भुर्जपत्र ते वेबपेज

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
3 Mar 2010 - 10:41 am

भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला. ब्लॊगिंग च्या माध्यमातुन अनेक तरुण लोकांच्या पर्यंत पोहोचता आले. त्यांच्या पुस्तकाचे उत्तम परिचय ऒर्कुट कम्युनिटीवर झाले. ही नव्या युगाची देणगी असल्याचे त्यांनी नमुद केले. महेश घाटपांडे यांनी आम्ही म्रराठी हा अंक वेबसाईट स्वरुपात प्रथम आणल्यावर सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यानंतर जसा या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे संकेतस्थळाला भेट देणार्‍या लोकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले. मिलिंद जोशींनी देहबोली ते भुर्जापत्राचा प्रवास कथन केला. पारंपारिक साहित्यातील जड शब्दांना कंटाळलेल्या लोकांना हा नवीन पर्याय मिळाल्याने साहित्यातील मक्तेदारी कमी होण्यात उपयोग झाल्याचे सांगितले. संध्या टांकसाळे यांनी या माध्यमामुळे वाचकांना आपले प्रतिसाद लगेच देता आले. यामुळे एखाद्या लेखावर प्रतिक्रिया एकदम शंभरात पोहोचल्याने हा लक्षणीय फरक दिसल्याचे सांगितले. उज्वला बर्वे यांनी आत्ताच्या पत्रकारितेतल्या माध्यमाला एक साचा असतो तो अभ्यासक्रमात शिकवला जातो. तशा प्रकारचे बंधन या इंटरनेटवरील माध्यमाला नसल्याने वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटत नसल्याचे सांगितले.
कार्यक्रम रंगत दार झाला. इंटरनेटवरच्या मराठी जगतात मराठीची मोडतोड होते असे म्हटले तर ती आताच्या माध्यमात देखील होते वाहिन्यांच्या माध्यमातुन पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो हा किस्सा मिलिंद जोशींनी सांगितला. वर्तमान पत्रातील बातमीत 'भांगेत शेंदुर' भरला जातो. याचा किस्सा उज्वला बर्वे यांनी सांगितला. या नवीन माध्यमाच्या स्पर्धेत आशय व गुणवत्त्ता बाबत मापदंड लावायचे झाल्यास ते नवीनच ठरवावे लागतील. नेट वरील संगणकीय मराठीच्या प्रगतीसाठी लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ब्लॊगर नी बहुमोल कामगिरी केली आहे याची नोंद चर्चेत घेण्यात आली. उपक्रम सारख्या मराठी संकेतस्थळावर चांगले उपक्रम चालतात तसेच मायबोली या जुन्या मराठी संकेतस्थळाची दखल घेतली गेली. नवीन येणार्‍या तंत्रज्ञानासोबत लेखन कसे बदलत जाते याचाही परामर्श घेतला. ब्लॊगिंग कसे असावे याबाबत महेश घाट्पांडे म्हणाले कि अमुक शैली असावी अमुक असु नये असे म्हणता येणार नाही वाचकांनी आवडले नाही तर वाचु नये.
कार्यक्रमात माध्यमाईटस या पत्रकारांनी एकत्र येउन केलेल्या गटातर्फे श्री गणेश पुराणिक हे रानडे इनिस्टीट्युट चे माजी पत्रकार विद्यार्थी व सध्या मुंबई महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करणारे ब्लॉगर यांनी ब्लॉगिंग मराठीसंकेतस्थळ यावर सदीप व सविस्तर माहिती दिली. अनिल अवचटांच्या हस्ते औरंगाबादचे दांपत्य अंजली कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांच्या साहित्य संपदा डॊट कॊम दुवा या संकेत स्थळाचे उदघाटन झाले.लेखक, प्रकाशक यांनी या नवीन माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले मराठी मंडळी डॊट कॊम या मराठी ब्लॊगर्स कम्युनिटीच्या रात्री १० वाजुन ३ मिनिटांनी प्रस्थापित होणार्‍या संकेत स्थळाचे उदघाट्न पण याच कार्यक्रमात अनिल अवचटांच्या मुखी करण्यात आले. विक्रांत देशमुख यांनी पुण्यात झालेल्या ब्लॊगर्स मेळाव्याबद्दल माहिती दिली. नेहमी प्रमाणे जालमित्रांसाठी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण आम्ही केले आहे. ऐका हो ऐका!

Go To FileFactory.com

संस्कृतीसाहित्यिकसमाजविचार

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2010 - 11:38 am | राजेश घासकडवी

या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती देऊन सर्वांना समावेशित केल्याबद्दल धन्यवाद.

कितीही श्रेष्ठ लेखक असले तरी भूर्जपत्रांपासून ते वेबपेजपर्यंतच्या क्रांती (वा उत्क्रांती) विषयी सर्व अंगं स्पर्श होतील अशी अपेक्षा करणं धाडसाचं आहे. तरी या चर्चेत फक्त टाईपरायटर ते वेबपेज एवढीच, तीही लेखकांच्या प्रकाशकांच्या दृष्टीकोनातून झाली असं वाटलं. लेखन म्हणजे काय, किंवा लेखक व वाचक यांच्या परस्पर संबंधामध्ये, संवादामुळे जी क्रांती झालेली आहे व त्यामुळे यापुढे या संवादाचं स्वरूप कसं बदलणार आहे याविषयी चर्चा काही झाली असावी असं वाटलं नाही. असल्यास कळवा.

पुन्हा एकदा धन्यवाद.
राजेश

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2010 - 11:51 am | प्रकाश घाटपांडे

इस्णीप च्या अडचणी मुळे तो संवाद आपण ऐकू शकत नाही.
फाईल शेअर करणे आणी फाईल चे एम्पी ३ विजेट करुन सर्वांना खुले ऐकता येईल असे ठेवणे या गोष्टी भिन्न असाव्यात (चुभुदेघे) मी http://www.esnips.com/web/socialspeech या ठिकाणी आत्तापर्यंत ठेउन त्याचे विजेट वापरत आलो आहे. ईस्णीपवर ५ जीबी जागा आहे
कुणीही पाहुण्याने जरी संकेतस्थळाला भेट दिली तरी त्याला एका क्लिक वर कार्यक्रम ऐकता यावा हा हेतु आहे.
युसेंड इट किंवा ड्रॉप आय ओ मधे फाईल शेअर जरी करता आल्या तरी आठ दिवसांनी काढुन टाकल्या जातात.
सर्वांना ऐकता येईल असा काही मार्ग कोणी सुचवला तर आनंदात सहभागी होता येईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

घाटावरचे भट's picture

3 Mar 2010 - 4:35 pm | घाटावरचे भट

4shared.com वर विजेटची सुविधा आहे. फक्त ९० दिवसांतून एकदा लॉगिन न केल्यास खाते बंद होते. तिथेही फाईलच्या आकारावर १०० एमबीची मर्यादा आणि एकूण ५ जीबी जागा उपलब्ध आहे आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

3 Mar 2010 - 5:38 pm | प्रकाश घाटपांडे

वा!वा! भटोबा ! पूढ्च्या चकट फु ची सोय झाली
मंडळी ऐका आता कार्यक्रम! प्रमोद देवांना धन्यवाद त्यांणी फाईलफॅक्टरीचा अनुभव सांगितला
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

स्वाती दिनेश's picture

3 Mar 2010 - 12:47 pm | स्वाती दिनेश

प्रकाशराव,
वृत्तांत आवडला,
स्वाती

अविनाशकुलकर्णी's picture

3 Mar 2010 - 3:05 pm | अविनाशकुलकर्णी

महेश हे आमचे आवडते कवि आहेत.. व आमचे मित्र पण आहेत.ऑरकुट वर कवितेचे गाव व काव्यांजली वर त्याम्च्या कवितेचा आस्वाद सारे जण घेत असतात.....वाचुन खुप आनंद झाला ......