भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

सातारकर's picture
सातारकर in जनातलं, मनातलं
4 Jan 2010 - 9:58 am

मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं. परंतू तिसरा भाग लिहायच्या आधीच तेलंगाणाची आणि तदनंतर वेगळ्या विदर्भाची देखील मागणी पुढे आली.

भाग - १, भाग - २

या भागात बाबासाहेबांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधाची कारणं आणि ४ (३ मोठी + मुंबई) राज्यांच्या समर्थनाची कारणं आहेत.

ह्यापुढे आपण आज जी तुलना करतो मुंबईची आणि मद्रास किंवा कलकत्त्याची तिच्याच आधारान बाबासाहेब देखील अस म्हणतात की ही कॉस्मोपॉलिटन (मराठी ?) शहरं जर त्या त्या राज्यात राहू शकतात तर मुंबई का नाही, आणि ह्याच कारणासाठी कोणताही मराठी माणूस मुंबई वेगळ करण का सहन करेल? मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करावी ह्यासाठी

महाराष्ट्राच्या बाजूनी खालील मुद्दे आहेत;

१. मुंबई मराठी माणसाच्या भांडवलावरती वर आलेली नाही, मान्य, पण मग कलकत्ता फक्त बंगाल्यांच्या आणि मद्रास फक्त मद्राश्यांच्या भांडवलावर उभारले आहेत का ?

२. मुंबईला पाणि, वीज आणि मनुष्यबळ यांचा पुरवठा उर्वरीत महाराष्ट्रातून होतो (इथे मुंबई वेगळी करा म्हणणारे दाभोळकर आठवले). महाराष्ट्र कोणत्याही क्षणी मुंबईच रुपांतर मोहेंजोदोडो मधे (City of the dead) करू शकेल.

३. गुजराती लोकांची, मराठी लोक त्यांच्याशी भेदभाव करतील ही भीती निराधार आहे. घटनेन तस करता येण अशक्य आहे.

आता वरील मुद्यांच्या विरुध्द आणि मराठी लोकांसाठी विचार करण्यासारख;

१. महाराष्ट्र मुंबईच्या विकासाठी पुरेस भांडवल उपलब्ध करू शकतो काय

२. जर या शहराची आर्थिक स्थिती बिघडली तर इथे राहणार्‍या मराठी लोकांच्या राहणीमानाच्या स्तरावरती काय परिणाम होइल? मराठी लोकांनी हे विसरता कामा नये की महाराष्ट्र हे एक कारकून आणि भोई (coolies) लोकांच राष्ट्र आहे.

आता ह्यापेक्षा एक वेगळा मुद्दा देखील इथे येतो. तो म्हणजे अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेचा. इथे सर्वत्र अल्पसंख्य म्हणजे हिंदू धर्मातील क्षत्रीय सोडून इतर जाती (इतर धर्म नाही). जर संयुक्त महाराष्ट्र झाला तर त्यांना जायला कुठेही जागा उरणार नाही. ज्यावेळेला गांधींच्या मृत्यूनंतर ब्राम्हणांना गाव सोडून जाव लागल तेंव्हा ते सगळे शहरांमधे जाऊन राहीले आणि आता सुरक्षित ठीकाणी पोचल्यावर तेच लोक संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत आहेत. (जर वेगळी राज्य केली तर ही समस्या कशी सुट्णार हे नक्की कळल नाही)

ह्यात मुख्य चिंता व्यक्त केली आहे ती मराठवाड्याबद्द्ल. त्यावेळेला (१९५५) पुर्व महाराष्ट्र (विदर्भ) आणि पश्चीम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा हा अत्यंत मागासलेला भाग होता. पुर्व महाराष्ट्र हा औद्योगिक, व्यवस्थापकीय (administrative), न्यायव्यवस्था, करव्यवस्था (revenue) या सगळ्याच बाजूंनी पुढारलेला आहे. या दोन प्रगत भागांच्या मधे मराठवाड्याची ससेहोलपट होण्याचीच शक्यता जास्त. निजामाच्या या भागाकडच्या २०० वर्षांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शैक्षणिक दृष्ट्यादेखील मराठवाडा इतरांच्या मागे आहे. जर भविष्यात हा भाग पुणे विद्यापिठाच्या कार्यकक्षेत गेला तर त्याची अधोगती होण्याचीच शक्यता जास्त, कारण प्राप्त काळात पुणे विद्यापिठातील आणि मराठवाड्यातील शिक्षणाच्या दर्जात फार मोठी दरी आहे. मराठवाडा हा केवळ मागासच आहे अस नाही तर येथील लोक याबाबतीत उदासीन देखील आहेत.

ह्या तिन्ही राज्यांची उपलब्ध आकडेवारी अशी;

----राज्य------------लोकसंख्या---------क्षेत्रफळ--------उत्पन्न
पश्चीम महाराष्ट्र------12677316--------30028-------262420441
मध्य महाराष्ट्र-------12409044--------55482-------216380095
पुर्व महाराष्ट्र-----------8027130--------39004--------94111012

याशिवाय संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचंड आकारामुळे देखील त्याच व्यवस्थापन अवघड होउन बसेल. संयुक्त महाराष्ट्राची खरोखर काय गरज आहे? उद्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेश बरोबर युद्ध करायचे आहे का?

अजून एक महत्त्वाची गोष्ट जी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात असलेली ती म्हणजे मराठा मंत्र्यांची राजकीय अक्षमता (incapability). काँग्रेसमधे महाराष्ट्राच्या नेतृत्वाला काहीही किंमत नाही. जर तीन राज्य केली तर तीन मुख्यमंत्री आणि तिप्पट मंत्री यांना संधी मिळेल आणि जास्त मराठी पुढार्‍यांना संधी मिळेल, जेणेकरून अंतीमतः केंद्रात वजन वाढेल.

प्राप्त परिस्थीतीत मुंबई विधीमंडळात प्रगत असलेल्या पश्चीम महाराष्ट्रातील सदस्यांच प्राबल्य आहे. मुंबई विधिमंडळात एकूण सदस्य – ३१५ मराठी सदस्य – १४९ मंत्रिमंडळ (Council) – ७२ मराठी – ३४ या संख्याबलावरून मराठी मुख्यमंत्री व्हायला हवा हे सरळ आहे. परंतु मुख्यमंत्रीपदासाठी उभे राहेलेल्या श्री. भाउसाहेब हीरे यांना खाली बसवून वर मोरारजी भाई देसाईंच नाव पुढे करायलाही त्यांनाच सांगितल. ही महाराष्ट्राच्या पुढार्‍यांसाठी अत्यंत अपमानास्पद गोष्ट आहे. ह्यावरून काँग्रेसमधे मराठी पुढार्‍यांना काय किंमत आहे ते स्पष्ट होत. गैर्-काँग्रेसी पुढार्‍यांची केंद्रात फार पत आहे अशातला काही भाग नाही. आजमितीला श्री. टिळक, श्री. गोखले, श्री. रानडे यांच्या तोडीचा एकही पुढारी महाराष्ट्रात नाही.

जर पश्चीम महाराष्ट्रातील पुढार्‍यांची ही अवस्था, तर उद्या संयुक्त महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या पुढार्‍यांची काय अवस्था होइल.

पाली भाषेतील साहित्यानुसार पुर्वीपासून त्रै-महाराष्ट्र असा उल्लेख सापडतो. त्यामुळे ३ मराठी राज्यांचा प्रस्ताव नवा नाही. जातिंच्या आधारावर जरी विचार केला तरी,जे संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्ण आहे की एका जातीतल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनादेखील एकमेकांबद्द्ल काय वाटत? सातारच्या मराठा जातीच्या माणसाला औरंगाबादच्या मराठा जातीच्या माणसाबद्द्ल प्रेम आहे का? नाशिकच्या मराठा जातीच्या माणसाला रत्नागिरीच्या मराठा जातीच्या माणसाबद्द्ल काय वाटत ?

सद्ध्याच्या मुंबई कॅबिनेट मधील सर्व मराठा मंत्री सातारा (= सातारा + सांगली) आणि नाशिक मधले आहेत, कोकणातील एकही नाही.

याच्याशिवाय मराठी भाषिक भाग गैर्-मराठी राज्यांना देण हा उद्योग केवळ महाराष्ट्र द्वेषातून आणि महाराष्ट्राचे पंख छाटण्यासाठी केलेला उद्योग आहे.

सारांश :
१. संयुक्त महाराष्ट्र बनवण्यामागे महाराष्ट्राचा – मराठी माणसाचा काही फायदा होणार आहे अस दिसत नाही. किंबहुना नुकसानच होण्याची शक्यता जास्त.
२. जर संयुक्त महाराष्ट्र झालाच तर मराठवाडा पुर्व आणि पश्चीम महाराष्ट्राच्या मधे भरडला जाईल.
३. एकाच महाराष्ट्रामुळे एकावेळेला एकच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ असेल पण ४ मराठी राज्य केली असता ४ मुख्यमंत्री आणि त्यांची मंत्रीमंडळ अस होइल जेणेकरून जास्त लोकांच प्रशिक्षण होइल.
४. लहान आकारांमुळे राज्य करण सोप होइल.
५. मुंबईच महाराष्ट्र शहर राज्य या नावान एक वेगळ मराठी राज्य कराव.
६. मराठी भाषकांचा इतर राज्यांना जोडलेला भाग केवळ आकसान जोडलेला असून, तो परत त्या त्या मराठी राज्यांना जोडण्यात यावा.

मला इथे प्रकर्षान एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, काँग्रेस नी महाराष्ट्राला कायमच डावलल आहे, अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली आहे याबाबतीत सर्व मराठीजनात, काँग्रेसचे सोडून (…), एकमत दिसत आणि तरीही इथे सर्वात जास्त काळ तोच पक्ष सत्तेत आहे हा फारच मोठा विनोद आहे.

संदर्भ : Thoughts On Linguistic States by Dr. B.R. Ambedkar (1955)

इतिहाससमाजभूगोलमतमाहिती

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

10 Mar 2014 - 4:47 pm | प्रमोद देर्देकर

विचार करायला लावणारा लेख म्हणुन वर काढतोय. त्यातील दाभोळकरांचा लेखही मस्त भरपुर माहिती मिळते.

ऋषिकेश's picture

10 Mar 2014 - 5:32 pm | ऋषिकेश

उत्तम लेख. आधी कसा निसटला माहित नाही.
प्रमोद देर्देकर यांचेही आभार!

आत्मशून्य's picture

10 Mar 2014 - 5:49 pm | आत्मशून्य

रोचक लिखाण.

पुतळाचैतन्याचा's picture

10 Mar 2014 - 8:30 pm | पुतळाचैतन्याचा

मराठी माणसाची एकजूट असणे हे फार महत्वाचे आहे. वेगळी राज्ये निर्माण करून विशेष फरक पडणार नाहीये. प्रत्येक प्रदेशातून नेतृत्व निर्माण होणे महत्वाचे आहे. उदा. नारायण राणे हे कोकणच्या एका विशिष्ट भागात थोडा फार का होईना विकास नेत आहेत. तसा प्रत्येक प्रादेशिक नेत्याने नेला पहिजे. आता प्रफुल पटेल अथवा गडकरींनी विदर्भात काय केले हे जनतेने विचारले पाहिजे. नुसते राज्याचे तुकडे करा बोलणारे नेते मंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत. असले राज्य तोडणारे विचार हे पक्के कोन्ग्रेसच्या सोयीचे आहेत.