वळखा पाहू

उग्रसेन's picture
उग्रसेन in जनातलं, मनातलं
14 Apr 2010 - 2:29 pm

गावगाडा म्हणल्यावर गाणी, म्हणी, उखाणी, त्या इषयाला काय कमी नाय. आन उखाणा कोड्यासारखा असला तर लय मजा.
आज काही कोड्यासारखी उखाणी घालतो . तुम्हाला ठाव असल तर तुम्हीबी उखाणे टाका. पर उखाण्यामधी कोडं असलं पाह्यजेन.
उखाण्याचं उत्तर धाग्यामधीच द्यायचं. ज्याच उत्तर बरुबर राहीन. त्याच्या खरडवहीत 'शाब्बास' असे लिव्हल्या जाईन याची
गावकर्‍यांनी नोंद घ्यावी. :)

१) रंग नाही रुप नाही आभाळ म्हणशील काय ?
आदी नाही अंत नाही देव म्हणशील काय ?
भूत नाही, देव नाही, विचार करतोय काय ?
सांग मला काय ते, नाही तर येथून जाय.

२)रघुरघु रुसला, पाण्यात घुसला
रघुला चार पाय, रघुचे नाव काय ?

३) तीन पायाची तिपाई, वर बसला शिपाई

सांगा पटापट उत्तरं :)

कलासंगीतसंस्कृतीप्रतिसादआस्वाद

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

14 Apr 2010 - 5:37 pm | अमोल केळकर

बाबुराव तुम्हीच द्या उत्तरं

अमोल
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

टारझन's picture

14 Apr 2010 - 5:40 pm | टारझन

गावकर्‍यांनी फाट्यावर मारलं का काय ? =))

उग्रसेन's picture

14 Apr 2010 - 6:22 pm | उग्रसेन

तरी मनलं अजून Rolling on the floor चा वाकडा उत्तर कसा नाय दिसना .
येत आस्सन तर उत्तर दे. बाकी शिट्ट्या कशाक माराव म्हणतो.
शिट्या माराक ब-याच जागा असती ना :)

एक दोस्तानं व्यनी करुन पहिल्यानं उखाण्याचं उत्तर 'इंटरनेट' दिला.
ते उत्तर माका चूक वाटे. पर उत्तर आवडेश.

बाबुराव :)

शुचि's picture

14 Apr 2010 - 6:03 pm | शुचि

तो रघु बेडुक वाटतोय किंवा कासव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

उग्रसेन's picture

14 Apr 2010 - 6:05 pm | उग्रसेन

उत्तराच्या लय जोळ आल्या तुमी
हे का ते आस्सं नाय म्हणाचं बॉ :)

बाबुराव :)

शुचि's picture

14 Apr 2010 - 6:15 pm | शुचि

पहील्याचं उत्तर मन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

उग्रसेन's picture

14 Apr 2010 - 6:18 pm | उग्रसेन

उत्तर चूक हाय. मगर सोचनेका तरीका आवडेश.

बाबुराव :)

शुचि's picture

14 Apr 2010 - 6:29 pm | शुचि

रामराम मंडळी, मला बी २ उखाणे येतात

(१) २ भाऊ शेजारी
भेट नाही संसारी

(२) एवढासा गडू
त्याला पाहून रडू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

विंजिनेर's picture

14 Apr 2010 - 6:33 pm | विंजिनेर

१ = डोळे
२ = कांदा

शुचि's picture

14 Apr 2010 - 6:57 pm | शुचि

बरोब्बर!!! :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

उम्मि's picture

14 Apr 2010 - 6:29 pm | उम्मि

हवा....पहील्याचे उत्तर.

ऊम्मि

Romance means hand in hand,
hand in ****
that in ****
that in that.....

उग्रसेन's picture

14 Apr 2010 - 6:37 pm | उग्रसेन

:)

बाबुराव :)

शुचि's picture

14 Apr 2010 - 6:58 pm | शुचि

मला हे उत्तर येत होतं ... मी आळस केला
[( :''( [( :''( [( :''(
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

अनामिक's picture

14 Apr 2010 - 7:48 pm | अनामिक

आता आळस केलाच आहे तर आळ्स देऊनही टाका.

-अनामिक

इनोबा म्हणे's picture

14 Apr 2010 - 10:46 pm | इनोबा म्हणे

तिसर्‍या प्रश्नाचं उत्तर 'माठ'.(?)
शिपाई सहसा 'माठ'च असतो. ;)

पाषाणभेद's picture

15 Apr 2010 - 9:04 am | पाषाणभेद

अजून एक:
रघू रघू नाना पाची बोटे ताणा
आमचा रघू रूसला, भिंतीवर जावून रूसला.

कृपया उत्तर माहीत असेल तर येथे देवू नका.

व्यनी करा. उत्तराला शाबासकी येथे दिली जाईल व उत्तर कर्त्याचे नाव येथे दिले जाईल.
ही पद्धत इतरांनाही उत्तरे देण्यास व विचार करण्यास कारण ठरेल म्हणून कृपया उत्तर माहीत असेल तर येथे देवू नका.

ज्यांना उत्तर मिळाले नाही ते इथे तसे लिहून उत्तर व्यनी मागवू शकतात.

या पुढेही कोड्यांना असलीच पद्धत अवलंबवावी.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

पाषाणभेद's picture

15 Apr 2010 - 10:24 am | पाषाणभेद

योगेश२४ शाब्बास!

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

उग्रसेन's picture

16 Apr 2010 - 4:56 pm | उग्रसेन

१) हवा २) कासव ३) चूल आन त्यावर तवा

बाबुराव :)

डावखुरा's picture

16 Apr 2010 - 5:12 pm | डावखुरा

व्यनि केलाय... "राजे!"

झुम्बर's picture

17 Apr 2010 - 2:06 pm | झुम्बर

मार मेल्या मार लग्न होऊस्तर मार
लग्न झाल्यावर मारशील तर जीव देईन ठार

ओळखा

अंग नाच तंग नाच
तु नाच मी नाच
बाबूची शेंडी नाच

ओळखा

तीन पायाची त्रिंबक राणी
खाते लाकूड पिते पाणी

ओळखा

उग्रसेन's picture

18 Apr 2010 - 1:22 pm | उग्रसेन

सांग ना गड्या उत्तर

बाबुराव :)

मदनबाण's picture

17 Apr 2010 - 2:12 pm | मदनबाण

तीन पायाची त्रिंबक राणी
खाते लाकूड पिते पाणी
>>> सहाण

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

शैलेन्द्र's picture

19 Apr 2010 - 4:23 pm | शैलेन्द्र

,

झुम्बर's picture

17 Apr 2010 - 3:07 pm | झुम्बर

अचुक रामबान मदनबाण.....

पर्नल नेने मराठे's picture

18 Apr 2010 - 6:15 pm | पर्नल नेने मराठे

फताडी म्हैस तिची फताडी शिगें...
लेंडके तिची गुळमट गुळमट .
:D ओळखा पाहु?

चुचु

झुम्बर's picture

19 Apr 2010 - 4:40 pm | झुम्बर

१.माठ
मार मेल्य मार कुम्भार मड्की बनवताना सतत थापड्या मारत असतो
लग्न होउस्तर मार म्हजे मडक पक्क होइपर्यन्त
लग्न झल्यवर मरशिल तर जिव देइन ठार म्हन्जे पक्क मद्क्यल मरल तर ते फुटत...

२.ताक घुसळ्न्यचि रवी