राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे.
भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती.
राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी?
बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते .
दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही)
आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला.
मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले.
भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले.
मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.


हम्म
सहमत.ईतके 'समाजकार्य' करुनही ह्या लोकाना 'अल्पसंख्यांकांचे लांगुलचलन' करणारे हरवु शकतात म्हणजे आशर्च्य आहे.
जामात ए अमित
आमचे बेन्ग्ळूर
व्वा....चांग
व्वा....
चांगला वैचारिक (?) लेख.
"हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे."
हे मात्र सर्वात विनोदी वाक्य.
झोपलेल्यालाच उठवता येईल, झोपेचे सोंग घेणा-याला कसे काय उठवणार?
सबब ह्या लेखावर जास्त प्रतिक्रिया देउ इच्छित नाही.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
सहमत! स्पष्
सहमत!
स्पष्टच बोलायचे तर हे वाचुन हसावे की रडावे तेच कळत नाहीय!
असो, ज्याची त्याची मते!
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
१०० वा
१०० वा प्रतिसाद !
धाग्याचा खफ झालेला असुन संपादक मात्र डाराडुर झोपा काढत आहेत. असो !
नशीब असते एकेका लेखकाचे.. आमचे साले नशीबच गांडु.. !
दिसला धागा की खचाक करुन उडवला जातो.. असो.
चालु द्या !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
नावाचा महीमा..
१०० वा प्रतिसाद !
अहो "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" असे म्हणले की हळू हळू विस्तारच होणार! याला म्हणतात नामाचा महीमा!
तुम्हाला पण असे हवे असेल तर एखादा संघावर/हिंदूत्वावर टिकात्मक लेख टाकून बघा. अभ्यासाची अथवा माहीतीची काही गरज नाही. वास्तवाला धरून नसले तर अधिक उत्तम... टंकायला सुरवात करायची आणि झोडपून काढायचे
बघा कसे दणादण प्रतिसाद मिळतात ते - बाजूने, विरुद्ध वगैरे. आपण तर खुद्द अवलिया, त्यामुळे याहून अधिक सांगायची काय गरज? 
नमस्ते सदा
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
दिवाळखोरी...
वरील लेख हा वैचारिक दिवाळखोरी दाखवतो असेच मी म्हणेन. लेख वाचायला सुरूवात केल्यावर सविस्तर उत्तर द्यावे असा विचार होता. मात्र जस जसा लेख वाचत गेलो तेव्हा ह्या सामान्य नागरिकाचे ( नागरिक एकवचनी म्हणून एकेरी उल्लेख , लेखकाचा नाही.) असामान्य जावाईशोध आणि आधीच ठरवलेले मत काही घटनांचा संदर्भ देऊ चिकटवण्याची घाई पाहिली आणि ह्या लगबगीची चिड येण्या ऐवजी किव आली.
भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
ह्या वाक्यावर तर ठार उडालोच. धम्या इस्टाईलने म्हणायचे झाल्यास फुटलो.... धन्य धन्य !
ज्यांना संघ काय? संघाची रचना काय? आदींची प्राथमिक जरी माहिती असेल त्यांना सुध्दा वरील वाक्यातील विनोदाने हसू येईल. अशी वाक्ये हिंदीभाषी न्यूज चॅनेलमध्ये शोभून दिसतात हो ! कोट बदलला आणि आवाजाची पट्टी बदलली की त्या निवेदकांना जगातील कुठल्याही विषयावर बोलण्याचा अधिकार मिळतो. तुमचा तसा काही ग्रह झालाय का?
असो... लेखकाला आपलं मत मांडायला अधीक भरपुर वाव आहे. माझं मत एवढंच की पुर्वग्रहदूषीत मत मांडतांना उगाच संघाचा आणि परिवारातील संघटनांचा आणि सोबतच गेल्या ६० वर्षांचा अभ्यास असल्याचा आव कशाला आणता?
वर अभिज्ञ ने म्हटल्या प्रमाणे झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार?
- नीलकांत
एका
एका सामान्यनागरीकाने ही मते व्यक्त केली आहेत.
त्या नागरीकाला संघ नक्की काय कार्य करतो ते ठाऊक व्हावे ही अपेक्षा आहे. त्या नागरीकाची मते जशीच्यातशी दिली आहेत.
संघाची भूमिका स्पष्ट करु शकत असाल तर बरे होईल अशी त्या नागरीकाची अपेक्षा आहे.
त्या नागरीकाची मते ही वैचारीक दिवाळखोरी असू शकेल पण त्याबद्दल आपण त्याला नीट महिती सांगु शकतो.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
माफ करा
माफ करा मात्र ही एका सामान्य नागरीकाची मते नाहीतच. सामान्य नागरीक हे बिरूद येथे केवळ आपली तटस्थता जाणवावी म्हणून घेतलेलं आहे.
लेखाच्या सुरूवातीच्या परिच्छेदात जसे संदर्भ दिलेले आहेत त्यावरून संघाच्या समग्र वाटचालीचा अभ्यास (?) करून केलेले विधानं दिसतात.
संघसंबंधीत काही घटनांचा अभ्यास करून मग संघात कसा संभ्रम आहे आदींचे विश्लेशन करणार्या व्यक्तीला जेव्हा हे लक्षात येतं की हे फारच एककल्ली होतंय तेव्हा "ही सामान्य मानसाची मते आहेत" अशी झुल पांघरली की झालं. फारच सोईची वाक्ये आहेत ना?
संघाबाबत येथे आणि इतरत्र आधीच अनेक लोकांनी खुप उत्तम लिहून ठेवलं आहे. सामान्य मानसाने केवळ शीर्षक लिहून गुगललं असतं तरी सर्व संभ्रम (?) दूर झाले असते.
त्याच विषयावर नव्याने चर्चा करायला हरकत नाही. पण काही तर नवीन मुद्दे हवेत ना?
- नीलकांत
तटस्थता
तटस्थता वगैरे नाही. लिखाण एकांगी असु शकेल पण जे मुद्दे मला भेटलेल्या त्या इसमाने मांडले त्याचे मुद्देसूद उत्तर मला देता आले नाही हे खरे.
निदान इथे त्यांची उत्तरे मिळतील म्हणून ते जसे च्या तसे लिहिले जो बोलला तो कदाचित सेवादलाचा कार्यकर्ताही असू शकेल
:)
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
ही वाक्ये वाचली की मनोरंजन होतं आणि शेवटी एवढ्या संख्येने सामान्य लोक संघाचं चांगलं व्हावं असं म्हणत आहेत तर संघाची काळजी करण्यासारखं काही नाही असं सुध्दा वाटतं.
खरं तर संघासाठी आयुष्य अर्पण करनार्या लोकांपेक्षा ज्यांना संघाच्या राजकीय क्षमतेशिवाय कसलीच माहिती नाही त्या लोकांना संघाची काळजी जास्त वाटायला लागली आहे. आधीच्या उठसुठ संघाला शिव्या देऊन आपलं सेक्युलॅरिझम सिध्दं करणारे आता संघाच्या भविष्याबाबत काळजी व्यक्त करण्याचा नवा पायंडा घालू पाहताहेत की काय?
- (आनंदीत) नीलकांत
प्रतिक्रिया राखुन ठेवतो आहे ...
बरेच काही नवे वाचायला मिळाले.
लेख पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो.
तुर्तास ही पोच समजावी ..
विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ...
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
मागे
मागे विनायक पाचलग ह्यांनी ह्याच नावाने चालु केलेला काथ्याकुट आठवला आणी त्याच जोडीने पाचलगांना ९९% प्रतिसादातुन मिळालेला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" असा मिळालेला सल्ला आठवला.
चालायचेच, इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते...
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
हीहीही ...
हीहीही ... कंपूतले म्हटल्यावर लिहावं लागतं म्हणून ... नाहीतर प्रतिसाद देणारच नव्हते ...
अदिती
अदिती
हो ना...
मला पण...
आणि हो, "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही" हा सल्ला त्यांना खूपच उपयोगी ठरला म्हणे.
बिपिन कार्यकर्ते
बिपिन कार्यकर्ते
पाचलगचा
पाचलगचा धागा पाहिला. तो धागा संघाची स्तुती करणारा होता. असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्याला "अजुन लहान आहेस, भरपुर अभ्यास कर आणी मग लिही"असे सांगणे जरुरी होते.
त्यामुळे अश्या प्रतिक्रिया आल्यास ते योग्यच आहे.
पाचलग जसजसा मोठा होत जाई/ भरपूर वाचन करेल तसतसे त्याचे विचार बदलतील अशी आशा करुया.
>>>असल्या
>>>असल्या अतिरेकी संघटनेची भलवाण करणार्याला
बरं बरं... खान साहेब... समजला तुमचा अभ्यास
खान साहेब?
खान साहेब?
पहा धर्मांध विचारसरणीचा परीणाम. राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल.
>>धर्मांध
>>धर्मांध विचारसरणीचा परीणाम
=))
बरं बरं !
>>राजेंनी लगेच मला मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु इ.इ. ठरवुन टाकले असेल.
टोमणा कळाला नसावा.. त्यामुळे होतं असे कधी कधी... चालू दे !
>>मुसलमान पर्यायाने देशाचा शत्रु
=))
च्यामायला तुम्ही संघामधे असलेल्या एका विशीष्ठ धर्माशी संबधीत लोकाच्यावर लिहले तर तुम्ही .. काय म्हणात तुमच्या भाषेत... सेकुलर... च्यामायला आम्ही नुस्तं खान म्हणालो की धर्मांधं :?
लै भारी... !
जरा चष्मा काढा... नाही तर... दवाची मात्रा वाढवा मात्र साहेब
टोमणा
टोमणा व्यवस्थित कळला. आणि बरोबर उत्तर दिले आहे. तुम्ही हसुन लोळणाररी चित्रे टाकून त्याकडे दुर्लक्ष केलेत. हरकत नाही.
पाचलग
पाचलग साहेबानी आधी सन्घावर चिखल्फेक सुरु केली होती... आधी मोठा हो बाळा, असा घाऊक सल्ला मिळाल्यावर मग त्यानी नमस्ते सदा वत्सले सन्घभूमे सुरु केलं होतं............
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
नक्की
संघवाले नक्की काय करतात ह्यावर कोणी संघवाला प्रकाश टाकु शकेल काय? पुर्वी मैदानात खाकी चड्डी(वैचारिकच असणार बहुतेक!) घालून हे लोक कवायत करताना दिसायचे.सध्या ते दिसत नाहीत्.त्यांचे सामाजिक कार्य पण आहे असे ऐकून आहे पण काहीच माहिती नाही.समाजात अफवा पसरवण्यात ही मंडळी उस्ताद आहेत असेही ऐकून आहे.क्रुपया माहितगारांनी प्रकाश टाकावा.
अमित
आमचे बेन्ग्ळूर
दळभद्री विचारातून आलेला धागा..
असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे.
ज्यांचा पक्ष भारतात जवळपास ६०-६२ ( मधली काही भाजपा आणि जनता सरकारची वर्षे सोडून) वर्षे सरकार स्थापून आहे ( पक्षी : काँग्रेस पक्ष ) त्यांनी देशाला पुरते नागवले. "अजूनही पोटापाण्याचे प्रश्न नीटपणे सुटत नसलेल्या लोकांचा देश " अशी अवस्था ज्यांनी केली त्यांच्या बद्द्ल कोणी काही लिहित नाही. पण कुणाचे, कधीही, कुठल्याही प्रकारचे नुकसान केले नाही आणि करणार देखील नाही अश्या संघासारख्या संघटनेने जरा राजकारणात- अलिप्त किंवा सक्रीय काय असेल ते राहून - जरा डोके वर काढले कि बोंब मारायला सुरवात.
खरोखरी, आपल्या अंतर्मनात जावून संघाच्या सुरवातीपासूनच्या वाटचालीचा त्रयस्थपणे आढावा घ्या आणि संघाने देशाचे, देशवासियांचे काही नुकसान केले आहे कां, ते पहा आणि मग विचार मांडा.
नाना बेरके
काम इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते
मी संध्याकाळी खातो, तू मला फेकीली शिते
असे विचार
असे विचार कोणाचे कां असेनात, पण ते दळभद्री आहेत हे मात्र खरे.
हे अतीअवांतर वैयक्तीक मत झाले.
साधन्शुचितेबाबत चोखंदळ ,परखड असणारे लोक जेंव्हा वेगळे वागु लागतात तेंव्हा खटकते.
याअ लेखात संघाबद्दल कोणतीच टीका केलेली नाही. फक्त बदलत्या राजकीय /आर्थीक्/जागतीक संदर्भात संघाची ध्येयधोरणे कशा प्रकारे आखली/बदलली/टिकवली आहेत. आणि ती नक्की काय आहेत हे विचारले आहे.
कावीळ झालेल्याना म्हणे जग फक्त पिवळेच दिसते तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या बद्दल कोणी काही विचारले की त्याना थेट दळभद्री विचारांचे म्हणवले जाते.कोणतिही चिकित्सा नाकारायची आणि स्वप्रेमात मग्न व्हायचे या वृत्तीला नार्सीसस असे म्हंटले जाते.
त्यामुळे कोणतीच प्रगती सुधारणा मात्र होत नाही.
असो.........
पवित्र डबक्यातले पाणी ......... त्यात शेवाळ आणि आणखी कायकाय साठून वास मारत असला तरी त्याबद्दल विचारायचे नसते......
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
संघ ही एक
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.
खरंच?
खरंच?
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
विजुभौ, रास्वस बद्दल काय लिहिणे अपेक्षीत आहे ?
संघाची बाजू घेऊन लिहावे की विरोधात लिहावे, हे ठरविता येईना. स्टार खेळाडु कोणत्या बाजूने उतरतात ते पाहून रणनिती ठरवेन. तो पर्यंत ही केवळ पोच.
-दिलीप बिरुटे
(दक्ष)
व्वा !!
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.
काय बोलणार?? आलाय हातात कळफलक, टंका हवा ते आणि करा प्रकाशीत. चालु द्या.
सुजय
मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?
ह्म्म ..
ह्म्म .. लेखाबद्दल बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाही.
संघाबद्दलची वाईट मते प्रतिसादांतून वाचूनही वाईट वाटले.
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?
-- लिखाळ.
-
आज आभाळ अंशतः ढगाळ राहील आणि तीव्र ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील किंवा पडणार नाहीत. किंवा कसेही
अतिशय
अतिशय एकांगी लेख आहे.
संघाबद्दल काही जास्ती माहिती नसली तरी जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे...
बाकी चालूद्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
दुसरी बाजू
लेख एकांगी आहे असं गृहित धरलं तरी मग ह्याची दुसरी बाजू वाचायला आवडेल. 'संघ म्हणजे नक्की काय', 'संघ नक्की काय करतो', 'संघाने केलेली काही ठळक विधायक कामे', 'संघात गेल्याचे काय व्यक्तिगत फायदे / तोटे आहेत' अशा स्वरूपाची माहिती संघाच्या जाणकारांनी दिली तर खर्या अर्थाने चांगली चर्चा होईल अन्यथा बहुतांश प्रतिसाद भरकटताना दिसतील.
---------
अवांतरः मी स्वतः शाळेत असताना काही वर्षं संघात जायचो. 'संघात जाऊन संस्कारांच्या दृष्टीने नक्की काय मिळवलं / गमावलं ते आठवायचा प्रयत्न करतोय.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
मीही...
लहानपणी मी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो.
एकूणात शिस्त, वेळेचे महत्त्व, लोकसंग्रह इत्यादी शिकलो. आमच्या शाखेत धार्मिक शिक्षण नव्हते. देशप्रेमावर व्याख्याने व्हायची. गुरू-शिष्य नात्यावरही बौद्धीकं व्हायची. ह्याचा बर्यापैकी फायदा पुढील आयुष्यात झाला.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
लहानपणी मी
मग मोठे झाल्यावर ते बंद करावेसे का वाटले तेही कृपया लिहा.
माझ्यामते
माझ्यामते लहानपणी असलेली एखादी चांगली सवय मोठेपणी बंद पडली म्हणजे ती आपण त्याज्य ठरवली किंवा टाळली असे नाही होत. मोठेपणी संसाराचे व्याप वाढले की आपोआप बाकी सगळे कमी होत जाते, पण त्याचा अर्थ जुने सगळे त्याज्य ठरवले आहे किंवा सोडले आहे असा होत नाही.
कॉलेजमध्ये असताना मी ही संघात जायचो, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे कार्य करायचो, जे आता इतर व्यापामुळे नाही जमत. पण याचा अर्थ आज मला स्वामी विवेकानंदांची किंवा कै. हेडगेवारांची , कै. गोळवलकर गुरुजींची मते पटत नाहीत असा नाही होत. माझ्या दुर्दैवाने त्या कार्याला मी तेवढा वेळ देवु शकत नाही एवढाच याचा अर्थ होतो.
काय पेठकरकाका? चुकत असेन तर सांगा.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
मला उत्तर
मला उत्तर पेठकरांकडून हवे होते. त्यांनी दिले नाही, त्यातच सगळे आले. तुमचा प्रतिसाद तुमच्या ख्यातीप्रमाणेच आहे..असो..
आणि
आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझी ख्याती काय आहे ते पण सांगा ना राव! मला पण कळु दे मी ख्यातनाम आहे की कुख्यात?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रामाणिक उत्तर...
श्री. निमित्त मात्र,
लहानपणी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो म्हणजे त्यांच्या कुठल्या आदर्शांनी प्रेरित होऊन जात होतो अशातला भाग नाही. मला स्वयंसेवकांचा गणवेश, ते खेळ, तो दंड आणि ती एकसुरात गाईलेली प्रार्थना आवडायची. त्यामुळे मी शाखेत जाऊ लागलो. पुढे त्यात रस वाढू लागला. पण दुर्दैवाने, शाखेच्या मैदानावर एका इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि शाखा एका दूरच्या मैदानावर भरू लागली. तिथेही मी सुरूवातीला जात होतो. पण ते मैदान मला लांब पडायचे. त्याकाळातच आमच्या गल्लीत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा सुरू झाली . तिथे मला वाचनाची आवड लागली. आमच्या गल्लीतच एका सेवाभावी डॉक्टरांनी एक मोफत वाचनालय सुरू केले होते. तिथेही मी जायचो. वाचनाच्या आवडीतून माझी 'पुलं'च्या साहित्याशी ओळख झाली तसेच काही प्रवासवर्णने , वासू मेहेंदळ्यांचे 'विचित्र विश्व', कुमार, नवनीत, विज्ञानयुग अशी काही नियतकालिके वाचावयास मिळाली. मधुनमधुन वेळ मिळाला आणि मनात आलं की मी शाखेवर चक्कर टाकायचो. पण वाचन, माफक प्रमाणात टेबलटेनिस, बॅडमिन्टन आणि काही तारूण्यसुलभ आकर्षणांच्या प्राधान्य क्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मागे पडत गेला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मी काही फार प्रेमात होतो अशातला भाग नाही आणि त्यांचा मी कधी तिरस्कारही केला नाही. शाखेमुळे आयुष्यात जे माझे फायदे झाले त्याचे श्रेय मी त्यांना का नाकारू? ते मी त्यांना देतो आणि कायम देत राहीन.
मला वाटते पुरेसे सविस्तर उत्तर मी दिले आहे. आपली जिज्ञासा शमली असेल असे मी मानतो.
धन्यवाद.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
मला वाटते कीं विजूभाऊंनी हा लेख पुन्हा लिहावा
खरं सांगायचं तर विजूभाऊना खूप सांगायचं/लिहायचं होतें पण जसजसा तो लेख मोठा होत गेला तसतसा त्यांना बहुदा अस्वस्थ वाटू लागलं असावं व त्यांनी तो घाईघाईने आटोपता घेतला. त्यामुळे या लेखाद्वारे त्यांना काय म्हणायचे आहे तेच समजत नाहीं. भरपूर 'डाटा' दिलाय, पण निष्कर्ष काढायचा राहून गेलाय असे मला वाटले.
माझा त्यांना सल्ला आहे कीं त्यानी हा लेख स्वतःच एकदा नीट वाचावा व पुन्हा लिहावा. नक्कीच मस्त होईल. बघा पटते का.
एक अशाच विषयांवरचा लेखक या नात्याने मी या चक्रव्युहात कधी-कधी सापडलो आहे. अशा वेळी एकाद्या मित्राला सल्ला विचारावा. मी असे खूपदा करतो.
गैरसमज नसावा ही कळकळीची विनंती.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
सुधीर काळे: सर्व चिनी वस्तूंवर वैयक्तिकरीत्या बहिष्कार घाला!
माझा प्रतिसाद का उडवला?
संघाचे वास्तविक स्वरुप सांगणारा माझा प्रतिसाद का उडवला कळेल का? मी मिपाच्या संचालक, संपादक किंवा सदस्यांसह कोणावरही काही वैयक्तिक आरोप केले नव्हते. कोणत्याही जातीवर-धर्मावर टीका केली नव्हती तरीही हा प्रकार संतापजनक आहे.
वर उदाहरणार्थ नाना बेरके यांचा दळभद्री विचार वगैरे शब्द असलेला प्रतिसाद मात्र तसाच आहे.
काल मी म्हटले होते की ब्राम्हण विरोधी काहीही लिहिले की ते ताबडतोब संपादित होते त्याचा पुरावा एका संपादकाला हवा होता. जर त्या संपादकानेच माझा प्रतिसाद उडवला नसेल तर त्याला पुरावा मिळाला असे मानण्यास प्रत्यवाय नसावा.
असे खरंच
असे खरंच झाले असेल तर ते चुकिचे आहे. विचारांची मुस्कटदाबी होते आहे. शक्य असल्यास सदर संपादकांने खुलासा केल्यास गैर समज होणार नाहीत.
मिपावर
मिपावर नवीन(पक्षी: हल्लीच जास्त कार्यरत झालेले) दिसता.. मागे मिपा मुखपृष्ठावर कोल्हापुरी चपलांचे चित्र होते. असो.
वरील लेख प्रतिक्रिया देण्यायोग्य वाटला नाही म्हणून प्रतिसादाला अवांतर प्रतिसाद देत आहे.
चांदणी भयामुळे इथे जास्त काही लिहीत नाही.
पुण्याचे पेशवे
हा मोनॅकोपॉवर्ड प्रतिसाद आहे.
Since 1984
पुण्याचे पेशवे
|| हल्ली आम्ही संवेदणशील 'वाचण' बंद केले आहे ||
मिपावर
मिपावर नविन असणे, हल्लीच कार्यरत असणे हा गुन्हा आहे का? मला दुसर्यांदा ह्यावरुन डिवचले जाते आहे म्हणून विचारले. कृपया तात्या किंवा संपादक ह्यांनी खुलासा करावा.
चप्पल घालून चालते व्हा म्हणून तुम्ही दिलेला सल्ला आवडला. आपल्या विचारांपेक्षा वेगळे विचार असणार्याच्या विचारांचा पराभा करण्याचा याहून सोपा मार्ग कोणता?
हा
हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी.
संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद.
प्रतिसाद मात्र
अदिती
कोणाचा
कोणाचा प्रतिसाद माझा की पेशव्यांचा? आधी पेशव्यांचा प्रतिसाद वाचा.
हा कसला पेशवा? हा तर चांदणीला घाबरणारा पळपुटा बाजीराव!! असले सवंग मलाही लिहिता आले असते. त्यावर तुमची ही प्रतिक्रिया योग्य ठरली असती.
# २
हा प्रतिसाद मूळ चर्चेशी पूर्ण अवांतर असून विनाकारण वैयक्तिक रोख ठेउन दिलेला आहे. संपादकांनी कृपया कारवाई करावी.
संदर्भः याच चर्चेवर सध्या पुढच्या पानावर बिल्ला क्र: २५८० यांनी दिलेला प्रतिसाद.
अदिती
अदिती
मी तक्रार
मी तक्रार केलेला जो प्रतिसाद दाखला म्हणून देत आहात तो आत दिसत नाही कारण मूळ प्रतिसादच साफ झाला आहे. तुम्ही तुमची जळ्जळ उगाळत राहा.मला हरकत नाही. इनो हवे असेल तर सांगा..
अदिती ओवीप
अदिती
ओवीपेक्षा ओवाच जास्त उपयोगी पडतो. संदर्भ "...गाळीव इतिहास" - पुलं
अवांतरः ग्लॅक्सोपण विदेशी कंपनीच आहे ना?
अदिती
घेउन टाका
घेउन टाका बघू पटकन आता..म्हणजे शांत झोप लागेल!
धाग्याचा खफ
आम्हा कष्टकरी माणसांना झोप लागण्यासाठी इनोची गरज नसते. इतर कोणाला हवं असेल तर परोपकार म्हणून दिलं, शिवाय ओव्याचा "देशी" मार्गही सुचवला.
असो.
अदिती
अदिती
झोप
झोप लागण्यासाठी नव्हे जळजळ कमी करण्यासाठी इनो घ्या म्हणालो.
१००
.
यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे?
यात आक्षेपार्ह काय आहे? खरे बोलणे हे?
अतिशय सुरेख व समतोल लेख. विजुभाऊंचे अभिनंदन करावेसे वाटते. बंद पडलेल्या मिपा संपादकीय या सदराला पुनरुज्जिवीत करण्यासाठी हा उत्तम लेख आहे.
संघ ही फॅसिस्ट विचारसरणीचीच संघटना आहे. घातपात करण्यासाठी, दंगली पसरवण्यासाठी त्यांना बजरंग दल, विहिंप, आक्रस्ताळी दुर्गा वाहिनी, त्याचबरोबर एकमेकांचा पायपोस नसलेल्या पतित पावन संघटना, वंदे मातरम संघटना अशा दहशतवादी संघटना लागतात. ही संघाचीच वेगवेगळी रुपे. पुराणात रावणाला जशी दहा तोंडे पण एकच शरीर आणि आत्मा होता तसाच हा दहा तोंडाचा एक राक्षस आहे. सिमी, तालिबान लष्कर ए कायदा आणि संघ यांच्या कार्यपद्धतीत फरक असला तरी विचारसरणीचे सूत्र मात्र एकच आहे. किंबहुना अधिक संभावित आणि चलाख असल्याने संघ तुलनेने धोकादायक आहे. सावरकरांनी केलेले दलितांसाठीचे कार्य, आंबेडकरांच्या चळवळी याच्याशीही संघाचा काहीही संबंध नाही. संघ प्रसिद्धीसाठी हपापलेला नाही असे म्हणत ठिकठिकाणच्या चर्चांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाचे पिलू सोडून स्वतःच स्वतःच्या टे-या बडवायच्या यातही संघ सराईत आहे. वास्तविक पाहता देशभरात निस्पृहतेने कार्य करणा-या अनेक संघटना आहेत. राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर अशी अक्षरश: आकाशाएवढे कर्तृत्व असणारी माणसे कोणताही राजकीय अजेंडा न घेता निरलसपणे कार्य करत होती, आहेत. त्यांच्याशी संघाची तुलना कशी करायची हा प्रश्नच पडतो.
संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत ही मराठी माणसे या जातीयवादी संघटनेच्या प्रमुखपदी विराजमान असल्याने आणि गांधींच्या खुनात संघिष्ठांचा हात असल्याने मराठी माणसांबाबत इतर देशवासीयांच्या मनात अप्रीती, अविश्वास आणि भीती निर्माण करण्यासाठीही संघच जबाबदार आहे.
अण्णा,
अण्णा, खणखणीत प्रतिसाद आहे. एकांगी विचार म्हणवणार्यांनी ह्याचा वैचारिक प्रतिवाद करावा.
वरील प्रतिसादात
वरील प्रतिसादात 'संघाची फारशी माहिती नाही पण जे लिहिले आहे ते नक्कीच चुकीचे आहे' छाप प्रतिक्रिया वाचून हसू आले'. हेही लिहिले होते. कदाचित त्यामुळे प्रतिसाद उडाला असावा.
राष्ट्र
राष्ट्र सेवा दलापासून वैयक्तिक पातळीवर अथक काम करणारे अवचट, दलवाई, बंग, बाबा आढाव, बावस्कर
संघाचे मुख्य कार्यालय नागपूर, महाराष्ट्र येथे आहे. गोळवलकर गुरुजींपासून ते करंदीकर, दाते, देवरस, भागवत
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
क्षणभर तर
क्षणभर तर मला सुमार साहेबांचे "लोकसत्तेचे" संपादकीयच वाचतोय असा भास झाला.
सर्वसामान्यांच्या नावावर खपवलेली वैचारिक दिवाळखोरी मात्र चांगलीच करमणूक करून गेली ह्यात काहि वाद नाहि.
पुढील लेखनास शुभेच्छा.
देव (मानत असा/नसा) तुम्हाला चांगले लेख लिहिण्याबद्दल सदबुध्दी देवो एवढीच इच्छा.
मुत्सद्दि.
अहो मग
अहो मग त्यातल्या मुद्द्यांचा वैचारिक प्रतिवाद करा ना. मलाही वाचायला आवडेल.
नुसतीच चीड चीड कशासाठी?
गादीवरुन
गादीवरुन डायरेक्ट संघ?
अतिशय एकांगी लेख. वैचारिक गोंधळ उडाला आहे लेखकाचा.
राष्ट्रीय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते.
संघाची मूळ भुमिका (संघटन आणि कार्यकर्ता निर्माण) बदलत असताना दिसत नाही. राष्ट्रासाठी आणि समाजासाठी काम करताना कालानुरूप बदल घडवण्याची लवचिकता नक्कीच संघाने दाखवलेली आहे. नाहीतर उद्या म्हणाल की आता इंटरनेट वापरतात, फोनवरून एसएमएस करतात वगैरे...संघातून प्रेरणा घेऊन जर कोणी कामे करत असले तर ती वेगळी संघटना असते आणि त्यात त्या संघटनेच्या उद्दीष्टांप्रमाणे त्या संस्थे संघटक भुमिका ठरवणार...
राजीव गांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
गांधीवादी समाजवाद हा इंदिरागांधींच्या अखेरच्या काळात आला होता. ते वाजपेयींचे विचार होते. त्यातून एक नक्की दिसते की संघाचे विचार काही असले (अथवा वाटले) तरी भाजपाने स्वतंत्र भुमिका घेतली होती. आणि अर्थातच त्या आधी म्हणजे बांग्लादेश मुक्तीयुद्धाच्या वेळेस इंदीरा गांधींची भुमिका पाहून तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांना त्यांना "दुर्गा" असे कौतुकाने म्हणत संघाचापाठींबा देण्यास कमी वाटले नव्हते.
पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
रामजन्मभूमीचा प्रश्न मंडलच्या आधी नवा नव्हता. तो आधीपासूनच होता, जरी मधल्या काळात निद्रीस्त झाला असला तरी. तो परत जागृत होण्याचे कारण हे शहाबानो प्रकरणात अल्पसंख्यांकाचे लांगुलचालन करत जी घटनादुरूस्ती करून सर्वोच्च न्यायालयाला देखील कमी पणा आणताना काही वाटले नव्हते, ते होते.
भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे.
उदाहरण दिल्यास समजेल की यात तथ्य किती आहे. ४२ च्या आंदोलनात करा अथवा मरा म्हणताना गांधीजींनी स्वत:ची भुमिका बदलली असे म्हणतात. वास्तवीक ती परिस्थितीनुरूप होती असे म्हणायला हवे. तीच कथा कदाचीत आपण उदाहरण दिल्यास स्पष्ट करता येईल. नाहीतर उगाच पोकळ वल्गना आहे.
संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो.
अहो गांधीटोपी घालणारी प्रत्येक व्यक्ती गांधीवादी असते का? (असते असे जरी कोणी म्हणाले तरी ते गांधीवाद किती पाळतात आणि "पुरूष" नाटकात दाखवल्याप्रमाणे आवाज उठवण्याऐवजी, तोंडात कोंबून बंद करायला किती लावतात हा अजूनच वेगळा प्रश्न आहे). विहिंप, बजरंगदल आदी संघटनांपैकी किमान काही (सगळ्याच असतील असे नाही) या संघाच्या सहकार्यातून तयार नक्कीच झाल्या. मात्र त्या स्वतंत्र संघटना आहेत. त्यात अनेक जण किंबहूना बहुतेक जणांनी कधी खाकीचड्डी घातली नाही की "नमस्ते सदा" म्हणले नाही. थोडक्यात जो शाखास्थानी आला नाही, ध्वजप्रणाम केला नाही तो स्वयंसेवक नाही आणि तशी संस्था म्हणजे संघ ही नाही...कायद्याने नाही असे नाही तर वैचारीक आणि आचारानेपण.
गांधीजी स्वतःला काँग्रेसचे चार आण्याचे सदस्य पण नाही असे म्हणायचे पण त्यांचा प्रभाव काँग्रेसवर होताच की. भाजपा जर चालू करण्यात स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला तर त्यात संघाच्या वैचारीक छटा दिसल्या तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले.
अजूनही मोदी लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. तसेच टाटा-अंबानीसकट त्यांच्या राज्यात आणि सरकारबरोबर धंदा करायला कोणालाही कमीपणा वाटत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे, गेली पाच+ वर्षे विरुद्ध सरकार केंद्रस्थानी असूनही मोदींच्या विरोधात अजून काहीच आरोपपत्र नाही. हा मुद्दा मांडायचे कारण मोदी बरोबर की चूक हे नसून जे विरोधकांकडूनही सिद्ध झालेले नाही ते होई पर्यंत हिटलर वगैरे म्हणणे अयोग्य वाटते. संजय गांधी जरी कट्टर शत्रू होता तरी मनेका गांधी या अनेक वर्षे भाजपात आहेत आणि मंत्रीही होत्या. तरी देखील राहून राहून एक वाटते की जेंव्हा आपण अजूनही त्याचे आई-बाप काढून मुलाची ओळख करावी का? कुठेतरी आपण घराणेशाहीत रमून जातो...
भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत.
संघाच्या बर्याच स्वयंसेवकांनी सत्तेची चव चाखली असेल पण जे स्वयंसेवक सतेत गेले त्यांना संघात काहीच दायीत्व राहीलेले नव्हते. संघाचे ध्येयधोरण म्हणाल तर एकच राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटन करणे आणि त्यासाठी कार्यकर्ता निर्माण करून तो राष्ट्रप्रवाहात सोडून देणे. त्यापासून ते कधीच ढळले नाहीत. आणि हा काय प्रकार आहे हे कधी त्याचा अनुभव जाउंदेत पण अभ्यास न केलेल्याला समजले नाही...
कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.
असे विधान सुषमा स्वराज यांनी केले होते. रा.स्व.संघ ही जन्मापासून केवळ "पुरूषांची" संघटना होती/आहे. त्यात सुषमा स्वराज नव्हत्या...
मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
बातम्या पाहील्यातर यात तथ्य नाही हे समजेल.... आत्ताच्या बातम्यात तर माजी सरसंघचालक काय म्हणाले हे वाचले नसेल तरच आश्चर्य...
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
याला काही आधार नसावा. कारण जर ध्येयधोरणे समजत नसतील तर स्वयंसेवक संघापासून फारकत घेतील. तशी ते घेताना दिसत नाहीत.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध नाही. संघ संघटना काय आहे हे मला सामान्य असून आणि (लहानपणी कधीपण न जाता) अभ्यास, निरीक्क्षण करून समजू शकते. ते जर इतरांना समजू शकले नाही तर एकतर आधीच डोक्यात काहीतरी आहे तसेच संघातील ज्या व्यक्तींशी संबंध आला त्या हे सांगायला कमी पडल्या असा अर्थ होऊ शकतो. "त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत" या वाक्यातून पुर्वीचे स्वयंसेवक प्रभावी होते असे आपल्याला म्हणायचे आहे असे दिसते. चांगले आहे... बाकी आत्ताची काळजी करू नये, अनेकजण प्रभावी आहेत. पण ते प्रसिद्धीसाठी काम करत नसल्याने एकतर माध्यमांमधे दिसत नाहीत आणि त्यांच्यावर टिका झाली तरी ते खचत नाहीत.
बाकी तेहलका मधील हा लेख काहीतरी सनसनाटी असेल असे वाटले पण त्यातून काहीच उलटसुलट ते लिहू शकलेले नाहीत असे वाटले...एक केवळ संघ भाजपाला झोडपतोय इतकेच काय ते. आता त्यातील किती खरे ठरते त्यावरून तेहलकाची वृत्तपत्रीय आचारसंहीता समजेल नाहीतर नसतेच सनसनाटी आणि कुणाच्या तरी बाजूने कुणाच्या तरी विरुद्ध ओरडणारे इतकेच काय ते...
जहाल आणि मादक
सध्या आम्ही जहाल आणि मादक पेयाचा आस्वाद घेतो आहोत. सर्वसामान्य नागरीकांच्या वैचारिक दिवाळखोरीकडे नंतर वळू.
बाकी सगळ्यांचे प्रतिसाद त्यांच्या त्यांच्या ख्यातीनुसारच आहेत. (एक्सेप्ट फॉर वनः नीलकांतचा नेहमीचा सौम्यपणा कुठे गेला?)
-- मिसळभोक्ता
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
बाकी
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे
असो..जोक्स अपार्ट, विकासने आण्णा चिंबोरींच्या प्रतिसादाचाही प्रतिवाद करावा अशी विनंती. तो पर्यंत त्याचा वरील प्रतिसाद नीट वाचून घेतो.
म्हणूनच
विकासचे प्रतिसाद मी वाचत नाही. एक तर चार ओळी पेक्षा मोठे प्रतिसाद मी वाचतच नाही. (कुणी लिहिला आहे ते बघून फक्त +१ म्हणतो.) दुसरे म्हणजे असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. विकासचे प्रतिसाद वाचण्याचे काम मी विकी ला आउटसोर्स केलेले आहे.
-- मिसळभोक्ता
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
विकासचे
हाहाहाहा मीही तेच करावे म्हणत आहे. वाचायला वेळ पुरत नाही तिथे इतके टंकायला कसा काय वेळ मिळतो ह्याचाच विचार करत होतो.
असे प्रतिसाद वाचून स्वतःची विचार करण्याची शक्ती नष्ट होण्याची भीती असते. हे मात्र अगदी लाखमोलाचे बोललात.
डिसक्लेमर
बाकी सर्वांचे माहित नाही, पण विकासचा प्रतिसाद मात्र त्याच्या (ब्रेन वॉशींग) ख्यातीनुसारच आहे
तुम्ही जरी विनोद म्हणून लिहीले असले आणि त्याअर्थाने मी जरी हलके घेत असलो तरी डिसक्लेमर करावासा वाटला. लहान मुले भांडताना एकाचे मुद्दे संपतात आणि मग उत्तर देता आले नाही की तो म्हणतो, "तू वेडा आहेस" आणि मग वाद दुसरीकडेच भरकटतो. मी ब्रेन वॉशिंग करतो असे म्हणणे हा यातीलच एका अर्थी प्रकार वाटतो...
मी माझा वरील प्रतिसाद हा संघाचा प्रचार करायला लिहीला नसून मूळ लेखातील तृटी आणी कमतरता दाखवण्यासाठी लिहीला होता. इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे. मग आता बाकी कशावरून तरी झोडा असा हा प्रकार आहे.
असे विचार पसरवणार्या संस्था/विचारवंत, काही न करता बोटे मोडत आणि कागाळ्या करत बसतात आणि वास्तवीक इतरांचे ब्रेनवॉशींग करण्याचा प्रयत्न करतात. केवळ संघाच्या संदर्भातच नाही तर एकूणच समाज, राष्ट्र, संस्कृती सगळ्याच्याच संदर्भात. जर तुम्हाला संस्कृती मान्य नसेल तर नसूंदेत पण इतरांना कशाला नावे ठेवता?
बाकी संघावरील माझा मूळ प्रतिसाद (विनायक पाचलगच्या चर्चेतील) आपण वाचला असेलच. त्यातील फक्त शेवटचे वाक्य येथे "ब्रेन वॉशिंगच्या" संदर्भात सांगतो: "म्हणूनच संघावर टिका करत बसण्याऐवजी जसे हवे तसे, वाटते त्या विचारधारेचा आधार घेऊन आपण समाजाला परत काही देतो का, याचा विचार करायला हवा इतकेच म्हणावेसे वाटते." आणि तसे प्रामाणिक काम करणारे सर्व विचारधारेत असतात आणि त्यांना असल्या फुटकळ काड्या करायला वेळ नसतो. त्यांचे ब्रेन वॉश करायचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडून तुम्हीआम्ही शिकण्यासारखे बरेच काही असते. आणि इतरांची अवस्था ही कच्च्या मडक्याप्रमाणे... ते ही उलटे ठेवलेले. आणि तुम्हाला माहीत असेलच की त्याला एक मराठीत चांगली म्हण आहे: पालथ्या घड्यावर पाणी!
विकास,
विकास, सर्वप्रथम हलके घेतल्याबद्दल आभारी आहे.
हे मलाच वाटत नाही, तर इतर सदस्यांनाही वाटते. आणि हे एक निव्वळ निरिक्षण आहे. "तू वेडा आहेस'" असे मी कुठेही म्हंटलेले नाही. त्यामूळे तू दिलेले उदाहरण मला मान्य नाही.
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?
लेख-प्रतिसाद
नाही वाचला. मूळ लेखा पेक्षा प्रतिसादच मोठा असेल तर मी सहसा वाचायचे टाळतो. बुवा वितभर आणि दाढी हात भर असे होण्याची शक्यता असते.
छान! मिसळभोक्तांच्या छोट्या प्रतिसादाने पण तुमचे ब्रेन वॉशिंग होते तर...
साम्यवादी सुडो सेक्युलर विचारसरणीतही असे लोक असतात का?
विचारसरणी सुडो नसते तीचा गैरवापर करणारे सुडो असतात. म्हणूनच कधी कधी "तथाकथीत" हिंदूत्ववादी असेही म्हणावे लागते.
मी आणि संघ
खालील विस्कळीत प्रतिसाद विषयाशी फारसा संबंधित नाही. (कृ. ह. घे.)
मी सात-आठ वर्षांचा असताना शाखेत जायला लागलो. आमच्या तालुकावजा गावात एकच शाखा लागत असे. गुरू-शिष्य वगैरे खेळ खेळतांना, पद्य एकातालात म्हणतांना, राणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतांना आम्ही मुले वेगळ्या विश्वात जात असू. भगवा ध्वज, मावळणारा सूर्य, खेळून दमलेलो आम्ही, पुर्वजांच्या शौर्यकथा ऐकून मनाशी बांधलेल्या खूणगाठी हे सर्व प्रार्थना म्हणतांना भारावून टाके. सर्वच मोहक. (एक पद्य आठवते: आओ बच्चों तुम्हे दिखाऊं दाढी *****की, इस दाढीमें चूहे भरे है सारे **स्तानके)
माझे शाळेतील मित्र कितीही सांगितले तरी शाखेत येतच नसत. पण भालेराव म्हणून एक प्रचारक आमच्या गावी आले आणि चित्र बदलले. एरवी पंधरा-वीसच मुले असणार्या शाखेत तरूण येऊ लागले. वयस्क लोकही दिसू लागले. पुर्वी न येणारे मित्रही येऊ लागले. पण भालेराव काहीतरी कारणाने दुसर्या गावी गेले आणि शाखा पुन्हा पुर्वीसारखीच आटली.(भालेराव बहूजन समाजातील असल्याने गावातील काही लोकांना ते नकोसे झाले होते.)
नंतर आम्ही नाशिकला राहू लागलो. तेथेही काही काळाने शाखा सुरू झाली आणि मी पुन्हा शाखेत जाऊ लागलो. मी नेहमी हिंदू राष्ट्र कसे जन्माला येईल याच चिंतेत बुडून जात असे. दहावीच्या परीक्षेनंतर आमच्या शिक्षकांनी मी संघ शिक्षा वर्गासाठी जावे असे लावून धरले. माझ्या घरचे लोक आता थोडेसे चिंतेत पडले. (मी प्रचारक वगैरे होईल की काय अशी रास्त भीती त्यांना वाटू लागली होती.) त्यांनी संघ शिक्षा वर्गास जाण्यास विरोध केला पण थोडाफार हट्ट केल्यानंतर जाऊ दिले. संघ शिक्षा वर्ग (चपखल नाव) मुंबईत होता. (देवळाली रेल्वे स्टेशनवर एक मोठे मुस्लिम कुटूंब पाहून आम्ही चेकाळल्यासारखे ड्रम वगैरे वाजवत पद्य म्हणत असल्याचे (आम्ही जवळ जवळ नव्वद जण होतो) चांगलेच आठवते).
मुंबईला गेल्यानंतर भल्या पहाटे उठून, पेलाभर चहा पिऊन, बुटांना-पट्ट्याच्या बिल्ल्याला पॉलिश करून आम्ही निरनिराळी शारिरिक कौशल्ये शिकण्यास जात असू. (आमची राहण्याची व्यवस्था विलेपार्ल्यात (विद्याविहार) कुठल्यातरी धनाढ्य शेठजींच्या नावाच्या शाळेत केलेली होती (त्यांचा तेथे अर्धाकृती पुतळाही होता. पुतळ्याची उंची आणि आमची उंची जवळपास एकच असल्याने आम्ही येता जाता पुतळ्याच्या थोबाडीत मारत असू). शाळेत संडासांची संख्या मर्यादीत होती. अनेक प्रौढ महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आले असल्याने सकाळी तेथे प्रचंड गर्दी होत असे. ती गर्दी पाहून मी पहिल्या दिवसानंतर त्यावेळात तिकडे फिरकलोच नाही. आंघोळ न करताच मी कवायतींकरता जाई. थोड्या कवायती झाल्यानंतर जेव्हा न्याहारीसाठी सोडले जाई तेव्हा मी विधी उरकत असे.) न्याहारी (जी मी करत नसे) झाल्यानंतर पुन्हा शारिरीक कवायती. त्यानंतर दुपारचे जेवण आणि जेवणानंतर दोन तास बौद्धिक.
बौद्धिक देण्यासाठी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, केंद्रीय कार्यकारिणीतील मंडळी यातले कोणीतरी असे. हे लोक पूर्ण दोन तास काहीतरी बोलत असत आणि सर्व लोक झोपत असत. (अक्षरशः झोपत असत.) कुठल्यातरी बौद्धिकात व्याख्यात्यांनीच या झोपण्यासंबंधी काहीतरी विनोद सांगितला होता (सुरूवातीला सांगितल्याने मी चुकून ऐकला होता.) तो असा. त्यांना कोणीतरी विचारले की संघाच्या बौद्धिकात अशी काय जादू आहेत की स्वयंसेवक इतके कट्टर हिंदूत्ववादी होतात? त्यांनी सांगितले कारण बौद्धिकात सुरूवातीला 'हिंदू राष्ट्र होण्यासाठी आपण काय केले पाहीजे?' आणि शेवटी 'हिंदू राष्ट्र झालेच पाहीजे' ही दोनच वाक्ये ते प्रत्येक बौद्धिकात ऐकतात(मधल्या वेळात झोपलेले असतात.) थोडक्यात बौद्धिकात झोपणे हे सर्वमान्य होते. असो. त्यानंतर एक तास विश्रांती आणि मग पुन्हा शरीरश्रम, जेवण आणि मग दीपगमन (किंवा त्या अर्थाचा संस्कृत शब्द).
चार-पाच दिवसातच मला तीव्रपणे घरची आठवण येऊ लागली आणि दुसरा कुठलाच सुटकेचा मार्ग न दिसल्याने मी आजारी पडलो. आजारी पडल्यानंतर माझी रवाणगी दुसर्या ठिकाणी करण्यात आली. येथे मात्र सर्व व्यवस्थित होते. मला शारिरिक कवायतीकरता न जाण्याचीही मुभा मिळाली. पण मी काही कवायतींकरता जात असे.(आमचा गण सांघिक पद्यगायनात पहिला आला होता. एक कोकणी पद्य होते: 'यक यक पाऊल घालतांना, पावलाचे मने जुळतांना' असे काही तरी. हे पद्य म्हणत आम्ही शाळेभोवतीच्या गल्ल्यांत फिरत असू. इतर गणांची पद्ये खूपच आवेशपूर्ण होती: 'नौबती झडाडल्या, दुंदुभी निनादल्या; केशरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला', 'हिंदू मोरा, हिंदू मोरा' वगैरे. या तुलनेत मला आमचे पद्य खूपच शेळपट वाटत असे. थोराड मुले आजुबाजुच्या अपार्टमेंटमधल्या मुली असतांना विशेष त्वेषाने पद्य म्हणत असत पण रांग कधीही मोडत नसत हे लक्षात घेण्यासारखे आहे.)
या शिक्षा वर्गाचा समारोप करण्याकरता कोण्या मोठ्या संघाशी संबंधित नसलेल्या व्यक्तिस बोलावण्यात येत असे. आमच्या दुर्दैवाने कोण्या डाव्या नेत्यास बोलावून संघाच्या अचाट शिस्तीचे दर्शन घडवावे असा समरसतेने भरलेला उपक्रम कोणा निमंत्रकांच्या डोक्यात आला. त्यांनी तो तडीस नेला. एका डाव्या नेत्यास (नाव आठवत नाही) समारोपास बोलावण्यात आले होते. त्यांनी शिस्तीचा वचपा काढण्याचे ठरवलेलेच असणार. संधी मिळताच अथक बोलण्यात डाव्या बाजूलाही मुबलकतेची कमतरता नसल्याचे दाखवण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. ते जवळजवळ अडीच तास बोलत होते. झोपण्याच्या अलिखित नियमाविषयी कदाचित त्यांना माहीत नसावे पण पाऊस पडू लागल्याने झोपणे अशक्य होते. भाषण कसे बसे पार पडले. स्वयंसेवकांना शांतपणे सर्व भाषण एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडतांना पाहून आमच्या प्रशिक्षकांनी वर्गाच्या यशाचे मनातल्या मनात नक्कीच कौतुक केले असणार. (नंतर तसे सांगण्यातही आले.)
वर्ग संपल्यानंतर मला स्वतःची शाखा घेण्याचे सांगण्यात आले. ही शाखा मी जेमतेम सहा महिने चालवली. मुलांना शाखेत येण्यासाठी आम्ही (मी आणि कार्यवाह) भरपूर प्रयत्न केले पण मुले येत नसत. आमच्या पटांगणाच्या बाजूलाच बारावीच्या ट्युशन्स भरत. क्लासच्या पन्नास बॅचेस असल्याने मुले बाहेर दुचाक्यांवर बसून गप्पा मारत. त्यातील टवाळ (काही माझे वर्गमित्र) बाहेरून मी 'संघ दक्ष' म्हणताच 'मुलींकडे लक्ष' असे ओरडत. मुली वळून पाहत (काही माझ्या वर्गातल्या). वैतागुन मी शाखा लावणे बंद केले. वर्षभरात मी शिक्षणासाठी पुण्यात गेलो आणि माझा संघाबरोबरचा संबंध संपला.
+१
माझेही साधारणतः असेच अनुभव आहेत. ओ टी सी मध्ये झोप ही बौद्धिकांसाठी राखीव ठेवलेली असते.
-- मिसळभोक्ता
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
अरेच्या हे काय भलतंच!
'एकतर चार ओळींपेक्षा मोठे प्रतिसाद मी वाचतच नाही'
अस्सं म्हणणार्या मिभोकाकांनी चक्क पन्नास एक ओळींचा प्रतिसाद वाचून इथे प्रतिक्रियाही दिली आहे! :?
बात कुछ हजम नहीं हुई!! :W
चतुरंग
वाचला ?
प्रतिसाद वाचून प्रतिक्रिया दिली असे तुम्हाला का वाटले बॉ ?
-- मिसळभोक्ता
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
अच्छा, म्हणजे न वाचताही प्रतिक्रिया देता!
छान!
चतुरंग
+१
संघाच्या नादी लागून माझ्या मित्राने त्याच्या आयुष्यातील वाया घालवलेले एक वर्ष मी जवळून बघीतले आहे.
-१
मी पण असे किमान दोन लोक ओळखतो. त्याचबरोबर संघाच्या सर्व कार्यक्रमात नियमीत भाग घेऊन, शाखेवर नियमीत हजेरी लावून, आपले सर्व व्याप सांभाळून आपल्या आयुष्यात अतिशय यशस्वी झालेले इतर अनेक मित्र मी जवळून पाहिले आहेत.
आजूबाजूची परिस्थिती चांगली नसूनही केवळ आपण शाखेत जात असल्याने अभ्यास केला व वस्तीवरील इतर मितरांप्रमाणे शिव्या देत फिरत आयुष्याचा टाइम पास नाही बनवला असा कबूल करणारेही काही आहेत...मराठी टंकलेखनात नवीन असल्याने सांभाळून घ्यावे..
धन्यवाद
-१ ला +१
खरेच आहे...
सुधीर फडके हे त्याचे एक सुप्रसिद्ध उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आहेत.
तेच उलट अर्थी पण आहे. फक्त संघातच कशाला? सगळ्या विचारसरणीत दिसेल. एम एन रॉय यांच्या नावाने अनेक विचारवंत पुढारी आरत्या ओवाळायचे पण मार्क्सवादाने त्यांचे काय केले? तात्पर्य त्याला कारण संघटना नसून त्या व्यक्तींना न पेलवलेले कार्य असते.
-१ ला +१
खरेच आहे...
सुधीर फडके हे त्याचे एक सुप्रसिद्ध उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आहेत.
तेच उलट अर्थी पण आहे. फक्त संघातच कशाला? सगळ्या विचारसरणीत दिसेल. एम एन रॉय यांच्या नावाने अनेक विचारवंत पुढारी आरत्या ओवाळायचे पण मार्क्सवादाने त्यांचे काय केले? तात्पर्य त्याला कारण संघटना नसून त्या व्यक्तींना न पेलवलेले कार्य असते.
+१
सहमत. डाव्या विचारसरणीचे कैफी आझमी-थोर गीतकार हे एक चांगले उदाहरण.हो ना?
अमित
आमचे बेन्ग्ळूर
मला तरी संघाची विचारसरणी पटत नाही.
परंतु आपण जे काही लिहित आहात त्यात काय तथ्य आहे का? हा विचार करुन लिहित चला.संघात एकादी व्यक्ती काही इच्छेखातर सामिल झाली तर तिचे आयुष्य बरबाद होते हे आपण कसे काय लिहु शकता?
एकाद्या ध्येयासाठी आपण आपले आयुष्य खर्च करणे म्हणजे आयुष्य वाया घालवणे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
संघाच्या नादी लागून माझ्या मित्राने त्याच्या आयुष्यातील वाया घालवलेले एक वर्ष मी जवळून बघीतले आहे.
असेकाय केले त्यामुळे तुमच्या मित्राचे एक वर्ष वाया गेले.एकाद्या गोष्टीला,व्यक्तिला किंवा संघटनेला वाईट म्हणता म्हणता आपण त्याच्यातील सर्व चांगल्या गोष्टीना देखिल नावे ठेवत असतो.
वेताळ
वेताळ
.संघात
संघ ह्या ठीकाणी लष्कर ए तेयबा टाकून पाहा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तरीही समजले नाही तर मला खरड पाठवा तिकडे चर्चा करु.
रास्वस
रास्वस बद्दल काय लिहिणे अपेक्षीत आहे ?
रास्वसं ची सफल झालेली उघड उद्दीष्ठ्ये.त्यांची ध्येय धोरणे नक्की काय आहेत. जर राजकीय अजेंडा नसेल तर सामाजीक अजेंडा कोणता या बद्दल माहिती हवी होती. त्याबाबत कोणीच फारसे लिहिले नाही.
हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे ही अपेक्षा कधीच शक्यतेत नव्हती. आजवरच्या इतिहासात भारतभूमी वर एकसंघ कोणाचेच कधीच राज्य नव्हते. हिंदु धर्म हा त्या अर्थाने कधीच आग्रही नव्हता. या भूमीवर बाहेरुन आलेले धर्म क्षणभर बाजूला ठेवुयात. पण जे धर्म याच भूमीत उमग पावले आहेत त्यांचे काय ? बौद्ध,जैन, पुष्टीमार्गीय वैष्णव , नागर , शिवधर्म हे स्वतःला हिंदु मानत नाहीत त्यांचे काय? या धर्माना पंथ म्हणता येणार नाहीत.
शंकराचार्याना त्यांच्या वैदीक मताला विरोध करणारेही बरेच आहेत.
असो.....
या धाग्याचा हेतू संघ बदलत्या राजकीय/जागतीक परिस्थीत कसा बदलला आहे त्याची माहिती मिळावी त्यावर चर्चा व्हावी अशी आहे.
त्याबद्दल कोणीच बोलत नाहीत.
धाग्यात मांडलेले विचार कदाचित एकांगी असतील पण त्यावर वैचारीक प्रतिसाद कोणीच दिला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते.
मी सुद्धा एकेकाळी अभाविप चा कार्यकर्ता होतो. शाखेत ही जायचो.
अभाविपसाठी कोपरा सभा घेतल्या आहेत. विद्यार्थीपरिषदेत असताना मला तेथे परिषदेचा संघाशी संबन्ध नाही असेच सांगण्यात यायचे पण कोणी जरा वेगळे मत मांडले की त्याला बाजूला काडले जायचे. तेथेही सम आर मोअर इक्वल हे जाणवण्याइतपत हा अनुभव मलाही आला होता. अंधश्रद्धेवर टीका केलेली चालायची नाही.
"हिंदु मोरा भई हिंदु मोरा " या गाण्यात असणार्या "मार्कसिझम मतिमंदु" या ओळीचे एकाला स्पष्टीकरण विचारले होते. त्या दिवसापासून हा जणू कोणी छुपा हेर आहे असे वातावरण झाले होते.
असो....
लोक हे संघटनेमुळे बांधले जातात. संघटना लोकमानस घडवते. एखाद्या संघटनेतले नेते जे बोलतात तेच त्या संघटनेचे विचार असतात असे लोक मानतात.
माझ्या लिखाणात मी कोणाचीच बाजू घेतली नाही . मला फक्त माहिती हवी आहे आणि ती येथे कोणीच देत नाही.
एवढे कट्टर स्वयंसेवक येथे आहेत निदान त्यानी तरी वैचारीक मतभेद बाजूला ठेवुन संघाच्या सध्याच्या ध्येयधोरणांबद्दल माहिती द्यावी ही विनन्ती.
काँग्रेस किंवा इतर संघटना कशा आहेत यावर टीका करण्यापेक्षा जी संघटना साधनशुचितेवर विष्वास ठेवते त्या संघटनेच्या एकूणच धोरणात बदलत्या काळानुसार काय बदल झाले आहेत याची माहिती हवी होती.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
धाग्यात
विजुभाऊ, तुम्हीही मिभोकाकांच्या पावलावर पाऊल ठेवून विकासचे प्रतिसाद दुर्लक्षित केलेत का?
अदिती
अदिती
निमित्तमात्र ह्यांचा प्रतिसाद . .
संघ ही एक फॅसिस्ट विचारसरणीची संस्था आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तिरस्काराचे बाळकडू शाखांमधून पाजले जाते. भडक विचारांचे माथेफिरू लोक नेतृत्व सांभाळतात. ज्याला खरोखरंच देशप्रेमासाठी आयुष्य घालवायचे असेल त्याने सैन्यात भरती व्हावे. संघ जात पात मानत नाही असे वरुन म्हणत असला तरी संघाचा प्रभाव एका विशीष्ठ पोट जातीतील लोकांवरच असतो. (कुठल्याही शाखेतील बहुतांश स्वयंसेवक पाहा). आजकाल ग्रामीण भागात जाऊन संख्या वाढवण्यासाठी बहुजन समाजातील लोकांनाही भरती केले जात असले तरी ह्यांचा मूळ उद्देश (हिडन अजेंडा) हा वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज उभा करणे हाच आहे.
श्री. निमित्तमात्र
१ फॅसिस्टची व्याख्या करता कां जरा ? म्हणजे निदान सगळ्यांना कळेल कि तुमच्या मते फॅसिस्ट कुणाला म्हणतात ?
२. आणि संघामध्ये फॅसिझम कसा आहे, ते ही सांगा - उदाहरणासकट.
३. संघाचा हा जो काही 'हिडन अजेंडा' आहे तो तुम्ही कुठे वाचलात ?
जर तसे तुमच्या विचारातून आलेले असेल तर त्या विचारांना काय 'बेस' आहे ते सांगा.
नाना बेरके
काम इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते
मी संध्याकाळी खातो, तू मला फेकीली शिते
एक चांगले वाचन.
ते बहुजन वगैरे मुद्दा पण तितका कळला नाही. पण ह्याच संदर्भात एक अतिशय चांगलं पुस्तक आहे. पुस्तक वर टिचका. शक्यतो मराठी मिळालं तर आवर्जून वाचा.
उत्सुकतेप
उत्सुकतेपोटी संघाची वेबसाईट बघितली.तेथून...
Who can become a member of RSS?
Any Hindu male can become member of RSS.
संघाने त्यांचे हे धोरण बदलले पाहिजे असे माझे बिलकूल म्हणणं नाहीय..
फक्त मला हे विशेष वाटल्याने (आणि आधी माहित नसल्याने) इथे सांगतोय.
बास की
"Any Hindu male can become member of RSS"
आता आणि वेगळे काय पाहिजे? ह्यांचे विचार्,आचार कुठच्या दिशेने चालत असणार हे ह्यावरुनच कळते.स्त्रिया आणि इतर धर्मिय दुय्यम दर्जाचे हे त्यातुन कळते्. हे फॅसिस्ट विचार नाहीतर काय लोकशाहीची मुल्ये? आचार्य अत्रे बोललेच होते- हे लोक पुढच्या दहा हजार वर्षात पण सत्तेवर येवू शकणार नाहीत.
अमित
आमचे बेन्ग्ळूर
खालिल सन्दर्भ
खालील नोंदीमधील संदर्भा वाचावा. आणि आचार्य अत्रे असं कधी कुठे म्हणाले होते ते दाखवलेत तर आनंद होईल...
'सेवक'
'सेवक' म्हणजे पुरुष... अभ्यन्कर मराठी बिघडायला लागलय तुमचं..........
सन्घटनेत स्त्री नसणं म्हणजे स्त्री द्वेष्टेपण का ? मग तुमच्या लाडक्या प्रार्थनास्थळांवर बायका बान्ग देत नाहीत , याचा अर्थ काय काढायचा ?
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
मग तुमच्या
मग तुमच्या लाडक्या प्रार्थनास्थळांवर बायका बान्ग देत नाहीत , याचा अर्थ काय काढायचा ?
त्या धर्मात स्त्रीयांना काय वागणूक मिळते ते जग जाहीर आहे त्यांची भूमीका स्पष्ट आहे. चांगली / वाईट हे इतरानी ठरवावे.
पण त्याचा उहापोह इथे कशाला? इथे बदलत्या काळानुसार संघाच्या ध्येयधोरणांबद्दल आपण बोलत आहोत. तुम्हाला जर ती नक्की माहीत असतील तर आम्हा अज्ञानी जनांच्या माहितीत थोडी भर टाकावी ही विनन्ती.
केवळ प्रतिवाद करायचा म्हणून कै च्या कै प्रतिसाद न देता मुद्द्याला धरून प्रतिसाद द्या.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
एक सन्दर्भ
शाहरूखजिंसाठी हा संदर्भ.
Any Hindu male can become
Any Hindu male can become member of RSS.
अहो मुळात इथेच गोची आहे ना! हिंदू म्हणजे कोण? ह्याचीच व्याख्या कुणाला माहित नाही. नाना बेरके म्हणतात भारतातले सगळे हिंदू (मिरजेतली दंगल दोन हिंदू गटांमध्येच काय हो नाना?).. विकास म्हणतो सगळे अमेरिकेतले हिंदू्. ..यशोधरा म्हणते व्याख्याच कशाला हवी?
थोडक्यात सोयीप्रमाणे कुणीही हिंदू म्हणवला जाऊ शकतो/ अपात्र ठरवला जाऊ शकतो.
बास की ? आता तर कुठे सुरु होतय . .
अभ्यंकर
संघ पुरुषांकरीताच आहे. महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती आहे.
दुसरे म्हणजे " हिंदूची व्याख्या अशी आहे कि, हिंदुस्थानात जो राहतो तो हिंदू " मग त्यात भारतातले मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर सगळे येतात.
नाना बेरके
काम इथले संपत नाही, मग तुझी आठवण येते
मी संध्याकाळी खातो, तू मला फेकीली शिते