नुकत्याच पुणे फेरी मधे काही पुस्तके विकत घेउन आलो. तु.मा.सा. इथे डाकवत आहे:
१. चर्चबेल
लेखकः ग्रेस
ललित लघुनिबंध आहेत ग्रेस यांचे. सुंदर भाषा, कधी कधी दुर्बोध वाटणारे ग्रेस यातही
तसाच वावर करतात. वाचताना त्यांच्या भावविश्वाची, विविध गोष्टींकडे बघण्याची त्यांची कवी-द्रुष्टी यांची अनुभुती येते.
एका निळ्या जगात, जेथे आपण एकटे असतो, तेथे हे पुस्तक आपल्याला घेउन जाते. सुंदर लेखन !!
जरूर वाचा.
२. पांगिरा.
विश्वास पाटिल यांची सुंदर कादंबरी. एका गावाची ही कथा आहे. लोकशाही गावात कशी रुजते, त्याचे काय परिणाम त्या गावावर होतात,
गाव १५ वर्षांच्या कालखंडात कसा बदलतो याचं एक तटस्थ चित्रण विश्वास ने केलं आहे. वाचताना मस्त वाटतं, कधी हासू येतं, चीड येते, हतबलता येते, लोक चूत्या असतात असं वाटतं ... मस्त पुस्तक आहे. एक उदाहरण विश्वास च्या निरिक्शण शक्ती चं:
"दलिताचा पोर, आबा कांबळे वकील झाला!! सा-या आळीला कौतुक वाटलं. लोक म्हणू लागले, जरा कमी, नाहीतर आबा बाबासाहेबाएवढं शिकला!!"
३. एक अरबी कहाणी.
लेखकः जी ए कुलकर्णी
"शेव्हींग औफ द शागपट" चा मुक्त अनुवाद.
जी ए स्टाइल लेखन नाही. नियती वाद नाही. चांगल पुस्तक आहे. पण शेवटी शेवटी बोर होतं. शेवट करताना जी ए गंडले :).
४. आवरण
लेखकः भैरप्पा (अनुवादीत- कन्नड "आवरण")
आजून वाचलं नाही. पण पुस्तक भारी वाटतयं. वाचून सांगीन ...
टाटा.
-बट्ट्या.
प्रतिक्रिया
20 Jan 2010 - 12:12 am | टारझन
वाचून झाली की दोन दिवस द्या :)
आम्हाला फुकट चावायला आवडते. :)
- गोट्ट्यागोल
20 Jan 2010 - 1:26 pm | बिपिन कार्यकर्ते
थोडक्यात चांगली ओळख. आवडलं वाचायला. यातली पुस्तकं वाचायचा योग येईल ते बघू.
बिपिन कार्यकर्ते
20 Jan 2010 - 8:17 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री बट्ट्याबोळ, पांगिरा खूप पुर्वी वाचले आहे. वाचून झाल्यावर आवरणविषयी थोडे विस्ताराने लिहावे, ही विनंती.
21 Jan 2010 - 11:08 am | टुकुल
चांगली माहीती.
एक प्रश्नः हे कवी/लेखक ग्रेस यांच खर नाव काय? माणिक सीताराम गोडघाटे ?
--टुकुल
21 Jan 2010 - 11:59 am | बट्ट्याबोळ
होय.