मनुष्याचा इतिहास यादवी-युद्धांनी भरलेला आहे. जे मुद्दे तडजोडीने, सहमतीने, गुण्यागोविंदाने सुटू शकतात अशाविषयी हट्टाग्रही भूमिका घेऊन शस्त्रं उपसायची परंपरा आहे. यात भावाविरुद्ध भाऊ उभा राहातो, मित्राविरुद्ध मित्र पवित्रा घेतो आणि प्रेम विसरून एकमेकांचा गळा घोटायला ते तयार होतात. कित्येक राज्यं, देश अशा आंतर्गत बंडाळ्यांमुळे कमकुवत होऊन परकीय आक्रमणांना बळी पडलेली आहेत.
मिपावर मी बऱ्याच लोकांपेक्षा खूप कमी वेळ वावरलो आहे. कोणाला अजून भेटलेलोही नाही. असं असतानाही माझे मिपाशी, तिथल्या लोकांशी ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. मिपाने मला खूप काही दिलेलं आहे. सर्वांनाच मिपाविषयी आत्मीयता वाटते हे मला दिसून आलेलं आहे. तेव्हा मी सर्वांना आवाहन करतो की माझ्या पहिल्या प्रतिसादाला +१ असा प्रतिसाद द्यावा. ज्यांना त्या साध्या विधानापलिकडे काही लिहायचं असेल, आमचा दोष नसून त्यांचा असं म्हणायचं असेल, किंवा जे झालं ते तितकं गंभीर नव्हतंच असं म्हणायचं असेल, ते स्वतंत्र प्रतिसाद द्यायला मोकळे आहेतच.
खालची कविता एकांगी होऊ नये म्हणून वादग्रस्त ओळींच्या दोन व्हर्जन आहेत. ज्याला जी हवी ती स्वीकारावी. पण कंसातल्या शब्दांपेक्षा कंसाबाहेरच्या शब्दांना महत्त्व द्यावं अशी विनंती.
(ग्रेसना वंदन करून)
यादवी
ती झाली तेव्हा टिकटिक, कीबोर्ड निनादत होता
(सत्तेत अडकली चरणे, हा पाश उल्गडत होता) किंवा (पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता)
ती घाई होती हाती, घनतुंबळ रणसमराची
निष्कारण दुहिच्या पायी, कल्लोळ माजला होता
ती झाली आता म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
घावांनी जख्-मि पाउस, रक्ताने भिजला होता
अंतरात गमले मजला, संपले नव्खेपण माझे
गोकुळी नांदता यदुजन, दोघांत वाटला होता
हे रक्त पाहतानाही त्यां आता गहिवर नाही
(निर्वस्त्र द्रौपदीला हा, दु:शासन हसला होता) किंवा (वस्त्रांत द्रौपदीच्याही, उद्देश नागडा होता)
प्रतिक्रिया
25 Apr 2010 - 5:55 am | राजेश घासकडवी
मिपाविषयी मला आत्मीयता आहे, त्यामुळे इथे खेळीमेळीच्या टक्केटोणप्यांपलिकडे, किंवा साध्या वैचारिक मतभेदांपलिकडे भांडणं होऊ नयेत असं मला मनापासून वाटतं.
25 Apr 2010 - 6:01 am | अक्षय पुर्णपात्रे
झकास विडंबन. (प्रतिसाद आल्यास उपप्रतिसाद लिहिण्याची शक्यता आहे.)
25 Apr 2010 - 6:13 am | श्रावण मोडक
+२
(हे झाले तुमच्या मागणीप्रमाणे)
हे अधिक समर्पक!
25 Apr 2010 - 6:48 am | Nile
>>हे अधिक समर्पक!
+१.
छान जमलंय!
25 Apr 2010 - 7:13 am | धनंजय
येथे किंवा अन्य संकेतस्थळावर व्यक्तिगत निरोप बघावे.
26 Apr 2010 - 1:22 pm | बिपिन कार्यकर्ते
+५
बाकी तिकडे बोलूच. :)
बिपिन कार्यकर्ते
26 Apr 2010 - 8:51 pm | संदीप चित्रे
असंच म्हणतो
25 Apr 2010 - 6:32 am | शुचि
कविता खूप आवडली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
25 Apr 2010 - 7:36 am | विसोबा खेचर
लै भारी रे! :)
25 Apr 2010 - 8:11 am | प्रमोद देव
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता
ही ओळ जास्त समर्पक आहे. ;)
तांडा च्या ऐवजी कंपू हा शब्द जास्त उचित होईल. :D
25 Apr 2010 - 9:03 am | मनीषा
पाहून मोकळी कुरणे, हा तांडा परतत होता
ही ओळ जास्त समर्पक आहे.
सहमत!
समयोचित आणि समर्पक कविता ...
25 Apr 2010 - 8:50 am | II विकास II
श्री घासकडवी यांचे मिपावरील प्रेम पाहुन आंनद झाला. निरपेक्ष प्रेम असेल तर काही अडचणी येत नाहीत, प्रेमातुन काहीतरी हवे असेल आणि ते मिळाले नाही कि उगाच शहारुख खानच्या 'डर' ची कथेची पुनरावृत्ती होती. कंपुला लोक नावे का ठेवता, याचासुद्धा कंपुने विचार करायला हवा. असो.
ज्याची त्याची समज, ज्याची त्याची जाण.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
25 Apr 2010 - 10:26 am | नंदन
--- खी: खी: खी:, 'यदुजन' भारीच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Apr 2010 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन, 'यदुजन' म्हणजे भाषा महत्त्वाची नसावी ... इथून तिथून "यादवी" महत्त्वाची! ;)
राजेश, झकास विडंबन! काना, मात्रा, वृत्ताबद्दल कवितक गुरूजींना मी काय सांगणार? अर्थही झकासच.
अदिती
26 Apr 2010 - 8:45 am | निरन्जन वहालेकर
वा ! क्या बात है ! अतिशय सुरेख विडंबन ! आणि सरस शब्द प्रतिभा ! !
अजून येऊ देत !