लेखन व लेखकाचे बाह्यरुप

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
19 Jan 2010 - 9:59 am

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.

असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्‍या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?

येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.

माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.

अवांतर : (आज हा लेख लिहून मिपावरच्या माझ्या लेखांची शंभरी भरली आहे. शंभरी गाठल्याबद्दल मी माझेच अभिनंदन करतो व तुम्ही मला सहन केले त्याबद्दल तुम्हाला आधीच धन्यवाद देतो. माझ्या लेखनाने तुम्हाला थोडाजरी आनंद मिळाला असेल तर मी धन्य आहे. )

साहित्यिकराहणीमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

19 Jan 2010 - 10:12 am | सुनील

मिपावरील "रामदास" ह्या व्यक्तीने माझी चक्का निराशा केली होती!! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पाषाणभेद's picture

19 Jan 2010 - 1:26 pm | पाषाणभेद

सुनीलभौ, माझे म्हणणे आपल्याला समजले. आपल्या मनात असलेला लेखक जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा आपली फसगत होते. मनाच्या कप्यात दुर कोठेतरी त्या लेखकाच्या लिहीलेल्या लेखांची/ साहित्याची प्रतिमांची सावली पडलेली असते. वेळोवेळी आपण त्या प्रतिमांशी लेखकाचे बाह्यरूप ताडून पाहत असतो. प्रत्यक्षात आपला भ्रमनिरासही होवू शकतो किंवा आपल्या मनातली प्रतिमा प्रत्यक्षात अधिकच उत्कट असते.

तुमचा याविषयी काही अभ्यास, विवेकशील मत असल्यास येथे द्या. लेखक जाणून घेण्यात आणखी मदत होईल.

- पाभे उर्फ दफो(इंजन मेक्यॅनीक)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2010 - 8:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनाची शंभरी गाठल्याबद्दल अभिनंदन....!!!

बाकी मिपावर लेखन करणारे कसे दिसत असतील त्याबाबत त्यांची एक काल्पनिक प्रतिमा मनात उमटते. पण, त्यांच्या वयक्तीक आवडी-निवडी कळणार नाहीत. मात्र लेखनाचे स्वरुप कसे असू शकते याचा अंदाज बांधता येईल. आवडी-निवडीपेक्षा त्यांच्या लेखनात रमण्यात मला मजा वाटते. लेखन करणारा कसा असेल याची तितकीच उत्सूकता असते. या उत्सुकतेपोटी मी एका मित्राकडे फोटोसाठी [ते दिसतात कसे यासाठी] हट्ट धरला होता. आणि तो हट्ट त्यांनी पूर्णही केला. :)

प्रमोद देव नावाचे मिपावरील गृहस्थ मला त्यांच्या लेखनावरुन-उपदेशावरुन खूप खडूस वाटायचे. पण नंतर माझा गैरसमज दूर झाला. :)

अवांतर : आमच्याविषयीही अशाच कोणाच्या कै च्या कै कल्पना असू शकतील या बद्दल शंकाच नाही.

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Jan 2010 - 8:12 pm | अक्षय पुर्णपात्रे

आमच्याविषयीही अशाच कोणाच्या कै च्या कै कल्पना असू शकतील या बद्दल शंकाच नाही.

आपल्या सदस्यनामामुळे असे घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2010 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आपल्या सदस्यनामामुळे असे घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपण काय कल्पना करता ?
[चांगली असेल तर इथे लिहा.नसेल तर व्य. नी करा :) ]

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Jan 2010 - 8:24 pm | अक्षय पुर्णपात्रे

मिशी, जाड चष्मा, कायम इस्त्रीचे कपडे घालणे, वय साधारणत: पन्नाशीत, साधारण अंगकाठी.
(किती जमले ते सांगा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2010 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> मिशी, जाड चष्मा, कायम इस्त्रीचे कपडे घालणे, वय साधारणत: पन्नाशीत, साधारण अंगकाठी.

=))

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Jan 2010 - 8:29 pm | अक्षय पुर्णपात्रे

अधोरेखित चुकीचे आहे काय? मला वाटलेच होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2010 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वय ३२ ते ३६, विवाहित आणि एक मुलगी आहे. बायकोवर खूप प्रेम. मितभाषी.... मौजमजेला वेळ मिळत नाही. राजा माणूस. स्वत:चे तणाव [प्रॊब्लेम्स] कोणाला न सांगणारा.

जमले का ?

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Jan 2010 - 8:45 pm | अक्षय पुर्णपात्रे

वय ३२ ते ३६, विवाहित आणि एक मुलगी आहे. बायकोवर खूप प्रेम. मितभाषी.... मौजमजेला वेळ(थोडाफार मिळतो). राजा माणूस(हे स्वत: कसे मान्य करावे? कोणी काहीही म्हणा पण मला तसेच वाटते. ) स्वत:चे तणाव [प्रॊब्लेम्स] कोणाला (जालावर) न सांगणारा.

वरील काही गोष्टी खरडवह्यांच्या अभ्यासातून मिळालेल्या आहेत म्हणून ती चलाखी (म्हणजे स्ट्रिक्टली लिखाणावरून (सॉरी प्रतिसादांवरून) ठरवलेले नाही.) आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2010 - 8:37 pm | बिपिन कार्यकर्ते

मला तर प्रा. डॉ. म्हणजे एकदम तब्येत दणकट, जाडजूड मिशा, गंभीर मुद्रा (गंभीर असेल तर चेहरा नाही म्हणवत, मुद्राच म्हणतात ;) ), तोंडात पाईप नाही तर चिरूट (चुकून चिरूटे लिहिणार होतो), अंगात सूट नाही तर सफारी वगैरे वाटायचे. पण ते तसे नाहीत हे नंतर कळले. :)

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2010 - 10:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीका, म्हणजे मुझे कुछ कहेना है. खूप सांगायचं आहे, पण सांगू का नको अशा द्विधेत गुंतणारा माणूस. सांगून टाकल्यावर सांगितले ते बरोबर की नाही, अशा विचारात गुंतुन जाणारा हळवा आणि भला माणूस. स्पष्ट बोलायला डचकणारा. आणि बांधावरुन गम्मत पाहणारा...!

जमले का ?

अवांतर : मी बिकाला पाहिलेलं आहे.

-दिलीप बिरुटे

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Jan 2010 - 9:36 am | अक्षय पुर्णपात्रे

सरांनी चर्चाप्रस्ताव वाचला नाही.

केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे.

कोणी राजा आहे का हळवा आहे याचा नाही. दिवसाचे राशीभविष्य लिहिल्यासारखे स्वभाव सांगायचे नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2010 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादातून व्यक्तीमत्वाकडे जाण्याऐवजी, आम्ही भविष्याकडे निघालो होतो.
दिलगिरी व्यक्त करतो....!

-दिलीप बिरुटे
[वाट चुकलेला]

पाषाणभेद's picture

20 Jan 2010 - 7:17 pm | पाषाणभेद

अक्षयला धागाविषय पुर्ण पणे समजलेला आहे. डोळ्यावर चष्मा, सरळ नाक, अन बारीक अंगकाठी, उंच व्यक्तीमत्वाचा धनी दिसतोय.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

आमच्या कडे लेखनावरून बाह्यवर्णन करून मिळेल. लेख पाठवा, बाह्यवर्णन मिळवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jan 2010 - 10:18 am | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! मालक, लै भारी.

बीका, म्हणजे मुझे कुछ कहेना है.

नक्कीच.

खूप सांगायचं आहे, पण सांगू का नको अशा द्विधेत गुंतणारा माणूस.

अंशत: ... द्विधा वगैरे नाही पण नात्यात अथवा संबंधात मोकळेपणा नसेल तर नाही बोलत मी फारसे.

सांगून टाकल्यावर सांगितले ते बरोबर की नाही, अशा विचारात गुंतुन जाणारा हळवा आणि भला माणूस.

नाही. बोललो की मग काय विचार करायचा? बाकी, आयटीत असल्याने हळवा आहेच (ह. घ्या.) आणि सध्या निवासी असल्याने भला पण झालोच आहे. (हे ही ह. च घ्या.)

स्पष्ट बोलायला डचकणारा.

नाही. वर म्हणले तसे, संबंधात मोकळेपणा नसेल तर नाही बोलत. पण बोलायला लागलो तर थेट आणि स्पष्ट बोलणार (मिपावरील काही सदस्य या बद्दल माझ्याशी नक्कीच सहमत होतील. ;) ).

आणि बांधावरुन गम्मत पाहणारा...!

टंकाळा असल्यामुळे जालिय चर्चा / मारामार्‍या वगैरे मधे फारसा भाग घेत नाही. पण कधी मूड लागला तर भला मोठा प्रतिसाद नक्की. मूड का सवाल है...

अवांतर : मी बिकाला पाहिलेलं आहे.

कधी? केव्हा? कुठे? कसं? !!!

बिपिन कार्यकर्ते

प्रमोद देव's picture

19 Jan 2010 - 8:37 pm | प्रमोद देव

प्रमोद देव नावाचे मिपावरील गृहस्थ मला त्यांच्या लेखनावरुन-उपदेशावरुन खूप खडूस वाटायचे
तसा मी खडूसच आहे,पण इथे मी जरा उदारतेचा मुखवटा चढवलाय. :D

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

विजुभाऊ's picture

20 Jan 2010 - 7:35 am | विजुभाऊ

मला देखील "प्रा डॉ दिलीप बिरुटे" हे एकदम भारदस्त व्यक्तीमत्वाचे गृहस्थ असतील असे अजून तरी वाटत आहे. ;)
अवांतरः विदेशी लेखाकांच्या बाबतीत तर अजून फसगत होते. नुसत्या नावावरून बर्‍याचदा ती व्यक्ती बाई आहे की बुवा हेच कळत नाही.
लेखनाच्या शैलीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर अतीशय खुमासदार शैलीत प्रेमकथा लिहिणार्‍या स्नेहलता दसनूरकर या चक्क साठीच्या पुढच्या होत्या. बर्‍याच वाचकांच्या त्यांच्या बाबतीत गैरसमज व्हायचा.
त्या ती गम्मत एन्जॉय करायच्या.

पाषाणभेद's picture

20 Jan 2010 - 7:50 am | पाषाणभेद

अगदी. मलाही तसेच वाटे. एकदम वजनी गृहस्थ, आकडेबाज मिशा, सावळा वर्ण, थोडेसे टक्कल, अन सफारी तोही पुर्ण बाही असलेला. पण नाही. प्रत्यक्षात वेगळे आहेत.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

सहज's picture

20 Jan 2010 - 8:04 am | सहज

बिरुटे सर म्हणजे एकदम [तरुण चिरंजीवी या अभिनेत्यासारखे] देखणे आकर्षक व्यक्तिमत्व व जिंदादील माणूस!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2010 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बिरुटे सर म्हणजे एकदम देखणे आकर्षक व्यक्तिमत्व व जिंदादील माणूस!
कौतुकाबद्दल धन्यु ! अशी कौतुकाची पेरणी मित्र नै करणार तर कोण करणार........! :)

[बाकी चित्रातील तुलना लैच झाली भो . मित्रांना किती खोटे बोलावे लागते नै ] :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

20 Jan 2010 - 9:04 pm | चतुरंग

"कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!" ह्या म्हणीबद्दल आपले काय मत आहे? ;)

(दिलदार)चतुरंग

II विकास II's picture

19 Jan 2010 - 8:30 pm | II विकास II

सुरेख कल्पना आहे.
आपण खेळ खेळायला हरकत नसावी,

पाषाणभेद's picture

19 Jan 2010 - 10:16 pm | पाषाणभेद

कुणाकुणाला त्यांच्याबद्दलच्या बाह्यरूपाची कल्पना केलेली येथे आवडेल ते सांगा म्हणजे लिहीता येईल. ज्यांना व्य.नी हवा असेल त्यांनी तसे सांगा म्हणजे जो माहीती सांगेल तो त्यांना व्य. नी. करेल.

कृपया लक्षात घ्या की आपण ही केवळ मौजमजा करतो आहे. एकदम हि& हि पातळीवर जाणार नाही आहोत. केवळ विरंगूळा. ज्यांना सार्वजनीक मत नको तसे सांगा.

आता तुम्ही माझ्या पासून सुरूवात करा. कोणी सांगेल का की मी कसा दिसतो? लेखनावरून माझ्या स्वभावाचा अंदाज येतो का? (हो पण त्या साठी आधी लेख वाचायला पाहिजे हं :-) )
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

टारझन's picture

19 Jan 2010 - 10:59 pm | टारझन

हॅहॅहॅ .... अब क्यो मुह खुलवा रहे हो पासाणभेद जी .. हॅहॅहॅ ..

बाकी एका येडझव्या व्यक्तीची प्रतिमा जशी मनात होती तश्शीच्या तश्शी ती व्यक्ती अंमळ वेडझवी निघाली बघा .. हॅहॅहॅ ..

बाकी कोण कसा दिसतो ह्याच्या उत्सुकता आम्हाला कधीच नव्हती , पण हो .. कोण कशी "दिसते" ह्यात मात्र अंमळ इंटरेस्ट असल्याचं आपण प्रांजळपणे कबुल करू शकतो. असो .. नो मोर कमेंट्स .. भेंडी ~~~

// अंमळ वेडझवा //

पाषाणभेद's picture

20 Jan 2010 - 2:10 am | पाषाणभेद

हॅहॅहॅ... आपली दोस्ती पक्की मग तर आता.
------------------------
- पाभे उर्फ दफो -(इंजन मेक्यॅनीक)

पाषाणभेद's picture

20 Jan 2010 - 2:27 am | पाषाणभेद

टारझन बाकी तुझे फोटो बघीतलेच आहेत. तरीही काही अंदाज:
तुला हाफ बाह्यांचे शर्ट वापरायला आवडतात. गळ्यात एखादी सॅक घालणे व पायात ब्राउन कलरचे शुज घालणे आवडते. शर्टाच्या पॉकेटमध्ये काहीच न ठेवलेले चालते. अन मोबाईल कायम हातात हवा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)

पाषाणभेद's picture

19 Jan 2010 - 10:37 pm | पाषाणभेद

हो, पण खेळीमेळीचेच वातावरण राहू द्या. कोणाला राग येतो कोणाला नाही. जास्त वैयक्तिक शेरेबाजी टाळा. केवळ आपल्या बुद्धीला चालना द्या व अंदाज करा.
कोणी 'माझ्याबद्दल येथे अंदाज करा' असे म्हटले तरच लिहा ही कळकळीची विनंती.

चिरोटा's picture

19 Jan 2010 - 11:10 pm | चिरोटा

उंची- ५-९'', मध्यम शरीरयष्टी,दाढी/मिशी उडवलेली,चष्मा नाही,थंड स्वभाव्/वय २५-३० च्या मध्ये.
किती बरोबर?
भेंडी
माझ्याबद्दल येथे अंदाज करा
P = NP

पाषाणभेद's picture

20 Jan 2010 - 7:56 am | पाषाणभेद

इतरांनाही अंदाज करता यावा म्हणून माझे वर्णन तुम्हाला व्यनी केले आहे.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा

पाभे (दफो)

बट्ट्याबोळ's picture

19 Jan 2010 - 11:46 pm | बट्ट्याबोळ

श्री. बट्ट्याबोळजी, कृपया असे प्रतिसाद या पुढे देऊ नका. सहकार्य होईल ही अपेक्षा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jan 2010 - 12:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'मयत रि किड्या'चे नवे अवतार दिसता आपण!

आपल्या प्रतिसादावरून काढलेला हा अंदाज हो... बाकी अवांतर काही नाही!

अदिती

धनंजय's picture

20 Jan 2010 - 2:49 am | धनंजय

माझे एकदोन मित्र गातात/बोलतात खर्जात पण दिसायला बुटके पाप्याचे पितर. आवाजाचा आणि अपेक्षित देहयष्टीचा मेळ जुळत नाही.

शाहरुख's picture

20 Jan 2010 - 7:51 am | शाहरुख

पर्नल नेने मराठे (सर्वांच्या लाडक्या चुचुताई) हे खाते चालवणारी व्यक्ति महिला नसावी असे मला पूर्वी वाटायचे.

jaypal's picture

20 Jan 2010 - 9:08 am | jaypal

तसच वाटल होत.
पर्नल ऐवजी कर्नल नेने मराठे अस वाटुन एखदा निवृत्त अक्कडबाज पिळदार मिशीवला (टायगरलिप्टन चहा) कर्नल वाटायचा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jan 2010 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

पर्नल ऐवजी कर्नल नेने मराठे अस वाटुन एखदा निवृत्त अक्कडबाज पिळदार मिशीवला (टायगरलिप्टन चहा) कर्नल वाटायचा.

आमाला बी अदुगर तसच वाटल. म्हनल खरडाव" हॅहॅहॅ राम राम कर्नल सायेब मिपावर स्वागत" पन नंतर वाटल आदुगरच हित आमच्या (एका)खरडन्यातुन वातावरन बिघाल्ड्याल कशाला अनीष्टापत्ती वढवुन घ्या. फट म्हंता ब्रह्महत्या व्हायची.आपन वळखीचे ना पाळखीचे . मिपावरील बक्कल नं २७ अस्ला म्हनुन काय झाल?बरी नव्हे ही थट्टा!
हघ्यासांनले
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Jan 2010 - 9:06 am | प्रकाश घाटपांडे

आम्ही ब्लॉगर्स मेळाव्याला याच उद्देशाने गेल्तो. लेखनी (पक्षी:- टंकनी) आनी वानी यांच्यामद्ला फरक न्यमका काय दिस्तो ब्वॉ ते पघायला. आभासी जगात मान्स कशी असत्यात आन प्रत्तेक्शात कशी दिसत्यात कशी बोलत्यात हे पघन्यासाठी आपन सोताला दुर्लक्षित ठेवायच. म्हजी लोकांच आपल्याक जास्त लक्ष जात नाई. अंधारातुन उजेडातल निरिक्षन करायल स्वॉप जातय.
(निरिक्षक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नीधप's picture

22 Jan 2010 - 10:29 am | नीधप

मग काय निघाला निष्कर्ष?

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

22 Jan 2010 - 2:39 pm | प्रकाश घाटपांडे

निष्कर्षात गडबड नको म्हणुन प्रथम आम्ही अनुमान काढतो. म्हण्जे निष्कर्ष फेल गेल्यास दु:ख नको.
आमचे अनुमान असे कि प्रत्यक्षात माणस चांगलीच असतात.:) मराठी ब्लॉगर्स या झेंड्याखाली उपयुक्ततेचे आदान प्रदान होउ शकते. मतभेद काय कुटुंबात देखील असतातच ना! मतभेदावर काम टाळण्यापेक्षा मतैक्यावर काम करणे उत्तम.
कालच निळू दामल्यांना मराठी ब्लॉगर्स ग्रुपच्या वतीने अल्पशी माहिती दिली. आपली आठवण आली पहा व ऐका http://www.misalpav.com/node/10830

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

II विकास II's picture

22 Jan 2010 - 2:43 pm | II विकास II

मतभेद काय कुटुंबात देखील असतातच ना! मतभेदावर काम टाळण्यापेक्षा मतैक्यावर काम करणे उत्तम.
+१

Agree to disagree व व्यक्तीगत हल्ले टाळले म्हणजे खुप काही त्रास वाचतो.

chipatakhdumdum's picture

20 Jan 2010 - 9:36 pm | chipatakhdumdum

हे खुळे बोलले होते, अवांतर प्रतिसाद असेल तर चप्पला शोधायला लागा.. घ्या घ्या .., अवांतर धागा म्हणजे काय जमालगोटा असतो ते..

निमीत्त मात्र's picture

20 Jan 2010 - 11:45 pm | निमीत्त मात्र

चतुरंग आणि विकास (बिना काड्यांचे) हाफ चड्डी घालून ताठ उभे राहिलेलेच आणि करारी मुद्रेचे असेच डोळ्यासमोर येतात.

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Jan 2010 - 11:48 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मात्र, असहमत आहे. श्री चतुरंग यांची विडंबने वाचून कायम हँगओवर व मार खाऊन सूजलेले तोंड समोर येते.

निमीत्त मात्र's picture

20 Jan 2010 - 11:52 pm | निमीत्त मात्र

तसे वर्णन आम्ही केशवसुमारांचे करू. प्रेयसीच्या बापाचा मार आणि अतिमद्य प्राशन ह्याने अनुक्रमे सुजलेले तोंड आणि डोळे = केशवसुमार!

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Jan 2010 - 11:53 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मात्र, स्वयंघोषित शिष्योत्तमांबाबत तुमचे मत वेगळे का आहे?

निमीत्त मात्र's picture

20 Jan 2010 - 11:57 pm | निमीत्त मात्र

हो. स्वयंघोषित गुरू कोण आहे त्यावर वर्णन बदलते.

चतुरंग's picture

20 Jan 2010 - 11:53 pm | चतुरंग

आपलाही प्रयत्न सपशेल फसलाय याबद्दल खेद आहे!
(जाताजाता - आपण विडंबन वाचूनही प्रतिसाद न देणार्‍यांपकी आहात हे कळवल्याबद्दल आभारी आहे! ;)

(अतिबात न पिणारा आणि तोंड न सुजलेला)चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

20 Jan 2010 - 11:56 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री चतुरंग, विडंबने वाचून काय वाटते ते सांगितले. आता इतर लेखन वाचून काय वाटते ते सांगतो. गव्हाळ वर्ण, उंच, अर्ध्या बाह्यांचे पट्ट्याचे किंवा चौकटीचे सदरे, केस कमी होत असल्याने विस्तारलेला भालप्रदेश. आता सांगा.

अक्षय पुर्णपात्रे's picture

21 Jan 2010 - 12:02 am | अक्षय पुर्णपात्रे

जाताजाता - आपण विडंबन वाचूनही प्रतिसाद न देणार्‍यांपकी आहात हे कळवल्याबद्दल आभारी आहे!

श्री चतुरंग प्रत्येकवेळी प्रतिसाद दिलाच जातो असे नाही. आपल्या काही धाग्यांवर आम्ही पुर्वी प्रतिसाद दिलेले आहेत, याची नोंद घ्यावी. विडंबने हमखास वाचतो.

चतुरंग's picture

20 Jan 2010 - 11:49 pm | चतुरंग

प्रयत्न चांगला होता पण माझ्याबद्दल तरी सपशेल चूक!

(फुल प्यांटीतला)चतुरंग

Nile's picture

22 Jan 2010 - 10:59 am | Nile

श्री निमित्त मात्र : सतत कुणीतरी तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन वावरत असावेत. घरी बायका पोरांना सुद्धा (किंवा इतर) 'गांधी काय म्हणाले होते' वगैरे ऐकवत असतील. कलामांच्या केसांबद्दल तक्रार करणारी वगैरे वृत्ती.
(प्रतिसादांवरुन अंदाज आहे हो, खराच करायला हवा असं नाही. ;) )

शुचि's picture

30 Jan 2010 - 9:08 am | शुचि

पाषाणभेद आपण "श्रवणकौशल्य" हा धागा लिहीलात. आपलयाला "management" अथवा तत्सम गोष्टींमध्ये रूची असवीशी वाटते. त्यावरून आपलं वय २७-३४ च्या दरम्यान असावेसे वाटते.
आपलं लग्नं व्हायचं आहे. सूर्य राशी - सिम्ह.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

पाषाणभेद's picture

30 Jan 2010 - 9:36 am | पाषाणभेद

राम राम राम .... कित्त्ती चुकीचे आहे. "श्रवणकौशल्य" हा धागा लिहीण्याचे प्रयोजन म्हणजे मागे लोकसत्तेत की कुठेतरी इंग्रजी शिकायचे असेल तर श्रवणकौशल्य शिकावे असा सल्ला होता. त्याचा विस्तार मी केला. "management" म्हणाल तर आमचा एकच दणक्यावर जास्त विश्वास आहे. "management" मधले छक्के पंजे कळतात. शेवटी आम्ही पडलो इंजन मेक्यॅनीक. वयाच सोडा. पण नंतरच हॅ...हॅ...हॅ... :-)

आमच्या कवीता अजून वाचलेल्या दिसत नाही. कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी माझा हक्क राखून ठेवतो. तुम्ही ताण द्या तुमच्या बुद्धीला.

वरती सांगीतलेला व्यवसाय माझा व्यवसाय, शिक्षण किंवा पदवी नाही. ते मी का लिहीले आहे ते तुम्हीच शोधा. :-)
------------------------
एक सुचना: माझ्या रुपाचा कॉपीराईट माझ्याकडे आहे. तो कोणी कॉपी करू नये किंवा वापरू नये. कायदेशीर कारवाई केली जाईल.
हुकूमावरून.

- पाभे (दफो)