सांगा पतंग कुणी हा पाहिला?
संक्रांतीचे दिवस जसे जवळ येतात तसे पतंग उडवण्याचेही दिवस येतात. काही ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवायला सुरूवात करतात. पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण लुटतात. या आनंदाच्या वेळी अनेक वेळा अपघात होतात व अनेक जण आपल्या प्राणाला मुकतात. मी पतंगामुळे होणार्या नेहमीच्याच अपघातांबद्दल- जसे वीज वाहक तारेला स्पर्श होणे, उंच इमारतीवरून पडणे आदी.- बोलणार नाही. हे असले अपघात पतंग उडवणार्यांना होतात. पतंग उडवणारे जर काळजी घेवून उडवत नसतील तर होणार्या परिणामांना तेच जबाबदार असतात. हे ठिक आहे. दुरर्या प्रकारच्या अपघातांच्या प्रकारात पतंग उडवून आनंद एक जण घेतो व त्यामुळे होणार्या अपघात दुसर्यांचेही होतात.
असले अपघात माझ्या बाबतीत दोन वेळा घडले आहेत.
एकदा मी व माझा मित्र मोटरसायकलवरून शहराच्या हमरस्त्याने जात होतो. मोटरसायकल माझा मित्र चालवत होता व मी पाठीमागे बसलो होतो. त्याच वेळी एक पतंगाचा मांजा आडवा आला. म्हणजे पतंग कटली होती व त्याचा मांजा अगदी खाली आलेला होता. पतंग व धागा लुटणारी मुले पतंगाच्या मागे होती. त्याच वेळी तो मांजाचा धागा नेमका माझ्या मित्राच्या गळ्याला लागला. हे सगळे अचानक घडले. एकतर संध्याकाळची वेळ व मांजा बारीक असल्याने दिसण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या मित्राला काहीतरी घडल्याची जाणीव झाली त्याने चालत्या गाडीवरूनच गळ्याला हात लावला व गाडी गियरमध्ये असल्याने गाडी बंद पडून व तोल जावून आम्ही दोघेही खाली पडलो. तो पर्यंत माझ्या मित्राचा गळा कापला गेलेला होता. त्यातून रक्त बाहेर येत होते. मांजा लुटणारे पसार झालेले होते. पतंग उडवणारा तर कोठे असेल त्याचा अंदाजपण करणे चुकीचे होते. दवाखान्यात गेल्यानंतर जास्त काही न दुखापत झाल्याचे समजले. मित्राने गाडी लगोलग थांबवल्याने गळा कमी प्रमाणातच कापला गेलेला होता.
त्याच्याच दुसर्या वर्षी मी मोटरसायकलवरूनच जात होतो. नेहमीप्रमाणे माझी हेल्मेट डोक्यावर होती. तोच माझ्या अगदी समोरून मला पतंगाचा मांजा दिसला. पतंगांचे दिवस व मागचा अपघात माझ्या लक्षात होता. मी तो मांजा माझ्या उजव्या हाताने आडवायचा प्रयत्न केला. तो मांजा त्यामुळे हातात आला. मागच्या सारखीच गाडी गियरमध्ये बंद पडली. या वेळी मी खाली पडलो नाही, पण पतंग उडवणारा मांजा ओढत असल्याने माझा तळहात कापला गेला व पुर्ण तळहात भरून दोन ठिकाणी कापल्या गेल्याच्या जखमा झाल्या. जखमेत मांजाला लावलेल्या काचा गेल्या होत्या. लगोलग ड्रेसिंग केले. ती चिघळलेली जखम पुर्ण भरायला जवळपास दिड महिना गेला होता. दोन वेळा इंजेक्शनही घ्यावे लागल्याचे आठवते.
त्याच वर्षी असल्याच कटलेल्या पतंगामुळे मोटरसायकलवरचा अपघात सिन्नर (जि. नाशिक) शहरात होवून अगदी लहान मुलीचा बळी त्यात गेलेला होता. एक मामा आपल्या ५/६ वर्षांच्या भाचीला कायनेटीक या स्कुटरवरून जात होता. कायनेटीकच्या पुढील भागात असणार्या फुटरेस्टवर ही लहाननगी उभी होती. रस्त्यात कधीतरी त्या चिमुरडीच्या गळ्याला कटलेल्या पतंगीचा मांजा चाटुन गेला व तिचा गळा कापला गेला. ते तिच्या मामाच्याही लक्षात आले नाही. ते थोडे पुढे गेल्यानंतर त्या मुलीने मान टाकलेली होती. गळा कापला जावून तिचा तेथेच अंत झाला होता.पतंग उडवणारे आपला आनंद घेत होते पण त्यात तिला प्राणांची बाजी लावावी लागली.
रस्त्यात पतंग उडवणारे फारच खालच्या उंचीवरून पतंग उडवत असतात. मांजा हा मोटरसायकलच्या उंचीवरून जातो. त्यानेच वरीलसारखे अपघात होतात त्यांचे परिणाम पतंगाच्या संबंघीत नसणार्या व्यक्तिही भोगतात.
पतंग उडवणारे पतंग उडवतीलच. चेन्नयी सारख्या शहरातले 'पतंग उडवण्याची बंदीचे' कायदे त्यांना लगाम घालू शकत नाही. आपणच आपली काळजी घेतली पाहीजे.
प्रतिक्रिया
25 Dec 2009 - 3:14 pm | सौरभ.बोंगाळे
छान लेख आहे. पतंग उडवणाऱ्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि आपल्या परिसरातील ईतरांनाही शहाणे करावे. :)
25 Dec 2009 - 3:27 pm | अवलिया
श्री रा रा पाषाणभेदजीसाहेब
आपला लेख छान आहे.
धन्यवाद.
--अवलिया
25 Dec 2009 - 5:54 pm | चिरोटा
पतंग उडवणार्या मिपाकरांनी आवर्जुन वाचावा असा लेख.
भेंडी
P = NP
25 Dec 2009 - 7:48 pm | स्वाती२
समयोचित चांगला लेख!
25 Dec 2009 - 8:20 pm | प्रकाश घाटपांडे
या निमित्त ऋषिकेशचा आजी आजोबांच्या वस्तु- पतंग आणि मांजा हा लेख आठवला.
अवांतर - आजच ऋषीकेशचा पतंग गगनात गेला. भर्यारा मारतोय आत्ता.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
25 Dec 2009 - 9:17 pm | प्राजु
अगदी समायोचित लेख.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
26 Dec 2009 - 8:30 am | विनायक प्रभू
शिर्षक वाचुन वाटले की सध्या एक राजकिय पतंग उडुन राहीला आहे त्या बद्दल लेख असावा.
असो.
चांगला लेख.
27 Dec 2009 - 1:25 pm | शक्तिमान
माझा पण गळा कापला गेला होता पतंगामुळे एकदा...
एखाद्या सैनिकासारखी अजुनही ती खूण मी गर्वाने दाखवतो :P
आता दुरुनजरी पतंग दिसला तरी मी गाडी एकदम सावकाश चालवतो...
29 Dec 2009 - 2:42 am | पाषाणभेद
http://www.misalpav.com/node/10604#comment-171359
बा शक्तिमाना दाखव बाबा आता तुझा गळा. लोकं काय काय पुरावा मागतील सांगता येत नाही.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
27 Dec 2009 - 3:37 pm | ज्ञानेश...
पतंगाचा मांजा गळ्याला लागण्याचा प्रकार प्रथमच ऐकतोय. (म्हणजे वाचतोय.)
आमच्याकडे पतंग घराच्या छतावरून उडवतात. त्यामुळे मुले छतावरून खाली पडण्याचे अपघात मात्र घडलेले आहेत.
काही वेळा मांजामुळे पक्ष्यांचेही जीव जातात, असे दिसते.
27 Dec 2009 - 3:52 pm | सुनील
काचामिश्रित मांज्याला ह्या वर्षीपासून बंदी घालणार, अशी बातमी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात वाचली होती. बंदी असा मांजा वापरण्यावर हवी, पतंग उडवण्यावर नव्हे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Dec 2009 - 10:05 pm | Nile
काहीच्या काही बोलणे थांबवा! याचा काही दुवा असेल तर द्या आधी. कटलेल्या पतंगाच्या मांजाने कापुस सुद्धा कापला जाणार नाही.
मांजावर लावलेली काच ही बारीक करुन लावलेली असते, कधी मांजा बनवताना पहा. लेखात वाचुन एखाद्याला वाटेल काचेचे इंच इंच तुकडेच लावलेत मांजावर!
29 Dec 2009 - 2:46 am | पाषाणभेद
निळे, मी बघतोय, बहूतेक घाग्यांशी पंगा घ्यायचेच काम करतात तुम्ही. एकतर स्वता: काही लिहीत नाही अन दुसरा लिहीतो त्यात खोडा घालायचे काम करतात. तुम्ही तिकडे राहतात म्हणून काही तुमचेच म्हणणे खरे ठरत नाही.
"काहीच्या काही बोलणे थांबवा! याचा काही दुवा असेल तर द्या आधी. कटलेल्या पतंगाच्या मांजाने कापुस सुद्धा कापला जाणार नाही. "
एक मिनीट, मी काहीच्या काही बोलत नाहीये. मी पेपरात आलेल्या सत्यघटनेच्या बातमीबद्दल बोलतोय. ती सुध्दा दोन पेप्रात आलेल्या. मी तर अजुन काही पत्रकार नाही अन माझा काही पेपर नाही. अन पेप्रांमध्ये रचलेल्या कथा असलेल्या बातम्या अजून छापायची प्रथा नाही. तितकी नैतिकता वृत्तपत्रांनी बाळगली आहे.
वाटल्यास त्या पेप्रांचे नाव देतो त्याचे मागील अंक चाळून पहा. अन त्या काळात त्या पेप्रांचे तुमच्याकडच्यासारखे ऑनलाईन अंक नसण्याची शक्यता फारच आहे. अन तुमच्यासाठी मला ऑफलाईन हार्डकॉपी अंक शोधण्याची अजीबात गरज पडत नाही, अन मला तितका वेळही नाही. ही काही जागतीक स्तरावरची बातमी नव्हती सगळ्या जगात यायला अन दुवा द्यायला. स्थानिक पेप्रात आली होती. उद्या लेखात आलेल्या प्रत्येक वाक्याबद्दल, प्रसंगाबाबतीत दुवा मागाल. येवढेही ऑनलाईन ईंटरनेटचे व्यसन लावून घेवून नका. माणूस न राहता त्याचा रोबोट बनेल हो. असो.
कापुस अन माणसाच्या गुणधर्मात (Properties) अंतर आहे. कापुस हा दाब पडल्यास दाबला जातो, काँप्रेस होतो. म्हणजेच तो पतंगाच्या मांज्याच्या आघाताचे शोषण करतो (करेल). मग तो कापला कसा जाणार? अन ही घटना (व माझ्या बाबतीतील, माझ्या मित्राच्या बाबतीतील, किंवा आपल्या मिपावरील शक्तिमानच्या बाबतीत) घडली त्या वेळी आम्ही मोटरसायकलवर होतो, वेगात होतो. (कार नाही हो सामान्य लोकं आहोत आम्ही.) तो धागा कोणीतरी ओढत होते. (निदान माझ्याबाबतीत तरी ते झाले होते.) येथे वस्तुमान अन वेगाचे उदाहरण लागू होते. वस्तुमान जरी कमी असेल व वेग जास्त असेल तर अपघातात जास्त त्वरण निर्माण होते. म्हणून विमानांना अपघात एखाद्या छोट्या पक्षाने ही होतो. एखादा छोटा पक्षी पुर्ण विमान उध्वस्त करू शकतो.
आपल्याला थोडे खरचटले तरी आपली त्वचा फाटते येथे तर पतंगाचा मजबुत मांजा असतो. तुम्ही थोडेजरी विज्ञान पाठशाळेच्या लेव्हलचे निट अभ्यासले असते तर तुम्हाला मी सांगतो ते इतरांसारखे समजले असते. असले वाह्यात प्रश्न उपस्थित केले नसते. मी सांगितलेला कापसाचा प्रयोग अन तुमच्या गळ्यावरचा प्रयोग घरी करून बघा. USA मध्ये मांजा मिळणार नाही. अन भारतात ज्या वातावरणात पतंग उडवतात ते वातावरणही मिळणार नाही. तुम्ही तेथे भारतीय वातावरण तर करूच शकणार नाही पण घरी प्रयोगासाठी मांजा लागला तर सांगा. मी स्वखर्चाने पाठवून देईन. नंतर हा प्रयोग तुमच्या (कापसासारख्या) गळ्यावर करा, व निष्कर्ष व अनुमान मिपावर जाहीर करा. तुमचा गळा न कापल्या गेल्यास मी माझा गळा जाहिरपणे (हो जाहिरपणे) कापुन घेईन व त्याचे चित्रीकरण करून मी येथे चिकटवेल व आपल्याला पाठवेल.
तुम्हीच काहिच्या काही प्रश्न विचारणे थांबवा.
हां, तुम्ही ह्या धाग्याचे काही विडंबन केले, माझ्यावर वैयक्तिक शिवीगाळ केली तर मी काहीच बोलणार नाही. मी ते सगळे हसत हसत घेईल. तेव्हडा सेन्स ऑफ ह्युमर आहे. पण तुम्ही आमचा अनुभव व पेप्रात आलेल्या बिगरराजकिय बातमीलाच खोटे ठरवताय म्हणून मी चिडलोय.
ती बिचारी गरीब मुलगी मेली हो मांजा लागून.
"मांजावर लावलेली काच ही बारीक करुन लावलेली असते, कधी मांजा बनवताना पहा."
मांजा कसा बनवतात ते मांजा बनवलेल्याला व पतंग उडवलेल्याल्या मला सांगू नका. पुर्वी पतंग उडवायसाठी १४ जानेवारीला सुटी नव्हती म्हणून रजा पण घेतलेली आठवते मला. (हा, याचा काही पुरावा किंवा दुवा नाही बरका माझ्याकडे.) उलटपक्षी तुम्ही कधीही पतंग उडवलेला दिसत नाही. किंवा उडवला असेल तर फक्त चक्री हातात धरली असेल. अहो, पतंगाच्या मांज्याने हाताची बोटेही कापली जातात. कोणाही शेंबड्या पोराला विचारा. काहीतरी आपलं, उचलली बोटे अन लावली कळफलकाला करू नका. पहिल्यांदा मांजा बनवा, मग पतंग उडवा अन मग गळा कापतो की नाही ते बघा अन मग येथे फोटो चिकटवा. मग बघू काय होते ते.
एक माझे अनुभव सोडा हो. मी तर काय खोटेच लिहीले असेल नाही का? पण आपल्या शक्तिमानला तर मी काही अमुक अमुक लिही असे म्हटले नव्हते ना? अजुन इतकीही कंपुबाजी सुरू झालेली नाही.
अवांतर : बा शक्तिमाना दाखव बाबा आता तुझा गळा. लोकं काय काय पुरावा मागतील सांगता येत नाही. अन्य मिपाकरहो, लेखावरील प्रतिक्रिया नाही पण तुमचा अनुभव लिहा हो मांज्याबद्दल.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 3:42 am | Nile
ह्याचा काय संबंध? जर कुणी चुक लिहित असेल तर ते दाखवण्याकरीता अमुक इतके लेख लिहिले पाहिजे असा नियम मिपावर ऐकल्याचे आठवत नाही.
पेपरांची नावं द्यायला विसरलात वाटतं? त्यांची नैतिकता आम्हाला चांगलीच माहीत आहे.
अहो साधं नाव द्या हो आधी बाकीची चर्चा सविस्तर करुच.
ओढत असलेला धागा म्हणजे पतंग कटलेला नसुन कटल्यानंतर पकडलेला होता.
दाब आणि घर्षण या मध्ये तुमचा गोंधळ झालेला दिसतो, असो.
हा हा ह. विज्ञानाचा विनोद केलात साहेब तुम्ही. पक्षी आणि विमानच्या उदाहरणात पक्ष्याचे वस्तुमान आणि वेग दोन्हीही विमानापेक्षा कित्येक पटीने कमी असतात. त्यामुळे (वस्तुमान X वेग्=) संवेग हा विमानाचाच जास्त असतो आणि त्यामुळे विमान उद्ध्वस्त होण्याचा प्रश्नच येत नाही. :)
त्वरण म्हणजे acceleration, याचा इथे काय संबंध हे मला अडाण्याला माहीत नाही, तुम्ही ऑनलॉईन विज्ञान शिकवता का? फुकट की दमड्या मोजुन?
तुमच्या कडुन विज्ञान शिकायलाच पाहिजे असे दिसते, निदान करमणुकतरी होइल. :)
पंधरा वर्ष नित्यनेमाने, विजेच्या धारेचा धक्का न लागता, छतावरुन न पडता आणि कुणाचाही गळा न कापता पतंग उडवलेला आहे त्यामुळे असले प्रयोग तुमच्या साठी नविन असतील माझ्यासाठी नाही. आणि माझ्या विमानाच्या ज्ञानाचा उद्धार करुन स्वत:च हसं करुन घेण्याआधी सांगतो मी स्वतः विमान अभियंता आहे. बाकी तुमचं चालुद्या.
पंगा म्हणा नाही तर काहीही म्हणा, जे चुक असेल ते दाखवायला आम्ही कुणाच्या बा ला घाबरत नाही मग भारतात राहत असु की मंगळावर.
29 Dec 2009 - 5:23 am | पाषाणभेद
निळे, आपण खरोखरच पतंग उडवलेला दिसत नाही. विमान अभियंता झालात (बाय द वे, एयरोडायनॅमीक ही पण एक शाखा आहे ना विमान इंजीनीअरींग मध्ये? (हा सरळ प्रश्न आहे.)) म्हणून काही पतंग व त्याच्या बाबतीत होणारी काटाकाटी माहीत असेलच असे नाही. तुमच्या ज्ञानाचा प्रॅक्टीकल उपयोग अंमलात आणा म्हणजे झाले.
त्वरणाच्या बाबतीत मी शब्द चुकीचा वापरला असेल. पण मी सांगीतलेले अपघाताचे व वस्तुमानाचे उदाहरण शालेय पुस्तकातही सापडतील. तेच खाली ईंग्रजीत दिले आहे. ते बघा.
त्या काळाचे नाशिक एडिशनचे सगळे पेपर वाचा. नाहितर सिन्नर गावात चक्कर मारा, तुम्हाला सगळे पुरावे मिळतील. सगळ्याच पेपरांनी नैतिकता गमावलेली नाही. अन हा मुद्दा बिगरराजकीय बातमीचा आहे हे मी वर लिहिलेले विसरलात वाटते. (तुमच्या प्रत्येक शब्दावर वाक्यावर खल करण्याची वृत्ती पाहून तुम्ही वकिली व्यवसाय करायला पाहिजे होता.)
माझा स्वता:चा तळहात मांज्याने कापला गेलेला होता. माझ्या मित्राचा अनुभव माझ्यासमोरचा आहे. अन आपले शक्तिमान ही त्याच अनुभवातून गेलेले आहेत.
मुख्य मुद्दा तुम्ही आमचे अनुभव खोटे ठरवता त्याचा आहे. मी काय म्हणतो त्याचे च्यालेंज घ्या की मग.
"विमानाचाच जास्त असतो आणि त्यामुळे विमान उद्ध्वस्त होण्याचा प्रश्नच येत नाही. "
हो ना आम्ही काही पेपर वाचतच नाही की त्यात बातम्या येत नाही की "अमुक एक विमान पक्षाच्या धडकेने डमेज झाले म्हणून".
काहीतरी आपल लिहीत जावू नका. वरील तुमच्या वाक्यानेच तुमचे ज्ञान समजले.
हे घ्या : अन हे खालचे मी नाही लिहीले हो. ते तर गुगल करा, ढिगभर लिंका (तुमच्या भाषेत) दुवा मिळतील.
हे येथे आहे.
The force of the impact on an aircraft depends on the weight of the animal and the speed difference and direction at the impact. The energy of the impact increases with the square of the speed difference. Hence a low-speed impact of a small bird on a car windshield causes relatively little damage. High speed impacts, as with jet aircraft, can cause considerable damage and even catastrophic failure to the vehicle. The energy of a 5 kg (11 lb) bird moving at a relative velocity of 275 km/h (171 mph) approximately equals the energy of a 100 kg (220 lb) weight dropped from a height of 15 metres (49 ft)[9]. However, according to the FAA only 15% of strikes (ICAO 11%) actually result in damage to the aircraft.
Inside of a jet engine after a bird strikeBird strikes can damage vehicle components, or injure passengers. Flocks of birds are especially dangerous, and can lead to multiple strikes, and damage. Depending on the damage, aircraft at low altitudes or during take off and landing often cannot recover in time, and thus crash.
वर मी सांगितलेले वस्तुमान व वेग आलेले आहे. (ठळक मी तुम्हाला समजायला केलेले आहे.)
आणखीन दुवे पाहिजे असतील तर हे घ्या:
१) पुरावा
२) पुरावा
हा धागा म्हणतो :
There are many misconceptions by air travelers and the general public about the threat posed by birds to aircraft and their occupants. The following facts should shed some light on some of these issues.
Myth - Bird strikes cannot cause serious airline accidents.
Fact - Since 1975, nine large jet airliners have had major accidents where bird strikes played a significant role. In one case, about three dozen people were killed.
Myth - Bird strikes are rare.
Fact – Over 87,000 bird strikes to civil aircraft in the United States were reported to the Federal Aviation Administration (FAA) from 1990-2008, a mere 20% of the number that likely occurred.
अजुन बरेच प्रश्नोत्तरे आहेत हा विषय न समजणार्यांसाठी. आपले ज्ञान अगाध आहे त्या मुळे आपणास त्याची गरज नाही तरी पण त्यात काहीतरी चुका दाखवण्यासाठी वाचाल अशी आशा आहे.
तुम्हाला काहीतरी वाद घालायची सवयच आहे असे दिसते. तुम्हाला सरळ भाषा समजत नाही. तुम्ही स्वता: मी सांगीतलेले चॅलेंज स्विकारा मगच काय ते बोला. तोंडाची फुकट बडबडीला अन तुमच्या प्रत्येक नकारार्थी प्रश्नाना उत्तर देणे अशक्य आहे.
तुम्ही प्रत्येक वाक्याला प्रश्नार्थी बदलू शकतात. ही तुमची हातोटी आहे. त्याने तुम्ही चर्चेचा मुख्य मुद्दा भरकटलेल्या पतंगासारखा (आता विमानासारखा म्हणूयात) भरकटवू देत आहात.
मुख्य मुद्दे पतंगाच्या मांजाने आपले शरीर क्षतीग्रस्त होईल का हा आहे व पेपरात आलेली घटना खरी का खोटी हा आहे.
ह्या दोन्ही घटना खर्या आहेत. पहिला मुद्दा पटवून घेण्यासाठी तुम्ही माझे चॅलेंज स्विकारा मग मी दुसर्या मुद्द्याचे पेपरातले पुरावे आणून देतो.
तुम्ही चॅलेंज* स्विकारा पुढचे पुढे बघू.
* चॅलेंजमधील सिनॅरीओ माझ्या घटनेसारखे किंवा त्या अभागी मुलीच्या गाडीसारखे, त्यातील वेगासारखे, त्या घटनेतील मांज्यासारखे राहतील.
भारतात रस्त्यावरपण पतंग उडवतात व कटलेल्या पतंगीचा मांजा पण लुटला जातो हे लक्षात ठेवा. तुमच्या USA सारखे मोकळ्या मैदानात पतंग उडवत नाहीत अजुन भारतात. कटलेल्या पतंगाचा मांजा हा खालीच येतो. तो काही विमानासारखा वर वर अजूनतरी जात नाही.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 8:09 am | शाहरुख
वेळ जात नसल्याने गुगलवर "पतंग गळा अपघात" हे देऊन शोध घेतला असता पहिल्या पानावर लोकसत्ताचा हा दुवा मिळाला..
अजूनही अनेक बातम्या दिसतायत तशा.
बाकी भौतिकीय चर्चा वाचतोयच :-)
29 Dec 2009 - 8:47 am | Nile
मला एक कळत नाही, इतका धारधार मांजा, ज्याच्यामुळे गळे चिरुन जागीच लोक मरता, वापरुन लोक पतंग उडवतात तरी कसा? त्याचे हात असे चिरुन जायबंदी कसे होत नाहीत? का ते खास पतंग उडवताना हाताच्या संरक्षणार्थ बनवलेले मोजे घालुन पतंग उडवतात?
शाहरुख तुम्ही ही भौतीकीय चर्चा वाचत आहात? देव(वरचा हो!) तुमचं रक्षण करो! दगडावर डोके आपटल्याने डोके फुटते हे सामान्यज्ञान मला असल्याने मी तर आता वाचणार पण नाही आहे. :)
29 Dec 2009 - 9:25 am | पाषाणभेद
धन्यवाद शारूखभाय, आपने जो दुवा दिया है ना, वो बडे काम का है | मै जो बोल रैला था वो अपने आप साबित हो गया |
लोकसत्ताचा (१६/०२/२००४ सालचा)दुव्यातील सारांश: पाकमध्ये पतंगबाजीगरांचा जोश सात ठार, १०० हून अधिक जखमी झाले, मोटरसायकलवरून पालकांसमवेत जाणार्या १८ महिन्यांच्या एका मुलीचा पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
बघा, येथेही मोटरसायकल आहे, मांजा आहे, मुलगी आहे, पालक आहेत अन तिचा मृत्यूही मांजाने गळा कापल्या गेल्यानेच झाला आहे.
निळे साहेब, जास्त पतंग उडवणारे दर्दी शौकीन लोकं अंगठ्याजवळच्या बोटात एक रबरी ट्युबसारखे घालतात. (सिमेंटचे कामे करणारे गवंडी बोटात घालतात ते.) ते पण अलिकडच्या काळात. एखादी पतंग उडवली तर काही होत नाही. अन चक्री पकडणार्याने बोटात काही घातले नाही तरी चालते.
पुर्वी संक्रांतीच्या दिवशी ३/ ३ डझन पतंग उडवणारे हाताची बोटे सोलवटून घेत.
जावू द्या आता तरी माझे म्हणणे पटले ना? येत्या १५ जानेवारीचे पेपर वाचा म्हणजे तुम्हाला समजेल मांजा कसा असतो ते.
संक्रांतीला पतंग उडवा मात्र सेफली.
अजूनही काही दुवे पहा :
http://www.google.co.in/search?hl=hi&source=hp&q=%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A...
http://sakaalblog.blogspot.com/2008/01/blog-post_17.html
http://onlinenews.lokmat.com/php/detailedurja.php?id=Urja-56-1-18-01-200...
http://harekrishnaji.blogspot.com/2008/01/blog-post_4868.html
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 3:08 pm | उमराणी सरकार
नाईल किंवा निळे 'आभि जाव काटाकाटी' खेळलेले दिसत नाही. लहानपणी आम्ही मांजा घरीच बनवायचो, कारण दुकानातल्या मांजाला 'खत्रा' धार नसायची. माझे हात बर्याच वेळा नुसते पतंग उडवून किंवा काटाकाटी खेळून कापल्याचे आठवतात. मागे डिस्कव्हरी वर एक कार्यक्र्म बघितला होता. शूटींग रेंज वर सराव करणार्या एका माणसाची गोळी वेध चुकून बाहेर गेली आणि एका घरात बसलेल्या एका तरूणाच्या डोक्यात शिरून क्षणार्धात त्याच्या प्राणाचा वेध घेतला. त्यात त्या गोळीचा शूटींग रेंज ते मस्तकापर्यंतचा प्रवास जर बघितला तर पटते की 'काळ येणे' म्हणजे काय असते.
असो. तर निळूभाऊंना एवढेच सांगायचे आहे, की चटकन अविश्वास दाखवण्यापूर्वी तर्क करून पहावा. विज्ञान देखील तर्क आणि अनुमान यावरच आधारले आहे.
बाकी, लेख उत्तम.
उमराणी सरकार
28 Dec 2009 - 11:19 pm | jaypal
चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल अभिनंदन. थोडीशी काळजी घेतल्यास अपघातराक्षसास आपण नक्कीच जेरबंद करूशकू. थोडीसी सावधानी जिंदगीभर आसानी ;-).
![](http://indiaeventcalendar.files.wordpress.com/2009/01/kite-festival-ahmedabad1.jpg)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
29 Dec 2009 - 9:40 am | प्रमोद देव
पतंग उडवताना गच्चीवरून पडून जखमी,मृत्यू अशा बातम्या दरवर्षी वर्तमानपत्रात येतात. सायकल,मोटरसायकलवरून जाणारे अथवा पादचारी,पक्षी ह्यांच्याबाबतीतही पतंगांच्या मांज्याने जखमी होण्याच्या घटनाही वृत्तपत्रात वाचायला मिळतात. ह्या बातम्यांमध्ये अवास्तव असे काहीही नाही.
पतंग उडवणार्यांचेही हात कापले जातात...तळहात म्हणतोय मी ज्याची कातडी गळा अथवा शरीराच्या इतर त्वचेपेक्षा नक्कीच जाड असते. लहानपणी आम्हीही आमचे हात चांगलेच कापून घेतलेत.
पाषाणभेद ह्यांनी लिहिलेले आहे ते अजिबात अतिरंजित नाही तर ते ढळढळीत वास्तव आहे. तेव्हा नील ह्यांना विनंती की त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास जरूर ठेवावा. अर्थात त्यांना तसा विश्वास ठेवायचा नसेल तरीही काही हरकत नाही पण कृपा करून इथे कोणतीही टिपणी करण्याऐवजी दूर्लक्ष करावे. त्यामुळे विषयाला फाटे फुटणार नाहीत. असो.
पाषाणभेद तुम्ही असेच लिहिते राहा. छान लिहिता.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
29 Dec 2009 - 10:06 am | Nile
माझे प्रतिसाद विषयाला आणि त्यायोगे त्यांच्या प्रतिसादाला अनुसरुनच होते. तुम्हाला त्यात जर विषयाला फोडलेले फाटे दिसत असतील तर तुम्ही ते प्रतिसाद उडवु शकता.
पतंगाच्या मांजाने गळाकापुन कुणाचा मृत्यु (जागीच!) होतो हे माझ्या तर्कबुद्धीला अजुनतरी पटलेलं नाही त्यामुळे मी विश्वास ठेवू शकत नाही, क्षमस्व. हीच बातमी कुणी दुसर्याने दिली असती तरी माझी प्रतिक्रीया अशीच असती, पाषाणभेद वा अन्य तत्सम सभासदांविषयी माझ्या मनात कोणताही द्वेष वा प्रेम नाही. असो.
29 Dec 2009 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
निळ्याशी सहमत. कटलेल्या पतंगाच्या मांजाने जर गळा चिरला जाऊ शकतो तर या हिशोबात त्याच मांजाने पतंग उडवताना किमान तळहात किंवा बोटं बाकीच्या शरीरापासून वेगळे व्हायला हरकत नाही.
(सामान्य तर्काने दिलेला निळ्याच्या प्रतिसादाला पाषाणभेद यांनी दिलेले व्यक्तीगत आणि तिरकस उत्तर जर अवांतर नसेल तर हा प्रतिसाद नक्कीच अवांतर नाही.)
अदिती
-----------------------------------
नास्तिक असल्यामुळे माझा देवावर विश्वास नाही, पण स्वतःवर आहे.
29 Dec 2009 - 10:52 am | छोटा डॉन
>>पतंगाच्या मांजाने गळाकापुन कुणाचा मृत्यु (जागीच!) होतो हे माझ्या तर्कबुद्धीला अजुनतरी पटलेलं नाही
+१, असेच म्हणतो.
गळा नक्की कापला जाऊ शकतो, म्हणजे चीर पडुन रक्तस्त्राव होऊ शकतो. पण जर वेळीच उपचार झाले तर मॄत्यु संभवत नाही, वेळी उपचार न होणे हे ही अतार्किक आहे.
असो.
टु बी फ्रँक, मांज्याने गळा कापल्या जाण्याची घटना आमच्या इथ्ही घडली होती, कोणी मेलं वगैरे नाही हे नशिब आहे. मात्र शा गोष्टी शक्य आहेत इतकेच माझे म्हणणे आहे.
बाकी माझा स्वतःचा हात बर्याच वेळा मांज्यामुळे कापला गेला आहे ...
बाकी चालु द्यात.
आणि हो, ते पक्षी-विमान वगैरे जरा चुकीच्या पद्धतीने मांडले जात आहे, पक्ष्याच्या धडकेने विमान कधीच कोसळत नाही. मात्र जर पक्षी विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तर इंजिन "स्टॉल" होऊन विमान कोसळु शकते. ह्यात विमान / पक्षी ह्यांचे वस्तुमान , वेग , त्वरण, घनता ह्यांचा काही संबंध नाही हे सत्य आहे. मी स्वतः "इंजिन डिसाईन इंजिनियर" आहे त्यामुळे इंजिनात कचरा ( पक्षी : मॄत पक्ष्याचे अवषेश ) अडकल्याने इंजिन बंद पडुन विमान कोसळले ह्यावर विश्वास ठेऊ शकतो, बाकी सगळ्या लोणकढी थापा आहेत हे सांगु इच्छितो.
जर गुगलुन शोध घेतला तर अशे घटना फक्त "सिंगन इंजिन विमाने" ह्याबाबत घडली असे दिसते, कारण स्पष्त आहे.
असो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
29 Dec 2009 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार
सहमत !
स्त्री सदस्या अवखळकरतै व पुरुष सदस्य डॉन्रावांशी सहमत आहे.
@ देवबाप्पा
हे का "सुनावले" गेले ते मज पामरास कळले नाही. माननीय श्री. नील ह्यांना आजवर विनाकारण / गंमत म्हणुन / आकसाने कुठल्याही धाग्यावर प्रतिक्रीया देताना / वाद घालताना मी तरी पाहिलेले नाही.
आता माननीय श्री. नील ह्यांना एखादा मुद्दा पटला नसेल तर तो त्यांना लेखकाने योग्य प्रकारे समजवुन सांगीतला असता अथवा त्याकडे सरळ दुर्लक्ष केले असते तरी समजु शकलो असतो. परंतु हे करण्याऐवजी लेखकाने
निळे, मी बघतोय, बहूतेक घाग्यांशी पंगा घ्यायचेच काम करतात तुम्ही. एकतर स्वता: काही लिहीत नाही अन दुसरा लिहीतो त्यात खोडा घालायचे काम करतात. तुम्ही तिकडे राहतात म्हणून काही तुमचेच म्हणणे खरे ठरत नाही.
उद्या लेखात आलेल्या प्रत्येक वाक्याबद्दल, प्रसंगाबाबतीत दुवा मागाल. येवढेही ऑनलाईन ईंटरनेटचे व्यसन लावून घेवून नका. माणूस न राहता त्याचा रोबोट बनेल हो. असो.
अशा मानहानीकारक टिपण्या केल्या. त्याबद्दल सदरहु लेखकावर मायेची पाखरण करत दुर्लक्ष करण्यात आले. अशा मानहानीकारक शब्दांना उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माननीय श्री. नील ह्यांना मात्र लगेच तंबी का बरे देण्यात आली ?
काही दिवसांपुर्वी आपण स्वतः "तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळाले तर ते सहन करायला शिका" असा सल्ला दिला होतात ना ? मग आता स्वतःचाच सल्ला विसरुन तुम्ही अशी प्रतिक्रीया का बरे दिलीत ? मला तर वाटले होते की हाच सल्ला आपण पुन्हा एकदा सदरहु लेखकास द्याल. पण इथे तर उलटाच न्याय दिसत आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Dec 2009 - 12:04 pm | प्रमोद देव
तंबी? तंबी देणारा मी कोण?
मी आता संपादकही नाही. तेव्हा तसा अधिकारही मला नाही.
मी केवळ वडिलकीचा सल्ला दिला...तोही मानायचा की नाही हे ठरवायचा अधिकार नील ह्यांचा आहे आणि तो मी नाकारणारा कोण?
पराशेठ, एकूण आपल्याला आणि आपल्या मित्रांना आता माझं सल्ले देणं त्रासदायक व्हायला लागलंय...हे आपल्या प्रतिसादांतून वेळोवेळी व्यक्त व्हायला लागलंय. हरकत नाही....तरी आपल्यालाही एक फुकटचा सल्ला देतोय...माझ्या सवयीप्रमाणे ...फारसे मनावर घेऊ नका...उगाच माझ्यासारख्या चिल्लर माणसाला का महत्व देताय?
उगाच माझा टीआपी वाढतोय. ;)
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
29 Dec 2009 - 12:45 pm | परिकथेतील राजकुमार
अहो देवबाप्पा मी तुमच्याच कंपुतला असल्याने तुमचा टीआरपी वाढल्यास मला आनंदच होईल.
तुम्ही संपादक आहात म्हणुन अशी टिपणी का केलीत असे माझे म्हणणेच न्हवते. एक सदस्य ह्या नात्यानीच मी तुमच्या टिपणीकडे बघितले होते. माननीय श्री. नील हे माझे सध्या तरी निव्वळ परिचीत आहेत. पुढील भविष्यात आमची गाढ मैत्री अथवा शत्रुत्व देखील होउ शकते :) त्यामुळे ते माझे मित्र वगैरे असल्याने त्यांना आपण दिलेला 'सल्ला' मला आवडला नाही असे म्हणणे चुक ठरेल. त्यांच्या बाबत जे घडले ते चुकीचे घडले असे मला वाटल्याने मी माझा प्रतिसाद इथे दिला. हेच दुसर्या कोणा सदस्याबाबत घडले असते तरी देखील मी प्रतिसाद दिलाच असता. विनाकारण एकाद्या सदस्यास मानहानीकारक बोलणे वा त्याच्या अनिवासी असल्याचा उल्लेख करणे हे चुकच आहे. कधीकधी तर हे प्रकार म्हणजे "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" असे वाटतात.
अवांतर :- माननीय श्री. नील मी आपली फुकटची वकीली केल्याबद्दल आपण 'तिकडुन' येताना मला काहितरी भेटवस्तु आणालच. त्यासाठी आधीच धन्यवाद. 'इकडे' येताना क्रुपया झेंड्याची चड्डी घालु नये अशी कळकळीची विनंती. अॅडी जोशी नावाच्या इसमाकडून धोका संभवतो.
पाताळनिवासी
©º°¨¨°º© परिकथेतला राक्षस ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Dec 2009 - 1:23 pm | प्रमोद देव
छान छान! :)
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
29 Dec 2009 - 9:28 pm | Nile
अवांतरासहीत प्रतिसादाची दखल घेतली आहे. झेंड्याची चड्डी अॅडींनाच भेट म्हणुन आणावी का असा विचार करत होतो. ;)
29 Dec 2009 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे
या पुर्वीच्या प्रतिसादात दुवा दिला होता. बहुतेकांनी वाचलेला दिसत नाही
प्रतिक्रिया १
प्रतिक्रिया २
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
29 Dec 2009 - 11:42 am | शक्तिमान
तरी पाषाणभेद यांच्या सूचनेनुसार मी काही फोटोस येथे डकवत आहे..
"बॅटल ऑफ गळा आणि मांजा इ.स. २००१"
29 Dec 2009 - 9:26 pm | Nile
तुम्ही अजुन आहात की? शंका नको हो!
29 Dec 2009 - 10:23 pm | पाषाणभेद
हा प्रश्न विचारून तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे निळे साहेब? ते आहेत हे त्यांच्या वरच्या प्रतिसादाच्याही आधी आलेल्या प्रतिसादाने सिद्ध झालेले आहे. अन तुम्ही आता परत "तुम्ही अजुन आहात की" अशी शंका उपस्थित करून वेगळाच अर्थ आम्हाला शोधायचे काम करायला लावत आहात. खोड्या, कुचाळकी काढा पण असला भलता अर्थ निघेल असे काही वक्तव्य करू नका.
शक्तिमानांनी वरील फोटो तुमच्या शंकेच्याच समाधानार्थ लावलेले आहेत. त्यात काही गैर नाही. मान्य आहे, तुमच्या बोलण्यात त्यांचे कौतूक आहे, तसे असेल तर तसे भासू द्या. वेगळे अर्थ निघतील अन भांडण, गैरसमज वाढेल असे काही लिहू नका.
दादा कोंडकेंच्या चित्रपटातील वाक्य आहे, "मराठी भाषा वळवावी तशी वळती, पळवावी तशी पळती अन तळावे तशी तळती".
धन्यवाद.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 12:16 pm | टारझन
माझ्या काही शंका :
१. मामासाहेबांना भाची मृत झाली हे पार घरी गेल्यावर कळलं ?
२. भाची कुठे बसली होती ? मामांपेचा तिची हाईट कमीच असावी. त्यामुळे मामाला त्या मांजाने कापायला हवं होतं ..
३. भाचीचा गळा कापला गेला म्हणता ? आहो ब्लड प्रेशर किती असतो ? रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या कशा नाही मग ?
४. मांजाला दोन्ही टोकांनी एवढा टाईट पणे पकडल्या गेले होते ? की एवढा मोठा ऑब्जेक्ट(पक्षी: गळा) कापू शकला ?
५. साधी पिन टोचली .. तरी माणूस विव्हळतो. गळा काय विदिन अ फ्लॅश कापला गेला ? आणि तेवढयात चक्क चकार ही निघला नाही ?
स्पष्टपणे सांगायचं झालं तर ही ण्युज काही पचली नाही.
"जाता जाता" च्या कोलन मधे एखाद हाजमोलाचं चित्र अपलोड करायला हरकत नव्हती. वादंच संभवले नसते :)
देव काकांचा "असा" प्रतिसाद पाहून आश्वर्य मात्र बिल्कुल वाटलं नाही .
चालू द्या ..
- अवांतराचे पैजार
29 Dec 2009 - 2:39 pm | पाषाणभेद
वर आलेली लोकसत्तातील बातमीही याच प्रकारातील आहे. ती बातमी पाकिस्थानातील आहे. २००४ सालातील आहे. बाकी एखादा माणूस बसमधल्या अपघातात मरतो त्याला रक्तस्तावाने मेला असे म्हणत नाही. मी बातमी सांगीतलेली खरी आहे. उगाचच त्यात खुसपट काढू नका.
मुलीच्या घडलेल्या बातमीबाबत पोलिसी पंचनाम्यासारखे प्रश्न बंद करा. असल्या घटना मांजाच्याबाबतीत घडतात हे भारतिय सत्य आहे.
टारझन, ही बातमी पेपरात आलेली होती. मी काही तयार केलेली नाही. तसे पटत नसल्यास प्रयोग करून पहायला हरकत नाही.
अन विमान अपघाताबाबतीत वरील लिंकांचाही असलाच विचार व्हावा.
बाकी माझे निळेंबाबतीत किंवा मिपावरील कोणत्याच सभासदाबाबतीत वैयक्तिक मतभेद नाहित.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 6:32 pm | टारझन
एवढं रक्त जाळून केलेल्या खुलाश्याबद्दल धन्यवाद पासाण !
प्रयोगासाठी इथेच उंदीर शोधतोय :) सापडला की प्रयोग करू :)
विमानाच्या दुव्याबरोबर आपला ही विचार करतोय :) (प्रयोगासाठी हो :) )
असो .. बाकी आम्ही मात्र कधीच म्हंटलो नव्हतो बरं .. तुम्ही मन के बातां लिहीता म्हणून :) आपण एक आदर्श लेखक आहात.
( षायंटिष्ट )
|| थर्डक्लास ||
29 Dec 2009 - 5:31 pm | प्रकाश घाटपांडे
माझी बायको नोंदणी खात्यात नोकरी करीत असताना एका बाईचा नवरा स्कूटर वरुन जाताना पतंगाचा मांजा गळ्याला लागुन गळा चिरला गेला व त्याचा उपचाराला नेईपर्यंतच मृत्यु झाला होता. पुण्यातील ही जुनी घटना आहे. त्या बाईंना शासनाने नवर्याच्या जागी नोकरीला घेतल होत. शासनात अनुकंपा तत्वावर असं नोकरीला घेतल जात.
अपघात अनेक होतात म्हणुन प्रत्येक अपघातात मृत्यु होतोच अस नाही. दगड वर्मी लागुन देखील मृत्यु होउ शकतो. श्रीराम लागुंचा मुलगा तन्वीर असाच ट्रेन मध्ये दगड लागुन गेला. ट्रेनचा वेग, दगडाचा वेग, अनेक डब्यातुन नेमका खिडकीतुन त्याला आत येण्यास वाव मिळण, आतील अनेक लोकांपैकी फक्त त्यालाच लागणं, तेही वर्मी लागण असे अनेक घटक जमून आले व हा दुर्योग घडुन गेला.
श्रीराम लागुंना लोक म्हणाले कि तुम्ही देव मानीत नाही ना म्हणुन तुम्हाला देवानी ही शिक्षा केली. त्यावर लागु म्हणाले जर तो देव हा जर अशी शिक्षा करीत असेल तर तो देव कसला? त्याला राक्षस म्हटल पाहिजे.
शब्दोच्छल करण्यापेक्षा त्यातील आशय लक्षात घ्या.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
29 Dec 2009 - 5:48 pm | चिरोटा
मीही त्या ट्रेन मध्ये बाजुच्या डब्यात होतो. १९९४ साली बहुतेक. प्रगती एक्स्प्रेसमध्ये,मुंबईहुन पुण्याला जाताना.दगड लहान होता,डोक्याच्या मागच्या बाजुस लागला होता.लागताक्षणीच तो बेशुद्ध पड्ला होता.एवढ्या लहान दगडाने असे कसे होईल म्हणून डब्यातल्या लोकांनाही आश्चर्य वाटले होते.
भेंडी
P = NP
29 Dec 2009 - 6:03 pm | कानडाऊ योगेशु
जर पाहीला असेल तर साध्या साध्या गोष्टींमुळे एखादी दुर्घटना कशी घडु शकते ह्याचा अंदाज येऊ शकतो.
केवळ मांज्यामुळे मृत्यु झाला ह्यामध्ये अशीही शक्यता असु शकते की मांजा चुकविणाच्या नादात वा मांज्या लुटणार्या मुलांना चुकविणाच्या नादात अशी दुर्घटना घडली.
दुचाकी चालवणार्यांना तर एकदम समोर आलेल्या अशा गोष्टींमुळे एकदम बिचकायला होते आणि एकदम तोलही जाऊ शकतो.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
29 Dec 2009 - 7:48 pm | पाषाणभेद
हा लेख ई सकाळ मध्येही आलेला आहे. या पुढील वाचकांनी त्याचा दुवाही इतरत्र वापरायला हरकत नाही. एका अर्थाने माझ्या अनुभवावर शिक्कामोर्तबच झाले आहे. असो.
दिलेल्या प्रतिसादातून कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नव्हता. ह्या धाग्याचा जनजागृतीसाठी उपयोग झाला तर मला आनंदच होईल.
पतंग उडणे ही एक सायंटीफिक प्रक्रिया समजली तर मला वाटते गळा कापणे (म्हणजे तलवारीसारखे शीर धडावेगळे नव्हे) ही प्रक्रियाही समजता येईल.
अवांतरः मी शाकाहारी आहे. पण काल मी एका मटणाच्या दुकानासमोरून गेलो होतो. तेथे एक बकरा तडफड करत होता. खाटकाने चालवलेला सुरा निट न चालवल्यागेल्याने त्याचे मुंडके धडावेगळे झाले नव्हते. एका सुर्याच्या भक्कम वारानेही त्या बकर्याचे शीर धडावेगळे झालेले नव्हते. तो मरणासाठी तडफडत होता. सांगायचा मुद्दा मांजा गळ्याला लागला तर शीर हमखास धडावेगळे होणार नाही पण त्यामुळे 'गळा कापला जावून' (हेच म्हणू शकतो आपण) मृत्यू येवू शकतो व ह्या घटणांचे पुरावे हमखास आहेत.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पतंग उडवतांना अनेक अपघात होतात. मांजाने बोट कापणे, पतंग कटल्यावर पतंगाच्या मागे धावतांना पोरं गाडीला धडकणे, मांजा गळ्यात अटकणे, इत्यादी.
पतंग उडवतांना काळजी घेतली पाहिजे, हा लेखाचा संदेश अगदी योग्यच.
-दिलीप बिरुटे
29 Dec 2009 - 11:38 pm | अशोक पतिल
वरील सर्व प्रतीक्रिया जरी तुर्तास बाजुला ठेवल्या , लेखका ने ज्या तळमळीने पतन्गा च्या मांजा मुळे होनार्या अपघात विष् यि लिहिले आहे , त्या बद्द्ल धन्यवाद . शब्दोच्छल करण्यापेक्षा त्यातील आशय लक्षात घ्या.
-अशोक
30 Dec 2009 - 8:50 am | sujay
लेखका ने ज्या तळमळीने पतन्गा च्या मांजा मुळे होनार्या अपघात विष् यि लिहिले आहे , त्या बद्द्ल धन्यवाद
+१
आईला ते पाभे यवड पोटतिडकीन सांगून राह्यले अन लोक तेच्यावरच अविश्वास दाखवू लागले ना बाप्पा.
30 Dec 2009 - 9:20 am | पाषाणभेद
पुल्ढ्या टायमाला माझ्याबरूबर एखांदा आपघात व्हत आसल तव्हा आधीच कॅमेरा नेईल आन जसा आपघात व्हयील ना तसे त्याच्यावाले फटू काढाया लागल. म्हंजे कसं इंन्शूरंस वाल्यांच बी काम वाचल आन माझ्याकडं त्याच्यावाले फटू बी रातील पुराव्यासंगट.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
हाय काय आन नाय काय.
------------------------
या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे.
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
16 Jan 2010 - 10:00 pm | पाषाणभेद
आजच्याच दैनिक लोकमतधील बातमी.
दैनिक लोकमत दि. १६ जानेवारी २०१० (नाशिक आवृत्ती) आहे. ही बातमी हार्डकॉपी तसेच ऑनलाईन आवृत्तीमध्येही आलेली आहे.
त्या बातमीची लिंक मी देत आहे.
http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=NashikEdition-6-2-1...
पण तो फाँन्ट युनीकोड नसल्याने कोणाला वाचता येणार नाही म्हणून मी ती बातमी जशीच्या तशी येथे लिहीत आहे:
------------------------------------------------------------
दै. लोकमत : नाशिक (शहर आवृत्ती) दि. १६ जानेवारी २०१०:
नाशिक:- यंदाच्या पतंगोत्सवात बाजारात आलेल्या नॉयलॉन धाग्यामुळे अनेकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सिडकोतील वृत्तपत्र विक्रेते अरूण शिंदे मकरसंक्रांतीच्या दिवशी पवननगरकडे जात असतांना पतंगाचा नॉयलॉन प्रकारचा मांजा त्यांच्या मानेला अडकून मोठी जखम झाली. यात शिंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेतून रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिडको विभागाचे सरचिटणीस बाळासाहेब गिते यांच्या मुलाच्या करंगळीला नॉयलॉनच्या धाग्याने दुखापत झाली. नॉयलॉनच्या धाग्यावर बंदी घालण्याची मागणी अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गांधीनगर नाका येथे एका वृद्धाचा पतंगाच्या मांजाने जबडा फाटल्याची घटना घडली. सदर व्यक्तीला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सातपूर आयटीआयजवळ कामावर जात असतांना मायको कामगार सुनील कुमावत यांच्या गळ्यात पतंगाचा घागा अडकल्याने गळ्याला जखम झाली. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
------------------------------------------------------------
ही तर मी वाचलेली स्थानीक बातमी होती. संपुर्ण भारतात अशा किती घटना घडल्या असतील? त्यात कोणी दुर्दैवी जखमी होवून मृत्यूदेखील पावले असतील.
या बातमीत नॉयलॉन मांजाचा उल्लेख आलेला आहे. तत्राप साध्या धाग्याचा मांजाही तितकाच धोकेदायक असल्याचे माझ्या बाबतीत सिद्ध झालेले होते. नॉयलॉनच्या मांजाचे प्रस्थ अलीकडील काळातील आहे. (फारतर हे एखादे वर्ष). मी वर उल्लेखीलेल्या घटनांत तरी साधाच मांजा तितकाच धोकेदायक असल्याचे सिद्ध झालेले होते.
सदर घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मोटरसायकलस्वारांची जनजागृती झाली पाहीजे.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
16 Jan 2010 - 10:37 pm | अविनाशकुलकर्णी
सांगा पतंग कुणी हा पाहिला? ....मला वाटले कि शिक्षण सम्राट कुलगुरु भारति विद्यापिठ [डीम] डोक्टर पतंग राव कदमावर लेख आहे....
पण हा पतंग भलताच निघाला.. असो छान आहे लेख.......
18 Jan 2010 - 9:32 pm | अमृतांजन
Five killed in state due to kite flying
18 Jan 2010 - 9:45 pm | अमृतांजन
पतंग उडवतांना मांजा अंगुलीच्या पहिल्या पेरातून पकडला जातो. त्याला काचेचे बारीक वस्त्रगाळ पुड करुन लावलेली काच असते.
वाऱ्याचा वेग, व पतंगाचा आकार ह्यावरुन पतंगाचा ताण वाढतो-कमी होतो. मांजामुळे बोट निश्चीत कापते व त्याची कोलवर जखम होते- जेव्हा कापायला सुरुवात होते तेव्हा आपण झटकन हातातून मांजा काढतो त्यामुळे थोडक्यात निभावते. अनेक पट्टीचे पतंगबाज बोटावर मेडीकल चिकटपट्ट्या लावून पतंग उडवतात. पतंग उडवतांना मांजा नाजूकपणे बोटात धरलेला असतो त्यामुळे सहसा ढील देतांना व नुसता उडवतांना कापत नाही.
पण काटाकाटीच्या वेळी मांजाला ढील दिली जाते किंवा जोरजोरात मांजा स्वतःकडे खेचला जातो त्यामुळे अनेकदा अशा वेळी बोट कापते. (पण वर म्हणाल्यामुळे आपली रिऍकशन खूप वेगवान असते त्यामुळे बोटाला फारशी इजा होत नाही).
अहमदाबाद व इतर ठिकाणी पतंग उडवतानांचा मोठा फरक म्हणजे गोत बसल्यावर, अहमदाबाद मधे मांजा स्वतःकडे ओढला जातो- इतर ठिकाणी ढील देतात.
जेव्हा पतंग कटतो, तेव्हा ज्याचा कटला आहे तो मांजा भराभरा ओढून घेतो, नाहीतर आकाशातून तो खाली स्वैरपणे खाली येतांना इतरांच्या हाती मांजा लागल्यास ते लोक तो मांजा लुटतात. अशा वेळी दोन्ही बाजूची लोकं मांजा ओढत असल्यामुळे त्याची एक ताणलेली दोरी होते व अशावेळी नेमका कोणाच्या गळ्यावर तो आला तर खैर नाही.
गळा कापायच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यातील व्यक्ती एखाद्या वाहनावरुन जात होत्या. त्यावेळेस त्यांना रिऍक्शनला वेळही मिळत नाही. एकतर ते थोड्या का होईना वेगात पुढे जात असतात व दोन्ही हात हॅन्डलवर असतात. त्यांनी काही करण्याआधीच बराच उशीर झालेला असतो.
18 Jan 2010 - 10:12 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री/ सौ अमृतांजन, अहो एकाच प्रतिक्रियेत माहिती द्या. पन्नास प्रतिसाद झाल्यावर धागा उघडण्याची इच्छा होत नाही.
18 Jan 2010 - 10:16 pm | अमृतांजन
अहो जसजसा वेळ मिळतोय, प्रतिसाद टाकलेत. माझे काही लक्ष नव्हते ५० का किती प्रतिसाद होताहेत त्याकडे.
>>पन्नास प्रतिसाद झाल्यावर धागा उघडण्याची इच्छा होत नाही.>>
का?
18 Jan 2010 - 10:21 pm | अक्षय पुर्णपात्रे
पहिल्या पानावर प्रतिसाद नसल्यावर दुसर्या पानावर जा. तिथे शोधाशोध करा, हे कंटाळवाणे प्रकरण आहे.
18 Jan 2010 - 9:54 pm | अमृतांजन
घरी जर मांजा चांगल्यापद्धतीने केला-
१. वस्त्रगाळ काचेची पुड
२. सरस (सिरस)- हा एक चिकट डींक वस्त्रांच्या कारखान्यात वापरतात
३. १० गेज चा धागा
असे साहित्य घेऊन जर मांजा हळूहळू सुतवला तर तो वाळल्यानंतर दोन्ही हातांनी पकडून ताणला तर हात कापतो पण मांजा तुटत नाही.
18 Jan 2010 - 10:09 pm | अमृतांजन
बारीक कुटलेल्या काचेची भुकटी जर मायक्रोस्क्पोप खाली पाहीली तर काचेचे क्रिस्टल स्पष्टपणे दिसतात. त्याचा आकार जरी ओबडधोबड असला तरी त्यांच्या टोकांना तीच धारदार कडा असते.
18 Jan 2010 - 10:51 pm | पाषाणभेद
अमृतांजन यांचे महत्वपुर्ण व अभ्यासपुर्ण प्रतिसाद्स.
आजकाल बोटाला चिकटपट्या लावण्यापेक्षा गवंडी लोक वापरतात तसे बोटांना रबरी कव्हर लावून पतंग उडवतात.
पतंग उडवणार्यांना होणारी जखम जाणूनबुजून होते ते ठिक आहे. पण अजाणतेपणी होणार्या अपघातांचे काय? त्यांना काही कायदा नाही का?
>> >>पन्नास प्रतिसाद झाल्यावर धागा उघडण्याची इच्छा होत नाही.>>
काहीतरी माहितीपुर्ण वाचन करायचे म्हणजे थोडी मेहनत करावी लागतेच. चालायचेच.
![The universal symbol for diabetes](http://www.diabetesbluecircle.org/img/UNR.png)
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)