मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुर्जपत्र ते वेबपेज

प्रकाश घाटपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला. ब्लॊगिंग च्या माध्यमातुन अनेक तरुण लोकांच्या पर्यंत पोहोचता आले. त्यांच्या पुस्तकाचे उत्तम परिचय ऒर्कुट कम्युनिटीवर झाले. ही नव्या युगाची देणगी असल्याचे त्यांनी नमुद केले. महेश घाटपांडे यांनी आम्ही म्रराठी हा अंक वेबसाईट स्वरुपात प्रथम आणल्यावर सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यानंतर जसा या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे संकेतस्थळाला भेट देणार्‍या लोकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले. मिलिंद जोशींनी देहबोली ते भुर्जापत्राचा प्रवास कथन केला. पारंपारिक साहित्यातील जड शब्दांना कंटाळलेल्या लोकांना हा नवीन पर्याय मिळाल्याने साहित्यातील मक्तेदारी कमी होण्यात उपयोग झाल्याचे सांगितले. संध्या टांकसाळे यांनी या माध्यमामुळे वाचकांना आपले प्रतिसाद लगेच देता आले. यामुळे एखाद्या लेखावर प्रतिक्रिया एकदम शंभरात पोहोचल्याने हा लक्षणीय फरक दिसल्याचे सांगितले. उज्वला बर्वे यांनी आत्ताच्या पत्रकारितेतल्या माध्यमाला एक साचा असतो तो अभ्यासक्रमात शिकवला जातो. तशा प्रकारचे बंधन या इंटरनेटवरील माध्यमाला नसल्याने वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटत नसल्याचे सांगितले.
कार्यक्रम रंगत दार झाला. इंटरनेटवरच्या मराठी जगतात मराठीची मोडतोड होते असे म्हटले तर ती आताच्या माध्यमात देखील होते वाहिन्यांच्या माध्यमातुन पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो हा किस्सा मिलिंद जोशींनी सांगितला. वर्तमान पत्रातील बातमीत 'भांगेत शेंदुर' भरला जातो. याचा किस्सा उज्वला बर्वे यांनी सांगितला. या नवीन माध्यमाच्या स्पर्धेत आशय व गुणवत्त्ता बाबत मापदंड लावायचे झाल्यास ते नवीनच ठरवावे लागतील. नेट वरील संगणकीय मराठीच्या प्रगतीसाठी लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ब्लॊगर नी बहुमोल कामगिरी केली आहे याची नोंद चर्चेत घेण्यात आली. उपक्रम सारख्या मराठी संकेतस्थळावर चांगले उपक्रम चालतात तसेच मायबोली या जुन्या मराठी संकेतस्थळाची दखल घेतली गेली. नवीन येणार्‍या तंत्रज्ञानासोबत लेखन कसे बदलत जाते याचाही परामर्श घेतला. ब्लॊगिंग कसे असावे याबाबत महेश घाट्पांडे म्हणाले कि अमुक शैली असावी अमुक असु नये असे म्हणता येणार नाही वाचकांनी आवडले नाही तर वाचु नये.
कार्यक्रमात माध्यमाईटस या पत्रकारांनी एकत्र येउन केलेल्या गटातर्फे श्री गणेश पुराणिक हे रानडे इनिस्टीट्युट चे माजी पत्रकार विद्यार्थी व सध्या मुंबई महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करणारे ब्लॉगर यांनी ब्लॉगिंग मराठीसंकेतस्थळ यावर सदीप व सविस्तर माहिती दिली. अनिल अवचटांच्या हस्ते औरंगाबादचे दांपत्य अंजली कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांच्या साहित्य संपदा डॊट कॊम दुवा या संकेत स्थळाचे उदघाटन झाले.लेखक, प्रकाशक यांनी या नवीन माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले मराठी मंडळी डॊट कॊम या मराठी ब्लॊगर्स कम्युनिटीच्या रात्री १० वाजुन ३ मिनिटांनी प्रस्थापित होणार्‍या संकेत स्थळाचे उदघाट्न पण याच कार्यक्रमात अनिल अवचटांच्या मुखी करण्यात आले. विक्रांत देशमुख यांनी पुण्यात झालेल्या ब्लॊगर्स मेळाव्याबद्दल माहिती दिली. नेहमी प्रमाणे जालमित्रांसाठी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण आम्ही केले आहे. ऐका हो ऐका! Go To FileFactory.com

वाचन 2519 प्रतिक्रिया 0