आणखी किती सतिश शेट्टी?

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
6 Feb 2010 - 3:52 pm

आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता.

परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.
माहिती अधिकार कायद्याच्या अनेक बाजु यात उकलल्या गेल्या. आपण या माहिती अधिकाराच्या चळ्वळीत कसे पडलो याचे विवेचन प्रत्येकाने केले. सामाजिक जाणीवा जागृत करण्याचे काम नेमके कोणाचे? हा कायदा तुमचा माझा सर्वांचा अधिकार आहे ही जाणी जागृत करण्यासाठी काय केले पाहिजे? माहिती अधिकाराचा वापर पर्याप्त आहे का? माहिती
अधिकाराच्या मर्यादा कोणत्या? भारताच्या सामाजिक राजकीय इतिहासा माहिती अधिकाराचे महत्व किती? अशा अनेक बाबतीत खुलेपणाने चर्चा झाली. श्रावण मोडकांनी वक्त्यांना नियंत्रित न करता अधिक बोलु दिले. विवेक वेलणकरांनी वीज पाणी रस्ते या मुद्द्यांवर पुणे मनपाकडुन भरपुर माहिती मिळवली. नुकतेच पुणे महापालिकेचे उपायुक्त यांचेच
बेकायदेशीर बांधकाम त्यांनी माहिती अधिकाराद्वारे उघडकीस आणले होते.
सिमप्रितसिंग यांनी मेधा पाटकर यांच्या समाजकार्यातुन प्रेरणा घेउन समाजविज्ञानाच्या अभ्यासासाठी माहिती अधिकाराचा वापर करुन मुंबईतील बिल्डरांचे बांधकामाची माहिती मुंबई पालिकेकडुन घेतली. त्या आधारे बिल्डरला २००० कोटी रुपयांचा दंड आकारला गेला.
मारुती भापकर हे पिंपरी चिंचवड भागात नगरसेवक नसतानाही माहिती अधिकाराद्वारे अनेक अल्पभुधारकांच्या जमीनी हडप करण्याचा डाव हाणुन पाडला.
ज्या मध्यमवर्गाने पुर्वी वॊचडॊग म्हणुन काम केल तोच आता कोषात गुंतला आहे या विवेक वेलणकरांच्या महत्वाच्या प्रतिपादनाचे विश्लेषण परिसंवादात झाल्याचे दिसते. माहिती अधिकार हे दुसरे स्वातंत्र्य आहे. त्याचा वापर केला पाहिजे.त्याच्या वापराने सतिश शेट्टीचा खुन झाला. पण हा धोका पत्करुन देखील लढा चालुच राहणार. मारुती भापकरांनी
भ्रष्टाचार जो पर्यंत आहे तो पर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी प्रतिज्ञा पुर्वी घेतल्याने अनवाणीच फिरतात. कदाचित त्यांना आयुष्यभर अनवाणीच फिरावे लागेल
कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला इथे टिचकी सरशी ऐकता येईल.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

समाजराजकारणप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2010 - 6:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्वनीमुद्रण आणि माहितीबद्दल धन्यवाद...!
[तासाभराचेच ध्वनीमुद्रण आहे का ? ]
माहितीअधिकाराचा वापर करुन शासन व्यवहारात अधिक पारदर्शकपणा आणता येऊ शकेल. तेव्हा हा लढा सर्वांचाच आहे आणि तो सर्वांनीच लढला पाहिजे...!

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

6 Feb 2010 - 7:37 pm | प्रकाश घाटपांडे

ध्वनीमुद्रण कालावधी १ तास ५५ मि.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2010 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग मला ६२ मिनिटेच ऐकता आले.

-दिलीप बिरुटे

स्वाती२'s picture

7 Feb 2010 - 6:48 am | स्वाती२

ध्वनिमुद्रणाबद्दल धन्यवाद.

सहज's picture

7 Feb 2010 - 4:37 pm | सहज

धन्यु प्रकाशकाका.