खटाऊची नोकरी -भाग २

हेमंत बर्वे's picture
हेमंत बर्वे in जनातलं, मनातलं
14 Apr 2010 - 1:51 pm

खटाव मिल त्या वेळी ऐन भरात होती.
ऑर्डरची कमी नव्हती .सहा सहा महीन्यांच्या ऑर्डर तयार असायच्या. तिन्ही शिफ्टमध्ये काम भरपूर असायचं .सुटीच्या दिवशी सुध्दा काम चालू असायचं .
कामगारांना दिडपट पगार मिळायचा.त्याखेरीज एक हक्काची रजा मिळायची.
धोतरामध्ये पटना एक्सप्रेस जोरात .
साड्यांमध्ये चंदेरी साडी .
सगळे ब्रॅंड बाजारात वर्षभर विकले जायचे.
खटाऊची व्हॉयल म्हणजे प्रिमीयम प्रॉडक्ट.
साडी सहा ते सात वर्षं टिकायची.रंग जायचा नाही किंवा पोतही खराब व्हायचा नाही.साडी आटायची नाही. साड्यांची उंची जास्त.
बुटक्या बायकांना या साडीच्या निर्‍या जवळ जवळ फुटभर आत खोचाव्या लागत.
उंच बायका मात्र या साड्यांवर फार खूष असायच्या असं आमचे रिटेलर आम्हाला सांगायचे.
खटावच्या या साड्यांचे मोठ्ठे ग्राहक म्हणजे तृतीय पंथी. एकेका वेळी शंभर शंभर साड्यांची खरेदी करायचे.
खटाउच्या साड्यांचे कॅलेंडर त्यावेळी फार लोकप्रिय होते.
आजही मुंबई मार्केटात खटाऊच्या साड्यांच्या कॅलेंडरच्या मॉडेलची आठवण काढूनओठावरून जीभ फिरवत शून्यात बघणारे व्यापारी आहेत.
त्यावेळची सगळी टॉप मॉडेल्स या सहा पानी कॅलेंडरमध्ये असायची.
अंगावर खटाऊची साडी आणि पोलक्याचा पत्ता नाही.
किंवा असलंच तर न दिसणारं .
कदाचीत मंदीरा बेदीला जर प्रेरणा मिळाली असेल तर आमच्या खटाऊचं कॅलेंडर बघूनच.
(इथे एक सुस्कारा आहे.तो वाचावा.)
हॅपी मोमेंट्स ऑफ युअर लाईफ यु कॅन शेअर विथ खटाउ ही आमची स्लोगन होती.
आम्ही ऑफीसर या तिन्ही पाळ्यांना ए बी आणि सी म्हणायचो.
पण कामगार मात्र दिवस पाळी ,मधली पाळी आणि छल्ली पाळी म्हणायचे.
कामगारात पण चार पाच वेगळे प्रकार असायचे.
कायम नोकरी असणारे जातू .
तात्पुरत्या कामगारांना बदली कामगार म्हणायचे.
कित्येक कामगार आठ आठ वर्षं बदली म्हणून काम करायचे.
जातू होणे म्हणजे ग्रीन कार्ड मिळन्याइतकं महत्वाचं होतं.
जातू झाल्यावर एक अढळ स्थान मिळायचं.एक लूम एक साचा. चार साचे म्हणजे एक जोडी .अशी एक जोडी कायम स्वरुपी त्याची व्हायची.
असं झालं की त्याचा सेन्स ऑफ बिलाँगींग फार उंचावर पोहचायचा.
मग त्यासाठी अर्धा तास आधी कामावर यायचा. साच्याची सफाई करायचा. साच्याखालचा केर काढायचा. त्यानी साच्यावर ठेवलेल्या फोटोला हार घालायचा. आधीच्या कामगाराकडून साच्यात काही बिघाड नाही याची खात्री करून घ्यायचा .
मग पाळी संपली की ८०% एफीशीअन्सी चा रिपोर्ट छाती पुढे काढून आम्हाला दाखवायचा.
जातू होणं म्हणजे एक शान होती. त्याला गिरणगावात एक मानही होता.

या सगळ्या जातूंचा बाप म्हणजे जॉबर.
प्रत्येक जातूचं आयुष्यातलं अंतीम स्वप्न म्हणजे जॉबर होणं .
एका जॉबर च्या हाताखाली तेरा साचेवाले. दोन फिटर. बारा बिगारी .एक फालतू.(असीस्टंट जॉबर).
एका जनरल मॅनेजरच्या अंगी असणारे सगळे गुण -अवगुण जॉबरकडे असायचे.
ऑफीसरशी फक्त जॉबर बोलणार.ऑफीसरनी त्याच्या जातूंशी डायरेक्ट बोलणे देखील जॉबरला अपमानास्पद वाटायचे.
मी खटाउला लागलो तेव्हा माझं वय बावीस . आणि असले अठरा बाप लोक माझ्या हाताखाली.
एकेक जॉबर सहा सहा फुटाचा पैलवान्.एका हाताच्या पकडीत लूम थांबवायची ताकद असलेले.
एक अलिखीत नियम मी नेहेमी पाळला .मी जॉबरच्या प्रांतात ढवळाढवळ करायची नाही आणि त्यांनी माझ्या अधिकाराचा उपमर्द करायचा नाही.
त्यामुळे हाताखाली दोनशे माणसं असूनही वातावरण नेहेमी खेळीमेळीचं .
माझ्या तिसर्‍या पाळीचा पहीला दिवस.रात्रीची पाळी लावून झाली.मेजर काम संपलं. एक कामगार माझ्याकडे आला .ऑफीसर रेस्टरूमची चावी मागीतली. मी दिली. थोड्या वेळानी चावी परत आली. मी रेस्टरूम मध्ये गेलो. माझं अंथरुण व्यवस्थीत घातलेलं होतं.साडेबाराला मी झोपलो.साडेपाच वाजता दारावर थाप मारून उठवण्यात आलं .मी फ्रेश होऊन खाली गेलो. रिपोर्टावर सही करून एफीशिअन्सी चार्ट भरून मी घरी गेलो.
मग वर्षानुवर्षं रात्र पाळी अशीच सुखात गेली.

खटाउचा एकेक सॉर्ट (मालाचा प्रकार)तीस -चाळीस वर्षं एकेका साच्यावर चालायचा.
कामगाराला ऑफीसरच्या सल्ल्याची आवश्यकताच पडायची नाही.
रीपोर्ट भरणे आणि चार्ट बनवणे.
वेगळेवेगळ्या गीअर मध्ये ओरडून दिड दोन तास वर्कर टॅकलींग करायचे.
क्वालीटी चेकींगचे कमीतकमी पाच टाके बघायचे.एक टाका म्हणजे एकशे पस्तीस मिटर.प्रत्येक लूमवर क्वालीटीची सही करायची.सवयीनी ही कामं लवकर व्हायची .
हे झालं की मग जॉबरच्या हातात सगळं सोडून द्यायला काहीच हरकत नसायची.
थोड्या वेळानी जॉबरपण विश्रांती घ्यायचा.त्यात ऑफीसर ढवळाढवळ करायची नाही
या पध्दतीनी रात्रपाळी चालायची.दिवस पाळीला कुठलीच तक्रार पोहचता कामा नये हे एक तत्व सगळ्यांनी सांभाळायचे.

माझ्या पहील्या पंधरवड्यात मी सकाळी नेहमीप्रमाणे खाली आलो.
मी नवीन असल्याने सगळेच कामगार माझ्यासाठी नवीन.
सकाळी सात वाजता मी रीपोर्ट देण्यासाठी मॅनेजरच्या समोर बसलो.
त्यांनी चार्ट बघून मला विचारलं "अरे , बर्वे तीन नंबरका बी.सी. वायंडींग का माल इतना कम क्यू?
आता मी रात्रभर झोपलेलो. मला काय माहीती की ते बी.सी. वायंडींगचं काय लफडं आहे?
मला काय उत्तर द्यावं ते कळेना .
तेव्हढ्यात एक वर्कर बाजूला उभा होता.
त्यानी तातडीनी परीस्थीती हातात घेतली.
कपाडीयांना त्यानी सांगायला सुरुवात केली.
"साब रातको एक बजे मशीन बंद ."
"फिर बर्वे साब आये. हम दोनो विलेक्ट्रीक डिपारमेंटमे गये."
"वो लोक तीन बजे आये. बहोत कोशीश किये.फिर बंद रखनेको बोले और निकल गये."
बर्वे साब और हम रातभर खडे थे लेकीन क्या करेंगे आपको मालूम है ना ये विलेक्ट्रीक वाले कैसे काम करते हय"
इथे लल्लन रामचरण चे स्टेटमेंट संपले.
कापडीयांनी मान डोलावली .
मी तिसर्‍या पाळीला फार लवकर सरावलो हे त्यांच्या लक्षात आलं असावंच.

अशा शुध्द सहकारात ऑफीसर आणि कामगार काम करायचे.
एकमेकांना सांभाळून घेणं हा एक महत्वाचा धडा मी शिकलो.
त्यामुळे उरलेली सगळी वर्षं डोक्यात अधिकाराची हवा गेली नाही आणि माझ्या शिफ्टची एफीशीअन्सी कायमच इतरांपेक्षा जास्त असायची.
पण सगळेच कामगार लल्लन रामचरणसारखे नसायचे काही पांडू भटासारखे पण असायचे...
(पांडूभटाची ष्टोरी पुढल्या भागात .)

भाग -१ : http://www.misalpav.com/node/11782

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

भारद्वाज's picture

14 Apr 2010 - 2:37 pm | भारद्वाज

पांडूभटाची वाट पाहतोय ...

टुकुल's picture

14 Apr 2010 - 2:41 pm | टुकुल

मस्त हो..
आधीचा भाग राहुन गेला होता, हा भाग एव्हढा चांगला लिहिला आहे कि पटकन आधीचा भाग शोधुन वाचुन काढला.
पुढचे भाग पण येवु द्या आता.

--टुकुल

स्वाती दिनेश's picture

14 Apr 2010 - 2:51 pm | स्वाती दिनेश

मस्त हो..
आधीचा भाग राहुन गेला होता, हा भाग एव्हढा चांगला लिहिला आहे कि पटकन आधीचा भाग शोधुन वाचुन काढला.
पुढचे भाग पण येवु द्या आता.

असेच म्हणते,
स्वाती

भोचक's picture

14 Apr 2010 - 3:08 pm | भोचक

वा. मस्तच लिहिलंय. आधीचा भाग वाचला होता. त्यामुळे नव्या भागाची वाट पहात होतोच.

पण फार उशिरा लिहिता हो तुम्ही.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

प्रकाश घाटपांडे's picture

14 Apr 2010 - 3:08 pm | प्रकाश घाटपांडे

पांडु भटाची वाट पहातो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

चतुरंग's picture

14 Apr 2010 - 4:12 pm | चतुरंग

वाट पहातो. (रामदासांच्या लिखाणाची आठवण येतेय..)
चतुरंग

प्रदीप's picture

14 Apr 2010 - 4:14 pm | प्रदीप

सुरेख.

रामदासांच्या लिखाणाची (विषेशतः 'जेसी, पीसी...') आठवण मला का होते आहे बरे?

पुढील भागांची वाट पहातो.

हवालदार's picture

17 Apr 2010 - 3:51 pm | हवालदार

पुर्ण झाली आहे का? त्याचे सर्व भाग एकत्र कुठे वाचायला मिळतील ?

विंजिनेर's picture

14 Apr 2010 - 4:51 pm | विंजिनेर

छान! चला.. मिपावर अजून एक उत्कृष्ट लेखमालिका वाचायला मिळते आहे.

बर्वेसाहेब, प्रत्येक भागात आधीच्या भागांचे दुवे टाकत गेलात तर सगळ्या भागांचा सलग आस्वाद घेता येईल (उदाहरण इथे पहा).

...लिखाण वाचून 'वामनसुत' यांच्या 'स्मृतीगंध' या लेखमालेचीही आठवण झाली...तसंच साध्या शब्दांतलं कसदार लिखाण, धन्यवाद!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Apr 2010 - 9:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी, साधे शब्द आणि कसदार लिखाण!
अदिती

आळश्यांचा राजा's picture

14 Apr 2010 - 5:41 pm | आळश्यांचा राजा

क्लास! मस्त लिहिलंय! ते दिवस गेल्याची एक हुरहूर लागून राहिलेली कायम जाणवत राहतेय...

आळश्यांचा राजा

तशा साड्या आणि तशा बायड्या आता कुठे ?
(इथेपण एक सुस्कारा आहे.)

चक्रमकैलास's picture

14 Apr 2010 - 6:44 pm | चक्रमकैलास

मस्त लिहिलाय लेख...पांडूभट कधी येणार आहे..??

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

प्रभो's picture

14 Apr 2010 - 6:46 pm | प्रभो

मस्त.. पुलेप्र.

गोगोल's picture

14 Apr 2010 - 7:49 pm | गोगोल

खुलेशु

प्राजु's picture

14 Apr 2010 - 8:39 pm | प्राजु

बाबांच्यामुळे माझं बालपण सगळं डेक्कन को-ऑप मिल्स च्या टेक्स्टाईल वातावरणार गेलं आहे. ते टेक्स्टाईल इंजिनियर आहेत.
त्यामुळे जॉबर, फर्स्ट शिफ्ट, नाइट शिफ्ट.. हे सगळे शब्द अखंड कानावर पडत असत.
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

पांथस्थ's picture

14 Apr 2010 - 9:15 pm | पांथस्थ

भाग १ आणी भाग २ मस्तच लिहिले आहेत. आणखी येउद्या!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

पाषाणभेद's picture

15 Apr 2010 - 4:01 am | पाषाणभेद

ओघवते लेखन. अजुन येवू द्या.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2010 - 5:45 am | राजेश घासकडवी

+१

मदनबाण's picture

15 Apr 2010 - 8:35 am | मदनबाण

पुढच्या भागाची वाट पाहतोय... :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अप्पा जोगळेकर's picture

17 Apr 2010 - 4:09 pm | अप्पा जोगळेकर

+१