२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
7 Jan 2010 - 10:46 pm

पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६/११ ला मुंबईवर केलेल्या रक्तलांछित हल्ल्याचे वर्णन पहातांना, वाचतांना व ऐकतांना असं वाटलं होतं कीं इतक्या लोकांना, पोलिसांना व शेवटी लष्करालाही २-२॥ दिवस तंगवून सोडणारं हे पथक ३०-४० लोकांचं तरी असावं. मग कळलं कीं फक्त दहाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी इथं येऊन हा अनर्थ केला व असा प्रचंड धुमाकूळ इथं यशस्वीपणे घातला. खरं तर केवळ दहाच जणांनी केलेल्या या नरसंहारावर अद्यापही विश्वास बसत नाहीं आणि जर हुतात्मा ओंबळे यांनी जिगरीने स्वतःचा जीव देऊन कसाबला जिवंत पकडले नसते तर "ते किती होते" याबद्दलची उलट-सुलट चर्चा अद्यापही चालू राहिली असती.
परवा डीट्रॉईट (Detroit) या मोटरगाड्यांच्या राजधानीच्या (car capital) विमानतळावर उतरणार्‍या विमानाला उडवून लावण्याचा प्रयत्न उधळून टाकणार्‍या आणखी एका 'डच ओंबळें'ची शौर्य-गाथाही अशीच रोमांचकारक आहे.
त्या विमानात '19A' या डावीकडील खिडकीलगतच्या (पंखावरील ) खुर्चीत बसलेल्या आत्मघाती अतिरेक्याची (उमर फरूक अब्दुलमुतल्लबची) बॉम्ब पेटविण्याची हालचाल पहाताच उजव्या बाजूला 18H या खुर्चीत बसलेल्या 'अलेन घोंडा' (Alain Ghonda) या एका अमेरिकन इस्टेट एजंटने पट्टा बांधायची आज्ञा झुगारून व उभे राहून 'आग, आग' अशा आरोळ्या जिवाच्या आकांताने ठोकायला सुरुवात केली. 18H च्या दोन ओळी मागे (20Aवर) बसलेल्या डच व्हीडियो फिल्म निर्माता 'यास्पर शुरिंगा'ने (Jasper Schuringa) डाव्या व उजव्या रांगांमधील ३-४ खुर्च्यांवरून छलांग मारून मुतल्लबला धरून ठेवले व विमान कर्मचार्‍यांना अग्निशामक उपकरणे आणण्याची आज्ञा दिली. विमानातल्या हवाई-सुंदरींनी व इतर 'केबिन क्रू' (cabin crew) च्या सभासदांनी प्रसंगावधान ओळखून मधे-मधे अडकलेल्या भयग्रस्त व 'पॅनिक'ग्रस्त प्रवाशांना मुष्किलीने बाजूला सारून अशी अग्निशमनाची उपकरणे मिळवली व अब्दुलमुतल्लब, त्याची पेटलेली पँट व 'यास्पर शुरिंगा' या शूराला पाण्यात नखशिखांत भिजवून काढले व आगीवर ताबा मिळवला. (चित्र पहा)

मुतल्लबला पकडून ठेवणारा खरा-खुरा वीर (Real-Life Hero) यास्पर शुरिंगा
९/११ च्या कुप्रसिद्ध हल्ल्यानंतर वरील प्रसंगांव्यतिरिक्तही विमानाच्या प्रवाशांनी एकीने व आपापसातल्या चांगल्या संतुलनाने टाळलेले असे आणखी चार प्रसंग आहेत. पहिला प्रसंग घडला ९/११ रोजीच. 'युनायटेड ९३' या विमानातील लोकांनी चांच्यांवर एकजुटीने प्रतिहल्ला केला व ते विमान अर्ध्या वाटेतच पाडले. असं वाचल्याचंही स्मरतंय् कीं ते विमान 'व्हाईट हाऊस'वर डागले गेले होते, पण या विमानावरील शूरवीर प्रवाशांनी स्वत:कडे कुठलीही शस्त्रे नसतांना व कुठलेही प्रशिक्षण नसताना शस्त्रधारी अतिरेक्यांवर मात करून हा मोठा अपघात टाळला. याचे कौतुक करावे तितके थोडेच!
या घटनेनंतर तीनच महिन्यांनी "शू-बॉम्बर" या उपनावाने (कु)प्रसिद्ध रिचर्ड रीड या अतिरेक्यालाही १५-२० माणसांनी एकसमयावच्छेदे घेरून व संगीत ऐकण्याच्या हेडफोनच्या तारांनी त्याला बांधून त्याच्या स्वत:च्या बुटातील स्फोटकें पेटविण्याच्या इराद्यालाही यश येऊ दिले नव्हते.
२००७ साली एका बंदूक 'पाजळणार्‍या' हवाई चांच्याला दहा-बारा प्रवाशांनी असेच पकडले व त्याचा विमान अपहरणाचा उद्देश हाणून पाडूला.
गेल्या नोव्हेंबरमध्येही सोमालियावरून जाणार्‍या विमानातील चांच्यावरही असाच एकीने प्रतिहल्ला करून प्रवाशांनी त्याचा मनसुबा धुळीला मिळविला होता.
या सर्व शौर्य दाखविणार्‍या प्रसंगातून जवळ-जवळ ६०० लोकांचे प्राण या नि:शस्त्र व कुठलेही प्रशिक्षण नसलेल्या वीरांनी वाचविले. या सर्व वीरांना खरं तर रोख बक्षिसें व पदकं दिली गेली पाहिजेत.
अधीक माहितीसाठी वाचा TIME च्या ११ जानेवारीच्या एशिया आवृत्तीतील हा दुवा: http://www.time.com/time/nation/article/0,8599,1950576,00.html
अचानक घडलेल्या घटनेने स्वत:चा घाबरगुंडा होऊ न देता (panic-stricken) प्रसंगावधान व संतुलन राखून व "मी अमूक करीत असतांना दुसरा दूर उभा असलेला माणूस काय करेल" याची अचूक अटकळ बांधण्याच्या गुणाचा (anticipation) वापर करून हे साध्य झाले.
आता वळू २६/११ कडे! बोरीबंदर येथील शिवाजी टर्मिनसवर केवळ दोन अतिरेक्यांनी जो अभूतपूर्व गोंधळ घालून जबरदस्त रक्तपात केला त्यात अशा तर्‍हेचे शौर्य कुणीच का नाहीं दाखविले?
तीच गोष्ट आहे ताज व ओबेरॉय हॉटेल्सची.
आरामखुर्चीत बसून मी हा प्रश्न विचारतोय् असं म्हणून कांहीं लोक कुत्सित टोमणेही मारतील, पण हा प्रसंग टोमणे मारण्याचा नसून आत्मपरिक्षण करण्याचा व भयावर विजय मिळवून परिस्थितीवर स्वार होण्याचा आहे. जे झाले ते होऊन गेले, पण असं पुन्हा होऊ नये म्हणूणूसखोल विचार करून आपला action plan व SOP आपण मुकर्रर केलीच पाहिजेत.
ज्यांनी गर्भगळित व भयभीत होऊन पळण्याचा मार्ग अंगिकारला त्यातलेही किती तरी (कदाचित बहुसंख्य) लोक मृत्युमुखीच पडले असतील. किती जीव पळून जाऊन जीव वाचवू शकले याची आकडेवारी मिळणे कठीणच, पण पळणे व जीव वाचविणे यात १:१ असा नक्कीच परस्परसंबंध (correlation) नसणार.
अशा पळून जाणार्‍यांपैकी कांहीं लोकांनी शांत डोके ठेवून अतिरेक्यांच्या मागील बाजूने ’धोबीपछाड’ पकडीने एकाद्याला कां पकडले नाहीं? हुतात्मा ओंबळेंनी हेच केले, एकट्याने केले ते एक प्रचंड जमाव कां करू शकला नाहीं?
याची दोन-तीन कारणे असू शकतात.
पश्चिम युरोपात प्रत्येक देशात प्रत्येक तरुणाला सक्तीचे दोन वर्षांचे लष्करी प्रशिक्षण घ्यावेच लागते. माझ्या युरोपच्या अनेक 'वार्‍यां'मधे मी शनिवारी-रविवारी असे अद्याप मिसरूडही न फुटलेले पण त्यांच्या crew-cut मुळे सहज ओळखू येणारे किती तरी 'कोवळे' सोजीर मी पाहिले आहेत. असे सक्तीचे लष्करी प्रशिक्षण त्यांना असे एरवीही उपयोगी पडते कां?
केवळ पोलीस किंवा सैन्यावर अवलंबून न रहाता प्रत्येक भारतीय नागरिकाला होमगार्ड पद्धतीचे प्रशिक्षण द्यायची गरज आज उघड-उघड दिसत आहे कां?
आणखी एक अवघड व बर्‍याचदा निरुत्तर करणारा प्रश्नही मला भेडसावतो. असं मृत्यूला घाबरून पळ काढण्याचा आपणा हिंदूंचा पिंडच आहे कां? काश्मीरमधून मुकाट्याने नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलेले अल्पसंख्य काश्मिरी हिंदूही आजही जम्मू प्रांतात व दिल्लीत निर्वासितांसारखे 'मुकी बिचारी कुणि हाका' पद्धतीने रहात आहेत. याउलट फाळणीनंतर अल्पसंख्य झालेले भारतीय मुसलमान आजही त्यांच्या एकजुटीमुळे व निर्भय वृत्तीमुळे आपले पाय घट्ट रोवून इथं खंबीरपणे व कौतुकास्पदपणे उभे राहिले आहेत. एके काळी ज्यू धर्मीयही याच न्यूनगंडाने पछाडलेले होते व त्यामुळे त्या जमातीचा अनन्वित छळ झाल्याच्या कथा किती तरी आपण वाचतो. लियॉन युरीसच्या दुसर्‍या महायुद्धावरील कादंबर्‍यात अशी किती तरी अंगावर शहारे आणणारी उदाहरणे आहेत. आउश्वित्ससारख्या (Auschwitz) concentration camps मध्ये झालेल्या ज्यूंच्या शिरकाणाबद्दलही आपण वाचलेले आहे व चलच्चित्रपटांतही पाहिले आहे. पण आत्मपरीक्षण करून स्वत:च्या दोषांचा व कमकुवत बाजूचा अभ्यास करून आज याच ज्यूंनी इस्रायलमध्ये एक लढाऊ राष्ट्र उभे केलेले आहे. तसेच आपणही - हिंदू, मुसलमान, शीख व ख्रिस्ती अशा सर्व भारतियांनी - आत्मपरीक्षण करून निर्भय लोकांच्या वृत्तीचे अनुकरण करून किंवा इतर कुठल्याही सोयीच्या मार्गाने आपल्या भयगंडावर विजय मिळवून अशा अतिरेकी हल्ल्यांना तोंड द्यायला नको कां?
सामान्य भारतीय नागरिकांसाठी सरकारने किंवा "रास्वसं"सारख्या पिंडानेच लढाऊ असलेल्या संस्थांनी असले प्रशिक्षण सार्‍या भारतीय जनतेला दिले पाहिजे व सर्व जनतेनेही असले प्रशिक्षण स्वयंस्फूर्तपणे स्वीकारून स्वत:ला अतिरेक्यांबरोबर लढायला, निदान पोलीस व लष्कर येईपर्यंत खिंड लढवायला शिकले पाह्जे.
हुतात्मा ओंबळे यांनी स्वत:ची प्राणाहुती देऊन सार्‍या भारताला हाच एक अनमोल धडा शिकवला आहे असंच मी मानतो व त्याच्यासारखे वागून आपण त्यांच्या स्मृतीला वंदन केले पाहिजे.
२६/११ च्या मुंबई हत्याकांडाबद्दल वाचताना व पहातांना मला एका पुस्तकाची सतत आठवण येत राहिली व ते म्हणजे टॉम क्लॅन्सी (Tom Clancy) या लेखकाचे रेनबो-६ (Rainbow-6) हे पुस्तक. प्रत्येक भारतियाने हे पुस्तक वाचावे असाच प्रेमळ आगप्रेकमीत कमी मिपाकरांना मला करावा असं वाटतं.

संस्कृतीराजकारणविचारअनुभव

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

8 Jan 2010 - 12:00 am | चतुरंग

खाजगी आणि सार्वजनिक जीवनातली कमालीची बेशिस्त ही आपल्या सर्वंकश अधःपतनाला कारणीभूत आहे. ही एकच गोष्ट १०% ने जरी सुधारली तरी चमत्कार वाटावा एवढी सुधारणा दिसून येईल.
(अतिरेकी हल्ले ही कदाचित कधीतरीच घडणारी गोष्ट आहे. पण रोजच्यारोज ही बेशिस्त छोट्या छोट्या प्रसंगातून तुमच्या आत्मविश्वासाचा कणा मोडायला कारणीभूत ठरते हे एकदा लक्षात आले बाकीचे प्रश्न सोपे वाटायला लागतात.)

चतुरंग

प्रशांत उदय मनोहर's picture

15 Jan 2010 - 12:50 pm | प्रशांत उदय मनोहर

१००% सहमत
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

मी-सौरभ's picture

8 Jan 2010 - 12:27 am | मी-सौरभ

हा सर्वात जास्त गरजेचा आहे....

-----
सौरभ :)

विकास's picture

8 Jan 2010 - 1:41 am | विकास

लेख आवडला कारण पोटतिडकीने लिहीलेला आहे. मात्र पूर्ण सहमत आहे असे म्हणू शकत नाही.

आता वळू २६/११ कडे! बोरीबंदर येथील शिवाजी टर्मिनसवर केवळ दोन अतिरेक्यांनी जो अभूतपूर्व गोंधळ घालून जबरदस्त रक्तपात केला त्यात अशा तर्‍हेचे शौर्य कुणीच का नाहीं दाखविले?

अनावधानाने, पण हे अर्धसत्य आहे. त्यावेळेस पोलीसांनी बाजूने (अतिशय हलक्याप्रतीची शस्त्रे हातात असूनही) तोंड दिल्याच्या चित्रफिती पाहील्या आहेत का? त्यावेळेस रेल्वेचा एक मराठी अनाउन्सर हा नक्की कुठून अनाउन्स करत आहेत हे समजे पर्यंत त्याने क्लोजसर्कीट टिव्हीवरून की काचेतून पहात सर्व प्रवाशांना कुठून गेले म्हणजे जास्त सुरक्षित आहे हे सांगितले. परीणामी अनेक जण वाचले आणि अतिरेक्यांचा गोंधळ उडाला...

अशा हल्ल्याच्या वेळेस (सार्वजनीक ठिकाणी) सामान्यांनी वास्तवीक काही गडबड न करता पडून रहायचे असते असेच शिक्षण सर्वत्र दिले जाते. जर असा अतिरेकी लोकलमधे असता तर त्याल धुवायला सोपे गेले असते. पण सार्वजनीक ठिकाणी असे करणे हे संकट वाढवण्यातला प्रकार आहे.

नरीमन हाऊसच्या खाली मिलीटरी आत असताना जो सावळा गोंधळ गर्दी करून केला जात होता तो पाहिला तर लोकांना भयगंडाने पछाडले नाही हे कळते पण वेड लागले आहे का असे देखील वाटते...तिथे वर चतुरंगने म्हणल्याप्रमाणे बेशिस्त दिसते.

वास्तवीक असे वाटते की पोलीसांनी पण शिस्त न पाळताच गोष्टी केल्या म्हणून पहील्याच तासात दुर्दैवाने तीन वरीष्ठ अधिकार्‍यांना मृत्यू आला.

ताज मधे माझ्या आठवणीप्रमाणे तेथील कर्मचार्‍यांनी अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढले. हेच त्यांचे काम होते, अतिरेक्यांशी लढणे हे नव्हते आणि त्यांनी ते स्वतःचा जीव धोक्यात असताना देखील केले. ओबेरॉयबद्दल माहीत नाही पण असे काही असल्यास आश्चर्य वाटायला नको. यावरून एका भारतीय विमान अपहरणाच्या प्रसंगात धैर्य दाखवून एका हवाई सुंदरीने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले मात्र स्वतःचे प्राण गमावले ते आठवले. (डिटेल्स आठवत नाहीत).

हुतात्मा ओंबळेंनी हेच केले, एकट्याने केले ते एक प्रचंड जमाव कां करू शकला नाहीं?

एखादाच ओंबळे असतो बाकीचा जमाव असतो हे त्याचे दुर्दैवाने कारण आहे.

शिवाय अचानक झालेल्या गोळीबारास सामान्यांनी तोंड देणे आणि अतिरेक्यांना पकडणे हे कुठेही अवघडच होईल. युनायटेड ९३ ची कहाणी कधी बाहेर येऊच शकणार नाही कारण ती काळाच्या उदरात गडप झाली आहे. पण मला खात्री आहे की एकच माणूस असा असणार जो पेटून उठला आणि ज्याने दुसर्‍यांना पेटवले. कारण इतर विमानात अतिरेक्यांनी शिकलेली अमेरिकन समाजाची मानसिकता कामाला आली - "सर्वांनी शांत रहा, तुम्हाला काही इजा होणार नाही, आम्ही विमानतळावर जात आहोत..." वगैरे बोलत त्यांनी अमेरिकन मानसास जे कायम शिकवले गेले आहे तशा पद्धतीची प्रतिक्रीया मिळवली असे म्हणले जाते.

सर्व जनतेनेही असले प्रशिक्षण स्वयंस्फूर्तपणे स्वीकारून स्वत:ला अतिरेक्यांबरोबर लढायला, निदान पोलीस व लष्कर येईपर्यंत खिंड लढवायला शिकले पाह्जे.
खरे आहे. पण त्यासाठी आधी एकत्रीत शिस्तबद्ध जगणे जमले तरी बरेच काही साध्य होईल. तसेच जर भ्रष्टाचार कमी केला आणि कुणाला व्हिसाच काय पण रेशनकार्ड देत आहोत, कोण शेजारीपाजारी आहे ह्याकडे लक्ष दिले तरी फरक पडू शकेल असे वाटते...

आणि सरतेशेवटी:

"रास्वसं"सारख्या पिंडानेच लढाऊ असलेल्या संस्थांनी असले प्रशिक्षण सार्‍या भारतीय जनतेला दिले पाहिजे

यात "लढाऊ" म्हणजे काय ह्यावर वरील वाक्य बरोबर आहे का नाही ते ठरवावे लागेल.

टिळकांच्या भाषेत, थंडगोळ्यासारख्या पडलेल्या महाराष्ट्रास न्या. रानड्यांनी नुसती वैचारीक उब देऊन जागे केले. टिळकांनी स्वतः अगदी तरूणपणी वासुदेव बळवंत फडक्यांना आपले जमणार नाही असे सांगितलेच. नंतरच्या काळात "लोकमान्य" झाल्यावरही, जेंव्हा त्यांचे समर्थक आक्रमक चाली करून समाज स्वतःकडे आकृष्टीत करता येईल असे म्हणत तेंव्हा टिळक म्हणत की आपण फक्त समाजाला पुढच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार करत आहोत. असे स्वातंत्र्य जे मला (टिळकांना) कधी हयातीत पहायला मिळण्याची शक्यता नाही.

रा.स्व. संघ "लढाऊ" नाही म्हणूनच तर सनातनवादी त्यांना नावे ठेवतात. रा.स्व. संघ "लढाऊ" नाही म्हणूनच तर नथुरामने संघ सोडला होता. सतत हजार+ वर्षे झालेल्या बाहेरील हल्ल्याचे मुख्य कारण आपण विभागलेले आहोत आणि शिस्त नाही हे असल्याने, परत असे होऊ नये म्हणून राष्ट्राच्या दृष्टिने एकसंध आणि शिस्तबद्ध हिंदू समाज तयार करणे हे डॉ. हेडगेवारांनी ध्येय ठेवले. असे ध्येय जे परीपूर्ण होण्यासाठी काही पिढ्या जाव्या लागतील ह्याची त्यांना कल्पना होती ...

संघाचे कामही वेगळे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठीची पद्धतही वेगळी आहे. पण तो वेगळा विषय झाला. पण वरील तीन उदाहरणात जे सांगायचा प्रयत्न करत होतो ते एकच की तुम्हाला जो समाज अपेक्षित आहे त्यात सर्वप्रथम सामाजीक शिस्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी गरज आहे ती समाजमनात तसे भिनवण्याची. ते काम एका दिवसाचे नाही, एका पिढीचेही नाही पण संयामाचे नक्की आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 10:35 am | विजुभाऊ

"रास्वसं"सारख्या पिंडानेच लढाऊ असलेल्या संस्थांनी असले प्रशिक्षण सार्‍या भारतीय जनतेला दिले पाहिजे
रास्वसं लढाऊ आहे हे कधीच सिद्ध झालेले नाही. ते लढाऊ असते तर त्यानी भारतीय समाजाला सैनीकी शिस्तीचे महत्व पटवले असते. हाती सत्ता असताना सैनीकी शिक्षण सक्तीचे केले असते.
रास्व्सं हा नेहमीच बोटचेपे धोरण स्वीकारत आलेला आहे. सत्तेत सहभाग नाही असे म्हणायचे पण अंकुश मात्र हवा असतो.
उदा: बाबरी मशीदी बाबत जे घडले त्याची जबादारी रास्वसं ने कधीच घेतली नाही. अर्थात बाबरी मशीदी संदर्भात जे काही घडले त्याला भेकडपणे केलेला विश्वासघात हे एकमात्र नाव देता येईल.
राष्ट्राच्या दृष्टिने एकसंध आणि शिस्तबद्ध हिंदू समाज तयार करणे हे डॉ. हेडगेवारांनी ध्येय ठेवले
दुर्दैवाने त्या ध्येयासाठी कठोर अंमलबजावणी करेल असे दूरदृष्टी असणारे नेतृत्व रास्वसं मध्ये आजतरी दिसत नाही.
शिवाय रास्वसं ही संघटना अनेक भागात विभागलेली आहे. त्या अनेकांचे एकमेकाशी बर्‍याच बाबतीत जमत नाही. त्याला कारण कोण आहे ते कळूनही त्याकडे डोळेझाक केली जाते.
भाजप , विहिंप , बजरंग दल वगैरेंच्या ध्येयात आणि धोरणात फरक आहेत. त्या सर्वांवर रास्वसं ला अंकुश ठेवायचा तर असतो. पण त्याच वेळेस भाजप म्हणजे रास्वसं नव्हे हे सुद्धा म्हणायचे असते.
रास्वसं ही ही हिटलरच्या एस एस संघटनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली. त्याची मूळ उद्दीष्टे ही खूपच चांगली आहेत परंतु हिटलरकडे जे नेतृत्व गुण होते ते रास्वसं च्या नेत्यांकडे कधीच नव्हते.

१०,००० % सहमत. मी शाळेत जाण्या आधी संघाच्या शाखेत जायला लागलो होतो.
आता पटत नाही म्हणुन जात नाही.
दरवर्षी दस-याच्या दिवशी संघाचे ध्वजसंचलन होते.हे ध्व्जसंचलन कोणकोणत्या परीसरातुन होते हे पाहण्यासारखे आहे. हिम्मत असेल तर मोहम्मद अली रोड, भेंडीबाजार ईत्यादी मुस्लीम बहुल परीसरातुन करुन दाखवावे.एके४७ आणि हँडग्रेनेडच्या जमान्यात आजुन हाफचडी घालुन दांडु हालवत आपल्याच गल्लीत यांचे ध्वजसंचलन यांना कसकाय "पिंडानेच लढाऊ"म्हणायच?
*************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विकास's picture

8 Jan 2010 - 10:20 pm | विकास

मी शाळेत जाण्या आधी संघाच्या शाखेत जायला लागलो होतो.

म्हणजे नक्की कितव्या वर्षापर्यंत तुम्ही शाखेत गेलात? :-)

एके४७ आणि हँडग्रेनेडच्या जमान्यात आजुन हाफचडी घालुन दांडु हालवत आपल्याच गल्लीत यांचे ध्वजसंचलन यांना कसकाय "पिंडानेच लढाऊ"म्हणायच?

म्हणूनच माझ्या मूळ प्रतिसादात म्हणले होते की नक्की "लढाऊ" म्हणजे काय ते ठरवा. आपल्याला अपेक्षित असलेल्या अर्थाने संघाचे कधीच उद्दीष्ट नाही कारण कायदा आणि सुव्यवस्था जनतेने हातात घेणे हे देशासाठी भस्मासूर ठरू शकतो. त्यातूनच अतिरेकी तयार होतात.

म्हणूनच (अजून एक उदाहरण) स्वा. सावरकारांनी देखील "अभिनव भारत संघटने"ची सांगता केली. त्यातून मेसेज हाच होता की नागरीकांनी शस्त्रे उचलली ती केवळ परकीय सत्तेविरुद्ध, ती बाहेर घालवायला. आता घरातील भांडणे - मग ती सरकार वि. जनता असोत, दोन विचारसरणीतील, दोन श्रद्धांमधील, कशातलीही, ती हातात कायदा घेऊन आणि शस्त्रे घेऊन करायची नाहीत तर लोकशाही पद्धतीनेच....

बाकी संघ मग काय करतोय यावरील टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी वाचनीय आहे. त्यातील मूळ गोषवारा खालील प्रमाणे:

'Sewa Disha' a special journal published by RSS front organisation released to the media on Tuesday reveals that its service projects all over the country that numbered 15,063 in 1997 have grown into a massive network of 1,57,776 in 2009. The journal, published once in five years, gives full account of the service work done by the innumerable units of the Sangh parivar, said RSS spokesman Manmohan Vaidya.

The service projects are engaged mainly in four fields-- education, healthcare, social work and economic self-reliance. Of the total 1.5 lakh projects, nearly 40% or 59,498 are into imparting education. This work is mainly done through Vanvasi Kalyan Ashram (3147 units), Rashtriya Sewa Bharti (20,500 schools), Vishwa Hindu Parishad (25, 922 units), Vidya Bharti (9682) units, Rashtriya Sevika Sangh (149 units) and Akhil Bhartiya Vidyarthi Parishad (98 units). Similarly, 38,582 health-related units are being currently operated through mainly Seva Bharti, VHP, Bharat Vikas Parishad and Vanvasi Kalyan Ashrams. While the number of social projects that do village development to disaster management have now grown 42,304, economic activity is being executed through 17,392 projects, according to the journal.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विनायक रानडे's picture

8 Jan 2010 - 12:28 pm | विनायक रानडे

"उदा: बाबरी मशीदी बाबत जे घडले त्याची जबादारी रास्वसं ने कधीच घेतली नाही. अर्थात बाबरी मशीदी संदर्भात जे काही घडले त्याला भेकडपणे केलेला विश्वासघात हे एकमात्र नाव देता येईल." खरेतर आम्ही कोणीच ढाचा पाडण्याचे श्रेय घेउ शकत नाही. कदाचित ढाचा पडला ह्याचा आनंद मानु शकतो. आम्ही सगळेच "निगेटीव्ह प्रपोगांडा" ने गुरफटलेले आहोत. ढाचा पाडला त्याच महिन्यात (मी ओमानला होतो) ओमान ऑबझरवर ह्या दैनिकात " एफ.बी.आय च्या सुत्रांनी "पनामा कारटेलच्या" भाडेकरु गुंडांचा त्यात हात आहे असे लिहिले होते. कारण अयोध्देत ऊच्च दर्जाच्या अफीमचे उत्पादन होते व त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्या वर बंदि आणली होती. तसेच असल्या सरकारला, रा.स्व.सं. व तसल्या संघटनांना एका दगडात अनेक पक्षी ह्या न्यायाने बदनाम करुन भारतात छान गोंधळ माजवण्याचे काम केले. त्याचा परिणाम अजूनही आम्ही पाहतो आहे. त्याचाच फायदा घेउन नेते मंडळी आपले अस्तित्त्व टीकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही इंटरनॅशनल कॉनस्पिरसी आहे. कदाचीत सोयिस्कर रित्त्या पचणार नाही. चुक आहे ती सशक्त हेर खात्याची, नेत्यांच्या, अधिकार्‍यांच्या क्षूद्र स्वकेंद्रित मोबदला मिळवण्याच्या वृत्तिची.

ह्याला पुरावा - २६/११ प्रक्रणातील हेडली व राणाची अमेरिकेतून उघडकीस येणारी निर्लज्य वक्तव्ये व टिप्पण्या. खरंच आम्ही संतुलीत विचार करण्यातही बेशिस्त आहोत.

हजारो वर्षापासुन संघटीत समाज भावना नव्हती. आक्रमकांनी आम्हाला ह्या गोंधळात खेचले असे दिसते आहे. जगा आणि जगु द्या ही माणूसकी जपणारी भारतिय परंपरा होती व आहे.

विजुभाऊ's picture

8 Jan 2010 - 4:14 pm | विजुभाऊ

"पनामा कारटेलच्या" भाडेकरु गुंडांचा त्यात हात आहे असे लिहिले होते. कारण अयोध्देत ऊच्च दर्जाच्या अफीमचे उत्पादन होते व त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्या वर बंदि आणली होती.
विनायक रानडेजी हे नवीनच ऐकीवात येतेय.
तुम्ही जे लिहिलय त्याचा अर्थ बाबरी ढाचा हा विहिंप्/बजरंग दल/ शिवसेना या पैकी कोणाच्याच कार्यकर्त्यानी पाडला नाही असाच होतो ना?
हा सोध अद्याप कोणाच्याच कसा लक्षात आला नाही?
रास्वसं ला कोणीच वाली नसणारी बाबरी मशीद अजेंड्यावर घेता आली. पण अनेक हिंदु मंदीरे/ताजमहाल वगैरे बाब्त मात्र ते सोयीस्कर मौन धारण करतात.
रास्वसं ही सध्या तरी शेजार्‍याचा मुलगा सैन्यात जावा माझा मुलगा ब्यान्केत क्लार्क व्हावा या वृत्तीच्या मध्यमवर्गीय माणसाच्या वृत्तीची संघटना उरलेली आहे. ती धाडसी नाही म्हणूनच उघडपणे कोणत्याच विचारसरणी ची बांधीलकी दाखवत नाही.
रास्वसं ला याच कारणासाठी भारतीय जनतेने नेहमीच चारहात दूर ठेवलेले आहे.
महाराष्ट्रात लोकाना त्यापेक्षा शिवसेना अधीक जवळची वाटते.

विनायक रानडे's picture

8 Jan 2010 - 6:26 pm | विनायक रानडे

हाच मलाही पडलेला प्रश्न आहे. ह्यालाच म्हणतात प्लॅनींग, सगळ्यांना संभ्रमात टाकणे व ऊद्देश साध्य करणे. मॉब सायकॉलॉजीचा उपयोग झाला होता, मी महीन्यापूर्वीच बघितलेल्या एका चित्रफितीत स्फोट झालेला बघीतला आहे. घण मारतांना साधी धूळ सुध्द्दा ऊडली नव्हती असे दिसले. मला कोणाचीच बाजू घ्यायची नाही. रास्वसं.ने फक्त हुतात्मे का घडवावे? मुद्दा आहे तो समाज संघठण व सुसंगत शिस्तबध्द विचारांची देवाणघेवाण. मला हुतात्मा बनून चोरांना राज्य मीळणे मुळीच पटत नाही. आज कोण खरे स्वातंत्र्य सैनीक होते हे कोण ठरवणार? इराणच्या क्रांतीत हेच घडले व घडते आहे. ७८ - ७९ ज्यांनी क्रांतीत भाग घेतला त्यांना आज नीवडणुकीच्या गोंधळात देशद्रोही ठरवले गेले आहे. ह्यातून आम्ही काय शिकणार? तीन आतंकी दिल्लीत पळून जातात? हेमंत करकर्‍यांचे जॅकेट कचर्‍यात टाकले जावे? विचार करणे रक्तदोष ठरला आहे.
धाडस येण्याकरता आधी सु संघटीत असणे आवश्यक आहे. नाहीतर कायदा हातात घेणारे गुंड ठरवले जाते. संघावरच्या दोन बेकायदेशिर बंद्या त्यात होरर्पळून गेलेली किति कुटूंबीय मंडळी होती? त्यांची विचारपूस कोणी केली?.
लोकसभा हल्ल्यातल्या शहिद कुटूंबीयाना अजून न्याय मिळत नाही. पण आमदार खासदाराला मोफत हवाई सेवा, २० रुपायात ऊत्त्म भोजान वगैरे . . .

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Jan 2010 - 5:04 pm | llपुण्याचे पेशवेll

विनायकरावांशी सहमत आहे..
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

विकास's picture

8 Jan 2010 - 9:59 pm | विकास

हे मूळ चर्चेसाठी अवांतर होत आहे. पण पर्याय नाही...

रास्वसं ही ही हिटलरच्या एस एस संघटनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली.

या आपल्या विधानाला काही संदर्भ आहे का? संदर्भ असला तर सांगा आणि नसला तर तसे देखील कृपया सांगावीत ही अपेक्षा आहे. माझ्या माहीती प्रमाणे:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा १९२५ साली चालू झाला. हिटलर हा १९२५ साली जर्मनीत आला आणि त्याने आणाभाका घेतल्या की मी शहाण्यासारखा वागेन आणि नंतर नाझींचा सर्वोच्च नेता झाला. एस एस बॉडीगार्ड त्याने १९३४ साली वापरायला सुरवात केली. (बाय द वे संघात बॉडीगार्ड तयार करत नाहीत)

दुर्दैवाने त्या ध्येयासाठी कठोर अंमलबजावणी करेल असे दूरदृष्टी असणारे नेतृत्व रास्वसं मध्ये आजतरी दिसत नाही.

अच्छा म्हणजे हिंदू संघटन व्हावे अशी आपली इच्छा आहे तर फक्त संघ दुर्दैवाने करू शकत नाही असे म्हणणे आहे. जर केले तर सुदैव आहे असेच म्हणायचे आहे का?

पण त्याच वेळेस भाजप म्हणजे रास्वसं नव्हे हे सुद्धा म्हणायचे असते.
अर्थातच भाजप म्हणजे रास्वसं नाही आहे. बाकी संघावरून तुम्हीच चालू केलेल्या धाग्यात नीलकांतचा आणि माझा प्रतिसाद वाचला असेलच. तसेच विनायक पाचलगच्या धाग्यात देखील. तेंव्हा परत येथे अतीअवांतर माझ्याकडून करत नाही.

हिटलरकडे जे नेतृत्व गुण होते ते ...
हिटलर कडे जे काही होते ते तुमच्या दृष्टीने गुण असतील कदाचीत पण आजही वयाच्या ९०व्या वर्षी त्याच्या संघटनेत दुरान्वयी संबंधीत असलेले पण तोंड लपवून जगत आहेत हा नुसताच इतिहास नाही तर वर्तमान आहे.

असो.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विजुभाऊ's picture

9 Jan 2010 - 2:34 pm | विजुभाऊ

हिटलरकडे जे नेतृत्व गुण होते ते ...

नेतृत्व गुण हे त्याच्याकडे होतेच. त्याच्याकडे प्रखर राष्ट्रनिष्ठा देखील होती.
नेतृत्व गुण हे बाळासाहेबदेवरसांकडे/ हेडगेवार्गुरुजींकडेसुद्धा होते. बाळसाहेब ठाकर्‍यांकडे सुद्धा नेतृत्वगुण आहेत. त्या शिवाय का
लादेन किंवा सद्दाम यांच्याकडे सुद्धा नेतृत्व गुण आहेत. लादेनकडे तर कितीतरी उच्च नेतृत्वगुण आहेत. देश बेचिराख झाला तरी चालेल पण नेतृत्वाशी गद्दारी करणार नाही हा बाणा नेतृत्वाने अन्यायांत आणणे हा चमत्कारच नव्हे का. त्या बाबतीत लादेन ला मानलेच लाहिजे.
हिटलरशी संबन्धीत असलेले आज तोंड लपवून जगत आहेत. हा वेगळा मुद्दा आहे. इतिहास जेते लिहितात. जर का हिटलर जिंकला असतात तर त्याच व्यक्तींचे पुतळे जगाने मिरवले असते.

विकास's picture

9 Jan 2010 - 6:27 pm | विकास

रास्वसं ही ही हिटलरच्या एस एस संघटनेच्या धर्तीवर तयार करण्यात आली.

अजूनही वरील विधानाचा संदर्भ काय, या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. सारखे विचाराय्चे कारण इतकेच की अशा बिनबुडाच्या (अर्थात "बेसलेस") विधानांनीच एखाद्या व्यक्तीचा अथवा संघटनेबद्दल गैरसमज पसरवता येतो. येथे हे रा.स्व.सं बद्दल झाले आहे. तेंव्हा कृपया करून संदर्भ आहे अथवा नाही ते अवश्य सांगा...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुधीर काळे's picture

8 Jan 2010 - 8:34 am | सुधीर काळे

वा विकास-जी! काय सुरेख प्रतिसाद दिला आहे तुम्ही!
------------------------
सुधीर काळे, Back to Jakarta on 6th!
जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!

सहज's picture

8 Jan 2010 - 9:08 am | सहज

सहमत.

मुळ लेख व प्रतिसाद दोन्ही छान!

प्रमोद देव's picture

8 Jan 2010 - 9:44 am | प्रमोद देव

काळेसाहेबांची कळकळ आणि विकास ह्यांचा संतुलित प्रतिसाद...ह्या दोन्हीबाबत सहमत आहे.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

पारंबीचा भापू's picture

8 Jan 2010 - 9:52 am | पारंबीचा भापू

सुधीरभाऊ,
बर्‍याच दिवसांनी तुमचे नवे लेखन 'मिपा'वर वाचायला मिळाले.
लेख खूपच आवडला! गोर्‍या लोकांत आणि आपल्यात हा फरक आहे हे खरेच!
भापू

देवदत्त's picture

8 Jan 2010 - 11:13 am | देवदत्त

चांगला लेख आहे. विस्तृत प्रतिक्रिया नंतर लिहितो.

सध्या तरी "असं मृत्यूला घाबरून पळ काढण्याचा आपणा हिंदूंचा पिंडच आहे कां?" ह्यावर असहमती.
(आणि तुम्ही असे लिहिताना न्यायालयाची परवानगी घेतली का? ;) )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2010 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण सुरक्षीत आहोत असे दिसल्यावर आपल्याला काय करायचे ही प्रवृत्ती खूप फोपावली आहे.
मराठी दैनिकांमधे 'यास्पर शुरिंगा' ची बातमी तितकी ठळक नव्हती. ठळक बातमी होती ती, ओबामा यांनी गुप्तचरांना झापल्याची.
बाकी आपली कळकळ योग्य आहे.

फक्त काही मुद्यांवर चर्चा जरुर व्हावी.
१)मृत्यूला घाबरून पळ काढण्याचा आपणा हिंदूंचा पिंडच आहे कां?
२)मुसलमान आजही त्यांच्या एकजुटीमुळे व निर्भय वृत्तीमुळे आपले पाय घट्ट रोवून इथं खंबीरपणे व कौतुकास्पदपणे उभे राहिले आहेत.
३)"रास्वसं"सारख्या पिंडानेच लढाऊ असलेल्या संस्थांनी असले प्रशिक्षण सार्‍या भारतीय जनतेला दिले पाहिजे

-दिलीप बिरुटे

चिरोटा's picture

8 Jan 2010 - 7:59 pm | चिरोटा

१)मृत्यूला घाबरून पळ काढण्याचा आपणा हिंदूंचा पिंडच आहे कां?

हिंदुंचा म्हणण्यापेक्षा तो भारतिय पिंड आहे असे वाटते. सरकारी,पोलिस,नोकरशहा ह्यांच्या नाकर्तेपणातुन तो पिंड तयार झाला आहे. आपले संरक्षण आपल्यालाच केले पाहिजे,सरकार्,पोलिस वगैरे काहीही मदत करणार नाहीत ह्याची नागरिकांना खात्री असते. भारतात एखादी दुर्घटना घडते तेव्हा तेथे सरकारी/खाजगी रुग्णवाहिका किती वेळात पोहोचते?
घटनेत मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास सरकार कसा वेळकाढूपणा करते हे माहित असते.
पाश्चात्य देशांतील सरकारे सामान्य नागरिकांना जी वागणूक देतात तिच्या एक दशांश वागणूकही आपले सरकार नागरिकांना देत नाही.

भेंडी
P = NP

II विकास II's picture

9 Jan 2010 - 12:30 pm | II विकास II

>>पाश्चात्य देशांतील सरकारे सामान्य नागरिकांना जी वागणूक देतात तिच्या एक दशांश वागणूकही आपले सरकार नागरिकांना देत नाही.
आजकालची परीस्थीती पाहुन असे म्हणावेसे वाटते की भारतीय लोकांची लोकशाही मध्ये राहण्याची लायकी नाही.
कमीत कमी, पैसे घेउन मत देणारांनी चांगल्या सरकारची अपेक्षा करु नये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2010 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>भारतीय लोकांची लोकशाही मध्ये राहण्याची लायकी नाही.

हम्म :(

भारतीय लोकांची लायकी अशा परदेशातील वागणुकीच्या तुलनेवरुन कोणी काढले की, लै वाईट वाटते.[तुलना खरी असते,पण ती पचवता येत नाही] पाश्चात्य देशातील सरकारांची नागरिकांना दिलेली जाणारी वागणूक खूप चांगली असेलही, पण म्हणून भारतीय लोकशाहीच्या नावाने थयथयाट नको. लोकशाही म्हटले की, काही भले आणि बुरे असणारच आहे. व्यवस्था इतकी सहज बदलणार नाही. होतील बदल हळूहळू. जवाबदार नागरिक, केवळ पदव्यांचे शिक्षण नव्हे तर जगरहाटीत वागण्याचे शिक्षण, पारदर्शक सरकारे, पारदर्शक प्रशासन, आणि पारदर्शक राजकारण या आणि अशा चांगल्या बदलांकडे आपली वाटचाल होईल. निसर्ग, परिस्थिती, लोकसंख्या, साधनांचा वापर, अशा घटकांचा अभ्यास आपला जगण्याचा मार्ग अधिक सुरक्षीत करील. यासाठी आपण सामान्य माणसाने होता होईल तितके व्यवस्थेत सहभागी होऊन, चांगल्या सरकारांसाठी आपले योगदान दिले पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

9 Jan 2010 - 6:40 pm | विकास

बिरूटेसरांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत...

एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की स्वातंत्र्यमिळे पर्यंत लोकशाही हा प्रकारच भारतीय जनतेस माहीत नव्हता. त्यात अनेक शतके एकंदरीतच गुलामगिरीत गेली होती. त्यामुळे मानसिकता वेगळी असल्याने एकदम लोकशाहीचे झाड रुजेल अशी अपेक्षा करणे चुकीचे होते. काही अंशी आज त्याच (सुरवातीच्या) काळातील फळे आपण चाखत आहो, जेंव्हा जनता बर्‍याच अर्थी राजकारण्यांवर विसंबून "आपण बरं आपलं बरं" म्हणत जगली. मात्र तो काळ विविध कारणाने आता चांगल्या अर्थाने बदलत आहे असे वाटते. प्रामुख्याने दळणवळणाबरोबरच इंटरनेट क्रांती हे देखील कारण आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

II विकास II's picture

9 Jan 2010 - 6:59 pm | II विकास II

वरील दोन्ही प्रतिसादाबद्दल आभार.

माझे मत कोणत्याही अशिक्षित/सुशिक्षित माणसांबद्द्ल नाही.

>>एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की स्वातंत्र्यमिळे पर्यंत लोकशाही हा प्रकारच भारतीय जनतेस माहीत नव्हता. त्यात अनेक शतके एकंदरीतच गुलामगिरीत गेली होती.

ही गोष्ट मान्य, पण जेव्हा काहीजण शिक्षित होतात. त्यांना फक्त त्यांच्या हक्काची जाणिव राहते. पण त्यांना कर्तव्याचा विसर पडतो . त्याबद्दल तुमचे काय मत आहे. अशी किती तरी उदाहरणे माझ्या आसपास आहेत.
माझ्या मते भारतीय शिक्षण व्यवस्था चांगले शिक्षित नागरीक तयार करण्यापेक्षा फक्त शिक्षित लोक तयार करण्यावर भर देते.

आपल्या मिपाचे सभासद असलेल्या एक अनिवासी भारतीय सभासदाने मला खालील प्रतिसाद पाठविलेला आहे व मी तो त्यांच्या परवानगीने अनुवादित करून इथे दिलेला आहे. त्यांना आपली ओळख द्यायची इच्छा नसल्याने मी त्यांचे नाव जाहीर करू शकत नाहीं. याच कारणामुळे या त्यांच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून आलेल्या प्रतिसादांनाही ते उत्तर देतीलच असे नाहीं.
सुधीर काळे
================================
मला उद्देशून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतातः
नमस्कार,
मी तुमचा भारतीय नागरिकांना आणीबाणीच्या प्रसंगी कसे स्वसंरक्षण करावे या बाबतीतला अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करायला उद्युक्त करण्याबद्दल कळकळीने लिहिलेला मिपावरील लेख वाचला. या अनुषंगाने जे मुद्दे तुम्ही उपस्थित केले आहेत त्याबद्दल माझी मतें मांडायला मराठीमध्ये योग्य शब्द सुचायला अडचणी येतील असे वाटल्याने मी माझी मतें इथे इंग्रजीत मांडत आहे. तसेच एक मुद्दा जो तुमच्या लेखात यायला हवा होता व आलेला नाही त्याबद्दलही लिहितोय्.
आपण भारतीय लोक, एकट्याने म्हणा किंवा सामुदायिकपणे म्हणा, आणीबाणीच्या (बाक्या) प्रसंगी जी शक्तीपूर्ण कारवाई करायला हवी ती करण्यात अपयशी होतो या तुमच्या अभिप्रायाशी/मताशी मी सहमत आहे.
याला दोन कारणे आहेत असे मला वाटते. एक म्हणजे अमेरिकन किंवा युरोपियन लोक शारीरिक दृष्ट्या आपल्यापेक्षा सुदृढ व 'फिट' असतात व दुसरे म्हणजे त्यांना लष्करी प्रशिक्षणाची चांगली पार्श्वभूमीही असते. याशिवाय गोरे लोक साधारणपणे गर्भगळित (panic) न होता शांत राहू शकतात व आपला मानसिक समतोल सांभळून संयमित कारवाई करू शकतात.
उदाहरणार्थ हडसन नदीत अलगदपणे विमात उतरविण्याची कृती. अशा प्रसंगी भारतीयांनी काय केले असते? माझ्या मतें आपले वैमानिक शांतचित्त राहून विमान चालविण्याच्या मॅन्युअलमध्ये (operations manual or SOP) दिलेल्या सल्ल्यानुसार विमान चालवू शकले नसते. खरे तर मॅन्युअलप्रमाणे काम करणे तुच्छ मानण्याची किंवा तसे करण्याचा तिरस्कार करण्याची भारतियांची प्रवृत्ती असते व हा आपल्यातला सर्वात मोठा दुर्गुण आहे.
आणि त्यांनी जर SOP चे अनुकरण केले असते तर विमानप्रवासी गर्भगळित होऊन (panic) अगदी असमंजसपणे किंवा अविवेकीपणे वागले असते व त्यामुळे एकंदरच हाहाकार घडून आला असता. याचे आणखी एक उदाहरण सांगतो. युरोपवरून विमान जात असताना एका तुर्की वैमानिकाने अशा बाक्या प्रसंगी धार्मिक मंत्र म्हणायला सुरुवात केली व सर्व गोष्टी देवाच्या भरवश्यावर सोडून दिल्या. परिणामत: ते विमान पडले व सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले.
हिंदू धर्माची शिकवणही आपल्याला मानसिक दबावात असताना मिळमिळीत बनविते (मूळ लेखकाने tame हा शब्द वापरला आहे) या तुमच्या मताशीही मी सहमत आहे. (कदाचित् आपल्या शाकाहारी भोजनामुळेही असे असेल हेही मनात येऊन गेले.).
पण भारतियांबद्दलची माझी गंभीर तक्रार आहे ती त्यांची शिस्तीत वागण्याबद्दलची उपेक्षा किंवा शिस्तीला डावलून कृती करण्याची प्रवृत्ती. फक्त या एका महत्वाच्या (crucial) दुर्गुणामुळे आपण भारतीय मंडळी सर्व प्रसंगात मार खातो. भारतीय मंडळी शिस्तीला कसे वार्‍यावर सोडून मोकळे होतात याबाबतीतले स्वत: अनुभवलेले प्रसंगही (anecdotes) मी सांगू शकतो. मला खात्री आहे कीं तुम्हालाही (म्हणजे मलाही) याचा अनुभव आला असणारच. ही बेशिस्त आपल्या सार्वजनिक आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात दिसते मग ती भारतातली बँक असो किंवा सरकारी कार्यालय असो किंवा सार्वजनिक प्रसंगी भारतीय लोकांच्या वैयक्तिक वागणुकीत असो.
एकच उदाहरण हे सांगायला पुरेसे आहे.
मी सध्या ज्या देशात रहातो तिथे आम्ही बहुतक सर्व लोक सदनिकांमध्ये (apartments) रहातो. या सदनिका (apartment complexes) सामायिक जमीनीवर उभ्या असतात व त्यांत क्लब हाऊससारख्या सुखसोयीही सामायिक असतात. या सदनिका बर्‍याचदा एकाद्या मेट्रो स्टेशनवर किंवा मॉल्सवर (malls) बांधलेल्या असतात. यामुळे तिथे रहाणार्‍या रहिवाशांना सदनिकांच्या खालीच असलेल्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी किंवा शॉपिंग करण्यासाठी खूप सोयीचे होते. सदनिकांत रहाणार्‍या रहिवाशांना घरी जाण्यासाठी व त्यांना भेटायला आलेल्या पाहुण्यांना कांहीं निर्बंधही असतात. प्रत्येक दारावर सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक कुलुपे असतात व रहिवासी आपले कार्ड swipe करून ते उघडू शकतात व असे कार्ड नसणारे पाहुणे आपले नांव नोंदवून वगैरे जाऊ शकतात. ही शिस्त सर्व रहिवाशी कटाक्षाने पाळतात. तिथे तैनात असलेला रक्षक फक्त तिथे 'उपस्थित' असतो व येणार्‍या-जाणार्‍यावर नजर ठेवणे व त्यांचे स्वागत करणे एवढेच त्याचे काम असते. कधी चुकून कार्ड swipe करूनही कुलूप उघडले नाहीं तरच तो मदतीला येतो.
इथे सर्व रहिवासी कुरकूर न करता ही शिस्त पाळतात. रहिवाश्यांना सगळे रक्षक माहीत असतात तर रक्षकांनाही सगळे रहिवाशी चेहर्‍याने माहीत असतात. येता-जाता good morning, how are you सारखे कांही प्रेमळ संवादही होतात. असे असूनही कुणी असे सौजन्याचे दोन शब्द न बोलता जात-येतही नाहीं किंवा त्याबद्दल नाखुषीही दाखवत नाहींत.
अशा तर्‍हेची सोय जर भारतात केली तर काय होईल याची मी कधी-कधी कल्पना करतो. बहुतेक वेळी रहिवासी रक्षकाला हात करून कुलूप उघडायला लावतील व आत जातील किंवा कधी-कधी रक्षक येणार्‍या-जाणार्‍याकडे नीट पहाणारही नाहींत. कुणाला 'मी'पणाचा झटकाही येईल. (मी रोज इथे येतो-जतो, त्याला मी कोण आहे ते माहीत कसे नाहीं? वगैरे) व अशा अनिष्ट स्वभाववैशिष्ट्यांमुळे अशी इलेक्ट्रॉनिक कुलुपांची पद्धत एका क्षणात जमीनदोस्त होईल. या विषादपूर्ण परिस्थितीमुळे मला भारताची काळजी वाटते.
शिस्तीने वागण्याबद्दलचा संपूर्ण अभाव व त्याबद्दलची उपेक्षा हीच सर्व अनर्थांच्या मुळाशी आहे असे मला वाटते.
मी ओंबळे व त्यांच्या सारख्या इतर वीरांना मानवंदना करतो. पण अंतर्मुख होऊन गंभीरपणे विचार केल्यावर असेही मनात येते कीं अशा व्यक्तींच्या बलिदानाला आज भारतात कांहीं किंमत आहे कां? सरकार एकाद्या निवेदनापलीकडे कांहींही अशा माणसांची व त्यांच्या कुटुंबियांची दखल घेणार नाहीं व आम जनता "जन पळभर म्हणतिल हाय हाय" च्या थाटात दोन दिवस दु:ख करेल आणि मग अशांनी केलेला त्याग विसरूनही जाईल.
याविरुद्ध राष्ट्रासाठी असे बलिदान देणार्‍या वीरांसाठी बांधलेल्या स्मारकांची पाश्चात्य लोक किती मनपासून काळजीघेतात व त्यांच्या त्यागाच्या आठवणी जोपासून ठेवतात ते पहाण्यासारखे आहे.
आपण एक स्वार्थी, निष्काळजी व कुणासाठीही कृतज्ञता नसलेले राष्ट्र बनलो आहोत असेच मला वाटते.
टीपः वरील मतें मला ई-मेल लिहिणार्‍या सभासदाची अहेत, माझी नाहींत. पण मी या मतांशी बव्हांशाने सहमत आहे. विकासजींच्या प्रतिसादाच्या तोडीचा हा प्रतिसाद आहे. तसेच बेशिस्तीबद्दलचे असेच मत चतुरंग व इतर सभासदांनीही त्यांच्या प्रतिसादात नोंदविले आहे.
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

सुधीर काळे's picture

13 Jan 2010 - 5:18 pm | सुधीर काळे

जसा एकाद्या अपघातानंतर वैद्यकीय मदत येईपर्यंत "प्रथमोपचार" केला जातो (त्याचा शिक्षणक्रमही असतो व या शिक्षणाला कामगारांकडून छान प्रतिसाद मिळतो व भारतीय कारखान्यांतून तो उत्साहाने शिकवलाही जातो) तसेच दुर्दैवाने अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या जवळ असलेल्या नागरिकांना एक प्रथमोपचार म्हणून करण्यासारखे कांहीं शिकवावे का या मुद्द्यावर लिहिलेल्या माझ्या लेखाला संख्या व प्रत या दोन्ही निकषांवर छान प्रतिसाद मिळाले. प्रतिसाद यावयाचे थांबेपर्यंत एकेका प्रतिसादाला प्रतिसाद द्यायचे मी टाळले व आता या सगळ्या प्रतिसादांना संबोधून हा प्रतिसाद लिहीत आहे. हा माझा "शेवटचा शब्द" नसेलही, पण तात्पुरता तरी तो तसा आहे.
विकासजींचे बरेच मुद्दे सुरेखच आहेत: अशा हल्ल्याच्या वेळेस (सार्वजनीक ठिकाणी) सामान्यांनी वास्तवीक काही गडबड न करता पडून रहायचे असते असेच शिक्षण सर्वत्र दिले जाते. सार्वजनीक ठिकाणी असे करणे हे संकट वाढवण्यातला प्रकार आहे.
शिवाजी टर्मिनससारख्याजागी खुल्लमखुला प्रतिकार करणे सोपे नाहीं हे मत आणखी दोघांनी खासगीत व्यक्त केले व ते मला मान्यही आहे.
जे बंदुकीच्या समोर आहेत त्यांच्या बाबतीत खरे आहे, पण आम लोकाना "पडून रहावे" हे कळण्यासाठीही प्रशिक्षण लागतेच. प्रशिक्षण नसेल तर लोक वाट फुटेल तिथे पळू लागतात व गोळ्यांना बळी पडू शकतात.
एकदा जकार्ताला मी १०व्या मजल्यावरच्य़ा ऑफीसमध्ये एक मीटिंगमध्ये होतो व जोरदार भूकंप झाला. मी व माझा अमेरिकन सहकारी मीटिंगच्या मोठ्या टेबलाखाली गेलो, कारण भूकंपात असे करणे सगळ्यात सुरक्षित असते हे कोयनेच्या भूकंपानंतर मी वाचले होते व टीव्हीवर पाहिलेही होते. पण त्या मीटिंगमधले बाकीचे लोक लिफ्टकडे पळाले कारण त्यांना ही माहिती नव्हती! सुदैवाने झटका थांबला व आम्ही बाहेर आलो. पण आमच्या सहकार्‍यांनी आम्हाला मूर्खात काढले!
जर असा अतिरेकी लोकलमधे असता तर त्याल धुवायला सोपे गेले असते. बंदिस्त जागेत असे करणे सोपे आहे.
ताज, ओबेरॉयसारख्या बंदिस्त जागीही आपण असे करू शकलो नाहीं हे लक्षात घ्यायला हवे. (आपण आत्मपरीक्षण करीत आहोत हेही विसरू नये.)
शिवाजी टर्मिनसच्या अनाउन्सरने चांगलेच काम केले. तसेच चांगले काम ताजच्या सेवकांनीही केले. ओबेरॉयच्या सेवकांनीही केले असेलच. पण माझ्या लेखाचा रोख जे केवळ दुर्दैवाने अतिरेक्यांच्या जवळपास अडकतात त्यांनी काय करायला हवे व ते त्यांच्या हातून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कसले प्रशिक्षण द्यायला हवे याबाबत आहे.
चतुरंग-जी, निनावी-जी व इतरही कांहीं प्रतिक्रियांत शिस्तीचा अभाव हा मुद्दा मांडला गेला आहे. भारतीय जनतेतील शिस्तीचा अभाव हा मुद्दा तर अगदी खरा आहे. पूर्वी ६५ सालच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात Air raid चा siren वाजल्यावर लोक गच्चीवर "गंमत" पहायला जायचे हेही मी पाहिले आहेच!
सावरकरांचे एक वचन विकासजींनी दिले आहे ते अगदी बरोबर आहे. आपल्या सरकारशी लढताना शस्त्रे कशाला हवीत? शस्त्रे नकोतच, पण शारीरिक सुदृढता व शिस्त हवी.
शारीरिक 'फिटनेस'साठी दंड-बैठकांसारखे बिनखर्चिक व्यायाम करावेत कां? लाठीसारखे "शस्त्र" हातात ठेवावे कां? लाठी कशी चालवावी, hand-to-hand combat याचे प्रशिक्षण सक्तीचे सक्तीचे करावे कां?
खरं तर हातात एक लाठी ठेवणे हा एक प्रशिक्षणाचा भाग असायला हरकत नाहीं. एकादी "हॉकी-स्टिक" काय करू शकते हे आपण चित्रपटांतून गुंडगिरीच्या संदर्भात पहातोच. वृद्धापकाळी चालताना आधार म्हणूनही हातात काठी येतेच. ती तरुण-तरुणींनी एक "स्वसंरक्षणाचे शस्त्र" म्हणून ठेवण्याची कल्पना मला हळू-हळू भावू लागली आहे. आपले पोलीसही सर्व प्रथम batons चाच उपयोग परिणामकारक रीत्या करतात.
"AK-47 व grenade युगात "अर्धी चड्डी घालून मिरवण्यात काय फायदा आहे?" असा प्रश्न जयपाल विचारतात. पण प्रामाणिक संतापाने रागावून/चिडून अतिरेक्याच्या टाळक्याला पाठीमागून लगावलेला एक सणसणीत फटका बराच परिणामकारक होऊ शकतो. एकाद्याला असे बेशुद्ध करणे तर अगदी शक्य आहे. एकाद्याची कवटी "egg-shell-thin" असेल तर असा इसम परलोकवासीही होऊ शकतो.
माझ्या लेखाचे आवाहन सर्व धर्माच्या भारतियांसाठी आहे. शिवाजी टर्मिनस, ताज, ओबेरॉय या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले ते कवी प्रदीप यांच्या "ऐ मेरे वतनके लोगों" या सुप्रसिद्ध कवितेत वर्णिल्याप्रमाणे "कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी"सारखे सर्वधर्मीय-सर्वप्रांतीय भारतीय होते (कांही परदेशीही होते). आता अतिरेकी हल्ले जगातील-पाकिस्तान, अमेरिका, युरोपसह-सर्वच देशात होत आहेत, म्हणून त्याला कसे तोंड द्यायचे ही गंभीर समस्या सर्वांपुढेच उभी आहे.
अतिरेक्यांनी उभे केलेले संकट धर्मातीत आहे व त्याचा मुकाबला सर्व भारतियांनी शिस्तीने व प्रशिक्षणाने करायला हवा.
मी शाळेत असताना "होमगार्ड" नावाची एक छान संस्था होती. माझ्या वडिलांचे अनेक मित्र त्यात होते. ती संस्था जातीधर्मनिरपेक्ष होती. ती जर अद्याप कार्यरत असेल तर ती हे काम करू शकेल व जर कार्यरत नसेल तर तिचे पुनरुज्जीवन का करू नये?
मुख्य मुद्दे शेवटी असे:

1. अतिरेक्यांच्या हल्ल्यांकडे पहाता आम भारतीय जनतेला असे प्रशिक्षण द्यायला हवे कीं नाहीं?
2. उत्तर "होय" असल्यास ते प्रशिक्षण कसे असावे? किती असावे? कुणी द्यावे? होमगार्ड, पोलीस, लष्कर? किती वर्षांचे? ऐच्छिक कीं सक्तीचे असावे?
3. आपल्यात शिस्तीचा जो अभाव आहे त्याबद्दल काय करावे?
या प्रतिसादाबरोबरच मी आता इथे थांबतो.
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Jan 2010 - 7:27 pm | डॉ.प्रसाद दाढे

अतिशय महत्वाचा असा धागा सुरू केल्याबद्दल काळेसाहेबांचे प्रथम अभिनंदन. ह्या धाग्यावर काही कंस्ट्रक्टिव्ह चर्चा आम्हां सर्वांना अपेक्षित आहे; न की रा.स्व. संघाचे मूल्यमापन. खूप विषयांतर झाले आहे ते एडिट करावे अशी विनंती. (बघा इथेही आपण कसलीच शिस्त दाखवू शकत नाही :)
काळेसाहेबांचे व त्यांच्या अनामिक मित्राचे मुद्दे निश्चितच मोलाचे आहेत. माझ्या मते ह्या शिस्तीची सुरूवात शाळा व कॉलेजपासूनच होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत व कॉलेजात एन.सी.सी युनिट्स स्थापन केली पाहिजेत. व प्रत्येक विद्यार्थ्याला त्यात सहभागी केले पाहिजे. दुर्दैवाने आज जुन्या शाळा सोडल्या तर पुष्कळ शाळांमध्ये व इंजिनियरिंग- मेडिकल कॉलेजात एन.सी.सी नाही. स्काऊटपेक्षा एन.सी.सी मला महत्वाची वाटते कारण ती थेट भारतीय लष्कराच्याच अधिपत्याखाली येते. तिथे तुम्हांला कडक अनुशासन, फिजिकल फिटनेस, शस्त्र प्रशिक्षण (एअर गन नाही तर प्रॉपर फायर आर्म- लाईट मशीनगन, ३०३, एस.एल.आर इ) घ्यावे लागते. शिवाय कॅम्पच्या निमित्ताने सर्व जाती व स्तरांमधील मुलांमध्ये मिसळून राहण्याची सवय होते. आयुष्यात संघर्ष व तडजोड म्हणजे नक्की काय चीज आहे ह्याची चुणूकही मिळते. लीडरशिप शिकायला मिळते.
मी स्वत: एन.सी.सी बेस्ट कॅडेट असून अचूक फायरिंग करून बक्षिसही मिळविले आहे.
दुर्दैवाने सध्या एन.सी.सी मध्ये सैन्याने आऊटडेटेड ठरवलेली शस्त्र शिकवितात त्याऐवजी अत्याधुनिक शस्त्रही हाताळायला दिली पाहिजेत. मार्शल आर्टसचाही अंतर्भाव व्हायला हवा.
मुळात भारतात शासनाचे फारसे क्रीडा प्रोत्साहन नाही; त्यामुळे खिलाडूवृत्तीचाही अभावच आहे. नेमबाजीच्या निमित्ताने तरी मुलांनी व तरूणांनी आधुनिक शस्त्रे हाताळली पाहिजेत, नियमित सराव केला पाहिजे. पालकांनीही प्रोत्साहन दिले पाहिजे, पोलिसांनीही पुढाकार घेऊन शस्त्र-परवाना प्रक्रिया सुलभ केली पाहिजे.
एका पत्रकाराने मुंबईतील अतिरेक्यांचे २६/११ ला फोटो काढले होते, तेव्हां त्याची प्रतिक्रिया अशी होती की कॅमेर्‍याच्या ऐवजी माझ्या हातात बंदूक असती तर किती बरे झाले असते? अर्थात नुसते शस्त्र असून उपयोग नाही, त्याचा नियमित सराव पाहिजे व मुळातच लढाऊ वृत्तीही पाहिजे; समोरच्या माणसाला गोळी घालणे इतके सोपे नाही, त्यासाठी किलींग इन्स्टिक्टचीही जरूरत आहे. इतके पराकोटीचे राष्ट्रप्रेम हवे की दातओठ खाऊन समोरच्या गनिमाला भुईसपाट करता आले पाहिजे.
ह्या विषयावर लिहिण्यासारखे आणखीही बरेच आहे, रादर लिहिन तितके कमीच आहे.

श्रावण मोडक's picture

13 Jan 2010 - 8:40 pm | श्रावण मोडक

हा लेख ठीक. पण तुमच्या त्या कामटे-देशमुख यांच्या पुस्तकाविषयीची लेखमालेची पूर्ती झाली आहे का? तुमच्या ट्रॅकरमध्ये दोनच लेख दिसताहेत. हे विचारण्याचे कारण येथेही एक प्रकारच्या एसओपीची चर्चा होताना दिसते आहे. चर्चा ठीक.

माझी त्या पुस्तकाची प्रत चुकून अमेरिकेला माझ्या मुलीकडेच राहिली, पण मी एक नवी प्रत एका मित्राकरवी मागविली होती ती कालच माझ्याकडे आली.
प्रश्न असा आहे कीं मी समारोपाचा उत्तरार्ध लिहावा कीं नाहीं!
कारण माझा मूळ उद्देश मिपावरील सभासादांना ते पुस्तक वाचायला प्रवृत्त करण्याचा होता जेणेकरून ते हे पुस्तक खरेदी करतील व वाचतील.
मला वाटते हा उद्देश सफल झाला आहे.
शेवटचे पर्व लिहिल्यास कदाचित् हे पुस्तक विकत घ्यायची उर्मीच उरणार नाहीं.
पण अजूनही विचार करतोय्.
रहाता राहिला प्रश्न SOP चा. प्रत्येक कृतीच्या बाबतीत SOP असतेच. कधी साधी-सोपी असते तर कधी अवघड, गुंगुंतागुंतीची व त्यामुळे अनेक उपविभागात विभगलेली असते. जितकी कृती अवघड तितकी SOP लिहिण्याची गरज जास्त व SOP गुंतागुंतीची!
पण प्रत्येक SOP च्या पुनरावलोकनाची/परिक्षणाची पद्धत सारखीच असते.
असो. विचार करतोय् तिसरा भाग लिहावा कीं नाहीं याचा.
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

श्रावण मोडक's picture

16 Jan 2010 - 11:42 pm | श्रावण मोडक

हे आधीच कळलं असतं तर बरं झालं असतं. आधीच्या लेखनात आणि चर्चेतील पवित्रा एसओपी आणि पोलीस फेल्युअर वगैरे जोरदार होता!
बाकी,

माझा मूळ उद्देश मिपावरील सभासादांना ते पुस्तक वाचायला प्रवृत्त करण्याचा होता जेणेकरून ते हे पुस्तक खरेदी करतील व वाचतील.
मला वाटते हा उद्देश सफल झाला आहे.
शेवटचे पर्व लिहिल्यास कदाचित् हे पुस्तक विकत घ्यायची उर्मीच उरणार नाहीं.

उद्देश सफल झाला असेल तर उर्मीची चिंता नको (उद्देशपूर्तीविषयी उगाच कोणीही सांख्यिकी वगैरे मागू नये. माझा तसा काही हेतू नाही, हा खुलासा मुद्दाम करतो आहे). एरवी, तुम्ही लिहिलेल्या पहिल्या दोन भागांनंतर पुस्तकाविषयीची 'उत्सुकता' प्रचंड वाढते हे खरं! पुस्तक असंच तर नाही ना की तिसरा भाग त्याविषयी भ्रमनिरास करणाराच लिहावा लागेल!! तसं असेल तर मात्र न लिहिण्याबद्दल धन्यवाद!!!

सुधीर काळे's picture

20 Jan 2010 - 10:34 pm | सुधीर काळे

तिसरा भाग भ्रमनिरास करणारा अजीबात नाहीं तर 'नितांत सुंदर' आहे. त्यात विनीताताईंनी RTI च्या सहाय्याने लपलेले सत्य कसे बाहेर काढले व त्यांची दिशाभूल करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी सत्य/अर्धसत्य/असत्य विधानांची भेसळ कशी केली याबद्दलचा भाग मी लिहिणार होतो. त्यासाठी वेगवेगळ्या पोलीस अधिकार्‍यांत झालेल्या रेडियोवरील संवादांचे (जे जागोजागी विखुरलेले आहेत) एका ठिकाणी संकलन करणे आवश्यक आहे व ते काम खूप मोठे आहे. ते मी करायला घेतलेही होते, पण मध्यंतरी मी पुण्याला गेलो जिथे माझ्याकडे इंटरनेट नव्हते. दरम्यान कांहीं अप्रिय घटनाही घडल्या (ज्याच्या परिणामतः प्रमोद देव संपादक झाले वगैरे) त्यामुळे तिसरा भाग लिहायचा मूडही गेला.
पण हाती घेतलेला प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे व त्या दृष्टीने तो लिहिणे हे माझे कर्तव्य आहे असेही मला वाटते, पण अजून मुहूर्त लागत नाहींय् हेच खरे.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

II विकास II's picture

14 Jan 2010 - 9:21 am | II विकास II

एक सुंदर लेख.
देशाबद्दल प्रेम, त्याग करण्याची वृत्ती, कठोर शिस्त ह्यात आपण कमी पडतो ही वस्तुस्थिती आहे.

ह्या धाग्याबरोबर हा ही धागा वाचला. तळेगावचे सतीश शेट्टी
आपण कुठे आहोत ह्याचे बोचरी जाणिव झाली.

डॉ.प्रसाद दाढे's picture

14 Jan 2010 - 4:53 pm | डॉ.प्रसाद दाढे

भारतीय पोलिसांना इस्त्रायल व श्रीलंकेत प्रशिक्षणासाठी पाठविले पाहिजे. अतिरेक्यांशी आणि देशाच्या शत्रूंशी कसे लढावे हे खरोखरीच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्याचबरोबर आपल्या गृहमंत्र्यांनी देखील जनरल सनथ फोन्सेकांची शिकवणी लावावी.

सुधीर काळे's picture

14 Jan 2010 - 6:16 pm | सुधीर काळे

सनथ फोन्सेकांची शिकवणी लावायची असेल तर लगेच पावले उचलली पाहिजेत! कारण येत्या निवडणुकीनंतर ते कदाचित् राष्ट्राध्यक्ष बनतील आणि मग त्यांना कुठला वेळ मिळायला?
पण इस्रायली पोलिसांकडे आपले पोलीस ट्रेनिंगसाठी पाठवायची कल्पना चांगली वाटते!
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

उडविण्यात येत आहे.त्याला पायबंद घालण्यासाठी संपादकानी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.

वेताळ

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jan 2010 - 12:06 pm | डॉ.प्रसाद दाढे

हा!हा! ही टिंगल परवडली हो वेतोबा, तिकडे पाक/ अफगाण अतिरेक्यांनी आत्तापर्यंत इतक्या वेळा भारतीय गुप्तहेरखाते आणि पोलिसांचे यथेच्छ वस्त्रहरण केलं त्याचा जाब कोणी कोणाला विचारायचा? मुंबईत २६/११ ला भल्याभल्यांच्या धोतरांची पितांबरे झाली (म्हणूनच बहुतेक आपले माननीय गृहमंत्री वारंवार कपडे बदलत असतील)
शांतताप्रिय व निमुटपणे (बेसुमार) कर भरणार्‍या प्रत्येक भारतीय नागरिकाची 'सामाजिक सुरक्षितता' ही सरकारकडून किमान अपेक्षा असते. प्रत्येक माणूस सदैव कमरेला तलवार, पायात जंबिया, पाठिवर तोफ आणि हातात ठिस ठिस करणारी पिस्तूले घेऊन फिरू शकत नाही. (इमॅजिन करा- आपले धमू आणि परा खांद्यावर रॉकेट लाऊंचर घेऊन सदाशिव पेठेत फिरत आहेत, तात्या तंबाखूचा बार भरण्याऐवजी कोलशेतवर हॉविट्झर तोफेत बार भरत आहेत, रामदास परकायाप्रवेशाने पाक मुलखात हेरगिरी करीत आहेत इ इ (प्रभूमास्तरांबद्दल तेव्हढं विचारू नका !)
दी वेन्स्डे मधील नसीरचा शेवटचा मोनोलॉग आठवा, खरंच आहे ते. हे सगळे उद्योग सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत म्हणूनच आम्ही एक सरकार चुनतो, की त्यांनी आम्हीं दिलेल्या कराच्या पैशातून एक संरक्षण व्यवस्था निर्माण करावी जिने आमचे स्थानिक वा परकिय समाजकंटकांपासून रक्षण करावे. पण जर ही सिस्टीम आम्हांला आमच्याच घरात येऊन मारणार्‍यांना रोखू शकत नसेल तर मात्र राजा रात्र वैर्‍याची आहे!
बर्‍याच वर्षांपूर्वी प.पू गगनगिरी महाराज स्पष्टपणे बोलले होते, "ह्यापुढच्या काळात एव्हढे अराजक माजेल की प्रत्येकाला आपले घर एक लढाऊ किल्ला बनवावा लागेल, सतत शस्त्रसज्ज राहावे लागेल.
हे तेव्हां जरा अतिशयोक्त वाटत होतं पण आता?
ज्यांनी कोणी मुंबईत २६/११ चा तो भयानक थरार अनुभवला आहे त्यातले जगलेवाचलेले अजूनही सुखाची झोप घेऊ शकत नाहीत. आपले नादान सरकार मात्र अजूनही आत्मपरिक्षण आणि आत्मशुद्धी करू शकत नाही. वीस वीस वर्षे मुंबईत विनाबदली ऐश करणारे ऐदी आणि एक नंबरचे भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी भेदरटासारखे लपून बसतात आणि करकरे- कामट्यांसारखे लाखमोलाचे मोहरे बळी पडतात, का तर ते निष्पाप निहत्त्या नागरिकांना वाचविण्यासाठी फडतूस दर्जाची चिलखते घालून जिवाची पर्वा न करता शत्रूवर तुटून पडतात! करकरेंचे चिलखत गायब केले जाते हे एक खूप मोठे षडयंत्र असले पाहिजे ज्यामध्ये अगदी सर्वोच्च पातळीवरचे अधिकारी आणि अर्थातच त्यांचे गॉडफादर असलेले राजकारणी सहभागी असणारच, हे न समजण्याइतके आम्हीं दूधखुळे नाही.
२६/११ प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पूर्णपणे नि:पक्ष व सत्यशोधक चौकशी पुन्हा होणे अत्यंत गरजेची आहे. त्यातून जे कोणी दोषी असतील त्यांचा कोणताही मुलाहिजा न बाळगता शासन केले पाहिजे.

विकास's picture

15 Jan 2010 - 7:57 pm | विकास

वरील सर्व मुद्दे मान्यच आहेत.

तिकडे पाक/ अफगाण अतिरेक्यांनी आत्तापर्यंत इतक्या वेळा भारतीय गुप्तहेरखाते आणि पोलिसांचे यथेच्छ वस्त्रहरण केलं त्याचा जाब कोणी कोणाला विचारायचा?

एका अर्थी असाच प्रकार अमेरिकेतही ९/११ नंतर किमान तीनचार वेळेस झाला. आता ओबामा आणि माध्यमे त्याला "सिस्टेमिक फेल्युअर" (व्यवस्थाच कोलमडली आहे) असे म्हणतात. कारण गुप्तहेर खात्याला अगदी कळले तरी पुढची कृती काहीच नाही, सरकारी अधिकार्‍यात संवाद नाही अशीच अवस्था. तरी देखील आजपर्यंत नशिबाने म्हणा/देवाच्या दयेने म्हणा कसेही म्हणा पण वास्तवात ते नशीब आणि देव हा सामान्य व्यक्तींच्या रुपातूनच आला आणि होणारे घातपाती प्रसंग रोखले गेले. त्यातील शू बाँबर आणि ख्रिसमस २००९ च्या वेळचा अंडरवेअर बाँबर हे जास्त प्रसिद्धीच्या झोतात आले.

थोडक्यात जे काही विपरीत टळले ते सामान्य माणसाच्या जलद कृतीने घडले. तसे आपल्याकडे घडायचे असेल तर काय होण्याची गरज आहे याचा विचार करायला हवा...

आज म.टा. मधील सतीश शेट्टींच्या हत्येवर लिहीलेल्या अग्रलेखाचे शिर्षक वाचले: अराजकाची नांदी... अगदी समर्पक शिर्षक आहे. पण दुर्दैवाने असे महाराष्ट्रात होत आहे - नव्हे वाढत आहे ह्याचे कारण निष्क्रीय सामान्य नागरीक. एकदिवस बंद आणि चौदा दिवस सुतक पाळले म्हणजे सगळे संपले का? संशयीत बिल्डर्सशी कुठलाही व्यवहार करणार नाही इतकी साधी अथवा तत्सम काहीतरी ठसा उमटवणारी गांधीगिरी करायची आपली तयारी राहील का? तशी तयारी राहणार नसेल तर पाकला अतिरेकी तयार करून स्वतःची माणसे मारायची गरज नाही. आमचे आम्ही समर्थ आहोत असेच वाटेल...
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

बरोबर!
सामान्य माणसाला 'कांहींसा असामान्य' (कमीत कमी स्वसंरक्षणाच्या बाबतीत समर्थ) कसा करता येईल हाच हेतू होता माझ्या लेखाचा.
पण आपल्या सर्वांसारख्यातली ('सामान्यां'तली) पण त्यातल्या त्यात चांगली व कर्तबगार माणसे निवडणूक लढवत नाहीं, मतदार योग्य लोकांना निवडूनही आणत नाहीं एवढेच काय पण मतदानही करत नाहीं हीच आपल्याच नव्हे तर सर्वच लोकशाहींची शोकांतिका आहे. आज इटलीसारख्या देशात बर्लुस्कोनीच्या रूपाने हीच शोकांतिका दिसतेय्!
शेवटी आपल्याला आपल्या लायकीचे सरकार (a government we deserve) मिळते हेच खरे!
<<देव हा सामान्य व्यक्तींच्या रुपातूनच आला>>
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

II विकास II's picture

16 Jan 2010 - 8:52 am | II विकास II

>>पण आपल्या सर्वांसारख्यातली ('सामान्यां'तली) पण त्यातल्या त्यात चांगली व कर्तबगार माणसे निवडणूक लढवत नाहीं,

कदाचित पुण्यात निवडणुक लढवणारे अरुण भाटीया यांचे उदाहरण केस स्ट्डी ठरावे.

सुधीर काळे's picture

16 Jan 2010 - 11:03 am | सुधीर काळे

जरासं 'अवांतर' होतंय् व मराठी-अमराठी वादात पडायची वा पाडायचीही इच्छा नाहींय्, पण श्री. अरुण भाटिया या अमराठी गृहस्थापेक्षा मला तितकाच चांगला व कर्तबगार एकादा मराठी उमेदवार जास्त आवडेल. एक धर्माधिकारी नावाचे गृहस्थही उभे होते असं आठवतंय्, ते मला जास्त भावतील!
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

II विकास II's picture

16 Jan 2010 - 2:44 pm | II विकास II

ते अविनाश धर्माधिकारी होते.

सुधीर काळे's picture

16 Jan 2010 - 8:54 pm | सुधीर काळे

होय. मला पूर्ण नांव आठवत नव्हते, पण अविनाश धर्माधिकारीच म्हणायचे होत मला!
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

शाहरुख's picture

19 Jan 2010 - 9:48 am | शाहरुख

अविनाश धर्माधिकार्‍यांचे नाव इथे आल्याने त्यांच्या "दहशतवाद आणि नागरिकांची भुमिका" या विषयावरील व्याख्यानाची आणि त्यांनी हाती घेतलेल्या नागरिक चळवळीची आठवण आली.

सुमारे २ तासाचे व्याख्यान सर्वांनी निश्चितच ऐकण्यासारखे आहे..पण मला जसा मोकळा वेळ मिळतो तसा आपल्याला मिळत नसेल तर निदान भाग ९, १०, ११ तरी ऐकावेत..त्यातून त्यांच्या नागरिक चळवळीची माहिती मिळेल.

चळवळीच्या सद्यस्थितीबद्दल कुणाला माहिती आहे का ?

II विकास II's picture

19 Jan 2010 - 11:25 am | II विकास II

दुव्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद

>>चळवळीच्या सद्यस्थितीबद्दल कुणाला माहिती आहे का ?
+१

II विकास II's picture

15 Jan 2010 - 9:00 pm | II विकास II

एकदिवस बंद आणि चौदा दिवस सुतक पाळले म्हणजे सगळे संपले का? संशयीत बिल्डर्सशी कुठलाही व्यवहार करणार नाही इतकी साधी अथवा तत्सम काहीतरी ठसा उमटवणारी गांधीगिरी करायची आपली तयारी राहील का?

सर्वसामन्याचा परस्परावरील अविश्वास, गांधीगिरीतुन/बहीष्कारातुन झालेले नुकसान सोसण्याची तयारी नसणे, कळते आहे पण त्याची किंमत मोजायची तयारी नसणे अशी काही कारणे आहेत.

II विकास II's picture

15 Jan 2010 - 9:01 pm | II विकास II

एकदिवस बंद आणि चौदा दिवस सुतक पाळले म्हणजे सगळे संपले का? संशयीत बिल्डर्सशी कुठलाही व्यवहार करणार नाही इतकी साधी अथवा तत्सम काहीतरी ठसा उमटवणारी गांधीगिरी करायची आपली तयारी राहील का?

सर्वसामन्याचा परस्परावरील अविश्वास, गांधीगिरीतुन/बहीष्कारातुन झालेले नुकसान सोसण्याची तयारी नसणे, कळते आहे पण त्याची किंमत मोजायची तयारी नसणे अशी काही कारणे आहेत.

मुळ लेख आवड्ला.. पुर्ण पटला असे नाहि. पण का पटला नाहि यासंबंधी वरील प्रतिक्रीयांमधे मुद्दे आले आहे.
समारोपाच्या प्रश्नांवर मत द्यायच तर... अश्या 'एकाच' प्रकारचे म्हणजे सैनिकी प्रशिक्षण सक्तीचे असु नये मात्र विविध प्रकारच्या प्रशिक्षणांच्या ऑप्शन देऊन त्यातील एक सक्तीचे करु शकतो. जसे सैनिकी / सामाजिक / निसर्गसंरक्षण / आदीवासी जमातींचा अभ्यास / आडगावात शिक्षक वगैरे.. शिवाय या कार्याचा सक्तीचा अवधी कमीत कमी २ वर्षे हवा व पोस्टींग सक्तीने लोकसंख्या १०००० पेक्षा कमी असणार्‍या भारतातील गावात/शहरात असावे. (आणि हे केल्याशिवाय पदवीचे सर्टीफिकेट मिळणार नाहि :) )
असा अनुभव घेतल्यावर जे युवक/नागरीक बाहेर येतील ते आपल्या देशाला ओळखणारे जबाबदार / सुजाण नागरीक असतील असे म्हणण्यास जास्त वाव आहे.

--ऋषिकेश

जरी माझ्या लेखाचा रो़ख स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाबाबत असला, तरी कुठलेही प्रशिक्षण कां होईना, पण अंगी शिस्त बाणवायला दोन वर्षें प्रत्येक भारतीय नागरिकाने देशाला द्यावीत असे मला वाटते!
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"

सायबा's picture

16 Jan 2010 - 10:02 pm | सायबा

सुधीरभाऊ,
तुम्ही पोटतिडिकेने लिहिलेला लेख खूप आवडला. घरीही सर्वांना आवडला.
असेच लिहीत जा. मला वाचायला आवडते तुमचे लेखन.
धन्यवाद
सायबा

सुधीर काळे's picture

19 Jan 2010 - 10:45 am | सुधीर काळे

वाSSSव! मी धर्माधिकारींबद्दल खूप ऐकलं होतं, पण कधी त्यांचं व्याख्यान ऐकायची संधी मिळाली नव्हती! सध्या ऑफिसमध्ये आहे. नंतर घरी जाऊन नक्की ऐकेन.
दुवा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
------------------------
सुधीर काळे
(जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")

सुरेख व्याख्यान. आज चार भाग ऐकले! शाहरुखसाहेबांचे पुन्हा एकदा आभार!
------------------------
सुधीर काळे (जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया")

शाहरुख-जी,
आज उरलेले ७ भाग (५, ६, ७, ८, ९, १० आणि ११) पाहिले व खूप प्रभावित झालो.
"दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सामान्य माणसाला प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे" व "पॅनिक न होता पट्कन काय केलं पाहिजे" याचंही प्रशिक्षण द्यायला हवं ही धर्माधिकारींनी माडलेली मतं माझ्या मतांशी मिळती-जुळतीच आहेत. जेंव्हा नि:शस्त्र शुरिंगाने नॉर्वेजियन माणसाला नेस्तनाबूत केले त्याबद्दल वाचूल्यावर मलाही हेच विचार (स्वतंत्रपणे) सुचले.
कां कुणास ठाऊक, पण असं संतुलित काम करायची संवय आम्हा भारतियांना अद्याप लागलेली नाहीं हे मात्र खरे!
"मी निर्भय आहे" हा निरोपही फारच योग्य आहे. ज्यू समाजाने हाच भयगंड आपल्या मनातून काढून टाकला व एक निर्भय राष्ट्र (इस्रायल) उभे केले.
एकंदर हे भाषण मला फारच आवडले व ते ऐकून मी खूपच प्रभावित झालो हे मात्र खरं. १६ डिसेंबरनंतर तर त्यांची संघटना प्रत्यक्ष 'प्रशिक्षण' देण्याची मोहीम सुरू करणार आहे तीही कायद्याच्या चौकटीतून हेही भारतात नवीनच, नाहीं कां?
'मिपा'वर कुणाला अविनाश धर्माधिकारींचा फोन नं किंवा ई-मेल आयडी माहीत असेल तर मला कळवण्याची कृपा करावी.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया