला जमत नाही. पण माझं 'ऑफिसने' (बॉसकरवी) दिलेले काम मी अगदी चोख करतो. नव्हे त्यात माहिर आहे. त्याचवेळी माझा एक सहकारी कामात 'मठ्ठ' आहे. परंतु, बॉसला खुश ठेवणे वगैरे बाबीत एक्स्पर्ट आहे. बॉसने प्रमोशन वा अप्रेझलच्या वेळी त्याच्या 'स्वामीनिष्ठेची' कदर करत त्याला माझ्यापेक्षा जास्त काही देऊ केले तर ती 'मी कामात दाखविलेल्या निष्ठेचीच' उपेक्षा ठरत नाही काय? इथे स्वतःचे 'भले' करून घेण्यासाठी प्रत्येक जण कोणताही मार्ग अंगीकारायला स्वतंत्र आहे, या विधानाचा 'गैरफायदा' घेतला जातो आहे, असे मला वाटते.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

ऋषिकेश's picture

1 May 2010 - 11:01 am | ऋषिकेश

एक उदा. घ्या तुमच्याकडे एखादी बाई भांडी घासायला येते ती भांडी अप्रतिम घासते. मात्र एका घरातील गोष्टी दुसर्‍या घरी चहाड्या करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि ते तुम्हाला आवडत नाहि. आता बघा ती दिलेले काम चोख करते तरीहि तुमची वैयक्तीक आवड न सांभाळल्याने तुम्ही तिला काढून दुसर्‍या एका व्यक्तीला (जी भांडी ठिक घासते मात्र चहाड्या अजिबात करत नाहि) काम दिलेत तर हा व्यक्तीनिष्ठ निर्णय नव्हे का?

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

Nile's picture

1 May 2010 - 11:53 am | Nile

खुप फरक आहे.

इथे चाललेली चर्चा ही तुझ्याच उदाहरणात बसवायची असेल तर.

एखादी चांगली भांडी घासत नाही पण 'अजुन काही' सेवा देण्यास तयार असेल तर.. चा प्रश्न आहे.

प्रमोद देव's picture

1 May 2010 - 12:08 pm | प्रमोद देव

सरळ सरळ सांगायचे...तर...
अंगावर काम..दाबून पगार...

टारझन's picture

1 May 2010 - 12:15 pm | टारझन

दाबून हा शब्द काळजाला भिडला :)

बारावीत वाचलेल्या फँटसीकथा आठवल्या =))

- सहिनी अंबुजा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2010 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>अंगावर काम..दाबून पगार...

:)

अवांतर : खुशवंतसिंगाचं मला पुस्तकाचं नाव आठवत नाही.
पण पहिला किस्सा त्यांचा कामवाल्या स्त्रीबद्दलच आहे असे अंधुक आठवते.

-दिलीप बिरुटे

भोचक's picture

1 May 2010 - 10:54 pm | भोचक

माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया.( women in my life) असे त्याचे नाव असावे.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

राजेश घासकडवी's picture

1 May 2010 - 12:19 pm | राजेश घासकडवी

'अजून काही' सेवा हा व्यक्तिगत संबंधांचा एक भाग झाला, बॉसला खुष ठेवण्याचं एक अंग झालं. वरच्या उदाहरणातला मुद्दा असा आहे, की कुठच्याही कार्यक्षेत्रात दिलेलं काम आणि व्यक्तिगत संबंध अशी काळी-पांढरी फारकत करणं शक्य नसतं.

हेच उदाहरण उलट्या बाजूने, दिलेलं काम मुकाट करणारा रामा गडी व काम करताना चार विनोदी गोष्टी सांगून तुमचं मन रिझवणारा शिवा गडी या स्वरूपातही मांडता येतं. शेवटी जाहिरातीत दिलेलं जॉब डिस्क्रीप्शन अपुरंच असतं. ते सर्व पार पाडून त्या परीघाबाहेर चुका करणं, किंवा 'वरची' कामगिरी बजावणं याने प्रचंड फरक पडून शकतो.

पुरुष बॉस व स्त्री रिपोर्ट यामुळे 'वरच्या' कामगिरीची क्षेत्रं विस्तारतात - व त्याचबरोबर यशस्वी स्त्रीच्या यशाकडेही बघतानाही 'वरच्या कामगिरीमुळे यशस्वी' अशी प्रतिमा बळावू शकते हा मुख्य मुद्दा आहे.

Nile's picture

1 May 2010 - 1:27 pm | Nile

चर्चेच्या मुख्य मुद्दाबाबत संभ्रम नाही. ऋषिकेशच्या वरील काही प्रतिसादांनुसार, स्वतःची प्रगती करण्याकरता 'काहीही'(कायद्यात बसणारे) मार्ग अवलंबायला हरकत नाही असे त्याचे मत असल्याचे दिसले म्हणुन ते उदाहरण दिले.

चर्चेतील मन्याचे फ्रस्ट्रेशन हे 'तसल्या' मार्गांच्या अवलंबनामुळे आहे.

रामा शिवा गड्यांचं उदाहरणही यात येत नाही, कारण ते 'स्कील' एका चांगल्या कर्मचार्‍याचेच आहे. यात शिवा असे करुन 'सर्वांना' खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.(चर्चेत मात्र भवितव्य हातात असलेल्या बॉस बद्दल उल्लेख आहे, 'सर्व' म्हणजेच कंपनीसाठी 'त्या' स्कीलचा काही संबंध नसावा)

चर्चेत आलेल्या मार्गाला जनमानसात खुली संमती नाही. (एखाद्याचे मत वेगळे असेल) त्यामुळेच तो मार्ग चुकिचा असे म्हणले जाते. शेवटी एखाद्याने असे करावे की करु नये हा वैयक्तीक नितीमत्तेचा प्रश्न आहे. (त्याशिवाय यश शक्यच नाही असेही काही ठिकाणी ऐकायला येते, उदा. 'कास्टिंग काउच')

स्वाती२'s picture

30 Apr 2010 - 3:53 pm | स्वाती२

चांगली चर्चा.

छोटा डॉन's picture

30 Apr 2010 - 4:01 pm | छोटा डॉन

ही केवळ पोच समजावी, सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे.
अनेक मजेशीर उदाहरणे पाहण्यात असल्याने भरभरुन लिहेन, तुर्तास चालु द्यात , सवडीने वाचतो आहे.
ऋचा प्रतिसादही भारी आहे :)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

प्रमोद देव's picture

30 Apr 2010 - 4:32 pm | प्रमोद देव

हा तर पुरुषांचा कमकुवतपणा समजला जातो.
एखादे वेळी बाटली काम करू शकणार नाही..पण बाई नक्की करेल...मग ती भाड्याची असो,दुसर्‍याची असो अथवा स्वतःची असो...तिच्यापुढे बधला नाही असा पुरुषोत्तम लाखात एखादाच मिळेल.
स्त्रियांकडे असणारी प्रमूख अस्त्रे म्हणजे सौंदर्य...ह्यामुळे तर विश्वामित्रासारख्या तपस्व्याचीही तपस्या भंग झाली..तिथे सामान्यांचा काय पाड?
दुसरे अस्त्र म्हणजे डोळ्यातले पाणी....ते झरू लागले की कितीही कठोर हृदयी पुरूष विरघळतो....
नेत्रकटाक्ष...ह्यामुळे किती पुरुष घायाळ होतात...त्याची गणती नाही...
बाकी अजून बरीच अस्त्र आहेत...आपापल्या कल्पना शक्तीने जाणून घ्या...

थोडक्यात काय तर समाज पुरूषप्रधान आहे असे जरी आपण उच्चरवाने म्हणत असलो तरी पुरुषाच्या चाव्या...स्त्रीच्या ताब्यात असतात हे विसरू नका.

Dhananjay Borgaonkar's picture

30 Apr 2010 - 4:36 pm | Dhananjay Borgaonkar

थोडक्यात काय तर समाज पुरूषप्रधान आहे असे जरी आपण उच्चरवाने म्हणत असलो तरी पुरुषाच्या चाव्या...स्त्रीच्या ताब्यात असतात हे विसरू नका.

अतिशय वास्तववादी विधान.

या वाक्यावर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत :D
=D> =D> =D> =D>

टुकुल's picture

30 Apr 2010 - 5:59 pm | टुकुल

एकदम सहमत.. असले धागे मस्त करमणुक करतात :-)

--टुकुल

प्रियाली's picture

30 Apr 2010 - 5:12 pm | प्रियाली

फारा वर्षांपूर्वी आमच्या इमारतीत राहणार्‍या माणसाचे सातत्याने प्रमोशन होत असे. आम्ही सगळे कंपनीने दिलेल्या घरांत राहत असल्याने प्रत्येकाला एकमेकांच्या अंतस्थ बाबी माहित असत.

या माणसाबद्दल सर्व म्हणत की तो बॉसची खूपच हांजी हांजी करतो. नंतर कोणी म्हणू लागले की बॉसच्या घरची भाजी वगैरे हाच आणतो. हा दावा थोडा हास्यास्पद वाटला. परंतु, एक दोनदा भाजी घेताना सदर प्राणी मला बाजारात दिसला आणि त्याने घेतलेल्या प्रचंड प्रमाणातील भाजीवरून (घरात तो आणि बायको दोघेच होते पण भाजीचे प्रमाण ३-४ किलो असे) मी त्याला सहज विचारले की "इतकी भाजी?" त्यावर त्याने सांगितले "हो, बॉसच्या घरी पोहोचवतो आहे." त्यावरून काय तो खुलासा झाला.

नंतर लोक म्हणू लागले की त्याच्या बायकोचे बॉसशी लफडे आहे. हे जरा अतिच होते. त्यावरून मी एका मैत्रिणीला "तुला घरात बसून दुसरे उद्योग नाहीत" असे दटावले होते. त्यानंतर कधीतरी सदर गृहस्थ त्या बॉसबरोबर पिकनिकला गेला असताना त्यांचा अपघात झाला असे ऐकले. रिक्षा उलटली होती. अपघातात सदर गृहस्थाला काहीच झाले नाही पण बॉस आणि बायको मात्र जबर जखमी झाले होते. त्यावरून अनेकांनी अनेक निष्कर्ष काढले होते हे सांगण्याची गरज नाहीच.

आंबोळी's picture

30 Apr 2010 - 5:46 pm | आंबोळी

प्रियाली,
किस्सा झकास आहे....
काहिच न सांगता बरेच काही सांगण्याची स्टाईल पण आवडली....
आंबोळी

Pain's picture

30 Apr 2010 - 10:59 pm | Pain

भारी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 May 2010 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

-दिलीप बिरुटे

निस्का's picture

30 Apr 2010 - 6:52 pm | निस्का

तुमचा जो professional networking चा मुद्दा आहे तो अगदी योग्य आहे. बर्याचश्या अभ्यासात असं दिसून आलंय कि एकत्र बीर पिणे, गोल्फ खेळणे वगेरे केल्यामुळे पुरुषांचे व्यावसायिक संबंध अधिक लौकर व मोठ्या प्रमाणावर विकसित होतात आणि त्याच्या बढती वगेरे साठी फायदा होतो. स्त्रियांना कुटुंब किंवा इतर कारणांमुळे ते शक्य नसते त्यामुळे त्या मागे पडतात, त्यांना पुरुष्यांच्या दुप्पट काम करून स्वतःला सिद्ध करावे लागते आणि glass-ceiling ला सामोरे जावे लागते.
(पार्श्वभूमी साठी - मी औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आहे)

नि...

नितिन थत्ते's picture

30 Apr 2010 - 7:22 pm | नितिन थत्ते

सगळे जण बॉसला खूष ठेवणे म्हणजे हांजी हांजी करणे किंवा बॉसची घरची कामे करणे असे मानत आहेत.

बर्‍याचदा बॉसची टारगेटस पूर्ण करायला मदत करणार्‍या आणि काम सोपवल्यावर निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास वाटणार्‍या माणसावर बॉस खूष असतो. आणि त्याच्या करिअरमध्ये बॉस त्याला मदत करतो.
(कधी कधी अशा पोटेन्शिअल असणार्‍याला बॉस त्याच्या चुकांमध्ये सांभाळूनही घेतो).

अशा व्यक्तीबद्दल इतर लोक बॉसच्या मर्जीतला/पुढेपुढे करणारा असे बोलतात.

काम कमी करून किंवा न करता बॉस ची केवळ मर्जी सांभाळून/बॉसला काही पर्सनल फेवर्स देऊन कुणाला करिअरमध्ये जास्त फायदा होत असेल असे वाटत नाही.

दुसरी गोष्ट ही या संबंधी नाही पण स्त्रीच्या चारित्र्याविषयी पुरुषाच्या दृष्टीकोनाविषयी आहे.

मी ज्या कंपनीत पहिली नोकरी केली तेथे एक इंजिनिअर स्त्री माझ्यापेक्षा सीनिअर होती.
त्या स्त्रीबद्द्ल काहीशी वदंता होती. तसेच आमचा एक एम डी होता. त्याच्याही बद्दल काही वावड्या होत्या. (या वावड्या त्या दोघांच्या एकमेकांतल्या संबंधाविषयी नव्हत्या). जरी दोघांचीही ख्याती सारखीच असली तरी दोन्हीतला फरक हा होता की त्या स्त्रीबद्दल बोलताना 'हलक्या प्रतीची स्त्री' असा सूर असे. पण एमडी विषयी बोलताना मात्र त्याच्या अशा वागण्याबद्दल 'कौतुकाची' भावना असे. या गोष्टीला २० हून जास्त वर्षे होऊन गेली आहेत.

नितिन थत्ते

प्रियाली's picture

30 Apr 2010 - 7:28 pm | प्रियाली

सगळे जण बॉसला खूष ठेवणे म्हणजे हांजी हांजी करणे किंवा बॉसची घरची कामे करणे असे मानत आहेत.

नव्हे नव्हे. त्यासाठी माझे दोन्ही प्रतिसाद बघावेत.

बॉसला ओळखणे ही कला आहे. शेवटी तोच तुमचा पहिला (इमिडिएट) कर्ताधर्ता असतो. त्याला तुमच्याकडून नेमके काय अपेक्षित आहे हे कळले (जसे, वेळच्यावेळी काम, कामाची रेकॉर्डस, त्याच्या गैरहजेरीत कामाची घेतलेली काळजी, एखाद्या मिटींगमध्ये त्याचा मुद्दा योग्य असल्यास दिलेला जाहीर पाठिंबा वगैरे. यांत कोणतीही हांजी हांजी नाही. परंतु, आपण एका टिममध्ये (कंपुमध्ये म्हणा हवं तर ;)) आहोत हे दर्शवणे) तर आपले, बॉसचे आणि टिमचे काम सुकर होते असा स्वानुभव आहे. :)

बर्‍याचदा बॉसची टारगेटस पूर्ण करायला मदत करणार्‍या आणि काम सोपवल्यावर निश्चित चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास वाटणार्‍या माणसावर बॉस खूष असतो. आणि त्याच्या करिअरमध्ये बॉस त्याला मदत करतो.
(कधी कधी अशा पोटेन्शिअल असणार्‍याला बॉस त्याच्या चुकांमध्ये सांभाळूनही घेतो).

याच्याशी सहमत.

II विकास II's picture

30 Apr 2010 - 7:30 pm | II विकास II

आपण जर स्वतःला बॉसच्या जागेवर ठेवुन पाहीले तर बॉसच्या अपेक्षा सहज कळतात. असो.

>>जसे, वेळच्यावेळी काम, कामाची रेकॉर्डस, त्याच्या गैरहजेरीत कामाची घेतलेली काळजी, एखाद्या मिटींगमध्ये त्याचा मुद्दा योग्य असल्यास दिलेला जाहीर पाठिंबा वगैरे. यांत कोणतीही हांजी हांजी नाही. परंतु, आपण एका टिममध्ये (कंपुमध्ये म्हणा हवं तर Wink) आहोत हे दर्शवणे
+१
-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

II विकास II's picture

30 Apr 2010 - 7:26 pm | II विकास II

त्या स्त्रीबद्द्ल काहीशी वदंता होती. तसेच आमचा एक एम डी होता. त्याच्याही बद्दल काही वावड्या होत्या. (या वावड्या त्या दोघांच्या एकमेकांतल्या संबंधाविषयी नव्हत्या). जरी दोघांचीही ख्याती सारखीच असली तरी दोन्हीतला फरक हा होता की त्या स्त्रीबद्दल बोलताना 'हलक्या प्रतीची स्त्री' असा सूर असे. पण एमडी विषयी बोलताना मात्र त्याच्या अशा वागण्याबद्दल 'कौतुकाची' भावना असे.
== शेवटी काय, ज्याची त्याची जाण, ज्याची त्याची निष्पक्षता

-----

ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2010 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त चर्चा वाचतोय....!

-दिलीप बिरुटे
[बिझी]

Pain's picture

30 Apr 2010 - 11:28 pm | Pain

आपण आपल्या सन्स्कार (हा शब्द लिहिता आला नाही) मुळे असा विचार करतो की नै तिकता महत्वाची वगैरे. प्रत्यक्शात तसे काही नसते. शाळेत कोपी (पुन्हा तेच) करणारी मुले आणि हे सारखेच.

बद्दु's picture

1 May 2010 - 1:13 pm | बद्दु

मी स्वत: एक बॉस आहे. हाताखाली केमिस्ट, इंजिनीयर, टेक्निकल असिस्टण्ट, सेक्रेटरी (अर्थात स्त्री...कसली..गोsssड मुलगी आहे.. असो) त्या सर्वांचे माझ्या सोबतचे वागणे मी अनुभवत असतो..त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून.. बर्यांच गोष्टी लक्षात येत असतात. त्यातून काय अर्थ काढायचा हे सुद्धा ठरवावे लागते..केवळ लांगूलचालन करणार्यााला मी (म्हणजे बॉस) जास्त भाव देतो असे नाही... किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो असेही नाही.. आणि कमी अधिक प्रमाणात सर्व बॉसेस हे करतात अशी खात्री आहे..काही "सन्माननीय" अपवाद वगळता.. “ असे मानले जाते की प्रत्येक व्यक्तीची एक मर्यादा असते..त्या मर्यादेत राहून तो काम करतो आणि प्रगती करण्याचा प्रयत्न करतो” ..आणि हे सर्व अगदी साहजिक आहे.. काही महत्वाकांक्षी व्यक्तींचे मात्र तसे नसते..ते मार्ग शोधत असतात..लवकर प्रसिद्ध होण्याचे, कमी प्रयत्नात जास्त लाभ (प्रमोशन/पगारवाढ) मिळविण्याचे… आणि हे साध्य करण्यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते..मग नैतिक..अनैतिक कुठलाही मार्ग .. ते प्रयत्न करत असतात..आणि हे सर्व मी/तुम्ही डोळ्याने बघत असतो/असता.. मी अनुभवावरून सांगतोय..परंतु स्त्री किंवा पुरूष दोघेही या मार्गांचा सारखाच प्रयोग करतात.. अनैतिक मार्गाने जाणारे माझ्यावर (म्हणजे बॉसवर) जास्त दबाव टाकतात..तर नैतिक मार्गाने चालणार्यां्ना माझा (म्हणजे.... ) दबाव जाणवतो..हे सर्व अनुभवता येत...परंतु एक गोष्ट सत्य आहे की तुम्ही कोणीही असा ..तुमचा वावर तोपर्यतच खपविला जातो जोपर्यंत तुमची आवश्यकता आहे... तुमची कार्यकुशलता, अनुभव, ज्ञान, तुमचे सौंदर्य, आणि तत्सम गोष्टी..या सर्व प्रकारचे मूल्यमापन वेगवेगळ्या पातळीवर होत असते..प्रत्येक गोष्टीला महत्व आहे..(एक मर्यादेत)..हे गृहीत असते.. आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा पुरेपूर वापर जीवनाच्या या सारीपाटावर केला जातो.. या खेळात जो जिंकतो तो राज्य करतो आणि जो हरतो तो वनवास भोगतो...

प्रकाश घाटपांडे's picture

2 May 2010 - 7:04 am | प्रकाश घाटपांडे

.परंतु एक गोष्ट सत्य आहे की तुम्ही कोणीही असा ..तुमचा वावर तोपर्यतच खपविला जातो जोपर्यंत तुमची आवश्यकता आहे... तुमची कार्यकुशलता, अनुभव, ज्ञान, तुमचे सौंदर्य, आणि तत्सम गोष्टी..या सर्व प्रकारचे मूल्यमापन वेगवेगळ्या पातळीवर होत असते..प्रत्येक गोष्टीला महत्व आहे..(एक मर्यादेत)..हे गृहीत असते.. आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा पुरेपूर वापर जीवनाच्या या सारीपाटावर केला जातो.. या खेळात जो जिंकतो तो राज्य करतो आणि जो हरतो तो वनवास भोगतो...

हेच म्हण्तो. तो पर्यंतच तुम्हाला किंमत आहे कि जोपर्यंत तुमच्या कडे उपयुक्तता / उपद्रव मुल्य आहे. जेव्हा तुमच्याकडे दोन्ही नसते तेव्हा तुमची क्षमता कितीही असली तरी तुमची किंमत शुन्य. तुमच्या तत्वांची किंमत तुम्हाला या ना त्या प्रकारे चुकवावीच लागते. अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळी नीती / अ-नीती च्या गप्पा निरर्थक असतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चित्रा's picture

1 May 2010 - 6:26 pm | चित्रा

कामाच्या ठिकाणी पैसा, नैतिकता, पगारवाढ, मान, पदोन्नती या सर्वांचे असे काही मिश्रण होते की तेथे हे नैतिक/अनैतिकतेचे प्रश्न कळीचे होतात. यात व्यक्तीसापेक्ष निर्णय होतात असे दिसते.

एखाद्या स्त्रीला वरचे पद पटकन मिळाले की तिने काही खास मर्जी सांभाळली असेल असे अनेक पुरूषांना जसे वाटते तसे ते काही स्त्रियांनाही वाटते असे दिसते. कधीकधी तसे ते असतेही, कधी नसते. बहुदा असे नसते तेव्हा अशा स्त्रीबद्दल आदर असतो, आणि मानही मिळताना अधिक मिळतो. तेव्हा तिच्या बुद्धी, आणि कार्यकुशलतेबरोबर तिच्या व्यक्तिगत नैतिक धोरणांनाही मान्यता मिळालेली असते. याउलट जेव्हा असे असते, म्हणजे थोडे सैल, सलगीचे वागणे असते, तेव्हा स्त्रीला पाठीमागे नावे ठेवली जातात. हे मला वाटते पुरूषांच्याही बाबतीत दिसते. पुरूषांचे अशा सैल वागण्याबद्दल कौतुक होत नाही.

पुरूषांना जेव्हा वरचे पद मिळते तेव्हा वर दिलेल्या इतर उदाहरणांप्रमाणे इतर काही गोष्टींमुळे (पुढेपुढे, हांजी, वरची कामे करण्याने) पदोन्नती झाली असे पाठीमागे म्हटले जात असावे असे वरील काही उदाहरणांवरून दिसतेच. ती पगारवाढ किंवा पदोन्नती सैल वागण्यामुळे मिळाली असे जेव्हा बॉस एखादी स्त्री असेल (म्हणजे विरूद्धलिंगी) किंवा समलिंगी संबंधाची शंका असली तर पुरूषालाही म्हटले जाईल याची खात्री वाटते.

तेव्हा मला मुद्दाम स्त्रियांना वेगळे नियम, पुरूषांना वेगळे नियम लावले जातात असे वाटत नाही. माझ्या पहाण्यात नैतिकतेचे नियम स्त्री-पुरूषांना सारखेच लावले जातात असेच आहे.