राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे.
भाजप मध्ये विलीन व्हायचे/भाजप वर अंकुश ठेवायचे/ जीना चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी जनसंघ नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. जनता पक्षाच्या कडबोळी सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली. त्यानन्तरच्या इंदिरा गांधींच्या करिश्माच्या आणि इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानभुतीच्या लाटेत भाजप या नावाने रुपडे पालटून उतरलेला हा पक्ष वाहून जातो की काय अशी शंका होती.
राजीवगांधींच्या काळात सुरुवतीला त्याना नक्की कसा विरोध करायचा हा संघीयाना एक मोठा प्रश्नच होता. त्या काळात भाजपने जाहीररित्या गांधीवादी समाजवादाचा स्वीकर करु असे जाहीरपणे सांगितले होते
पण नन्तर राजकारणात मंडल आयोगाच्या अस्त्राला उत्तर देण्यासाठी तितकेच विघातक असे रामजन्मभूमीचे अस्त्र संघाने बाहेर काढले. त्या विषयावर एक राजकीय पक्ष म्हणून त्यानी नेहमीच दुटप्पी भुमीका ठेवली. भाजप म्हणजे संघ नव्हे असे म्हणताना मात्र भाजपतर्फे संघाचा अजेन्डा चालू ठेवला.
भारतीय राजकारणातील बदलेल्या परीस्थीत संघाने नेहमीच धरसोड भुमीका घेतली आहे. संघ म्हणजे भाजप नव्हे. संघ म्हणजे विश्वहिन्दु परिषद नव्हे संघ म्हणजे बजरंग दल नव्हे असा प्रत्येक संघटनेशी स्वतःचा संबन्ध नाही असे संघ वारंवार म्हणत असतो. पण मग सम्घ म्हणजे नक्की कोण? असा साहजीक प्रश्न पडतो. राजकारणात यायचे नाही पण राजकारण आपल्या तालावर व्हावे असा दुटप्पी अट्टाहास कशासाठी?
बाबरी मशीद पाडण्यात संघाचा हात नव्हता ( असे निदान सध्या तरी मानु यात) पण बाबरी मशीदीचा मुद्दा हा संघानेच शिजवत ठेवला होता. भाजप च्या राजकीय फायद्या साठी बाबरी मशीदीचा मुद्दा सतत तेवत रहाणे अत्यन्त आवश्यक होते .
दुर्दैवाने बाबरी मशीद कारसेवकानी पाडली. ( संघाचा कारसेवकांशी संबन्ध नाही)
आणि तो मुद्दा भाजपच्या हातून निसटला.
मोदींचे हिटलरी स्टाईलचे हिन्दुत्व कदाचित भावले त्यामुळेच की काय स्वतःचा कट्टर शत्रु असलेल्या संजय गांधींच्या मुलाला पावन ठरवले गेले.
भाजप सत्तेत असताना बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. संघाच्या बर्याच स्वयंसेवकानी सत्तेची चव नव्याने चाखली. पण संघाला अजूनही स्वत:ची नक्की अशी ध्येय धोरणे ठरवता अली नाहीत. कधी सोनियाना विरोध कर त्यासाठी स्वतःचे मुंडण करु असे आक्रस्तळेपणे सांगून हसे करुन घे.कधी मनमोहनसिंगांचा विरोध कर अशा फारसा पक्का पाया नसलेल्या धोरणाना हाती धरत संसदेत भाजपने आपले आस्तित्व टिकवून ठेवले. कंदहार प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानन्तर भाजपच्या सुदैवाने विरोधी पक्षानी बराच समजूतदारपणा दाखवला. संघाने त्या घटनेवर सोयीस्कर मौन पाळले.
मध्यन्तरी पाकिस्तानात जाऊन अडवाणीनी जीनांची स्तुती केली. त्यावरही संघाने मौन राखले. जसवंतसिंगानी जीनांवर काहितरी लिहिले आणि अचानक खळबळ उडाली. संघाच्या नेत्याना( स्वयंसेवकाना) साक्षात्कार झाला आणि ते दोन वेगवेगळ्या बाजूने बोलु लागले.
स्वातंत्र्यानन्तर साठ वर्षे उलटली. एक चांगली ध्येधोरणे ठरवून जन्माला आलेली संघटना स्वतःची ध्येयधोरणे हरवून निष्प्रभ ठरु लागली आहे.
बरीच बौद्धीके/ विचार मंथन शिबीरे झाल्यानन्तरही ही संघटना आता नेतृत्वहीन बनत चालली आहे.
संघाची नक्की ध्येयधोरणे काय ही स्वयंसेवकानाच आता कळेनासे झाले आहे.
संघ ही संघटना कशासाठी हे सर्व सामान्य लोकाना कळत नाही. त्यामुळे नवे प्रभावी स्वयंसेवक तयार होत नाहीत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना ध्येयधोरणांच्या धरसोडीमुळे आता राजकीय आस्तित्वसाठी गुदमरत आहे
हे लिहिताना वैचारीक /राजकीय भुमीका/ वैयक्तीक आकस म्हणून असे काही नाही . हे एक सर्वसामान्य नागरीकाचे हे मत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
गाभा:
प्रतिक्रिया
29 Apr 2013 - 1:06 pm | श्रीगुरुजी
>>> बरं संघाने इतके चांगले संघटन असुन त्याचा देशासाठी काय उपयोग केला? संघसमर्थक हे लगेच आपत्कालिन मदती विषयी बोलतात कारण त्यापलिकडे संघाने काहीही कर्तुत्व दाखवलेले नाही. आणि हे आपत्कालिन कार्य देखिल बाळासाहेब देवरसांच्या आगमनानंतर सुरु झाले. तोपर्यंत ३०-४० वर्षे (माझ्या अंदाजाने) संघ काहीही भरीव कामगिरी करत नव्हता नुसत्या राष्ट्रप्रेमाच्या गप्फा हाणणे सोडल्यास. आणि आपत्कालिन कामही कुठे आपत्ती आल्यास केले जाते. इतकी मोठी संघटना आणि संघटन असताना आपत्ती येण्याची वाट का बघीतली जाते?
मी एका दुसर्या प्रतिसादात १९४७ च्या फाळणीत संघाच्या लोकांनी विस्थापितांना कशी मदत केली तिथपासून अगदी अलिकडे घडलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये संघाने कशी मदत केली होती त्याचे संदर्भ दिले होते. १९४७ मध्ये देवरस सरसंघचालक नसून श्री गोळवलकर गुरूजी हे सरसंघचालक होते व ते १९७३ पर्यंत या पदावर होते. त्यामुळे देवरसांच्या आगमनानंतर संघाने कार्य सुरू केले हे चुकीचे विधा आहे.
>>> आपल्या देशात समस्यांची काही कमी नाही. अनेक लोक मूलभुत गरजांपासुन वंचित आहेत. अशांसाठी संघाने आजपर्यंत काय केले आहे?
कोणतीही संघटना प्रत्येक क्षेत्रात काम करू शकत नाही आणि म्हणून त्या संघटनेचे एका क्षेत्रातील काम न बघता त्यांनी तर क्षेत्रात काम का केले नाही असे प्रश्न विचारणे अयोग्य आहे. कै. बाबा आमट्यांनी फक्त कुष्ठरोग्यांसाठी काम केले, पण देशातील इतर समस्यांविषयी काय केले असा प्रश्न विचारणे योग्य आहे का? किंवा महर्षी कर्व्यांनी फक्त स्त्रीशिक्षणाचे काम केले, पण कुष्ठरोग्यांसाठी काहीच केले नाही किंवा कै. नानाजी देशमुखांनी फक्त आदिवासींसाठी काम केले, पण शहरातली कचर्याची व वाहतुकीची समस्या सोडविण्याकरता त्यांनी काय केले असे प्रश्न सुद्धा अयोग्य नाहीत का?
संघाने १९४७ च्या फाळणीच्या वेळी आपला जीव धोक्यात घालून निर्वासितांना मदत केली होती. अनेक शीख निर्वासिंतांना संघाने संरक्षण दिले होते. त्यात संघाचे ८३ स्वयंसेवक मृत्युमुखी पडले होते. १९६२ च्या चीन आक्रमणात संघाची मदत झाली होती व त्या मदतीने प्रभावित झालेल्या नेहरूंनी २६ जानेवारी १९६३ च्या राष्ट्रीय संचलनात संघाच्या पथकाला समाविष्ट केले होते. आणिबाणीला विरोध करण्यात संघ आघाडीवर होता. देवरसांसकट संघाचे अनेक कार्यकर्ते दडपशाहीला विरोध केल्यामुळे २० महिने तुरूंगात होते. संघाने आपल्या शिक्षणसंस्थांद्वारे अनेक शाळा उघडल्या आहेत. नैसर्गिक आपत्तित मदत करण्याव्यतिरिक्त या काही इतर क्षेत्रातही संघाचे मोठे योगदान आहे.
>>> श्रीगुरुजींनी म्हंटले आहे की संघ अतिशय हार्मलेस आहे, अहो पण तो हार्मलेस नसुन आजच्या समाजातला 'युसलेस' घटक आहे.
तुम्हाला युसलेस वाटत असला तरी संघ आजही भारताला आवश्यक आहे.
>>> स्वातंत्रवीर सावरकरांचे आणि संघाचेही ह्याच कारणावरुन वाजले होते. संघाने वैज्ञानिक दॄष्टीकोनाचा प्रसार करावा, अनिष्ठ रुढी प्रथांना हद्दपार करावे असा सावरकरांचा आग्रह होता. संघाने अर्थातच ह्यातले काहीही केलेले नाही. सावरकरांचे हे उद्गार बरेच काही सांगुन जातात, "the epitaph for the RSS volunteer will be that he was born, he joined the RSS and he died without accomplishing anything".
संघ कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. संघात जातीयवाद पाळला जात नाही.
>>> अर्थात हे सगळे संघाला निष्ठा अर्पण केलेल्या समर्थकांना पटवुन सांगणे अशक्य कोटीचे काम आहे, हे मी आधीच मान्य केलेले आहे.
तुम्ही हे जर आधीच मान्य केले असेल तर इथे प्रतिसाद देण्याचा खटाटोप कशासाठी?
29 Apr 2013 - 9:06 pm | बंडा मामा
मी संघाने केलेल्या नैसर्गिक आपत्ती मदत कार्याविषयी बोलत होतो. ज्यात त्यांचे योगदान हे देवरसांच्यानंतरच सुरू झाले तो पर्यंत त्यांनी नैसर्गिक आपत्ती निवारणात काहीही सहभाग घेतला नव्हता. हजारो शाखा, लाखांनी स्वयंसेवक आणि ३० वर्षाचा कालावधी ह्यात संघाने काय अचिव्ह केले तर १९४७ च्या विस्थापितांना मदत आणि आणीबाणीला विरोध? बस? पुन्हा एकदा तटस्थपणे विचार करा. संघाच्या १/१०० मॅनपॉवर असणारी कुठलिही एनजीओ ह्यापेक्षा अधिका काम एका वर्षात करेल.
तुम्ही दिलेली बाबा आमट्यांची आणि कर्व्यांची उदाहरणेही मजेदारंच आहेत. बाबा आमटेंची संस्था वर्षातले १२ महिने कुष्ठरोग्यांची सेवा करत असतात. त्यांचे कार्यकर्ते कुठे भुकंप यायची किंवा पुर यायची वाट बघत गप्फा हाणत नसतात.
माझे प्रतिसाद हे तटस्थ विचार असणार्यांसाठी आहेत. संघाला निष्ठा वाहिलेल्यांना काहीही पटवुन देणे अतिशय कठिण असते हे मी अनुभवले आहे. बर्याचदा प्रतिवाद करताना ते एकेरी येऊन उर्मटपणे बोलू लागतात हा ही अनुभव घेतला आहे. इथेच खाली आशु जोग ह्यांचा प्रतिसाद पाहा.
30 Apr 2013 - 12:38 pm | श्रीगुरुजी
>>> हजारो शाखा, लाखांनी स्वयंसेवक आणि ३० वर्षाचा कालावधी ह्यात संघाने काय अचिव्ह केले तर १९४७ च्या विस्थापितांना मदत आणि आणीबाणीला विरोध? बस? पुन्हा एकदा तटस्थपणे विचार करा. संघाच्या १/१०० मॅनपॉवर असणारी कुठलिही एनजीओ ह्यापेक्षा अधिका काम एका वर्षात करेल.
संघाने १९४७ ची फाळणी, १९६२ चे चीनचे आक्रमण, १९६६ मधील दुष्काळ इ. प्रसंगात योगदान दिलेले आहे. दुर्दैवाने संघाविषयीच्या आंधळ्या द्वेषाने तुम्हाला ते दिसत नाही.
>>> तुम्ही दिलेली बाबा आमट्यांची आणि कर्व्यांची उदाहरणेही मजेदारंच आहेत. बाबा आमटेंची संस्था वर्षातले १२ महिने कुष्ठरोग्यांची सेवा करत असतात. त्यांचे कार्यकर्ते कुठे भुकंप यायची किंवा पुर यायची वाट बघत गप्फा हाणत नसतात.
संघ कार्यकर्ते हे भूकंप, पूर इ. यायची वाट बघत असतात हा जावईशोध वाचून हसू आले. या जावईशोधाबद्दल धन्यवाद! तुम्हाला मी काय सांगितले हे समजलेच नाही. माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा आणि काही समजलं नसेल तर हास्यास्पद जावईशोध लावण्यापेक्षा स्पष्टीकरण विचारा.
>>> माझे प्रतिसाद हे तटस्थ विचार असणार्यांसाठी आहेत. संघाला निष्ठा वाहिलेल्यांना काहीही पटवुन देणे अतिशय कठिण असते हे मी अनुभवले आहे.
तुमचे स्वतःचे पूर्वग्रहदूषित एकांगी विचार कोणालाच पटू शकणार नाहीत. यात तुमच्या पूर्वग्रहाचा दोष आहे की लोकांचा?
29 Apr 2013 - 1:11 pm | श्रीगुरुजी
>>> रास्वसं हा हिटलरच्या नाझीझम किंवा मुसोलिनीच्या फॅसीझमने प्रभावित होता/आहे हे संतुलित विचार करणार्या कुणालाही स्पष्ट दिसेल. त्यांचा गणवेश, संचलन, मानवंदना, एक राष्ट्र एक धर्म असल्या खुळ्या कल्पना हे सगळे नाझी लोकांशी साधर्म्य दाखवणारे आहे.
स्काऊटचे किंवा एनसीसीचे बालवीर हे सुद्धा गणवेश वापरतात. त्यांचेही संचलन, मानवंदना असते. तेसुद्धा नाझींशी साधर्म्य दाखविणारे आहेत का?
फॅसिझम/नाझीझममध्ये वर्णश्रेष्ठत्वाचा अत्यंत खोटा अहंकार होता व त्या अहंकारातून फक्त माझा वर्ण श्रेष्ठ व इतर सर्वजण कनिष्ठ अशी हीन व हिंसक मनोवृत्ती निर्माण झाली होती व त्यातूनच हिंसाचार झाला. संघात असे श्रेष्ठत्वाचे कोणतेही तत्वज्ञान मानत नाहीत व हिंसाचार ही संघाची कधीही बैठक नव्हती.
29 Apr 2013 - 9:11 pm | बंडा मामा
स्काउट आणि एन्सीसी कशाला भारतात बहुतांश शाळेतली मुले ही गणवेश घालुन जातात. कुणीही नुसता गणवेश घातला की त्यात नाझी साधर्म्य दिसत नसते. माझा प्रतिसाद नीट वाचा.
30 Apr 2013 - 12:40 pm | श्रीगुरुजी
>>> स्काउट आणि एन्सीसी कशाला भारतात बहुतांश शाळेतली मुले ही गणवेश घालुन जातात. कुणीही नुसता गणवेश घातला की त्यात नाझी साधर्म्य दिसत नसते. माझा प्रतिसाद नीट वाचा.
एक्झॅक्टली! मलाही तेच म्हणायचे होते. "कुणीही नुसता गणवेश घातला की त्यात नाझी साधर्म्य दिसत नसते." हे तुमचे वाक्य आणि संघ कार्यकर्ते गणवेष घालतात म्हणून त्यांच्यावर थेट नाझी/फॅसिस्ट असा शिक्का मारणारे तुम्ही यात पूर्ण विरोधाभास आहे.
23 Apr 2013 - 12:57 pm | श्रीगुरुजी
>>> खाली श्रीगुरुजींनी संघांवर स्तुतीसुमने उधळणारा भला मोठा प्रतिसाद दिला आहे. पण कसलाही संदर्भ न दिल्याने त्याला खोटारडेपणा म्हंटले तर चालेल का?
संघाविषयी अधिक माहितीसाठी http://www.rss.org/ हे संकेतस्थळ पहा. माझा प्रतिसाद हा तिथल्या माहितीवरच आधारित आहे. मी संदर्भाशिवाय प्रतिसाद देत नसतो. माझ्या प्रतिसादात संघाचे तत्वज्ञान, व्हिजन, मिशन इ. गोष्टी आहेत त्या संघाने सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. माझ्या मनातले त्यात काहीही मिसळलेले नाही.
मोरवी धरणफुटी, लातूरचा भूकंप, १९६२ चे चीनचे आक्रमण इ. नैसर्गिक आपत्तीकार्यात संघस्वयंसेवकांनी केलेली मदत जगजाहीर आहे. अनेक वृत्तपत्रातून त्याविषयी लिहून आलेले होते. संघावर स्तुतीसुमने उधळावीत असेच कार्य संघाने केले आहे.
अरविंद लव्हकरे या पत्रकाराचा हा लेख वाचा.
http://www.rediff.com/news/2001/feb/13arvind.htm
१९४७ च्या फाळणीतल्या निर्वासितांना मदत करण्यापासून भूकंप, पूर, धरणफुटी अशा अनेक नैसर्गिक आपत्तीप्रसंगी संघ कार्यकर्त्यांनी विस्थापितांची जात, धर्म इ. न बघता केवळ मानवतेच्या भूमिकेतून त्यांना मदत केली आहे. रमझानच्या उपासाच्या काळात मोरवी धरण फुटल्यावर सुमारे ४००० मुस्लिम तात्पुरत्या निवार्यात रहात असताना इतरांबरोबर संघ कार्यकर्त्यांनी त्यांना देखील त्यांच्या उपासाच्या वेळा सांभाळून जेवण पुरविले होते. पुरात किंवा भूकंपात मरण पावलेल्यांना अग्नी देण्याचे काम देखील संघाच्याच लोकांनी केले होते. खालील परिच्छेद नीट वाचा.
Those who view the saffron Sangh only with jaundiced eyes may argue that in the above cases the RSS entered the fray merely because Hindus were the sufferers. Well, look then at the Sangh's role in the Bihar famine of 1966, floods in Bharatpur district of Rajasthan in May 1977, the Andhra Pradesh cyclone in November 1977, the Yamuna floods near Delhi in 1978, the Morvi Dam disaster in August 1979, the Assam riots in February 1983, the Bhopal Gas tragedy in December 1984, the Gujarat drought in 1987-88, the Kerala train tragedy near Quilon in July 1988, the Uttar Kashi earthquake in UP in October 1991, the Latur earthquake in Maharashtra in 1993, the plague epidemic in Surat in 1994, the mid-air collision disaster of Saudi Arab and Kazak aircraft at Charkhi-Dadri in Haryana, in November 1996, the fire tragedy in HPCL's refinery at Vishakhapatnam in September 1997 and the Champa train accident in Madhya Pradesh in 1997. In each of these, the Sangh was the first to come with succour.
संघाने केलेल्या कामाविषयी ही संकेतस्थळे देखील बघा आणि नंतर ठरवा मी संदर्भासहीत लिहितो की संदर्भाशिवाय?
http://www.hindu.com/2005/01/05/stories/2005010504780400.htm
http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Swayamsevak_Sangh
23 Apr 2013 - 2:55 pm | पिंपातला उंदीर
धार्मिक अस्मितांच राजकारण आणि समाजकारण करणार्या संघटनाना अशा वेळेस (नैसर्गिक आपती ) वेळेस घटना प्रसंगी हजर राहून आपण केलेल्या मदतीचे ढोल वाजवणे आवश्यक असते का? कारण तिकडे पाकिस्तान मध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईद हाफीझ पण २००५ मध्ये पाकिस्तान मध्ये झालेल्या भूकंपनंतर आपण कसे घटनास्थळी पहिले जौन मदाद कार्य केले याचे ढोल वाजवत असतो.
दोन्ही बाजूच्या कट्टर संघातनामध्ये असलेले हे अजुन एक साम्य
http://www.ndtv.com/article/people/who-is-hafiz-saeed-193645
23 Apr 2013 - 3:01 pm | बॅटमॅन
किमान या तथाकथित कट्टरपंथीयांचा तितकातरी फायदा होतो, या यूसलेस स्यूडो-सेक्युलरपंथीयांना तोंडची वाफ दवडण्यापेक्षा काय जमते दुसरे? काम करायची अक्कल नाही, दुसर्याचे काम मान्य करायचा दिलदारपणा नाही, मग चघळून रबर झालेले मुद्दे चावत विचारमैथुन करणे हा एकच उपाय उरतो अशावेळी.
23 Apr 2013 - 3:20 pm | पिंपातला उंदीर
झाले का फ्रस्ट्रेशन चे झटके सुरू पुन्हा ; )
23 Apr 2013 - 3:32 pm | बॅटमॅन
भारताला दार-उल-स्युडोसेक्युलॅरिझम न बनवता आल्यामुळे फ्रस्ट्रेशन कुणाला आलेय हे सर्वप्रसिद्धच आहे. तस्मात चालू द्या, तुम्हाला माफ केल्या गेले आहे. :)
23 Apr 2013 - 3:25 pm | मृत्युन्जय
म्हणुन काही पक्ष आणी संघटना मदत न करता नुसतेच तुंबड्या भरण्याचे आणि आगी लावण्याचे काम करतात काय?
23 Apr 2013 - 5:22 pm | श्रीगुरुजी
>>> धार्मिक अस्मितांच राजकारण आणि समाजकारण करणार्या संघटनाना अशा वेळेस (नैसर्गिक आपती ) वेळेस घटना प्रसंगी हजर राहून आपण केलेल्या मदतीचे ढोल वाजवणे आवश्यक असते का? कारण तिकडे पाकिस्तान मध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईद हाफीझ पण २००५ मध्ये पाकिस्तान मध्ये झालेल्या भूकंपनंतर आपण कसे घटनास्थळी पहिले जौन मदाद कार्य केले याचे ढोल वाजवत असतो.
वरील वाक्यात 'ढोल बडविणे' हा अत्यंत चुकीचा शब्द वापरला आहे. रा.स्व.संघ १९४७ सालापासून भारतातल्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत स्वतःहून मदतीला जातो आणि आपण केलेल्या मदतीचे व कार्याचे संघ कधीच ढोल बडवत नाही. नैसर्गिक आपत्तीत मदतीला जाणे हे आपले कर्तव्य आहे या पवित्र भूमिकेतून संघ मदतीला जातो. संघाच्या संकेतस्थळावर किंवा संघाच्या बैठकीत किंवा बौध्दिकात किंवा इतरत्र कोठेही संघाच्या मदतकार्याचे ढोल बडविले जात नाहीत किंवा संघ स्वतःहून आपल्या कार्याची प्रसिद्धी करत नाही. मी वरील जे संदर्भ दिले आहेत ते 'रीडीफ', 'हिंदू दैनिक', विकीपिडीया इ. संघाशी अजिबात संबंध नसलेल्या संस्थांचे आहेत. संघाच्या संकेतस्थळावर आपण केलेल्या मदतकार्याबद्दल कोठेही उल्लेख नसतो किंवा स्वतःची प्रसिद्धी केलेली नसते.
>>> दोन्ही बाजूच्या कट्टर संघातनामध्ये असलेले हे अजुन एक साम्य
तुमचा प्रतिसाद तुमच्या बालबुद्धीचे निदर्शन आहे. संघ आणि पाकिस्तानमधील संघटनांची तुलना करणे किंवा संघ व हाफिझ सईदची तुलना करणे हे अत्यंत मूर्ख असल्याचे लक्षण आहे.
23 Apr 2013 - 8:17 pm | पिंपातला उंदीर
तुमचा प्रतिसाद तुमच्या बालबुद्धीचे निदर्शन आहे. संघ आणि पाकिस्तानमधील संघटनांची तुलना करणे किंवा संघ व हाफिझ सईदची तुलना करणे हे अत्यंत मूर्ख असल्याचे लक्षण आहे.
एखाद्या संघटनेची zआपड डोळ्यावर ओढणे हे विचारशक्ती तुंबल्याचे आणि महमूर्ख पनाचे लक्षण
23 Apr 2013 - 8:21 pm | गणामास्तर
तुम्ही उदगिर मध्ये राहता का हो?
नाही..सहज आपली एक शंका म्हणून विचारलं.
24 Apr 2013 - 2:55 pm | श्रीगुरुजी
>>> एखाद्या संघटनेची zआपड डोळ्यावर ओढणे हे विचारशक्ती तुंबल्याचे आणि महमूर्ख पनाचे लक्षण
एक्झॅक्टली! निधर्मीवादाची झापडे डोळ्यावर लावल्यावर निधर्मांधता येणे हे कशाचे (अव)लक्षण आहे ते लक्षात आले असेलच!
23 Apr 2013 - 6:47 pm | विकास
मला वाटते संघाने कधी ढोल वाजवला नव्हता आणि आज देखील वाजवत नाहीत. प्रसिद्धीपरड्मुखता आदर्श ठेवली गेली होती. पण त्यांच्या नावाने खोटी कुंभाडे रचून शंख करणारे स्युडोसेक्यूलर आणि विचारवंत जेंव्हा अति होऊ लागले तेंव्हा त्यांना फॉर दी रेकॉर्ड हे जाहीर करणे भाग पडू लागले.
23 Apr 2013 - 9:28 pm | बंडा मामा
तुम्ही हे संदर्भ मूळ प्रतिसादात का बरे दिले नव्हतेत? ते दिले नाहीत म्हणून तुम्हाला खोटारडा ठरवणे योग्य आहे का? ह्या दोन प्रश्नांची उतरे द्या. ती टाइप करताना तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येइल.
24 Apr 2013 - 2:50 pm | श्रीगुरुजी
संघाचे मदतकार्य जगजाहीर आहे. ते तुम्हाला माहिती असेल असे वाटले होते, म्हणून मूळ प्रतिसादात संदर्भ देण्याचा आळस केला. संघाविषयी तुमचे जर काही गैरसमज असलेच तर आता संदर्भ वाचल्यावर ते दूर झाले असतील अशी आशा आहे.
28 Apr 2013 - 8:45 pm | बंडा मामा
माझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर देणे तुम्ही टाळलेत ह्यातच सगळे आहे (ते दिले नाहीत म्हणून तुम्हाला खोटारडा ठरवणे योग्य आहे का?)
29 Apr 2013 - 1:12 pm | श्रीगुरुजी
संदर्भरहीत खोटे आरोप केले तर खोटारडा म्हणणे योग्य ठरेल. पण संदर्भ दिल्यावर संदर्भ तपासूनच अभिप्राय द्यावा.
22 Apr 2013 - 3:06 pm | श्रीगुरुजी
>>> संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच. शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)
खरं पाहिलं तर संभाजी ब्रिगेड, मुस्लीम लीग, मराठा सेवा संघ, सिमी इ. जातीयवादी व कट्टर संघटनांची विचारसरणी आणि प्रत्यक्ष कारवाया याच नाझीझम/फॅसिझम इ. च्या जवळ जाणार्या आहेत.
28 Apr 2013 - 8:49 pm | बंडा मामा
नाही ह्या संघटनांकडे नाझींच्या जवळपासही पोहचेल असे संघटन, शिस्त नाही.
29 Apr 2013 - 1:18 pm | श्रीगुरुजी
>>> नाही ह्या संघटनांकडे नाझींच्या जवळपासही पोहचेल असे संघटन, शिस्त नाही.
नसेलही. पण या संघटनांची मसलपॉवर व उपद्रवमूल्य जबरदस्त आहे व त्यांना राजकीय पाठबळही आहे. त्या जोरावर संघटन व शिस्त नसताना सुद्धा ते समाजाला उपद्रव देऊ शकतात.
29 Apr 2013 - 9:08 pm | बंडा मामा
ह्या संघटना निश्चितच उपद्रवी आहेत पण त्यांची तुलना नाझी किंवा रेड आर्मीशी होऊ शकत नाही.
30 Apr 2013 - 12:43 pm | श्रीगुरुजी
>>> ह्या संघटना निश्चितच उपद्रवी आहेत पण त्यांची तुलना नाझी किंवा रेड आर्मीशी होऊ शकत नाही.
असे असेल तर समाजकार्याला वाहून घेतलेल्या व गुंडगिरी, हिंसाचार इ. न करता कोणालाही अजिबात उपद्रव न देणार्या संघाची नाझी किंवा रेड आर्मीशी तुलना कशी होऊ शकते?
21 Apr 2013 - 9:23 pm | श्रीगुरुजी
>>> संघाला कायमच हिटलर सारख्यांचे आकर्षण होते/आहे हे ही छुपे रहस्य नाही. माधव गोळवलकरांचे त्यावरील विवेचन प्रसिद्ध आहेच. शिवाय अनेक लेखकांनी नाझीझम/फॅसीझमशी संघाच्या विचारसरणीशी केलेली तुलना बिनबुडाची म्हणून उडवुन लावण्याइतकी पोकळ नाही. (संघनिष्ठांना मात्र ती तशीच जाणवणार कारण त्यांचा उघड बायस)
संघाइतकी दुसरी निरूपद्रवी संघटना नाही. ना ते कधी बंद जाहीर करून नागरिकांना वेठीला धरतात ना ते कधी पुतळे हलवा, नामांतर करा, आरक्षण द्या, स्मारक करा इ. मागण्या करून धुडगुस घालतात. रस्त्यावर मांडव घालून रस्ते अडविणे, गाणी लावून घागडधिंगा घालणे इ. संघ क्वचितच करतो. गणवेष घालून नियमित १ तास शाखेवर जाउन पद्यांचे सामूहिक गायन करणे, प्रार्थना म्हणणे, दसरा/पाडवा इ. दिवशी संचलन करणे ही संघाची मुख्य दैनंदिन कामे. या संघटनेत कधीही जातीयता पाळली जात नाही. असल्या अराजकीय संघटनेवर फॅसिस्ट्/नाझी असा शिक्का मारणे यासारखा दुसरा विनोद नाही.
>>> अर्थात त्यामुळे संघाने केलेले समाजकार्य (विशेषतः नैसर्गिक आपत्ती प्रसंगी) आणि त्यांचे चांगले गुण नाहिसे होत नाहीत जे मी ही माझ्या प्रतिसादात नाकारलेले नाहीत.
१९६२ चे चीन आक्रमण, १९८० मधील मोरवी येथील धरणफुटी, १९९३ मधील लातूरचा भूकंप, २००० मधील भूजचा भूकंप, २००४ मधील त्सुनामी या व अशा अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित प्रकोपांच्या वेळी संघस्वयंसेवकांनी जिवापाड मदत केली आहे.
संघाचा राजकारणात सहभाग नाही. पण हिंदूसंघटन हे संघाचे मुख्य कार्य आहे. ज्या देशात "हिंदू" हा शब्द उच्चारणारा देखील जातीयवादी समजला जातो, हिंदूंवरील अन्यायाविरूद्ध किंवा हिंदूंच्या बाजूने बोलणारा व इतर धर्मातील वाईट गोष्टींवर टीका करणारा जातीयवादी समजला जातो व इतर धर्मियांच्या वाईट गोष्टींना पाठिंबा देणारा निधर्मी समजला जातो त्या देशात संघासारखी संघटना अत्यावश्यक आहे.
देशात व परदेशात हिंदूवर अन्याय होत असेल तर संघ आवाज उठवितो. पाकिस्तान, बांगलादेश इ. देशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार, श्रीलंकेतील तामिळांवरील अत्याचार इ. गोष्टींविरूद्ध संघ आवाज ऊठवितो.
हे आहे संघाचे तत्वज्ञान -
Antidote To Self-Oblivion
The idea of founding the Rashtriya Swayamsevak Sangh was conceived at a time when self-oblivion had overtaken the society. The struggle for political independence occupied the minds of people; this was but natural. However, what was askew was the tacit assumption that the advent of freedom would automatically usher in a revival of genuine nationalist values which had perforce receded during foreign rule. Looking to the West as the pinnacle of civilization, irrationally perpetuating the Britishers' self serving theories of the 'White Man's burden'; that the Hindus were 'a nation-in-the-making', that the Hindus had achieved nothing of significance in the past, that Westernisation was the only hope for 'the dying race' that were the Hindus; unquestioning acceptance of myths floated by Westerners even in the name of history (e.g., that the Aryans came from outside), that life in Bharat was and had always been at a near primitive state; - acceptance of such numerous myths had virtually become mandatory for anyone with the slightest pretensions to education or intellectuality.
Vision and Mission
There could be only one explanation for the continuing march of the Sangh from strength to strength: the emotive response of the millions to the vision of Bharat's national glory, based on the noblest values constituting the cultural and spiritual legacy of the land and collectively called 'Dharma', comprising faith in the oneness of the human race, the underlying unity of all religious traditions, the basic divinity of the human being, complementarity and inter-relatedness of all forms of creation both animate and inanimate, and the primacy of spiritual experience. That the mission of the Sangh is in tune with a millennia old heritage itself carries an irresistible appeal.
इतरधर्मियांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी संघासारख्या निरूपद्रवी व देशभक्त संघटनेचा बागुलबुवा उभा केलेला आहे.
22 Apr 2013 - 1:36 pm | आशु जोग
साठ खासदार, अटलजींनी सांगितलय इ. गोष्टी
कलमाडींच्या समर्थनासाठी पुण्यातील स्थानिक लोकांनी पिकवल्या होत्या.
थापांना वस्तुस्थिती मानण्याची चूक करू नये. व्यक्ती नव्हे विचारधारा म्हत्त्वाची.
22 Apr 2013 - 1:41 pm | आशु जोग
एकाच वेळी संघाचा फॅसिझम इ. शी संबंध जोडायचा
आणि नैसर्गिक आपत्तीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीने अचंबितही
व्हायचे
हे विसंगत नाही का वाटत !
देशाची फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, काश्मीरातील हिंदूंची हकालपट्टी,
ओवेसीची भाषणे, देशभरात काही संघटनांनी धर्माच्या नावाने चालवलेला आतंक
या सगळ्या गोष्टी होवूनही संघाने मदतकार्यात धर्मावर आधारीत भेदभाव केलेला
नाही. हे उल्लेखनीय आहे.
संघाने चालवलेल्या कोणत्याही रुग्णालयात धर्म पंथ न पाहता रुग्णाला मदतकार्य
केले जाते.
ज्यांना फार शंका आहेत. त्यांच्या शंका नुसत्या शब्दांनी दूर होणे शक्य नाही.
एकच सांगेन, या गोष्टींची प्रत्यक्षच पाहणी करावी.
जमल्यास त्या कार्यात सामील व्हावे.
बा द वे
संघाचे कार्य उघड ओपन खुलेपणाने चालते.
कुणीही पाहू शकते, सामील होऊ शकते
23 Apr 2013 - 12:28 am | बंडा मामा
विसंगत नाही त्याला संतुलित विचार म्ह्णतात. संघाच्या कार्याने मी अचंबित झालो असे लिहिले नसुन त्यांच्या कार्याचीही मला जाणिव आहे असे लिहिले होते. (नुसतीच टी़का करायची किंवा नुसतेच भारावुन जायचे ह्याला विचारांचा असंतुलितपणा म्हणातत.)
23 Apr 2013 - 11:19 am | आशु जोग
बंडा मामा
जरा सांगा जे समज तुम्ही संघाबाबत करून घेतले आहेत
ते खरे आहेत की खोटे हे पाहण्यासाठी काय केलेत.
संघ इंटरनेटवर गूगळून सापडत नाही तो प्रत्यक्ष पहावा लागतो.
23 Apr 2013 - 9:30 pm | बंडा मामा
विसंगतीच्या मुद्द्याचे खंडन झाले आहे असे मानतो.
असे असल्यास ह्या इंटरनेटवरील चर्चेत तुम्ही भाग घेण्याचे प्रयोजन समजले नाही.
24 Apr 2013 - 1:37 am | आशु जोग
बंडा
आत्तापर्यंत तुम्ही सीरियसली चर्चा करताय असे मी समजत होतो.
संघ इंटरनेटवर गूगळून सापडत नाही तो प्रत्यक्ष पहावा लागतो.
यात काय चूकलं ?
इंटरनेटपूर्वीही संघ होताच की .
प्रत्यक्ष पाहील्यास अधिक चांगला संघ समजेल. तुम्ही वंदा किंवा निंदा त्याबद्दल आक्षेप नाही
पण जे काय आहे ते जवळून पहा. एवढेच सांगणे आहे.
28 Apr 2013 - 8:48 pm | बंडा मामा
मी अजूनही सिरीयसलीच चर्चा करतोय. (मला खोटारडा, काविळ झालेला, बालबुद्धी वागैरे संबोधने लावली असली तरी).
तुमचे मुळातले गृहितक चुकिचे आहे हे दाखवायचे होते. उद्या कुणी काँग्रेसवर टीका केली तर तुम्ही काँग्रेस पक्षात भाग घेऊन अनुभव घेतला आहे का? असे विचारणार का?
28 Apr 2013 - 9:22 pm | आशु जोग
बंडाभाऊ
तुम्हाला मी कोणतीच विशेषणे लावलेली नाहीत.
तुमचे संघाबाबत काय मत असावे याबद्दलही काही म्हणणे नाही.
पण
प्रत्यक्ष पाहणी करावी. त्यानंतर हवे ते मत बनवावे.
इंटरनेटवर संघ समजणार नाही. काँग्रेसबद्दलही मी तेच म्हणेन.
आळशीपणा सोडून प्रत्यक्ष कामाची पाहणी करा.
अभ्यासोनि प्रकटावे !
28 Apr 2013 - 9:50 pm | बंडा मामा
इथे काँग्रेसवर तुटून पडणारे सदस्य (उदा. श्रीगुरुजी वगैरे) ह्यांनी काँग्रेस जवळून पाहिली आहे का? त्यांनी काँग्रेसमधे प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे का? पण त्यांनी जेव्हा काँगेसवर टीका केली तेव्हा त्यांना तुम्ही आळशी म्हंटलेले दिसले नाही.
28 Apr 2013 - 10:02 pm | आशु जोग
बंडा
आता बास कर पकवणे
29 Apr 2013 - 1:59 am | बंडा मामा
:) मुद्दे संपले का?
29 Apr 2013 - 5:18 am | बंडा मामा
"
आता बास कर पकवणे"
एकेरीवर उतरुन सिरियस चर्चांमधे असली विधाने करणे हे तुमचे संघाचे संस्कार नाहीत अशी अपेक्षा करतो. ज्या संघाचा तुम्हाला इतका अभिमान आहे त्याची भलावण करताना उर्मटपणे असे जाहिर फोरम्सवर लिहिल्यास त्याचे नुकसानच होणार नाही का?
29 Apr 2013 - 11:02 pm | आशु जोग
एवढा का वैतागतोस !
29 Apr 2013 - 5:22 am | बंडा मामा
मुद्दा क्र. ३
कुणीही संघात जाऊन सहभागी व्हावे अशी तुमची इच्छा असेल तर स्वातंत्र्यवीरांचे हे वाक्य आधी खंडन करुन दाखवा;
"the epitaph for the RSS volunteer will be that he was born, he joined the RSS and he died without accomplishing anything".
सावरकरांच्या सारख्या तेजस्वी बुद्धीमत्तेच्या व्यक्तिचे हे मत..तुमची आमची तर गणतीच नको.
29 Apr 2013 - 6:05 am | विकास
सावरकर म्हणाले (without accomplishing anything) तसे जर संघाने काहीच केले नसेल असे तुमचे मत असेल तर संघाबद्दल परत परत चर्चा कशाला करावी लागत आहे?
आणि हो सावरकर (हिंदूत्वाच्या व्याख्येपासून) अजून बरेच काही म्हणाले आहेत ते सगळे पण तुम्हाला मान्यच आहे असे आता गृहीत धरतो.
29 Apr 2013 - 7:49 pm | श्रीगुरुजी
हे वाक्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नक्की केव्हा, कोणाला उद्देशून व कोणत्या संदर्भात म्हटले आहे?
29 Apr 2013 - 9:12 pm | बंडा मामा
श्रीगुरुजी, अभ्यास कमी पडतो आहे का?
30 Apr 2013 - 12:46 pm | श्रीगुरुजी
अजिबात नाही. तुमचाच अभ्यास कमी आहे. या वाक्याच्या मागचे-पुढचे पूर्ण संदर्भ दिले असते तर हे वाक्य तुम्ही इथे टाकलेच नसते. म्हणूनच मुद्दामच मी तुम्हाला या वाक्यामागचे संदर्भ मागितले. ते वाचलेत तर हे वाक्य इथे टाकण्यात चूक केली हे तुमच्या लक्षात येईल.
24 Apr 2013 - 1:26 am | अनामिका
चला संघद्वेषाच्या काविळीने ग्रस्त सदस्य एकमेकाना टाळी देत टिपर्या खेळा आता
28 Apr 2013 - 11:15 pm | पिशी अबोली
जे वर संघात मुस्लिम द्वेत, जातीयवाद वगैरे असल्याचा मुद्दा सतत काढत आहेत त्यांच्यासाठी-
आमच्या घरात लहानपणापासून मी अनेक संघ कार्यकर्ते,प्रचारक यांना बघत आलेय. सगळ्या जातींचे, सगळ्या प्रांतातले लोक माझ्या घरात मोकळेपणाने वावरतात. इतकच नव्हे तर आमच्याकडे एक संघप्रचारक यायचे जे मुसलमान होते.
मला बरीच मोठी होईपर्यंत जात हा प्रकारच माहीत नव्हता. शाळेत गेल्यानंतर लोकांकडून ऐकून कळला. पण अजूनही फारसा समजत नाही. संघ शिक्षा वर्ग, कौटुंबिक मेळावे इ. ठिकाणी तर कधीही समजत नाही. प्रत्येकाला समान नियम असतो.
वर जे म्हटलेच आहे ते परत म्हणते. चार-पाच तथाकथित विचारवंतांची मते वाचून संघ कळला म्हणणार्यांची कीव येते. संदर्भ मागत बसण्यापेक्षा स्वतः जाऊन बघा.
29 Apr 2013 - 7:13 pm | आजानुकर्ण
http://www.rss.org//Encyc/2012/10/23/Basic-FAQ-on-RSS.aspx
संघाच्या संकेतस्थळावरील ही माहिती आहे. मात्र तुमच्याकडे येणारे संघप्रचारक हे मुसलमान असल्याचे दिसते. त्यावरुन भारतातील संघप्रचारक असलेले मुसलमान हे हिंदू असतात असा निष्कर्ष काढता येईल.
29 Apr 2013 - 7:49 pm | विकास
त्यावरुन भारतातील संघप्रचारक असलेले मुसलमान हे हिंदू असतात असा निष्कर्ष काढता येईल.
संघाच्या विश्व संवाद केंद्राच्या संस्थळावरील या रिपोर्टमधे पण असेच काहीसे दिसले... मुस्लीम राष्ट्रीय मंचचा संघ शिक्षा वर्ग
मुस्लीम राष्ट्रीय मंचचे चेपू पान पण आहे असे दिसतयं...
असो.